Return to Video

तुमच्या आरोग्याबाबत धक्कादायक बाबी| लिसा रंकीन|TEDxFiDiWomen

  • 0:13 - 0:17
    तुमच्या आरोग्याची सर्वात
    महत्वाची गोष्ट कोणती?
  • 0:17 - 0:19
    तुम्हाला कोणती महत्वाची वाटते?
  • 0:19 - 0:25
    ती आहे पालेभाजा युक्त संतुलीत आहार.
  • 0:25 - 0:32
    पुरेशी झोप.व्यायाम व शरीरातील
    संप्रेरकांचे हार्मोन्सचे संतुलन.
  • 0:32 - 0:34
    काय म्हणावयाचे आहे तुम्हाला?
  • 0:34 - 0:38
    हे म्हणावयाचे आहे जीवनसत्वे खा
    आणि डॉक्टरांकडे नियमित जा.
  • 0:38 - 0:40
    (हशा)
  • 0:40 - 0:45
    या सर्व गोष्टी महत्वाच्या वाटतात
    तसेच निर्णायक वाटतात.
  • 0:45 - 0:50
    आरोग्यपूर्ण जीवन जगण्यास.
    पण मी जर तुम्हाला सांगितले
  • 0:50 - 0:56
    आपल्या शरीराची काळजी घेणे
    यास तुम्ही खूपच कमी महत्व देता?
  • 0:56 - 0:59
    तुम्हाला काय वाटते?
  • 0:59 - 1:02
    मी डॉक्टर आहे,पाच वर्षापूर्वी
    तुम्ही जर हे मला सांगितले असते
  • 1:02 - 1:04
    तो पाखंडी पण झाला असता.
  • 1:04 - 1:07
    मी १२ वर्षे प्रशिक्षण घेतले.
  • 1:07 - 1:13
    आपले शरीर हा
    आपल्या आरोग्याचा पाया आहे.
  • 1:13 - 1:18
    पण तुम्हास काय वाटेल वैद्यकीय शाखेतही
    काही कमतरता आहे.
  • 1:18 - 1:23
    तुमच्या शरीराचा आकार
    योग्य नसला तर कसे आपण जगू?
  • 1:23 - 1:29
    आपले शरीर आपली जीवन जगण्याचे प्रतिबिंब
    दाखवित असते.
  • 1:29 - 1:33
    आपल्या जीवनातील काही क्षण आठवा
  • 1:33 - 1:37
    तुम्ही जीवन जगत
    आहात असे तुम्हाला वाटे तो काळ
  • 1:37 - 1:40
    तुम्ही कदाचित चुकीच्या
    नात्यात गुंतला असाल
  • 1:40 - 1:42
    किवा एखाद्या कामात गढून गेला असाल
  • 1:42 - 1:45
    आपण असेच जगले पाहिजे अशी त्यावेळी
    तुमची धारणा असेल.
  • 1:45 - 1:51
    तुम्ही काही निर्मिती करण्यात अपयशी असाल
    तुम्हाला त्यामुळे नैराश्य आले असेल
  • 1:51 - 1:55
    अशावेळी शरीर तुम्हाला
    काही इशारे देऊ लागले असेल
  • 1:55 - 1:58
    काही शारीरिक लक्षणे दिसत असतील
  • 1:58 - 2:01
    शरीर तुम्हाला काहीतरी
    सांगते ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता.
  • 2:01 - 2:03
    तुम्हाला आपण करीत असलेलेच योग्य वाटत्ते
  • 2:03 - 2:06
    तसेच चालू राहिल्यास
    शरीर खन्गते.
  • 2:06 - 2:10
    आपल्या जीवनात असे काही
    घडल्याचे तुम्हाला आठवते का?
  • 2:10 - 2:12
    अनेकांनी यास होकार दिला
  • 2:12 - 2:15
    माझ्याबाबत ही असेच घडले.
  • 2:15 - 2:19
    शरीर हे सर्व तल्लखपणे करीत असते.
  • 2:19 - 2:21
    शरीर आपल्या कानात
    एकप्रकारे कुजबुजत असते.
  • 2:21 - 2:26
    याकडे आपण दुर्लक्ष केल्यास
    शरीर ते ओरडून सांगते.
  • 2:26 - 2:31
    लक्षावधी लोक शरीराच्या देत असलेल्या
    या सूचनांकडे दुर्लक्ष करतात.
