WEBVTT 00:00:01.750 --> 00:00:03.792 ख्रिस अँडरसन: डॉ. जेन गुडाल, आपले स्वागत. NOTE Paragraph 00:00:04.875 --> 00:00:06.143 जेन गुडाल: धन्यवाद. 00:00:06.167 --> 00:00:10.101 मला वाटतं, माझ्यासोबत मि. एच आहेत, हे लोकांना कळले पाहिजे. 00:00:10.125 --> 00:00:12.268 नाहीतर ही मुलाखत अपुरी राहील. 00:00:12.292 --> 00:00:14.417 कारण मि. एच यांना सगळे ओळखतात. NOTE Paragraph 00:00:16.083 --> 00:00:17.625 ख्रिस: हॅलो, मि. एच. 00:00:18.667 --> 00:00:20.934 १७ वर्षांपूर्वीच्या टेड व्याख्यानात आपण 00:00:20.958 --> 00:00:26.684 मानवाच्या निसर्गावरच्या अतिक्रमणाबद्दल धोक्याची सूचना दिली होती. 00:00:26.708 --> 00:00:28.559 आजची ही महामारी म्हणजे एक प्रकारे 00:00:28.583 --> 00:00:32.476 निसर्गाचा प्रतिहल्ला आहे, असे आपल्याला वाटते का? NOTE Paragraph 00:00:32.500 --> 00:00:37.559 गुडाल:हे अगदी स्पष्ट आहे, की 00:00:37.583 --> 00:00:42.518 करोना किंवा एच आय व्ही/एड्स यासारखे प्राणिजन्य रोग 00:00:42.542 --> 00:00:46.893 आणि प्राण्यांपासून उद्भवणारे सर्व प्रकारचे इतर रोग 00:00:46.917 --> 00:00:50.059 यांचा पर्यावरणाच्या हानीशी अंशतः संबंध आहे. 00:00:50.083 --> 00:00:54.059 प्राण्यांचे निवासस्थान नष्ट झाले, की ते दाटीवाटीने राहू लागतात. 00:00:54.083 --> 00:00:58.351 त्यामुळे काहीवेळा एखाद्या प्राणी प्रजातीत सामान्यपणे आढळणारा विषाणू, 00:00:58.375 --> 00:01:01.434 जो शेकडो वर्षे त्या प्रजातीत सहजपणे राहिला असेल, 00:01:01.458 --> 00:01:03.476 तो नव्या प्रजातीत संक्रमित होतो. 00:01:03.500 --> 00:01:08.643 याशिवाय, प्राणी मानवाच्या अधिक निकट संपर्कात येत आहेत. 00:01:08.667 --> 00:01:14.643 काहीवेळा यापैकी एखादा प्राणी -- ज्याला विषाणूची लागण झाली असेल -- 00:01:14.667 --> 00:01:18.893 तो विषाणूला मानवात संक्रमित होण्याची संधी देतो, 00:01:18.917 --> 00:01:22.976 आणि कोविड-१९ सारखा नवा रोग निर्माण करतो. 00:01:23.000 --> 00:01:25.018 याचबरोबर 00:01:25.042 --> 00:01:27.851 आपण प्राण्यांचा मोठा अनादर करत आहोत. 00:01:27.875 --> 00:01:29.518 आपण त्यांची शिकार करतो, 00:01:29.542 --> 00:01:31.851 त्यांना ठार मारतो, त्यांना खातो, 00:01:31.875 --> 00:01:33.393 त्यांचा विक्रय करतो, 00:01:33.417 --> 00:01:39.809 वन्यप्राण्यांच्या बाजारपेठेत पाठवतो, 00:01:39.833 --> 00:01:41.101 आशियामध्ये. 00:01:41.125 --> 00:01:44.434 तिथे त्यांना छोट्याशा पिंजऱ्यांत, भयानक अवस्थेत कोंडून ठेवले जाते. 00:01:44.458 --> 00:01:48.768 तिथे मानवांमध्ये रक्त, मूत्र, विष्ठा याद्वारे संसर्ग फैलावतो. 00:01:48.792 --> 00:01:53.434 एका प्राण्यातून दुसऱ्यात किंवा मानवात विषाणूचा प्रसार होण्यासाठी 00:01:53.458 --> 00:01:55.184 ही परिस्थिती आदर्श ठरते. NOTE Paragraph 00:01:55.208 --> 00:01:59.476 ख्रिस: मला थोडं भूतकाळात डोकावायचे आहे. 00:01:59.500 --> 00:02:01.393 कारण आपली कहाणीच तशी अद्भुत आहे. 00:02:01.417 --> 00:02:05.518 म्हणजे १९६० च्या सुमारास, आजच्यापेक्षा कट्टर स्त्रीविरोधी वातावरणात 00:02:05.542 --> 00:02:08.268 आपण मार्ग काढू शकलात, 00:02:08.292 --> 00:02:11.643 जगातल्या आघाडीच्या शास्त्रज्ञांपैकी एक ठरलात, 00:02:11.667 --> 00:02:15.184 चिंपांझींबद्दल एकामागून एक आश्चर्यजनक शोध लावलेत, 00:02:15.208 --> 00:02:18.268 म्हणजे त्यांनी साधनांचा केलेला वापर, आणि असेच इतर अनेक शोध. 00:02:18.292 --> 00:02:20.893 हे यश आपल्यामधल्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे मिळाले, 00:02:20.917 --> 00:02:23.976 असे आपल्याला वाटते? NOTE Paragraph 00:02:24.000 --> 00:02:27.226 गुडाल: प्राण्यांविषयी प्रेम घेऊनच मी जन्माला आले. 00:02:27.250 --> 00:02:30.393 आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आईने मला खूप पाठिंबा दिला. 00:02:30.417 --> 00:02:33.059 माझ्या अंथरुणात गांडूळ पाहून ती चिडली नाही. 00:02:33.083 --> 00:02:35.559 हे बागेत असायला हवेत, इतकेच म्हणाली. 00:02:35.583 --> 00:02:38.309 मी चार तास गायब होते, तेव्हाही ती चिडली नाही. 00:02:38.333 --> 00:02:41.268 तिने पोलिसांना फोन केला. मी खुराड्यात बसून राहिले होते. 00:02:41.292 --> 00:02:44.768 कारण अंडे कोणत्या भोकातून बाहेर येते ते मला कोणी सांगत नव्हते. NOTE Paragraph 00:02:44.792 --> 00:02:47.059 शास्त्रज्ञ व्हावे,असे माझे स्वप्न नव्हते. 00:02:47.083 --> 00:02:49.476 कारण स्त्रिया अशा प्रकारचे काही करत नसत. 00:02:49.500 --> 00:02:52.726 खरे तर त्याकाळी कोणी पुरुषही असे काही करत नव्हते. 00:02:52.750 --> 00:02:54.684 सगळे मला हसले. फक्त आई सोडून. 00:02:54.708 --> 00:02:58.393 ती म्हणाली, "तुला हे खरोखर करायचे असेल, तर प्रचंड कष्ट करावे लागतील. 00:02:58.417 --> 00:03:00.143 प्रत्येक संधीचा फायदा घ्यावा लागेल. 00:03:00.167 --> 00:03:02.393 हार मानली नाहीस, तर कदाचित तुला मार्ग सापडेल." NOTE Paragraph 00:03:02.417 --> 00:03:06.518 ख्रिस: आणि कसा कोण जाणे, आपण चिंपांझींचा विश्वास संपादन केलात. 00:03:06.542 --> 00:03:10.292 हे पूर्वी कोणालाच जमले नव्हते. 