Return to Video

निर्वासीतांसाठी उच्च शिक्षण आणि रोजगाराचा मार्ग

  • 0:03 - 0:06
    सईदा अदेन सईद:माझ्या डोक्यामध्ये
    अजूनही ते भयानक चित्र आहे .
  • 0:06 - 0:08
    मी लोकांना खाली पडताना बघतेय ,
  • 0:08 - 0:10
    बंदुकीचे आवाज.
  • 0:10 - 0:11
    मी खूप घाबरलेले होते .
  • 0:11 - 0:13
    खरंच,मी खुप रडत होते .
  • 0:13 - 0:16
    माझ्या आई वडिलांच्या ओळखीच्या
    एकाने माझा हात धरला आणि म्हणाले ,
  • 0:16 - 0:18
    "लवकर चल ,लवकर चल ,लवकर चल "
  • 0:18 - 0:21
    मी म्हणत होते "माझी आई कुठे आहे ?
    आई ?आई ?"
  • 0:21 - 0:25
    नोरिया डम्बरीन दुसाबिरेमे:रात्रीच्या
    वेळी आम्हाला गोळ्यांचे आवाज येत असत ,
  • 0:25 - 0:27
    आम्हाला बंदुकीचे आवाज येत होते.
  • 0:27 - 0:28
    निवडणूक जवळ आली होती
  • 0:28 - 0:31
    आमच्या इथे तरुण लोक रस्त्यावर उतरले होते ,
  • 0:31 - 0:33
    ते विरोध करत होते
  • 0:33 - 0:35
    आणि त्यातले बरेचसे आता मरून पडले होते .
  • 0:35 - 0:37
    सईदा:आम्हाला एका गाडी मध्ये भरले.
  • 0:37 - 0:39
    ज्यामध्ये खूप गर्दी होती .
  • 0:39 - 0:41
    लोक त्यांचा जीव वाचवण्यासाठी पळत होते.
  • 0:41 - 0:44
    अशा पद्धतीने मी सोमालिया मधून पळाले .
  • 0:44 - 0:46
    माझ्या आईची आणि माझी
    चुकामुक झाली .
  • 0:46 - 0:48
    मी कुठे आहे ते तिला कोणीच सांगितले नाही.
  • 0:48 - 0:50
    नोरिया:सांगण्याचे कारण असे आहे
    कि आम्ही शाळेत गेलो नाही,
  • 0:50 - 0:53
    बाजारात जाता येत नव्हते घरातच
    बसावे लागत होते
  • 0:53 - 0:58
    मला जाणीव झाली कि पर्याय असता तर
    मी अजून काही तरी चांगले केले असते,
  • 0:58 - 1:01
    मी तो निवडला असता आणि माझं
    भविष्य काही वेगळंच असलं असतं.
  • 1:01 - 1:02
    (संगीत)
  • 1:02 - 1:05
    इग्नाझिओ मात्त्येंनी:सध्या जगात सगळीकडेच
  • 1:05 - 1:07
    स्थलांतरित लोकांची संख्या
    वाढते आहे .
  • 1:07 - 1:10
    आतापर्यंत ६० लक्ष लोक स्थलांतरित
    झाले आहेत .
  • 1:10 - 1:13
    आणि दुर्दैवाने हे थांबतच नाहीय.
  • 1:13 - 1:16
    क्रिस्टीना रसेल :मला वाटते मानवतावादी
    संघटनेला
  • 1:16 - 1:18
    संशोधन आणि सत्य यातून समजले आहे कि
  • 1:18 - 1:21
    हा तर कायमस्वरूपी प्रश्न आहे ,ज्यावर
    आता आपण बोलत आहोत .
  • 1:21 - 1:24
    बेली दमतीए येशिता:या सगळ्या
    विदयार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची गरज आहे,
  • 1:24 - 1:27
    एक पदवी जी ते वापरू शकतील .
  • 1:27 - 1:29
    समजा विद्यार्थी आता रवांडा मध्ये आहेत,
  • 1:29 - 1:33
    ते जरी स्थलांतरित झाले तरी त्यांचे
    शिक्षण सुरूच राहिले पाहिजे .
  • 1:33 - 1:35
    ते कुठेही गेले तरी त्यांची पदवी त्यांना
    वापरता यायला हवी .
  • 1:35 - 1:39
    क्रिस्टीना :सौदर्न न्यू हॅम्पशायर च्या
    ग्लोबल एज्युकेशन मुव्हमेंटच्या अंतर्गत
  • 1:39 - 1:43
    आमचा एक निर्भय प्रकल्प होता ,
