Return to Video

निसर्गातील जाळे : समृद्ध जंगलात झाडे एकमेकांशी कसा संवाद साधतात - सुझेन सिमर्ड |TEDxSeattle

  • 0:13 - 0:15
    सॅलीश किनाऱ्यावरचे लोक म्हणतात
    "आम्हीच ती माणसे"
  • 0:15 - 0:17
    [....]
  • 0:17 - 0:19
    हजारो वर्षे ते तिथे राहिले
  • 0:20 - 0:22
    पण आपलं त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही
  • 0:22 - 0:24
    आपल्यापैकी बरेच जण हे विसरून गेलो आहोत की
  • 0:24 - 0:26
    आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत
  • 0:26 - 0:28
    वं निसर्गाशीही....
  • 0:28 - 0:30
    आपण एक आहोत
  • 0:30 - 0:34
    निसर्गाचे वेगळे अस्तित्व नसून
    तो खरेतर आपल्यातच सामावला आहे
  • 0:34 - 0:36
    आणि आपण ह्या पृथ्वीवर काय करतो?
  • 0:36 - 0:38
    आपल्या पर्यावरणात लहरी निर्माण करतो
  • 0:38 - 0:40
    आपल्यातल्या गुंतागुंतीमुळे
  • 0:40 - 0:43
    पण आता त्याचा प्रभाव नाकारता येत नाहीये
  • 0:43 - 0:45
    वातावरण बदल,
  • 0:45 - 0:47
    नामशेष होणारे जीव,
  • 0:47 - 0:49
    मानवी जीवांचे हाल
  • 0:49 - 0:51
    आपण विसरलो आहोत
  • 0:51 - 0:56
    पण माणसे मनातून जंगलांशी जोडली गेली आहेत
  • 0:56 - 0:59
    आणि नद्यांशी , समुद्रांशी,
    अस्वलांशी अन माशांशी
  • 0:59 - 1:02
    सालीश किनाऱ्यावरची माणसे दुर्लक्षित होती
  • 1:02 - 1:05
    खर तर हे सगळे विश्वासापाशी येऊन थांबतं
  • 1:05 - 1:08
    परस्परांवरच्या विश्वास आणि आदरापाशी
  • 1:08 - 1:11
    ज्यामुळे निसर्गातील गुंतागुंत
    निर्माण झाली आहे
  • 1:11 - 1:16
    पण आपण म्हणतो हे सगळे अवैज्ञानिक आहे
  • 1:16 - 1:19
    पाश्चिमात्य शास्त्रांना
    तंतोतंत पुरावे लागतात
  • 1:19 - 1:21
    दर्शनी पुरावे,
  • 1:21 - 1:22
    सांख्यिक आधार,
  • 1:22 - 1:24
    पण चुका नको असतात
  • 1:24 - 1:29
    सालीश किनाऱ्यावरचे लोक
    पुरते शास्त्रीय होते
  • 1:29 - 1:33
    नाहीतर जवळजवळ १०००० वर्षांहून अधिक काळ
    त्यांनी इतक्या भरभराटीत कशी काढली असती ?
  • 1:33 - 1:36
    प्रत्यक्षात ते आपल्याहून जास्त
    शास्त्रीय दृष्टीकोन बाळगत
  • 1:36 - 1:40
    आपल्यासाठी जास्त खोलात शिरलं की
    प्रगती खुंटली असती असं वाटतंं
  • 1:40 - 1:44
    "जंगलात झाडे आहेत , आणि आपल्या
    इमारतींना लाकूड लागते
  • 1:44 - 1:46
    आणि छपाईसाठी कागद
  • 1:46 - 1:52
    "आपल्याला जंगलतोड करावी लागते
    आणि झाडे पुन्हा लावावी लागतात "
  • 1:52 - 1:53
    आता ह्यात माझी भूमिका काय आहे?
  • 1:53 - 1:57
    बऱ , मी एक लाकूडतोड्या घराण्यातली आहे
  • 1:57 - 1:59
    आणि जेव्हा माझा परिवारातील लोक
  • 1:59 - 2:01
    डोंगरावर लाकूडतोड करत असत,
  • 2:01 - 2:02
    एक इकडे , एक तिकडे
  • 2:02 - 2:05
    तेव्हा मी खालच्या जंगलातील
  • 2:05 - 2:09
    ओळखीच्या तसेच अनोळखी जागी
  • 2:09 - 2:12
    झाडाझुडपांमध्ये ,लाकडाच्या ओंडक्यामध्ये
    खेळत असे
  • 2:12 - 2:15
    आणि मला वाटे , तिथे पऱ्या राहत
  • 2:15 - 2:18
    आणि माझ्याप्रमाणेच त्यांचे कामदेखील
    जंगलाचे रक्षण करणे हेच असावे
  • 2:18 - 2:21
    अगदी मी जे काम करते तसेच
  • 2:21 - 2:23
    पण ... त्या जंगल वाचवू शकल्या नाहीत
  • 2:24 - 2:27
    आणि मी पण नाही वाचवू शकले ...
