गेवर टली देताहेत आयुष्याचे धडे उचापती आणि खुडबुडी करण्यातून!
-
0:00 - 0:04हा तो नेमका क्षण आहे,
-
0:04 - 0:09ज्या क्षणापासून मी खुडबुडशाळेची सुरुवात केली.
-
0:09 - 0:13ही अशी जागा आहे जिथं मुलं निर्धास्तपणे काठ्या,
-
0:13 - 0:17हातोड्या आणि इतर धोकादायक गोष्टी हाताळू शकतात,
-
0:17 - 0:19आमच्या विश्वासासकट.
-
0:19 - 0:21विश्वास हा, की मुलं स्वत:ला इजा करून घेणार नाहीत
-
0:21 - 0:25आणि हासुद्धा, की ती इतरांना दुखापत करणार नाहीत.
-
0:25 - 0:28शाळेत एक ठरावीक अभ्यासक्रम पाळला जात नाही.
-
0:28 - 0:30आणि इथे परीक्षा नसतात!
-
0:30 - 0:34आम्ही कुणालाही कुठलीही ठरावीक गोष्ट शिकवायचा प्रयत्न करत नाही.
-
0:34 - 0:37जेव्हा मुलं इथे येतात, तेव्हा
-
0:37 - 0:39त्यांचा अनेक गोष्टींशी सामना होतो.
-
0:39 - 0:43लाकूड, खिळे, दोरखंड आणि चाकं,
-
0:43 - 0:48आणि खूप सारी अवजारं. खरी खुरी अवजारं!
-
0:48 - 0:53मुलांसाठी हा एक सहा दिवसांचा गुंगवून टाकणारा अनुभव असतो.
-
0:53 - 0:57आणि त्या अनुषंगाने, आपण मुलांना मोकळा वेळ देऊ शकतो.
-
0:57 - 1:00जो त्यांच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनात
-
1:00 - 1:03दुर्मिळ होऊन गेला आहे.
-
1:03 - 1:06आमचं उद्दिष्ट हेच आहे की मुलं इथून जाताना
-
1:06 - 1:08त्यांच्या निर्मितीक्षमतेत वाढ झालेली असावी,
-
1:08 - 1:11वस्तू कशा बनवायच्या याचा बर्यापैकी अंदाज त्यांना यावा
-
1:11 - 1:14आणि या गोष्टीची खोलवर जाणीव त्यांना व्हावी, की
-
1:14 - 1:18आपण वस्तूंना हाताळून, त्यांच्याशी खेळून त्या कशा चालतात हे शिकू शकतो.
-
1:18 - 1:23कुठलीही गोष्ट ठरवल्याप्रमाणे घडत नाही.. कधीच नाही!
-
1:23 - 1:25हशा
-
1:25 - 1:27आणि मुलांच्या लवकरच लक्षात येतं की
-
1:27 - 1:31सगळेच प्रकल्प भरकटतात --
-
1:31 - 1:32हशा
-
1:32 - 1:34आणि ती या कल्पनेला सरावतात की,
-
1:34 - 1:37प्रकल्पातलं प्रत्येक पाऊल हे आपल्याला
-
1:37 - 1:40यशाच्या किंवा गंमतीशीर अपयशाच्या
-
1:40 - 1:44जवळ नेत असतं.
-
1:44 - 1:48आम्ही कागदांवर रेघोट्या मारत आणि चित्रं खरडत सुरवात करतो
-
1:48 - 1:51आणि कधी कधी खर्याखुर्या योजना सुद्धा बनवतो.
-
1:51 - 1:55कधी कधी आम्ही थेट वस्तू बनवायला सुरुवात करतो.
-
1:55 - 1:58या अनुभवाच्या गाभ्यात बांधकाम आहे, संरचना आहे.
-
1:58 - 2:01स्वत:च्या हातांनी काम करत आणि समस्येशी पूर्ण इमान राखीत
-
2:01 - 2:05ही मुलं कामात खोल बुडून जातात.
-
2:05 - 2:08रॉबिन आणि मी, सहकारी म्हणून काम करीत
-
2:08 - 2:10प्रकल्पांचा रोख
-
2:10 - 2:13पूर्णत्वाकडे वळवतो.
-
2:13 - 2:16यश हे कृतीत आहे
-
2:16 - 2:19आणि अपयशं साजरी करता करता त्यांची तपासणीही केली जाते.
-
2:19 - 2:22समस्या बनतात कोडी
-
2:22 - 2:26आणि अडथळे गायब होतात.
-
2:26 - 2:28खूपच अवघड अडथळ्यांचा किंवा
-
2:28 - 2:30किचकट गोष्टींचा सामना झाल्यावर
-
2:30 - 2:35एक खूपच चित्तवेधक वागणूक सामोरी येते : सजावट.
-
2:35 - 2:38हशा
-
2:38 - 2:40अर्धवट प्रकल्पांची सजावट ही
-
2:40 - 2:44एक प्रकारे संकल्पनांची निर्मिती आहे.
-
2:44 - 2:47अशा मध्यंतरांतूनच उदय होतो,
-
2:47 - 2:50खोल जाणिवांचा आणि समस्या-समाधानाच्या नव्या मार्गांचा -
-
2:50 - 2:55ज्या समस्यांनी त्यांना काही क्षणांपूर्वी त्रस्त करून सोडलं होतं.
-
2:55 - 3:00सगळ्या वस्तू वापरासाठी उपलब्ध आहेत.
-
3:00 - 3:06अगदी त्या कंटाळवाण्या, चिडीला आणणार्या प्लॅस्टिकच्या भाजीच्या पिशव्यांचा सुद्धा
-
3:06 - 3:08अकल्पनीय असा
-
3:08 - 3:12दणकट पूल तयार होतो.
-
3:12 - 3:15आणि ज्या गोष्टी ते बनवतात
-
3:15 - 3:18त्या त्यांना स्वत:लाही अचंबित करतात.
-
3:18 - 3:22तीन, दोन, एक, चला!
-
3:29 - 3:33गेवर टली: सात वर्षाच्या मुलांनी बनवलेला रोलरकोस्टर.
-
3:33 - 3:36हुर्रे!
-
3:36 - 3:38टाळ्या.
-
3:38 - 3:41गेवर टली: धन्यवाद. मला खूप मजा आली इथे.
-
3:41 - 3:47टाळ्या
- Title:
- गेवर टली देताहेत आयुष्याचे धडे उचापती आणि खुडबुडी करण्यातून!
- Speaker:
- Gever Tulley
- Description:
-
गेवर टली आकर्षक चित्रं आणि छायाचित्रणांमधून आपल्याला दाखवतायत की त्यांच्या शाळेमध्ये मुलं मौल्यवान शिक्षण कसं मिळवतात. हत्यारं , कच्चा माल आणि मार्गदर्शन मिळाल्यावर या मुलांच्या कल्पनाशक्ती भरार्या घेतात आणि सर्जनशीलपणे प्रश्न सोडवायच्या तंत्रानं अनोख्या बोटी, सेतू आणि चक्क रोलर कोस्टर सुद्धा निर्माण करतात.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 03:48