00:03:11.167 --> 00:03:15.809 मागे वळून पाहताना आनंदाचे कोणते क्षण आठवतात? 00:03:15.833 --> 00:03:19.417 किंवा अजून चिंपांझींबद्दल लोकांना न कळणारे असे काही आहे का? NOTE Paragraph 00:03:20.333 --> 00:03:24.309 गुडाल: तुम्ही म्हणता, "कोणीच न पाहिलेले मी पाहिले, 00:03:24.333 --> 00:03:25.601 विश्वास संपादन केला." 00:03:25.625 --> 00:03:27.226 इतर कोणी प्रयत्नच केला नव्हता. 00:03:27.250 --> 00:03:29.018 खरंच सांगते. 00:03:29.042 --> 00:03:34.018 मी त्याच पद्धती वापरल्या, 00:03:34.042 --> 00:03:38.601 ज्या वापरून मी लहानपणी घराभोवतीच्या प्राण्यांचा अभ्यास करत असे. 00:03:38.625 --> 00:03:40.184 शांतपणे बसून राहणे. 00:03:40.208 --> 00:03:42.643 भर्रकन प्राण्यांच्या फार जवळ न जाणे. 00:03:42.667 --> 00:03:47.226 पण ते कठीण होते. कारण फक्त सहा महिन्यांपुरते पैसे होते. 00:03:47.250 --> 00:03:49.601 कल्पना करा, पैसे मिळवणे किती कठीण असेल. 00:03:49.625 --> 00:03:51.643 एका तरुण मुलीला, जिच्याजवळ पदवीही नाही, 00:03:51.667 --> 00:03:55.434 काहीतरी विचित्र करण्यासाठी, जंगलात जाऊन शांत बसून राहण्यासाठी पैसे. 00:03:55.458 --> 00:03:56.934 पण शेवटी 00:03:56.958 --> 00:04:00.976 एका अमेरिकन परोपकारी व्यक्तीकडून सहा महिन्यांपुरते पैसे मिळाले. 00:04:01.000 --> 00:04:04.934 कालांतराने आपण चिंपांझीचा विश्वास कमावू, हे मला ठाऊक होते. 00:04:04.958 --> 00:04:06.476 पण माझ्याजवळ वेळ होता का? 00:04:06.500 --> 00:04:11.018 हळूहळू महिने उलटले, आणि शेवटी सुमारे चार महिन्यांनंतर 00:04:11.042 --> 00:04:13.809 एका चिंपांझीची भीती चेपली. 00:04:13.833 --> 00:04:16.934 आणि एका प्रसंगी त्याच चिंपांझीला मी पाहिले -- 00:04:16.958 --> 00:04:20.143 अजून मी फार जवळ गेले नव्हते, पण माझ्याजवळ दुर्बीण होती -- 00:04:20.167 --> 00:04:25.309 वाळवी शोधण्यासाठी साधने तयार करून तो ती वापरत होता. 00:04:25.333 --> 00:04:28.143 मला आश्चर्याचा धक्का बसला नाही, 00:04:28.167 --> 00:04:32.143 कारण बंदिवासातील चिंपांझी काय करू शकतात ते मी वाचले होते -- 00:04:32.167 --> 00:04:34.184 पण मला वैज्ञानिक मत ठाऊक होते. ते असे, की 00:04:34.208 --> 00:04:37.559 मानव, फक्त मानवच साधने निर्माण करतो आणि त्यांचा वापर करतो. 00:04:37.583 --> 00:04:40.809 [डॉ. लुईस] लीकींना किती आनंद होईल, ते मला ठाऊक होते. 00:04:40.833 --> 00:04:42.559 या निरीक्षणामुळे 00:04:42.583 --> 00:04:45.643 त्यांना नॅशनल जॉग्राफिककडे जाता आले. 00:04:45.667 --> 00:04:49.726 आणि त्यांचे उत्तर आले, "ठीक आहे, आम्ही या संशोधनासाठी साहाय्य करत राहू." 00:04:49.750 --> 00:04:53.893 मग त्यांनी ह्युगो व्हान लाविक या छायाचित्रकार-चित्रपटनिर्मात्याला पाठवले. 00:04:53.917 --> 00:04:56.559 माझ्या निरीक्षणाची नोंद करण्यासाठी. 00:04:56.583 --> 00:05:01.018 अनेक शास्त्रज्ञ साधन वापरावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. 00:05:01.042 --> 00:05:04.101 खरेच, त्यातला एक म्हणाला, की मी चिंपांझींना शिकवले असले पाहिजे. NOTE Paragraph 00:05:04.125 --> 00:05:06.018 (हशा) NOTE Paragraph 00:05:06.042 --> 00:05:08.934 पण मी त्यांच्याजवळ जात नव्हते, म्हणजे हा चमत्कार असावा. 00:05:08.958 --> 00:05:11.559 पण ह्युगोची चित्रफीत पाहिल्यावर, 00:05:11.583 --> 00:05:16.018 आणि मी केलेली चिंपांझींच्या वर्तनाची वर्णने ऐकल्यावर 00:05:16.042 --> 00:05:19.351 शास्त्रज्ञांना आपले मत बदलायला सुरुवात करावी लागली. NOTE Paragraph 00:05:19.375 --> 00:05:22.018 ख्रिस: आणि त्यानंतर आपण आणखी अनेक शोध लावलेत. 00:05:22.042 --> 00:05:26.601 त्यामुळे चिंपांझींचे मानवाशी अविश्वसनीय असे जवळचे नाते सिद्ध झाले. 00:05:26.625 --> 00:05:29.976 चिंपांझींना विनोदाचे अंग असते असे तुम्ही कुठेतरी म्हटल्याचे आठवते. 00:05:30.000 --> 00:05:32.684 ते कुठे व्यक्त झालेले आपण पाहिले आहे का? NOTE Paragraph 00:05:32.708 --> 00:05:36.934 गुडाल: त्यांच्या खेळात ते दिसून येते. 00:05:36.958 --> 00:05:39.393 एखादा मोठा चिंपांझी छोट्याशी खेळत असतो. 00:05:39.417 --> 00:05:41.809 छोटा झाडाभोवती वेलीमागे जात असतो. 00:05:41.833 --> 00:05:44.684 दरवेळी छोटा ती वेल पकडणार, 00:05:44.708 --> 00:05:46.684 तेवढ्यात मोठा ती ओढून दूर खेचतो. 00:05:46.708 --> 00:05:48.476 छोटा रडू लागतो, 00:05:48.500 --> 00:05:50.268 तर मोठा हसू लागतो. 00:05:50.292 --> 00:05:51.750 यावरून समजते. NOTE Paragraph 00:05:54.417 --> 00:05:59.809 ख्रिस: आणि नंतर आपण फार क्लेशकारक असे काही पाहिलेत. 00:05:59.833 --> 00:06:04.559 काही प्रसंगी आपण चिंपांझींच्या टोळ्या, जमाती, गट, 00:06:04.583 --> 00:06:10.684 एकमेकांशी क्रूरपणे, हिंसकपणे वागताना पाहिलेत. 00:06:10.708 --> 00:06:14.351 याचा अर्थ आपण कसा लावला हे मला जाणून घ्यायचे आहे. 