    खरेतर कोणीच वाचवू शकले नाही
  • 2:27 - 2:28
    कारण जंगलाच्या त्याविभागाच्या मालकाला
  • 2:28 - 2:31
    आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी
    झाडे तोडणे अपरिहार्य होते
  • 2:31 - 2:33
    आणि ह्या गोष्टीने मला पार बदलून टाकले
  • 2:33 - 2:36
    खरे तर त्या गोष्टीने मला प्रेरित केले
  • 2:36 - 2:39
    मी जंगलांचा अभ्यास शिकण्यासाठी शाळेत गेले
  • 2:39 - 2:44
    मला जाणून घ्यायचे होते की
    जंगले इतकी शक्तिमान का आहेत?
  • 2:44 - 2:46
    मला जंगले वाचवायची होती
  • 2:46 - 2:50
    विरोधाभासाने , वनशास्त्राचा अभ्यासक्रम
    पूर्ण झाल्यावर
  • 2:50 - 2:52
    पहिली नोकरी अशी लागली जिच्यात
  • 2:52 - 2:57
    मला अतिशय जुनी झालेले वृक्ष तोडीसाठी
    चिन्हांकित करावयाचे होते
  • 2:57 - 2:59
    त्याजागी तीव्र गतीने वाढणारे फर
    व पाईन वृक्ष लावायचे होते
  • 2:59 - 3:03
    तसेच नको त्या प्रजातींचा
    समूळ उच्चाटन करायचे होते
  • 3:03 - 3:04
    जसे की अल्डर , बर्च व अस्पेन
  • 3:04 - 3:07
    आणि तुम्हाला माहितेय तसे का करावे लागले ?
  • 3:07 - 3:10
    कारण आपण त्यांना आपले प्रतिस्पर्धी समजलो
  • 3:10 - 3:12
    आपल्या नफ्याआड येणारे
  • 3:12 - 3:16
    आणि मी ही नवीन एकसुरी वाढणारी
    प्रजात निर्माण करण्यात प्रवीण झाले
  • 3:16 - 3:20
    पण प्रश्न निर्माण होत राहिले
  • 3:20 - 3:25
    ह्या प्रजातींमध्ये इतक्या भराभर
    रोग का पसरत होता?
  • 3:25 - 3:28
    बर्चची झाडे तोडल्यावर
    फरची झाडे का दुर्मुखत होती?
  • 3:28 - 3:38
    वृक्षतोडीच्या वाढत्या दराचे
    मला भय वाटू लागले
  • 3:38 - 3:42
    मी शाळेत शिकलो होतो की
    एका शतकापूर्वी
  • 3:42 - 3:45
    कॅनडा आणि ब्रिटीश कोलंबियामध्ये
    त्यांनी असा वृक्षतोडीचा ठराव केला
  • 3:45 - 3:48
    जेणेकरून सगळी वाढलेली
    जुनी झाडे तोडली जातील
  • 3:48 - 3:53
    पण मला हे लक्षात यायला वेळ लागला की
    जंगलतोड करून हे सगळे संपणार नाहीये
  • 3:53 - 3:58
    तसेच असे करून आपण जंगलांना
  • 3:58 - 4:03
    सुंदर वनात परिवर्तीत करू शकतो
    अशी धारणाही बदलू शकत नाही
  • 4:03 - 4:07
    माझ्यासाठी ह्या वरवर दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा
    जंगलामध्ये खूप काही दडले होते
  • 4:07 - 4:09
    म्हणून मी पदवी शिक्षणासाठी आले
  • 4:09 - 4:13
    आणि ह्या सगळ्या मुलभूत गोष्टीनी प्रेरित झाले
  • 4:13 - 4:17
    ही जुनी जंगले इतकी शक्तीदायी का आहेत
    हे रहस्य मला जाणून घ्यायचे होते
  • 4:17 - 4:20
    म्हणून यू के मधील ह्या अभ्यासाकडे वळले
  • 4:20 - 4:24
    आणि तिथे प्रयोगशाळेत
    बिया रुजवण्याचे प्रयत्न चालू होते
  • 4:24 - 4:28
    मायकोर्झिअल बुरशीच्या सानिध्यात
  • 4:28 - 4:31
    बुरशीमुळे रोपे एका प्रकारच्या जाळ्यात गुंतत
  • 4:31 - 4:37
    व एकमेकांमध्ये कार्बनची देवाण घेवाण करत
  • 4:37 - 4:40
    मायकोर्झिया म्हणजे खरेतर बुरशीचे मूळ
  • 4:40 - 4:44
    ह्या सहजीवनात बुरशी जमिनीत वाढते
  • 4:44 - 4:48
    व जमिनीतून जीवनद्रव्ये
    व पाणी झाडांपर्यंत पोचवते
  • 4:48 - 4:51
    त्याबदल्यात प्रकाश संश्लेषणासाठी
    कार्बन मिळवते
  • 4:51 - 4:54
    हे साह्याचे , परस्परसंबंधांचे नाते असते
  • 4:54 - 4:57
    आणि मला सगळ्यात जास्त भावले ते म्हणजे
  • 4:57 - 5:02
    ही बुरशी जमिनीखालच्या झाडांना जोडू शकते
  • 5:02 - 5:05
    तेव्हा माझ्या मनात विचार चमकला की
  • 5:05 - 5:08
    माझ्या फरच्या जंगलात सुद्धा
  • 5:08 - 5:13
    बर्च झाडांसोबत जगणारी बुरशी
    फरला पुनर्जीवन देऊ शकेल का ?
