Marathi subtitles

← गेवर टली देताहेत आयुष्याचे धडे उचापती आणि खुडबुडी करण्यातून!

Get Embed Code
42 Languages

Subtitles translated from English Showing Revision 1 created 09/10/2011 by Rahul Deshmukh.

 1. हा तो नेमका क्षण आहे,
 2. ज्या क्षणापासून मी खुडबुडशाळेची सुरुवात केली.
 3. ही अशी जागा आहे जिथं मुलं निर्धास्तपणे काठ्या,

 4. हातोड्या आणि इतर धोकादायक गोष्टी हाताळू शकतात,
 5. आमच्या विश्वासासकट.
 6. विश्वास हा, की मुलं स्वत:ला इजा करून घेणार नाहीत
 7. आणि हासुद्धा, की ती इतरांना दुखापत करणार नाहीत.
 8. शाळेत एक ठरावीक अभ्यासक्रम पाळला जात नाही.
 9. आणि इथे परीक्षा नसतात!
 10. आम्ही कुणालाही कुठलीही ठरावीक गोष्ट शिकवायचा प्रयत्न करत नाही.
 11. जेव्हा मुलं इथे येतात, तेव्हा

 12. त्यांचा अनेक गोष्टींशी सामना होतो.
 13. लाकूड, खिळे, दोरखंड आणि चाकं,
 14. आणि खूप सारी अवजारं. खरी खुरी अवजारं!
 15. मुलांसाठी हा एक सहा दिवसांचा गुंगवून टाकणारा अनुभव असतो.
 16. आणि त्या अनुषंगाने, आपण मुलांना मोकळा वेळ देऊ शकतो.
 17. जो त्यांच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनात
 18. दुर्मिळ होऊन गेला आहे.
 19. आमचं उद्दिष्ट हेच आहे की मुलं इथून जाताना
 20. त्यांच्या निर्मितीक्षमतेत वाढ झालेली असावी,
 21. वस्तू कशा बनवायच्या याचा बर्यापैकी अंदाज त्यांना यावा
 22. आणि या गोष्टीची खोलवर जाणीव त्यांना व्हावी, की
 23. आपण वस्तूंना हाताळून, त्यांच्याशी खेळून त्या कशा चालतात हे शिकू शकतो.
 24. कुठलीही गोष्ट ठरवल्याप्रमाणे घडत नाही.. कधीच नाही!

 25. हशा
 26. आणि मुलांच्या लवकरच लक्षात येतं की
 27. सगळेच प्रकल्प भरकटतात --
 28. हशा
 29. आणि ती या कल्पनेला सरावतात की,
 30. प्रकल्पातलं प्रत्येक पाऊल हे आपल्याला
 31. यशाच्या किंवा गंमतीशीर अपयशाच्या
 32. जवळ नेत असतं.
 33. आम्ही कागदांवर रेघोट्या मारत आणि चित्रं खरडत सुरवात करतो
 34. आणि कधी कधी खर्याखुर्या योजना सुद्धा बनवतो.
 35. कधी कधी आम्ही थेट वस्तू बनवायला सुरुवात करतो.
 36. या अनुभवाच्या गाभ्यात बांधकाम आहे, संरचना आहे.
 37. स्वत:च्या हातांनी काम करत आणि समस्येशी पूर्ण इमान राखीत
 38. ही मुलं कामात खोल बुडून जातात.
 39. रॉबिन आणि मी, सहकारी म्हणून काम करीत
 40. प्रकल्पांचा रोख
 41. पूर्णत्वाकडे वळवतो.
 42. यश हे कृतीत आहे
 43. आणि अपयशं साजरी करता करता त्यांची तपासणीही केली जाते.
 44. समस्या बनतात कोडी
 45. आणि अडथळे गायब होतात.
 46. खूपच अवघड अडथळ्यांचा किंवा

 47. किचकट गोष्टींचा सामना झाल्यावर
 48. एक खूपच चित्तवेधक वागणूक सामोरी येते : सजावट.
 49. हशा
 50. अर्धवट प्रकल्पांची सजावट ही
 51. एक प्रकारे संकल्पनांची निर्मिती आहे.
 52. अशा मध्यंतरांतूनच उदय होतो,
 53. खोल जाणिवांचा आणि समस्या-समाधानाच्या नव्या मार्गांचा -
 54. ज्या समस्यांनी त्यांना काही क्षणांपूर्वी त्रस्त करून सोडलं होतं.
 55. सगळ्या वस्तू वापरासाठी उपलब्ध आहेत.

 56. अगदी त्या कंटाळवाण्या, चिडीला आणणार्या प्लॅस्टिकच्या भाजीच्या पिशव्यांचा सुद्धा
 57. अकल्पनीय असा
 58. दणकट पूल तयार होतो.
 59. आणि ज्या गोष्टी ते बनवतात
 60. त्या त्यांना स्वत:लाही अचंबित करतात.
 61. तीन, दोन, एक, चला!

 62. गेवर टली: सात वर्षाच्या मुलांनी बनवलेला रोलरकोस्टर.

 63. हुर्रे!

 64. टाळ्या.
 65. गेवर टली: धन्यवाद. मला खूप मजा आली इथे.

 66. टाळ्या