1 00:00:01,750 --> 00:00:03,792 ख्रिस अँडरसन: डॉ. जेन गुडाल, आपले स्वागत. 2 00:00:04,875 --> 00:00:06,143 जेन गुडाल: धन्यवाद. 3 00:00:06,167 --> 00:00:10,101 मला वाटतं, माझ्यासोबत मि. एच आहेत, हे लोकांना कळले पाहिजे. 4 00:00:10,125 --> 00:00:12,268 नाहीतर ही मुलाखत अपुरी राहील. 5 00:00:12,292 --> 00:00:14,417 कारण मि. एच यांना सगळे ओळखतात. 6 00:00:16,083 --> 00:00:17,625 ख्रिस: हॅलो, मि. एच. 7 00:00:18,667 --> 00:00:20,934 १७ वर्षांपूर्वीच्या टेड व्याख्यानात आपण 8 00:00:20,958 --> 00:00:26,684 मानवाच्या निसर्गावरच्या अतिक्रमणाबद्दल धोक्याची सूचना दिली होती. 9 00:00:26,708 --> 00:00:28,559 आजची ही महामारी म्हणजे एक प्रकारे 10 00:00:28,583 --> 00:00:32,476 निसर्गाचा प्रतिहल्ला आहे, असे आपल्याला वाटते का? 11 00:00:32,500 --> 00:00:37,559 गुडाल:हे अगदी स्पष्ट आहे, की 12 00:00:37,583 --> 00:00:42,518 करोना किंवा एच आय व्ही/एड्स यासारखे प्राणिजन्य रोग 13 00:00:42,542 --> 00:00:46,893 आणि प्राण्यांपासून उद्भवणारे सर्व प्रकारचे इतर रोग 14 00:00:46,917 --> 00:00:50,059 यांचा पर्यावरणाच्या हानीशी अंशतः संबंध आहे. 15 00:00:50,083 --> 00:00:54,059 प्राण्यांचे निवासस्थान नष्ट झाले, की ते दाटीवाटीने राहू लागतात. 16 00:00:54,083 --> 00:00:58,351 त्यामुळे काहीवेळा एखाद्या प्राणी प्रजातीत सामान्यपणे आढळणारा विषाणू, 17 00:00:58,375 --> 00:01:01,434 जो शेकडो वर्षे त्या प्रजातीत सहजपणे राहिला असेल, 18 00:01:01,458 --> 00:01:03,476 तो नव्या प्रजातीत संक्रमित होतो. 19 00:01:03,500 --> 00:01:08,643 याशिवाय, प्राणी मानवाच्या अधिक निकट संपर्कात येत आहेत. 20 00:01:08,667 --> 00:01:14,643 काहीवेळा यापैकी एखादा प्राणी -- ज्याला विषाणूची लागण झाली असेल -- 21 00:01:14,667 --> 00:01:18,893 तो विषाणूला मानवात संक्रमित होण्याची संधी देतो, 22 00:01:18,917 --> 00:01:22,976 आणि कोविड-१९ सारखा नवा रोग निर्माण करतो. 23 00:01:23,000 --> 00:01:25,018 याचबरोबर 24 00:01:25,042 --> 00:01:27,851 आपण प्राण्यांचा मोठा अनादर करत आहोत. 25 00:01:27,875 --> 00:01:29,518 आपण त्यांची शिकार करतो, 26 00:01:29,542 --> 00:01:31,851 त्यांना ठार मारतो, त्यांना खातो, 27 00:01:31,875 --> 00:01:33,393 त्यांचा विक्रय करतो, 28 00:01:33,417 --> 00:01:39,809 वन्यप्राण्यांच्या बाजारपेठेत पाठवतो, 29 00:01:39,833 --> 00:01:41,101 आशियामध्ये. 30 00:01:41,125 --> 00:01:44,434 तिथे त्यांना छोट्याशा पिंजऱ्यांत, भयानक अवस्थेत कोंडून ठेवले जाते. 31 00:01:44,458 --> 00:01:48,768 तिथे मानवांमध्ये रक्त, मूत्र, विष्ठा याद्वारे संसर्ग फैलावतो. 32 00:01:48,792 --> 00:01:53,434 एका प्राण्यातून दुसऱ्यात किंवा मानवात विषाणूचा प्रसार होण्यासाठी 33 00:01:53,458 --> 00:01:55,184 ही परिस्थिती आदर्श ठरते. 34 00:01:55,208 --> 00:01:59,476 ख्रिस: मला थोडं भूतकाळात डोकावायचे आहे. 35 00:01:59,500 --> 00:02:01,393 कारण आपली कहाणीच तशी अद्भुत आहे. 36 00:02:01,417 --> 00:02:05,518 म्हणजे १९६० च्या सुमारास, आजच्यापेक्षा कट्टर स्त्रीविरोधी वातावरणात 37 00:02:05,542 --> 00:02:08,268 आपण मार्ग काढू शकलात, 38 00:02:08,292 --> 00:02:11,643 जगातल्या आघाडीच्या शास्त्रज्ञांपैकी एक ठरलात, 39 00:02:11,667 --> 00:02:15,184 चिंपांझींबद्दल एकामागून एक आश्चर्यजनक शोध लावलेत, 40 00:02:15,208 --> 00:02:18,268 म्हणजे त्यांनी साधनांचा केलेला वापर, आणि असेच इतर अनेक शोध. 41 00:02:18,292 --> 00:02:20,893 हे यश आपल्यामधल्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे मिळाले, 42 00:02:20,917 --> 00:02:23,976 असे आपल्याला वाटते? 43 00:02:24,000 --> 00:02:27,226 गुडाल: प्राण्यांविषयी प्रेम घेऊनच मी जन्माला आले. 44 00:02:27,250 --> 00:02:30,393 आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आईने मला खूप पाठिंबा दिला. 45 00:02:30,417 --> 00:02:33,059 माझ्या अंथरुणात गांडूळ पाहून ती चिडली नाही. 46 00:02:33,083 --> 00:02:35,559 हे बागेत असायला हवेत, इतकेच म्हणाली. 47 00:02:35,583 --> 00:02:38,309 मी चार तास गायब होते, तेव्हाही ती चिडली नाही. 48 00:02:38,333 --> 00:02:41,268 तिने पोलिसांना फोन केला. मी खुराड्यात बसून राहिले होते. 49 00:02:41,292 --> 00:02:44,768 कारण अंडे कोणत्या भोकातून बाहेर येते ते मला कोणी सांगत नव्हते. 50 00:02:44,792 --> 00:02:47,059 शास्त्रज्ञ व्हावे,असे माझे स्वप्न नव्हते. 51 00:02:47,083 --> 00:02:49,476 कारण स्त्रिया अशा प्रकारचे काही करत नसत. 52 00:02:49,500 --> 00:02:52,726 खरे तर त्याकाळी कोणी पुरुषही असे काही करत नव्हते. 53 00:02:52,750 --> 00:02:54,684 सगळे मला हसले. फक्त आई सोडून. 54 00:02:54,708 --> 00:02:58,393 ती म्हणाली, "तुला हे खरोखर करायचे असेल, तर प्रचंड कष्ट करावे लागतील. 55 00:02:58,417 --> 00:03:00,143 प्रत्येक संधीचा फायदा घ्यावा लागेल. 56 00:03:00,167 --> 00:03:02,393 हार मानली नाहीस, तर कदाचित तुला मार्ग सापडेल." 57 00:03:02,417 --> 00:03:06,518 ख्रिस: आणि कसा कोण जाणे, आपण चिंपांझींचा विश्वास संपादन केलात. 58 00:03:06,542 --> 00:03:10,292 हे पूर्वी कोणालाच जमले नव्हते. 