Marathi subtitles

← आफ्रिका एका झोपलेल्या राक्षसा सारखी आहे -मी तिला जागे करण्याचा प्रयत्न करतेय

Get Embed Code
48 Languages

Showing Revision 15 created 07/14/2020 by Arvind Patil.

 1. कसे आहेत सगळेजण ?
 2. माझा खरंच विश्वास नाही मी
  टेड टॉक वर आज वक्ता आहे .
 3. हि खरंच खूप मोठी गोष्ट आहे .
 4. माझ्या गावातील प्रत्येकजण,
 5. आत्ता हा कार्यक्रम बघतोय .
 6. नक्कीच माझी वधु म्हणून किंमत
  आता जास्त झाली असेल.
 7. माझे नाव अदेओल फायेहून.
 8. मी नायजेरिया ची आहे.

 9. मी यु.स.मध्ये राहते ,
 10. मी पत्रकार ,विनोदी कलाकार ,
 11. किंवा उपहासात्मक लेखन करणारी आहे .
 12. तुम्हाला जसे वाटेल तसे ,खरंच
 13. माझ्यामध्ये प्रत्येक प्रकारची स्त्री आहे.
 14. माझे यु ट्यूब चॅनेल आहे "कीपिंग इट रिअल
  विथ अदेओल "
 15. हा शो एक मार्ग आहे सभ्य ,आदरणीय अशा
 16. भ्रष्ट आफ्रिकन नेत्यांना संबोधण्याचा .
 17. (विडिओ)अध्यक्ष बुहारी : माहित नाही
 18. माझी बायको कोणत्या पक्षाची आहे ,
  पण ती माझ्या स्वयंपाकघरात असते .

 19. अदेओल फायेहून:अरे देवा
 20. मला पाणी हवंय--

 21. मला खरंच पाणी हवंय
 22. बघा?
 23. यांच्या सोबत हे नेहमीच खरं असतं हा!

 24. विशेषतः ते जेंव्हा गडबड करतात
  जि बऱ्याचदा होते.
 25. चुकून कोणी आफ्रिकन अधिकारी मला
  बघत आहे का ,
 26. मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे, सर
 27. हो ,मी तुमच्या सहकार्यांबद्दल बोलतेय .
 28. मी हे करतेय कारण आफ्रिकेत सगळे
  काही महान आहे .
 29. यावर विश्वास ठेवतच मी मोठी झालीय ,

 30. आफ्रिका खंड म्हणून प्रचंड
  मोठा आहे.
 31. आपल्याकडे कौशल्य ,विचारवंत लोक ,
 32. दुसरीकडे नसलेले नैसर्गिक स्रोत
 33. जगातील ३१% सोने आफ्रिका पुरवते ,
 34. मँगनीज ,युरेनियम ,
 35. जगातील ५७% हिरे
 36. १३% तेल .
 37. आपल्याला कोणावरही अवलंबून राहण्याचे
  कारण नाही
 38. जागतिक बँकेकडून किंवा चीन कडून उधार
  घ्यायची हि जरुरत नाही.
 39. फक्त चांगल्या नेतृत्वा विना ,
 40. आपण एक गरुड आहोत ज्याला उडायचेच
  माहित नाही
 41. एकट्याने
 42. आफ्रिका एखाद्या झोपलेल्या राक्षसा
  प्रमाणे आहे .
 43. सत्य हे आहे ,मला या राक्षसाला
  झोपेतून जागे करायचे आहे

 44. म्हणून मी त्या राक्षसाची सगळे घाणेरडे कपडे
 45. धुवून वाळवायचे असेच ठरवलेय ..
 46. आपले राजकारणी ,धार्मिक गुरु ,
 47. ज्यांचा खुप आदर केला जातो ,
 48. दुसऱ्या कोणत्याही गोष्टी पेक्षा,
 49. त्यांना तो आदर जास्त महत्वाचा आहे .
 50. मी तो त्यांना डोसच्या रूपात देते .
 51. माझ्या कार्यक्रमात,
 52. मी त्यांच्या समोर झुकते --हा! -
 53. मी त्यांना काका,काकू असे बोलवते ,
 54. वडिलांसमान ,परमेश्वर ,
 55. आणि नंतर --
 56. आपल्या बुद्धिमतेचा अनादर
  केल्याबद्दल मी त्यांचा अपमान करते .
 57. कारण आता आपण कंटाळलो आहोत
 58. ढोंगीपणाला आणि खोट्या आश्वासनांना.
 59. जसे कि ,
 60. निजेरियाच्या अध्यक्षांनी वैद्यकीय पर्यटन
  संपवण्याचे आश्वासन दिले होते