  • 2:31 - 2:33
    या एकप्रकारच्या साथीच्या रोगास
    आपण बळी पडतो.
  • 2:33 - 2:36
    आधुनिक उपचार अपुरे पडतात.
  • 2:36 - 2:41
    बाधित झालेले लोकाना थकवा जाणवतो.
  • 2:41 - 2:47
    ते अस्वथ होतात, त्यांना नैराश्य येते.
    रात्रभर तळमळत असतात.
  • 2:47 - 2:51
    त्यांना जीवनात उत्साह वाटत नाही.
  • 2:51 - 2:55
    दुखणे व वेदना त्यांना बेजार करतात.
  • 2:58 - 3:01
    ते डॉक्टरांकडे जातात
    तेथे काहीतरी चुकते.
  • 3:01 - 3:06
    डॉक्टर वेगवेगळ्या चाचण्या घेतात.
  • 3:06 - 3:10
    सर्व चाचण्या सामान्य आढळतात
    रुग्णाला निरोगी मानले जाते.
  • 3:10 - 3:12
    फक्त रुग्णाला बरे वाटत नसते.
  • 3:12 - 3:16
    तो पुन्हा पुन्हा नव्या डॉक्टरांकडे जातो.
  • 3:16 - 3:18
    त्याला वाटते काहीतरी चुकीचे होत आहे.
  • 3:18 - 3:21
    तिला जे चुकीचे आहे वाटते
    तेच मुळात चूक असते,
  • 3:23 - 3:26
    मी गजबजलेल्या रुग्णसेवा
    केंद्रात काम करावयाची.
  • 3:26 - 3:29
    दररोज मला चाळीस रुग्ण तपासावे लागत.
  • 3:29 - 3:31
    हे रुग्ण मला कमालीचा वैताग देत असत.
  • 3:31 - 3:35
    ते यासाठी यायचे कि त्यांना
    आजारी आहोत असे वाटे.
  • 3:35 - 3:38
    सर्व चाचण्या होऊन ते
    सामान्य असल्याचे दिसे
  • 3:38 - 3:40
    मी त्यांची कसून तपासणी केली.
    मला ते सारखेच वाटत
  • 3:40 - 3:43
    त्यांना वाटे आपण आजारी आहोत
  • 3:43 - 3:47
    पण मला त्यांचे निदान जमेना
    मी निराश व्हायची
  • 3:47 - 3:50
    ते प्रार्थना करीत.
    देवा मला गोळी तरी दे.
  • 3:50 - 3:53
    आणि त्यासाठी कोणतीही गोळी नव्हती.
  • 3:53 - 3:56
    त्याची प्रयोग शाळेतही घेण्याजोगती
    कोणतीही चाचणी नव्हती.
  • 3:56 - 4:01
    लस वा शस्त्रक्रिया हि
    त्यासाठी उपलब्ध नव्हती
  • 4:01 - 4:04
    काही काळाने मला जाणवले
  • 4:04 - 4:06
    मला माझ्या रुग्णांप्रमाणेच
    होऊ लागले आहे.
  • 4:06 - 4:09
    मी त्यावेळी ३३ वर्षाची होत्ये.
  • 4:09 - 4:11
    मी एक साचेबंद डॉक्टर होते,
  • 4:11 - 4:14
    मी सर्व प्रयत्नात यशस्वी झाले होते.
    मला हवे असलेले मिळाले होते.
  • 4:14 - 4:18
    सन दिअगो येथे समुद्रासमोर माझे घर होते.
  • 4:18 - 4:22
    सुतीतले घर होते,एक बोट होती,
    आणि भरपूर पैसे होते.
  • 4:22 - 4:27
    मी खरे तर माझे भविष्य
    आनंदी असावयास पाहिजे होते
  • 4:27 - 4:31
    पण दोनदा मी या परिस्थितीतून अलग झाले.
  • 4:31 - 4:33
    मला उच्च रक्तदाब झाल्याचे निदान झाले.
  • 4:33 - 4:36
    मी जी तीन औषधे घेत होत्ये
    ते रक्तदाब नियमित करण्यास कुचकामी ठरले.
  • 4:36 - 4:38
    माझे आता निदान झाले.
  • 4:38 - 4:42
    माझ्या मानेजवळ पूर्व कर्करोगाच्या पेशी
    आढळल्या.शस्त्रक्रिया करणे गरजचे होते.
