0:00:01.750,0:00:03.792 ख्रिस अँडरसन: डॉ. जेन गुडाल, आपले स्वागत. 0:00:04.875,0:00:06.143 जेन गुडाल: धन्यवाद. 0:00:06.167,0:00:10.101 मला वाटतं, माझ्यासोबत मि. एच आहेत,[br]हे लोकांना कळले पाहिजे. 0:00:10.125,0:00:12.268 नाहीतर ही मुलाखत अपुरी राहील. 0:00:12.292,0:00:14.417 कारण मि. एच यांना सगळे ओळखतात. 0:00:16.083,0:00:17.625 ख्रिस: हॅलो, मि. एच. 0:00:18.667,0:00:20.934 १७ वर्षांपूर्वीच्या टेड व्याख्यानात आपण 0:00:20.958,0:00:26.684 मानवाच्या निसर्गावरच्या अतिक्रमणाबद्दल [br]धोक्याची सूचना दिली होती. 0:00:26.708,0:00:28.559 आजची ही महामारी म्हणजे एक प्रकारे 0:00:28.583,0:00:32.476 निसर्गाचा प्रतिहल्ला आहे,[br]असे आपल्याला वाटते का? 0:00:32.500,0:00:37.559 गुडाल:हे अगदी स्पष्ट आहे, की 0:00:37.583,0:00:42.518 करोना किंवा एच आय व्ही/एड्स [br]यासारखे प्राणिजन्य रोग 0:00:42.542,0:00:46.893 आणि प्राण्यांपासून उद्भवणारे [br]सर्व प्रकारचे इतर रोग 0:00:46.917,0:00:50.059 यांचा पर्यावरणाच्या हानीशी [br]अंशतः संबंध आहे. 0:00:50.083,0:00:54.059 प्राण्यांचे निवासस्थान नष्ट झाले, [br]की ते दाटीवाटीने राहू लागतात. 0:00:54.083,0:00:58.351 त्यामुळे काहीवेळा एखाद्या प्राणी प्रजातीत [br]सामान्यपणे आढळणारा विषाणू, 0:00:58.375,0:01:01.434 जो शेकडो वर्षे त्या प्रजातीत [br]सहजपणे राहिला असेल, 0:01:01.458,0:01:03.476 तो नव्या प्रजातीत संक्रमित होतो. 0:01:03.500,0:01:08.643 याशिवाय, प्राणी मानवाच्या [br]अधिक निकट संपर्कात येत आहेत. 0:01:08.667,0:01:14.643 काहीवेळा यापैकी एखादा प्राणी -- [br]ज्याला विषाणूची लागण झाली असेल -- 0:01:14.667,0:01:18.893 तो विषाणूला मानवात [br]संक्रमित होण्याची संधी देतो, 0:01:18.917,0:01:22.976 आणि कोविड-१९ सारखा नवा रोग निर्माण करतो. 0:01:23.000,0:01:25.018 याचबरोबर 0:01:25.042,0:01:27.851 आपण प्राण्यांचा मोठा अनादर करत आहोत. 0:01:27.875,0:01:29.518 आपण त्यांची शिकार करतो, 0:01:29.542,0:01:31.851 त्यांना ठार मारतो, त्यांना खातो, 0:01:31.875,0:01:33.393 त्यांचा विक्रय करतो, 0:01:33.417,0:01:39.809 वन्यप्राण्यांच्या बाजारपेठेत पाठवतो, 0:01:39.833,0:01:41.101 आशियामध्ये. 0:01:41.125,0:01:44.434 तिथे त्यांना छोट्याशा पिंजऱ्यांत, [br]भयानक अवस्थेत कोंडून ठेवले जाते. 0:01:44.458,0:01:48.768 तिथे मानवांमध्ये रक्त, मूत्र, विष्ठा [br]याद्वारे संसर्ग फैलावतो. 0:01:48.792,0:01:53.434 एका प्राण्यातून दुसऱ्यात किंवा मानवात [br]विषाणूचा प्रसार होण्यासाठी 0:01:53.458,0:01:55.184 ही परिस्थिती आदर्श ठरते. 0:01:55.208,0:01:59.476 ख्रिस: मला थोडं भूतकाळात डोकावायचे आहे. 0:01:59.500,0:02:01.393 कारण आपली कहाणीच तशी अद्भुत आहे. 0:02:01.417,0:02:05.518 म्हणजे १९६० च्या सुमारास, [br]आजच्यापेक्षा कट्टर स्त्रीविरोधी वातावरणात 0:02:05.542,0:02:08.268 आपण मार्ग काढू शकलात, 0:02:08.292,0:02:11.643 जगातल्या आघाडीच्या [br]शास्त्रज्ञांपैकी एक ठरलात, 0:02:11.667,0:02:15.184 चिंपांझींबद्दल एकामागून एक [br]आश्चर्यजनक शोध लावलेत, 0:02:15.208,0:02:18.268 म्हणजे त्यांनी साधनांचा केलेला वापर, [br]आणि असेच इतर अनेक शोध. 0:02:18.292,0:02:20.893 हे यश आपल्यामधल्या [br]कोणत्या वैशिष्ट्यामुळे मिळाले, 0:02:20.917,0:02:23.976 असे आपल्याला वाटते? 0:02:24.000,0:02:27.226 गुडाल: प्राण्यांविषयी प्रेम घेऊनच[br]मी जन्माला आले. 0:02:27.250,0:02:30.393 आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे,[br]आईने मला खूप पाठिंबा दिला. 0:02:30.417,0:02:33.059 माझ्या अंथरुणात गांडूळ पाहून [br]ती चिडली नाही. 0:02:33.083,0:02:35.559 हे बागेत असायला हवेत, इतकेच म्हणाली. 0:02:35.583,0:02:38.309 मी चार तास गायब होते, [br]तेव्हाही ती चिडली नाही. 0:02:38.333,0:02:41.268 तिने पोलिसांना फोन केला.[br]मी खुराड्यात बसून राहिले होते. 0:02:41.292,0:02:44.768 कारण अंडे कोणत्या भोकातून बाहेर येते[br]ते मला कोणी सांगत नव्हते. 0:02:44.792,0:02:47.059 शास्त्रज्ञ व्हावे,असे माझे स्वप्न नव्हते. 0:02:47.083,0:02:49.476 कारण स्त्रिया अशा प्रकारचे काही करत नसत. 0:02:49.500,0:02:52.726 खरे तर त्याकाळी कोणी पुरुषही [br]असे काही करत नव्हते. 0:02:52.750,0:02:54.684 सगळे मला हसले. फक्त आई सोडून. 0:02:54.708,0:02:58.393 ती म्हणाली, "तुला हे खरोखर करायचे असेल, [br]तर प्रचंड कष्ट करावे लागतील. 0:02:58.417,0:03:00.143 प्रत्येक संधीचा फायदा घ्यावा लागेल. 0:03:00.167,0:03:02.393 हार मानली नाहीस, [br]तर कदाचित तुला मार्ग सापडेल." 0:03:02.417,0:03:06.518 ख्रिस: आणि कसा कोण जाणे, [br]आपण चिंपांझींचा विश्वास संपादन केलात. 0:03:06.542,0:03:10.292 हे पूर्वी कोणालाच जमले नव्हते. 