 61. आपली जीर्ण झालेली हॉस्पिटल व्यवस्था
  नीट करण्याचे
 62. आणि अजून नवीन हॉस्पिटल बांधण्याचे .
 63. पण त्यांनी काय केले ?
 64. २०१७ मध्ये ३ महिने स्वतः वर लंडन
  मध्ये उपचार घेतले .
 65. आणि आपण विना अध्यक्ष ३ महिने होतो .
 66. आपण विना अध्यक्ष ३ महिने होतो .
 67. मग हे माझे काम होते राष्ट्रपतींना
  बोलते करणे,
 68. तेही आदराने .
 69. मी म्हणाले "हा मा.अध्यक्ष मी तुमची
  मुलगी अदेओल.
 70. तुम्ही कसे आहात,मी काय करतीय
  तुम्हाला माहित आहे का?
 71. तुम्हाला थोडीहि लाज नाही वाटत "
 72. मी "सर" म्हणायला विसरले .
 73. "सर" तुम्हाला जराही लाज
  वाटत नाही .
 74. (योरूबा भाषेत :तुम्हाला देवाची भीती
  नाही वाटत. )
 75. तुम्हाला देवाची भीती नाहीय "
 76. ३५००० हजारांहून हि जास्त नायजेरिअन
  डॉक्टर्स सध्या यु.स.,
 77. यु.के. आणि कॅनडा मध्ये

 78. चांगले काम करत आहेत ,
 79. कारण त्यांना नायजेरियात चांगला
  पगार नाही मिळत ,
 80. चांगले डॉक्टर म्हणून काम करण्यासाठी
 81. ना त्यांच्या कडे चांगली उपकरणे आहेत
 82. आणि हे कितीतरी आफ्रिकन देशां
  मध्ये होत आहे .
 83. आपल्यामध्ये उडण्याची शक्ती आहे
 84. पण वास्तव हे आहे कि सगळी प्रतिभा आफ्रिके
  च्या बाहेर जातेय

 85. दुसऱ्या खंडांकडे .
 86. उदाहरणार्थ ,
 87. ह्या डॉक्टर ने न जन्मलेल्या बाळावर
  शस्त्रक्रिया केली
 88. पण ती टेक्सास मध्ये .
 89. आणि या दुसऱ्या डॉक्टरांनी क्रीडापटूंच्या
 90. मेंदू वर होणाऱ्या आघातावर अभ्यास केला
 91. कितीतरी आफ्रिकन देशातील खेळाडू
 92. त्यांच्या साठी सुवर्ण पदके मिळवत आहेत .
 93. मनोरंजक गोष्ट म्हणजे ,
 94. आफ्रिकेला देव च तारेल अशी आपण
  वाट बघत आहोत .

 95. हा काही विनोद नाही ,पण खरंच आपण
  देवाची वाट बघतोय
 96. म्हणजे बघा जरा अध्यक्ष बुरुंदी यांच्याकडे
 97. ते विरोधकांना ,पत्रकारांना तुरुंगात
  टाकत आहेत ,
 98. आणि राष्ट्रीय प्रार्थना दिवस जाहीर
  करत आहेत
 99. ज्या दिवशी लोक देवाकडे प्राथर्ना करू
  शकतील देश वाचवण्याची .
 100. माझ्या मते ते स्वतः हे नाही करू शकत का ?
 101. ओह नाही ,नाही, नाही, नाही ,नाही .
 102. आम्हाला देवानेच वाचवले पाहिजे
 103. आता तुम्हाला कळले असेल कि माझी लढाई
  कशा सोबत आहे ?
 104. मी तुम्हाला सांगते ,
 105. या राजकारण्यांकडे वेगाने जाणारे
  वादळ निर्माण होत आहे .
 106. त्यांच्या पेक्षा आपण खूप चांगले आहोत .
 107. मला वाटतेय आपल्या नेत्यांनी आता
  जवाबदारी घ्यायला हवीय
 108. सगळे काही देवावर सोडून नाही चालणार .
 109. देवाने आपल्याला हवे असलेले सगळे दिले आहे .
 110. ते इथेच आहे ,चला त्याचा वापर करूयात .
 111. इथे माझा आवडता भाग येतो तो आहे
 112. आफ्रिकन लोक जे खूप चांगलं काम करत
  आहेत त्यांच्या बद्दल बोलणे ,