  • 4:42 - 4:48
    मला माझे अस्तित्व संपल्याचे वाटले.
  • 4:48 - 4:56
    डॉक्टर होण्याचा माझ्या ज्ञानाचा मला
    काही उपयोग नव्हता.
  • 4:58 - 5:00
    मी आहे तरी कोण मला प्रश्न पडे.
  • 5:00 - 5:03
    मी अनेक मुखवटे चढविले होते.
  • 5:03 - 5:06
    जसा डॉक्टरचा पांढरा कोट.
  • 5:06 - 5:09
    जो घालून तुम्हाला बतावणी करावयाची
    मला सर्व कळते याची.
  • 5:09 - 5:11
    आपण सर्वज्ञ आहोत असे वाटे.
  • 5:11 - 5:14
    मी पूर्ण व्यवसायिक कलाकार होती
    माझा मुखवटा हि कलात्मक होता.
  • 5:14 - 5:16
    गंभीर दिसणे आवश्यक होते.
  • 5:16 - 5:22
    मी कोणी गूढ वा लोभी नव्हती.
  • 5:22 - 5:24
    माझे तिसऱ्यांदा लग्न झाले
  • 5:24 - 5:26
    तिसरे लग्न त्यात मोहकता आहे.
  • 5:26 - 5:29
    मी जणू कर्तव्यदक्ष पत्नीचा मुखवटा चढविला.
  • 5:29 - 5:31
    टेबलावर जेवण ठेवणे माझे काम झाले
  • 5:31 - 5:33
    मला योग्य ती अंगवस्त्रे मिळालीत
  • 5:33 - 5:35
    मी गरोदर झाले अचानक
  • 5:35 - 5:38
    मला जाणवले आपण आईचा
    मुखवटा चढविला आहे.
  • 5:38 - 5:40
    आईचा मुखवटा तुम्ही जाणता
  • 5:40 - 5:42
    तुम्ही जाणता तुमचे जीन्स
    हे आनुवंशिक आहेत
  • 5:42 - 5:47
    तेच तुम्हाला घडवितात.
  • 5:48 - 5:50
    मी चढविलेले मुखवटे
    त्यांचीच देणगी होती.
  • 5:50 - 5:53
    जेव्हा आयुष्यात हे झंझावात आले
  • 5:54 - 6:00
    आणि याच अवस्थेत मी जानेवारी २००६ मध्ये,
  • 6:00 - 6:03
    माझ्या मुलीला जन्म दिला त्यावेळी
    सीझर करावे लागले'
  • 6:03 - 6:05
    माझा १६ वर्षाचा कुत्रा मरण पावला,
  • 6:05 - 6:08
    माझा निरोगी भाऊ यकृताच्या
    व्याधीने ग्रस्त झाला,
  • 6:08 - 6:11
    हे झीठ्रोमाक्स या प्रतीजैविकाने झाले
  • 6:11 - 6:18
    माझे प्रिय वडील दोन आठवड्यातच
    मेंदूत गुठळी होउन वारले
  • 6:18 - 6:21
    मी यातून निश्वास सोडेस्तोवर
  • 6:21 - 6:23
    माझे पती जे लहानग्याची काळजी घेत होते
  • 6:23 - 6:29
    त्यांची डाव्या हाताची दोन्ही
    बोटे करवतीने कापली गेली
  • 6:32 - 6:34
    अरे देवा!
  • 6:34 - 6:42
    म्हणतात न संकटे एकटी येत नाहीत
    पला ताफा घेऊन येतात.
  • 6:42 - 6:47
    यातून मी परिपक्व झाले.
    माझ्यात काहीतरी वेगळे होते.
  • 6:47 - 6:54
    सार्क त्यास "आतला शहाणपणा म्हणतो त्यास
    मी तुमचा "आतील मार्गदर्शक दिवा " म्हणते.
  • 6:54 - 7:00
    तो सांगत असतो मूर्खपणा थांबवा
    भ्रमातून बाहेर पडण्याची हि वेळ आहे
  • 7:00 - 7:07
    हि वेळ तुम्हाला काय वाटते ते करण्याची आहे
  • 7:07 - 7:09
    त्यामुळेच मला वाटले
    मी हा व्यवसाय सोडायला हवा.
