Return to Video

संवेदनशील लोकांचे ३ रहस्य

  • 0:01 - 0:06
    मी तुम्हा सर्वाना काही प्रश्न विचारून
    सुरुवात करू इच्छिते.
  • 0:06 - 0:10
    तुम्ही जर कधी
    एखाद्या जवळच्या व्यक्ती ला गमावले असेल,
  • 0:10 - 0:12
    तुम्ही कधी प्रेम भंग अनुभवला असेल,
  • 0:12 - 0:15
    कधी वाईट घटस्फोट अनुभवला असेल,
  • 0:15 - 0:18
    तुमचा कधी विश्वासघात झाला असेल,
  • 0:18 - 0:20
    कृपया उभे राहा.
  • 0:20 - 0:24
    जर उभे राहणे शक्य नसेल,
    तर तुम्ही हात वर करू शकता.
  • 0:24 - 0:26
    कृपया उभेच राहा ,
  • 0:26 - 0:28
    आणि तुमचा हात वरच राहू द्या .
  • 0:28 - 0:30
    तुम्ही कुठल्या
    नैसर्गिक आपत्तीतून वाचले असाल,
  • 0:30 - 0:32
    कधी छळवणुकीमुळे
    आयुष्य निरर्थक वाटलं असेल,
  • 0:32 - 0:34
    उभे राहा.
  • 0:34 - 0:37
    तुम्ही कधी गर्भपात अनुभवला असेल,
  • 0:37 - 0:39
    कधी गर्भपात करून घ्यावा लागला असेल,
  • 0:39 - 0:42
    किंवा व्यंधत्व सोसलं असेल,
  • 0:42 - 0:44
    कृपया उभे राहा.
  • 0:44 - 0:47
    तुम्ही, किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीने ,
  • 0:47 - 0:50
    मानसिक विकार अनुभवला असेल,
  • 0:50 - 0:53
    कुठल्या प्रकारची शारीरिक कमजोरी,
  • 0:53 - 0:55
    आत्महत्येचा विचार केला असेल,
  • 0:55 - 0:57
    कृपया उभे राहा.
  • 0:57 - 0:59
    आपल्या आजूबाजूला बघा.
  • 0:59 - 1:04
    आपत्ती भेदभाव करत नाही.
  • 1:04 - 1:06
    जर तुम्ही जिवंत आहात,
  • 1:06 - 1:10
    तर तुम्ही अडचणींचा सामना केला असेल,
  • 1:10 - 1:13
    किंवा तुम्हाला पुढे करावाच लागेल.
  • 1:13 - 1:15
    धन्यवाद , तुम्ही सगळे बसू शकता.
  • 1:19 - 1:23
    मी संवेदनशीलते वर संशोधनाच्या अभ्यासाला,
    फिलिडेफिया येथील
  • 1:23 - 1:26
    पेन्सिल्वेनिया युनिव्हर्सिटीत
    दहा वर्षां आधी सुरुवात केली.
  • 1:26 - 1:28
    तिथे असण्याची ती योग्य वेळ होती,
  • 1:28 - 1:31
    कारण माझ्या शिक्षकांनी नुकताच,
  • 1:31 - 1:37
    अमेरिकेच्या ११ लाख सैनिकांना
    प्रशिक्षण द्यायचा करार केला होता.
  • 1:37 - 1:42
    शारीरिकरित्या सुदृढ असताना
    त्यांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्या करिता.
  • 1:42 - 1:43
    तुम्ही अंदाज बंधू शकता,
  • 1:43 - 1:47
    अफगाणिस्तान हुन परतलेल्या
    अमेरिकन ड्रिल सार्जंट्स पेक्षा
  • 1:47 - 1:51
    संशयवादी विवेकी समिक्ष श्रोते
    मिळणं शक्य नाही.
