आपण का संतापतो -- आणि ते आरोग्यदायी का आहे
-
0:02 - 0:07कल्पना करा तुमच्या मित्राचा संदेश आला आहे.
-
0:07 - 0:11"तुला पटणार नाही काय झालं आहे,
मला खूप संताप येतोय." -
0:11 - 0:15तुम्ही मित्राचे कर्तव्य म्हणून
तपशील विचारता. -
0:15 - 0:17आणि ते तुम्हांला काय घडले ते सांगतात.
-
0:17 - 0:20व्यायामशाळेत, कार्यालयात
किंवा काल रात्री डेटवर -
0:20 - 0:23तुम्ही ऐकता व ते का संतापले
हे समजून घ्यायचा प्रयत्न करता. -
0:24 - 0:27कदाचित गुप्तपणे निवाडा करता,
त्यांनी चिडायला हवं की नाही -
0:27 - 0:29(हास्य)
-
0:29 - 0:31कधी त्यांना सल्लाही देता.
-
0:31 - 0:35तत्क्षणी आवश्यक असे जे काही तुम्ही करता,
ते मी रोज करतो -
0:35 - 0:37कारण मी एक क्रोध संशोधक आहे.
-
0:37 - 0:41क्रोध संशोधक म्हणून
माझे व्यावसायिक आयुष्य उत्तम आहे. -
0:41 - 0:44चेष्टा नाही ,पण माझे खाजगी आयुष्यही.
-
0:44 - 0:46लोकांना राग का येतो हे अभ्यासताना.
-
0:46 - 0:49चिडल्यावर त्यांच्या मनात काय विचार येतात,
-
0:49 - 0:51आणि चिडल्यावर ते काय करतात याचाही.
-
0:51 - 0:54भांडणे असो की वस्तू फोडणे किंवा
-
0:54 - 0:56अगदी ठळक अक्षरांत
इंटरनेटवर एखाद्यावर ओरडणे असो. -
0:56 - 0:57(हास्य)
-
0:57 - 0:59तुम्ही कल्पना करू शकता,
-
0:59 - 1:01जेव्हा लोक ऐकतात की मी क्रोध संशोधक आहे,
-
1:01 - 1:03त्यांना रागाबद्दल
माझ्याशी बोलावं वाटतं. -
1:03 - 1:05त्यांच्या रागाच्या कथा
मला सांगाव्या वाटतात. -
1:05 - 1:07त्यांना चिकित्सकाची गरज आहे,
म्हणून नाही. -
1:07 - 1:09जरी कधी असं झालं तरी,
-
1:09 - 1:10असं घडतं कारण राग वैश्विक आहे.
-
1:10 - 1:14अशी गोष्ट जी आपण सगळे अनुभवतो
आणि जिचा ते संबंध जोडू शकतात -
1:14 - 1:16आयुष्याच्या पहिल्या काही महिन्यांपासून
पण ती अनुभवत आहोत -
1:16 - 1:20आपल्याला हवं ते मिळालं नाही की
आपल्या निषेधार्थ रडण्याने -
1:20 - 1:23जसं,"तुम्हाला काय म्हणायचंय,
तुम्ही खुळखुळा उचलणार नाही का बाबा" -
1:23 - 1:24मला पाहिजे तो!
-
1:24 - 1:26(हास्य)
-
1:26 - 1:31संपूर्ण किशोर वयात तो जाणवतो,
कारण माझी आई निश्चितच हे सिद्ध करेल. -
1:31 - 1:32माफ कर, आई.
-
1:32 - 1:34अगदी शेवटपर्यंत आपण तो अनुभवतो.
-
1:34 - 1:38जीवनातील काही अत्यंत वाईट क्षणी सुद्धा
राग आपल्या सोबत आहे. -
1:38 - 1:41तो आपल्या दु:खाचा
नैसर्गिक व अपेक्षित भाग आहे. -
1:41 - 1:44पण आयुष्याच्या काही उत्तम क्षणीही
तो आपल्या सोबत आहे. -
1:44 - 1:47लग्न व सुट्टी सारख्या काही खास प्रसंगी.