    ज्यामध्ये आम्ही वास्तविक तपासण्या केल्या ,
  • 1:43 - 1:46
    अशा लोकांसाठी जे स्थलांतरित आहेत
    किंवा शिक्षण नाही घेऊ शकत
  • 1:46 - 1:49
    रोजगारावर आधारित पदवी मिळवण्याचा
    मार्ग त्यांना दाखवण्याचा ,
  • 1:49 - 1:54
    तोही त्यांच्या क्षमतेनुसार.
  • 1:54 - 1:58
    सईदा:स्थलांतरित व्यक्ती म्हणून
    माझ्या साठी हे अश्यकच होते ,
  • 1:58 - 2:01
    स्वतःचे शिक्षण पूर्ण करत पायावर उभे रहाणे.
  • 2:01 - 2:03
    माझे नाव सईदा अदेन ,
  • 2:03 - 2:06
    मी सोमालिया वरून आलीय.
  • 2:06 - 2:09
    जेंव्हा मी ककुमाला आले तेंव्हा
    ९ वर्षांची होते,
  • 2:09 - 2:12
    आणि १७ व्या वर्षी मी शाळेत जायला
    सुरुवात केली .
  • 2:12 - 2:15
    मी आता सौदर्न न्यू हॅम्पशायर
    युनिव्हर्सिटी तुन
  • 2:15 - 2:16
    माझी पदवी घेतेय .
  • 2:18 - 2:21
    नोरिया :माझे नाव नोरिया डम्बरीन दुसबरीम
  • 2:21 - 2:26
    मी संभाषण कले मध्ये माझी पदवी घेतेय
  • 2:26 - 2:28
    व्यावसायिक दृष्टिकोनामधून.
  • 2:28 - 2:31
    क्रिस्टीना :आम्ही ५ देशातील विद्यार्थ्यां
    सोबत काम करत आहोत:
  • 2:31 - 2:35
    लेबनान,केनिया ,मलावी ,रवांडा आणि
    दक्षिणआफ्रिका.
  • 2:35 - 2:39
    सांगायला खूप अभिमान वाटतो कि ४०० पदवीधर,
    ८०० हुन जास्त पदवी घेणारे विद्यार्थी आहेत
  • 2:39 - 2:42
    १००० पेक्षा हि जास्त जणांनी नावनोंदणी
    केली आहे
  • 2:42 - 2:50
    निर्वासित जिथे आहेत तिथेच
    जाऊन आम्ही काम करतोय ,आहे ना जादू
  • 2:52 - 2:54
    तिथे कोणताच वर्ग नाही .
  • 2:54 - 2:56
    कोणतेच व्याख्यान नाही .
  • 2:56 - 2:57
    कोणताच ठराविक दिवस नाही .
  • 2:57 - 2:59
    कोणतीच अंतिम परीक्षा नाही.
  • 3:00 - 3:04
    हि पदवी कार्यक्षमतेवर आधारित
    आहे वेळेवर नाही .
  • 3:04 - 3:06
    इथे तुम्हीच तुमचा प्रकल्प निवडायचा आहे .
  • 3:06 - 3:08
    तो कसा हाताळायचा तेही तुम्हीच ठरवायचे .
  • 3:08 - 3:12
    नोरिया:एकदा तुम्ही व्यासपीठ नक्की केले
    कि तुम्हाला तुमचे उद्देश्य कळेल .
  • 3:12 - 3:15
    प्रत्येक उद्देश्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे
    प्रकल्प सापडतील .
  • 3:15 - 3:17
    प्रत्येक प्रकल्प तुम्हाला सांगेल
  • 3:17 - 3:20
    तुम्हाला कोणते कौशल्य आत्मसात
    करायचे आहे ,
  • 3:20 - 3:21
    त्याचा मार्ग ,
  • 3:21 - 3:23
    प्रकल्पाचा आढावा .
  • 3:23 - 3:26
    क्रिस्टीना :सौदर्न न्यू हॅम्पशायर
    युनिव्हर्सिटीच्या यशाचे गमक आहे
  • 3:26 - 3:30
    ते त्यांचे कार्यक्षमतेवर आधारित
    संगणकीय शिक्षण
  • 3:30 - 3:33
    ज्यामध्ये ते सहकाऱ्यासोबत शिकतात
  • 3:33 - 3:36
    जिथे त्यांना सर्व प्रकारचे समर्थन मिळते .
  • 3:36 - 3:38
    जिथे त्यांना व्यावसायिक शिक्षणा शिवाय
  • 3:38 - 3:40
    मानसिक आधार ,
  • 3:40 - 3:42
    वैद्यकीय आधार हि मिळतो,
  • 3:42 - 3:45
    आणि शेवटी रोजगाराचा आधार हि मिळतोच
  • 3:45 - 3:48
