Return to Video

चित्रकला तुम्हाला कशी मुक्त बनवते

  • 0:01 - 0:02
    तर आज आपण सगळे इथे आहोत .
  • 0:02 - 0:06
    मी तर घरातच आहे ,तुमच्या पैकी बरेच
    जण हि घरातच असतील .
  • 0:06 - 0:08
    आणि आता आपल्याला समजले आहे
  • 0:08 - 0:10
    आपले स्वतःशी काय नाते आहे
  • 0:10 - 0:11
    आणि दुसऱ्यासोबतही
  • 0:11 - 0:12
    आता आपण ज्या जागी आहोत
  • 0:12 - 0:16
    त्याचा खोलवर परिणाम होत असतो
    आपल्या व्यक्तीत्व व उद्दिष्ट यावर
  • 0:16 - 0:19
    सगळेच अगदी नाटकीय पद्धतीने बदलले आहेत .
  • 0:19 - 0:22
    कधीही नव्हते असे अंतर आता सगळ्यांमध्ये
    निर्माण झाले आहे .
  • 0:22 - 0:24
    पण मी तुम्हाला सांगितले
  • 0:24 - 0:28
    एक मार्ग हृदयकडून हाताकडे नेणारा
  • 0:28 - 0:30
    पुन्हा एकत्र येण्यास
  • 0:30 - 0:34
    एकत्र येतील हे काम करण्यासाठी
  • 0:34 - 0:37
    मी मदत करू शकते तुमचे मन
    ताजेतवाने करण्यात
  • 0:37 - 0:40
    ज्यामुळे तुम्ही ह्या संधी मध्ये नवनवीन
  • 0:40 - 0:44
    आनंद ,उत्साह ,कल्पना यांचा शोध घेऊ शकाल ?
  • 0:44 - 0:47
    तिथे पोहचण्यासाठी तुम्हाला
  • 0:48 - 0:49
    फक्त एक पेन लागेल ,
  • 0:49 - 0:51
    आता मागे जाऊन पुन्हा सुरुवात करूयात .
  • 0:51 - 0:54
    माझे लहानपण दक्षिणपूर्व लंडन मध्ये ,
  • 0:54 - 0:56
    एक तिऱ्हाईत म्हणूनच गेले .
  • 0:56 - 0:58
    सहा भावंडां मध्ये मी
    सगळ्यात मोठी होते ,
  • 0:58 - 1:00
    माझी भावंडे सगळे अगदी इंग्लिश दिसत
  • 1:00 - 1:03
    माझी भावंडे सगळे अगदी इंग्लिश दिसत
  • 1:03 - 1:04
    आणि एक मी होते :
  • 1:04 - 1:07
    अर्धी नायजेरियन ,कुरळ्या केसांची ,सावळी.
  • 1:07 - 1:10
    तुम्ही जेंव्हा वेगळे दिसत असता
  • 1:10 - 1:12
    तेंव्हा तुम्हाला वेगळेच वाटते,
  • 1:12 - 1:14
    तेंव्हा तुमचे विचारही वेगळे असतात
  • 1:14 - 1:17
    तुमच्या अवतीभोवती असणाऱ्यांपेक्षा ?
  • 1:17 - 1:22
    या अंधाऱ्या,वर्णद्वेषी एकट्या मार्गावर
  • 1:22 - 1:24
    तुम्ही कसा रस्ता शोधाल?
  • 1:24 - 1:26
    इथे पेन कामाला आला.
  • 1:27 - 1:28
    मी चित्र काढायला सुरुवात केली .
  • 1:28 - 1:30
    तुम्ही बघू शकता ,माझ्या कडे हा पेन आहे,
  • 1:30 - 1:32
    त्याला माहित आहे काय
    करायचे आहे .
  • 1:32 - 1:35
    याचे अनुसरण कसे करायचे ते मी
    चांगलीच शिकलेय .
  • 1:35 - 1:38
    पहिले काम मी काय केले असेल तर ते
    त्याने काढलेल्या रेषेचे अनुसरण ,
  • 1:38 - 1:41
    जी संस्कृती मला सांगत होती
  • 1:41 - 1:44
    कि मी काय करू शकत नाही .
  • 1:44 - 1:46
    माझा माझ्या पेन वर विश्वास होता,
  • 1:46 - 1:49
    आणि तो मला घेऊन गेला
  • 1:49 - 1:51
    लंडनच्या सेंट मार्टिन स्कूल मध्ये,
  • 1:51 - 1:53
    जिथे मी माझी पदवी मिळवली.