59 00:03:11,167 --> 00:03:15,809 मागे वळून पाहताना आनंदाचे कोणते क्षण आठवतात? 60 00:03:15,833 --> 00:03:19,417 किंवा अजून चिंपांझींबद्दल लोकांना न कळणारे असे काही आहे का? 61 00:03:20,333 --> 00:03:24,309 गुडाल: तुम्ही म्हणता, "कोणीच न पाहिलेले मी पाहिले, 62 00:03:24,333 --> 00:03:25,601 विश्वास संपादन केला." 63 00:03:25,625 --> 00:03:27,226 इतर कोणी प्रयत्नच केला नव्हता. 64 00:03:27,250 --> 00:03:29,018 खरंच सांगते. 65 00:03:29,042 --> 00:03:34,018 मी त्याच पद्धती वापरल्या, 66 00:03:34,042 --> 00:03:38,601 ज्या वापरून मी लहानपणी घराभोवतीच्या प्राण्यांचा अभ्यास करत असे. 67 00:03:38,625 --> 00:03:40,184 शांतपणे बसून राहणे. 68 00:03:40,208 --> 00:03:42,643 भर्रकन प्राण्यांच्या फार जवळ न जाणे. 69 00:03:42,667 --> 00:03:47,226 पण ते कठीण होते. कारण फक्त सहा महिन्यांपुरते पैसे होते. 70 00:03:47,250 --> 00:03:49,601 कल्पना करा, पैसे मिळवणे किती कठीण असेल. 71 00:03:49,625 --> 00:03:51,643 एका तरुण मुलीला, जिच्याजवळ पदवीही नाही, 72 00:03:51,667 --> 00:03:55,434 काहीतरी विचित्र करण्यासाठी, जंगलात जाऊन शांत बसून राहण्यासाठी पैसे. 73 00:03:55,458 --> 00:03:56,934 पण शेवटी 74 00:03:56,958 --> 00:04:00,976 एका अमेरिकन परोपकारी व्यक्तीकडून सहा महिन्यांपुरते पैसे मिळाले. 75 00:04:01,000 --> 00:04:04,934 कालांतराने आपण चिंपांझीचा विश्वास कमावू, हे मला ठाऊक होते. 76 00:04:04,958 --> 00:04:06,476 पण माझ्याजवळ वेळ होता का? 77 00:04:06,500 --> 00:04:11,018 हळूहळू महिने उलटले, आणि शेवटी सुमारे चार महिन्यांनंतर 78 00:04:11,042 --> 00:04:13,809 एका चिंपांझीची भीती चेपली. 79 00:04:13,833 --> 00:04:16,934 आणि एका प्रसंगी त्याच चिंपांझीला मी पाहिले -- 80 00:04:16,958 --> 00:04:20,143 अजून मी फार जवळ गेले नव्हते, पण माझ्याजवळ दुर्बीण होती -- 81 00:04:20,167 --> 00:04:25,309 वाळवी शोधण्यासाठी साधने तयार करून तो ती वापरत होता. 82 00:04:25,333 --> 00:04:28,143 मला आश्चर्याचा धक्का बसला नाही, 83 00:04:28,167 --> 00:04:32,143 कारण बंदिवासातील चिंपांझी काय करू शकतात ते मी वाचले होते -- 84 00:04:32,167 --> 00:04:34,184 पण मला वैज्ञानिक मत ठाऊक होते. ते असे, की 85 00:04:34,208 --> 00:04:37,559 मानव, फक्त मानवच साधने निर्माण करतो आणि त्यांचा वापर करतो. 86 00:04:37,583 --> 00:04:40,809 [डॉ. लुईस] लीकींना किती आनंद होईल, ते मला ठाऊक होते. 87 00:04:40,833 --> 00:04:42,559 या निरीक्षणामुळे 88 00:04:42,583 --> 00:04:45,643 त्यांना नॅशनल जॉग्राफिककडे जाता आले. 89 00:04:45,667 --> 00:04:49,726 आणि त्यांचे उत्तर आले, "ठीक आहे, आम्ही या संशोधनासाठी साहाय्य करत राहू." 90 00:04:49,750 --> 00:04:53,893 मग त्यांनी ह्युगो व्हान लाविक या छायाचित्रकार-चित्रपटनिर्मात्याला पाठवले. 91 00:04:53,917 --> 00:04:56,559 माझ्या निरीक्षणाची नोंद करण्यासाठी. 92 00:04:56,583 --> 00:05:01,018 अनेक शास्त्रज्ञ साधन वापरावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. 93 00:05:01,042 --> 00:05:04,101 खरेच, त्यातला एक म्हणाला, की मी चिंपांझींना शिकवले असले पाहिजे. 94 00:05:04,125 --> 00:05:06,018 (हशा) 95 00:05:06,042 --> 00:05:08,934 पण मी त्यांच्याजवळ जात नव्हते, म्हणजे हा चमत्कार असावा. 96 00:05:08,958 --> 00:05:11,559 पण ह्युगोची चित्रफीत पाहिल्यावर, 97 00:05:11,583 --> 00:05:16,018 आणि मी केलेली चिंपांझींच्या वर्तनाची वर्णने ऐकल्यावर 98 00:05:16,042 --> 00:05:19,351 शास्त्रज्ञांना आपले मत बदलायला सुरुवात करावी लागली. 99 00:05:19,375 --> 00:05:22,018 ख्रिस: आणि त्यानंतर आपण आणखी अनेक शोध लावलेत. 100 00:05:22,042 --> 00:05:26,601 त्यामुळे चिंपांझींचे मानवाशी अविश्वसनीय असे जवळचे नाते सिद्ध झाले. 101 00:05:26,625 --> 00:05:29,976 चिंपांझींना विनोदाचे अंग असते असे तुम्ही कुठेतरी म्हटल्याचे आठवते. 102 00:05:30,000 --> 00:05:32,684 ते कुठे व्यक्त झालेले आपण पाहिले आहे का? 103 00:05:32,708 --> 00:05:36,934 गुडाल: त्यांच्या खेळात ते दिसून येते. 104 00:05:36,958 --> 00:05:39,393 एखादा मोठा चिंपांझी छोट्याशी खेळत असतो. 105 00:05:39,417 --> 00:05:41,809 छोटा झाडाभोवती वेलीमागे जात असतो. 106 00:05:41,833 --> 00:05:44,684 दरवेळी छोटा ती वेल पकडणार, 107 00:05:44,708 --> 00:05:46,684 तेवढ्यात मोठा ती ओढून दूर खेचतो. 108 00:05:46,708 --> 00:05:48,476 छोटा रडू लागतो, 109 00:05:48,500 --> 00:05:50,268 तर मोठा हसू लागतो. 110 00:05:50,292 --> 00:05:51,750 यावरून समजते. 111 00:05:54,417 --> 00:05:59,809 ख्रिस: आणि नंतर आपण फार क्लेशकारक असे काही पाहिलेत. 112 00:05:59,833 --> 00:06:04,559 काही प्रसंगी आपण चिंपांझींच्या टोळ्या, जमाती, गट, 113 00:06:04,583 --> 00:06:10,684 एकमेकांशी क्रूरपणे, हिंसकपणे वागताना पाहिलेत. 114 00:06:10,708 --> 00:06:14,351 याचा अर्थ आपण कसा लावला हे मला जाणून घ्यायचे आहे. 115 00:06:14,375 --> 00:06:17,601 त्यांना पाहून आपल्याला मानवाबद्दल निराशा वाटली का? 