Return to Video

इंटरनेट: पॅकेट्स, राऊटिंग आणि विश्वसनीयता

 • 0:00 - 0:08
  [गाण्यातून काऊंट डाऊन: 7, 6, 5, 4, 3, 2, 1]
  इंटरनेट: पॅकेट्स, राऊटिंग, आणि विश्वसनीयता
 • 0:08 - 0:14
  हाय, माझं नाव आहे लिन. मी स्पॉटीफायमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि मी हे मान्य करणारी
 • 0:14 - 0:19
  पहिली व्यक्ती असेन की मी बऱ्याचवेळा इंटरनेटची विश्वसनीयता गृहीत धरते. इंटरनेटवरून प्रसारित
 • 0:19 - 0:23
  होणाऱ्या माहितीचं प्रमाण प्रचंड आहे. पण डेटाचा प्रत्येक भाग आपल्यापर्यंत विश्वासनीयरित्या पोचवणं
 • 0:23 - 0:29
  कसं शक्य होतं? समजा तुम्हाला स्पॉटीफायवरून
  एक गाणं लावायचं आहे. असं वाटतं की
 • 0:29 - 0:34
  तुमचा कॉम्प्युटर थेट स्पॉटीफायशी जोडला जातो आणि
  स्पॉटीफाय तुम्हाला थेट, समर्पित लाईनवरून
 • 0:34 - 0:39
  गाणं पाठवतं. पण वास्तविक, इंटरनेट अशाप्रकारे
  काम करत नाही. जर इंटरनेट थेट,
 • 0:39 - 0:44
  समर्पित कनेक्शन्सचं बनलेलं असेल तर ते सुरू ठेवणं अवघड आहे कारण लक्षावधी युजर्स जोडलेले असतात.
 • 0:44 - 0:48
  आणि, विशेषत: प्रत्येक वायर आणि कॉम्प्युटर सगळा वेळ काम करत असतीलच,
 • 0:48 - 0:53
  याची खात्री नाही. त्याऐवजी डेटा इंटरनेटवरून बऱ्याच
  कमी थेट पद्धतीनं प्रवास करतो.
 • 0:53 - 1:01
  खूप खूप वर्षांपूर्वी, 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला माझा पार्टनर बॉब कान आणि मी एका डिझाईनवर
 • 1:01 - 1:07
  काम करायला सुरुवात केली, ज्याला आपण आज
  इंटरनेट म्हणतो. बॉब आणि मला इंटरनेटचे
 • 1:07 - 1:15
  प्रोटोकॉल्स आणि आर्किटेक्चर डिझाईन करण्याची
  जबाबदारी आणि संधी मिळाली. तर आम्ही इंटरनेटच्या
 • 1:15 - 1:20
  वाढीमध्ये आणि उत्क्रांतीमध्ये या सगळ्या काळापासून ते थेट आत्तापर्यंत सहभागी होणे सुरू ठेवले.
 • 1:20 - 1:26
  माहिती एका कॉम्प्युटरपासून दुसऱ्या कॉम्प्युटरपर्यंत
  कशाप्रकारे प्रवास करते, हे फार रंजक आहे.
 • 1:26 - 1:31
  ती नेहमी एका ठराविक मार्गाने जात नाही, प्रत्यक्षात,
  एका कॉम्प्युटरचा दुसऱ्या कॉम्प्युटरशी संवाद सुरू
 • 1:31 - 1:36
  असताना तुमचा मार्ग बदलू शकतो. इंटरनेटवरची माहिती एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्या कॉम्प्युटरवर
 • 1:36 - 1:42
  माहितीच्या पॅकेटच्या स्वरूपात जाते. आणि आपण गाडीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जसे जातो,
 • 1:42 - 1:46
  बऱ्याचशा तशाच पद्धतीने पॅकेट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते.
 • 1:46 - 1:51
  प्रत्येक वेळी प्रवास करून त्याच ठिकाणी जाताना वाहतुकीची कोंडी किंवा रस्त्यांच्या स्थितीनुसार,
 • 1:51 - 1:59
  तुम्ही दुसरा रस्ता निवडता किंवा तसं करणं तुम्हाला
  भाग पडतं. आणि
 • 1:59 - 2:04
  तुम्ही गाडीतून सगळ्या प्रकारचं सामान नेऊ शकता त्याचप्रमाणे, विविध प्रकारची डिजिटल माहिती
 • 2:04 - 2:10
  आयपी पॅकेट्सबरोबर पाठवली जाऊ शकते, पण याला काही मर्यादा आहेत. उदा. जर तुम्हाला एखादं
 • 2:10 - 2:14