  • 7:09 - 7:14
    मोठा खडतर निर्णय होता डॉक्टर होण्यासाठी
    मी १२ वर्षे शिक्षण घेतले होते
  • 7:14 - 7:16
    आणि लाखो डोल्लर खर्च केले होते
  • 7:16 - 7:19
    यासाठी माझे घरही गहाण होते.
  • 7:19 - 7:21
    सर्व डॉक्टर असेच करतात.हो न?
  • 7:21 - 7:25
    माझ्या पतिना नोकरी नव्हती
    मला नुकतेच लहान बाळ झाले होते.
  • 7:25 - 7:29
    मला याबाबत झालेल्या
    कराराचे पैसेही भरावे लागले.
  • 7:29 - 7:32
    ती सहा अंकी रक्कम होती.
  • 7:32 - 7:37
    मी तसे करावयाचे ठरविले.
    मला माझ्या पतीची साथ मिळाली.
  • 7:37 - 7:39
    मी व्यवसाय सोडला
    मला घरही विकावे लागले.
  • 7:39 - 7:42
    माझी सेवानिवृत्तीऱ्या रकम खर्च होऊन
    मला गावी परतावे लागले.
  • 7:42 - 7:47
    काही महिने मी लिखाण व चित्रकलेत घालविले
    या काळात मी माझ्या जखमा चाटत होत्ये.
  • 7:47 - 7:53
    (हशा)
    (टाळ्या)
  • 7:53 - 7:57
    नऊ महिन्यांनी जो शब्द सर्वाना आवडतो
  • 7:57 - 7:58
    मी माझा पेशा सोडू शकते
  • 7:58 - 8:02
    पण याबाबत सल्ला मार्गदर्शन करू शकते.
  • 8:02 - 8:05
    मी सात वर्षाची असतानाच माझी ओळख झाली
  • 8:05 - 8:09
    औषधाच्या अध्यात्मिक सरावाशी.
  • 8:09 - 8:11
    जे मी कधी विसरले नाही.
  • 8:11 - 8:16
    मी ज्या व्यवस्थेत होते त्यात
    भरडले गेल्याने त्य्कडे माझे लक्ष नव्हते.
  • 8:16 - 8:20
    पण मी आता त्यतून बरी होऊन आली आहे
  • 8:20 - 8:24
    मला आता परत जायचे नाही
    दरदिवशी चाळीस रुग्ण तपासायला.
  • 8:24 - 8:27
    ज्यांना मी पाच ते सात मिनिटे तपासायची.
    मला कळेना मी का डॉक्टर झाले
  • 8:27 - 8:33
    यातून माझी पाच वर्षाची तपस्या फळास आली.
  • 8:33 - 8:36
    मी शोधले मी उपचारावर
    मी का प्रेम करीत होते
  • 8:36 - 8:40
    मला कळले मी
  • 8:40 - 8:41
    इतरांना दोष देत आहे.
  • 8:41 - 8:44
    हा गैर व्यवहाराचा मागोवा होता.
  • 8:44 - 8:48
    औषधी कंपन्यांचा यात हात होता,
  • 8:48 - 8:50
    विमा कंपन्याही यात दोषी होत्या.
  • 8:50 - 8:53
    मला जाणवले.उपचार पद्धतीचा
    सखोल अभ्यास करून
  • 8:53 - 8:56
    आम्ही शरीराच्या भागाचे स्पेशालीस्ट
    झालो आहोत
  • 8:56 - 8:59
    मी प्रसूती डॉक्टर म्हणून
    ओटीपोटीत दुखत असणाऱ्यांना तपासे
  • 8:59 - 9:02
    मला वाटे दुखणे दुखणे याही पेक्षा मोठे आहे
    ते अन्यत्र ही आहे
  • 9:02 - 9:05
    त्यामुळेच हे घडते.
  • 9:05 - 9:08
    पण त्याचे निदान करण्यासाठी
    मला प्रशिक्षण दिलेले नव्हते.
  • 9:08 - 9:11
    तुम्हाला वाटे त्यासाठी त्या
    स्पेशालीस्टकडे गेले पाहिजे.
  • 9:11 - 9:14
    करंगळीला जखम झाली डॉक्टर म्हण्त्रात
    "मी अंगठ्याचा डॉक्टर आहे "
  • 9:14 - 9:16
    (हशा)
  • 9:16 - 9:19
    पूर्ण शरीराचा कोणी विचार करयला तयार नाही
  • 9:19 - 9:22
    मला वाटले सर्वसमावेशक औषध
    हा खरा इलाज आहे
  • 9:22 - 9:24
    मी त्याची प्रक्टिस सुरु केली
  • 9:24 - 9:29
    ती इतकी उपयुक्त वाटली कि
    मी माझ्या रुग्णांना भरपूर वेळ देऊ लागली.
