Return to Video

घरातून काम करणे व्यवसायासाठी का चांगले आहे?

  • 0:00 - 0:02
    कार्यालयामध्ये काम करतानाची
    मूलभूत समस्या
  • 0:02 - 0:04
    हीच कि कामाच्या वातावरणावर नियंत्रण नसते.
  • 0:05 - 0:07
    [आपण ज्या प्रकारे कार्य करतो]
  • 0:09 - 0:12
    नमस्कार माझे नाव मॅट
    आणि मी ऑटोमॅटिकचा सीईओ आहे,
  • 0:12 - 0:15
    जी चालवते WordPress.com,
    Jetpack आणि WooCommerce
  • 0:15 - 0:19
    आम्ही 800हून अधिक कर्मचार्यांकडे पोहचतोय
    आणि ते सर्वत्र राहतात,
  • 0:19 - 0:23
    कॅलिफोर्नियापासून अलाबामा, मिसिसिपी ते
    माझे ठिकाण टेक्सास.
  • 0:23 - 0:25
    आणि ६७ देशांमध्ये देखील आहेत.
  • 0:25 - 0:27
    कॅनडा, मेक्सिको, भारत, न्यूझीलँड.
  • 0:27 - 0:30
    त्यातील काही तर सतत
    प्रवास करत भटकत असतात.
  • 0:30 - 0:32
    ते आरव्ही मधून किंवा
    Airbnb मधून काम करतात,
  • 0:32 - 0:35
    दररोज,आठवडा किंवा महिन्यात
    ते नवीन ठिकाणी असतात.
  • 0:35 - 0:38
    Wi-Fi ची चांगली सोय असेल तर,
    ठिकाण कोणते याची काळजी नाही.
  • 0:38 - 0:41
    वितरित कार्यावरील आमचे लक्ष
    आम्ही विचलित होऊ देत नाही.
  • 0:41 - 0:44
    अगदी सुरुवातीपासून
    ही एक जागरूक निवड होती.
  • 0:44 - 0:46
    लक्षात घ्या
    मी "दूरस्थ" हा शब्द वापरत नाही.
  • 0:46 - 0:48
    कारण ती अपेक्षा निश्चित करते,
  • 0:48 - 0:50
    की काही लोक आवश्यक आहेत
    आणि काही नाहीत.
  • 0:50 - 0:52
    "वितरित"शब्द वापरतो
    आमच्या कार्यवर्णऩासाठी
  • 0:52 - 0:54
    जिथे प्रत्येकजण समान आहे.
  • 0:54 - 0:55
    मला वाटते की वितरित कार्यबल
  • 0:55 - 0:57
    प्रभावी आहे
    कंपनी बनवण्यासाठी.
  • 0:57 - 0:59
    मात्र जाणीवपूर्वक याचा
    विचार करणे महत्वाचे.
  • 0:59 - 1:01
    जेव्हा आम्ही वर्डप्रेस सुरू केले,
  • 1:01 - 1:03
    पहिल्या २० कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना
    मी भेटलो नव्हतो.
  • 1:03 - 1:06
    परंतु आम्ही बर्याच वर्षांपासून ऑनलाइन
    संपर्कात होतो.
  • 1:06 - 1:09
    मला ते एका साध्या कारणासाठी
    पुढे चालू ठेवायचे आहे.
  • 1:09 - 1:12
    मला वाटते की कौशल्य आणि बुद्धिमत्ता
  • 1:12 - 1:14
    जगभर सारख्याच प्रमाणात आहे.
  • 1:14 - 1:15
    पण संधी मात्र नाही.
  • 1:15 - 1:18
    सिलिकॉन व्हॅलीमध्ये,
    मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यां
  • 1:18 - 1:20
    याच लहानश्या जागी कर्मचारी शोधतात.
  • 1:20 - 1:23
    एक वितरीत कंपनी
    संपूर्ण जगभरातून कर्मचारी मिळवू शकते.
  • 1:23 - 1:26
    कॅलिफोर्नियात राहणाऱ्या
    जपानी व्यक्तीला घेण्यापेक्षा
  • 1:26 - 1:28
    अश्या कोणाला तरी तुम्ही घेऊ शकता
  • 1:28 - 1:31
    जी जगाच्या कोणत्याही भागात राहते,काम करते.
  • 1:31 - 1:33
    वेगळ्या संस्कृतीतील लोक
    वेगळा दृष्टिकोन आणतात.
  • 1:33 - 1:35
