मुलींचा आवाज दाबणाऱ्या सात सवयी नष्ट कशा कराव्यात.
-
0:01 - 0:04शाह रुख खान:
मुलींनी छान दिसावं. बोलू नये. -
0:04 - 0:06गप्प बसा. चूप.
-
0:06 - 0:09हे शब्द वापरून मुलींना गप्प केलं जातं.
अगदी बालपणापासून, -
0:09 - 0:11प्रौढपणी, आणि
-
0:11 - 0:12थेट म्हातारपणापर्यंत.
-
0:12 - 0:16यापुढील वक्त्यांची ओळख:
स्त्रीशक्तीच्या खऱ्याखुऱ्या पुरस्कर्त्या. -
0:16 - 0:18जागतिक बँक, युनो
आणि देशविदेशांतील -
0:18 - 0:20अनेक एनजीओ संस्थांच्या
-
0:20 - 0:24गरिबी, लैंगिकता आणि विकास
या विषयांबद्दलच्या सल्लागार. -
0:24 - 0:28त्या स्वतःला
सांस्कृतिक गुप्तहेर म्हणवतात. -
0:28 - 0:32या सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आणि लेखिकेचं
जोरदार स्वागत करू. -
0:32 - 0:34दीपा नारायण.
-
0:34 - 0:36(संगीत)
-
0:36 - 0:40(टाळ्या)
-
0:45 - 0:47सर्व प्रेमळ पालकांना
वाटतं, की -
0:47 - 0:49मुलींचं चांगल्या रीतीने
संगोपन करावं. -
0:49 - 0:51पण प्रत्यक्षात मात्र ते
-
0:51 - 0:55मुलींवर बंधनं घालून
त्यांना चिरडून टाकतात. -
0:55 - 0:57त्यांची मनं चिरडून टाकून
-
0:57 - 0:59त्यांना छळ सोसायला तयार करतात.
-
1:00 - 1:02खरं तर हे इतकं भयानक आहे, की
-
1:02 - 1:05पालकांना ते सहन होत नाही. म्हणून,
-
1:05 - 1:06त्याचं रूप बदललं जातं.
-
1:06 - 1:09भारतात आम्ही त्याला "तडजोड" असं म्हणतो.
-
1:09 - 1:11हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल.
-
1:12 - 1:14"डार्लिंग, जरा जुळवून घे ना थोडंसं.
-
1:14 - 1:15फक्त थोडंसं जुळवून घे.
-
1:15 - 1:18काहीही घडलं, तरी जरा तडजोड कर. "
-
1:18 - 1:22"तडजोड" मुलींना शिकवते, शक्तिहीन बना.
-
1:22 - 1:24जगू नका. अदृश्य रहा.
-
1:24 - 1:26स्वत्व विसरा.
-
1:26 - 1:33आणि ती मुलांना शिकवते,
जगावर सत्ता गाजवा. ताकद दाखवा. -
1:33 - 1:38हे सगळं घडत असतानाच आपण लिंगसमभाव
आणि महिलांचं सक्षमीकरण याबद्दल बोलत असतो. -
1:38 - 1:44२०१२ मध्ये दिल्लीत चालत्या बसमध्ये
घडलेल्या सामूहिक बलात्कारानंतर -
1:44 - 1:49मला छळामागची कारणं जाणून घेण्याची
गरज वाटू लागली. -
1:49 - 1:52म्हणून मी एक साधा प्रश्न विचारू लागले.
-
1:52 - 1:57आजच्या युगात, एक चांगली स्त्री किंवा
चांगला पुरुष असणं, म्हणजे काय? -
1:58 - 2:01यावर आलेल्या उत्तरांचं, खास करून
तरुण पिढीच्या उत्तरांचं, -
2:01 - 2:05मला इतकं आश्चर्य वाटलं, की
-
2:05 - 2:10हा माझ्या संशोधनाचा प्रकल्प बनला आणि
त्याने माझं आयुष्य व्यापून टाकलं. -
2:10 - 2:16तीन वर्षांत मी ६०० स्त्रिया, पुरुष
आणि मुलांशी बोलले. -
2:16 - 2:17हे सर्व सुशिक्षित, मध्यमवर्गीय होते.