  • 9:29 - 9:31
    मी खरोखर त्यांचे दुखणे जणू लागली.
  • 9:31 - 9:33
    आम्ही विमा कंपन्यांना जवळ फिरकू दिले नाही
  • 9:33 - 9:35
    हे खूपच फायदेशीर होते.
  • 9:35 - 9:38
    मी खडतरपणे हे काम चालू ठेवले.
  • 9:38 - 9:41
    जर तुम्ही माझ्याकडे आलात निराश अवस्थेत
  • 9:41 - 9:44
    तर मी तुम्हाला वनस्पती व
    अमिनोआम्ल देई प्रोझाक ऐवजी
  • 9:44 - 9:46
    दुसरी लक्षणे असल्यास
  • 9:46 - 9:48
    अलोपथी इलाज आजही करावा लागतो
  • 9:48 - 9:50
    इलाज मात्र दुसरेच असतात.
  • 9:50 - 9:52
    तुम्हास योग्य टो इलाज मला करयचा असतो
  • 9:52 - 9:56
    त्यासाठी मला प्रस्थापित उपचार पलीकडे
    पाहावे लागते.
  • 9:56 - 9:59
    बरे करण्य्तासाठी नवी अवजारे शोधावी लागतात
  • 9:59 - 10:01
    मी या पूरक उपचार पद्धतीचा
    व तशी आरोग्य केंद्रे
  • 10:01 - 10:03
    यांची मदत घेऊ लागली
  • 10:03 - 10:06
    त्यात अक्युपंक्चर निसर्गोपचार
    आहार तज्ञ होते
  • 10:06 - 10:09
    मी माझ्या रुग्णांना त्यांची उर्जा पातळी
    जाणून उपचार करू लागली.
  • 10:09 - 10:12
    कच्या आनाचा उपयोक करण्यास सांगितले
    उत्तम इलाज होता.
  • 10:12 - 10:15
    मी माझे हे कार्य चालू ठेवले.
  • 10:15 - 10:17
    रुग्णातील एक लक्षण जायचे
  • 10:17 - 10:20
    त्यांच्यात आढळणारी प्राथमिक लक्षणे
    कोणत्या कारणाने आलीत
  • 10:20 - 10:23
    मूळ कारण जाणून उपचार न केल्यास.
  • 10:23 - 10:25
    एक लक्षण जाऊन दुसरे यायचे.
  • 10:25 - 10:29
    मी व रुग्ण यामुळे निराश व्हायचे.
  • 10:29 - 10:32
    मी हा मार्ग निवडला
  • 10:32 - 10:34
    ज्याने आरोग्य मिळाले.
  • 10:34 - 10:37
    आपण आजारी का पडतो
  • 10:37 - 10:40
    मी यावर भरपूर अभ्यास केला
    वैद्यकीय ग्रंथ अभ्यासले.
  • 10:40 - 10:44
    काही अकस्मात केलेले प्रयोग
    निष्पन्न झाले
  • 10:44 - 10:47
    त्याबद्दलच मी सांगणार आहे
  • 10:47 - 10:48
    मी त्याचे उत्तर शोधले आहे.
  • 10:48 - 10:53
    मी अहोरात्र वाचनालयात बसून
    अध्ययन केले
  • 10:53 - 10:56
    मला जे आढळले त्याने मला
    नवा साक्षात्कार झाला.
  • 10:56 - 11:00
    हे मला मिळलेले मी वैद्यकीय शाखेत
    शिकले नव्हते.
  • 11:00 - 11:04
    आरोग्याबाबत जे आपण विचार करतो
    त्यास महत्व आहे.