-
1:47 - 1:50सतत दैनंदिन वैफल्याने दुखावलेला,
-
1:50 - 1:52खराब हवामान, प्रवासाला विलंब..
-
1:52 - 1:54त्या क्षणी भयंकर वाटते सगळे,
-
1:54 - 1:57पण अखेर सगळं सुरळीत झाल्यावर
त्यांचा विसर पडतो. -
1:58 - 2:01मी लोकांशी त्यांच्या रागाविषयी
खूप संवाद साधतो. -
2:01 - 2:04याच संवादातून मला समजले की ते बरेचसे लोक,
-
2:04 - 2:06आणि पैजेवर सांगतो या खोलीतील अनेक जण,
-
2:06 - 2:08रागाला एक समस्या मानतात.
-
2:08 - 2:10तो तुमच्या जीवनात हस्तक्षेप करतो,
-
2:10 - 2:13नातेसंबंधांवर परिणाम करतो,
म्हणूनच भयानक वाटतो. -
2:13 - 2:16मी हे जाणतो पण
मी रागाकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहतो, -
2:16 - 2:19आज मी तुम्हांला
एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे -
2:19 - 2:20तुमच्या रागाबद्दल, ती अशी:
-
2:20 - 2:24राग ही जीवनातील प्रभावी व पोषक शक्ती आहे.
-
2:24 - 2:26तुम्हाला राग येतो,चांगली गोष्ट आहे.
-
2:26 - 2:27तो अनुभवणे आवश्यक आहे
-
2:28 - 2:30हे सगळं समजून घेण्यासाठी आपण जरा मागे जाऊ.
-
2:30 - 2:33आणि प्रथम आपल्याला राग का येतो
यावर चर्चा करू. -
2:33 - 2:35यासाठी आपल्याला एका संशोधकाचे
कार्य पाहावे लागेल. -
2:36 - 2:40डॉ. जेरी डेफनबाकर, ज्यांनी १९९६ साली
-
2:40 - 2:42समस्याप्रधान रागाला कसे हाताळावे
याबद्दल लिहिले -
2:42 - 2:45आपल्यापैकी अनेकांना, तुमच्या पैकी अनेकांना
-
2:45 - 2:46हे सोपे वाटते जसे:
-
2:46 - 2:48कोणी डिवचल्यावर मला राग येतो.
-
2:49 - 2:50लोक अशी भाषा वापरताना तुमच्या कानी येतं.
-
2:50 - 2:52ते असं काहीसं बोलतात,
-
2:52 - 2:54"मी संतापतो,
जेव्हा लोक इतके सावकाश वाहन चालवतात " -
2:54 - 2:58"मला राग आला
कारण तिने पुन्हा दूध बाहेर ठेवले" -
2:58 - 2:59किंवा माझे आवडते वाक्य,
-
2:59 - 3:03"मला रागाची समस्या नाही--
फक्त लोकांनी माझ्याबाबत गोंधळ घालू नये." -
3:03 - 3:04(हास्य)
-
3:05 - 3:09या चिथावणीच्या विविध प्रकारांना
नीट समजून घेण्याच्या हेतूने, -
3:09 - 3:13माझे मित्र, सहकारी व अगदी माझे कुटुंब
यांच्यासह मी कित्येक जणांना विचारतो, -
3:13 - 3:15"कोणत्या गोष्टी
तुमच्या डोक्यात जातात ?" -
3:15 - 3:17तुम्हाला कशाचा राग येतो?