  • 1:51 - 1:52
    तर माझ्यासारखी व्यक्ती,
  • 1:52 - 1:56
    जिचं मूळ ध्येय,
  • 1:56 - 2:01
    सर्वोत्तम वैज्ञानिक निष्कर्ष
    अव्यवहार्य अध्ययनातून
  • 2:01 - 2:04
    लोकांपर्यंत पोहोचवणं आहे,
  • 2:04 - 2:07
    माझ्या साठी ती एक उत्कृष्ट संधी होती.
  • 2:07 - 2:09
    मी अमेरिकेत शिकले,
  • 2:09 - 2:12
    आणि माझ्या डॉक्टरेट संशोधनाकरिता,
  • 2:12 - 2:15
    इथे, घरी, क्रिस्टचर्चला परतले.
  • 2:15 - 2:18
    मी संशोधनाला नुकतीच सुरुवात केली असताना
  • 2:18 - 2:21
    क्रिस्टचर्चला भूकंप आला.
  • 2:21 - 2:23
    तर मी ते संशोधन तात्पुरते थांबवले,
  • 2:23 - 2:26
    आणि भूकंपा नंतरच्या कठीण काळात मदत म्हणून
  • 2:26 - 2:31
    सामाजिक कार्य करायला लागले.
  • 2:31 - 2:33
    मी सरकारी विभागांपासून,
    बांधकाम कंपन्यांपर्यंत,
  • 2:33 - 2:37
    सर्व प्रकारच्या संगठनांबरोबर काम केले,
  • 2:37 - 2:38
    आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये
  • 2:38 - 2:41
    संवेदनशीलता वाढवण्याच्या
  • 2:41 - 2:45
    आपल्याला माहित असलेल्या
    विचार आणि वागणूक पद्धती शिकवल्या
  • 2:45 - 2:48
    मला ही माझी
    जीवन वृत्ती असल्याची खात्री होती,
  • 2:48 - 2:53
    माझ्या संशोधनाचा
    चांगला वापर करण्याची संधी,
  • 2:53 - 2:56
    पण दुर्दैवाने, हे खरं नव्हतं.
  • 2:56 - 3:01
    कारण माझी खरी परीक्षा, २०१४ मध्ये
  • 3:01 - 3:03
    कविन्स बर्थडे वीकेंडला होती.
  • 3:03 - 3:06
    आमच्या बरोबर २ परिवारांनी,
  • 3:06 - 3:10
    लेक ओहाउला जाऊन सायकलिंग करायचे ठरवले.
  • 3:10 - 3:12
    शेवटच्या क्षणी,
  • 3:12 - 3:15
    माझी १२ वर्षांची मुलगी, ॲबी ,
  • 3:15 - 3:20
    तिची मैत्रीण एला आणि एलाची आई,
  • 3:20 - 3:24
    माझी जिवलग मैत्रीण, सॅली, गाडीत बसल्या.
  • 3:25 - 3:28
    रस्त्यात राकाया हुन जाताना
  • 3:28 - 3:30
    थॉंप्सन ट्रॅक वर,
  • 3:30 - 3:33
    एक गाडी
    स्टॉप चिन्हाकडे दुर्लक्ष करून पुढे गेली,
  • 3:33 - 3:35
    त्यांच्या गाडीशी धडकली
  • 3:35 - 3:38
    तत्क्षणी त्या तिघींचा जीव गेला.
  • 3:39 - 3:42
    एकाच क्षणात,
  • 3:42 - 3:45
    मी उदाहरणाच्या दुसऱ्या बाजूला होते
  • 3:45 - 3:48
    एका वेगळ्या ओळखी सोबत.
  • 3:48 - 3:51
    संवेदनशीलता तज्ञाच्या जागी,
  • 3:51 - 3:54
    अचानक मी एक शोकास्पद आई होते.
  • 3:54 - 3:56
    जाग आल्यावर माझी ओळख बदलली होती,
  • 3:56 - 4:00
    मी या अकल्पनीय घटनेला
    समजून घ्यायचा प्रयत्न करत होते,
  • 4:00 - 4:03
    माझे जग बिथरले होते.