  • 1:53 - 1:57
    मला लवकरच कळले कि लंडन हे
    काही माझ्या साठी नाही ,
  • 1:57 - 2:00
    तुमची इच्छा असो व नसो पण ,
  • 2:00 - 2:03
    इंग्लंड हा असा देश आहे जिथे
  • 2:03 - 2:05
    वर्णव्यवस्था अजूनही टिकून आहे.
  • 2:05 - 2:10
    माझ्या कडे तर संधीच नव्हती कारण ,
  • 2:10 - 2:12
    मी एक काळी,मध्यमवर्गीय ,
    कलाकार तरुणी होते
  • 2:12 - 2:15
    म्हणून मी लंडन सोडून जपानला गेले ,
  • 2:15 - 2:17
    जिथे मला कोणीच विचारले नाही
    कि मी कुठून आलीय .
  • 2:17 - 2:19
    तिथे मी फक्त एक परदेशी होते,
  • 2:20 - 2:25
    ज्याचा अर्थ फक्त आणि फक्त
    " बाहेरच्या देशातील "असाच होतो .
  • 2:25 - 2:28
    मी त्या संस्कृती मध्ये एवढी एकरूप
    झाले कारण ,
  • 2:29 - 2:32
    तिथे लोकांना फक्त कला माहित होती
    आणि ती ते पूर्वापार जपत होते .
  • 2:32 - 2:35
    हि अशी संस्कृती आहे जिने वेळ,
    काळावर प्राविण्य मिळवले आहे
  • 2:35 - 2:38
    जिथे कलाकाराला त्याच्या कलेचे
    स्वातंत्र्य आहे .
  • 2:38 - 2:42
    मला याची जाणीव झाली कि हीच
    ती जागा आहे ज्यावर मी चिडलेली नाही .
  • 2:42 - 2:44
    टोकियो ने मला वाईट वागणूक नाही दिली .
  • 2:44 - 2:47
    खूप दिवसात मी आता चिडून काम नव्हते करत
  • 2:47 - 2:48
    किंवा दुखी होऊन.
  • 2:48 - 2:52
    मी स्वतःला मोकळे सोडले होते
    नवनिर्मिती साठी .
  • 2:52 - 2:55
    मला हे अदभूत शस्त्र सापडले
  • 2:55 - 2:58
    पेपरवर आखलेली रेषा ओलांडण्यासाठी.
  • 2:58 - 3:00
    ज्यामुळे एक गोष्ट मला
    समजली कि
  • 3:00 - 3:02
    आता माझा मेंदू ,हृदय आणि माझे हात
  • 3:02 - 3:04
    एका लयीत काम करतायेत .
  • 3:04 - 3:07
    मी जगाकडे एका नव्या दृष्टीने बघतेय
  • 3:07 - 3:10
    मी कधीही विचार केला नसलेल्या
    प्रश्नांची उत्तरे मला मिळाली
  • 3:10 - 3:13
    ती हि वेगळ्या अर्थाने .
  • 3:13 - 3:15
    मी बघू शकते कि हे जगामध्ये
  • 3:15 - 3:18
    चांगल्या आणि वाईट
    अशा दोन्ही जागा आहेत .
  • 3:18 - 3:19
    तसे बघितले तर
  • 3:19 - 3:21
    आता घाबरण्याचे काहीच कारण नाही.
  • 3:21 - 3:24
    माझा पेन माझ्या साठी एक प्रकाशझोत आहे,
  • 3:24 - 3:26
    अज्ञात अशा कितीतरी गोष्टी आहेत,
  • 3:26 - 3:27
    पण त्या तितक्या भयावह नाहीत .
  • 3:28 - 3:31
    ५ वर्ष जपान मध्ये राहिल्या नंतर ,
    माझी कला जोपासल्या नंतर ,
  • 3:32 - 3:34
    असे वाटू लागले कि आता थोडा बदल हवा .
  • 3:34 - 3:36
    म्हणून मी न्यूयॉर्क ला गेले ,
  • 3:36 - 3:38
    एक कलाकार म्हणून तुम्ही असेच कराल ना ?
  • 3:38 - 3:40
    जगातल्या मोठ्या शहरात जाल
  • 3:40 - 3:42
    ज्याच्या कडे अशी शक्ती असेल
  • 3:42 - 3:46
    जी तुम्हाला अज्ञात बनवेल
  • 3:47 - 3:50
    ह्यावेळी मात्र मी स्वतःलाच विचारायला
    सुरुवात केली ,
  • 3:50 - 3:52
    कि" मी कोण आहे ?"