    म्हणूनच पदवी घेणाऱ्यांची संख्या ९५% आणि
  • 3:48 - 3:50
    रोजगाराची संख्या ८८% एवढी आहे .
  • 3:50 - 3:53
    नोरिया :मी सामाजिक माध्यम व्यवस्थापन
    शिकत आहे .
  • 3:53 - 3:57
    तो माझ्या व्यावसायीक शिक्षणाचाच एक भाग आहे
  • 3:57 - 4:00
    या प्रकल्पातून मी खऱ्या दुनियेला
    समजू शकले
  • 4:01 - 4:04
    क्रिस्टीना :आमची स्थानबद्ध शिक्षणव्यवस्था
    हि एक चांगली संधी आहे
  • 4:04 - 4:07
    विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य
    वापरण्यासाठी .
  • 4:07 - 4:10
    आणि आमच्या साठी हि नवीन संधी आहे
  • 4:10 - 4:14
    स्थानबद्ध शिक्षण आणि येणाऱ्या नवीन
    रोजगार संधी यांची सांगड घालण्याची
  • 4:14 - 4:16
    (संगीत)
  • 4:16 - 4:20
    हा एक चांगला नमुना आहे ज्यामध्ये
  • 4:20 - 4:23
    वेळ आणि विद्यापीठाचे धोरण याना
    महत्व न देता
  • 4:23 - 4:25
    विदयार्थी केंद्र स्थानी आहेत .
  • 4:26 - 4:31
    इग्नाझिओ :ह्या "स. न .ह .यु."च्या धोरणाने
    झाडाची मूळे हलवून टाकली आहेत .
  • 4:32 - 4:33
    हे खूप मोठे आहे .
  • 4:33 - 4:38
    पारंपरिक शिक्षण व्यवस्थेला हा
    मोठा धक्का आहे .
  • 4:40 - 4:44
    बेली :याने निश्चितच त्या असुरक्षित ,
    निर्वासित छावण्यां मधील
  • 4:44 - 4:47
    विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून जाईल .
  • 4:47 - 4:48
    नोरिया :जर मला पदवी मिळाली,
  • 4:48 - 4:52
    तर मी परत जाऊन जिथे मला हवे तिथे
    काम करू शकेन
  • 4:52 - 4:55
    इंग्लिश वर प्रभुत्वव मिळवेन,
  • 4:55 - 4:58
    ज्याचा कधी मी स्वप्नात हि विचार
    केला नव्हता .
  • 4:58 - 5:02
    आता माझ्या कडे तो आत्मविश्वास
    आणि कौशल्य आहे
  • 5:02 - 5:05
    कोणाला हि न घाबरता मी
  • 5:05 - 5:09
    माझे काम व्यवस्थित हाताळू शकते .
  • 5:09 - 5:11
    सादिया :मला नेहमीच समाजासाठी काम
    करायचे होते.
  • 5:11 - 5:14
    स्त्री शिक्षणासाठी अशी संस्था स्थापन
    करायची आहे
  • 5:14 - 5:18
    ना नफा तत्वावर.
  • 5:18 - 5:21
    अशांसाठी मला दूत बनायचे आहे
  • 5:21 - 5:24
    शिक्षणासाठी परावृत्त करायचे आहे
  • 5:24 - 5:27
    स्वप्न पूर्ण करण्यासाठी
  • 5:28 - 5:30
    अजूनही उशीर नाही झाला.
Title:
निर्वासीतांसाठी उच्च शिक्षण आणि रोजगाराचा मार्ग
Speaker:
क्रिस्टीना रस्सेल
Description:

जगभरातील ७० लक्ष निर्वासित लोकांमधून फक्त ३% लोक उच्चशिक्षित आहेत .ग्लोबल एज्युकेशन मुव्हमेंट चे उद्यीष्टय आहे निर्वासितांना उच्चशिक्षण देत रोजगाराचा मार्ग दाखवणे.ऐकूयात विद्यार्थी आणि कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका क्रिस्टीना रस्सेल यांच्यातील संभाषण ,कसे ग्लोबल एज्युकेशन मुव्हमेंट चे कौश्यल्यावर आधारित शिक्षण निर्वासितांना पदवीधर बनवत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे .

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
05:44

Marathi subtitles

Revisions