-
3:17 - 3:20एक फायदा सांगण्याची
ही योग्य वेळ आहे. -
3:20 - 3:21क्रोध संशोधक असण्यासंबंधीचा
-
3:21 - 3:24मी समग्र यादी तयार करण्यासाठी
एक दशकाहूनही जास्त काळ घालवला आहे. -
3:24 - 3:27अशा गोष्टी ज्यांमुळे माझे सहकारी वैतागतात.
-
3:28 - 3:29अगदीच मला गरज पडली तर
-
3:29 - 3:33(हास्य)
-
3:33 - 3:35पण त्यांची उत्तरे आकर्षक असतात.
-
3:35 - 3:38कारण ते असं म्हणतात,
-
3:38 - 3:40"जेव्हा माझा खेळाचा संघ हारतो."
-
3:40 - 3:42"जे लोक मोठा आवाज करत खातात"
-
3:42 - 3:44खरं तर, हे आश्चर्यकारकरित्या
सार्वत्रिक आहे. -
3:44 - 3:48"जे लोक सावकाश चालतात" हे माझे कारण आहे.
-
3:48 - 3:50आणि हो,"गोलाकार मार्ग "
-
3:50 - 3:51गोलाकार मार्ग--
-
3:51 - 3:53(हास्य)
-
3:53 - 3:56मी प्रामाणिकपणे सांगतो,
या रागाइतका राग इतर कशाचाही नाही. -
3:56 - 3:59(हास्य)
-
3:59 - 4:01काहीवेळा त्याची उत्तरे
अजिबात किरकोळ नसतात. -
4:01 - 4:05कधी ते वंशवाद, लैंगिकता व गुंडगिरी
याबद्दल बोलतात. -
4:05 - 4:09पर्यावरणाची हानी--
आपल्या समोरील मोठी जागतिक समस्या. -
4:10 - 4:11पण कधीकधी,
-
4:11 - 4:14त्यांची उत्तरे खूप स्पष्ट असतात,
कदाचित अगदी विचित्ररित्या स्पष्ट. -
4:15 - 4:17"तुमच्या शर्टवर उमटलेली ओली आडवी रेषा,
-
4:17 - 4:20तुम्ही चुकून सार्वजनिक स्वच्छता गृहातील
कट्ट्यावर वाकता" -
4:20 - 4:22(हास्य)
-
4:22 - 4:24अतिशय ठळक, बरोबर?
-
4:24 - 4:25(हास्य)
-
4:25 - 4:28किंवा "कोणतंही ड्राईव्ह कॉम्प्युटरला
जोडण्याच्या दोनच पद्धती आहेत, -
4:29 - 4:31मग मलाच तीनतीनदा प्रयत्न का करावे लागतात?"
-
4:31 - 4:35(हास्य)
-
4:35 - 4:39आता ते लहान असो किंवा मोठे,
साधारण असो की विशिष्ट, -
4:39 - 4:41आपण ही उदाहरणे पाहू शकतो.
-
4:41 - 4:43आणि आपण काही सामाईक विषय बाजूला काढू शकतो.
-
4:43 - 4:46अप्रिय परिस्थिती मध्ये आपल्याला राग येतो.
-
4:46 - 4:49जे ध्येयात अडथळा आणते, ते अयोग्य वाटते,
-
4:49 - 4:52ते टाळणे शक्य होते ही भावना
निष्प्रभ करून टाकते. -
4:52 - 4:54ही रागाची पाककृती आहे.
-
4:54 - 4:55पण तुम्ही असेही म्हणू शकता,
-
4:56 - 4:59अशा परिस्थितीत मनात येणारी
राग ही एकमेव भावना नाही. -
4:59 - 5:01राग पोकळी मध्ये निर्माण होत नाही.
-
5:01 - 5:04आपण जेव्हा भयभीत किंवा दु:खी असतो
त्याचवेळी क्रोधित ही होऊ शकतो. -
5:04 - 5:07किंवा इतर अनेक भावनांचा समूह जाणवतो.