  • 4:03 - 4:07
    एकाएकी मला सगळे सल्ले मिळू लागले.
  • 4:07 - 4:09
    आणि मी तुम्हाला सांगू शकते,
  • 4:09 - 4:12
    ते ऐकायला सोप्पे नव्हते.
  • 4:12 - 4:15
    ॲबी गेल्याच्या काही दिवसात,
  • 4:15 - 4:20
    आम्हाला सांगितले गेले की आता आमच्यात
    पारिवारिक तणाव होण्याची शक्यता आहे
  • 4:20 - 4:23
    आमचा घटस्फोट होऊ शकतो,
  • 4:23 - 4:26
    आणि आम्हाला मानसिक आजार होण्याचे
    संभाव्य आहे.
  • 4:26 - 4:27
    मी विचार केला," वा "
  • 4:27 - 4:30
    "मला वाटले,
    माझे आयुष्य आधीच खूप गोंधळलेले आहे."
  • 4:30 - 4:32
    (हास्य)
  • 4:32 - 4:35
    माहितीपत्रकांत शोकाचे ५ टप्पे रेखले असतात:
  • 4:35 - 4:38
    राग, सौदेबाजी, नाकबुली, औदासिन्य, स्वीकृती
  • 4:38 - 4:41
    मानसीक समर्थनाकरिता लोक आमच्या दाराशी आले,
  • 4:41 - 4:46
    आम्हाला सांगण्यात आले कि आमच्या आयुष्यातील
    पुढची ५ वर्षे शोकात जाणे अपेक्षित आहे.
  • 4:47 - 4:51
    मला ठाऊक होतं कि ती सगळी माहितीपत्रकं
    आणि संसाधने आमच्या चांगल्या साठी होती,
  • 4:51 - 4:53
    पण या सर्व सल्ल्यांमुळे
  • 4:53 - 4:57
    आम्ही शोकग्रस्त असल्या सारखे
    वाटत राहायचे.
  • 4:57 - 4:59
    पुढच्या प्रवासाने
    पूर्णपणे भांभावून गेली असताना
  • 4:59 - 5:05
    आणि आमच्या दुःखाबद्दल
    शक्तिहीन वाटत असताना,
  • 5:05 - 5:09
    परिस्थिती किती वाईट आहे
    हे जाणून घ्यायची मला इच्छा नव्हती.
  • 5:09 - 5:13
    परिस्थिती किती भयंकर आहे
    याची मला पुरेपूर कल्पना होती.
  • 5:13 - 5:16
    मला गरज होती, ती आशे ची.
  • 5:17 - 5:21
    मला त्या क्लेशातून,
  • 5:21 - 5:24
    त्रासातून,
    उत्कंठेतून निघायची गरज होती.
  • 5:24 - 5:25
    सगळ्यात महत्वाचं म्हणजे,
  • 5:25 - 5:31
    मला माझ्या शोकात
    सक्रियपणे सहभाग घ्यायचा होता.
  • 5:31 - 5:34
    तर मी त्यांच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले
  • 5:34 - 5:39
    आणि स्वतःवर प्रयोग करायचे ठरवले.
  • 5:39 - 5:41
    मी संशोधन केले होते,
    माझ्या कडे साधने होती,
  • 5:41 - 5:44
    एवढ्या प्रचंड अट्टाहासात,
    ती माझ्या किती उपयोगी येतील
  • 5:44 - 5:48
    हे मला जाणून घ्यायचे होते.
  • 5:48 - 5:51
    मी काबुल करते,
  • 5:51 - 5:54
    तेव्हा मला ठाऊक नव्हतं
    हे काम करेल की नाही.
  • 5:54 - 5:57
    मूल गमावणं हे सगळ्यात कठीण दुर्भाग्य आहे
  • 5:57 - 6:00
    असं विस्तृतपणे मानल्या जातं.