  • 5:13 - 5:15
    म्हणून मी थोडे संशोधन केले.
    मला शोधायचे होते हे!
  • 5:15 - 5:19
    माझा प्रश्न राहून राहून
    पुन्हा विश्वासावर येऊन थांबे
  • 5:19 - 5:21
    जरी आपल्याला दिसलं नाही तरीही
  • 5:21 - 5:26
    ह्या बुरशा जमिनीखाली
    झाडांना जोडत असाव्यात का ?
  • 5:26 - 5:29
    बर , असे दिसतेय की
    खऱ्याखुऱ्या जंगलात असे घडते
  • 5:29 - 5:34
    डी एन ए लघु उपग्रहाच्या मदतीने आम्ही
    हे जाळे उघडे करू शकलो
  • 5:34 - 5:38
    ह्या चित्रात ही गर्द वर्तुळे
    म्हणजे डग्लस फरची झाडे
  • 5:38 - 5:42
    जितके मोठे आणि गर्द वर्तुळ,
    तितके मोठे अन जुने ते झाड
  • 5:42 - 5:46
    आणि मध्ये ती छोटी फिकी वर्तुळे आहेत ना
  • 5:46 - 5:50
    ती म्हणजे गोष्टीमधली छोटी रोपटी
  • 5:50 - 5:52
    आणि वर्तुळांना जोडणाऱ्या त्या रेषा म्हणजे
  • 5:52 - 5:54
    मायकोर्झिया बुरशीचे महामार्ग
  • 5:54 - 5:56
    आणि तुम्हाला जाणवेल की
  • 5:57 - 6:00
    मोठी गर्द वर्तुळे जास्तीत जास्त
    जोडली गेली आहेत
  • 6:00 - 6:03
    म्हणून आपण त्यांना
    "केंद्रस्थानातील झाडे" म्हणू
  • 6:03 - 6:08
    आणि नंतर प्रेमाने आम्ही त्यांना
    "जन्मदात्री वृक्ष" म्हणू लागलो
  • 6:08 - 6:11
    कारण असे दिसले की
    ही झाडे आईप्रमाणे
  • 6:11 - 6:14
    छोट्या रोपट्यांची देखभाल करत होती
  • 6:14 - 6:17
    आता हा नकाशा १०० प्रकारच्या बुरशीपैकी
  • 6:17 - 6:20
    केवळ दोन प्रकारांवर केंद्रित आहे
  • 6:20 - 6:29
    कल्पना करा जर सर्व १०० प्रजातींना
    आपण दाखवू शकलो तर!
  • 6:29 - 6:33
    तसेच , मला जाणून घ्यायचे होते की
    ह्या जाळ्यातून काय वाहते?
  • 6:33 - 6:38
    तर असे दिसले की, झाडांना जगण्यासाठी
    व वाढण्यासाठी लागते ते
  • 6:38 - 6:42
    म्हणजे कार्बन , जीवनद्रव्ये व पाणी
  • 6:42 - 6:46
    म्हणून आम्ही समस्थानिके, कार्बन समस्थानिके
    वापरून झाडे निर्देशित केली
  • 6:46 - 6:47
    आणि आम्हाला दिसले की
  • 6:47 - 6:52
    ह्या जाळ्यात कार्बनची देवाणघेवाण होत होती
  • 6:52 - 6:53
    जसे इंटरनेट वर मेसेजेस होतात
  • 6:53 - 7:01
    आणि जेव्हा एखाद बी छोटं असतं ,
    किंवा कुपोषित असतं
  • 7:01 - 7:04
    तेव्हा इतर झाडे त्याला अधिक कार्बन देतात
  • 7:04 - 7:09
    हे स्त्रोत - विहीर असे नाते असते
  • 7:09 - 7:12
    एका दणकट झाडाच्या स्त्रोताकडून
    जसा त्या प्रकाशमान बर्च झाडाकडून
  • 7:12 - 7:16
    एका गरजू झाडाकडे
    म्हणजे गोष्टीतल्या फरच्या झाडाकडे
  • 7:16 - 7:20
    आणि हे सगळे स्त्रोत असलेल्या झाडाला
    यत्किंचितही अपाय न करता
  • 7:20 - 7:24
    पुढची गोष्ट जी आम्हाला
    जाणायची होती ती म्हणजे ,
  • 7:24 - 7:26
    हे तर सगळे घडते ,
    पण जंगलात काय बदल घडतो ?