-
5:07 - 5:09पण ती गोष्ट अशी आहे:
-
5:09 - 5:12या चिथावण्यांमुळे आपल्याला राग येत नाही
-
5:12 - 5:13फक्त त्याचमुळे तर नाहीच ,
-
5:13 - 5:15आपल्याला हे माहित आहे कारण तसं असतं तर,
-
5:15 - 5:18आपण सगळे एकाच गोष्टीमुळे संतापलो असतो,
पण असे होत नाही. -
5:18 - 5:21माझ्या आणि तुमच्या रागाची कारणे
भिन्न आहेत, -
5:21 - 5:23म्हणून इथे वेगळं काहीतरी घडत आहे.
-
5:24 - 5:25हे काहीतरी म्हणजे काय?
-
5:25 - 5:30चिथावणाऱ्या क्षणी आपल्याला काय वाटतंय,
आपण काय करतोय हे आपल्याला माहिती असतं. -
5:30 - 5:34आम्ही याला क्रोध पूर्व अवस्था म्हणतो,
तुम्ही भुकेले आहात? थकला आहात? -
5:34 - 5:38तुम्हांला कशाची चिंता वाटते?
तुम्हाला उशीर झाला आहे? -
5:38 - 5:39तुमच्या मनात अशा गोष्टी असताना,
-
5:39 - 5:42त्या चिथावण्या अधिक त्रासदायक वाटतात.
-
5:43 - 5:45पण सर्वात महत्वाच्या ना या चिथावण्या आहेत,
-
5:45 - 5:48ना क्रोध-पूर्व अवस्था, ती आहे:
-
5:48 - 5:50आपण या चिथावणीचा अर्थ कसा लावतो.
-
5:50 - 5:52जीवनात आपण त्यांचा कसा अर्थ लावतो?
-
5:52 - 5:54जेव्हा काही घडते,
-
5:54 - 5:57आपण हे ठरवतो, ते चांगले की वाईट?
-
5:57 - 6:01ते योग्य की अयोग्य?
ते जबाबदार आहे की शिक्षेला पात्र? -
6:01 - 6:05हे झालं प्राथमिक मूल्यमापन,
तुम्ही फक्त त्या प्रसंगाचे मूल्यांकन करता. -
6:05 - 6:07आपण ठरवतो आपल्या जीवनात याचा काय अर्थ आहे.
-
6:07 - 6:10एकदा हे झालं की
आपण ठरवतो ते किती वाईट आहे. -
6:10 - 6:11हे झालं दुय्यम मूल्यमापन.
-
6:12 - 6:14आपण म्हणतो ,
"आजवर घडलेली ही सर्वात वाईट घटना आहे." -
6:14 - 6:16किंवा मी याचा सामना करू शकतो का?
-
6:17 - 6:20हे स्पष्ट करण्यासाठी, कल्पना करा,
तुम्ही वाहन चालवत एका ठिकाणी जात आहात. -
6:21 - 6:23अधिक पुढे जाण्याआधी,
मी तुम्हांला सांगू इच्छितो, -
6:23 - 6:25मी जर वाईट शक्ती असतो,
-
6:25 - 6:29आणि मला तुम्ही संतापण्याजोगी
परिस्थिती निर्माण करायची असती, -
6:29 - 6:31तर ती बहुतेक वाहन चालवण्यासारखीच
असली असती. -
6:31 - 6:32(हास्य)
-
6:32 - 6:34खरं आहे हे.
-
6:34 - 6:36सांगितल्याप्रमाणे,
तुम्ही एका ठिकाणी जात आहात, -
6:36 - 6:40घडणारी प्रत्येक गोष्ट-
वाहतूक, इतर चालक, रस्तेनिर्माण -
6:40 - 6:43असं वाटतं हे आपल्या ध्येयातील अडथळे आहेत.
-
6:43 - 6:46सगळे लिखित व अलिखित वाहतुकीचे नियम,
-
6:46 - 6:49सर्रास आपल्यासमोर मोडीत काढले जातात.