  • 11:04 - 11:07
    जसे व्यायाम संतुलित आहार
  • 11:07 - 11:09
    डॉक्टरांकडे जाणे हि
  • 11:09 - 11:17
    पण आरोग्य राखण्यास आरोग्य्पुर्ब नाते
    याचेही मोठे महत्व आहे हे नव्याने मी शिकले
  • 11:17 - 11:22
    आरोग्यपूर्ण व्यावसायिक जीवन
  • 11:23 - 11:27
    तुमची निर्मिती क्षमता
  • 11:27 - 11:29
    आध्यात्मिक वृत्ती
  • 11:35 - 11:37
    आनंदी कामजीवन
  • 11:40 - 11:43
    आरोग्य राखणारे अर्थार्जन
  • 11:45 - 11:48
    आरोग्यदायी परिसर
  • 11:51 - 11:53
    संतुलित मानसिकता
  • 11:55 - 11:58
    या सर्व गोष्टी परंपरेने
    आरोग्याशी निगडीत आहे
  • 11:58 - 12:01
    तसेच सर्व नैसर्गिक गोष्टी
    ज्या शरीरास पूरक आहे
  • 12:02 - 12:04
    हि सर्व माहिती अविश्वसनीय होती.
  • 12:04 - 12:09
    आम्चापैकी अनेकाना या प्राचीन उपायांची
    माहिती नव्हती.
  • 12:09 - 12:13
    या बाबत डॉक्टरांनी वाचले होते
    मनोव्यापारांच्या साहित्यात
  • 12:13 - 12:15
    सामाजिक साहित्यात
  • 12:15 - 12:18
    पण न्यू इंग्लंड मेडिकल जर्नलचा
    खोल अभ्यास केल्यास त्यात
  • 12:18 - 12:21
    व अमेरिकन मेडिकल असोसिएशन यातही
    हा विचार आढळतो.
  • 12:21 - 12:24
    हार्वर्ड याले व जोहन होप्किंस
    यातही हा विचार आहे.
  • 12:24 - 12:28
    यात सांगितले आहे हे सर्व महत्वाचे आहे
  • 12:28 - 12:30
    खूप काही नसले तरी
  • 12:30 - 12:32
    माझी एक रुग्ण कच्या अन्नाची
    शाकाहारी आहे
  • 12:32 - 12:35
    ती धावपटू आहे
    दिवसभरात ती वीस पूरक अन्न घेते.
  • 12:35 - 12:39
    आठ तास ती रात्री झोपते
  • 12:39 - 12:42
    डॉक्टरांचे सल्ले ती पाळते.
  • 12:42 - 12:47
    माझे तत्वज्ञान जाणून तिने
    ते पाळण्यास सुरवात केली
  • 12:47 - 12:50
    मी तिला जो फॉर्म दिला
    तो वीस पानाचा होता.
  • 12:50 - 12:54
    त्यात आध्यात्मिकता.काम. नातेसंबंध
    याची माहिती विचारली आहे.
  • 12:54 - 12:58
    निर्मिती क्षमता कामजीवन
    या सर्वांची माहिती विचारली.
  • 12:58 - 13:00
    ती आली तिने फॉर्म भरला आणि विचारले
  • 13:00 - 13:02
    "डॉक्टर माझे निदान सांगा "
  • 13:02 - 13:06
    मी म्हणाले "तुझे लग्न हे तुला
    उध्वस्त करणारे वाटते
  • 13:06 - 13:10
    निर्मितीक्षमता नसल्याने तू तुझ्या
    व्यवसायाचा द्वेष करते.
  • 13:10 - 13:14
    अध्यात्मिकते पासून तू दूर आहे
  • 13:14 - 13:17
    लहानपणी तुझ्या वडिलांनी केलेल्या
  • 13:17 - 13:19
    त्रासातून तू मुक्त झाली नाहीस
  • 13:19 - 13:23
    हे सर्व दूर केल्याशिवाय
    तू बरी होणार नाहीस.
  • 13:23 - 13:27
    आरोग्य होणे म्हणजे केवळ
    शरीराची काळजी घेणे नाही.
  • 13:27 - 13:30
    मग काय आहे?
  • 13:30 - 13:35
    त्यात आहे मन व हृदय भावनां
    यांची काळजी घेणे.
  • 13:35 - 13:38
    आपल्या आत्म्याची काळजी घेणे.
  • 13:38 - 13:42
    त्यसाठी तुम्हाला जाणवला पाहिजे
    आतलं मार्गदर्शक प्रकाश.
  • 13:42 - 13:45
    जो तुमचा अविभाज्य भाग आहे.
  • 13:45 - 13:50
    तोच आध्यात्मिकदृष्ट्या जाणीव करून देतो
    .