 113. सामान्य पण असामान्य काम करणारे लोक .
 114. या केनियाच्या महिलेप्रमाणे, वांगारी माथाई,
 115. मानवी हक्कांसाठी उभे राहण्याचे
 116. पहिले नोबेल पारितोषिक मिळवणारी
  आफ्रिकन महिला
 117. आणि लाखो झाडांचे वृक्षारोपण करणारी .
 118. तसेच ही झिम्बाब्वेची महिला,
 119. डॉ तेरेराई ट्रेंट,
 120. जिचे वयाच्या १४ व्या वर्षीच
  लग्न झाले
 121. फक्त एका गायी च्या बदल्यात.
 122. या महिलेने स्वतःला साक्षर बनवले ,
 123. आणि ती ओप्राह च्या कार्यक्रमात पोहोचली .
 124. ओह ,मलाही एक दिवस ओप्राह मध्ये
  सहभागी होयचंय .
 125. आज या महिलेने झिम्बाब्वेतील
  हजारो मुलांसाठी
 126. शाळा उभी केली आहे.
 127. तसेच, लोकप्रिय ब्रिटिश आर्किटेक्ट
  डेव्हिड ऍड्जये यांनी
 128. जगभरात अनेक नेत्रदीपक इमारती बनवल्या आहेत.

 129. आणि ते दोन्ही घाणीयन आणि टांझानियन आहेत ,
 130. तर आपल्याला माहीतच असेल कि हा
  घानाचा जलोफ तांदूळ आहे ,
 131. जो ते खातात ,
 132. आणि जो त्यांना नवनवीन रचना करण्याची
  प्रेरणा देतो .
 133. अहं,कदाचित हा नायजेरियन जलोफ तांदूळ असेल,
 134. कारण नायजेरिअन तांदूळ जास्त
  चांगला असतो .
 135. ते काहीही असो हीच त्यांची प्रेरणा आहे
 136. जी त्यांना महान बनवते .
 137. जर तुमचे माझ्या कडे लक्ष असेल तर,
 138. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे

 139. जरा जवळ या .
 140. एवढेही नाही ,बस एवढे
  ठीक आहे.
 141. मला तुमच्यातील काहीजण आवडत नाहीत
 142. जे आफ्रिकेचे चुकीचे चित्रण करतात.
 143. सगळेच नाही ,फक्त काहीच जण .
 144. खासकरून तुम्ही .
 145. हा देश नाहीए हा खंड आहे .
 146. युगांडातील पॉल ला मी नाही ओळखत ,

 147. झिम्बाब्वेच्या रेबेकाला हि मी ओळखत नाही
 148. नायजेरिया झिम्बाब्वेपासून खूप दूर आहे
 149. जसे न्यूयॉर्क फ्रान्स पासून आहे.
 150. तुम्ही असे चुकीचे समजता
 151. कारण आहेत काही निलाजरे लोक .
 152. आमच्या इथे रस्त्यावर सिंह असेच
  फिरतात असे नाही ,ठीक आहे ?
 153. मी बोलणारच आहे
 154. तुम्हाला माहित आहे ना पण मी कशा
  बद्दल बोलतेय .
 155. माझे काम करायला सुरुवात करते ,
 156. राक्षसा सारख्या झोपलेल्या आफ्रिकेला
  जागे करण्याचे ,

 157. जेणेकरून ती जगाच्या रिंगणात तिची
  जागा घेऊ शकेल ,
 158. आणि तुम्ही सुद्धा
 159. थोडे अजून लक्ष देऊन ऐका.
 160. पूर्वग्रहदूषित न होता
 161. तुमच्या आफ्रिकन मित्रांचे म्हणणे
  ऐकून घ्या
 162. त्यांना नक्की काय सांगायचे आहे .
 163. आफ्रिकन पुस्तके वाचा .
 164. अरे देवा, आफ्रिकन मुव्हीज पण बघू शकता .
 165. किंवा निदान,
 166. आमच्या ५४ देशांची काहि नावे
  तरी लक्षात ठेवा..
 167. हो बाळा ५४ ,५ ४ .
 168. ठीक आहे ,हे सगळे खरे आहे ,
 169. जे आहे तेच मी सांगतेय .
 170. पुढच्या वेळेपर्यंत ,मी पुन्हा तुम्हाला
  भेटणार आहे.
 171. शांतता