  • 6:02 - 6:05
    पण, आज पाच वर्षांनंतर,
    मी तुम्हाला सांगू शकते,
  • 6:05 - 6:08
    जे मला माझ्या संशोधनातून
    पूर्वीच माहिती होतं.
  • 6:08 - 6:11
    कि तुम्ही आपत्तीतून उठू शकता,
  • 6:11 - 6:14
    कि काही पद्धती आहेत, ज्या काम करतात,
  • 6:14 - 6:17
    कि विचार आणि वागणुकीच्या
    काही अश्या पद्धती आहेत,
  • 6:17 - 6:21
    ज्या तुम्हाला कठीण काळात,
  • 6:21 - 6:26
    मदत करू शकतात.
  • 6:26 - 6:30
    हे साध्य करायला महत्वाचे संशोधन झाले आहे.
  • 6:30 - 6:34
    आज मी तुम्हाला फक्त
    ३ पद्धतींबद्दल सांगणार आहे.
  • 6:34 - 6:38
    या माझ्या विश्वसनीय पद्धती आहेत,
  • 6:38 - 6:40
    ज्यांनी मला सगळ्यात वाईट दिवसांमध्ये
    सुद्धा मदत केली.
  • 6:40 - 6:44
    ह्या त्या तीन पद्धती आहेत,
    ज्या माझ्या कार्याला आधार देतात,
  • 6:44 - 6:47
    आणि त्या आपण सर्वांना सहजपणे उपलब्ध आहेत,
  • 6:47 - 6:48
    त्या कोणीही शिकू शकतं,
  • 6:48 - 6:50
    तुम्ही त्या आज इथे सुद्धा शिकू शकता.
  • 6:50 - 6:51
    तर, नंबर एक,
  • 6:53 - 6:59
    संवेदनशील लोकांना कळतं की
  • 6:59 - 7:01
    दुःख आयुष्याचा भाग आहे.
  • 7:01 - 7:03
    याचा अर्थ असा नाही कि त्यांना ते हवं असतं,
  • 7:03 - 7:05
    ते भ्रामक नसतात.
  • 7:05 - 7:09
    परंतु, जेव्हा कठीण प्रसंग येतात,
  • 7:09 - 7:11
    त्यांना कल्पना असते की,
  • 7:11 - 7:16
    व्यथा जीवनाचा भाग आहे.
  • 7:16 - 7:18
    आणि हे जाणत असताना,
    जेव्हा कठीण प्रसंग येतात
  • 7:18 - 7:22
    तेव्हा त्यांना आपल्या सोबत
    भेदभाव झाल्या सारखा वाटत नाही.
  • 7:22 - 7:24
    मी कधीच हा विचार केला नाही कि,
  • 7:24 - 7:26
    "मी का?"
  • 7:26 - 7:28
    खरंतर मी विचार करायचे,
  • 7:28 - 7:30
    "मी का नाही?"
  • 7:30 - 7:32
    भयंकर प्रसंग होत राहतात,
  • 7:32 - 7:33
    सगळ्यांसोबत च,
  • 7:33 - 7:35
    हे आता आपलं आयुष्य आहे,
  • 7:35 - 7:37
    ही करा किंवा मरा ची वेळ आहे."
  • 7:37 - 7:39
    खरी दुःखाची गोष्ट म्हणजे,
  • 7:39 - 7:43
    आपल्याला आजकाल हे कळत नाही.
  • 7:43 - 7:45
    आपण अश्या काळात राहतो,
    जिथे प्रत्येकाला
  • 7:45 - 7:47
    परीपूर्ण जीवनाचा हक्क आहे,
  • 7:47 - 7:50
    जिथे इंस्टाग्राम वर सगळे
    हसरे छायाचित्र असतात,
  • 7:50 - 7:52
    जेव्हा खरंतर, जसं तुम्ही सर्वांनी
  • 7:52 - 7:56
    कार्यक्रमाच्या सुरवातीला दर्शवलं,
  • 7:56 - 7:59
    सत्य याउलट आहे.