  • 13:50 - 13:52
    तो सांगत असतो
    तुमच्यासाठी काय योग्य आहे.
  • 13:52 - 13:56
    टो जन्मापासून मृत्यू पर्यंत
    तुमची सोबत करतो.
  • 13:56 - 13:59
    हाच जाणत असतो तुमच्या बद्दल व
    शरीराबद्दलची सत्यता.
  • 13:59 - 14:02
    तो तुमच्याशी कुजबुज करीत असतो
    तो असतो तुमचा आतील आवाज.
  • 14:02 - 14:06
    हा तुमच्या शरीराचा सुंदर भाग आहे
    तो तुमचा चाहता आहे.
  • 14:06 - 14:10
    तो जणू तुम्हाला प्रेम पत्र लिहित असतो
  • 14:10 - 14:12
    आणि ते तुम्हाला बरे करीत असते.
  • 14:12 - 14:16
    कोणत्याही डॉक्टर व उपचार शिवाय.
  • 14:16 - 14:21
    जे मी शिकले त्यावर आधारित
    मी एक आरोग्य उपचार प्रणाली बनविली.
  • 14:21 - 14:24
    ती काही कोण्या आलेखावर आधारित नाही.
  • 14:24 - 14:27
    बरेचसे उपचार आलेखावर आधरित असतात.
  • 14:27 - 14:28
    तो रस्त्यावरील मैलाचा दगड असतो.
  • 14:28 - 14:31
    तुम्ही सानफ्रान्सिस्को परिसरात
    या या गोष्टी पाहिल्या आहेत?
  • 14:31 - 14:35
    या दगडांची तोल सांभाळणारी
    चळत मला फार प्रिय आहेत.
  • 14:35 - 14:37
    मी कलाकार असल्याने
    मला ते भावतात.
  • 14:37 - 14:41
    त्या दगडांचा एकमेकांशी संबंध असतो
    तरी प्रत्येक स्वतंत्र असतो.
  • 14:41 - 14:44
    त्यातील एकही काढता येत नाही
  • 14:44 - 14:47
    वरचा दगड सर्वात मोलाचा असतो.
  • 14:48 - 14:50
    मला वाटते आपले शरीरही
    या दगडाप्रमाणे आहे.
  • 14:50 - 14:53
    वरचा दगड.
  • 14:53 - 14:57
    एक जरी ढळला तरी सर्व चालत कोसळेल.
  • 14:57 - 15:00
    शरीर प्रथम आपल्याशी कुजबुजते.
  • 15:00 - 15:03
    या चळतीचा पाया असतो
    आपला आतील आवाज
  • 15:03 - 15:07
    टो तुमचा मध्यवर्ती भाग असतो
    पारदर्शक भाग असतो
  • 15:08 - 15:13
    त्यावर आधारित पूर्ण आरोग्य
    उपचार प्रणाली प्रणाली मी बनविली.
  • 15:13 - 15:15
    या पुस्तकात ते सर्व ग्रंथित आहे.
  • 15:15 - 15:19
    तुमचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी
    लागणाऱ्या गोष्टी त्यात आहेत.
  • 15:19 - 15:25
    हि स्वयं बरे करणारी पद्धती आहे
    हे तुम्हाला कळेल.
  • 15:25 - 15:29
    स्वतःला बरे करण्याच्या या प्रवासात
    लागणारी साधने यात मिळतील.
  • 15:29 - 15:32
    हि सर्व तुमच्या आजूबाजूस आहेत.
  • 15:32 - 15:34
    मी त्याला आरोग्याचे फुगे म्हणते.
  • 15:34 - 15:38
    ते आहे प्रेम,कृतज्ञता आणि सुख समाधान.
  • 15:38 - 15:40
    विज्ञानाने या सर्वस मान्यता दिली आहे.
  • 15:40 - 15:45
    या सर्व गोष्टी परस्परांशी चिकटून आहेत
    तुमचे आरोग्य राखण्यास.
  • 15:45 - 15:50
    मी आव्हान देते तुम्हाला जर काही
    आजरा असेल
  • 15:51 - 15:55
    प्लेग सारख्या साथीच्या रोगास
    बळी पडला असाल
  • 15:55 - 15:59
    तर मी विचारते "तुम्ही आजारी का पडलात "
  • 15:59 - 16:05
    आमच्या आरोग्य व्यवस्थेत आहे तरी काय?