  • 7:26 - 7:29
    तर असा ..जर तुम्ही एखादे झाड
    दुसऱ्याच्या सावलीत लावले
  • 7:29 - 7:33
    जसे की , डग्लस फर झाडे बर्चेच्याखाली
    वाढली तर बर्चची झाडे
  • 7:33 - 7:36
    त्यांना १०% कार्बन देतील
  • 7:36 - 7:38
    आणि हे प्रमाण बरेच आहे
  • 7:38 - 7:41
    डग्लस फरच्या झाडांना
    पुनरोत्पत्ती करण्यासाठी पुरेसा
  • 7:41 - 7:43
    आता आम्ही अगदी अचूक माप
    शोधू शकलो नसलो तरीही
  • 7:43 - 7:49
    आम्हाला हे माहितेय की
    अशा प्रकारची देवाण घेवाण
  • 7:49 - 7:52
    झाडांच्या जगण्या व वाढण्यासाठी पोषक असते
  • 7:52 - 7:55
    आणि त्यांच्या मुळांशी असलेल्या
    बियांना शक्ती देण्यासाठीही
  • 7:55 - 7:58
    मी हे संशोधन बऱ्याच चांगल्या
    नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केले
  • 7:58 - 8:03
    ह्या बातमीने नाळ जोडली गेली
  • 8:03 - 8:06
    अनेक लोक प्रभावित झाले
  • 8:06 - 8:10
    प्रत्यक्षदर्शी , ह्यावर जगभर
    नवे शोध घेतले गेले
  • 8:10 - 8:11
    जे ह्या प्रबंधामुळे घडले
  • 8:11 - 8:18
    त्याच वेळी , माझ्या कामाची टीका करणारे
    अनेक जणही जन्माला आले
  • 8:18 - 8:20
    खरतर , अनेक प्रबंध लिहिले गेले
  • 8:20 - 8:21
    मुख्य संदेश दिले गेले
  • 8:21 - 8:23
    बातम्या प्रकाशित केल्या गेल्या
  • 8:23 - 8:29
    आणि माझ्या नावे एक व्यावहारिक
    नितीत्मक पत्र फाडण्यात आले
  • 8:29 - 8:32
    "कुत्र्याचा नाश्ता "
    अशी माझ्या कामाची अवहेलना करण्यात आली
  • 8:32 - 8:35
    तुम्हाला तर माहितेय की
  • 8:35 - 8:39
    जेव्हा एखादा वैज्ञानिक शोध
    सद्य परिस्थितीला आवाहन देतो
  • 8:39 - 8:43
    तेव्हा शोधकाला, अशा छळाला
    सामोरे जावे लागते
  • 8:43 - 8:48
    पण हे माहित असूनही मी थांबले नाही
  • 8:48 - 8:50
    मला माहित होतं की माझे विज्ञानाचे ज्ञान
  • 8:50 - 8:52
    पक्के आणि अचूक होते
  • 8:52 - 8:54
    आणि मला हे ही माहित होते की
    एक न एक दिवस ते
  • 8:54 - 8:57
    पर्यावरणाप्रती आपला दृष्टीकोन
    बदलायला भाग पाडेल
  • 8:57 - 8:58
    अशा रीतीने प्रेरित झालेल्या
    मी माझे लक्ष पुन्हा एकदा
  • 8:58 - 9:00
    मूळ प्रश्नावर केंद्रित केले
  • 9:00 - 9:02
    कारण मला पूर्ण उत्तर गवसले नव्हते
  • 9:02 - 9:05
    आणि मला कुतूहल वाटले की
    हे जाळे म्हणजे
  • 9:05 - 9:12
    केवळ , कार्बन ,जीवनद्रव्ये वं पाणी
    देवाणघेवाणीचे साधन नसावे तर
  • 9:12 - 9:14
    एखाद्या कुपोषित , आजारी झाडाला
  • 9:14 - 9:18
    त्याच्या निरोगी शेजारी झाडांपासून
    पोषण मिळू शकते?
  • 9:18 - 9:21
    बर्च फरला मदत करू शकते का?
  • 9:21 - 9:24
    मी आणखी काही प्रयोग केले,
    वं लक्षात आले की हे घडू शकते
  • 9:24 - 9:25
    जेव्हा डग्लस फर झाड आजारी पडते
  • 9:25 - 9:29
    तेव्हा ते शेजारच्या निरोगी झाडांना
    बचावात्मक संदेश पाठवते
  • 9:29 - 9:33
    आणि शेजारी झाडे त्यांच्यातील
    संरक्षक संप्रेरकांचे उत्पादन वाढवतात
  • 9:33 - 9:37
    आणि ती रोगाचा जास्त जोमाने प्रतिकार करतात
  • 9:37 - 9:40
    आणि जर तो शेजारी बर्चचे झाड असेल तर
  • 9:40 - 9:42
    फरच्या झाडाला फायदा होतो.
  • 9:42 - 9:46
    त्याच्या प्रतिजैविक
    निर्माण करणारे जीवाणूमुळे
  • 9:46 - 9:49
    सार्वजनिक लसीकरण संस्थेसारखे आहे हे
  • 9:49 - 9:51
    मला उत्सुकता वाटली,
    की ह्याहून जास्त स्वयंसुरक्षेचे संदेश
  • 9:51 - 9:54
    वाहत असतील का ह्या जाळ्यात?