-
2:18 - 2:22मी एकूण १८०० तास त्यांचं बोलणं ऐकलं,
-
2:22 - 2:24आणि त्याबद्दल ८००० पानं भरून टिपणं लिहिली.
-
2:24 - 2:26त्यांचा अर्थ लावायला मला
आणखी एक वर्ष लागलं. -
2:26 - 2:32आजकाल सर्वत्र आपण सुशिक्षित,
सुरेख पोषाखातल्या स्त्रिया पाहतो. -
2:32 - 2:35आज इथे जमलेल्या स्त्रिया किंवा
मीही दिसते, तशाच. -
2:35 - 2:38त्यामुळे आपल्याला वाटतं, की जग बदललं आहे.
-
2:38 - 2:42पण हे बाह्य बदल पूर्णपणे
दिशाभूल करणारे आहेत. -
2:42 - 2:45कारण आपल्यामध्ये अंतर्गत बदल
झालेलेच नाहीत. -
2:46 - 2:49म्हणून, आज इथे मी
गरिबांविषयी बोलणार नाही. -
2:49 - 2:52आज मी मध्यमवर्ग आणि उच्चवर्गाविषयी
बोलणार आहे. -
2:52 - 2:55कारण हाच वर्ग या सत्याकडे सर्वात जास्त
डोळेझाक करतो. -
2:55 - 2:59आपण फक्त पुन्हा पुन्हा म्हणत राहतो, की
-
2:59 - 3:01स्त्रियांना शिक्षण मिळालं,
-
3:01 - 3:03नोकऱ्या मिळाल्या,
-
3:03 - 3:05त्या कमावत्या झाल्या, की
-
3:05 - 3:08त्यांना समान हक्क मिळतील,
त्या सक्षम होतील, मुक्त होतील. -
3:09 - 3:10तसं झालेलं नाही.
-
3:10 - 3:11का?
-
3:11 - 3:15माझ्या संशोधनातून मला
सात सवयी सापडल्या आहेत. -
3:15 - 3:17त्या स्त्रियांना मिटवून टाकतात.
-
3:17 - 3:19त्यांना पार अदृश्य करून टाकतात.
-
3:19 - 3:21पण या सवयी समाजात टिकून राहिल्या आहेत,
-
3:21 - 3:24कारण त्या आपल्या ओळखीच्या आहेत.
-
3:24 - 3:26त्यांना आपण चांगल्या, सोज्वळ सवयी मानतो.
-
3:27 - 3:30अर्थात, चांगल्या, सोज्वळ गोष्टी कोणी
कशाला बदलेल, किंवा सोडून देईल? -
3:32 - 3:34एकीकडे आपण आपल्या अपत्यांवर प्रेम करतो.
-
3:34 - 3:35मुलींवर प्रेम करतो.
-
3:35 - 3:37आणि दुसरीकडे त्यांना चिरडून टाकतो.
-
3:39 - 3:42पहिली सवय: मुलींना शरीर नसतं.
-
3:43 - 3:49मुलीला नाहीसं करण्याची पहिली पायरी
म्हणजे तिचं शरीर नाहीसं करणं. -
3:49 - 3:51तिला शरीर नाही अशी बतावणी करणं.
-
3:51 - 3:54२३ वर्षे वयाची आकांक्षा म्हणते,
-
3:54 - 3:58"आमच्या घरी आम्ही कधीच शरीराबद्दल
बोलत नाही. कधीच नाही." -
3:58 - 4:00आणि याच अबोल शांततेमुळे
-
4:00 - 4:04करोडो मुलींवर लैंगिक अत्याचार होतात,
-
4:04 - 4:07पण त्या आपल्या आईलासुद्धा
त्याबद्दल सांगत नाहीत. -
4:08 - 4:10इतरांच्या नकारात्मक टिपण्या ऐकून
-
4:10 - 4:15९० टक्के मुलींना स्वतःचंच शरीर
आवडेनासं होतं. -
4:15 - 4:18एखाद्या मुलीने स्वतःचं शरीर नाकारणं म्हणजे
-
4:18 - 4:20स्वतःचं हक्काचं एकमेव घर नाकारणं.
-
4:20 - 4:23मग अदृष्यपणा आणि असुरक्षित भावना
-
4:23 - 4:25हा तिच्या आयुष्याचा डळमळीत पाया ठरतो.