  • 3:52 - 3:55
    सकाळी उठल्यानंतर कामाला सुरुवात
    करण्या आधी,
  • 3:55 - 3:57
    मी यावर रोज चिंतन करत होते
  • 3:57 - 3:58
    हा प्रश्न डोक्यात असताना
  • 3:58 - 4:00
    हि माझी चित्रकला सुरूच होती .
  • 4:00 - 4:02
    मी रेषांचा मागोवा घेत होते .
  • 4:02 - 4:04
    त्यांचाच मार्ग अनुसरायचे
    ठरवले होते .
  • 4:04 - 4:06
    पेन हातात घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ,
  • 4:06 - 4:09
    जो कि सगळ्यांकडेच असतो
  • 4:09 - 4:12
    मी स्वतःला झोकून दिले होते
  • 4:12 - 4:16
    मला हवे असलेले स्वातंत्र्य मिळवताना
  • 4:16 - 4:18
    मध्ये अडवणूक करणाऱ्या
  • 4:18 - 4:20
    सगळ्या भीती,विचार ,अनिश्चितता
  • 4:20 - 4:22
    याना मी सोडून दिले होते .
  • 4:22 - 4:25
    जेंव्हा मी न्यूयॉर्क मध्ये दाखल
    झाले तेंव्हा,
  • 4:25 - 4:28
    मला स्वतःला कलाविश्वच्या नियमांमध्ये
    बांधून घ्यायचे नव्हते .
  • 4:28 - 4:31
    मी परदेशी म्हणूनच काम सुरु ठेवले .
  • 4:31 - 4:33
    रेखाटने चालूच ठेवले .
  • 4:33 - 4:36
    उत्सुकताच माझ्या पेन ची शाई बनली ,
  • 4:36 - 4:38
    मी अजून खोलात जातच राहिले .
  • 4:38 - 4:43
    त्यावेळी मी माझ्या साठी अशी बिनधास्त ,
    निर्भय अशी जागा निर्माण केली ,
  • 4:43 - 4:45
    जी फक्त माझ्या साठीच बनली होती
  • 4:45 - 4:47
    सुरुवातीला ती फक्त माझी झोपण्याची
    खोली होती.
  • 4:47 - 4:50
    पण ती लवकरच "द न्यूयॉर्क टाइम्स " बनली
  • 4:50 - 4:53
    मी लवकरच ओळखले जाऊ लागले
  • 4:53 - 4:55
    या दुनियेची निर्माती म्हणून .
  • 4:56 - 4:57
    आणि तेंव्हा पासून,
  • 4:57 - 5:01
    मी अशा कितीतरी अद्वितीय कलाकारांसोबत ,
  • 5:01 - 5:03
    संस्था सोबत मिळून काम केलं
  • 5:03 - 5:05
    स्क्रीन्स ऑफ टाइम स्क्वेअर पासून ते,
  • 5:05 - 5:08
    न्यू यॉर्क सिटी बॅलेटच्या
    अद्धभुत शृंखले पर्यंत .
  • 5:08 - 5:11
    जिथे मी कितीतरी नर्तिकांची मुलाखत घेतली.
  • 5:11 - 5:14
    त्यांचे शब्द, त्यांच्या गोष्टी पुढे
    जाऊन३० हुन हि जास्त भित्तीचित्र ,
  • 5:14 - 5:17
    यांचा पाया बनल्या ,
  • 5:17 - 5:19
    कितीतरी भिंती ,खिडक्या त्यांच्या मुळे
  • 5:19 - 5:21
    रंगून गेल्या .
  • 5:22 - 5:23
    खूप दिवसं मी कविता आणि
    चिंतन साठी ,
  • 5:24 - 5:27
    एखाद्या जागेच्या निर्माणच विचार करत होते .
  • 5:27 - 5:28
    आणि २०१९ मध्ये ,
  • 5:28 - 5:30
    मला अशी संधी मिळाली
  • 5:30 - 5:32
    आयर्लंड च्या राज्यपालांकडून.
  • 5:33 - 5:35
    ज्यांनी मला अगदी हवी तशी जागा मिळवून दिली
  • 5:35 - 5:38
    जो कि त्यांचा पूर्व लष्करी तळ होता .
  • 5:38 - 5:39
    "मे रूम "
  • 5:39 - 5:43
    ज्याच्या बाहेरच्या भिंतींवर आयर्लंडचा
    इतिहास चितारला गेला ,
  • 5:43 - 5:46
    आणि तुम्ही जर तुमच्या चप्पल बाहेर
    काढून आत मध्ये गेलात तर,
  • 5:46 - 5:49
    फारशी वरचे चक्रव्यूहाचे चित्र बघू शकाल
  • 5:49 - 5:51
    जे तुम्हाला पुन्हा तुमच्या पर्यंतच
    घेऊन येईल.
