-
Title:
अथांग सागरात पोहोण्यामुळे मी लवचिकतेबद्दल शिकवले
-
Description:
भक्ती शर्मा या अथांग सागरात पोहोणा जलतरणपटूबरोबर थोडे खोलात जाउया, तिच्या वैयक्तिक प्रवासत ती चिकाटीबद्दल काय शिकली ते सांगत आहे. हा प्रवास राजस्थान, भारत इथल्या रणरणत्या उकाड्यात सुरु होऊन हाडे गोठवणाऱ्या अंटार्क्टिकाच्या तिच्या विक्रमी जलतरणात पोहोचला.
-
Speaker:
भक्ती शर्मा
-
शहारुख खान : सर्वात मोठी ध्येये
गाठणाऱ्यामधे दिसते -
-
धैर्य, निग्रह आणि एकाग्र, केलेली दृष्टी ।
-
त्यांच्यात इतकी हिंमत असते की
त्यांना अपयश हा पर्यायच नसतो।
-
विशाल सागर आपल्याला
अजिंक्य दिसतो पण,
-
आपल्या आजच्या वक्त्यासाठी
ते आकर्षक व्यासपीठ आहे
-
ज्याच्यासाठीच ती जन्मली.
-
तर आजची आपली निर्भय व्यक्ती
भक्ती शर्मा हिच्या गोष्टीत
-
उडी घेऊ या.
-
ही लांब अंतर पोहोण्याच्या क्षेत्रात
लाटा निर्माण करत आहे.
-
भक्ती शर्मा.
-
-
भक्ती शर्मा : कल्पना करा,
राजस्थानच्या कडक उन्हात
¶
-
एखाद्या रणरणत्या दुपारी,
-
एक दोन वर्षाची मुलगी
आईच्या मोपेडवर बसते,
-
तिला माहित नाही, आपण कुठे जातोय
-
आणि २० मिनिटांनंतर
-
ह्या अडीच वर्षांच्या मुलीला दिसतं
-
की ती पाण्यात पडली आहे.
-
मला काही समजण्याच्या आत,
-
मी लाथा मारत होते,
पाणी उडवत, ओरडत होते
-
माझ्या पोटातही पाणी जात होतं,
-
माझ्या प्रिय आयुष्यासाठी
मी आईला धरत होते.
-
मी अशी पोहायला शिकले।
-
मी अडीच वर्षांची असताना
तलावात पोहायला लागले.
¶
-
आणि १४ वर्षांची असताना
सागराच्या खुल्या पाण्यात.
-
मी या खेळाला माझ्या आयुष्याची
२५ पेक्षा जास्त वर्षे दिली आहेत.
-
या काळात मी जगातले सगळे
म्हणजे पाचही सागर पोहले आहे.
-
इंग्लिश खाडी पार केली आहे --
-
जिला पोहण्याच्या क्षेत्रात
माउंट एव्हरेस्ट समजतात --
-
आणि गोठवणाऱ्या अंटर्क्टिक सागरात
जागतिक विक्रम नोंदला आहे.
-
-
जेव्हा तुम्ही एखाद्या खेळात
इतका काळ असता,
¶
-
तो फक्त खेळ रहात नाही,
-
तर एक आरसा बनतो,
-
तो तुम्ही खरंच कोण
आहात हे दाखवतो.
-
खेळाडू म्हणून तुमची परीक्षा
फक्त शर्यतीच्या दिवशीच नाही,
-
तर प्रत्येक दिवशी होत असते,
-
जेव्हा ह्या खेळाची मागणी असते की
तुम्ही पहाटे ४:३० ला उठायचे,
-
दोन तास पोहायचे,
-
शाळेत जायचे, परत यायचे,
परत ३ तास पोहायचे,
-
घरी जायचे, जेवायचे आणि झोपायचे.
-
जेव्हा तुम्ही एक मेडल जिंकता
किंवा जागतिक विक्रम करता,
-
तेव्हा हा आरसा तुम्हाला तुमचा आणि
तुमच्या जवळच्यांचा आनंद दाखवतो,
-
तसेच तुम्ही ढाळलेले
अश्रुही दाखवतो
-
जे तुम्ही पाण्यात अगदी
एकटे असताना येतात.
-
खुल्या सागरात पोहणे हा
खूप एकाकी खेळ आहे.
¶
-
मी असे अनेक तास घालवले आहेत,
-
माझ्याखालच्या अनंत आणि अथांग
वाटणाऱ्या सागरात बघत,
-
जिथे माझ्या सोबतीला माझे
विचार सोडून कोणीही नसते.
-
त्यामुळे माझी परीक्षा एक
जलतरणपटू म्हणूनच होत नाही तर
-
एक विचारी, भावना असलेली, कल्पना
करणारी माणूस म्हणूनही होते.