  • 9:54 - 9:56
    हो, असे निदर्शनास आले की,
  • 9:56 - 10:00
    झाडे त्यांच्या नातेवाईकांना ओळखू शकतात ,
    त्यांना संदेश पाठवू शकतात
  • 10:00 - 10:04
    जन्मदाती झाडे ओळखू शकतात की

  • 10:04 - 10:09
    आजूबाजूला असलेली झाडे आपली आहेत का परकी
  • 10:09 - 10:13
    आपण जन्म दिलेल्या झाडांना,
    ती झाडे इतरांपेक्षा जास्त कार्बन देऊ शकतात
  • 10:13 - 10:16
    आणि जर जन्मदाते झाड दुखावले तर
  • 10:16 - 10:18
    ते त्याच्या बाळ रोपांना जास्त कार्बन देते
  • 10:18 - 10:22
    जणू काही ती ( जन्मदात्री ) झाडे,
  • 10:22 - 10:25
    त्यांची शक्ती त्यांच्या पुढच्या
    पिढीला देत आहेत
  • 10:25 - 10:28
    आता जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टींकडे
    एकत्रित रित्या बघते
  • 10:28 - 10:29
    तेव्हा जाणवते की ही झाडे
    त्यांच्यातल्या गुप्त गोष्टी
  • 10:29 - 10:32
    एकमेकांना सांगत आहेत
  • 10:32 - 10:34
    हा अतिशय महत्वाचा शोध आहे
  • 10:34 - 10:38
    आणि अतिशय उत्कंठावर्धक
  • 10:38 - 10:42
    तुम्हाला माहितेय, त्यावेळी,
    बरीच वृत्ते लिहिली गेली
  • 10:42 - 10:44
    शास्त्र, माहितीपट प्रसिद्ध झाले
  • 10:44 - 10:53
    प्रसिद्धी होत होती,
    मी खूप खूप उत्साहात होते
  • 10:53 - 10:54
    पण मला कर्करोग झाला
  • 10:54 - 10:59
    आणि तो भयंकर होता
  • 10:59 - 11:03
    पण एक छान गोष्ट घडली
  • 11:03 - 11:09
    त्याने मला माझ्या आपल्या लोकांशी जोडले
  • 11:09 - 11:14
    माझे लोक, माझ्या कुटुंबाने
    माझी देखभाल केली
  • 11:14 - 11:16
    त्यांनी मला उभे केले
  • 11:16 - 11:17
    त्यांनी मला चढायला मदत केली
  • 11:17 - 11:19
    माझ्यासाठी जेवण बनवलं
  • 11:19 - 11:22
    माझ्या मुलांचा सांभाळ केला
  • 11:22 - 11:26
    त्यांनी मला वाचवलं
  • 11:26 - 11:28
    आणि रुग्णालयाततर
  • 11:28 - 11:31
    अजून जास्त नाती जुळली
  • 11:31 - 11:33
    अधिक घट्ट
  • 11:33 - 11:36
    अशा अनेक स्त्रियांशी ज्यां
    स्तनाच्या कर्करोगाशी लढत होत्या
  • 11:36 - 11:40
    आणि आम्ही सगळे घाबरलो होतो
  • 11:40 - 11:41
    आम्ही रडलो
  • 11:41 - 11:44
    पण आम्ही हसलोही
  • 11:44 - 11:48
    आम्ही हसतोय ..दर रोज
  • 11:48 - 11:51
    आम्ही इतक्या घट्ट नात्यांनी बांधलो गेलो
  • 11:51 - 11:56
    जणू अशा सुंदर वेलबुट्टीदार वस्त्राने
    ज्याची वीण मजबूत होत गेली
  • 11:56 - 11:59
    जेव्हा आमच्यापैकी कोणी अडखळत असे,
    किंवा वाकत असे
  • 11:59 - 12:02
    तेव्हा इतर जणी तिला सांभाळत.
  • 12:02 - 12:06
    ह्या सगळ्यातून आम्ही काय शिकलो?
  • 12:06 - 12:08
    तेच जे माझी जंगले
    मला शिकवायचा प्रयत्न करीत होती
  • 12:08 - 12:12
    की ही नाती आपल्या हितासाठी
    अतिशय महत्वाची असतात
  • 12:12 - 12:15
    सहजासहजी दिसत नाहीत पण
  • 12:15 - 12:16
    ती असतात - खरीखुरी
  • 12:16 - 12:20
    आणि तुम्हाला माहितेय -
    मी त्याचे जिवंत उदाहरण आहे
  • 12:20 - 12:22
    मी खूप आभारी आहे
  • 12:22 - 12:23
    ( टाळ्या)
  • 12:23 - 12:30
    धन्यवाद
  • 12:30 - 12:36
    आता जेव्हा मी सशक्त आणि धैर्यवान झालेय,
    मी माझ्या शास्त्राकडे पुन्हा वळलेय
  • 12:36 - 12:39
    आणि मी इतराना प्रश्न विचारतेय
  • 12:39 - 12:43
    माझा तुम्हाला सगळ्यात
    महत्वाचा प्रश्न असा आहे ..