  • 7:59 - 8:01
    नंबर दोन,
  • 8:01 - 8:08
    संवेदनशील लोक
    त्यांच लक्ष कुठे लावायचं
  • 8:08 - 8:12
    हे ठरवण्यात उत्तम असतात,
  • 8:12 - 8:16
    वस्तुस्तिथी च उचित मूल्यमापन करायची
    त्यांना सवय असते.
  • 8:16 - 8:21
    आणि ते ज्या गोष्टी बदलू शकतात
    त्यांच्या कडे लक्ष केंद्रित करतात,
  • 8:21 - 8:26
    आणि ज्या गोष्टी बदलता येत नाहीत,
    त्यांना ते स्वीकारतात.
  • 8:26 - 8:33
    संवेदनशीलतेसाठी
    हे एक महत्वपूर्ण कौशल्य आहे.
  • 8:34 - 8:37
    मनुष्य म्हणून,
    आपण धोका आणि कमजोरी
  • 8:37 - 8:41
    ओळखण्यात माहीर असतो.
  • 8:41 - 8:45
    ती नकारात्मकता आपल्यात असतेच.
  • 8:45 - 8:48
    आपण त्यांना उत्तमपणे ओळखतो.
  • 8:48 - 8:53
    नकारात्मक भावना आपल्याला
    वेल्क्रो सारख्या चिटकतात,
  • 8:53 - 8:58
    तर सकारात्मक भावना
    टेफ्लॉन सारख्या उडून जातात.
  • 8:58 - 9:02
    अशी रचना असणं खरंतर
    आपल्या साठी खूप फायद्याचं आहे,
  • 9:02 - 9:06
    उत्क्रांतिविषयक दृष्टिकोनातून
    आपल्याला याचा लाभ झाला आहे.
  • 9:06 - 9:08
    कल्पना करा कि
    मी एक गुहेत राहणारी स्त्री आहे,
  • 9:08 - 9:10
    आणि मी सकाळी गुहेतून बाहेर पडते,
  • 9:10 - 9:11
    एकीकडे वाघ आहे आणि
  • 9:11 - 9:14
    दुसरीकडे एक सुंदर इंद्रधनुष्य.
  • 9:14 - 9:19
    तर मला जगायसाठी ,
    वाघ दिसणं जास्त महत्वाचं.
  • 9:19 - 9:21
    आता समस्या हि आहे कि,
  • 9:21 - 9:25
    आपण अश्या जगात राहतो जिथे,
  • 9:25 - 9:27
    आपल्याला सतत धोके आढळतात,
  • 9:27 - 9:32
    आणि आपला बिचारा मेंदू
    त्या सगळ्या धोक्यांना,
  • 9:32 - 9:35
    ते वाघ असल्या सारखे बघतो.
  • 9:35 - 9:39
    आपलं धोक्यावरचं लक्ष, तणावाला प्रतिसाद,
  • 9:39 - 9:42
    सतत वाढलेला असतो.
  • 9:42 - 9:46
    संवेदनशील लोक, नकारात्मक गोष्टीकडे
    दुर्लक्ष करत नाहीत,
  • 9:46 - 9:49
    पण ते सकारत्मक गोष्टींकडे
  • 9:49 - 9:52
    लक्ष द्यायचा सुद्धा मार्ग काढतात.
  • 9:53 - 9:58
    एकदा जेव्हा शंकांमुळे मी दडपली होती,
  • 9:58 - 9:59
    मी विचार केला,
  • 9:59 - 10:04
    "नाही, या सगळ्यात स्वतःला
  • 10:04 - 10:06
    घेरून घेऊ नकोस,
    तुला जगायचं आहे,
  • 10:06 - 10:09
    तुझ्याकडे जगण्यासाठी भरपूर करणं आहेत,
  • 10:09 - 10:11
    मरण नाही जीवन निवड,
  • 10:11 - 10:14
    तू जे गमावलं आहेस,
  • 10:14 - 10:17
    त्याला आयुष्य गमावू नकोस."