-
ही परीक्षा माझ्या पहिल्या
मेरेथोन टेस्टमधे होते,
-
किंवा न थांबता १२ तास
तलावात पोहायचे ठरवताना होते,
-
तसंच १३ तास ५५ मिनिटांमधे
इंग्लिश खाडी ओलांडताना होते.
-
पोहत असताना तुम्ही बोलत नाही,
-
तुम्हाला नीट ऐकू येत नाही,
-
आणि तुमची नजर फक्त
अगदी समोर असलेल्या किंवा
-
तुमच्या खालच्या गोष्टींपर्यतच जाते.
-
माझ्या खेळातले हे एकाकीपण
माझ्यासाठी सर्वात मोठे बक्षिस आहे.
-
अथांग सागरात पोहोण्यामुळे,
¶
-
मी कधी अपेक्षा केली नसेल अशा
प्रकारे मला स्वत:ची ओळख झाली.
-
मला आठवतंय, १४ वर्षांची असताना,
-
मी जेव्हा सागरात पोहोण्यासाठी
पहिल्यांदा उडी मारली,
-
आणि ह्या पूर्ण पोहोण्यामधे,
-
लाटा मला उंच उचलत होत्या
आणि खाली फेकत होत्या,
-
मला माझ्यातलं मूल दिसलं,
ज्याला असं धाडस आवडतं.
-
इंग्लिश खाडी पार करताना,
-
आधीचे १० तास पोहोल्यानंतर,
-
मी जेव्हा एकाच जागी
दीड तास अडकून पडले,
-
जे प्रवाहांमुळे होतं,
-
मला माझ्यातला समर्पित
आणि खंबीर खेळाडू दिसला,
-
ज्याला त्याच्या देशाचा आणि
पालकांचा अपेक्षाभंग करायचा नव्हता.
-
स्वित्झर्लंडमधे झालेल्या
खुल्या पाण्यातल्या मेरेथोन मधे
-
मी जेव्हा माझं पहिलं सुवर्णपदक
भारतासाठी मिळवलं- -
-
-
मी माझ्यातला अभिमानी भारतीय पाहिला.
¶
-
पुन्हा एकदा इंग्लिश खाडी
पार करताना,
-
ह्यावेळी माझ्या आईबरोबर रिले करत,
-
आम्ही इतिहास घडवतो
आहे हे माहित नसताना,
-
मी माझ्यातली काळजी
घेणारी मुलगी पाहिली,
-
जिला फक्त तिच्या आईचं स्वप्न
साकार होताना पहायचं होतं.
-
आणि चार वर्षांपूर्वी,
-
मी जेव्हा अंटार्क्टिक समुद्रात उडी घेतली,
-
अंगावर स्वीमिंग सूट्, टोपी व
गोगल सोडून काही नसताना,
-
फक्त काही करण्याच्या अथक जिद्दीने,
-
माझ्यातला योध्दा मी पाहिला.
-
मी जेव्हा शून्य ते एक अंश
तापमानाच्या पाण्यात उडी मारली,
¶
-
मला जाणीव झाली की मी स्वत:च्या
शरीर व मनाला थंडीसाठी तयार केलं होतं,
-
पण पाण्याच्या दाटपणासाठी
माझी तयारी नव्हती.
-
मारलेला प्रत्येक हात तेलात
मारल्यासारखा वाटत होता.
-
आणि पहिल्या पाच मिनिटांमधे,
-
मला हे सगळं सोडून देण्याचा
पंगू करणारा विचार आला.
-
हे सगळं सोडलं तर किती बरं होईल,
-
बोटीवर जावं,
-
गरम पाण्याच्या शोवरखाली उभं रहावं,
-
की उबदार पांघरुणात गुंडाळून घ्यावं
-
पण ह्याच विचाराबरोबर,
-
अगदी आतून एक हट्टी
सबळ विचार आला.
-
"तुला माहितीये की अजून एक
स्ट्रोक मारण्याची क्षमता तुझ्यात आहे."
-
आणि मी हात उचलून
एक स्ट्रोक मारला.
-
" आता अजून एक."
-
मग मी दुसरा आणि
तिसराही स्ट्रोक मारला.
-
चौथ्या स्ट्रोक पर्यंत,
-
मला माझ्या पोटाखालून
एक पेंग्विन पोहोताना दिसला.
-
तो माझ्या डावीकडे आला व
माझ्याबरोबर पोहू लागला.
-
" पहा, पेंग्विन तुला
प्रोत्साहन देत आहे,"
-
त्या आवाजाने मला सांगितलं.