116 00:06:17,625 --> 00:06:20,149 कारण मानवाशी त्यांचे जवळचे नाते आहे. 117 00:06:20,173 --> 00:06:23,976 सर्व वानर जमातींमध्ये अटळपणे कोणत्या तरी स्वरूपात 118 00:06:24,000 --> 00:06:27,375 हिंसा असणार, असे वाटले का? 119 00:06:28,375 --> 00:06:30,976 गुडाल: तशी ती आहे, हे तर उघड आहे. 120 00:06:31,000 --> 00:06:35,643 मानवी क्रौर्याशी माझा प्रथम संबंध आला, 121 00:06:35,667 --> 00:06:37,309 तो युद्ध संपल्यावर, 122 00:06:37,333 --> 00:06:40,101 ज्यूंच्या संहाराची चित्रे पाहताना. 123 00:06:40,125 --> 00:06:42,726 आणि त्यामुळे मला मोठा धक्का बसला. 124 00:06:42,750 --> 00:06:44,018 त्यामुळे मी बदलले. 125 00:06:44,042 --> 00:06:46,351 मला वाटतं, त्यावेळी मी दहा वर्षांची होते. 126 00:06:46,375 --> 00:06:48,851 आणि जेव्हा मला चिंपांझींमधल्या 127 00:06:48,875 --> 00:06:52,018 हिंसेची झलक दिसली, तेव्हा वाटलं, की 128 00:06:52,042 --> 00:06:54,559 ते आपल्यासारखेच पण जास्त चांगले आहेत. 129 00:06:54,583 --> 00:06:57,143 मग समजले, की माझ्या कल्पनेपेक्षा 130 00:06:57,167 --> 00:06:58,684 आपल्यात जास्त साम्य आहे. 131 00:06:58,708 --> 00:07:02,684 १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला 132 00:07:02,708 --> 00:07:03,976 हे फार विचित्र वाटले. 133 00:07:04,000 --> 00:07:05,601 आक्रमकता ही जन्मजात असते, 134 00:07:05,625 --> 00:07:09,726 की आत्मसात केलेली असते याबद्दल मोठा वाद होता. 135 00:07:09,750 --> 00:07:12,434 आणि त्याला राजकीय वळण लागले. 136 00:07:12,458 --> 00:07:15,893 तो खराच मोठा विचित्र काळ होता. 137 00:07:15,917 --> 00:07:17,559 मी पुढे सरून सांगत होते, 138 00:07:17,583 --> 00:07:20,143 "नाही. मला वाटते, आक्रमकता हा नक्कीच 139 00:07:20,167 --> 00:07:24,268 आपल्या नैसर्गिक वर्तणुकींच्या पटलामधला एक भाग आहे." 140 00:07:24,292 --> 00:07:29,934 एका आदरणीय शास्त्रज्ञाला मी त्यांचे खरेखुरे मत विचारले. 141 00:07:29,958 --> 00:07:32,351 कारण ते स्पष्ट सांगत होते, की 142 00:07:32,375 --> 00:07:33,851 आक्रमकता आत्मसात केलेली असते. 143 00:07:33,875 --> 00:07:38,018 आणि ते म्हणाले, "जेन, मला खरोखर काय वाटते याबद्दल मी न बोलणे चांगले." 144 00:07:38,042 --> 00:07:41,917 माझ्यासाठी विज्ञानाच्या दृष्टीने हा मोठाच धक्का होता. 145 00:07:42,792 --> 00:07:47,351 ख्रिस: लहानपणापासून, जग सुंदर आहे असा माझा समज होता. 146 00:07:47,375 --> 00:07:52,893 फुलपाखरे, मधमाशा, फुले यांबद्दलचे अनेक सुंदर चित्रपट, 147 00:07:52,917 --> 00:07:55,851 अतिशय सुंदर असे निसर्गचित्र. 148 00:07:55,875 --> 00:08:01,893 अनेक पर्यावरण शास्त्रज्ञ बरेचदा असा पवित्रा घेतात, 149 00:08:01,917 --> 00:08:06,059 "होय, निसर्ग निर्मळ आहे. निसर्ग सुंदर आहे. मानव दुष्ट आहे." 150 00:08:06,083 --> 00:08:08,726 पण प्रत्यक्षात मात्र आपली निरीक्षणे निराळी असतात. 151 00:08:08,750 --> 00:08:11,601 निसर्गाच्या कोणत्याही घटकाकडे जास्त बारकाईने पाहता 152 00:08:11,625 --> 00:08:13,976 खरोखर भयंकर गोष्टी आढळतात. 153 00:08:14,000 --> 00:08:16,393 निसर्गाचा अर्थ आपण कसा लावता? आपल्याला काय वाटते? 154 00:08:16,417 --> 00:08:18,851 आपण त्याचा अर्थ कसा लावावा? 155 00:08:18,875 --> 00:08:20,851 गुडाल: निसर्ग म्हणजे 156 00:08:20,875 --> 00:08:24,809 उत्क्रांतीचा संपूर्ण वर्णपट पाहता, 157 00:08:24,833 --> 00:08:28,518 एखादे आदिम स्वरूपातले ठिकाण.. 158 00:08:28,542 --> 00:08:33,143 माझ्या लहानपणी आफ्रिका अशी आदिम स्वरूपात होती. 159 00:08:33,167 --> 00:08:36,101 तिथे सर्वत्र प्राणी होते. 160 00:08:36,125 --> 00:08:40,018 आणि सिंहांनी शिकार केलेली मला कधीच आवडत नसे. 161 00:08:40,042 --> 00:08:42,559 पण त्यांना शिकार करावी लागते. तो त्यांचा धर्म आहे. 162 00:08:42,583 --> 00:08:46,393 त्यांनी प्राणी मारले नाहीत, तर ते स्वतः मरतील. 163 00:08:46,417 --> 00:08:50,101 आपण आणि प्राणी यांतला मोठा फरक, मला वाटते, 164 00:08:50,125 --> 00:08:56,018 ते जे काही करतात, तो त्यांचा धर्म असतो म्हणून करतात. 165 00:08:56,042 --> 00:08:59,393 आपण योजना आखून काम करू शकतो. 166 00:08:59,417 --> 00:09:01,184 आपल्या योजना फार निराळ्या असतात. 167 00:09:01,208 --> 00:09:05,226 आपण एखादे जंगल पूर्णपणे तोडण्याच्या योजना आखू शकतो, 168 00:09:05,250 --> 00:09:07,726 कारण आपल्याला लाकूड विकायचे असते, 169 00:09:07,750 --> 00:09:10,101 किंवा आणखी एखादा शॉपिंग मॉल बांधायचा असतो, 170 00:09:10,125 --> 00:09:11,393 वगैरे काहीतरी. 171 00:09:11,417 --> 00:09:16,143 आपण निसर्गाचा नाश करतो, युद्धे करतो. 172 00:09:16,167 --> 00:09:19,976 आपण असा दुष्टावा करू शकतो, कारण स्वतः आरामात बसून 173 00:09:20,000 --> 00:09:22,934 आपण दूरवर कोणाला तरी छळण्याची योजना आखू शकतो. 174 00:09:22,958 --> 00:09:24,226 हा दुष्टपणा आहे. 175 00:09:24,250 --> 00:09:27,893 चिंपांझींचे युद्ध आदिम प्रकारचे असते. 176 00:09:27,917 --> 00:09:29,476 ते अतिशय आक्रमक होऊ शकतात. 177 00:09:29,500 --> 00:09:30,893 पण ते क्षणिक असते. 