  • 10:17 - 10:19
    मानसशात्रज्ञांत याला
    'बेनेफिट फाइंडिंग ' म्हणतात.
  • 10:19 - 10:21
    माझ्या नव्या,धीट विश्वात,
    मी ज्या साठी आभारी आहे,
  • 10:21 - 10:24
    त्या गोष्टी शोधण्याचा समावेश होता.
  • 10:24 - 10:27
    निदान आमची लहानशी मुलगी,
    कुठल्या भीषण,
  • 10:27 - 10:31
    दीर्घ विकाराने तर वारली नाही.
  • 10:31 - 10:34
    तिचा मृत्यू क्षणिक होता,
  • 10:34 - 10:36
    तिला आणि आम्हाला तो त्रास
    सोसावा लागला नाही.
  • 10:36 - 10:40
    या सगळ्यात मदत करायला,
    आम्हाला मित्र, परिवाराकडून
  • 10:40 - 10:42
    खूप मोठा आधार होता.
  • 10:42 - 10:44
    आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे,
  • 10:44 - 10:46
    आमच्या जवळ आमचे २ मुलं होते,
  • 10:46 - 10:49
    ज्यांना आता आमची गरज होती,
    त्यांना शक्य तितक्या
  • 10:49 - 10:54
    सामान्य आयुष्याची गरज होती.
  • 10:56 - 10:59
    चांगल्या कडे
  • 10:59 - 11:01
    लक्ष वेधीत करता येणं,
  • 11:01 - 11:05
    ही विज्ञानानूसार एक प्रबळ पद्धत आहे.
  • 11:05 - 11:10
    तर २००५ मध्ये मार्टीन सेलिग्मन आणि
    त्याच्या सहकार्यांनी एक प्रयोग केला.
  • 11:10 - 11:14
    त्यांनी लोकांना एवढंच करायला सांगितलं,
  • 11:14 - 11:19
    लोकांना रोज त्यांच्या सोबत घडलेल्या तीन
    चांगल्या गोष्टींचा विचार करायला सांगितला.
  • 11:19 - 11:23
    ६ महिन्यांच्या निरीक्षणानंतर
    त्यांच्या हे लक्षात आलं कि
  • 11:23 - 11:26
    ते लोक कृतज्ञतेची उच्च पातळी दर्शावत होते,
  • 11:26 - 11:29
    आनंदाची उच्च पातळी
    आणि ६ महिन्यांच्या निरीक्षणात
  • 11:29 - 11:33
    कमी नैराश्य दर्शावले.
  • 11:33 - 11:35
    जेव्हा तुम्ही शोकातून जात असता,
  • 11:35 - 11:37
    कृतज्ञ वाटण्यासाठी,
    तुम्हाला
  • 11:37 - 11:40
    आठवणीची गरज असू शकते,
    तुम्हाला परवानगी लागू शकते.
  • 11:40 - 11:43
    आमच्या स्वयंपाकघरात
    एक लख्ख गुलाबी चित्र आहे
  • 11:43 - 11:46
    जे आम्हाला चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचीआ
    ठवण करून देते.
  • 11:46 - 11:48
    अमेरिकन सैन्यात,
  • 11:48 - 11:50
    याची रचना थोडी वेगळी होती.
    सैन्यामध्ये
  • 11:50 - 11:54
    चांगल्या गोष्टींचा शोधण्याबद्दल बोलायचे.
  • 11:54 - 11:56
    तुम्हाला जी भाषा मानवते ती शोधा,
  • 11:56 - 11:58
    पण जे काही कराल,
  • 11:58 - 12:02
    सतत तुमच्या जगातल्या,
  • 12:02 - 12:05
    चांगल्या गोष्टींशी जोडण्याचा
    सहेतुक प्रयत्न करा.