0:03:11.167,0:03:15.809 मागे वळून पाहताना[br]आनंदाचे कोणते क्षण आठवतात? 0:03:15.833,0:03:19.417 किंवा अजून चिंपांझींबद्दल लोकांना न कळणारे[br]असे काही आहे का? 0:03:20.333,0:03:24.309 गुडाल: तुम्ही म्हणता, [br]"कोणीच न पाहिलेले मी पाहिले, 0:03:24.333,0:03:25.601 विश्वास संपादन केला." 0:03:25.625,0:03:27.226 इतर कोणी प्रयत्नच केला नव्हता. 0:03:27.250,0:03:29.018 खरंच सांगते. 0:03:29.042,0:03:34.018 मी त्याच पद्धती वापरल्या, 0:03:34.042,0:03:38.601 ज्या वापरून मी लहानपणी [br]घराभोवतीच्या प्राण्यांचा अभ्यास करत असे. 0:03:38.625,0:03:40.184 शांतपणे बसून राहणे. 0:03:40.208,0:03:42.643 भर्रकन प्राण्यांच्या फार जवळ न जाणे. 0:03:42.667,0:03:47.226 पण ते कठीण होते.[br]कारण फक्त सहा महिन्यांपुरते पैसे होते. 0:03:47.250,0:03:49.601 कल्पना करा, पैसे मिळवणे किती कठीण असेल. 0:03:49.625,0:03:51.643 एका तरुण मुलीला, जिच्याजवळ पदवीही नाही, 0:03:51.667,0:03:55.434 काहीतरी विचित्र करण्यासाठी, [br]जंगलात जाऊन शांत बसून राहण्यासाठी पैसे. 0:03:55.458,0:03:56.934 पण शेवटी 0:03:56.958,0:04:00.976 एका अमेरिकन परोपकारी व्यक्तीकडून [br]सहा महिन्यांपुरते पैसे मिळाले. 0:04:01.000,0:04:04.934 कालांतराने आपण चिंपांझीचा विश्वास कमावू, [br]हे मला ठाऊक होते. 0:04:04.958,0:04:06.476 पण माझ्याजवळ वेळ होता का? 0:04:06.500,0:04:11.018 हळूहळू महिने उलटले, [br]आणि शेवटी सुमारे चार महिन्यांनंतर 0:04:11.042,0:04:13.809 एका चिंपांझीची भीती चेपली. 0:04:13.833,0:04:16.934 आणि एका प्रसंगी [br]त्याच चिंपांझीला मी पाहिले -- 0:04:16.958,0:04:20.143 अजून मी फार जवळ गेले नव्हते, [br]पण माझ्याजवळ दुर्बीण होती -- 0:04:20.167,0:04:25.309 वाळवी शोधण्यासाठी साधने तयार करून [br]तो ती वापरत होता. 0:04:25.333,0:04:28.143 मला आश्चर्याचा धक्का बसला नाही, 0:04:28.167,0:04:32.143 कारण बंदिवासातील चिंपांझी [br]काय करू शकतात ते मी वाचले होते -- 0:04:32.167,0:04:34.184 पण मला वैज्ञानिक मत ठाऊक होते.[br]ते असे, की 0:04:34.208,0:04:37.559 मानव, फक्त मानवच साधने निर्माण करतो [br]आणि त्यांचा वापर करतो. 0:04:37.583,0:04:40.809 [डॉ. लुईस] लीकींना किती आनंद होईल, [br]ते मला ठाऊक होते. 0:04:40.833,0:04:42.559 या निरीक्षणामुळे 0:04:42.583,0:04:45.643 त्यांना नॅशनल जॉग्राफिककडे जाता आले. 0:04:45.667,0:04:49.726 आणि त्यांचे उत्तर आले, "ठीक आहे, [br]आम्ही या संशोधनासाठी साहाय्य करत राहू." 0:04:49.750,0:04:53.893 मग त्यांनी ह्युगो व्हान लाविक या [br]छायाचित्रकार-चित्रपटनिर्मात्याला पाठवले. 0:04:53.917,0:04:56.559 माझ्या निरीक्षणाची नोंद करण्यासाठी. 0:04:56.583,0:05:01.018 अनेक शास्त्रज्ञ साधन वापरावर[br]विश्वास ठेवायला तयार नव्हते. 0:05:01.042,0:05:04.101 खरेच, त्यातला एक म्हणाला, की [br]मी चिंपांझींना शिकवले असले पाहिजे. 0:05:04.125,0:05:06.018 (हशा) 0:05:06.042,0:05:08.934 पण मी त्यांच्याजवळ जात नव्हते, [br]म्हणजे हा चमत्कार असावा. 0:05:08.958,0:05:11.559 पण ह्युगोची चित्रफीत पाहिल्यावर, 0:05:11.583,0:05:16.018 आणि मी केलेली चिंपांझींच्या [br]वर्तनाची वर्णने ऐकल्यावर 0:05:16.042,0:05:19.351 शास्त्रज्ञांना आपले मत बदलायला [br]सुरुवात करावी लागली. 0:05:19.375,0:05:22.018 ख्रिस: आणि त्यानंतर [br]आपण आणखी अनेक शोध लावलेत. 0:05:22.042,0:05:26.601 त्यामुळे चिंपांझींचे मानवाशी[br]अविश्वसनीय असे जवळचे नाते सिद्ध झाले. 0:05:26.625,0:05:29.976 चिंपांझींना विनोदाचे अंग असते [br]असे तुम्ही कुठेतरी म्हटल्याचे आठवते. 0:05:30.000,0:05:32.684 ते कुठे व्यक्त झालेले आपण पाहिले आहे का? 0:05:32.708,0:05:36.934 गुडाल: त्यांच्या खेळात ते दिसून येते. 0:05:36.958,0:05:39.393 एखादा मोठा चिंपांझी छोट्याशी खेळत असतो. 0:05:39.417,0:05:41.809 छोटा झाडाभोवती वेलीमागे जात असतो. 0:05:41.833,0:05:44.684 दरवेळी छोटा ती वेल पकडणार, 0:05:44.708,0:05:46.684 तेवढ्यात मोठा ती ओढून दूर खेचतो. 0:05:46.708,0:05:48.476 छोटा रडू लागतो, 0:05:48.500,0:05:50.268 तर मोठा हसू लागतो. 0:05:50.292,0:05:51.750 यावरून समजते. 0:05:54.417,0:05:59.809 ख्रिस: आणि नंतर आपण [br]फार क्लेशकारक असे काही पाहिलेत. 0:05:59.833,0:06:04.559 काही प्रसंगी आपण [br]चिंपांझींच्या टोळ्या, जमाती, गट, 0:06:04.583,0:06:10.684 एकमेकांशी क्रूरपणे, [br]हिंसकपणे वागताना पाहिलेत. 0:06:10.708,0:06:14.351 याचा अर्थ आपण कसा लावला [br]हे मला जाणून घ्यायचे आहे. 