178 00:09:30,917 --> 00:09:32,393 ती त्यांची भावना असते. 179 00:09:32,417 --> 00:09:34,809 एका भावनेला दिलेला तो प्रतिसाद असतो. 180 00:09:34,833 --> 00:09:38,476 ख्रिस: आपल्या निरीक्षणानुसार चिंपांझींची प्रगती 181 00:09:38,500 --> 00:09:41,893 काही लोक ज्याला मानवी महाशक्ती म्हणतात 182 00:09:41,917 --> 00:09:43,643 तिच्याइतकी नाही. 183 00:09:43,667 --> 00:09:49,601 भविष्याचे तपशीलवार चित्र मनात पाहून 184 00:09:49,625 --> 00:09:52,393 मानव दीर्घकालीन योजना आखू शकतो. 185 00:09:52,417 --> 00:09:57,768 त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ शकतो. 186 00:09:57,792 --> 00:10:01,226 चिंपांझींबरोबर इतका काळ घालवलेल्या आपणासारख्या व्यक्तीलादेखील 187 00:10:01,250 --> 00:10:04,434 असे वाटते की हे निराळे कौशल्य आहे. 188 00:10:04,458 --> 00:10:06,601 आपण त्याची जबाबदारी घेऊन 189 00:10:06,625 --> 00:10:09,434 ते अधिक शहाणपणाने वापरले पाहिजे. 190 00:10:09,458 --> 00:10:11,351 गुडाल: होय. मला स्वतःला असे वाटते -- 191 00:10:11,375 --> 00:10:13,684 म्हणजे याबद्दल बरीच चर्चा झाली आहे, 192 00:10:13,708 --> 00:10:17,601 पण मला वाटते, आपण दोघे ज्या पद्धतीने संवाद करत आहोत, 193 00:10:17,625 --> 00:10:19,393 ती पद्धत मानवाने निर्माण केली आहे. 194 00:10:19,417 --> 00:10:21,518 आपल्याजवळ शब्द आहेत. 195 00:10:21,542 --> 00:10:24,934 म्हणजे प्राण्यांमधला संवाद आपल्याला वाटतो त्यापेक्षा 196 00:10:24,958 --> 00:10:26,226 फार प्रगत आहे. 197 00:10:26,250 --> 00:10:28,226 चिंपांझी, गोरिला, ओरँगउटान 198 00:10:28,250 --> 00:10:31,708 हे बहिऱ्यांसाठीची मानवी खाणाखुणांची भाषा शिकू शकतात. 199 00:10:32,792 --> 00:10:38,226 आपली जी भाषा असेल, तीच शिकत आपण मोठे होतो. 200 00:10:38,250 --> 00:10:41,893 त्यामुळे तुम्ही कधीच ऐकल्या नसतील अशा गोष्टी मी तुम्हांला सांगू शकते. 201 00:10:41,917 --> 00:10:44,476 पण चिंपांझी तसे करू शकत नाहीत. 202 00:10:44,500 --> 00:10:49,726 आपण आपल्या मुलांना अमूर्त गोष्टी शिकवू शकतो. 203 00:10:49,750 --> 00:10:51,559 पण चिंपांझी तसे करू शकत नाहीत. 204 00:10:51,583 --> 00:10:55,268 हो, चिंपांझी सर्व प्रकारच्या चतुराईच्या गोष्टी करू शकतात. 205 00:10:55,292 --> 00:10:59,893 तसेच हत्ती, कावळे आणि ऑक्टोपससुद्धा करू शकतात. 206 00:10:59,917 --> 00:11:03,518 पण आपण दुसऱ्या ग्रहांवर जाणारी याने तयार करू शकतो. 207 00:11:03,542 --> 00:11:06,101 छायाचित्रे काढणारे छोटे यंत्रमानव निर्माण करू शकतो. 208 00:11:06,125 --> 00:11:10,893 आपण दोघे आपापल्या ठिकाणाहून एकमेकांशी बोलतो आहोत, 209 00:11:10,917 --> 00:11:13,059 ती अद्भुत पद्धत आपण शोधून काढली आहे. 210 00:11:13,083 --> 00:11:14,726 माझ्या लहानपणी 211 00:11:14,750 --> 00:11:17,559 टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता. 212 00:11:17,583 --> 00:11:19,434 संगणक नव्हते. 213 00:11:19,458 --> 00:11:20,893 ते जग फार निराळे होते. 214 00:11:20,917 --> 00:11:24,518 माझ्याजवळ होती फक्त पेन्सिल, पेन आणि वही. 215 00:11:24,542 --> 00:11:27,393 ख्रिस: आपण पुन्हा निसर्गाबद्दलच्या प्रश्नाकडे वळू. 216 00:11:27,417 --> 00:11:28,989 मी याबद्दल पुष्कळ विचार करतो. 217 00:11:29,013 --> 00:11:32,263 प्रामाणिकपणे सांगतो, मी हे समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे. 218 00:11:33,208 --> 00:11:37,393 आपण, आणि मला आदरणीय असणाऱ्या अनेक लोकांनी 219 00:11:37,417 --> 00:11:44,226 निसर्गाची हानी होऊ न देणे या एका ध्यासापोटी इतके कार्य केले आहे. 220 00:11:44,250 --> 00:11:47,101 तर, ही गोष्ट शक्य आहे का, योग्य किंवा गरजेची आहे का: 221 00:11:47,125 --> 00:11:51,976 आपण एकाच वेळी दोन्ही बाजू स्वीकारू शकतो का, 222 00:11:52,000 --> 00:11:53,934 की निसर्गात अनेक भयंकर गोष्टी असतात, 223 00:11:53,958 --> 00:11:56,851 पण त्याचवेळी निसर्ग विलक्षण सुंदरही असतो. 224 00:11:56,875 --> 00:12:02,018 यापैकी काही सौंदर्य त्या भयंकरपणाच्या शक्यतेतून निर्माण होतं. 225 00:12:02,042 --> 00:12:06,934 ते आपले भान हरपण्याइतके सुंदर असते. 226 00:12:06,958 --> 00:12:10,684 आपण निसर्गाचा एक भाग आहोत. त्याशिवाय आपल्याला अस्तित्व नाही. 227 00:12:10,708 --> 00:12:13,143 मानवाला पूर्णत्व हवे असेल, तर प्रथम 228 00:12:13,167 --> 00:12:17,434 आपण निसर्गाला आपलेसे केले पाहिजे. त्याचा भाग झाले पाहिजे. बरोबर? 229 00:12:17,458 --> 00:12:22,226 हे नाते कोणत्या भाषेत मांडावे? आपण मला मार्गदर्शन करा. 230 00:12:22,250 --> 00:12:26,351 गुडाल: मला वाटतं, एक समस्या अशी आहे, की आपली बुद्धी जशी विकसित झाली, 231 00:12:26,375 --> 00:12:29,018 तशी आपल्या उपयोगासाठी 232 00:12:29,042 --> 00:12:32,434 पर्यावरणात बदल घडवण्याची आपली क्षमता वाढत गेली, 233 00:12:32,458 --> 00:12:35,268 आपण शेती करून पीक घेऊ लागलो. 234 00:12:35,292 --> 00:12:38,476 त्या जागी पूर्वी जंगल किंवा वनराई होती. 