  • 12:43 - 12:44
    आपण लावलेले शोध हे,
  • 12:44 - 12:46
    आपल्याला असलेल्या
    सगळ्यात मोठ्या धोक्यापासून
  • 12:46 - 12:48
    म्हणजे "वातावरण बदलापासून
    आपल्याला कसे वाचवू शकतात?
  • 12:48 - 12:51
    हो,"वातावरण बदल" म्हणजे नुसती लबाडी नाहीये
  • 12:51 - 12:54
    आपण स्वतःची गंमत करू शकत नाही
  • 12:54 - 12:59
    असे कुठलेही भपकेदार तंत्रज्ञान नाही
    जे आपल्याला ह्या गर्त्यातून बाहेर काढू शकेल
  • 12:59 - 13:02
    माझ्या शोधांनी मला दाखवून दिलंय की
  • 13:02 - 13:07
    ह्या प्रश्नाचे उत्तर दडलंय
    आपल्या निसर्गाशी असलेल्या नात्यात
  • 13:07 - 13:10
    आणि हा शोध घेताना,
  • 13:10 - 13:13
    मी ऑस्ट्रेलियातील
    आदिवासी लोकांपर्यंत पोहोचले
  • 13:13 - 13:16
    मी माझा शोध ऑस्ट्रेलियातील आदिवासी
    लोकांबरोबर करतेय
  • 13:16 - 13:19
    अशी माणसे जी साल्मन माशावर अवलंबून आहेत
  • 13:19 - 13:23
    आणि साल्मन माशांचे जतन संवर्धन
    करताना त्यांच्याशी गहिरे नाते जपून आहेत
  • 13:23 - 13:27
    त्यामुळे त्यांच्या आयुष्याला आधार मिळतो
    खरतर ते त्यांच्या जगण्याचा आधार आहे
  • 13:27 - 13:30
    म्हणून , वसंत ऋतूत साल्मन मासे नदीत
    उड्या मारतात तेव्हा
  • 13:30 - 13:33
    अस्वले नद्यांवर येतात
  • 13:33 - 13:37
    अस्वले आणि कोल्हे नदीतील
    साल्मन माशांवर उदरनिर्वाह करतात
  • 13:37 - 13:39
    आणि ते साल्मन मासे पकडून
    जंगलात घेऊन जातात
  • 13:39 - 13:42
    आणि जंगलातल्या महाकाय जुन्या
    जन्मदात्या वृक्षांखाली बसून
  • 13:42 - 13:44
    आणि त्या आईच्या मुकुटासमान सावलीखाली
  • 13:44 - 13:46
    ते साल्मन मासे भक्षण करतात
  • 13:46 - 13:51
    आणि वसंत ऋतूत , उरलेसुरले
    खाद्य कुजून जमिनीत मुरते
  • 13:51 - 13:53
    आणि आपल्याला वाटते की
  • 13:53 - 13:55
    जन्मदात्या वृक्षांखाली असेलेले बुरशीचे जाळे
  • 13:55 - 13:58
    हा नायट्रोजन शोषून घेते
  • 13:58 - 14:00
    आणि शास्त्रज्ञांनी झाडाच्या खोडांच्या
    परिघात
  • 14:00 - 14:05
    साल्मन माशांमधील नायट्रोजनचे अंश
    शोधून काढले आहेत
  • 14:05 - 14:08
    आणि ह्या उन्हाळ्यात आम्ही
    पुन्हा जंगलात जाणार आहोत
  • 14:08 - 14:12
    आणि शोध घेणार आहोत नायट्रोजनचा
    आम्हाला वाटतंय असं घडतंय
  • 14:12 - 14:15
    जन्मदात्या वृक्षांपासून
    त्यांच्या शेजारच्या झाडांपर्यंत
  • 14:15 - 14:18
    एका झाडापासून दुसऱ्या
    झाडापर्यंत जंगलात दूरवर
  • 14:18 - 14:22
    आणि आम्हाला वाटते की
    हे सगळे जंगलाच्या समृद्धीशी निगडीत आहे
  • 14:22 - 14:25
    अर्थात नद्यांच्या आरोग्यावर
  • 14:25 - 14:30
    जे अर्थात साल्मन माशांशी निगडीत आहे
    आणि त्यांच्या संख्येवर
  • 14:30 - 14:34
    जे समुद्रात जाऊन मिळते
    व पुन्हा आपण माणसांकडे परतते
  • 14:34 - 14:38
    हे आयुष्याचे वर्तुळ
  • 14:38 - 14:43
    ज्याला ऑस्ट्रेलियातील आदिवासी
    "देवाणघेवाण" म्हणतात
  • 14:43 - 14:45
    ते म्हणजे परस्परांवरील आदराचा व्यवहार होय
  • 14:45 - 14:48
    आणि शास्त्रज्ञांच्या मते हे
  • 14:48 - 14:53
    "जुळवणाऱ्या जटील प्रणाली" चे
    अतिशय चपखल उदाहरण आहे
  • 14:53 - 14:58
    आता बघा , जंगले नात्यांच्या
    आधारावर वसली आहेत
  • 14:58 - 15:03
    एका निरोगी जंगलात सर्वकाही जोडलेलं असतं
    आणि एकमेकांशी संवाद करत असतं
  • 15:03 - 15:07
    इथे हे जोड वेगवेगळ्या प्रजातींचे
    प्रतिनिधित्व करतात
  • 15:07 - 15:09
    आणि ते सतत एकमेकांशी जोडलेले असतात
  • 15:09 - 15:12
    आणि त्यांच्या परस्पर संबंधांनी बनते
  • 15:12 - 15:16
    "जुळवून घ्यायच्या आचरणाची जटील शैली"
  • 15:16 - 15:18
    किंवा उच्च प्रणाली पातळी गुणधर्म.