0:06:14.375,0:06:17.601 त्यांना पाहून आपल्याला [br]मानवाबद्दल निराशा वाटली का? 0:06:17.625,0:06:20.149 कारण मानवाशी त्यांचे जवळचे नाते आहे. 0:06:20.173,0:06:23.976 सर्व वानर जमातींमध्ये [br]अटळपणे कोणत्या तरी स्वरूपात 0:06:24.000,0:06:27.375 हिंसा असणार, असे वाटले का? 0:06:28.375,0:06:30.976 गुडाल: तशी ती आहे, हे तर उघड आहे. 0:06:31.000,0:06:35.643 मानवी क्रौर्याशी माझा प्रथम संबंध आला, 0:06:35.667,0:06:37.309 तो युद्ध संपल्यावर, 0:06:37.333,0:06:40.101 ज्यूंच्या संहाराची चित्रे पाहताना. 0:06:40.125,0:06:42.726 आणि त्यामुळे मला मोठा धक्का बसला. 0:06:42.750,0:06:44.018 त्यामुळे मी बदलले. 0:06:44.042,0:06:46.351 मला वाटतं, त्यावेळी मी दहा वर्षांची होते. 0:06:46.375,0:06:48.851 आणि जेव्हा मला चिंपांझींमधल्या 0:06:48.875,0:06:52.018 हिंसेची झलक दिसली, तेव्हा वाटलं, की 0:06:52.042,0:06:54.559 ते आपल्यासारखेच पण जास्त चांगले आहेत. 0:06:54.583,0:06:57.143 मग समजले, की माझ्या कल्पनेपेक्षा 0:06:57.167,0:06:58.684 आपल्यात जास्त साम्य आहे. 0:06:58.708,0:07:02.684 १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला 0:07:02.708,0:07:03.976 हे फार विचित्र वाटले. 0:07:04.000,0:07:05.601 आक्रमकता ही जन्मजात असते, 0:07:05.625,0:07:09.726 की आत्मसात केलेली असते [br]याबद्दल मोठा वाद होता. 0:07:09.750,0:07:12.434 आणि त्याला राजकीय वळण लागले. 0:07:12.458,0:07:15.893 तो खराच मोठा विचित्र काळ होता. 0:07:15.917,0:07:17.559 मी पुढे सरून सांगत होते, 0:07:17.583,0:07:20.143 "नाही. मला वाटते, आक्रमकता हा नक्कीच 0:07:20.167,0:07:24.268 आपल्या नैसर्गिक वर्तणुकींच्या [br]पटलामधला एक भाग आहे." 0:07:24.292,0:07:29.934 एका आदरणीय शास्त्रज्ञाला[br]मी त्यांचे खरेखुरे मत विचारले. 0:07:29.958,0:07:32.351 कारण ते स्पष्ट सांगत होते, की 0:07:32.375,0:07:33.851 आक्रमकता आत्मसात केलेली असते. 0:07:33.875,0:07:38.018 आणि ते म्हणाले, "जेन, मला खरोखर काय वाटते[br]याबद्दल मी न बोलणे चांगले." 0:07:38.042,0:07:41.917 माझ्यासाठी विज्ञानाच्या दृष्टीने [br]हा मोठाच धक्का होता. 0:07:42.792,0:07:47.351 ख्रिस: लहानपणापासून, जग सुंदर आहे [br]असा माझा समज होता. 0:07:47.375,0:07:52.893 फुलपाखरे, मधमाशा, फुले [br]यांबद्दलचे अनेक सुंदर चित्रपट, 0:07:52.917,0:07:55.851 अतिशय सुंदर असे निसर्गचित्र. 0:07:55.875,0:08:01.893 अनेक पर्यावरण शास्त्रज्ञ [br]बरेचदा असा पवित्रा घेतात, 0:08:01.917,0:08:06.059 "होय, निसर्ग निर्मळ आहे. [br]निसर्ग सुंदर आहे. मानव दुष्ट आहे." 0:08:06.083,0:08:08.726 पण प्रत्यक्षात मात्र [br]आपली निरीक्षणे निराळी असतात. 0:08:08.750,0:08:11.601 निसर्गाच्या कोणत्याही घटकाकडे [br]जास्त बारकाईने पाहता 0:08:11.625,0:08:13.976 खरोखर भयंकर गोष्टी आढळतात. 0:08:14.000,0:08:16.393 निसर्गाचा अर्थ आपण कसा लावता? [br]आपल्याला काय वाटते? 0:08:16.417,0:08:18.851 आपण त्याचा अर्थ कसा लावावा? 0:08:18.875,0:08:20.851 गुडाल: निसर्ग म्हणजे 0:08:20.875,0:08:24.809 उत्क्रांतीचा संपूर्ण वर्णपट पाहता, 0:08:24.833,0:08:28.518 एखादे आदिम स्वरूपातले ठिकाण.. 0:08:28.542,0:08:33.143 माझ्या लहानपणी आफ्रिका [br]अशी आदिम स्वरूपात होती. 0:08:33.167,0:08:36.101 तिथे सर्वत्र प्राणी होते. 0:08:36.125,0:08:40.018 आणि सिंहांनी शिकार केलेली [br]मला कधीच आवडत नसे. 0:08:40.042,0:08:42.559 पण त्यांना शिकार करावी लागते. [br]तो त्यांचा धर्म आहे. 0:08:42.583,0:08:46.393 त्यांनी प्राणी मारले नाहीत, [br]तर ते स्वतः मरतील. 0:08:46.417,0:08:50.101 आपण आणि प्राणी यांतला मोठा फरक, मला वाटते, 0:08:50.125,0:08:56.018 ते जे काही करतात, [br]तो त्यांचा धर्म असतो म्हणून करतात. 0:08:56.042,0:08:59.393 आपण योजना आखून काम करू शकतो. 0:08:59.417,0:09:01.184 आपल्या योजना फार निराळ्या असतात. 0:09:01.208,0:09:05.226 आपण एखादे जंगल पूर्णपणे तोडण्याच्या [br]योजना आखू शकतो, 0:09:05.250,0:09:07.726 कारण आपल्याला लाकूड विकायचे असते, 0:09:07.750,0:09:10.101 किंवा आणखी एखादा शॉपिंग मॉल बांधायचा असतो, 0:09:10.125,0:09:11.393 वगैरे काहीतरी. 0:09:11.417,0:09:16.143 आपण निसर्गाचा नाश करतो, युद्धे करतो. 0:09:16.167,0:09:19.976 आपण असा दुष्टावा करू शकतो,[br]कारण स्वतः आरामात बसून 0:09:20.000,0:09:22.934 आपण दूरवर कोणाला तरी [br]छळण्याची योजना आखू शकतो. 0:09:22.958,0:09:24.226 हा दुष्टपणा आहे. 