235 00:12:38,500 --> 00:12:41,309 आपण आता त्याबद्दल बोलायला नको. 236 00:12:41,333 --> 00:12:44,893 पण अशी आहे आपली निसर्ग बदलण्याची क्षमता. 237 00:12:44,917 --> 00:12:49,351 आपण शहरांत आणि महानगरांत जास्त वस्ती करू लागलो, 238 00:12:49,375 --> 00:12:53,351 तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहू लागलो, 239 00:12:53,375 --> 00:12:56,976 त्यामुळे जास्त लोकांना निसर्गापासून ताटातूट झाल्यासारखे वाटू लागले. 240 00:12:57,000 --> 00:12:59,559 आज शेकडो, हजारो मुले 241 00:12:59,583 --> 00:13:01,309 शहराच्या आतल्या भागांत वाढताहेत. 242 00:13:01,333 --> 00:13:04,059 तिथे कोणत्याही प्रकारचा निसर्ग नाही. 243 00:13:04,083 --> 00:13:09,143 म्हणूनच हरित शहरांची मोहीम इतकी महत्त्वाची आहे. 244 00:13:09,167 --> 00:13:11,518 याबाबत प्रयोग झाले आहेत. 245 00:13:11,542 --> 00:13:14,809 मला वाटते शिकागोमध्ये असावेत. पण खात्री नाही. 246 00:13:14,833 --> 00:13:17,893 तिथे अनेक मोकळ्या जागा होत्या. 247 00:13:17,917 --> 00:13:21,684 हिंसाचार प्रबळ असणाऱ्या शहराच्या एका भागात. 248 00:13:21,708 --> 00:13:24,768 यापैकी काही जागा त्यांनी हरित केल्या. 249 00:13:24,792 --> 00:13:29,809 त्यांनी त्या मोकळ्या जागांमध्ये फुले, झाडे, झुडुपे लावली. 250 00:13:29,833 --> 00:13:33,184 आणि तिथले हिंसेचे प्रमाण एकदम कमी झाले. 251 00:13:33,208 --> 00:13:35,708 मग त्यांनी उरलेल्या अर्ध्या भागातही झाडे लावली. 252 00:13:36,917 --> 00:13:38,851 यावरून हे स्पष्ट होते. 253 00:13:38,875 --> 00:13:41,643 याखेरीज संशोधनातून असेही सिद्ध झाले आहे, की 254 00:13:41,667 --> 00:13:45,917 योग्य मानसिक वाढीसाठी मुलांना हरित निसर्गाची गरज असते. 255 00:13:46,875 --> 00:13:50,101 तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण निसर्गाचा एक भाग आहोत. 256 00:13:50,125 --> 00:13:54,351 आणि आपण निसर्गाचा अनादर करत आहोत. 257 00:13:54,375 --> 00:13:57,309 हे आपल्या मुलांसाठी फार घातक आहे. 258 00:13:57,333 --> 00:13:58,809 आणि आपल्या नातवंडांसाठीही. 259 00:13:58,833 --> 00:14:02,851 कारण स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, हवामान आणि पावसाचे नियमन 260 00:14:02,875 --> 00:14:06,434 यासाठी आपण निसर्गावर अवलंबून असतो. 261 00:14:06,458 --> 00:14:09,226 आपण काय केले त्याकडे पहा. हवामान संकटाकडे पहा. 262 00:14:09,250 --> 00:14:11,476 हे आपल्यामुळे घडले. आपणच हे केले. 263 00:14:11,500 --> 00:14:13,184 ख्रिस: सुमारे तीस वर्षांपूर्वी 264 00:14:13,208 --> 00:14:19,018 आपण वैज्ञानिक ते सामाजिक कार्यकर्ती असा बदल केलात. 265 00:14:19,042 --> 00:14:20,292 का? 266 00:14:21,333 --> 00:14:26,809 गुडाल: १९८६ सालची विज्ञान परिषद. तोपर्यंत मला पी. एच.डी. मिळालेली होती. 267 00:14:26,833 --> 00:14:30,559 चिंपांझींचे वर्तन सभोवतालच्या परिसरासोबत कसे बदलते, 268 00:14:30,583 --> 00:14:32,143 याबद्दल परिषद होती. 269 00:14:32,167 --> 00:14:34,559 आफ्रिकाभर सहा ठिकाणी पाहणीच्या जागा होत्या. 270 00:14:34,583 --> 00:14:38,268 आम्हांला वाटले, या शास्त्रज्ञांना एकत्र आणू, 271 00:14:38,292 --> 00:14:39,684 आणि याचा शोध घेऊ. 272 00:14:39,708 --> 00:14:41,226 हे फार रंजक होते. 273 00:14:41,250 --> 00:14:43,893 पण यापैकी एक सत्र निसर्ग संरक्षणाबद्दल होते. 274 00:14:43,917 --> 00:14:47,768 आणि एक सत्र बंदिस्त अवस्थेतील प्राण्यांबद्दल होते. 275 00:14:47,792 --> 00:14:49,893 उदाहरणार्थ, वैद्यकीय संशोधनातील प्राणी. 276 00:14:49,917 --> 00:14:54,184 ही दोन सत्रे माझ्यासाठी धक्कादायक ठरली. 277 00:14:54,208 --> 00:14:56,768 एक वैज्ञानिक म्हणून मी परिषदेला गेले होते, 278 00:14:56,792 --> 00:14:58,351 कार्यकर्ती म्हणून बाहेर आले. 279 00:14:58,375 --> 00:15:02,184 हा निर्णय मी घेतला नाही. मनात आत काहीतरी घडलं. 280 00:15:02,208 --> 00:15:05,726 ख्रिस: गेली चौतीस वर्षे 281 00:15:05,750 --> 00:15:08,434 मानव आणि निसर्गातले संबंध सुधारण्यासाठी 282 00:15:08,458 --> 00:15:11,750 आपण अथकपणे मोहीम राबवलीत. 283 00:15:12,667 --> 00:15:17,750 हे संबंध कसे असायला हवेत? 284 00:15:19,000 --> 00:15:23,809 गुडाल: हे प्रश्न पुन्हापुन्हा समोर येतात. 285 00:15:23,833 --> 00:15:26,583 मानवाला राहण्यासाठी जागा लागते. 286 00:15:27,625 --> 00:15:29,726 पण मला वाटते, समस्या हीच आहे, की 287 00:15:29,750 --> 00:15:33,309 आपला सधन समाज 288 00:15:33,333 --> 00:15:34,726 अतिशय लोभी झाला आहे. 289 00:15:34,750 --> 00:15:40,018 खरोखर, मोठमोठी पटांगणे असणारी चार चार घरे कोणाला लागतात? 290 00:15:40,042 --> 00:15:43,684 आणखी एक शॉपिंग मॉल आपल्याला कशासाठी हवा असतो? 291 00:15:43,708 --> 00:15:45,434 आणखी असेच बरेच काही. 292 00:15:45,458 --> 00:15:50,434 आपण अल्पकाळचा आर्थिक फायदा पाहतो आहोत. 293 00:15:50,458 --> 00:15:53,518 पैसा हा उपासना करण्याचा देव झाला आहे. 294 00:15:53,542 --> 00:15:57,601 निसर्गाशी असलेले अस्तित्वाचे सर्व बंध आपण हरवून बसलो आहोत. 295 00:15:57,625 --> 00:16:03,351 म्हणून आपण अल्पकाळचा आर्थिक फायदा किंवा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. 