  • 15:18 - 15:20
    लवचिकपणा आणि आरोग्य यासारख्या गोष्टी,
  • 15:20 - 15:24
    शुद्ध हवा आणि शुद्ध पाण्याचे चक्र
  • 15:24 - 15:30
    आधुनिक जगात, आपण स्वतःला
    ह्या सगळ्यापासून वेगळे मानतो
  • 15:30 - 15:34
    कुठेतरी वरच्या दर्जाचे
  • 15:34 - 15:36
    किंवा आपण ग्राह्य धरतो
    पण मुख्य गोष्ट अशी आहे की
  • 15:36 - 15:40
    जेव्हा आपण त्यातील
    महात्वाचे दुवे काढून घेतो
  • 15:40 - 15:42
    त्या ग्रीझली अस्वलांसारखे
  • 15:42 - 15:44
    आणि साल्मन माशांची संख्या कमी करतो
  • 15:44 - 15:49
    तेव्हा त्या प्रणाल्या जलदगत्या नाश पावतात
  • 15:49 - 15:50
    "दुष्ट शांत अवस्थेत"
  • 15:50 - 15:54
    आता इथे आपल्याला जायचं नाहीये
  • 15:54 - 15:56
    "दुष्ट शांत अवस्थांचा" अंदाज बांधता येत नाही
  • 15:56 - 15:58
    त्या विरोधाभासी असतात
  • 15:58 - 16:01
    तुम्ही एक प्रश्न सोडवता अन
    दुसरा जन्माला येतो
  • 16:01 - 16:05
    आणि ज्या प्रकारे गोष्टी घडत आहेत
  • 16:05 - 16:08
    आपली जंगले वातावरण बदलाची बळी पडत आहेत
  • 16:08 - 16:11
    ज्यामुळे वातावरण बदलात आणखी भर पडतेय
  • 16:11 - 16:16
    आणि हे प्रचंड वेगात होतेय
  • 16:16 - 16:18
    पण इथे एक सुंदर गोष्ट घडतेय
  • 16:18 - 16:21
    कारण की ह्या "जुळवून घेण्याच्या
    जटील प्रणाल्या" आहेत
  • 16:21 - 16:25
    ज्या अशा बदलाची वाट बघत आहेत जिथे
  • 16:25 - 16:29
    नकारात्मक ते सकारात्मक
    असे मार्गक्रमण होऊ शकेल
  • 16:29 - 16:31
    आपण ते असे करू शकतो
  • 16:31 - 16:37
    प्रथम आपल्याला स्वतःला
    ह्या जाळ्यातील घटक मानायला हवं
  • 16:37 - 16:41
    कल्पना करा तुम्ही इतर
    सर्व जीवांशी बोलत आहात
  • 16:42 - 16:44
    आपण जमिनीखाली जाऊन
    त्या संभाषणात सामील होऊ शकतो
  • 16:44 - 16:50
    आणि त्या संवादाचा भाग होऊ शकतो
  • 16:50 - 16:53
    आणि जर आपण हे केले तर आपल्याला
  • 16:53 - 16:56
    जंगलातील बर्चची झाडे
    कधीच तोडावी लागणार नाहीत
  • 16:56 - 16:57
    कारण तसे करणे म्हणजे जंगलाच्या
  • 16:57 - 16:59
    लवचिकतेला सुरुंग लावणे
    हे आपल्याला माहित असते
  • 16:59 - 17:01
    आपण तरीही असे करतोय
  • 17:01 - 17:04
    पण मी आशावादी आहे
  • 17:04 - 17:08
    कारण एकदाका आपण ह्या
    "जुळवण्याच्या जटील प्रणालीचा" हिस्सा बनू
  • 17:08 - 17:12
    तर आपण आपली धारणा बदलू शकतो
    आपण आपले आचरण बदलू शकतो
  • 17:12 - 17:16
    आणि आपण ह्या महान प्रणालीचा घटक होऊ शकतो
  • 17:16 - 17:21
    आठवा , जेव्हा बर्चचे झाड
    फरला जीवनद्रव्ये देते
  • 17:21 - 17:24
    आणि फरचे झाड ते पुन्हा बर्चला देते
  • 17:24 - 17:27
    ह्याचाच अर्थ असा आहे की,
    पर्यावरणात हटवाद नसतो
  • 17:27 - 17:31
    तिथे फक्त देवाणघेवाण असते
  • 17:31 - 17:33
    परस्परांबद्दल आदर असतो
  • 17:33 - 17:36
    तसाच जरा माझ्या कॅन्सर आधार गटात होता
  • 17:36 - 17:38
    आम्ही असेच आचरण करतो
  • 17:38 - 17:42