0:09:24.250,0:09:27.893 चिंपांझींचे युद्ध आदिम प्रकारचे असते. 0:09:27.917,0:09:29.476 ते अतिशय आक्रमक होऊ शकतात. 0:09:29.500,0:09:30.893 पण ते क्षणिक असते. 0:09:30.917,0:09:32.393 ती त्यांची भावना असते. 0:09:32.417,0:09:34.809 एका भावनेला दिलेला तो प्रतिसाद असतो. 0:09:34.833,0:09:38.476 ख्रिस: आपल्या निरीक्षणानुसार [br]चिंपांझींची प्रगती 0:09:38.500,0:09:41.893 काही लोक ज्याला मानवी महाशक्ती म्हणतात 0:09:41.917,0:09:43.643 तिच्याइतकी नाही. 0:09:43.667,0:09:49.601 भविष्याचे तपशीलवार चित्र मनात पाहून 0:09:49.625,0:09:52.393 मानव दीर्घकालीन योजना आखू शकतो. 0:09:52.417,0:09:57.768 त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी[br]एकमेकांना उत्तेजन देऊ शकतो. 0:09:57.792,0:10:01.226 चिंपांझींबरोबर इतका काळ घालवलेल्या [br]आपणासारख्या व्यक्तीलादेखील 0:10:01.250,0:10:04.434 असे वाटते की हे निराळे कौशल्य आहे. 0:10:04.458,0:10:06.601 आपण त्याची जबाबदारी घेऊन 0:10:06.625,0:10:09.434 ते अधिक शहाणपणाने वापरले पाहिजे. 0:10:09.458,0:10:11.351 गुडाल: होय. मला स्वतःला असे वाटते -- 0:10:11.375,0:10:13.684 म्हणजे याबद्दल बरीच चर्चा झाली आहे, 0:10:13.708,0:10:17.601 पण मला वाटते, आपण दोघे[br]ज्या पद्धतीने संवाद करत आहोत, 0:10:17.625,0:10:19.393 ती पद्धत मानवाने निर्माण केली आहे. 0:10:19.417,0:10:21.518 आपल्याजवळ शब्द आहेत. 0:10:21.542,0:10:24.934 म्हणजे प्राण्यांमधला संवाद [br]आपल्याला वाटतो त्यापेक्षा 0:10:24.958,0:10:26.226 फार प्रगत आहे. 0:10:26.250,0:10:28.226 चिंपांझी, गोरिला, ओरँगउटान 0:10:28.250,0:10:31.708 हे बहिऱ्यांसाठीची मानवी [br]खाणाखुणांची भाषा शिकू शकतात. 0:10:32.792,0:10:38.226 आपली जी भाषा असेल, [br]तीच शिकत आपण मोठे होतो. 0:10:38.250,0:10:41.893 त्यामुळे तुम्ही कधीच ऐकल्या नसतील [br]अशा गोष्टी मी तुम्हांला सांगू शकते. 0:10:41.917,0:10:44.476 पण चिंपांझी तसे करू शकत नाहीत. 0:10:44.500,0:10:49.726 आपण आपल्या मुलांना [br]अमूर्त गोष्टी शिकवू शकतो. 0:10:49.750,0:10:51.559 पण चिंपांझी तसे करू शकत नाहीत. 0:10:51.583,0:10:55.268 हो, चिंपांझी सर्व प्रकारच्या [br]चतुराईच्या गोष्टी करू शकतात. 0:10:55.292,0:10:59.893 तसेच हत्ती, कावळे [br]आणि ऑक्टोपससुद्धा करू शकतात. 0:10:59.917,0:11:03.518 पण आपण दुसऱ्या ग्रहांवर जाणारी [br]याने तयार करू शकतो. 0:11:03.542,0:11:06.101 छायाचित्रे काढणारे छोटे [br]यंत्रमानव निर्माण करू शकतो. 0:11:06.125,0:11:10.893 आपण दोघे आपापल्या ठिकाणाहून [br]एकमेकांशी बोलतो आहोत, 0:11:10.917,0:11:13.059 ती अद्भुत पद्धत आपण शोधून काढली आहे. 0:11:13.083,0:11:14.726 माझ्या लहानपणी 0:11:14.750,0:11:17.559 टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता. 0:11:17.583,0:11:19.434 संगणक नव्हते. 0:11:19.458,0:11:20.893 ते जग फार निराळे होते. 0:11:20.917,0:11:24.518 माझ्याजवळ होती फक्त पेन्सिल, पेन आणि वही. 0:11:24.542,0:11:27.393 ख्रिस: आपण पुन्हा निसर्गाबद्दलच्या [br]प्रश्नाकडे वळू. 0:11:27.417,0:11:28.989 मी याबद्दल पुष्कळ विचार करतो. 0:11:29.013,0:11:32.263 प्रामाणिकपणे सांगतो, [br]मी हे समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे. 0:11:33.208,0:11:37.393 आपण, आणि मला आदरणीय असणाऱ्या अनेक लोकांनी 0:11:37.417,0:11:44.226 निसर्गाची हानी होऊ न देणे[br]या एका ध्यासापोटी इतके कार्य केले आहे. 0:11:44.250,0:11:47.101 तर, ही गोष्ट शक्य आहे का, [br]योग्य किंवा गरजेची आहे का: 0:11:47.125,0:11:51.976 आपण एकाच वेळी दोन्ही बाजू [br]स्वीकारू शकतो का, 0:11:52.000,0:11:53.934 की निसर्गात अनेक भयंकर गोष्टी असतात, 0:11:53.958,0:11:56.851 पण त्याचवेळी निसर्ग विलक्षण सुंदरही असतो. 0:11:56.875,0:12:02.018 यापैकी काही सौंदर्य त्या भयंकरपणाच्या [br]शक्यतेतून निर्माण होतं. 0:12:02.042,0:12:06.934 ते आपले भान हरपण्याइतके सुंदर असते. 0:12:06.958,0:12:10.684 आपण निसर्गाचा एक भाग आहोत. [br]त्याशिवाय आपल्याला अस्तित्व नाही. 0:12:10.708,0:12:13.143 मानवाला पूर्णत्व हवे असेल, तर प्रथम 0:12:13.167,0:12:17.434 आपण निसर्गाला आपलेसे केले पाहिजे. [br]त्याचा भाग झाले पाहिजे. बरोबर? 0:12:17.458,0:12:22.226 हे नाते कोणत्या भाषेत मांडावे? [br]आपण मला मार्गदर्शन करा. 0:12:22.250,0:12:26.351 गुडाल: मला वाटतं, एक समस्या अशी आहे, [br]की आपली बुद्धी जशी विकसित झाली, 0:12:26.375,0:12:29.018 तशी आपल्या उपयोगासाठी 0:12:29.042,0:12:32.434 पर्यावरणात बदल घडवण्याची [br]आपली क्षमता वाढत गेली, 0:12:32.458,0:12:35.268 आपण शेती करून पीक घेऊ लागलो. 