Return to Video

गेवर टली देताहेत आयुष्याचे धडे उचापती आणि खुडबुडी करण्यातून!

  • 0:00 - 0:04
    हा तो नेमका क्षण आहे,
  • 0:04 - 0:09
    ज्या क्षणापासून मी खुडबुडशाळेची सुरुवात केली.
  • 0:09 - 0:13
    ही अशी जागा आहे जिथं मुलं निर्धास्तपणे काठ्या,
  • 0:13 - 0:17
    हातोड्या आणि इतर धोकादायक गोष्टी हाताळू शकतात,
  • 0:17 - 0:19
    आमच्या विश्वासासकट.
  • 0:19 - 0:21
    विश्वास हा, की मुलं स्वत:ला इजा करून घेणार नाहीत
  • 0:21 - 0:25
    आणि हासुद्धा, की ती इतरांना दुखापत करणार नाहीत.
  • 0:25 - 0:28
    शाळेत एक ठरावीक अभ्यासक्रम पाळला जात नाही.
  • 0:28 - 0:30
    आणि इथे परीक्षा नसतात!
  • 0:30 - 0:34
    आम्ही कुणालाही कुठलीही ठरावीक गोष्ट शिकवायचा प्रयत्न करत नाही.
  • 0:34 - 0:37
    जेव्हा मुलं इथे येतात, तेव्हा
  • 0:37 - 0:39
    त्यांचा अनेक गोष्टींशी सामना होतो.
  • 0:39 - 0:43
    लाकूड, खिळे, दोरखंड आणि चाकं,
  • 0:43 - 0:48
    आणि खूप सारी अवजारं. खरी खुरी अवजारं!
  • 0:48 - 0:53
    मुलांसाठी हा एक सहा दिवसांचा गुंगवून टाकणारा अनुभव असतो.
  • 0:53 - 0:57
    आणि त्या अनुषंगाने, आपण मुलांना मोकळा वेळ देऊ शकतो.
  • 0:57 - 1:00
    जो त्यांच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनात
  • 1:00 - 1:03
    दुर्मिळ होऊन गेला आहे.
  • 1:03 - 1:06
    आमचं उद्दिष्ट हेच आहे की मुलं इथून जाताना
  • 1:06 - 1:08
    त्यांच्या निर्मितीक्षमतेत वाढ झालेली असावी,
  • 1:08 - 1:11
    वस्तू कशा बनवायच्या याचा बर्यापैकी अंदाज त्यांना यावा
  • 1:11 - 1:14
    आणि या गोष्टीची खोलवर जाणीव त्यांना व्हावी, की
  • 1:14 - 1:18
    आपण वस्तूंना हाताळून, त्यांच्याशी खेळून त्या कशा चालतात हे शिकू शकतो.
  • 1:18 - 1:23
    कुठलीही गोष्ट ठरवल्याप्रमाणे घडत नाही.. कधीच नाही!
  • 1:23 - 1:25
    हशा
  • 1:25 - 1:27
    आणि मुलांच्या लवकरच लक्षात येतं की
  • 1:27 - 1:31
    सगळेच प्रकल्प भरकटतात --
  • 1:31 - 1:32
    हशा
  • 1:32 - 1:34
    आणि ती या कल्पनेला सरावतात की,
  • 1:34 - 1:37
    प्रकल्पातलं प्रत्येक पाऊल हे आपल्याला
  • 1:37 - 1:40
    यशाच्या किंवा गंमतीशीर अपयशाच्या
  • 1:40 - 1:44
    जवळ नेत असतं.
  • 1:44 - 1:48
    आम्ही कागदांवर रेघोट्या मारत आणि चित्रं खरडत सुरवात करतो
  • 1:48 - 1:51
    आणि कधी कधी खर्याखुर्या योजना सुद्धा बनवतो.
  • 1:51 - 1:55
    कधी कधी आम्ही थेट वस्तू बनवायला सुरुवात करतो.