  • 12:06 - 12:07
    नंबर तीन,
  • 12:07 - 12:09
    संवेदनशील लोक विचार करतात,
  • 12:09 - 12:13
    "मी करतोय त्याने मला मदत होतेय कि हानी?"
  • 12:13 - 12:17
    हा प्रश्न चांगल्या उपचार पद्धतीत
    बरेचदा वापरल्या जातो.
  • 12:17 - 12:19
    काय प्रभावी प्रश्न आहे!
  • 12:19 - 12:23
    मुलींच्या निधनानंतर
  • 12:23 - 12:25
    मी स्वतःला सतत हा प्रश्न विचारायचे.
  • 12:25 - 12:28
    स्वतःला सतत विचारात राहायचे.
  • 12:28 - 12:32
    "मी खटल्याला जाऊन
    ड्राइवरला बघितला पाहिजे का?
  • 12:32 - 12:34
    त्याने मला मदत होईल कि हानी?"
  • 12:34 - 12:36
    तो निर्णय सोपा होता,
  • 12:36 - 12:39
    मी दूरच राहायचं ठरवलं.
  • 12:39 - 12:41
    पण माझा नवरा, ट्रेवरने
    ड्राइवरला
  • 12:41 - 12:42
    नंतर भेटायचं ठरवलं.
  • 12:42 - 12:48
    रात्री उशिरा मी ॲबीचे फोटो पाहून,
  • 12:48 - 12:50
    अस्वस्थ व्हायचे.
  • 12:50 - 12:52
    मी स्वतःला विचारायचे,
    "याने तुला
  • 12:52 - 12:55
    मदत होतेय कि हानी?
  • 12:55 - 12:57
    फोटो ठेवून दे,
  • 12:57 - 12:58
    झोपून जा,
  • 12:58 - 13:00
    स्वतःवर दया कर. "
  • 13:01 - 13:05
    हा प्रश्न खूप ठिकाणी लागू होऊ शकतो.
  • 13:05 - 13:09
    मी जसा वागतो आणि विचार करतो,
    त्याने मला मदत होते कि हानी,
  • 13:09 - 13:12
    तुमच्या पदोन्नतीच्या मागणीत,
  • 13:12 - 13:14
    परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी,
  • 13:14 - 13:16
    हृदयविकारातून बरं होण्यासाठी?
  • 13:16 - 13:19
    कितीतरी प्रकार आहेत.
  • 13:19 - 13:21
    मी संवेदनशीलते बद्दल बरेचदा लिहिते,
  • 13:21 - 13:24
    एवढ्या वर्षांत, या एका पद्धतीला,
  • 13:24 - 13:28
    बाकी सगळ्यांपेक्षा जास्त सकारात्मक
    प्रतिसाद मिळाला आहे.
  • 13:28 - 13:30
    मला सगळीकडून लोकांचे पत्र आणि ई-मेल आले,
  • 13:30 - 13:32
    हे सांगत कि,
    याचा त्यांच्या जीवनावर
  • 13:32 - 13:34
    किती मोठा प्रभाव पडला आहे.
  • 13:34 - 13:41
    ते जुने पारिवारिक भांडणं असो,
  • 13:41 - 13:42
    नाताळातले वाद असो,
  • 13:42 - 13:46
    किंवा फक्त सोशल मेडियातलं ट्रोलिंग असो,
  • 13:46 - 13:48
    अजून एक वाईनच्या ग्लास ची खरंच गरज आहे का
  • 13:48 - 13:51
    असं स्वतःला विचारताना असो.
