Return to Video

WHO: The Two Polio Vaccines

  • 0:00 - 0:03
    पोलिओमुळे नेहेमीसाठी अपंगत्व येते.
  • 0:05 - 0:08
    यावर इलाज सापडलेला नाही,
    पण यावर प्रतिबंध करता येतो.
  • 0:09 - 0:11
    पोलिओवर प्रतिबंध करण्यासाठी
    दोन मोठी साधने आहेत.
  • 0:11 - 0:13
    दोन सुरक्षित आणि प्रभावी लसी.
  • 0:15 - 0:18
    यापैकी एक तर फक्त दोन थेंबांची आहे जी
  • 0:18 - 0:20
    लहान मुलांना तोंडातून दिली जाते,
  • 0:20 - 0:22
    याला ओरल पोलिओ लस म्हणतात.
  • 0:23 - 0:24
    दुसरी लस इंजेक्शनच्या स्वरूपात दिली जाते,
  • 0:24 - 0:28
    याला इनऍक्टिव्हेटेड पोलिओ व्हायरस लस
    असे म्हणतात.
  • 0:28 - 0:32
    दोन्ही लसी पोलिओ व्हायरसशी लढा कसा द्यायचा
    हे लहान मुलांच्या शरीरांना शिकवतात.
  • 0:32 - 0:34
    ते दोन निराळ्या मार्गांनी हे शिकवतात.
  • 0:35 - 0:39
    ओरल पोलिओ लस
    मुलांच्या आतड्यांमध्ये संरक्षण तयार करते.
  • 0:39 - 0:42
    या लसी मुळे लस दिलेल्या मुलाचेच नव्हे, तर
  • 0:42 - 0:45
    आजूबाजूच्या सर्व लोकांचेही संरक्षण होते.
  • 0:46 - 0:50
    अशा ठिकाणी जिथे पोलिओचा प्रभाव
    अधिक आहे, तिथे प्रत्येक लहान मुलाला
  • 0:50 - 0:53
    ओरल पोलिओ लसीचे
    अनेक डोस दिले गेले पाहिजेत.
  • 0:53 - 0:58
    इंजेक्शनच्या लसीने पोटाऐवजी
    रक्तातून सुरक्षितता निर्माण केली जाते.
  • 0:58 - 1:02
    याने रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि
    संपूर्ण देश पोलिओपासून मुक्त राहतो.
  • 1:02 - 1:05
    पण याने मुलांमध्ये
    आपसात पोलिओ पसरणे थांबत नाही,
  • 1:05 - 1:09
    त्यामुळे पोलिओ अजूनही पसरत असलेल्या ठिकाणी
    ही लस एवढी उपयोगाची नाही.
  • 1:10 - 1:14
    सापडेल तिथे व्हायरसचा नायनाट करण्यासाठी
    आपल्याला ओरल पोलिओ लस वापरली पाहिजे.
  • 1:15 - 1:16
    पोलिओ नामशेष झाल्यावरच
  • 1:17 - 1:20
    आपण इनऍक्टिव्हेटेड पोलिओ व्हायरस लस
    स्वतंत्रपणे वापरू शकतो
  • 1:20 - 1:23
    ज्याने सर्वांना सुरक्षित ठेवता येईल.
  • 1:24 - 1:27
    या दोन्ही लसींना सुरक्षित आणि
    परिणामकारक म्हणून विश्व आरोग्य संगठनाकडून
  • 1:27 - 1:29
    मान्यता मिळाली आहे.
  • 1:30 - 1:33
    त्यांना नीट परिणाम साधायचा असल्यास,
    सर्व लहान मुलांना दिले जाणे गरजेचे आहे,
  • 1:33 - 1:35
    मग ते कुठल्याही देशातील असोत.
  • 1:36 - 1:38
    या लसींमुळेच आज संपूर्ण जगामध्ये
  • 1:38 - 1:42
    पोलिओ 99% पर्यंत कमी झालेला आहे.
  • 1:45 - 1:48
    प्रत्येक लहान मुलाचे लसीकरण करू या!
  • 1:48 - 1:50
    नेहमीसाठी पोलिओला पळवून लावू या!
Title:
WHO: The Two Polio Vaccines
Description:

more » « less
Video Language:
English
Team:
Amplifying Voices
Project:
COVID-19 Pandemic
Duration:
02:00

Marathi subtitles

Revisions