    म्हणून ,शेवटी , तिसरी गोष्ट म्हणजे
  • 17:42 - 17:46
    जेव्हा आपल्याला कळून चुकते की
  • 17:46 - 17:50
    आपण निसर्गाचा अविभाज्य घटक आहोत
  • 17:50 - 17:51
    खराखुरा अंश आहोत,
  • 17:51 - 17:54
    वेगळे नाही आहोत
  • 17:54 - 17:59
    तेव्हा आपण ह्या महान सशक्तीकारणाचा
    भाग होऊ शकतो
  • 17:59 - 18:02
    त्या सकारात्मक मार्गावर चालू शकतो
  • 18:02 - 18:06
    निसर्गाला बाजार समजणे बंद करायला हवे
  • 18:06 - 18:10
    आणि आपण जेव्हा असे करू तेव्हा,
    आपण भविष्याची रूपरेखा बदलू शकू
  • 18:10 - 18:15
    कधीकाळी मला वाटे की,
    पऱ्या निसर्गातील दुवे साधतात
  • 18:15 - 18:17
    व जंगलांचे रक्षण करतात
  • 18:17 - 18:21
    आणि आता माझ्या शास्त्रामुळे जाणवतेय की,
    मी फार चुकीचे नव्हते
  • 18:21 - 18:23
    (हशा)
  • 18:23 - 18:31
    विज्ञानामुळे मी अचूकपणे दाखवू शकले की
    असे अदृश्य संबंध असतात
  • 18:31 - 18:35
    जसे सालीश किनाऱ्यावरील लोक सांगत आले.
  • 18:35 - 18:40
    त्यांनी दर्शवून दिले, विज्ञानाने दाखवून दिले की
    सर्वकाही जोडलेले आहे
  • 18:40 - 18:42
    आणि एकमेकांशी संवाद साधते आहे
  • 18:42 - 18:44
    परस्परांवरील आदराने
    व देवाणघेवाणीच्या माध्यमातून
  • 18:44 - 18:47
    आणि ह्यातूनच समाजात वं पर्यावरणात
    समतोल साधला जातोय
  • 18:47 - 18:50
    मोठ्यांचा आदर , परस्परांशी नाते
    ह्या तत्वांवर हे आधारित आहे
  • 18:50 - 18:53
    आणि ह्यामुळे जटिलता तसेच
    जुळवून घेण्याची क्षमता वाढीस लागते
  • 18:53 - 18:56
    आणि अर्थातच त्यातून लवचिकपणा उदयास येतो
  • 18:56 - 19:05
    पर्यावरण बदलास सामोरे जाण्याचा लवचिकपणा
  • 19:05 - 19:09
    म्हणून , मी एक आशावादी विचार तुम्हापाशी
    व्यक्त करू इच्छिते
  • 19:09 - 19:13
    अनुभवाने मला माहितेय की,
  • 19:13 - 19:16
    वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघितले
    तर तुम्ही सुद्धा हे समजू शकता
  • 19:16 - 19:22
    की आपण एक आहोत.
  • 19:22 - 19:24
    खूप धन्यवाद.
  • 19:24 - 19:31
    (टाळ्या)
Title:
निसर्गातील जाळे : समृद्ध जंगलात झाडे एकमेकांशी कसा संवाद साधतात - सुझेन सिमर्ड |TEDxSeattle
Description:

हा आकर्षक संवाद एका शास्त्रीय शोधावर भाष्य करतो जो आपल्याला जंगलातील पर्यावरणातील परस्पर संबंध दर्शवतो . हा संवाद आपल्याला थेट जंगलातील भूमीवर नेतो जीथे आपण शिकतो की कशी झाडे एकमेकांशी संवाद साधतात अन देवाणघेवाण करतात .जंगल म्हणजे केवळ साधन नसून त्यापलीकडे जाऊन आयुष्यातील गुंतागुंतीचे जाळे आहे . निसर्गातल्या ह्या गुंतागुंतीची नाती समजावून सांगणारा तिचा अभ्यास आपल्याला जाणीव करून देतो की "आपण सर्व एक आहोत"

हे व्याख्यान एका स्थानीय TEDx कार्यक्रमात सादर केले होते, हे TED संमेलनाच्या स्वतंत्र रुपात बनविले आहे.

अधिक माहितीसाठी: http://ted.com/tedx

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDxTalks
Duration:
19:33

Marathi subtitles

Revisions Compare revisions