00:06:14.375 --> 00:06:17.601 त्यांना पाहून आपल्याला मानवाबद्दल निराशा वाटली का? 00:06:17.625 --> 00:06:20.149 कारण मानवाशी त्यांचे जवळचे नाते आहे. 00:06:20.173 --> 00:06:23.976 सर्व वानर जमातींमध्ये अटळपणे कोणत्या तरी स्वरूपात 00:06:24.000 --> 00:06:27.375 हिंसा असणार, असे वाटले का? NOTE Paragraph 00:06:28.375 --> 00:06:30.976 गुडाल: तशी ती आहे, हे तर उघड आहे. 00:06:31.000 --> 00:06:35.643 मानवी क्रौर्याशी माझा प्रथम संबंध आला, 00:06:35.667 --> 00:06:37.309 तो युद्ध संपल्यावर, 00:06:37.333 --> 00:06:40.101 ज्यूंच्या संहाराची चित्रे पाहताना. 00:06:40.125 --> 00:06:42.726 आणि त्यामुळे मला मोठा धक्का बसला. 00:06:42.750 --> 00:06:44.018 त्यामुळे मी बदलले. 00:06:44.042 --> 00:06:46.351 मला वाटतं, त्यावेळी मी दहा वर्षांची होते. 00:06:46.375 --> 00:06:48.851 आणि जेव्हा मला चिंपांझींमधल्या 00:06:48.875 --> 00:06:52.018 हिंसेची झलक दिसली, तेव्हा वाटलं, की 00:06:52.042 --> 00:06:54.559 ते आपल्यासारखेच पण जास्त चांगले आहेत. 00:06:54.583 --> 00:06:57.143 मग समजले, की माझ्या कल्पनेपेक्षा 00:06:57.167 --> 00:06:58.684 आपल्यात जास्त साम्य आहे. 00:06:58.708 --> 00:07:02.684 १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला 00:07:02.708 --> 00:07:03.976 हे फार विचित्र वाटले. 00:07:04.000 --> 00:07:05.601 आक्रमकता ही जन्मजात असते, 00:07:05.625 --> 00:07:09.726 की आत्मसात केलेली असते याबद्दल मोठा वाद होता. 00:07:09.750 --> 00:07:12.434 आणि त्याला राजकीय वळण लागले. 00:07:12.458 --> 00:07:15.893 तो खराच मोठा विचित्र काळ होता. 00:07:15.917 --> 00:07:17.559 मी पुढे सरून सांगत होते, 00:07:17.583 --> 00:07:20.143 "नाही. मला वाटते, आक्रमकता हा नक्कीच 00:07:20.167 --> 00:07:24.268 आपल्या नैसर्गिक वर्तणुकींच्या पटलामधला एक भाग आहे." 00:07:24.292 --> 00:07:29.934 एका आदरणीय शास्त्रज्ञाला मी त्यांचे खरेखुरे मत विचारले. 00:07:29.958 --> 00:07:32.351 कारण ते स्पष्ट सांगत होते, की 00:07:32.375 --> 00:07:33.851 आक्रमकता आत्मसात केलेली असते. 00:07:33.875 --> 00:07:38.018 आणि ते म्हणाले, "जेन, मला खरोखर काय वाटते याबद्दल मी न बोलणे चांगले." 00:07:38.042 --> 00:07:41.917 माझ्यासाठी विज्ञानाच्या दृष्टीने हा मोठाच धक्का होता. NOTE Paragraph 00:07:42.792 --> 00:07:47.351 ख्रिस: लहानपणापासून, जग सुंदर आहे असा माझा समज होता. 00:07:47.375 --> 00:07:52.893 फुलपाखरे, मधमाशा, फुले यांबद्दलचे अनेक सुंदर चित्रपट, 00:07:52.917 --> 00:07:55.851 अतिशय सुंदर असे निसर्गचित्र. 00:07:55.875 --> 00:08:01.893 अनेक पर्यावरण शास्त्रज्ञ बरेचदा असा पवित्रा घेतात, 00:08:01.917 --> 00:08:06.059 "होय, निसर्ग निर्मळ आहे. निसर्ग सुंदर आहे. मानव दुष्ट आहे." 00:08:06.083 --> 00:08:08.726 पण प्रत्यक्षात मात्र आपली निरीक्षणे निराळी असतात. 00:08:08.750 --> 00:08:11.601 निसर्गाच्या कोणत्याही घटकाकडे जास्त बारकाईने पाहता 00:08:11.625 --> 00:08:13.976 खरोखर भयंकर गोष्टी आढळतात. 00:08:14.000 --> 00:08:16.393 निसर्गाचा अर्थ आपण कसा लावता? आपल्याला काय वाटते? 00:08:16.417 --> 00:08:18.851 आपण त्याचा अर्थ कसा लावावा? NOTE Paragraph 00:08:18.875 --> 00:08:20.851 गुडाल: निसर्ग म्हणजे 00:08:20.875 --> 00:08:24.809 उत्क्रांतीचा संपूर्ण वर्णपट पाहता, 00:08:24.833 --> 00:08:28.518 एखादे आदिम स्वरूपातले ठिकाण.. 00:08:28.542 --> 00:08:33.143 माझ्या लहानपणी आफ्रिका अशी आदिम स्वरूपात होती. 00:08:33.167 --> 00:08:36.101 तिथे सर्वत्र प्राणी होते. 00:08:36.125 --> 00:08:40.018 आणि सिंहांनी शिकार केलेली मला कधीच आवडत नसे. 00:08:40.042 --> 00:08:42.559 पण त्यांना शिकार करावी लागते. तो त्यांचा धर्म आहे. 00:08:42.583 --> 00:08:46.393 त्यांनी प्राणी मारले नाहीत, तर ते स्वतः मरतील. 00:08:46.417 --> 00:08:50.101 आपण आणि प्राणी यांतला मोठा फरक, मला वाटते, 00:08:50.125 --> 00:08:56.018 ते जे काही करतात, तो त्यांचा धर्म असतो म्हणून करतात. 00:08:56.042 --> 00:08:59.393 आपण योजना आखून काम करू शकतो. 00:08:59.417 --> 00:09:01.184 आपल्या योजना फार निराळ्या असतात. 00:09:01.208 --> 00:09:05.226 आपण एखादे जंगल पूर्णपणे तोडण्याच्या योजना आखू शकतो, 00:09:05.250 --> 00:09:07.726 कारण आपल्याला लाकूड विकायचे असते, 00:09:07.750 --> 00:09:10.101 किंवा आणखी एखादा शॉपिंग मॉल बांधायचा असतो, 00:09:10.125 --> 00:09:11.393 वगैरे काहीतरी. 00:09:11.417 --> 00:09:16.143 आपण निसर्गाचा नाश करतो, युद्धे करतो. 00:09:16.167 --> 00:09:19.976 आपण असा दुष्टावा करू शकतो, कारण स्वतः आरामात बसून 00:09:20.000 --> 00:09:22.934 आपण दूरवर कोणाला तरी छळण्याची योजना आखू शकतो. 00:09:22.958 --> 00:09:24.226 हा दुष्टपणा आहे. 