0:12:35.292,0:12:38.476 त्या जागी पूर्वी जंगल किंवा वनराई होती. 0:12:38.500,0:12:41.309 आपण आता त्याबद्दल बोलायला नको. 0:12:41.333,0:12:44.893 पण अशी आहे आपली निसर्ग बदलण्याची क्षमता. 0:12:44.917,0:12:49.351 आपण शहरांत आणि महानगरांत [br]जास्त वस्ती करू लागलो, 0:12:49.375,0:12:53.351 तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहू लागलो, 0:12:53.375,0:12:56.976 त्यामुळे जास्त लोकांना निसर्गापासून [br]ताटातूट झाल्यासारखे वाटू लागले. 0:12:57.000,0:12:59.559 आज शेकडो, हजारो मुले 0:12:59.583,0:13:01.309 शहराच्या आतल्या भागांत वाढताहेत. 0:13:01.333,0:13:04.059 तिथे कोणत्याही प्रकारचा निसर्ग नाही. 0:13:04.083,0:13:09.143 म्हणूनच हरित शहरांची मोहीम [br]इतकी महत्त्वाची आहे. 0:13:09.167,0:13:11.518 याबाबत प्रयोग झाले आहेत. 0:13:11.542,0:13:14.809 मला वाटते शिकागोमध्ये असावेत. [br]पण खात्री नाही. 0:13:14.833,0:13:17.893 तिथे अनेक मोकळ्या जागा होत्या. 0:13:17.917,0:13:21.684 हिंसाचार प्रबळ असणाऱ्या [br]शहराच्या एका भागात. 0:13:21.708,0:13:24.768 यापैकी काही जागा त्यांनी हरित केल्या. 0:13:24.792,0:13:29.809 त्यांनी त्या मोकळ्या जागांमध्ये [br]फुले, झाडे, झुडुपे लावली. 0:13:29.833,0:13:33.184 आणि तिथले हिंसेचे प्रमाण एकदम कमी झाले. 0:13:33.208,0:13:35.708 मग त्यांनी उरलेल्या [br]अर्ध्या भागातही झाडे लावली. 0:13:36.917,0:13:38.851 यावरून हे स्पष्ट होते. 0:13:38.875,0:13:41.643 याखेरीज संशोधनातून [br]असेही सिद्ध झाले आहे, की 0:13:41.667,0:13:45.917 योग्य मानसिक वाढीसाठी [br]मुलांना हरित निसर्गाची गरज असते. 0:13:46.875,0:13:50.101 तुम्ही म्हटल्याप्रमाणे [br]आपण निसर्गाचा एक भाग आहोत. 0:13:50.125,0:13:54.351 आणि आपण निसर्गाचा अनादर करत आहोत. 0:13:54.375,0:13:57.309 हे आपल्या मुलांसाठी फार घातक आहे. 0:13:57.333,0:13:58.809 आणि आपल्या नातवंडांसाठीही. 0:13:58.833,0:14:02.851 कारण स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, [br]हवामान आणि पावसाचे नियमन 0:14:02.875,0:14:06.434 यासाठी आपण निसर्गावर अवलंबून असतो. 0:14:06.458,0:14:09.226 आपण काय केले त्याकडे पहा. [br]हवामान संकटाकडे पहा. 0:14:09.250,0:14:11.476 हे आपल्यामुळे घडले. आपणच हे केले. 0:14:11.500,0:14:13.184 ख्रिस: सुमारे तीस वर्षांपूर्वी 0:14:13.208,0:14:19.018 आपण वैज्ञानिक ते सामाजिक कार्यकर्ती [br]असा बदल केलात. 0:14:19.042,0:14:20.292 का? 0:14:21.333,0:14:26.809 गुडाल: १९८६ सालची विज्ञान परिषद. [br]तोपर्यंत मला पी. एच.डी. मिळालेली होती. 0:14:26.833,0:14:30.559 चिंपांझींचे वर्तन सभोवतालच्या [br]परिसरासोबत कसे बदलते, 0:14:30.583,0:14:32.143 याबद्दल परिषद होती. 0:14:32.167,0:14:34.559 आफ्रिकाभर सहा ठिकाणी [br]पाहणीच्या जागा होत्या. 0:14:34.583,0:14:38.268 आम्हांला वाटले, [br]या शास्त्रज्ञांना एकत्र आणू, 0:14:38.292,0:14:39.684 आणि याचा शोध घेऊ. 0:14:39.708,0:14:41.226 हे फार रंजक होते. 0:14:41.250,0:14:43.893 पण यापैकी एक सत्र [br]निसर्ग संरक्षणाबद्दल होते. 0:14:43.917,0:14:47.768 आणि एक सत्र बंदिस्त अवस्थेतील [br]प्राण्यांबद्दल होते. 0:14:47.792,0:14:49.893 उदाहरणार्थ, वैद्यकीय संशोधनातील प्राणी. 0:14:49.917,0:14:54.184 ही दोन सत्रे माझ्यासाठी धक्कादायक ठरली. 0:14:54.208,0:14:56.768 एक वैज्ञानिक म्हणून मी परिषदेला गेले होते, 0:14:56.792,0:14:58.351 कार्यकर्ती म्हणून बाहेर आले. 0:14:58.375,0:15:02.184 हा निर्णय मी घेतला नाही. [br]मनात आत काहीतरी घडलं. 0:15:02.208,0:15:05.726 ख्रिस: गेली चौतीस वर्षे 0:15:05.750,0:15:08.434 मानव आणि निसर्गातले संबंध सुधारण्यासाठी 0:15:08.458,0:15:11.750 आपण अथकपणे मोहीम राबवलीत. 0:15:12.667,0:15:17.750 हे संबंध कसे असायला हवेत? 0:15:19.000,0:15:23.809 गुडाल: हे प्रश्न पुन्हापुन्हा समोर येतात. 0:15:23.833,0:15:26.583 मानवाला राहण्यासाठी जागा लागते. 0:15:27.625,0:15:29.726 पण मला वाटते, समस्या हीच आहे, की 0:15:29.750,0:15:33.309 आपला सधन समाज 0:15:33.333,0:15:34.726 अतिशय लोभी झाला आहे. 0:15:34.750,0:15:40.018 खरोखर, मोठमोठी पटांगणे असणारी [br]चार चार घरे कोणाला लागतात? 0:15:40.042,0:15:43.684 आणखी एक शॉपिंग मॉल [br]आपल्याला कशासाठी हवा असतो? 0:15:43.708,0:15:45.434 आणखी असेच बरेच काही. 0:15:45.458,0:15:50.434 आपण अल्पकाळचा आर्थिक फायदा पाहतो आहोत. 0:15:50.458,0:15:53.518 पैसा हा उपासना करण्याचा देव झाला आहे. 