  अवकाशयान जिथं तयार झालं आहे तिथून प्रक्षेपणाच्या ठिकाणी न्यायचं असलं तर? अवकाशयान
 • 2:14 - 2:19
  एका ट्रकमध्ये मावणार नाही, त्यामुळे त्याचे तुकडे करावे लागतील, आणि ट्रकच्या काफिल्यामधून त्यांची
 • 2:19 - 2:23
  वाहतूक करावी लागेल. ते वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकतात आणि इच्छित ठिकाणी वेगवेगळ्या वेळी
 • 2:23 - 2:28
  पोचू शकतात. पण एकदा सगळे भाग पोचले की ते जोडून तुम्हाला अवकाशयान पुन्हा जोडता येतं आणि
 • 2:28 - 2:34
  ते उड्डाणासाठी सज्ज होतं. इंटरनेटवरसुद्धा अशाचप्रकारे काम होतं, जर
 • 2:34 - 2:40
  तुमची इमेज फार मोठी असेल आणि तुम्हाला ती मित्राला पाठवायची असेल किंवा वेबसाईटवर अपलोड
 • 2:40 - 2:45
  करायची असेल, तर ती इमेज कोट्यावधी अशा 1 आणि 0 च्या बीट्सपासून बनलेली असेल, एका पॅकेटमध्ये
 • 2:45 - 2:50
  पाठवण्यासाठी खूप जास्त. हा कॉम्प्युटरवरचा डेटा असल्यानं , पाठवणारा कॉम्प्युटर याचं लगेचच शेकडो
 • 2:50 - 2:56
  किंवा अगदी हजारो छोट्या भागात, पॅकेट्समध्ये
  विभाजन करू शकतो. कार्स किंवा ट्रकप्रमाणं
 • 2:56 - 3:00
  या पॅकेट्सना ड्रायव्हर्स नसतात आणि ती आपला मार्ग निवडत नाहीत. प्रत्येक
 • 3:00 - 3:05
  पॅकेटला इंटरनेट अॅड्रेस असतो, तो जिथून आला आहे आणि जिथे जाणार आहे त्याचा. इंटरनेटवरील खास
 • 3:05 - 3:09
  कॉम्प्युटर्स म्हणजे राऊटर्स वाहतूक नियंत्रकांप्रमाणं काम करतात आणि या पॅकेट्सची वाहतूक नेटवर्कमधून
 • 3:09 - 3:15
  सुरळीत चालू ठेवतात. जर एका मार्गावर गर्दी असेल तर,
  प्रत्येक पॅकेट इंटरनेटवर वेगवेगळ्या मार्गानं प्रवास
 • 3:15 - 3:20
  करू शकतं आणि ती पुन्हा इच्छित ठिकाणी थोड्याशा वेगवेगळ्या वेळी पोचू शकतात किंवा अगदी बिघडूसुद्धा
 • 3:20 - 3:27
  शकतात. हे कसं काम करतं ते बघूया. इंटरनेट प्रोटोकॉलचा भाग म्हणून,
 • 3:27 - 3:31
  प्रत्येक राऊटर पॅकेट्स पाठवायच्या विविध मार्गांवर लक्ष ठेवतं, आणि डेटाच्या प्रत्येक भागासाठी पॅकेट
 • 3:31 - 3:37
  पाठवायच्या आयपी अॅड्रेसनुसार त्यातील सर्वांत स्वस्त उपलब्ध मार्ग निवडतं.
 • 3:37 - 3:42
  या संदर्भात सर्वांत स्वस्त म्हणजे किमतीच्या दृष्टीनं नाही तर वेळ आणि इतर अ-तांत्रिक घटक म्हणजे
 • 3:42 - 3:47
  राजकारण आणि कंपन्यांमधील नातं वगैरेच्या दृष्टीनं.
  बऱ्याचदा डेटाच्या प्रवासाचा सर्वोत्तम मार्ग सर्वांत थेट
 • 3:47 - 3:53
  असेलच असं नाही. मार्गांसाठी पर्याय असणं हे नेटवर्कला
  दोषांसाठी सहनशील बनवतं. म्हणजेच जरी काही मोठी
 • 3:53 - 3:58
  समस्या आली तरीही नेटवर्क पॅकेटस पाठवणं
  चालूच ठेवू शकतं.
 • 3:58 - 4:05
  हा इंटरनेटच्या महत्त्वाच्या तत्त्वाचा पाया आहे: विश्वसनीयता. आता, जर तुम्हाला
 • 4:05 - 4:09
  काही डेटा हवा असेल आणि सगळं पाठवलं गेलं नसेल तर काय? समजा, तुम्हाला एखादं गाणं ऐकायचं आहे.
 • 4:09 - 4:15
  तुम्हाला 100% खात्री कशी होईल की सगळा डेटा आला आहे, आणि गाणं व्यवस्थित लागणार आहे?
 • 4:15 - 4:21
  ओळख करून देत आहे, तुमच्या नव्या सगळ्यात चांगल्या मित्राची, टीसीपी (ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल). टीसीपी तुमचा सर्व डेटा पॅकेट्स