00:09:24.250 --> 00:09:27.893 चिंपांझींचे युद्ध आदिम प्रकारचे असते. 00:09:27.917 --> 00:09:29.476 ते अतिशय आक्रमक होऊ शकतात. 00:09:29.500 --> 00:09:30.893 पण ते क्षणिक असते. 00:09:30.917 --> 00:09:32.393 ती त्यांची भावना असते. 00:09:32.417 --> 00:09:34.809 एका भावनेला दिलेला तो प्रतिसाद असतो. NOTE Paragraph 00:09:34.833 --> 00:09:38.476 ख्रिस: आपल्या निरीक्षणानुसार चिंपांझींची प्रगती 00:09:38.500 --> 00:09:41.893 काही लोक ज्याला मानवी महाशक्ती म्हणतात 00:09:41.917 --> 00:09:43.643 तिच्याइतकी नाही. 00:09:43.667 --> 00:09:49.601 भविष्याचे तपशीलवार चित्र मनात पाहून 00:09:49.625 --> 00:09:52.393 मानव दीर्घकालीन योजना आखू शकतो. 00:09:52.417 --> 00:09:57.768 त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ शकतो. 00:09:57.792 --> 00:10:01.226 चिंपांझींबरोबर इतका काळ घालवलेल्या आपणासारख्या व्यक्तीलादेखील 00:10:01.250 --> 00:10:04.434 असे वाटते की हे निराळे कौशल्य आहे. 00:10:04.458 --> 00:10:06.601 आपण त्याची जबाबदारी घेऊन 00:10:06.625 --> 00:10:09.434 ते अधिक शहाणपणाने वापरले पाहिजे. NOTE Paragraph 00:10:09.458 --> 00:10:11.351 गुडाल: होय. मला स्वतःला असे वाटते -- 00:10:11.375 --> 00:10:13.684 म्हणजे याबद्दल बरीच चर्चा झाली आहे, 00:10:13.708 --> 00:10:17.601 पण मला वाटते, आपण दोघे ज्या पद्धतीने संवाद करत आहोत, 00:10:17.625 --> 00:10:19.393 ती पद्धत मानवाने निर्माण केली आहे. 00:10:19.417 --> 00:10:21.518 आपल्याजवळ शब्द आहेत. 00:10:21.542 --> 00:10:24.934 म्हणजे प्राण्यांमधला संवाद आपल्याला वाटतो त्यापेक्षा 00:10:24.958 --> 00:10:26.226 फार प्रगत आहे. 00:10:26.250 --> 00:10:28.226 चिंपांझी, गोरिला, ओरँगउटान 00:10:28.250 --> 00:10:31.708 हे बहिऱ्यांसाठीची मानवी खाणाखुणांची भाषा शिकू शकतात. 00:10:32.792 --> 00:10:38.226 आपली जी भाषा असेल, तीच शिकत आपण मोठे होतो. 00:10:38.250 --> 00:10:41.893 त्यामुळे तुम्ही कधीच ऐकल्या नसतील अशा गोष्टी मी तुम्हांला सांगू शकते. 00:10:41.917 --> 00:10:44.476 पण चिंपांझी तसे करू शकत नाहीत. 00:10:44.500 --> 00:10:49.726 आपण आपल्या मुलांना अमूर्त गोष्टी शिकवू शकतो. 00:10:49.750 --> 00:10:51.559 पण चिंपांझी तसे करू शकत नाहीत. 00:10:51.583 --> 00:10:55.268 हो, चिंपांझी सर्व प्रकारच्या चतुराईच्या गोष्टी करू शकतात. 00:10:55.292 --> 00:10:59.893 तसेच हत्ती, कावळे आणि ऑक्टोपससुद्धा करू शकतात. 00:10:59.917 --> 00:11:03.518 पण आपण दुसऱ्या ग्रहांवर जाणारी याने तयार करू शकतो. 00:11:03.542 --> 00:11:06.101 छायाचित्रे काढणारे छोटे यंत्रमानव निर्माण करू शकतो. 00:11:06.125 --> 00:11:10.893 आपण दोघे आपापल्या ठिकाणाहून एकमेकांशी बोलतो आहोत, 00:11:10.917 --> 00:11:13.059 ती अद्भुत पद्धत आपण शोधून काढली आहे. 00:11:13.083 --> 00:11:14.726 माझ्या लहानपणी 00:11:14.750 --> 00:11:17.559 टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता. 00:11:17.583 --> 00:11:19.434 संगणक नव्हते. 00:11:19.458 --> 00:11:20.893 ते जग फार निराळे होते. 00:11:20.917 --> 00:11:24.518 माझ्याजवळ होती फक्त पेन्सिल, पेन आणि वही. NOTE Paragraph 00:11:24.542 --> 00:11:27.393 ख्रिस: आपण पुन्हा निसर्गाबद्दलच्या प्रश्नाकडे वळू. 00:11:27.417 --> 00:11:28.989 मी याबद्दल पुष्कळ विचार करतो. 00:11:29.013 --> 00:11:32.263 प्रामाणिकपणे सांगतो, मी हे समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे. 00:11:33.208 --> 00:11:37.393 आपण, आणि मला आदरणीय असणाऱ्या अनेक लोकांनी 00:11:37.417 --> 00:11:44.226 निसर्गाची हानी होऊ न देणे या एका ध्यासापोटी इतके कार्य केले आहे. 00:11:44.250 --> 00:11:47.101 तर, ही गोष्ट शक्य आहे का, योग्य किंवा गरजेची आहे का: 00:11:47.125 --> 00:11:51.976 आपण एकाच वेळी दोन्ही बाजू स्वीकारू शकतो का, 00:11:52.000 --> 00:11:53.934 की निसर्गात अनेक भयंकर गोष्टी असतात, 00:11:53.958 --> 00:11:56.851 पण त्याचवेळी निसर्ग विलक्षण सुंदरही असतो. 00:11:56.875 --> 00:12:02.018 यापैकी काही सौंदर्य त्या भयंकरपणाच्या शक्यतेतून निर्माण होतं. 00:12:02.042 --> 00:12:06.934 ते आपले भान हरपण्याइतके सुंदर असते. 00:12:06.958 --> 00:12:10.684 आपण निसर्गाचा एक भाग आहोत. त्याशिवाय आपल्याला अस्तित्व नाही. 00:12:10.708 --> 00:12:13.143 मानवाला पूर्णत्व हवे असेल, तर प्रथम 00:12:13.167 --> 00:12:17.434 आपण निसर्गाला आपलेसे केले पाहिजे. त्याचा भाग झाले पाहिजे. बरोबर? 00:12:17.458 --> 00:12:22.226 हे नाते कोणत्या भाषेत मांडावे? आपण मला मार्गदर्शन करा. NOTE Paragraph 00:12:22.250 --> 00:12:26.351 गुडाल: मला वाटतं, एक समस्या अशी आहे, की आपली बुद्धी जशी विकसित झाली, 00:12:26.375 --> 00:12:29.018 तशी आपल्या उपयोगासाठी 00:12:29.042 --> 00:12:32.434 पर्यावरणात बदल घडवण्याची आपली क्षमता वाढत गेली, 00:12:32.458 --> 00:12:35.268 आपण शेती करून पीक घेऊ लागलो. 