-
4:25 - 4:29दुसरी सवय: गप्प राहा. चूप.
-
4:30 - 4:32तुला अस्तित्वच नाही,
-
4:32 - 4:33शरीरही नाही.
-
4:33 - 4:35मग तुला आवाज तरी कसा असेल?
-
4:35 - 4:37अगदी सर्वच स्त्रियांनी मला सांगितलं,
-
4:37 - 4:41"लहानपणी आई ओरडायची.
-
4:41 - 4:44म्हणायची, बोलू नकोस. गप्प बस. चूप.
-
4:44 - 4:48हळू बोल. वाद घालू नकोस.
उलट उत्तरं देऊ नकोस. -
4:48 - 4:49उलटून बोलू नकोस."
-
4:49 - 4:51तुम्ही सर्वांनीही हे ऐकलं असेल.
-
4:52 - 4:54यामुळे मुली घाबरतात, आणि मिटून जातात.
-
4:54 - 4:58त्या गप्प होतात, आणि म्हणतात,
-
4:58 - 4:59"सोडून देऊ. जाऊ दे.
-
5:00 - 5:01काय उपयोग? कोणी ऐकणार नाही."
-
5:02 - 5:04सुशिक्षित स्त्रिया म्हणाल्या,
-
5:04 - 5:06आमची सर्वात मोठी समस्या म्हणजे
-
5:06 - 5:09धीटपणे बोलता न येणं.
-
5:09 - 5:12जणु आम्ही बोललो तर
कोणी गळ्यावर टाच लावून -
5:12 - 5:13गळाच दाबणार आहे.
-
5:14 - 5:17बोलता न आल्यामुळे स्त्रियांच्या
व्यक्तिमत्त्वाचे तुकडे पडतात. -
5:19 - 5:22तिसरी सवय: लोकांना खूष करा.
-
5:22 - 5:24इतरांना खूष करा.
-
5:24 - 5:27सतत हसणारी, कशालाच नकार न देणारी,
-
5:27 - 5:29कोणी शोषण केलं तरीही न रागावणारी
-
5:29 - 5:31अशी छानशी स्त्री सर्वांनाच आवडते.
-
5:31 - 5:34१८ वर्षे वयाची अमिषा म्हणाली,
-
5:34 - 5:36"माझे वडील म्हणत,
-
5:36 - 5:39तू हसताना दिसली नाहीस तर
मला काही बरं वाटत नाही." -
5:40 - 5:41म्हणून ती हसते.
-
5:42 - 5:44म्हणजे तिच्या वडिलांनी तिला शिकवलं, की
-
5:44 - 5:48तुझ्या आनंदापेक्षा
माझा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. -
5:48 - 5:52सतत सर्वांना खूष ठेवण्याचा
प्रयत्न करत राहिल्यामुळे -
5:52 - 5:55मुली निर्णय घ्यायला घाबरतात.
-
5:56 - 5:59त्यांना काही विचारलं, की म्हणतात,
-
5:59 - 6:01"काही चालेल. कुछ भी.
-
6:02 - 6:04मला सगळं चालतं. चलता है."
-
6:05 - 6:07२५ वर्षे वयाची दर्शा
-
6:07 - 6:09मोठ्या अभिमानाने सांगते,
-
6:09 - 6:12"मी अगदी लवचिक आहे.
-
6:12 - 6:15इतरांना जशी हवी तशी मी होऊ शकते."
-
6:16 - 6:18अशा मुली आपली स्वप्नं विसरून जातात.
-
6:18 - 6:20इच्छा विसरून जातात.
-
6:20 - 6:22आणि कोणाला त्याची दखल नसते.
-
6:22 - 6:23एक नैराश्य सोडून.
-
6:24 - 6:25ते त्यांना ग्रासतं.
-
6:26 - 6:29त्यांच्या व्यक्तिमत्वाचा
आणखी एक तुकडा निखळून पडतो. -
6:31 - 6:34चौथी सवय: तुम्हांला लैंगिकता नाही.
-
6:35 - 6:39१.३ अब्ज लोकसंख्येच्या आपल्या देशात
-
6:39 - 6:41लैंगिकता ही काही नवी गोष्ट नव्हे.