-
( टाळ्या व प्रोत्साहन )
¶
-
मी बोटीतल्या माझ्या
लोकांकडे पाहिलं.
¶
-
माझ्या चेहऱ्यावर होतं
तसंच हसू त्यांच्यापण होतं.
-
आम्हा सगळ्यांकडे तेच हसू होतं
-
जे आपण अवघड
परिस्थितीत अडकलेले असताना
-
आशेचा एक किरण दिसल्यावर येतं.
-
आपण ते नशिबाचे चिन्ह म्हणून घेतो,
-
आणि आपण फक्त पुढे जात रहातो.
-
अगदी मी केलं त्याप्रमाणे
-
आणि ४० मिनिटांनंतर,
-
मी अटलांटिक सागरात
सर्वात जास्त अंतर पोहोण्याचा
-
जागतिक विक्रम केला.
-
-
कल्पना करा,राजस्थानमधे
बर्फसुद्धा पडत नाही.
¶
-
-
हा आवाज, जो माझ्या सर्व कठीण
प्रसंगात माझ्या सोबतीला होता
¶
-
माझ्या सगळ्या पोहोण्यामधे,
-
मला कधीच दिसला नसता,
-
जर मी इतका वेळ
एकटीने घालवला नसता,
-
जर माझ्या मनात डोकावणाऱ्या
-
प्रत्येक विचाराकडे लक्ष दिलं नसतं.
-
जेव्हा तुम्ही सागरात फक्त तुमच्या
विचारांच्या साथीने एकटे असता,
-
तुम्हाला येऊन भिडणारी संकटं
व्हेल, शार्क, जेलीफिश अशी
-
किंवा नाउमेद करणारी माणसे
-
अशी फक्त बाहेरची नसतात,
-
पण जास्त भितीदायक
राक्षसी शत्रू म्हणजे
¶
-
तुमच्या मनातली भीती
आणि नकारात्मक विचार.
-
जे सांगतात, तू पुरेशी चांगली नाहीस,
-
तू कधीच त्या किनाऱ्याला
लागणार नाहीस.
-
तुझं पुरेसं प्रशिक्षण झालं नाही
-
तुला अपयश आलं तर?
लोक काय म्हणतील?
-
मला खात्री आहे की आत्ता सगळे
म्हणताहेत 'तू किती हळू पोहोतेस.'
-
सगळ्यांनाच स्वत:चे आतले
राक्षस असतात, नाही का?
-
रोजच्या जीवनात आपण
त्यांच्यापासून लपू शकतो,
-
तुमचे काम किंवा लक्ष देण्याच्या
इतर अनेक गोष्टींच्या मागे.
-
पण मी म्हटले त्याप्रमाणे
-
अथांग सागरात तुम्हाला
लपायला कुठेच जागा नसते.
-
मलाही माझ्या आतल्या
राक्षसांना तोंड द्यावं लागलं,
-
जशी मला सागराच्या खारट
पाण्याची चव बघावी लागते,
-
अंगावर दमटपणा जाणवतो,
-
किंवा माझ्या बाजूने पोहोणाऱ्या
व्हेल माशांची दखल घ्यावी लागते,
-
मला ह्याचा राग येतो,
आणि प्रेमही वाटतं.
-
मला राग येतो कारण हा खेळ
मला माझी ती बाजू दाखवतो
¶
-
जिच्या अस्तित्वावर मला
विश्वास ठेवायचा नाही.
-
माझी मानवी आणि
आदर्श नसलेली बाजू.
-
माझा तो भाग
-
जो सकाळी अंथरुणाबाहेर
पडून सराव करु शकत नाही
-
तो भाग जो इतका दमतो,
त्याचा इतका शक्तीपात होतो,
-
की त्याला पोहोणंच
सोडून द्यायचं असतं.
-
पण या खेळाबद्दल प्रेमही वाटतं,
-
कारण ह्याने मला दिलेल्या काही
क्षणांची मी तेव्हा आठवण काढते,
-
जेव्हा मला प्रेरणा मिळत नाही.
-
आणि मला फार क्रुतद्न्य वाटून
-
मी त्याच्यापुढे अगदी गुढगे टेकते.
-
तुमच्यापैकी बरेच जण न थांबता
तासनतास पोहले नसतील.
¶
-
पण तुम्ही तुमचा बराच वेळ
कोणाबरोबर घालवता?
-
तुमचं स्वत:बाहेरचं लक्ष अनेक
लोकांशी वाटून घेतलेलं असतं,
-
पण तुमचा एक सोबती
सतत तुमच्याजवळ असतो,
-
तुम्ही स्वत:
-
तरीही, बहुतेकांना आपण खरंच
कोण आहोत याची ओळख नसते.