0:15:53.542,0:15:57.601 निसर्गाशी असलेले अस्तित्वाचे सर्व बंध [br]आपण हरवून बसलो आहोत. 0:15:57.625,0:16:03.351 म्हणून आपण अल्पकाळचा आर्थिक फायदा [br]किंवा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. 0:16:03.375,0:16:06.018 पृथ्वीचे संरक्षण 0:16:06.042,0:16:08.083 किंवा आपल्या मुलांचे भविष्य याऐवजी. 0:16:09.000,0:16:12.101 आता आपल्याला या गोष्टींची काळजी वाटत नाही. 0:16:12.125,0:16:15.226 म्हणून, मी माझा लढा कधीच थांबवणार नाही. 0:16:15.250,0:16:19.059 ख्रिस: चिंपांझी संरक्षणाच्या आपल्या कामात 0:16:19.083,0:16:24.268 आपण जनतेला केंद्रस्थानी ठेवले. 0:16:24.292,0:16:26.393 स्थानिक जनतेचा सहभाग मिळवला. 0:16:26.417,0:16:27.684 यात कितपत यश मिळाले? 0:16:27.708,0:16:29.851 पृथ्वीचे यशस्वीपणे रक्षण करण्यासाठी 0:16:29.875,0:16:32.934 हे गरजेचे आहे, असे आपल्याला वाटते का? 0:16:32.958,0:16:35.434 गुडाल: त्या सुप्रसिद्ध परिषदेनंतर [br]मला वाटले, 0:16:35.458,0:16:39.018 आफ्रिकेतले चिंपांझी नाहीसे का होताहेत,[br]आणि जंगलांची काय परिस्थिती आहे 0:16:39.042,0:16:40.893 याबद्दल जास्त जाणून घ्यायला हवे. 0:16:40.917,0:16:45.976 मग मी थोडे पैसे जमवून चिंपांझी वस्तीच्या [br]सहा देशांना भेट दिली. 0:16:46.000,0:16:50.018 आणि चिंपांझींना कोणत्या समस्यांचा[br]सामना करावा लागतो हे समजून घेतले. 0:16:50.042,0:16:52.809 मांसासाठी हत्या होणे,[br]जिवंत प्राण्यांचा विक्रय, 0:16:52.833,0:16:54.518 सापळ्यात पकडले जाणे, 0:16:54.542,0:16:58.934 मानवी लोकसंख्येची वाढ 0:16:58.958,0:17:02.684 आणि त्यामुळे त्यांची शेती, गुरे [br]आणि वस्तीसाठी जास्त जमिनीची गरज. 0:17:02.708,0:17:07.434 पण अनेक माणसांना सोसावे लागणारे [br]हाल सुद्धा मी पाहत होते. 0:17:07.458,0:17:11.018 अतोनात दारिद्र्य, [br]आरोग्य आणि शिक्षण यांचा अभाव, 0:17:11.042,0:17:13.518 जमिनीची धूप. 0:17:13.542,0:17:18.518 गॉम्बेच्या छोट्याशा राष्ट्रीय उद्यानावरून[br]विमानाने जात असताना हे विचार असह्य झाले. 0:17:18.542,0:17:22.809 एकेकाळी आफ्रिकेच्या [br]पश्चिम किनाऱ्यापर्यंत जाणारा हा 0:17:22.833,0:17:24.101 विषुववृत्तीय जंगलपट्टा. 0:17:24.125,0:17:25.434 आणि १९९० मध्ये 0:17:25.458,0:17:29.101 उरले होते त्या जंगलाचे एक छोटेसे बेट. [br]छोटेसे राष्ट्रीय उद्यान. 0:17:29.125,0:17:31.018 सभोवतालच्या सगळ्या टेकड्या उजाड होत्या. 0:17:31.042,0:17:32.768 त्यावेळी मला जोरदार धक्का बसला. 0:17:32.792,0:17:34.601 आपण जर जनतेला 0:17:34.625,0:17:36.893 पर्यावरणाची हानी न करता 0:17:36.917,0:17:39.518 जगण्याच्या पद्धती शोधायला मदत केली नाही, 0:17:39.542,0:17:42.226 तर आपण चिंपांझींना वाचवण्याचा प्रयत्न [br]करूच शकत नाही. 0:17:42.250,0:17:45.976 म्हणून जेन गुडाल संस्थेने [br]"Take Care" हा कार्यक्रम सुरु केला. 0:17:46.000,0:17:48.018 आम्ही त्याला "TACARE" म्हणतो. 0:17:48.042,0:17:51.976 ही आमची निसर्ग संरक्षणाची पद्धत [br]समाजावर आधारित आहे. 0:17:52.000,0:17:54.101 ही सर्वसमावेशक आहे. 0:17:54.125,0:17:57.351 निसर्ग संरक्षणाची साधने 0:17:57.375,0:17:59.226 आम्ही गावकऱ्यांच्या हातात सोपवली आहेत. 0:17:59.250,0:18:04.351 टांझानियामधले वन्य चिंपांझी [br]आरक्षित जागेत राहत नाहीत. 0:18:04.375,0:18:07.143 ते गावातल्या राखीव जंगलांत राहतात. 0:18:07.167,0:18:12.434 लोक आता गावातल्या जंगलांवर[br]नजर ठेवू लागले आहेत. 0:18:12.458,0:18:14.684 आता त्यांना समजते, की 0:18:14.708,0:18:18.268 जंगलांचे संरक्षण हे फक्त [br]वन्यप्राण्यांसाठी नसून 0:18:18.292,0:18:19.768 ते त्यांच्यासाठीदेखील आहे. 0:18:19.792,0:18:22.226 जंगल ही त्यांची गरज आहे. 0:18:22.250,0:18:23.601 त्यांना त्याचा अभिमान वाटतो. 0:18:23.625,0:18:25.726 तिथले स्वयंसेवक कार्यशाळेत जातात. 0:18:25.750,0:18:27.809 स्मार्टफोन कसे वापरावेत ते शिकतात. 0:18:27.833,0:18:32.601 क्लाउड मध्ये माहिती [br]अपलोड कशी करावी ते शिकतात. 0:18:32.625,0:18:35.476 त्यामुळे सर्व काम पारदर्शी होते. 0:18:35.500,0:18:37.643 झाडे पुन्हा उगवली आहेत. 0:18:37.667,0:18:39.726 आता टेकड्या उजाड राहिल्या नाहीत. 0:18:39.750,0:18:44.476 गॉम्बेभोवती एक मध्यवर्ती विभाग [br]निर्माण करण्याचे त्यांनी ठरवले आहे. 0:18:44.500,0:18:47.893 त्यामुळे चिंपांझींना १९९० पेक्षा [br]जास्त मोठे जंगल उपलब्ध होईल. 0:18:47.917,0:18:49.851 जंगलांमधले जोडमार्ग ते खुले करत आहेत. 0:18:49.875,0:18:55.268 त्यामुळे विखुरलेल्या प्रजातींचा संबंध येईल[br]जवळच्या नात्यात संबंध येणार नाही. 