  • 16:05 - 16:12
    खरे रोग निदान कोणते?
    ते झाल्यावर काय करावे?
  • 16:12 - 16:14
    तुम्ही अधिक पर्दषक कसे व्हाल
  • 16:14 - 16:17
    सर्व शक्यता तुम्ही कशा आजमावाल?
  • 16:17 - 16:22
    आपण कोण आहोत आपल्या गरजा कोणत्या
    हेज प्रामाणिक पणे कसे जाणून घेणार?
  • 16:22 - 16:26
    जर ब्रेने ब्राऊनचे TED व्याख्यान
    ऐकण्याचे भाग्य तुम्हास लाभले असेल
  • 16:26 - 16:27
    अबाउट द पॉवर ऑफ व्हरनेर्बिलीटी
  • 16:27 - 16:30
    मला दिसते अनेकांनी मना डोलावून
    प्रतिसाद दिला आहे.
  • 16:30 - 16:34
    ते खूपच श्रवणीय आहे.
    त्या मागे विज्ञानाचा आधार आहे
  • 16:34 - 16:37
    तुमचे गुपित सर्वांसमोर उघड होते
    तेव्हा अधिक पारदर्शक बनता
  • 16:37 - 16:42
    त्याने प्रेम व नाते निर्माण होते
    त्यामुळे ऑक्सिटोसीन व इंडोफिन वाढते.
  • 16:42 - 16:46
    परिणामतः कोर्तीसोल व अन्द्रेलीन
    हार्मोन्स कानी होतात.
  • 16:46 - 16:52
    आपण जेव्हा आपल्याला आजमावतो
    आपल्याला आतला दिवा दिसतो.
  • 16:52 - 16:53
    आपण आतून बाहे बरे होऊ लागतो.
  • 16:53 - 16:58
    आणि हे बरे होणे औषधाहून टिकणारे आहे.
  • 16:58 - 17:01
    मी सांगते तुम्हीच तुमच्यासाठी उपचार निवडा
  • 17:01 - 17:04
    हे डॉक्टर करू शकणार नाही
    आम्ही फक्त औषधे देत असतो.
  • 17:04 - 17:07
    गरजेच्यावेळी आम्ही शस्त्रक्रिया करतो
  • 17:07 - 17:11
    स्वतः बरे होण्यासाठी
    ती महत्वाची पायरी आहेच.
  • 17:11 - 17:14
    आतून बरे झाल्यावर तुम्हाला पुन्हा
    नवीन लक्षणे दिसणार नाहीत.
  • 17:14 - 17:19
    तुम्हाला दुसऱ्या शास्दत्र्क्रीयेची गरज
    पडणार नाही तुमची उपचार सूची तयार झाली?
  • 17:19 - 17:27
    तुमच्या गरजा कोणत्या
    शरीराला आरोग्यदायी गोष्टी कोणत्या?
  • 17:27 - 17:32
    तुमच्यात कोणता बदल घडला पाहिजे
    कोणत्या गोष्टींची आयुष्यात साथ पाहिजे
  • 17:32 - 17:35
    हे तुम्ही जाणल्यास
    तुमचे सर्व मुखवटे गळून पडतील
  • 17:35 - 17:37
    आणि त्यामुळे तुम्हाला
    अंतर्मनाचा प्रकाश दिसेल.
  • 17:37 - 17:42
    हेच तुमच्या समस्यांचे उत्तर आहे
    करणार हे?
  • 17:42 - 17:44
    ठामपणे सांगते
  • 17:44 - 17:48
    याने तुमचे शरीर परिपक्व होईल
    त्याच्या चमत्काराचा साक्ष्त्कार होईल.
  • 17:48 - 17:50
    आभारी आहे.
  • 17:50 - 17:52
    (टाळ्या)
Title:
तुमच्या आरोग्याबाबत धक्कादायक बाबी| लिसा रंकीन|TEDxFiDiWomen
Description:

लिसा रंकीन यांनी आरोग्याबाबत तसेच औषधाबाबत अनेक व्याख्याने दिली आहेत .
त्यातील एक. त्या सांगतात आतील्र आवाज तुम्हाला शारीरिक दोषांची जाणीव करून देतो
बरे होणे म्हणजे केवळ शरीरावर इलाज नव्हे तर मन व आत्म्यावर हि इलाज आहे .

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDxTalks
Duration:
18:03

Marathi subtitles

Revisions