-
मी एक मुलगी आहे, एक भारतीय,
एक जलतरणपटू, एक विद्यार्थी आहे.
-
पण यापलीकडेही मी कितीतरी आहे.
-
तुम्ही स्वत:मधे गुंतवणुक
करत नसाल,
-
तुम्हाला 'त्या' स्वत:जवळ
नेणारा मार्ग तयार करत नसाल तर
-
कितीही "यश" मिळाल्याने तुम्हाला
शाश्वत आनंद व समाधान मिळणार नाही.
-
-
जेव्हा मला, मी करतेय त्यातून
प्रेरणा किंवा आनंद मिळत नाही,
-
मी स्वत:ला फक्त विचारते,
-
या क्षणी मी जे सर्वोत्तम
करु शकेन, ते हेच आहे का?
-
आणि "माझे सर्वोत्तम" ह्याचा
अर्थ बदलत रहातो.
-
कधी तो, प्रयत्न सोडू
नये असा असतो,
-
कधी, गोठलेल्या पाण्यात पोहत राहून
जागतिक विक्रम करणे असतो.
-
पण इतर अनेक दिवशी,
-
माझ्या निराश विचारांवर
मात करणे असतो,
-
घराच्या बाहेर पाऊल टाकून,
-
रोजची साधी कामे करु शकणे असतो.
-
बदलत नाही तो आतला आवाज.
-
ते आतलं होकयंत्र, जे मला
-
दररोज जास्त चांगली व्यक्ती
होण्याची दिशा दाखवतं.
-
आणि माझा विश्वास आहे की
-
खरोखरचे यशस्वी आयुष्य
म्हणजे याचा शोध घेत रहाणे
-
की तुम्ही 'सर्वात चांगले
तुम्ही' कसे असाल
-
जेव्हा तुम्ही शेवटचा श्वास घ्याल.
-
-
-
शहारुख खान: मला वाटतं पोहणे हा
एकच खेळ मला जमणार नाही-
¶
-
मी दगडासारखा खाली बुडतो.
-
त्यामुळे जगातल्या सर्वोत्तम
जलतरणपटूच्या शेजारी उभं रहायला
-
मला जरा कसं वाटतंय, म्हणजे - -
-
माझ्या शब्द-कोटीला माफ करा - -
-
जणू काही सागरात असल्यासारखं.
-
पण - -
-
भक्ती शर्मा : (हसते) खरंच कोटी नाही.
¶
-
खान : पण तुमचं जलतरणातलं
पुढचं ध्येय काय आहे?
¶
-
शर्मा : मला स्पर्धेची बरीच भिती आहे,
¶
-
तेव्हा ओलिंपिकपेक्षा जास्त
चांगलं ध्येय काय असेल?
-
कारण खुल्या सागरात पोहोणे हा
आता ओलिंपिकमधला खेळ आहे.
-
-
हे मोठ्याने बोलतानासुद्धा
माझ्या अंगावर शहारे येतायत,
¶
-
कारण ते इतकं मोठं ध्येय आहे
-
की ते ध्येय माझं आहे यावर
मला विश्वास ठेवायचा नाही
-
पण तोच त्यातला थरार आहे,
तोच त्याचा भाग आहे.
-
आणि माझा असा विचार आहे की मी
ओलिंपिकमधे गेले, किंवा नाही गेले,
-
त्याने मला फरक पडत नाही,
-
पण त्याच्या प्रशिक्षणाच्या प्रक्रीयेमधे
-
मी एक जास्त चांगली जलतरणपटू
आणि एक चांगली माणूस बनेन.
-
खान : इन्शा अल्ला, तू
जरुर ओलिंपिकला जाशील.
¶
-
आणि मला तुला सांगायचंय की
-
बरेच लोक जे हा कार्यक्रम
घरुन पहात आहेत
-
असंख्य माणसे, जी सगळी तुझ्याबद्दल
फक्त सकारात्मक विचार करत आहेत,
-
तर तू जेव्हा ओलिंपिकला जाशील,
-
आम्ही सगळे पेंग्विनचा सूट
घालून तुझ्याबरोबर पोहत असू,
-
आणि म्हणू, "पुढे जा,
भक्ती, पुढे जा, पुढे जा."
-
भक्ती : माझा खास पेंग्विन व्हाल?
¶
-
खान : मी आताच तुझा पेंग्विन आहे.
¶
-
तू जर शार्क वगैरे म्हणाली
असतीस तर बरं झालं असतं,
-
पण पेंग्विन - -
-
भक्ती : माझा आवडता प्राणी
ओर्का आहे, माझे ओर्का व्हा.
¶
-
-
खान : लेडीज अड जंटलमन, भक्ती.
¶
-
-