0:18:55.292,0:18:58.434 होय, या पद्धतीला यश मिळाले आहे. [br]आता ती आणखी सहा देशांत सुरु आहे. 0:18:58.458,0:18:59.726 हीच पद्धत. 0:18:59.750,0:19:05.351 ख्रिस: आपण आपले असामान्य विचार [br]न थकता जगात सर्वत्र पोहोचवता. 0:19:05.375,0:19:07.309 इतका प्रवास करता. 0:19:07.333,0:19:10.601 सगळीकडे व्याख्याने देता.[br]सर्वत्र लोकांना प्रेरणा देता. 0:19:10.625,0:19:15.601 आपल्याला ही ऊर्जा कुठून मिळते? 0:19:15.625,0:19:17.268 या कार्याचा इतका उत्कट ध्यास, 0:19:17.292,0:19:20.476 कारण हे काम थकवणारं आहे. 0:19:20.500,0:19:23.018 मोठ्या समुदायासमोर दिलेले [br]प्रत्येक व्याख्यान 0:19:23.042,0:19:25.101 शारीरिक दृष्टया थकवून टाकते. 0:19:25.125,0:19:28.143 तरीही, आपण अजूनही हे करताहात. 0:19:28.167,0:19:30.125 आपण हे कसे करता? 0:19:31.042,0:19:36.393 गुडाल: तुम्हांला ठाऊक असेल, मी हट्टी आहे. [br]मला हार मानणं आवडत नाही. 0:19:36.417,0:19:41.684 मोठाल्या कंपन्यांचे अधिकारी 0:19:41.708,0:19:43.226 जे जंगले नष्ट करतात, 0:19:43.250,0:19:49.809 किंवा पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांचे [br]निसर्ग रक्षणाचे नियम 0:19:49.833,0:19:51.143 रद्द करणारे राजकारणी, 0:19:51.167,0:19:53.976 मी कोणाबद्दल बोलते आहे तुम्ही जाणता. 0:19:54.000,0:19:56.143 यांच्याविरुद्ध मी लढतच राहणार आहे. 0:19:56.167,0:20:00.268 वन्यजीवनाविषयी मला काळजी आहे, [br]तो माझा ध्यास आहे. 0:20:00.292,0:20:02.976 मला निसर्गाचा ध्यास आहे. 0:20:03.000,0:20:07.434 माझं जंगलांवर प्रेम आहे. [br]त्यांचा नाश होताना पाहून मला दुःख वाटते. 0:20:07.458,0:20:10.351 आणि मला मुलांविषयी फार आस्था वाटते. 0:20:10.375,0:20:12.434 त्यांचे भवितव्य आपण हिरावून घेत आहोत. 0:20:12.458,0:20:14.184 मी हार मानणार नाही. 0:20:14.208,0:20:19.143 मला वाटते, माझ्याजवळ चांगली जनुके आहेत. [br]ही देवाची देणगी आहे. 0:20:19.167,0:20:22.768 आणि माझ्याजवळ जी दुसरी देणगी [br]असल्याचे माझ्या लक्षात आले, 0:20:22.792,0:20:24.226 ती म्हणजे संवाद. 0:20:24.250,0:20:26.893 मग ते लिहिणे असो किंवा बोलणे. 0:20:26.917,0:20:28.976 आपल्याला वाटते, 0:20:29.000,0:20:31.893 असे जगभर फिरून काय होणार? 0:20:31.917,0:20:35.018 पण दरवेळी मी व्याख्यान देते 0:20:35.042,0:20:36.393 तेव्हा लोक सांगतात, 0:20:36.417,0:20:38.768 "मी हार मानली होती. [br]पण तुम्ही मला प्रेरणा दिलीत. 0:20:38.792,0:20:41.059 आता मी माझा हातभार लावण्याची [br]प्रतिज्ञा करतो." 0:20:41.083,0:20:45.976 आणि "Roots and Shoots" ही मुलांची मोहीम [br]आता पासष्ट देशांतून सुरु आहे. 0:20:46.000,0:20:47.559 आणि त्यात वाढ होत आहे. 0:20:47.583,0:20:48.851 सर्व वयोगट 0:20:48.875,0:20:52.018 मानवाला, प्राण्यांना, पर्यावरणाला [br]मदत करणारे प्रकल्प निवडताहेत. 0:20:52.042,0:20:54.643 बाह्या सरसावून कामाला लागले आहेत. 0:20:54.667,0:20:57.809 त्यांच्या डोळ्यांत एक चमक दिसते.[br]त्यांना सांगायचं असतं, 0:20:57.833,0:21:00.309 डॉ. जेन, पहा, आम्ही काय करतो आहोत 0:21:00.333,0:21:02.101 पृथ्वीच्या रक्षणासाठी. 0:21:02.125,0:21:03.934 त्यांना मी निराश कशी करू? 0:21:03.958,0:21:07.226 ख्रिस: पृथ्वीच्या भविष्याबद्दल [br]आपल्याला वाटणारी 0:21:07.250,0:21:08.893 सर्वात मोठी काळजी कोणती? 0:21:08.917,0:21:12.292 आजच्या आपल्या स्थितीबद्दल वाटणारी [br]सर्वात मोठी भीती कोणती? 0:21:13.750,0:21:19.101 गुडाल: मला वाटते, आपल्या हातात [br]फार कमी वेळ असल्याची भीती. 0:21:19.125,0:21:22.643 झालेल्या हानीची भरपाई करण्याची [br]निदान सुरुवात करण्यासाठी, 0:21:22.667,0:21:25.726 हवामान बदल मंदावण्यासाठी. 0:21:25.750,0:21:27.726 वेळ संपत आली आहे. 0:21:27.750,0:21:32.934 लॉकडाऊनच्या काळात जगभरात [br]काय घडले ते आपण पाहिलेच. 0:21:32.958,0:21:35.018 कोविड-१९ मुळे. 0:21:35.042,0:21:37.226 शहरांवरचे आकाश स्वच्छ झाले. 0:21:37.250,0:21:41.101 काही लोकांनी प्रथमच [br]इतक्या शुद्ध हवेत श्वास घेतला. 0:21:41.125,0:21:44.059 आणि रात्री इतके लखलखणारे [br]आकाश प्रथमच पाहिले, 0:21:44.083,0:21:46.684 जे यापूर्वी कधीच नीट पाहिले नव्हते. 0:21:46.708,0:21:49.059 तर मला वाटते, 0:21:49.083,0:21:52.143 सर्वात मोठी काळजी अशी, 0:21:52.167,0:21:55.476 की जास्त लोकांना, 0:21:55.500,0:21:57.786 लोकांना समजते, पण ते कृती करत नाहीत. 0:21:57.810,0:22:00.434 जास्त लोकांना कृती करायला [br]प्रेरित कसे करावे? 