  • 5:51 - 5:54
    हे तर शांततेचे आवाहन आहे
  • 5:54 - 5:57
    ज्याच्या भिंतींवर तुम्ही बघू शकाल
    असे काही वाक्यप्रचार.
  • 5:57 - 5:59
    "तुम्ही खूप ज्ञानी बनाल"
  • 5:59 - 6:01
    "तुम्हाला रात्री शांत झोप लागेल "
  • 6:01 - 6:03
    "तुम्ही झाडे वाचवाल"
  • 6:03 - 6:06
    "कदाचित तुम्ही ""कदाचित तुम्ही "
    "कदाचित आपण ".
  • 6:06 - 6:09
    असे वाटते कि हि वाक्ये तुमच्यातुनच
    निघत आहेत
  • 6:09 - 6:11
    किंवा तुमच्यापर्यंतच पोहचत आहेत .
  • 6:11 - 6:14
    मी माझ्या रेघांनाच माझी भाषा बनवली आहे
  • 6:14 - 6:17
    जी कि आयुष्यासारखी उलगडत जाते .
  • 6:17 - 6:19
    जेंव्हा तिथे शांतता असते तिथे मी,
  • 6:19 - 6:22
    याप्रकारच्या सवांदातून ,
  • 6:22 - 6:24
    स्वतःला अस्वस्थेते मधून बाहेर काढण्याचा
    मार्ग शोधला आहे .
  • 6:24 - 6:27
    चित्रकलेने मला स्वतःचे नियम कसे
    बनवायचे ते शिकवले.
  • 6:28 - 6:32
    त्यानी मी डोळे उघडून काय दिसते
    एवढेच नाही तर ,
  • 6:32 - 6:33
    काय असू शकते हे हि शिकवले .
  • 6:33 - 6:36
    जर तिथे एखादी खंडित प्रणाली असेल
  • 6:36 - 6:41
    तर आपण नवीन बनवू शकतो जी चांगले
    कामही करेल आणि सर्वांसाठी हि असेल ,
  • 6:41 - 6:43
    फक्त कोणा एकासाठीच नसेल.
  • 6:43 - 6:46
    चित्रकलेने शिकवले कि या जगात सतत
    उद्योगी कसे रहायचे.
  • 6:46 - 6:50
    रेघांच्या दुनियेत मला समजले कि
  • 6:50 - 6:52
    दिसत राहणे महत्वाचे नाही
  • 6:52 - 6:55
    तर आपण दुसऱ्याना काय देतो हे
    जास्त महत्वाचे आहे
  • 6:55 - 6:57
    आणि हेच बघण्याचे स्वातंत्र्य आहे.
  • 6:57 - 6:59
    माझा शब्दश: असा अर्थ नाहीय ,
  • 6:59 - 7:04
    कारण दृष्टिकोन हा आपल्या
    दृष्टी वर च ठरतो .
  • 7:04 - 7:08
    माझ्या मते जगाचा खरा अनुभव पूर्ण पणे,
  • 7:08 - 7:11
    फक्त कठीण आव्हानांच्या वेळीच येतो .
  • 7:11 - 7:14
    जसे कि आज आपण अनुभवत आहोत .
  • 7:14 - 7:15
    मी शँटेल मार्टिन.
  • 7:15 - 7:16
    चित्रकार .
  • 7:16 - 7:18
    तुम्हाला आवाहन करते कि उचला पेन
  • 7:18 - 7:20
    आणि बघा तो तूम्हाला कुठे घेऊन जातो ते .
  • 7:20 - 7:23
    (संगीत)
Title:
चित्रकला तुम्हाला कशी मुक्त बनवते
Speaker:
शँटेल मार्टिन
Description:

तुम्ही कोण आहात? या प्रश्नाचे उत्तर देण्या साठी शँटेल मार्टिन या कलाकाराने तिच्या कुंचल्याच्या आधार घेतला आहे . या दृष्य संभाषणाचे वैशिष्ट्य आहे त्यांचे मुक्त रेखाटन --जे अगदी न्यू यॉर्क स्क्रीन्स ऑफ टाइम स्क्वेयर पासून ते सिटी बॅलेट डान्सर पर्यंत आहे -- मार्टिन सांगतात त्यांना कसे स्वातंत्र्य आणि नवा दृष्टिकोन कले मुळे गवसला .रेखाटन कसे तुमच्या हातांचा आणि हृदयाचा समन्वय करत तुम्हाला जगाशी जोडते .

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
07:47

Marathi subtitles

Revisions