 • 4:21 - 4:27
  म्हणून पाठवण्याच्या आणि स्वीकारण्याच्या कामाचं नियंत्रण करतो. एखादी विश्वासार्ह पोस्टाची सेवा
 • 4:27 - 4:32
  असल्याप्रमाणं आहे तो. जेव्हा तुम्ही तुमच्या डिव्हाईसवर गाणं पाठवण्याची विनंती करता, तेव्हा
 • 4:32 - 4:37
  स्पॉटीफाय गाण्याचं अनेक पॅकेट्समध्ये विभाजन
  करतं. पॅकेट्स आली की टीसीपी ती तपासून आलेल्या
 • 4:37 - 4:43
  प्रत्येक पॅकेटसाठी पोचपावती पाठवतो. सगळी पॅकेट्स आली तर टीसीपी तुमच्या डीलीव्हरीसाठी स्वाक्षरी करतो
 • 4:43 - 4:55
  आणि तुमचं काम होतं (गाणं ऐकू येतं), जर काही पॅकेट्स गहाळ झाल्याचं टीसीपीला कळलं तर तो
 • 4:55 - 5:00
  स्वाक्षरी करत नाही, नाहीतर गाणं तितकं चांगलं ऐकू येणार नाही किंवा त्याचा काही भाग गहाळ असेल.
 • 5:00 - 5:06
  प्रत्येक गहाळ किंवा अपूर्ण पॅकेट स्पॉटीफाय पुन्हा पाठवतं. टीसीपीनं त्या गाण्यासाठीची सगळी
 • 5:06 - 5:13
  पॅकेट्स आल्याची पुष्टी केल्यावर तुमचं गाणं लागेल. टीसीपी आणि राऊटर सिस्टीमची महत्त्वाची गोष्ट
 • 5:13 - 5:19
  काय आहे? ते स्केलेबल आहेत. ते 8 किंवा 800 कोटी
  डिव्हायसेसबरोबर काम करू शकतात. खरंतर,
 • 5:19 - 5:23
  दोष सहनशीलता आणि अतिरिक्तता, या तत्त्वांमुळं, आपण जितके जास्त राऊटर्स जोडतो, तितकं इंटरनेट
 • 5:23 - 5:28
  जास्त विश्वसनीय होतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इंटरनेट आणि त्याचं प्रमाण वाढवू
 • 5:28 - 5:34
  शकतो, कोणीही वापरत असलेल्या सेवांमध्ये व्यत्यय न आणता. इंटरनेट प्रत्यक्ष जोडलेली शेकडो नेटवर्क्स आणि
 • 5:34 - 5:39
  कोट्यावधी कॉम्प्युटर्स आणि डिव्हायसेस यापासून बनलेलं आहे, इंटरनेट बनवणाऱ्या या वेगवेगळया
 • 5:39 - 5:44
  प्रणाली एकमेकांशी जोडल्या जातात, संवाद साधतात, आणि एकत्र काम करतात ते
 • 5:44 - 5:51
  डेटा इंटरनेटवर कसा पाठवला जाईल याबद्दलच्या मान्य केलेल्या स्टँडर्ड्समुळं.
 • 5:51 - 5:56
  इंटरनेटवरची कॉम्प्युटिंग डिव्हायसेस, किंवा राऊटर्स
  सर्व पॅकेटना त्यांच्या इच्छित स्थळी पोचण्यासाठी
 • 5:56 - 6:03
  मदत करतात, जिथं ती पुन्हा एकत्र केली जातात, आवश्यक असेल तर क्रमाने लावली जातात. हे
 • 6:03 - 6:09
  एका दिवसात कोट्यावधीवेळा होतं, तुम्ही आणि इतर लोक मेल पाठवत असतील, वेब पेज पहात असतील,
 • 6:09 - 6:14
  किंवा व्हिडीओ चॅट करत असतील, मोबाईल अॅप वापरत असतील किंवा जर इंटरनेटवरची सेन्सर्स किंवा
 • 6:14 - 6:21
  डीव्हायसेस एकमेकांशी बोलत असतील तेव्हा.
Title:
इंटरनेट: पॅकेट्स, राऊटिंग आणि विश्वसनीयता
Description:

स्पॉटीफाय इंजिनिअर लिन रूट आणि इंटरनेटचे जनक, विंट सर्फ, इंटरनेट कशामुळे चालू रहातं आणि माहिती पॅकेटसमध्ये कशी विभाजित होते, हे समजावून सांगत आहेत.
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.

आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg

more » « less
Video Language:
English
Duration:
06:26

Marathi subtitles

Revisions Compare revisions