-
6:49 - 6:51सहसा परिणामांशिवाय
-
6:51 - 6:52आणि हे नियम कोण मोडतो?
-
6:52 - 6:55अनोळखी व्यक्ती,
ज्यांना तुम्ही कधीही भेटणार नाही. -
6:55 - 6:58तुमच्या क्रोधाचे सर्वात सोपे कारण बनतात.
-
6:58 - 7:00(हास्य)
-
7:00 - 7:04तुम्ही गाडी चालवत कुठेतरी जात आहात
म्हणजे तुमची चिडचिड होणार हे नक्कीच. -
7:04 - 7:07तुमच्या समोरील व्यक्ती
वेगमर्यादेपेक्षा खूप हळू वाहन चालवत आहे. -
7:08 - 7:09आणि हे निराशाजनक आहे,
-
7:09 - 7:12कारण ते सावकाश का जात आहेत
हे तुम्ही पाहू शकत नाही. -
7:12 - 7:14हे झाले प्राथमिक मूल्यांकन.
-
7:14 - 7:17तुम्ही हे पाहिले आणि म्हणालात,
हे खूप वाईट व दोष देण्याजोगे आहे. -
7:17 - 7:20पण कदाचित तुम्ही ठरवाल की
ही तेवढी मोठी गोष्ट नाही. -
7:20 - 7:22तुम्हाला घाई नाही, हरकत नाही.
-
7:22 - 7:24हे झालं दुय्यम मूल्यांकन--
तुम्हाला राग येत नाही. -
7:25 - 7:29पण कल्पना करा
तुम्ही नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात. -
7:30 - 7:32ती व्यक्ती जे करत आहे ते बदलले नाही,बरोबर?
-
7:32 - 7:36तर प्राथमिक मूल्यांकन बदलत नाही,
अजूनही वाईट, अजूनही दोष देण्याजोगे. -
7:36 - 7:39पण तुमची सामना करण्याची क्षमता बदलते.
-
7:39 - 7:41कारण एकाएकी,
-
7:41 - 7:43तुम्ही नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात.
-
7:43 - 7:44एकाएकी,
-
7:44 - 7:46तुम्हाला स्वप्नातील नोकरी मिळत नाही.
-
7:46 - 7:49जी तुम्हाला पैशाचे ढीगच ढीग देणार होती.
-
7:49 - 7:50(हास्य)
-
7:50 - 7:52इतरांना तुमच्या स्वप्नातील
नोकरी मिळत आहे. -
7:52 - 7:54तुम्ही ढासळणार आहात.
-
7:54 - 7:55तुम्ही निराधार होणार आहात.
-
7:56 - 7:59कदाचित तसेच थांबा, मागे वळा,
तुमच्या पालकांच्या घरी जाऊन रहा. -
7:59 - 8:01(हास्य)
-
8:01 - 8:02का?
-
8:02 - 8:04"या समोरील माणसामुळे.
-
8:04 - 8:06हा माणूस नाही, राक्षस आहे."
-
8:06 - 8:07(हास्य)
-
8:07 - 8:10हा राक्षस फक्त तुमच्या आयुष्याची नासाडी
करण्यासाठी आला आहे. -
8:11 - 8:12(हास्य)
-
8:12 - 8:14आता ही विचार प्रक्रिया,
-
8:14 - 8:18याला म्हणतात आपत्तीजनन,
जिथे तुम्ही सर्वात वाईट गोष्ट करता. -
8:19 - 8:21हा ज्ञात असणाऱ्या
विचारांच्या प्राथमिक प्रकारांपैकी आहे. -
8:21 - 8:23जो जुनाट क्रोधाशी निगडित आहे.
-
8:23 - 8:25पण असे अजूनही आहेत.
-
8:25 - 8:27चुकीचा कार्यकारणभाव.