00:12:35.292 --> 00:12:38.476 त्या जागी पूर्वी जंगल किंवा वनराई होती. 00:12:38.500 --> 00:12:41.309 आपण आता त्याबद्दल बोलायला नको. 00:12:41.333 --> 00:12:44.893 पण अशी आहे आपली निसर्ग बदलण्याची क्षमता. 00:12:44.917 --> 00:12:49.351 आपण शहरांत आणि महानगरांत जास्त वस्ती करू लागलो, 00:12:49.375 --> 00:12:53.351 तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहू लागलो, 00:12:53.375 --> 00:12:56.976 त्यामुळे जास्त लोकांना निसर्गापासून ताटातूट झाल्यासारखे वाटू लागले. 00:12:57.000 --> 00:12:59.559 आज शेकडो, हजारो मुले 00:12:59.583 --> 00:13:01.309 शहराच्या आतल्या भागांत वाढताहेत. 00:13:01.333 --> 00:13:04.059 तिथे कोणत्याही प्रकारचा निसर्ग नाही. 00:13:04.083 --> 00:13:09.143 म्हणूनच हरित शहरांची मोहीम इतकी महत्त्वाची आहे. 00:13:09.167 --> 00:13:11.518 याबाबत प्रयोग झाले आहेत. 00:13:11.542 --> 00:13:14.809 मला वाटते शिकागोमध्ये असावेत. पण खात्री नाही. 00:13:14.833 --> 00:13:17.893 तिथे अनेक मोकळ्या जागा होत्या. 00:13:17.917 --> 00:13:21.684 हिंसाचार प्रबळ असणाऱ्या शहराच्या एका भागात. 00:13:21.708 --> 00:13:24.768 यापैकी काही जागा त्यांनी हरित केल्या. 00:13:24.792 --> 00:13:29.809 त्यांनी त्या मोकळ्या जागांमध्ये फुले, झाडे, झुडुपे लावली. 00:13:29.833 --> 00:13:33.184 आणि तिथले हिंसेचे प्रमाण एकदम कमी झाले. 00:13:33.208 --> 00:13:35.708 मग त्यांनी उरलेल्या अर्ध्या भागातही झाडे लावली. 00:13:36.917 --> 00:13:38.851 यावरून हे स्पष्ट होते. 00:13:38.875 --> 00:13:41.643 याखेरीज संशोधनातून असेही सिद्ध झाले आहे, की 00:13:41.667 --> 00:13:45.917 योग्य मानसिक वाढीसाठी मुलांना हरित निसर्गाची गरज असते. NOTE Paragraph 00:13:46.875 --> 00:13:50.101 तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण निसर्गाचा एक भाग आहोत. 00:13:50.125 --> 00:13:54.351 आणि आपण निसर्गाचा अनादर करत आहोत. 00:13:54.375 --> 00:13:57.309 हे आपल्या मुलांसाठी फार घातक आहे. 00:13:57.333 --> 00:13:58.809 आणि आपल्या नातवंडांसाठीही. 00:13:58.833 --> 00:14:02.851 कारण स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, हवामान आणि पावसाचे नियमन 00:14:02.875 --> 00:14:06.434 यासाठी आपण निसर्गावर अवलंबून असतो. 00:14:06.458 --> 00:14:09.226 आपण काय केले त्याकडे पहा. हवामान संकटाकडे पहा. 00:14:09.250 --> 00:14:11.476 हे आपल्यामुळे घडले. आपणच हे केले. NOTE Paragraph 00:14:11.500 --> 00:14:13.184 ख्रिस: सुमारे तीस वर्षांपूर्वी 00:14:13.208 --> 00:14:19.018 आपण वैज्ञानिक ते सामाजिक कार्यकर्ती असा बदल केलात. 00:14:19.042 --> 00:14:20.292 का? NOTE Paragraph 00:14:21.333 --> 00:14:26.809 गुडाल: १९८६ सालची विज्ञान परिषद. तोपर्यंत मला पी. एच.डी. मिळालेली होती. 00:14:26.833 --> 00:14:30.559 चिंपांझींचे वर्तन सभोवतालच्या परिसरासोबत कसे बदलते, 00:14:30.583 --> 00:14:32.143 याबद्दल परिषद होती. 00:14:32.167 --> 00:14:34.559 आफ्रिकाभर सहा ठिकाणी पाहणीच्या जागा होत्या. 00:14:34.583 --> 00:14:38.268 आम्हांला वाटले, या शास्त्रज्ञांना एकत्र आणू, 00:14:38.292 --> 00:14:39.684 आणि याचा शोध घेऊ. 00:14:39.708 --> 00:14:41.226 हे फार रंजक होते. 00:14:41.250 --> 00:14:43.893 पण यापैकी एक सत्र निसर्ग संरक्षणाबद्दल होते. 00:14:43.917 --> 00:14:47.768 आणि एक सत्र बंदिस्त अवस्थेतील प्राण्यांबद्दल होते. 00:14:47.792 --> 00:14:49.893 उदाहरणार्थ, वैद्यकीय संशोधनातील प्राणी. 00:14:49.917 --> 00:14:54.184 ही दोन सत्रे माझ्यासाठी धक्कादायक ठरली. 00:14:54.208 --> 00:14:56.768 एक वैज्ञानिक म्हणून मी परिषदेला गेले होते, 00:14:56.792 --> 00:14:58.351 कार्यकर्ती म्हणून बाहेर आले. 00:14:58.375 --> 00:15:02.184 हा निर्णय मी घेतला नाही. मनात आत काहीतरी घडलं. NOTE Paragraph 00:15:02.208 --> 00:15:05.726 ख्रिस: गेली चौतीस वर्षे 00:15:05.750 --> 00:15:08.434 मानव आणि निसर्गातले संबंध सुधारण्यासाठी 00:15:08.458 --> 00:15:11.750 आपण अथकपणे मोहीम राबवलीत. 00:15:12.667 --> 00:15:17.750 हे संबंध कसे असायला हवेत? NOTE Paragraph 00:15:19.000 --> 00:15:23.809 गुडाल: हे प्रश्न पुन्हापुन्हा समोर येतात. 00:15:23.833 --> 00:15:26.583 मानवाला राहण्यासाठी जागा लागते. 00:15:27.625 --> 00:15:29.726 पण मला वाटते, समस्या हीच आहे, की 00:15:29.750 --> 00:15:33.309 आपला सधन समाज 00:15:33.333 --> 00:15:34.726 अतिशय लोभी झाला आहे. 00:15:34.750 --> 00:15:40.018 खरोखर, मोठमोठी पटांगणे असणारी चार चार घरे कोणाला लागतात? 00:15:40.042 --> 00:15:43.684 आणखी एक शॉपिंग मॉल आपल्याला कशासाठी हवा असतो? 00:15:43.708 --> 00:15:45.434 आणखी असेच बरेच काही. 00:15:45.458 --> 00:15:50.434 आपण अल्पकाळचा आर्थिक फायदा पाहतो आहोत. 00:15:50.458 --> 00:15:53.518 पैसा हा उपासना करण्याचा देव झाला आहे. 