  • 13:52 - 13:57
    जे तुम्ही करताय, जसा तुम्ही विचार करताय,
  • 13:57 - 13:59
    जसं तुम्ही वागताय,
    त्याने तुम्हाला मदत होतेय कि हानी
  • 13:59 - 14:00
    असा विचार करणं,
  • 14:00 - 14:04
    तुम्हाला तुमच्या निर्णयांवर
  • 14:04 - 14:09
    नियंत्रण देतं.
  • 14:10 - 14:12
    तीन पद्धती.
  • 14:12 - 14:13
    बऱ्यापैकी सोप्या.
  • 14:15 - 14:17
    आपल्या सर्वांसाठी कुठेही,
  • 14:17 - 14:20
    कधीही उपलब्ध आहेत.
  • 14:20 - 14:23
    त्याला कुठल्या कठीण विज्ञानाची गरज नाही.
  • 14:23 - 14:26
    संवेदनशीतला कुठला निश्चित गुण नाही.
  • 14:26 - 14:28
    तो निसटून जात नाही,
    काही लोकांकडे आहे,
  • 14:28 - 14:31
    काहींकडे नाही, असे नाही.
  • 14:32 - 14:36
    त्याला खरंतर खूप साधारण प्रक्रियांची
    गरज असते.
  • 14:36 - 14:40
    फक्त ते करून पाहण्याची तयारी पाहिजे.
  • 14:40 - 14:43
    आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे क्षण येतात,
  • 14:43 - 14:45
    जेव्हा आयुष्याच्या वाटा वेगळ्या होतात
  • 14:45 - 14:47
    आणि आपण ठरवलेली वाट सोडून,
  • 14:47 - 14:52
    आयुष्य कुठल्या तरी भयानक दिशेला जातं,
  • 14:52 - 14:53
    ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता आणि
  • 14:53 - 14:56
    जे आपल्याला कधीच नको होतं.
  • 14:56 - 14:57
    ते माझ्या सोबत घडलं.
  • 14:58 - 15:01
    ते अतिशय भयंकर होतं.
  • 15:01 - 15:06
    जर तुम्ही कधीही अश्या परिस्थितीत असाल
    जिथे तुम्हाला वाटेल,
  • 15:06 - 15:10
    "इथून परतणं शक्य नाही."
  • 15:10 - 15:13
    मी तुम्हाला विनंती करते,
    या तीन पद्धती शिका,
  • 15:13 - 15:15
    आणि पुन्हा विचार करा.
  • 15:17 - 15:19
    मी म्हणणार नाही कि
  • 15:19 - 15:21
    असा विचार करणे सोपे आहे.
  • 15:21 - 15:25
    याने सगळ्या वेदना दूर होत नाही.
  • 15:25 - 15:30
    पण मी या पाच वर्षात
    काही शिकली असेल तर ते हे आहे कि,
  • 15:30 - 15:33
    असा विचार केल्याने खरंच मदत होते.
  • 15:33 - 15:35
    सगळ्यात महत्वाचं म्हणजे,
  • 15:35 - 15:39
    याने मला दाखवून दिलं आहे कि,
  • 15:39 - 15:43
    एकाच वेळी जगणं आणि शोकात असणं, शक्य आहे.
  • 15:43 - 15:48
    आणि त्यासाठी मी नेहमी आभारी राहील.
  • 15:48 - 15:49
    धन्यवाद.
  • 15:49 - 15:51
    (टाळ्या)
Title:
संवेदनशील लोकांचे ३ रहस्य
Speaker:
लुसि होन
Description:

सगळे कधी ना कधी कोणालातरी गमावतात, पण त्या नंतरच्या कठीण काळात तुम्ही स्वतःला कसे सांभाळू शकता? संवेदनशीलता संशोधक लुसि होन, विपत्तीशी झुंजण्यासाठी आणि जे होईल त्याला धैर्याने सामोरी जाण्यासाठी,कठीण प्रसंगांतून शिकलेल्या तीन पद्धतींबद्दल सांगतात.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
16:05

Marathi subtitles

Revisions