-
8:27 - 8:29क्रोधित व्यक्तीचा कल
असंबंधित ठिकाणी दोष देण्याकडे असतो. -
8:29 - 8:31फक्त लोकांना नाही,
-
8:31 - 8:33तर निर्जीव वस्तूंना सुद्धा.
-
8:33 - 8:35जर तुम्हांला वाटतं हे हास्यास्पद आहे,
-
8:35 - 8:38आठवा, तुम्ही गाडीच्या किल्ल्या
हरवल्या तेंव्हा म्हणालात, -
8:38 - 8:40" कुठे गेल्या किल्ल्या?"
-
8:40 - 8:42कारण तुम्ही जाणता, त्या स्वतः पळून गेल्या.
-
8:42 - 8:45(हास्य)
-
8:45 - 8:47हे नेहमी होत असं त्यांना वाटतं
मग ते शब्द वापरतात , "कायम", -
8:47 - 8:50"कधीच नाही ","प्रत्येक",
" हे नेहमी माझ्याच बाबतीत घडतं", -
8:50 - 8:52"मला जे हवं ते मिळत नाही."
-
8:52 - 8:54"आज इकडे येताना
प्रत्येक स्टॉपलाईट जवळ थांबावे लागले." -
8:55 - 8:58मागणी करण्याची वृत्ती: इतरांपेक्षा
स्वतःच्या गरजांना महत्व देतात: -
8:58 - 9:00"देवा, ही व्यक्ती इतकी हळू
वाहन का चालवत आहे, -
9:00 - 9:04त्यांनी वेग वाढवावा वा पुढे वाटचाल करावी
म्हणजे मी मुलाखतीला वेळेवर पोहोचेन." -
9:04 - 9:07आणि शेवटी, प्रक्षोभक नामकरण.
-
9:07 - 9:10ते लोकांना मूर्ख, बावळट, राक्षस म्हणतात
-
9:10 - 9:13किंवा अशा शब्दांचा गठ्ठा
जे इथे उच्चारण्याची मला मुभा नाही. -
9:13 - 9:14या टेड टॉक मध्ये.
-
9:14 - 9:16(हास्य)
-
9:16 - 9:17तर बराच काळ,
-
9:17 - 9:21मानसशास्त्रज्ञांनी याचा उल्लेख
आकलनविषयक विकृती असा केला आहे. -
9:21 - 9:22किंवा अकारण समज सुद्धा.
-
9:22 - 9:25आणि हो, कधीकधी ते अकारण असतात.
-
9:25 - 9:27कदाचित बरेचदा.
-
9:27 - 9:30पण काही वेळा हे विचार
पूर्णपणे तर्कसंगत असतात. -
9:31 - 9:32या जगात अन्याय आहे.
-
9:32 - 9:34क्रूर, स्वार्थी माणसे आहेत.
-
9:34 - 9:38जेव्हा आपल्याला वाईट वागणूक मिळते तेव्हा ,
-
9:38 - 9:41संतापणे फक्त ठीक नाही तर योग्य आहे.
-
9:42 - 9:46माझ्या आजच्या बोलण्यातील
एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ती म्हणजे: -
9:46 - 9:50तुमचा राग
तुमच्यात भावनेच्या रूपात अस्तित्वात आहे. -
9:50 - 9:54कारण त्याने तुमच्या दोन्ही-
मानवी व अमानवी पूर्वजांना -
9:54 - 9:56उत्क्रांतीरूपी लाभ करून दिला आहे.
-
9:57 - 10:00जशी भीती तुम्हाला
संभाव्य धोक्याची सूचना देते, -
10:00 - 10:02तसा क्रोध अन्यायाची सूचना देतो.
-
10:02 - 10:05मेंदूचा तुमच्याशी संपर्क साधण्याचा
तो एक मार्ग आहे. -
10:05 - 10:06की आता पुरे झालं.