296 00:16:03,375 --> 00:16:06,018 पृथ्वीचे संरक्षण 297 00:16:06,042 --> 00:16:08,083 किंवा आपल्या मुलांचे भविष्य याऐवजी. 298 00:16:09,000 --> 00:16:12,101 आता आपल्याला या गोष्टींची काळजी वाटत नाही. 299 00:16:12,125 --> 00:16:15,226 म्हणून, मी माझा लढा कधीच थांबवणार नाही. 300 00:16:15,250 --> 00:16:19,059 ख्रिस: चिंपांझी संरक्षणाच्या आपल्या कामात 301 00:16:19,083 --> 00:16:24,268 आपण जनतेला केंद्रस्थानी ठेवले. 302 00:16:24,292 --> 00:16:26,393 स्थानिक जनतेचा सहभाग मिळवला. 303 00:16:26,417 --> 00:16:27,684 यात कितपत यश मिळाले? 304 00:16:27,708 --> 00:16:29,851 पृथ्वीचे यशस्वीपणे रक्षण करण्यासाठी 305 00:16:29,875 --> 00:16:32,934 हे गरजेचे आहे, असे आपल्याला वाटते का? 306 00:16:32,958 --> 00:16:35,434 गुडाल: त्या सुप्रसिद्ध परिषदेनंतर मला वाटले, 307 00:16:35,458 --> 00:16:39,018 आफ्रिकेतले चिंपांझी नाहीसे का होताहेत, आणि जंगलांची काय परिस्थिती आहे 308 00:16:39,042 --> 00:16:40,893 याबद्दल जास्त जाणून घ्यायला हवे. 309 00:16:40,917 --> 00:16:45,976 मग मी थोडे पैसे जमवून चिंपांझी वस्तीच्या सहा देशांना भेट दिली. 310 00:16:46,000 --> 00:16:50,018 आणि चिंपांझींना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे समजून घेतले. 311 00:16:50,042 --> 00:16:52,809 मांसासाठी हत्या होणे, जिवंत प्राण्यांचा विक्रय, 312 00:16:52,833 --> 00:16:54,518 सापळ्यात पकडले जाणे, 313 00:16:54,542 --> 00:16:58,934 मानवी लोकसंख्येची वाढ 314 00:16:58,958 --> 00:17:02,684 आणि त्यामुळे त्यांची शेती, गुरे आणि वस्तीसाठी जास्त जमिनीची गरज. 315 00:17:02,708 --> 00:17:07,434 पण अनेक माणसांना सोसावे लागणारे हाल सुद्धा मी पाहत होते. 316 00:17:07,458 --> 00:17:11,018 अतोनात दारिद्र्य, आरोग्य आणि शिक्षण यांचा अभाव, 317 00:17:11,042 --> 00:17:13,518 जमिनीची धूप. 318 00:17:13,542 --> 00:17:18,518 गॉम्बेच्या छोट्याशा राष्ट्रीय उद्यानावरून विमानाने जात असताना हे विचार असह्य झाले. 319 00:17:18,542 --> 00:17:22,809 एकेकाळी आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत जाणारा हा 320 00:17:22,833 --> 00:17:24,101 विषुववृत्तीय जंगलपट्टा. 321 00:17:24,125 --> 00:17:25,434 आणि १९९० मध्ये 322 00:17:25,458 --> 00:17:29,101 उरले होते त्या जंगलाचे एक छोटेसे बेट. छोटेसे राष्ट्रीय उद्यान. 323 00:17:29,125 --> 00:17:31,018 सभोवतालच्या सगळ्या टेकड्या उजाड होत्या. 324 00:17:31,042 --> 00:17:32,768 त्यावेळी मला जोरदार धक्का बसला. 325 00:17:32,792 --> 00:17:34,601 आपण जर जनतेला 326 00:17:34,625 --> 00:17:36,893 पर्यावरणाची हानी न करता 327 00:17:36,917 --> 00:17:39,518 जगण्याच्या पद्धती शोधायला मदत केली नाही, 328 00:17:39,542 --> 00:17:42,226 तर आपण चिंपांझींना वाचवण्याचा प्रयत्न करूच शकत नाही. 329 00:17:42,250 --> 00:17:45,976 म्हणून जेन गुडाल संस्थेने "Take Care" हा कार्यक्रम सुरु केला. 330 00:17:46,000 --> 00:17:48,018 आम्ही त्याला "TACARE" म्हणतो. 331 00:17:48,042 --> 00:17:51,976 ही आमची निसर्ग संरक्षणाची पद्धत समाजावर आधारित आहे. 332 00:17:52,000 --> 00:17:54,101 ही सर्वसमावेशक आहे. 333 00:17:54,125 --> 00:17:57,351 निसर्ग संरक्षणाची साधने 334 00:17:57,375 --> 00:17:59,226 आम्ही गावकऱ्यांच्या हातात सोपवली आहेत. 335 00:17:59,250 --> 00:18:04,351 टांझानियामधले वन्य चिंपांझी आरक्षित जागेत राहत नाहीत. 336 00:18:04,375 --> 00:18:07,143 ते गावातल्या राखीव जंगलांत राहतात. 337 00:18:07,167 --> 00:18:12,434 लोक आता गावातल्या जंगलांवर नजर ठेवू लागले आहेत. 338 00:18:12,458 --> 00:18:14,684 आता त्यांना समजते, की 339 00:18:14,708 --> 00:18:18,268 जंगलांचे संरक्षण हे फक्त वन्यप्राण्यांसाठी नसून 340 00:18:18,292 --> 00:18:19,768 ते त्यांच्यासाठीदेखील आहे. 341 00:18:19,792 --> 00:18:22,226 जंगल ही त्यांची गरज आहे. 342 00:18:22,250 --> 00:18:23,601 त्यांना त्याचा अभिमान वाटतो. 343 00:18:23,625 --> 00:18:25,726 तिथले स्वयंसेवक कार्यशाळेत जातात. 344 00:18:25,750 --> 00:18:27,809 स्मार्टफोन कसे वापरावेत ते शिकतात. 345 00:18:27,833 --> 00:18:32,601 क्लाउड मध्ये माहिती अपलोड कशी करावी ते शिकतात. 346 00:18:32,625 --> 00:18:35,476 त्यामुळे सर्व काम पारदर्शी होते. 347 00:18:35,500 --> 00:18:37,643 झाडे पुन्हा उगवली आहेत. 348 00:18:37,667 --> 00:18:39,726 आता टेकड्या उजाड राहिल्या नाहीत. 349 00:18:39,750 --> 00:18:44,476 गॉम्बेभोवती एक मध्यवर्ती विभाग निर्माण करण्याचे त्यांनी ठरवले आहे. 350 00:18:44,500 --> 00:18:47,893 त्यामुळे चिंपांझींना १९९० पेक्षा जास्त मोठे जंगल उपलब्ध होईल. 351 00:18:47,917 --> 00:18:49,851 जंगलांमधले जोडमार्ग ते खुले करत आहेत. 352 00:18:49,875 --> 00:18:55,268 त्यामुळे विखुरलेल्या प्रजातींचा संबंध येईल जवळच्या नात्यात संबंध येणार नाही. 353 00:18:55,292 --> 00:18:58,434 होय, या पद्धतीला यश मिळाले आहे. आता ती आणखी सहा देशांत सुरु आहे. 