    आणि एक वेगळा अनुभव.
  • 1:36 - 1:38
    वितरित होण्याच्या निर्णयाच्या मागे,
  • 1:38 - 1:41
    लोकांना त्यांच्या पद्धतीने काम करण्याची
    मुभा देण्याची इच्छा होती.
  • 1:41 - 1:44
    तुमच्या कामाबाबत विशिष्ट वेळीच
    एखादी गोष्ट करणे गरजेचे नसल्यास
  • 1:44 - 1:45
    तुम्हीच नियोजन करू शकता.
  • 1:45 - 1:49
    मग प्रत्येकजण हवी तशी जागा,
    खायचे पदार्थ इ. निवडू शकतो.
  • 1:49 - 1:52
    तुम्हीच निवडू शकता कधी संगीत असावे
    आणि कधी शांतता.
  • 1:52 - 1:54
    तुम्हीच खोलीचे तापमान ठरवू शकता.
  • 1:54 - 1:56
    येण्याजाण्याचा वेळ वाचवू शकता.
  • 1:56 - 1:59
    तुमच्या गरजेच्या गोष्टींसाठी
    तो वापरू शकता.
  • 1:59 - 2:02
    तंत्रज्ञान कंपनीसाठी
    वितरित कार्यबल आदर्श आहे.
  • 2:02 - 2:03
    पण लोक मला नेहमी विचारतात,
  • 2:03 - 2:06
    "हे तुमच्यासाठी चांगले आहे;
    पण इतरांचे काय ?"
  • 2:06 - 2:08
    जर आपल्याकडे एखादे कार्यालय असेल तर
  • 2:08 - 2:10
    वितरित क्षमता बनवण्यासाठी
    काही गोष्टी करू शकता.
  • 2:11 - 2:13
    प्रथम: सगळ्याची कागदोपत्री नोंद ठेवा.
  • 2:13 - 2:16
    एका कार्यालयात,
    क्षणात निर्णय घेणे सोपे आहे,
  • 2:16 - 2:17
    किचनमध्ये, हॉलमध्ये.
  • 2:17 - 2:19
    पण जेव्हा लोक दूरस्थपणे काम करतात
  • 2:19 - 2:21
    व टीम मधील इतर सदस्य
    याबद्दल चर्चा करतात तेंव्हा
  • 2:21 - 2:22
    सहभागी होता येत नाही.
  • 2:22 - 2:25
    हे निर्णय त्यांना का ते
    समजून घेतल्याशिवाय घेतलेले दिसतील.
  • 2:25 - 2:28
    आपण कुठे होता आणि काय विचार करीत होता
    याच्या खुणा नेहमीच सोडा.
  • 2:28 - 2:31
    यामुळे तुम्ही जिथे सोडले तिथून
    ते पुढे नेणे इतरांना शक्य होईल.
  • 2:31 - 2:33
    यामुळे भिन्न वेळातील
    लोक संवाद साधू शकतात.
  • 2:33 - 2:36
    संस्थेचा विस्तार होताना
    याचा विचार जरूर करावा.
  • 2:36 - 2:38
    लोक सोडतात आणि सामील होतात तेंव्हा .
  • 2:38 - 2:42
    शक्य तितके संभाषण
    ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करा.
  • 2:42 - 2:46
    जेव्हा सर्व सार्वजनिकरित्या होते,
    तेव्हा लोकांना सहज समजू शकते.
  • 2:46 - 2:49
    यासाठी योग्य साधने
    शोधण्याची आवश्यकता आहे.
  • 2:49 - 2:52
    बरेच अॅप्स, सेवा आहेत
    ज्या रोजच्या संभाषणास उपयोगी आहेत.
  • 2:52 - 2:55
    हिडिओ कॉन्फरन्सिंग, प्रकल्प व्यवस्थापन.
  • 2:55 - 2:59
    वस्तूंमुळे कामाच्या पद्धतीत
    बदल झालेला नाही
  • 2:59 - 3:01
    संगणका मुळे झाला आहे.
  • 3:01 - 3:03
    म्हणून सहयोग सक्षम करणारी साधने वापरा,
  • 3:03 - 3:05
    काय प्रभावी ठरते ते पहा.
  • 3:05 - 3:08
    कार्यक्षमरित्या संवाद साधा.
  • 3:08 - 3:09
    पारंपारिक कार्यालयात,
  • 3:09 - 3:12
    आपण त्याच ठिकाणी वर्षातून ४८ आठवडे असता
  • 3:12 - 3:14
    आणि तीन चार आठवडे इतरत्र काम करता