00:15:53.542 --> 00:15:57.601 निसर्गाशी असलेले अस्तित्वाचे सर्व बंध आपण हरवून बसलो आहोत. 00:15:57.625 --> 00:16:03.351 म्हणून आपण अल्पकाळचा आर्थिक फायदा किंवा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. 00:16:03.375 --> 00:16:06.018 पृथ्वीचे संरक्षण 00:16:06.042 --> 00:16:08.083 किंवा आपल्या मुलांचे भविष्य याऐवजी. 00:16:09.000 --> 00:16:12.101 आता आपल्याला या गोष्टींची काळजी वाटत नाही. 00:16:12.125 --> 00:16:15.226 म्हणून, मी माझा लढा कधीच थांबवणार नाही. NOTE Paragraph 00:16:15.250 --> 00:16:19.059 ख्रिस: चिंपांझी संरक्षणाच्या आपल्या कामात 00:16:19.083 --> 00:16:24.268 आपण जनतेला केंद्रस्थानी ठेवले. 00:16:24.292 --> 00:16:26.393 स्थानिक जनतेचा सहभाग मिळवला. 00:16:26.417 --> 00:16:27.684 यात कितपत यश मिळाले? 00:16:27.708 --> 00:16:29.851 पृथ्वीचे यशस्वीपणे रक्षण करण्यासाठी 00:16:29.875 --> 00:16:32.934 हे गरजेचे आहे, असे आपल्याला वाटते का? NOTE Paragraph 00:16:32.958 --> 00:16:35.434 गुडाल: त्या सुप्रसिद्ध परिषदेनंतर मला वाटले, 00:16:35.458 --> 00:16:39.018 आफ्रिकेतले चिंपांझी नाहीसे का होताहेत, आणि जंगलांची काय परिस्थिती आहे 00:16:39.042 --> 00:16:40.893 याबद्दल जास्त जाणून घ्यायला हवे. 00:16:40.917 --> 00:16:45.976 मग मी थोडे पैसे जमवून चिंपांझी वस्तीच्या सहा देशांना भेट दिली. 00:16:46.000 --> 00:16:50.018 आणि चिंपांझींना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे समजून घेतले. 00:16:50.042 --> 00:16:52.809 मांसासाठी हत्या होणे, जिवंत प्राण्यांचा विक्रय, 00:16:52.833 --> 00:16:54.518 सापळ्यात पकडले जाणे, 00:16:54.542 --> 00:16:58.934 मानवी लोकसंख्येची वाढ 00:16:58.958 --> 00:17:02.684 आणि त्यामुळे त्यांची शेती, गुरे आणि वस्तीसाठी जास्त जमिनीची गरज. 00:17:02.708 --> 00:17:07.434 पण अनेक माणसांना सोसावे लागणारे हाल सुद्धा मी पाहत होते. 00:17:07.458 --> 00:17:11.018 अतोनात दारिद्र्य, आरोग्य आणि शिक्षण यांचा अभाव, 00:17:11.042 --> 00:17:13.518 जमिनीची धूप. 00:17:13.542 --> 00:17:18.518 गॉम्बेच्या छोट्याशा राष्ट्रीय उद्यानावरून विमानाने जात असताना हे विचार असह्य झाले. 00:17:18.542 --> 00:17:22.809 एकेकाळी आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत जाणारा हा 00:17:22.833 --> 00:17:24.101 विषुववृत्तीय जंगलपट्टा. 00:17:24.125 --> 00:17:25.434 आणि १९९० मध्ये 00:17:25.458 --> 00:17:29.101 उरले होते त्या जंगलाचे एक छोटेसे बेट. छोटेसे राष्ट्रीय उद्यान. 00:17:29.125 --> 00:17:31.018 सभोवतालच्या सगळ्या टेकड्या उजाड होत्या. 00:17:31.042 --> 00:17:32.768 त्यावेळी मला जोरदार धक्का बसला. 00:17:32.792 --> 00:17:34.601 आपण जर जनतेला 00:17:34.625 --> 00:17:36.893 पर्यावरणाची हानी न करता 00:17:36.917 --> 00:17:39.518 जगण्याच्या पद्धती शोधायला मदत केली नाही, 00:17:39.542 --> 00:17:42.226 तर आपण चिंपांझींना वाचवण्याचा प्रयत्न करूच शकत नाही. 00:17:42.250 --> 00:17:45.976 म्हणून जेन गुडाल संस्थेने "Take Care" हा कार्यक्रम सुरु केला. 00:17:46.000 --> 00:17:48.018 आम्ही त्याला "TACARE" म्हणतो. 00:17:48.042 --> 00:17:51.976 ही आमची निसर्ग संरक्षणाची पद्धत समाजावर आधारित आहे. 00:17:52.000 --> 00:17:54.101 ही सर्वसमावेशक आहे. 00:17:54.125 --> 00:17:57.351 निसर्ग संरक्षणाची साधने 00:17:57.375 --> 00:17:59.226 आम्ही गावकऱ्यांच्या हातात सोपवली आहेत. 00:17:59.250 --> 00:18:04.351 टांझानियामधले वन्य चिंपांझी आरक्षित जागेत राहत नाहीत. 00:18:04.375 --> 00:18:07.143 ते गावातल्या राखीव जंगलांत राहतात. 00:18:07.167 --> 00:18:12.434 लोक आता गावातल्या जंगलांवर नजर ठेवू लागले आहेत. 00:18:12.458 --> 00:18:14.684 आता त्यांना समजते, की 00:18:14.708 --> 00:18:18.268 जंगलांचे संरक्षण हे फक्त वन्यप्राण्यांसाठी नसून 00:18:18.292 --> 00:18:19.768 ते त्यांच्यासाठीदेखील आहे. 00:18:19.792 --> 00:18:22.226 जंगल ही त्यांची गरज आहे. 00:18:22.250 --> 00:18:23.601 त्यांना त्याचा अभिमान वाटतो. 00:18:23.625 --> 00:18:25.726 तिथले स्वयंसेवक कार्यशाळेत जातात. 00:18:25.750 --> 00:18:27.809 स्मार्टफोन कसे वापरावेत ते शिकतात. 00:18:27.833 --> 00:18:32.601 क्लाउड मध्ये माहिती अपलोड कशी करावी ते शिकतात. 00:18:32.625 --> 00:18:35.476 त्यामुळे सर्व काम पारदर्शी होते. 00:18:35.500 --> 00:18:37.643 झाडे पुन्हा उगवली आहेत. 00:18:37.667 --> 00:18:39.726 आता टेकड्या उजाड राहिल्या नाहीत. 00:18:39.750 --> 00:18:44.476 गॉम्बेभोवती एक मध्यवर्ती विभाग निर्माण करण्याचे त्यांनी ठरवले आहे. 00:18:44.500 --> 00:18:47.893 त्यामुळे चिंपांझींना १९९० पेक्षा जास्त मोठे जंगल उपलब्ध होईल. 00:18:47.917 --> 00:18:49.851 जंगलांमधले जोडमार्ग ते खुले करत आहेत. 00:18:49.875 --> 00:18:55.268 त्यामुळे विखुरलेल्या प्रजातींचा संबंध येईल जवळच्या नात्यात संबंध येणार नाही. 00:18:55.292 --> 00:18:58.434 होय, या पद्धतीला यश मिळाले आहे. आता ती आणखी सहा देशांत सुरु आहे. 