Return to Video

माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: प्रस्तावना

  • 0:00 - 0:05
    माझं नाव येन बर्गेनस्टेन, पण मला जेब म्हणतात. मी mojang.com मध्ये
  • 0:05 - 0:13
    माईनक्राफ्टचा लीड डेव्हलपर आहे. 11 किंवा 12 व्या
    वर्षी मी प्रोग्रॅमिंगला सुरुवात केली
  • 0:13 - 0:18
    कारण मला गेम्स तयार करायचे होते. माझ्या
    वडीलांच्या एक मित्राने मला सांगितले की
  • 0:18 - 0:26
    गेम्स तयार करण्यासाठी तुला प्रोग्रॅमिंग शिकायला
    लागेल. अशाप्रकारे मी सुरुवात केली. मला डीझाइनिंग
    आवडते आणि गोष्टींचे
  • 0:26 - 0:33
    आर्किटेक्चर शोधायला आवडते. मला माईनक्राफ्टमधली ही गोष्ट खूप आवडते.
  • 0:33 - 0:39
    पुढच्या तासाभरात तुम्ही माईनक्राफ्ट वर्ल्डच्या सिम्युलेटेड तुकड्यादवारे अलेक्स किंवा स्टीव्हचे प्रोग्रॅमिंग करून
  • 0:39 - 0:46
    कॉम्प्युटर सायन्समधल्या मूलभूत गोष्टी शिकणार आहात. पारंपरिक प्रोग्रॅमिंगमध्ये टेक्स्ट असते,
  • 0:46 - 0:51
    पण आज आपण ब्लॉकली ही प्रणाली वापरणार आहोत: ही प्रणाली ब्लॉक्स वापरते,
  • 0:51 - 0:58
    ते ओढून आणि सोडून तुम्ही प्रोग्रॅम लिहू शकता. यात तुम्ही खरंतर जावास्क्रिप्ट कोड लिहीत असता.
  • 0:58 - 1:03
    तुम्ही शिकणार असलेल्या संकल्पना कॉम्प्युटर प्रोग्रॅमर्स रोज वापरत असतात. त्या कॉम्प्युटर सायन्सचा
    पाया आहेत.
  • 1:03 - 1:10
    मोजांगमध्ये आम्ही माईनक्राफ्ट चालवण्यासाठी याच संकल्पना वापरतो. तुम्ही सुरू
  • 1:10 - 1:15
    करण्यापूर्वी, तुमचे कॅरॅक्टर निवडा. मी अलेक्स निवडणार आहे. तिला स्क्रीनभर फिरायला मदत करण्यासाठी
  • 1:15 - 1:23
    आपण कोड लिहूया.
  • 1:23 - 1:29
    तुमच्या स्क्रीनचे तीन मुख्य भाग आहेत. डावीकडे माईनक्राफ्ट प्ले स्पेस, तिथे तुमचा प्रोग्रॅम रन होईल. प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना
  • 1:29 - 1:35
    खाली आहेत. हा मधला भाग टूलबॉक्स आहे आणि यातला प्रत्येक ब्लॉक
  • 1:35 - 1:41
    म्हणजे एक कमांड आहे, ती अलेक्सच्या कृतीसाठी सूचना देते. उजवीकडच्या पांढऱ्या जागेला
  • 1:41 - 1:47
    वर्क स्पेस म्हणतात. इथे आपण आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत. जर आपण moveForward(); ब्लॉक
  • 1:47 - 1:53
    वर्कस्पेसमध्ये ओढला आणि रनवर क्लिक केले, तर काय होते? अलेक्स ग्रीडवर एक स्पेस पुढे जाते
  • 1:53 - 2:00
    आणि ती एक स्पेस पुढे गेल्यावर आपल्याला काहीतरी करायचे असेल तर? आपण
  • 2:00 - 2:05
    आपल्या प्रोग्रॅममध्ये अजून एक ब्लॉक जोडू शकतो. मी turnRight(); ब्लॉक निवडणार आहे,
  • 2:05 - 2:11
    आणि केशरी रेष दिसेपर्यंत मी तो moveForward(); ब्लॉकच्या खाली ओढणार आहे.
  • 2:11 - 2:17
    नंतर मी तो सोडणार आहे, मग दोन्ही ब्लॉक जोडले जातील.
  • 2:17 - 2:23
    आपण पुन्हा रन बटण दाबले की, अलेक्स आपल्या वर्कस्पेसमधल्या वरपासून ते खालपर्यंतच्या कमांड्सनुसार कृती करेल.
  • 2:23 - 2:29
    आणि जर ब्लॉक डीलीट करायचा असेल, तर तुम्ही तो स्टॅकमधून ओढून परत टूलबॉक्समध्ये आणू शकता.
  • 2:29 - 2:34
    तुमचे बदल पूर्ववत करण्यासाठी आणि सुरुवातीच्या पातळीला मागे जाण्यासाठी वर्कस्पेसच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातले
  • 2:34 - 2:41
    स्टार्ट ओव्हर बटण वापरा. आणि अजून एक, तुम्हाला टर्न ब्लॉक्सवरचा छोटा त्रिकोण दिसतो का?
  • 2:41 - 2:47
    तुम्हाला हे त्रिकोण दिसतील तेव्हा, त्याचा अर्थ तुम्ही वेगवेगळे पर्याय निवडू शकता.
  • 2:47 - 2:49
    चला, कोडींग सुरू करूया!
Title:
माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: प्रस्तावना
Description:

http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
02:51

Marathi subtitles

Revisions Compare revisions