0:22:00.458,0:22:06.184 गुडाल: नॅशनल जॉग्राफिकने आपल्याविषयी [br]एक असामान्य चित्रफीत प्रदर्शित केली आहे. 0:22:06.208,0:22:09.768 सहा दशकांच्या आपल्या कार्यावर [br]प्रकाशझोत टाकणारी. 0:22:09.792,0:22:13.208 तिचे नाव आहे:[br]"Jane Goodall: The Hope." 0:22:14.042,0:22:16.018 तर, ही कोणती आशा? 0:22:16.042,0:22:17.309 गुडाल: माझी आशा म्हणजे, 0:22:17.333,0:22:19.393 माझी सर्वात मोठी आशा म्हणजे तरुणाई. 0:22:19.417,0:22:21.976 चीनमध्ये लोक सांगतात, 0:22:22.000,0:22:24.143 "होय, अर्थातच मला [br]पर्यावरणाविषयी आस्था आहे. 0:22:24.167,0:22:26.434 मी प्राथमिक शाळेत[br]Roots and Shoots मध्ये होतो." 0:22:26.458,0:22:29.768 Roots and Shoots द्वारे आम्ही [br]नीतिमूल्यांचा पाठपुरावा करतो आहोत. 0:22:29.792,0:22:34.601 या मुलांना भरपूर उत्साह आहे. [br]एकदा समस्या समजल्या, 0:22:34.625,0:22:36.476 त्यांच्यात कृती करण्याची क्षमता आहे, 0:22:36.500,0:22:40.667 ते नद्या स्वच्छ करताहेत. [br]अतिक्रमण करणाऱ्या प्रजाती काढताहेत. 0:22:41.958,0:22:43.684 त्यांच्यापाशी कितीतरी कल्पना आहेत. 0:22:43.708,0:22:48.393 आमच्याजवळ विलक्षण बुद्धिमत्तेचे लोक आहेत. 0:22:48.417,0:22:52.476 त्यांच्या सहयोगाने आम्ही [br]तंत्रज्ञान विकसित करत आहोत. 0:22:52.500,0:22:55.351 त्यामुळे निसर्गाबरोबर [br]एकात्मतेने राहता येईल. 0:22:55.375,0:22:56.976 आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यांत 0:22:57.000,0:23:01.101 आपल्या रोजच्या कृतींचा परिणाम काय होतो[br]त्याचा आपण विचार करूया. 0:23:01.125,0:23:03.226 आपण काय विकत घेतो? ते कुठून आले? 0:23:03.250,0:23:04.809 ते कसे निर्माण झाले? 0:23:04.833,0:23:07.768 यासाठी पर्यावरणाची हानी झाली का?[br]प्राण्यांचा छळ झाला का? 0:23:07.792,0:23:10.143 बालमजूर वापरल्यामुळे ते स्वस्त आहे का? 0:23:10.167,0:23:12.018 नैतिक पर्याय निवडा. 0:23:12.042,0:23:15.559 पण तुम्ही गरिबीत राहत असाल, [br]तर तसे करू शकणार नाही. 0:23:15.583,0:23:18.268 सरतेशेवटी, या लोकांजवळ दुर्दम्य आशा आहे. 0:23:18.292,0:23:20.893 ते अशक्य वाटणाऱ्या प्रश्नांचा सामना करतात 0:23:20.917,0:23:23.351 आणि हार मानत नाहीत. 0:23:23.375,0:23:26.476 त्यांना हार मानणं शक्य नसतं. 0:23:26.500,0:23:29.018 पण काही गोष्टींशी मी लढू शकत नाही. 0:23:29.042,0:23:31.625 मी भ्रष्टाचाराशी लढू शकत नाही. 0:23:32.833,0:23:36.958 लष्कराची राजवट आणि हुकूमशहा [br]यांच्याशी मी लढू शकत नाही. 0:23:38.625,0:23:40.476 मला शक्य आहे तितकेच मी करू शकते. 0:23:40.500,0:23:43.893 प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे वाटा उचलला 0:23:43.917,0:23:47.809 तर सर्व एकत्र मिळून पूर्णत्वाला येईल [br]आणि यश मिळेल. 0:23:47.833,0:23:49.226 ख्रिस: आता शेवटचा प्रश्न. 0:23:49.250,0:23:51.559 अशी एक कल्पना, एक विचार सांगा, 0:23:51.583,0:23:56.309 जो आज हे व्याख्यान पाहणाऱ्या [br]प्रत्येकाच्या मनात आपण रुजवू इच्छिता. 0:23:56.333,0:23:58.184 असा कोणता विचार सांगाल? 0:23:58.208,0:24:02.351 गुडाल: फक्त एवढेच लक्षात ठेवा, [br]आयुष्याच्या प्रत्येक दिवशी 0:24:02.375,0:24:04.726 तुम्ही पृथ्वीवर परिणाम करत आहात. 0:24:04.750,0:24:07.018 ते तुम्ही टाळू शकत नाही. 0:24:07.042,0:24:10.601 अगदी पराकोटीच्या दारिद्र्यात राहत नसाल, 0:24:10.625,0:24:13.851 तर हा परिणाम कोणत्या प्रकारचा असेल [br]ते तुम्ही निवडू शकता. 0:24:13.875,0:24:15.809 गरिबीत सुद्धा पर्याय उपलब्ध असतात. 0:24:15.833,0:24:19.726 पण आपण सधन असलो, [br]तर आपल्याजवळ जास्त पर्याय असतात. 0:24:19.750,0:24:22.643 आपण सर्वांनी नैतिक पर्याय निवडले, 0:24:22.667,0:24:25.809 तर आपल्या जगाचा प्रवास योग्य दिशेने होईल 0:24:25.833,0:24:30.893 आणि ते पतवंडांसाठी सोडून जाताना [br]इतकं निकृष्ट नसेल. 0:24:30.917,0:24:35.684 मला वाटते, हा सर्वांसाठी संदेश आहे. 0:24:35.708,0:24:38.684 कारण बऱ्याच लोकांना [br]काय घडते आहे ते समजते आहे. 0:24:38.708,0:24:41.476 पण त्यांना असहाय वाटते, निराश वाटते. [br]आणि मग आपण काय करणार, 0:24:41.500,0:24:44.059 म्हणून ते काहीच करत नाहीत. [br]उदासीन राहतात. 0:24:44.083,0:24:46.875 उदासीनता हा एक मोठा धोका आहे. 0:24:47.750,0:24:49.934 ख्रिस: डॉ. जेन गुडाल, वा. 0:24:49.958,0:24:53.934 आपल्या असामान्य आयुष्याबद्दल [br]मी आपले खूप आभार मानतो. 0:24:53.958,0:24:55.976 आपल्या कार्याबद्दल, आणि 0:24:56.000,0:24:57.858 आज इथे आमच्याशी इतका वेळ बोलल्याबद्दल. 0:24:57.882,0:24:59.268 धन्यवाद. 0:24:59.292,0:25:00.542 गुडाल: धन्यवाद.