  • 1:55 - 1:58
    या अनुभवाच्या गाभ्यात बांधकाम आहे, संरचना आहे.
  • 1:58 - 2:01
    स्वत:च्या हातांनी काम करत आणि समस्येशी पूर्ण इमान राखीत
  • 2:01 - 2:05
    ही मुलं कामात खोल बुडून जातात.
  • 2:05 - 2:08
    रॉबिन आणि मी, सहकारी म्हणून काम करीत
  • 2:08 - 2:10
    प्रकल्पांचा रोख
  • 2:10 - 2:13
    पूर्णत्वाकडे वळवतो.
  • 2:13 - 2:16
    यश हे कृतीत आहे
  • 2:16 - 2:19
    आणि अपयशं साजरी करता करता त्यांची तपासणीही केली जाते.
  • 2:19 - 2:22
    समस्या बनतात कोडी
  • 2:22 - 2:26
    आणि अडथळे गायब होतात.
  • 2:26 - 2:28
    खूपच अवघड अडथळ्यांचा किंवा
  • 2:28 - 2:30
    किचकट गोष्टींचा सामना झाल्यावर
  • 2:30 - 2:35
    एक खूपच चित्तवेधक वागणूक सामोरी येते : सजावट.
  • 2:35 - 2:38
    हशा
  • 2:38 - 2:40
    अर्धवट प्रकल्पांची सजावट ही
  • 2:40 - 2:44
    एक प्रकारे संकल्पनांची निर्मिती आहे.
  • 2:44 - 2:47
    अशा मध्यंतरांतूनच उदय होतो,
  • 2:47 - 2:50
    खोल जाणिवांचा आणि समस्या-समाधानाच्या नव्या मार्गांचा -
  • 2:50 - 2:55
    ज्या समस्यांनी त्यांना काही क्षणांपूर्वी त्रस्त करून सोडलं होतं.
  • 2:55 - 3:00
    सगळ्या वस्तू वापरासाठी उपलब्ध आहेत.
  • 3:00 - 3:06
    अगदी त्या कंटाळवाण्या, चिडीला आणणार्या प्लॅस्टिकच्या भाजीच्या पिशव्यांचा सुद्धा
  • 3:06 - 3:08
    अकल्पनीय असा
  • 3:08 - 3:12
    दणकट पूल तयार होतो.
  • 3:12 - 3:15
    आणि ज्या गोष्टी ते बनवतात
  • 3:15 - 3:18
    त्या त्यांना स्वत:लाही अचंबित करतात.
  • 3:18 - 3:22
    तीन, दोन, एक, चला!
  • 3:29 - 3:33
    गेवर टली: सात वर्षाच्या मुलांनी बनवलेला रोलरकोस्टर.
  • 3:33 - 3:36
    हुर्रे!
  • 3:36 - 3:38
    टाळ्या.
  • 3:38 - 3:41
    गेवर टली: धन्यवाद. मला खूप मजा आली इथे.
  • 3:41 - 3:47
    टाळ्या
Title:
गेवर टली देताहेत आयुष्याचे धडे उचापती आणि खुडबुडी करण्यातून!
Speaker:
Gever Tulley
Description:

गेवर टली आकर्षक चित्रं आणि छायाचित्रणांमधून आपल्याला दाखवतायत की त्यांच्या शाळेमध्ये मुलं मौल्यवान शिक्षण कसं मिळवतात. हत्यारं , कच्चा माल आणि मार्गदर्शन मिळाल्यावर या मुलांच्या कल्पनाशक्ती भरार्‍या घेतात आणि सर्जनशीलपणे प्रश्न सोडवायच्या तंत्रानं अनोख्या बोटी, सेतू आणि चक्क रोलर कोस्टर सुद्धा निर्माण करतात.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
03:48
Rahul Deshmukh added a translation

Marathi subtitles

Revisions