  • 3:14 - 3:16
    आम्ही हे बदलले: छोट्या
    काळासाठी एकत्र येतो.
  • 3:16 - 3:18
    वर्षातून एकदा आम्ही एक भव्य भेट करतो
  • 3:18 - 3:20
    संपूर्ण कंपनी एक आठवड्यासाठी एकत्रित होते.
  • 3:20 - 3:22
    अर्धे काम, अर्धी मजा.
  • 3:22 - 3:24
    प्राथमिक लक्ष्य आहे माणसे जोडणे.
  • 3:24 - 3:26
    आम्ही खात्री करू इच्छितो
    सर्वाना सर्वकाही समजले आहे,
  • 3:26 - 3:28
    संबंध चांगले आहेत याची.
  • 3:28 - 3:30
    जेव्हा ते उर्वरित वर्ष एकत्र काम करतात,
  • 3:30 - 3:34
    तेंव्हा त्यांच्यात सामंजस्य
    आणि सहानभूती राहील.
  • 3:34 - 3:35
    आणि शेवटची गोष्ट :
  • 3:35 - 3:39
    लोकांना त्यांचे स्वतःचे कामाचे वातावरण
    बनविण्यासाठी मुभा द्या.
  • 3:39 - 3:42
    ऑटोमॅटिकसमधील प्रत्येकास
    सहकारी-भत्ता दिला जातो
  • 3:42 - 3:43
    ज्याने ते कामासाठी जागा घेऊ शकतात.
  • 3:43 - 3:46
    कॉफीशॉपमधील Wi-Fi वापरतांना
    कॉफी खरेदीसाठी वापरू शकतात
  • 3:46 - 3:48
    सिएटलमधील एका गटाने त्यांच्या वेतन
    एकत्रित करण्याचा निर्णय घेतला
  • 3:48 - 3:51
    आणि एका घाटावर
    कामाची जागा भाड्याने घेतली.
  • 3:51 - 3:54
    आमच्याकडे काम करणार्या प्रत्येकास
    घरच्या कार्यालयासाठी वेतन मिळते
  • 3:54 - 3:56
    या पैशात योग्य चेअर, मॉनिटर
    घेऊ शकतात
  • 3:56 - 4:02
    योग्य डेस्क सेटअप, जेणेकरुन त्यांच्यासाठी
    सर्वात उत्पादनक्षम वातावरण असेल.
  • 4:02 - 4:05
    आज काही मोजक्याच कंपन्या
    वितरित कार्य पद्धती वापरतात
  • 4:05 - 4:09
    एक दशक किंवा दोन दशकांत
    90 टक्के कंपन्यां असे करतील
  • 4:09 - 4:10
    यामुळे जगभरात बदल घडतील
  • 4:10 - 4:12
    जग अश्या प्रकारे कार्य करू लागेल.
  • 4:12 - 4:16
    ते वितरित कार्यपद्धती अनुसरतील
    वा काळाच्या ओघात मागे पडतील
  • 4:16 - 4:19
    जेंव्हा तुम्ही भविष्यात
    काही बनवण्याचा विचार कराल
  • 4:19 - 4:22
    तेंव्हा जगभरातील कौशल्याचा
    वापर कसा होतो ते पहा
  • 4:22 - 4:24
    लोकांना जगण्याची व हवे तिथून
    काम करू द्या
  • 4:24 - 4:27
    आणि तुम्ही करत असलेल्या कार्यात
    एकत्रितपणे सहभागी व्हा.
Title:
घरातून काम करणे व्यवसायासाठी का चांगले आहे?
Speaker:
मॅट मुलेंवेग
Description:

दूरस्थ कामाची लोकप्रियता वाढत चालली आहे त्यामुळे आजचे कर्मचारी कर्मचारी वेगवेगळ्या वेळांमध्ये एकमेकांच्या सहयोगाने काम करू शकतात. यामुळे कार्यालयाशी संबंधित गणिते कशी बदलतात ? आणि आपण हे कसे सुनिश्चित करू शकतो की मुख्यालयात आणि घरात दोन्ही ठिकाणहून काम करणारे कर्मचारी एकमेकांच्या कायम संपर्कात राहतील ? मॅट मुलेंवेग,वर्डप्रेस सह संस्थापक आणि ऑटोमॅटिकचे सीईओ(ज्यामध्ये 100 टक्के वितरित कार्यबल आहे), आपल्याला सांगताहेत या संबंधीची रहस्ये !

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED Series
Duration:
04:44

Marathi subtitles

Revisions