00:18:58.458 --> 00:18:59.726 हीच पद्धत. NOTE Paragraph 00:18:59.750 --> 00:19:05.351 ख्रिस: आपण आपले असामान्य विचार न थकता जगात सर्वत्र पोहोचवता. 00:19:05.375 --> 00:19:07.309 इतका प्रवास करता. 00:19:07.333 --> 00:19:10.601 सगळीकडे व्याख्याने देता. सर्वत्र लोकांना प्रेरणा देता. 00:19:10.625 --> 00:19:15.601 आपल्याला ही ऊर्जा कुठून मिळते? 00:19:15.625 --> 00:19:17.268 या कार्याचा इतका उत्कट ध्यास, 00:19:17.292 --> 00:19:20.476 कारण हे काम थकवणारं आहे. 00:19:20.500 --> 00:19:23.018 मोठ्या समुदायासमोर दिलेले प्रत्येक व्याख्यान 00:19:23.042 --> 00:19:25.101 शारीरिक दृष्टया थकवून टाकते. 00:19:25.125 --> 00:19:28.143 तरीही, आपण अजूनही हे करताहात. 00:19:28.167 --> 00:19:30.125 आपण हे कसे करता? NOTE Paragraph 00:19:31.042 --> 00:19:36.393 गुडाल: तुम्हांला ठाऊक असेल, मी हट्टी आहे. मला हार मानणं आवडत नाही. 00:19:36.417 --> 00:19:41.684 मोठाल्या कंपन्यांचे अधिकारी 00:19:41.708 --> 00:19:43.226 जे जंगले नष्ट करतात, 00:19:43.250 --> 00:19:49.809 किंवा पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांचे निसर्ग रक्षणाचे नियम 00:19:49.833 --> 00:19:51.143 रद्द करणारे राजकारणी, 00:19:51.167 --> 00:19:53.976 मी कोणाबद्दल बोलते आहे तुम्ही जाणता. 00:19:54.000 --> 00:19:56.143 यांच्याविरुद्ध मी लढतच राहणार आहे. 00:19:56.167 --> 00:20:00.268 वन्यजीवनाविषयी मला काळजी आहे, तो माझा ध्यास आहे. 00:20:00.292 --> 00:20:02.976 मला निसर्गाचा ध्यास आहे. 00:20:03.000 --> 00:20:07.434 माझं जंगलांवर प्रेम आहे. त्यांचा नाश होताना पाहून मला दुःख वाटते. 00:20:07.458 --> 00:20:10.351 आणि मला मुलांविषयी फार आस्था वाटते. 00:20:10.375 --> 00:20:12.434 त्यांचे भवितव्य आपण हिरावून घेत आहोत. 00:20:12.458 --> 00:20:14.184 मी हार मानणार नाही. 00:20:14.208 --> 00:20:19.143 मला वाटते, माझ्याजवळ चांगली जनुके आहेत. ही देवाची देणगी आहे. 00:20:19.167 --> 00:20:22.768 आणि माझ्याजवळ जी दुसरी देणगी असल्याचे माझ्या लक्षात आले, 00:20:22.792 --> 00:20:24.226 ती म्हणजे संवाद. 00:20:24.250 --> 00:20:26.893 मग ते लिहिणे असो किंवा बोलणे. 00:20:26.917 --> 00:20:28.976 आपल्याला वाटते, 00:20:29.000 --> 00:20:31.893 असे जगभर फिरून काय होणार? 00:20:31.917 --> 00:20:35.018 पण दरवेळी मी व्याख्यान देते 00:20:35.042 --> 00:20:36.393 तेव्हा लोक सांगतात, 00:20:36.417 --> 00:20:38.768 "मी हार मानली होती. पण तुम्ही मला प्रेरणा दिलीत. 00:20:38.792 --> 00:20:41.059 आता मी माझा हातभार लावण्याची प्रतिज्ञा करतो." 00:20:41.083 --> 00:20:45.976 आणि "Roots and Shoots" ही मुलांची मोहीम आता पासष्ट देशांतून सुरु आहे. 00:20:46.000 --> 00:20:47.559 आणि त्यात वाढ होत आहे. 00:20:47.583 --> 00:20:48.851 सर्व वयोगट 00:20:48.875 --> 00:20:52.018 मानवाला, प्राण्यांना, पर्यावरणाला मदत करणारे प्रकल्प निवडताहेत. 00:20:52.042 --> 00:20:54.643 बाह्या सरसावून कामाला लागले आहेत. 00:20:54.667 --> 00:20:57.809 त्यांच्या डोळ्यांत एक चमक दिसते. त्यांना सांगायचं असतं, 00:20:57.833 --> 00:21:00.309 डॉ. जेन, पहा, आम्ही काय करतो आहोत 00:21:00.333 --> 00:21:02.101 पृथ्वीच्या रक्षणासाठी. 00:21:02.125 --> 00:21:03.934 त्यांना मी निराश कशी करू? NOTE Paragraph 00:21:03.958 --> 00:21:07.226 ख्रिस: पृथ्वीच्या भविष्याबद्दल आपल्याला वाटणारी 00:21:07.250 --> 00:21:08.893 सर्वात मोठी काळजी कोणती? 00:21:08.917 --> 00:21:12.292 आजच्या आपल्या स्थितीबद्दल वाटणारी सर्वात मोठी भीती कोणती? NOTE Paragraph 00:21:13.750 --> 00:21:19.101 गुडाल: मला वाटते, आपल्या हातात फार कमी वेळ असल्याची भीती. 00:21:19.125 --> 00:21:22.643 झालेल्या हानीची भरपाई करण्याची निदान सुरुवात करण्यासाठी, 00:21:22.667 --> 00:21:25.726 हवामान बदल मंदावण्यासाठी. 00:21:25.750 --> 00:21:27.726 वेळ संपत आली आहे. 00:21:27.750 --> 00:21:32.934 लॉकडाऊनच्या काळात जगभरात काय घडले ते आपण पाहिलेच. 00:21:32.958 --> 00:21:35.018 कोविड-१९ मुळे. 00:21:35.042 --> 00:21:37.226 शहरांवरचे आकाश स्वच्छ झाले. 00:21:37.250 --> 00:21:41.101 काही लोकांनी प्रथमच इतक्या शुद्ध हवेत श्वास घेतला. 00:21:41.125 --> 00:21:44.059 आणि रात्री इतके लखलखणारे आकाश प्रथमच पाहिले, 00:21:44.083 --> 00:21:46.684 जे यापूर्वी कधीच नीट पाहिले नव्हते. 00:21:46.708 --> 00:21:49.059 तर मला वाटते, 00:21:49.083 --> 00:21:52.143 सर्वात मोठी काळजी अशी, 00:21:52.167 --> 00:21:55.476 की जास्त लोकांना, 00:21:55.500 --> 00:21:57.786 लोकांना समजते, पण ते कृती करत नाहीत. 00:21:57.810 --> 00:22:00.434 जास्त लोकांना कृती करायला प्रेरित कसे करावे? NOTE Paragraph 00:22:00.458 --> 00:22:06.184 गुडाल: नॅशनल जॉग्राफिकने आपल्याविषयी एक असामान्य चित्रफीत प्रदर्शित केली आहे. 