354 00:18:58,458 --> 00:18:59,726 हीच पद्धत. 355 00:18:59,750 --> 00:19:05,351 ख्रिस: आपण आपले असामान्य विचार न थकता जगात सर्वत्र पोहोचवता. 356 00:19:05,375 --> 00:19:07,309 इतका प्रवास करता. 357 00:19:07,333 --> 00:19:10,601 सगळीकडे व्याख्याने देता. सर्वत्र लोकांना प्रेरणा देता. 358 00:19:10,625 --> 00:19:15,601 आपल्याला ही ऊर्जा कुठून मिळते? 359 00:19:15,625 --> 00:19:17,268 या कार्याचा इतका उत्कट ध्यास, 360 00:19:17,292 --> 00:19:20,476 कारण हे काम थकवणारं आहे. 361 00:19:20,500 --> 00:19:23,018 मोठ्या समुदायासमोर दिलेले प्रत्येक व्याख्यान 362 00:19:23,042 --> 00:19:25,101 शारीरिक दृष्टया थकवून टाकते. 363 00:19:25,125 --> 00:19:28,143 तरीही, आपण अजूनही हे करताहात. 364 00:19:28,167 --> 00:19:30,125 आपण हे कसे करता? 365 00:19:31,042 --> 00:19:36,393 गुडाल: तुम्हांला ठाऊक असेल, मी हट्टी आहे. मला हार मानणं आवडत नाही. 366 00:19:36,417 --> 00:19:41,684 मोठाल्या कंपन्यांचे अधिकारी 367 00:19:41,708 --> 00:19:43,226 जे जंगले नष्ट करतात, 368 00:19:43,250 --> 00:19:49,809 किंवा पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांचे निसर्ग रक्षणाचे नियम 369 00:19:49,833 --> 00:19:51,143 रद्द करणारे राजकारणी, 370 00:19:51,167 --> 00:19:53,976 मी कोणाबद्दल बोलते आहे तुम्ही जाणता. 371 00:19:54,000 --> 00:19:56,143 यांच्याविरुद्ध मी लढतच राहणार आहे. 372 00:19:56,167 --> 00:20:00,268 वन्यजीवनाविषयी मला काळजी आहे, तो माझा ध्यास आहे. 373 00:20:00,292 --> 00:20:02,976 मला निसर्गाचा ध्यास आहे. 374 00:20:03,000 --> 00:20:07,434 माझं जंगलांवर प्रेम आहे. त्यांचा नाश होताना पाहून मला दुःख वाटते. 375 00:20:07,458 --> 00:20:10,351 आणि मला मुलांविषयी फार आस्था वाटते. 376 00:20:10,375 --> 00:20:12,434 त्यांचे भवितव्य आपण हिरावून घेत आहोत. 377 00:20:12,458 --> 00:20:14,184 मी हार मानणार नाही. 378 00:20:14,208 --> 00:20:19,143 मला वाटते, माझ्याजवळ चांगली जनुके आहेत. ही देवाची देणगी आहे. 379 00:20:19,167 --> 00:20:22,768 आणि माझ्याजवळ जी दुसरी देणगी असल्याचे माझ्या लक्षात आले, 380 00:20:22,792 --> 00:20:24,226 ती म्हणजे संवाद. 381 00:20:24,250 --> 00:20:26,893 मग ते लिहिणे असो किंवा बोलणे. 382 00:20:26,917 --> 00:20:28,976 आपल्याला वाटते, 383 00:20:29,000 --> 00:20:31,893 असे जगभर फिरून काय होणार? 384 00:20:31,917 --> 00:20:35,018 पण दरवेळी मी व्याख्यान देते 385 00:20:35,042 --> 00:20:36,393 तेव्हा लोक सांगतात, 386 00:20:36,417 --> 00:20:38,768 "मी हार मानली होती. पण तुम्ही मला प्रेरणा दिलीत. 387 00:20:38,792 --> 00:20:41,059 आता मी माझा हातभार लावण्याची प्रतिज्ञा करतो." 388 00:20:41,083 --> 00:20:45,976 आणि "Roots and Shoots" ही मुलांची मोहीम आता पासष्ट देशांतून सुरु आहे. 389 00:20:46,000 --> 00:20:47,559 आणि त्यात वाढ होत आहे. 390 00:20:47,583 --> 00:20:48,851 सर्व वयोगट 391 00:20:48,875 --> 00:20:52,018 मानवाला, प्राण्यांना, पर्यावरणाला मदत करणारे प्रकल्प निवडताहेत. 392 00:20:52,042 --> 00:20:54,643 बाह्या सरसावून कामाला लागले आहेत. 393 00:20:54,667 --> 00:20:57,809 त्यांच्या डोळ्यांत एक चमक दिसते. त्यांना सांगायचं असतं, 394 00:20:57,833 --> 00:21:00,309 डॉ. जेन, पहा, आम्ही काय करतो आहोत 395 00:21:00,333 --> 00:21:02,101 पृथ्वीच्या रक्षणासाठी. 396 00:21:02,125 --> 00:21:03,934 त्यांना मी निराश कशी करू? 397 00:21:03,958 --> 00:21:07,226 ख्रिस: पृथ्वीच्या भविष्याबद्दल आपल्याला वाटणारी 398 00:21:07,250 --> 00:21:08,893 सर्वात मोठी काळजी कोणती? 399 00:21:08,917 --> 00:21:12,292 आजच्या आपल्या स्थितीबद्दल वाटणारी सर्वात मोठी भीती कोणती? 400 00:21:13,750 --> 00:21:19,101 गुडाल: मला वाटते, आपल्या हातात फार कमी वेळ असल्याची भीती. 401 00:21:19,125 --> 00:21:22,643 झालेल्या हानीची भरपाई करण्याची निदान सुरुवात करण्यासाठी, 402 00:21:22,667 --> 00:21:25,726 हवामान बदल मंदावण्यासाठी. 403 00:21:25,750 --> 00:21:27,726 वेळ संपत आली आहे. 404 00:21:27,750 --> 00:21:32,934 लॉकडाऊनच्या काळात जगभरात काय घडले ते आपण पाहिलेच. 405 00:21:32,958 --> 00:21:35,018 कोविड-१९ मुळे. 406 00:21:35,042 --> 00:21:37,226 शहरांवरचे आकाश स्वच्छ झाले. 407 00:21:37,250 --> 00:21:41,101 काही लोकांनी प्रथमच इतक्या शुद्ध हवेत श्वास घेतला. 408 00:21:41,125 --> 00:21:44,059 आणि रात्री इतके लखलखणारे आकाश प्रथमच पाहिले, 409 00:21:44,083 --> 00:21:46,684 जे यापूर्वी कधीच नीट पाहिले नव्हते. 410 00:21:46,708 --> 00:21:49,059 तर मला वाटते, 411 00:21:49,083 --> 00:21:52,143 सर्वात मोठी काळजी अशी, 412 00:21:52,167 --> 00:21:55,476 की जास्त लोकांना, 413 00:21:55,500 --> 00:21:57,786 लोकांना समजते, पण ते कृती करत नाहीत. 414 00:21:57,810 --> 00:22:00,434 जास्त लोकांना कृती करायला प्रेरित कसे करावे? 415 00:22:00,458 --> 00:22:06,184 गुडाल: नॅशनल जॉग्राफिकने आपल्याविषयी एक असामान्य चित्रफीत प्रदर्शित केली आहे. 