-
10:07 - 10:10एवढंच नाही, तो तुम्हाला
अन्यायाचा सामना करायची शक्ती देतो. -
10:10 - 10:14एक सेकंद विचार करा,
मागील वेळी तुम्ही चिडला होता, -
10:14 - 10:15तेव्हा ह्रदयाचे ठोके वाढले होते.
-
10:15 - 10:18तुमचा श्वासोश्वास वाढला,
तुम्हाला घाम आला, -
10:18 - 10:20ही तुमची सिंपँथेटीक मज्जासंस्था आहे.
-
10:20 - 10:23किंवा तिला 'लढा वा पळा' प्रणाली म्हणतात.
-
10:23 - 10:27जी तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी
आवश्यक ती उर्जा देण्यात मदत करते. -
10:28 - 10:30या फक्त
लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत. -
10:30 - 10:34त्याच वेळी, उर्जा वाचवण्यासाठी
तुमच्या पचनसंस्थेचा वेग मंदावला. -
10:34 - 10:36त्यामुळेच तुमचे तोंड कोरडे पडले.
-
10:36 - 10:40आणि अवयवांना रक्तपुरवठा करण्यासाठी
तुमच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावल्या. -
10:40 - 10:42म्हणून तुमचा चेहरा लाल झाला.
-
10:42 - 10:45शारीरिक अनुभवांच्या
गुंतागुंतीच्या प्रकाराचाच हा एक भाग आहे. -
10:45 - 10:46जो आज अस्तित्वात आहे.
-
10:46 - 10:49कारण त्यांनी तुमच्या पूर्वजांना मदत केली.
-
10:49 - 10:53निसर्गाच्या क्रूर व अक्षम्य शक्तींचा
सामना करण्यासाठी. -
10:53 - 10:56आणि समस्या ही आहे की
तुमच्या पूर्वजांनी जी गोष्ट केली, -
10:56 - 10:58रागाचा सामना करण्यासाठी,
-
10:58 - 10:59शारीरिक लढ्यासाठी,
-
10:59 - 11:01त्या आता रास्त व योग्य वाटत नाहीत.
-
11:04 - 11:05कायम चिडून
फायदा नाही. -
11:05 - 11:08(हास्य)
-
11:08 - 11:09पण इथे एक चांगली बातमी आहे.
-
11:09 - 11:11तुम्ही सक्षम आहात
-
11:11 - 11:13ज्यासाठी तुमचे अमानवी पूर्वज सक्षम नव्हते.
-
11:13 - 11:16आणि ती म्हणजे भावनांना काबूत ठेवणे.
-
11:16 - 11:17खूप चिडता तेंव्हाही
-
11:17 - 11:19तुम्ही रागाला वाट करून देऊ शकता.
-
11:19 - 11:22एखाद्या अधिक उत्पादनक्षम गोष्टीकडे.
-
11:22 - 11:24तर ,नेहमी आपण रागाबद्दल बोलतो तेव्हा
-
11:24 - 11:26तो येऊ नये याबद्दल बोलतो.
-
11:26 - 11:29आपण लोकांना शांत व्हा
व आराम करा असे सांगतो. -
11:29 - 11:31आपण लोकांना 'जाऊ द्या'असेही सांगतो.
-
11:31 - 11:33राग वाईट व तो येणे चुकीचे आहे,
असे आपण मानतो. -
11:33 - 11:38पण त्याऐवजी, मला रागाचा
प्रेरक म्हणून विचार करायला आवडते. -
11:39 - 11:42तसेच जसे तहान तुम्हाला
पाणी पिण्यासाठी प्रेरित करते. -
11:42 - 11:45भूक तुम्हाला अन्न खाण्यासाठी प्रेरणा देते.