00:22:06.208 --> 00:22:09.768 सहा दशकांच्या आपल्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारी. 00:22:09.792 --> 00:22:13.208 तिचे नाव आहे: "Jane Goodall: The Hope." 00:22:14.042 --> 00:22:16.018 तर, ही कोणती आशा? NOTE Paragraph 00:22:16.042 --> 00:22:17.309 गुडाल: माझी आशा म्हणजे, 00:22:17.333 --> 00:22:19.393 माझी सर्वात मोठी आशा म्हणजे तरुणाई. 00:22:19.417 --> 00:22:21.976 चीनमध्ये लोक सांगतात, 00:22:22.000 --> 00:22:24.143 "होय, अर्थातच मला पर्यावरणाविषयी आस्था आहे. 00:22:24.167 --> 00:22:26.434 मी प्राथमिक शाळेत Roots and Shoots मध्ये होतो." 00:22:26.458 --> 00:22:29.768 Roots and Shoots द्वारे आम्ही नीतिमूल्यांचा पाठपुरावा करतो आहोत. 00:22:29.792 --> 00:22:34.601 या मुलांना भरपूर उत्साह आहे. एकदा समस्या समजल्या, 00:22:34.625 --> 00:22:36.476 त्यांच्यात कृती करण्याची क्षमता आहे, 00:22:36.500 --> 00:22:40.667 ते नद्या स्वच्छ करताहेत. अतिक्रमण करणाऱ्या प्रजाती काढताहेत. 00:22:41.958 --> 00:22:43.684 त्यांच्यापाशी कितीतरी कल्पना आहेत. 00:22:43.708 --> 00:22:48.393 आमच्याजवळ विलक्षण बुद्धिमत्तेचे लोक आहेत. 00:22:48.417 --> 00:22:52.476 त्यांच्या सहयोगाने आम्ही तंत्रज्ञान विकसित करत आहोत. 00:22:52.500 --> 00:22:55.351 त्यामुळे निसर्गाबरोबर एकात्मतेने राहता येईल. 00:22:55.375 --> 00:22:56.976 आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यांत 00:22:57.000 --> 00:23:01.101 आपल्या रोजच्या कृतींचा परिणाम काय होतो त्याचा आपण विचार करूया. 00:23:01.125 --> 00:23:03.226 आपण काय विकत घेतो? ते कुठून आले? 00:23:03.250 --> 00:23:04.809 ते कसे निर्माण झाले? 00:23:04.833 --> 00:23:07.768 यासाठी पर्यावरणाची हानी झाली का? प्राण्यांचा छळ झाला का? 00:23:07.792 --> 00:23:10.143 बालमजूर वापरल्यामुळे ते स्वस्त आहे का? 00:23:10.167 --> 00:23:12.018 नैतिक पर्याय निवडा. 00:23:12.042 --> 00:23:15.559 पण तुम्ही गरिबीत राहत असाल, तर तसे करू शकणार नाही. 00:23:15.583 --> 00:23:18.268 सरतेशेवटी, या लोकांजवळ दुर्दम्य आशा आहे. 00:23:18.292 --> 00:23:20.893 ते अशक्य वाटणाऱ्या प्रश्नांचा सामना करतात 00:23:20.917 --> 00:23:23.351 आणि हार मानत नाहीत. 00:23:23.375 --> 00:23:26.476 त्यांना हार मानणं शक्य नसतं. 00:23:26.500 --> 00:23:29.018 पण काही गोष्टींशी मी लढू शकत नाही. 00:23:29.042 --> 00:23:31.625 मी भ्रष्टाचाराशी लढू शकत नाही. 00:23:32.833 --> 00:23:36.958 लष्कराची राजवट आणि हुकूमशहा यांच्याशी मी लढू शकत नाही. 00:23:38.625 --> 00:23:40.476 मला शक्य आहे तितकेच मी करू शकते. 00:23:40.500 --> 00:23:43.893 प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे वाटा उचलला 00:23:43.917 --> 00:23:47.809 तर सर्व एकत्र मिळून पूर्णत्वाला येईल आणि यश मिळेल. NOTE Paragraph 00:23:47.833 --> 00:23:49.226 ख्रिस: आता शेवटचा प्रश्न. 00:23:49.250 --> 00:23:51.559 अशी एक कल्पना, एक विचार सांगा, 00:23:51.583 --> 00:23:56.309 जो आज हे व्याख्यान पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आपण रुजवू इच्छिता. 00:23:56.333 --> 00:23:58.184 असा कोणता विचार सांगाल? NOTE Paragraph 00:23:58.208 --> 00:24:02.351 गुडाल: फक्त एवढेच लक्षात ठेवा, आयुष्याच्या प्रत्येक दिवशी 00:24:02.375 --> 00:24:04.726 तुम्ही पृथ्वीवर परिणाम करत आहात. 00:24:04.750 --> 00:24:07.018 ते तुम्ही टाळू शकत नाही. 00:24:07.042 --> 00:24:10.601 अगदी पराकोटीच्या दारिद्र्यात राहत नसाल, 00:24:10.625 --> 00:24:13.851 तर हा परिणाम कोणत्या प्रकारचा असेल ते तुम्ही निवडू शकता. 00:24:13.875 --> 00:24:15.809 गरिबीत सुद्धा पर्याय उपलब्ध असतात. 00:24:15.833 --> 00:24:19.726 पण आपण सधन असलो, तर आपल्याजवळ जास्त पर्याय असतात. 00:24:19.750 --> 00:24:22.643 आपण सर्वांनी नैतिक पर्याय निवडले, 00:24:22.667 --> 00:24:25.809 तर आपल्या जगाचा प्रवास योग्य दिशेने होईल 00:24:25.833 --> 00:24:30.893 आणि ते पतवंडांसाठी सोडून जाताना इतकं निकृष्ट नसेल. 00:24:30.917 --> 00:24:35.684 मला वाटते, हा सर्वांसाठी संदेश आहे. 00:24:35.708 --> 00:24:38.684 कारण बऱ्याच लोकांना काय घडते आहे ते समजते आहे. 00:24:38.708 --> 00:24:41.476 पण त्यांना असहाय वाटते, निराश वाटते. आणि मग आपण काय करणार, 00:24:41.500 --> 00:24:44.059 म्हणून ते काहीच करत नाहीत. उदासीन राहतात. 00:24:44.083 --> 00:24:46.875 उदासीनता हा एक मोठा धोका आहे. NOTE Paragraph 00:24:47.750 --> 00:24:49.934 ख्रिस: डॉ. जेन गुडाल, वा. 00:24:49.958 --> 00:24:53.934 आपल्या असामान्य आयुष्याबद्दल मी आपले खूप आभार मानतो. 00:24:53.958 --> 00:24:55.976 आपल्या कार्याबद्दल, आणि 00:24:56.000 --> 00:24:57.858 आज इथे आमच्याशी इतका वेळ बोलल्याबद्दल. NOTE Paragraph 00:24:57.882 --> 00:24:59.268 धन्यवाद. NOTE Paragraph 00:24:59.292 --> 00:25:00.542 गुडाल: धन्यवाद.