416 00:22:06,208 --> 00:22:09,768 सहा दशकांच्या आपल्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारी. 417 00:22:09,792 --> 00:22:13,208 तिचे नाव आहे: "Jane Goodall: The Hope." 418 00:22:14,042 --> 00:22:16,018 तर, ही कोणती आशा? 419 00:22:16,042 --> 00:22:17,309 गुडाल: माझी आशा म्हणजे, 420 00:22:17,333 --> 00:22:19,393 माझी सर्वात मोठी आशा म्हणजे तरुणाई. 421 00:22:19,417 --> 00:22:21,976 चीनमध्ये लोक सांगतात, 422 00:22:22,000 --> 00:22:24,143 "होय, अर्थातच मला पर्यावरणाविषयी आस्था आहे. 423 00:22:24,167 --> 00:22:26,434 मी प्राथमिक शाळेत Roots and Shoots मध्ये होतो." 424 00:22:26,458 --> 00:22:29,768 Roots and Shoots द्वारे आम्ही नीतिमूल्यांचा पाठपुरावा करतो आहोत. 425 00:22:29,792 --> 00:22:34,601 या मुलांना भरपूर उत्साह आहे. एकदा समस्या समजल्या, 426 00:22:34,625 --> 00:22:36,476 त्यांच्यात कृती करण्याची क्षमता आहे, 427 00:22:36,500 --> 00:22:40,667 ते नद्या स्वच्छ करताहेत. अतिक्रमण करणाऱ्या प्रजाती काढताहेत. 428 00:22:41,958 --> 00:22:43,684 त्यांच्यापाशी कितीतरी कल्पना आहेत. 429 00:22:43,708 --> 00:22:48,393 आमच्याजवळ विलक्षण बुद्धिमत्तेचे लोक आहेत. 430 00:22:48,417 --> 00:22:52,476 त्यांच्या सहयोगाने आम्ही तंत्रज्ञान विकसित करत आहोत. 431 00:22:52,500 --> 00:22:55,351 त्यामुळे निसर्गाबरोबर एकात्मतेने राहता येईल. 432 00:22:55,375 --> 00:22:56,976 आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यांत 433 00:22:57,000 --> 00:23:01,101 आपल्या रोजच्या कृतींचा परिणाम काय होतो त्याचा आपण विचार करूया. 434 00:23:01,125 --> 00:23:03,226 आपण काय विकत घेतो? ते कुठून आले? 435 00:23:03,250 --> 00:23:04,809 ते कसे निर्माण झाले? 436 00:23:04,833 --> 00:23:07,768 यासाठी पर्यावरणाची हानी झाली का? प्राण्यांचा छळ झाला का? 437 00:23:07,792 --> 00:23:10,143 बालमजूर वापरल्यामुळे ते स्वस्त आहे का? 438 00:23:10,167 --> 00:23:12,018 नैतिक पर्याय निवडा. 439 00:23:12,042 --> 00:23:15,559 पण तुम्ही गरिबीत राहत असाल, तर तसे करू शकणार नाही. 440 00:23:15,583 --> 00:23:18,268 सरतेशेवटी, या लोकांजवळ दुर्दम्य आशा आहे. 441 00:23:18,292 --> 00:23:20,893 ते अशक्य वाटणाऱ्या प्रश्नांचा सामना करतात 442 00:23:20,917 --> 00:23:23,351 आणि हार मानत नाहीत. 443 00:23:23,375 --> 00:23:26,476 त्यांना हार मानणं शक्य नसतं. 444 00:23:26,500 --> 00:23:29,018 पण काही गोष्टींशी मी लढू शकत नाही. 445 00:23:29,042 --> 00:23:31,625 मी भ्रष्टाचाराशी लढू शकत नाही. 446 00:23:32,833 --> 00:23:36,958 लष्कराची राजवट आणि हुकूमशहा यांच्याशी मी लढू शकत नाही. 447 00:23:38,625 --> 00:23:40,476 मला शक्य आहे तितकेच मी करू शकते. 448 00:23:40,500 --> 00:23:43,893 प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे वाटा उचलला 449 00:23:43,917 --> 00:23:47,809 तर सर्व एकत्र मिळून पूर्णत्वाला येईल आणि यश मिळेल. 450 00:23:47,833 --> 00:23:49,226 ख्रिस: आता शेवटचा प्रश्न. 451 00:23:49,250 --> 00:23:51,559 अशी एक कल्पना, एक विचार सांगा, 452 00:23:51,583 --> 00:23:56,309 जो आज हे व्याख्यान पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आपण रुजवू इच्छिता. 453 00:23:56,333 --> 00:23:58,184 असा कोणता विचार सांगाल? 454 00:23:58,208 --> 00:24:02,351 गुडाल: फक्त एवढेच लक्षात ठेवा, आयुष्याच्या प्रत्येक दिवशी 455 00:24:02,375 --> 00:24:04,726 तुम्ही पृथ्वीवर परिणाम करत आहात. 456 00:24:04,750 --> 00:24:07,018 ते तुम्ही टाळू शकत नाही. 457 00:24:07,042 --> 00:24:10,601 अगदी पराकोटीच्या दारिद्र्यात राहत नसाल, 458 00:24:10,625 --> 00:24:13,851 तर हा परिणाम कोणत्या प्रकारचा असेल ते तुम्ही निवडू शकता. 459 00:24:13,875 --> 00:24:15,809 गरिबीत सुद्धा पर्याय उपलब्ध असतात. 460 00:24:15,833 --> 00:24:19,726 पण आपण सधन असलो, तर आपल्याजवळ जास्त पर्याय असतात. 461 00:24:19,750 --> 00:24:22,643 आपण सर्वांनी नैतिक पर्याय निवडले, 462 00:24:22,667 --> 00:24:25,809 तर आपल्या जगाचा प्रवास योग्य दिशेने होईल 463 00:24:25,833 --> 00:24:30,893 आणि ते पतवंडांसाठी सोडून जाताना इतकं निकृष्ट नसेल. 464 00:24:30,917 --> 00:24:35,684 मला वाटते, हा सर्वांसाठी संदेश आहे. 465 00:24:35,708 --> 00:24:38,684 कारण बऱ्याच लोकांना काय घडते आहे ते समजते आहे. 466 00:24:38,708 --> 00:24:41,476 पण त्यांना असहाय वाटते, निराश वाटते. आणि मग आपण काय करणार, 467 00:24:41,500 --> 00:24:44,059 म्हणून ते काहीच करत नाहीत. उदासीन राहतात. 468 00:24:44,083 --> 00:24:46,875 उदासीनता हा एक मोठा धोका आहे. 469 00:24:47,750 --> 00:24:49,934 ख्रिस: डॉ. जेन गुडाल, वा. 470 00:24:49,958 --> 00:24:53,934 आपल्या असामान्य आयुष्याबद्दल मी आपले खूप आभार मानतो. 471 00:24:53,958 --> 00:24:55,976 आपल्या कार्याबद्दल, आणि 472 00:24:56,000 --> 00:24:57,858 आज इथे आमच्याशी इतका वेळ बोलल्याबद्दल. 473 00:24:57,882 --> 00:24:59,268 धन्यवाद. 474 00:24:59,292 --> 00:25:00,542 गुडाल: धन्यवाद.