-
11:45 - 11:48तसा राग तुम्हाला अन्यायाचा प्रतिकार
करण्याची प्रेरणा देऊ शकतो. -
11:48 - 11:51कारण आपण कशासाठी चिडू शकतो हे शोधण्यासाठी
फार विचार करावा लागत नाही. -
11:52 - 11:56जेव्हा आपण
पुन्हा सुरूवातीच्या मुद्द्यांकडे वळतो, -
11:56 - 11:58हो, काही गोष्टी
क्षुल्लक आहेत. -
12:02 - 12:05पण वंशवाद, लैंगिकता, गुंडगिरी,
पर्यावरणाची हानी, -
12:05 - 12:07या गोष्टी वास्तविक व भयानक आहेत.
-
12:07 - 12:10त्यांचे निराकरण करण्याचा एकमेव मार्ग
म्हणजे आधी संतापणे. -
12:11 - 12:14मग लढण्यासाठी
त्या रागाला योग्य वाट करून देणे. -
12:14 - 12:18आणि तुम्ही संताप, शत्रुत्व
किंवा हिंसाचाराने लढा देण्याची गरज नाही. -
12:18 - 12:21राग व्यक्त करण्याचे अमर्याद मार्ग आहेत.
-
12:21 - 12:24तुम्ही विरोध करू शकता,
संपादकांना पत्र लिहू शकता. -
12:24 - 12:27तुम्ही दान करू शकता,
स्वयंसेवक म्हणून कार्य करू शकता. -
12:27 - 12:30तुम्ही कला आणि साहित्य निर्माण करू शकता.
-
12:30 - 12:32तुम्ही कविता व संगीत निर्माण करू शकता.
-
12:32 - 12:34समुदाय तयार करू शकता
जो एकमेकांची काळजी घेतो, -
12:34 - 12:36आणि तसे अत्याचार होऊ देत नाही.
-
12:37 - 12:40तर पुढील वेळेस,
जेव्हा तुम्हांला राग येतोय असे वाटेल; -
12:40 - 12:42तेव्हा तो दाबून न टाकता,
-
12:42 - 12:45मी आशा करतो,
तो काय सांगत आहे हे तुम्ही ऐकून घ्याल. -
12:45 - 12:48सकारात्मक व उत्पादनक्षम गोष्टीद्वारे
तुम्ही त्याला वाट करून द्याल. -
12:49 - 12:50धन्यवाद.
-
12:50 - 12:53(टाळ्या)
- Title:
- आपण का संतापतो -- आणि ते आरोग्यदायी का आहे
- Speaker:
- रायन मार्टिन
- Description:
-
क्रोध संशोधक रायन मार्टिन यांनी माणसाला येणारा राग आणि त्यावेळी मेंदूत घडणाऱ्या क्रिया यांचा सखोल अभ्यास केला आहे व रागाची आरोग्यदायी मात्रा कशी उपयुक्त ठरू शकते यावर संशोधन केले आहे. ते म्हणतात , "तुमचा राग तुमच्यात भावनेच्या रूपात अस्तित्वात आहे कारण त्याने तुमच्या दोन्ही- मानवी व अमानवी पूर्वजांना उत्क्रांतीरूपी लाभ करून दिला आहे. ती तुमच्या जीवनातील प्रबळ व आरोग्यदायी शक्ती आहे."
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 13:06
Abhinav Garule approved Marathi subtitles for Why we get mad -- and why it's healthy | ||
Smita Kantak accepted Marathi subtitles for Why we get mad -- and why it's healthy | ||
Smita Kantak edited Marathi subtitles for Why we get mad -- and why it's healthy | ||
ASAVARI KULKARNI edited Marathi subtitles for Why we get mad -- and why it's healthy | ||
ASAVARI KULKARNI edited Marathi subtitles for Why we get mad -- and why it's healthy | ||
ASAVARI KULKARNI edited Marathi subtitles for Why we get mad -- and why it's healthy | ||
ASAVARI KULKARNI edited Marathi subtitles for Why we get mad -- and why it's healthy | ||
ASAVARI KULKARNI edited Marathi subtitles for Why we get mad -- and why it's healthy |