-
6:42 - 6:47नवी गोष्ट ही, की
स्त्रीला लैंगिक इच्छा असण्याचा हक्क आहे, -
6:47 - 6:50हे आता मान्य होऊ लागलं आहे.
-
6:51 - 6:55पण ज्या स्त्रीला स्वतःचं शरीर
स्वतःच्या मालकीचं असण्याची मुभा नाही, -
6:55 - 6:57जिला स्वतःच्या शरीराबद्दल
शिक्षण दिलं जात नाही, -
6:57 - 6:59जिच्यावर कदाचित लैंगिक अत्याचार
झाले असतील, -
7:00 - 7:01जिला नाही म्हणता येत नाही,
-
7:01 - 7:03आणि जिला स्वतःची शरम वाटत असेल,
-
7:03 - 7:06ती स्वतःची लैंगिक इच्छापूर्ती कशी करणार?
-
7:06 - 7:09स्त्रीची लैंगिकता दडपली गेली आहे.
-
7:11 - 7:14पाचवी सवय: स्त्रियांवर विश्वास ठेवू नका.
-
7:15 - 7:17कल्पना करा, सर्व स्त्रियांची एकजूट झाली,
-
7:17 - 7:20तर जग किती बदलेल.
-
7:20 - 7:23आणि नेमकं हेच होऊ नये, म्हणून
-
7:23 - 7:26आमची संस्कृती पुरुषांशी इमान राखणे,
कुटुंबातल्या गोष्टी गुप्त ठेवणे -
7:26 - 7:30अशा गोष्टींना मोठं नैतिक महत्त्व देते.
-
7:30 - 7:32एकामागून एक स्त्रियांनी सांगितलं,
-
7:32 - 7:34"माझा फक्त एकाच स्त्रीवर विश्वास आहे.
-
7:34 - 7:36आणि ती स्त्री म्हणजे मी स्वतः."
-
7:36 - 7:38३० वर्षे वयाची रुचि
-
7:38 - 7:41दिल्ली विद्यापीठात स्त्रियांच्या
सबलीकरणावर काम करते. तीदेखील म्हणाली, -
7:42 - 7:45"माझा स्त्रियांवर विश्वास नाही.
त्या मत्सरी असतात, पाठीत खंजीर खुपसतात." -
7:45 - 7:47साहजिकच, शहरांमधून
-
7:47 - 7:49स्त्रिया महिला गटांत सामील होत नाहीत.
-
7:49 - 7:52यामागचं कारण विचारल्यावर सांगतात,
"मला कुचाळक्या करायला वेळ नाही." -
7:53 - 7:57एकट्या स्त्रीला नेस्तनाबूत करणं
जास्त सोपं असतं. -
7:58 - 8:02सहावी सवय: आपल्या इच्छेपेक्षा
कर्तव्य महान. -
8:03 - 8:07चांगल्या मुलीची ही लांबलचक व्याख्या
सांगणारी मुस्कान फक्त १५ वर्षांची आहे. -
8:07 - 8:10"दयाळू, मृदु स्वभावाची, नम्र, प्रेमळ,
काळजी घेणारी, -
8:10 - 8:12सत्यवचनी, आज्ञाधारक, मोठ्यांचा आदर करणारी,
-
8:12 - 8:16विनाअट मदत करणारी, चांगुलपणाने वागणारी,
आणि आपली कर्तव्ये पार पाडणारी." -
8:18 - 8:20बाप रे!
-
8:20 - 8:23कर्तव्य पार पाडून होईपर्यंत
-
8:23 - 8:26उरलीसुरली इच्छा नाहीशी होणारच.
-
8:26 - 8:30मग जेव्हा त्यागमूर्ती आईजवळ
-
8:30 - 8:31जेवणाखेरीज दुसरा विषय उरत नाही,
-
8:31 - 8:35फक्त "जेवलास का? जेवायला काय करू?"
-
8:35 - 8:39तेव्हा २४ वर्षीय सौरभ सारखे पुरुष
त्यांना "कंटाळवाणी आई" म्हणतात. -
8:40 - 8:43स्त्री केवळ अवशेषमात्र उरते.
-
8:43 - 8:47सातवी सवय: पूर्णपणे परावलंबी व्हा.
-
8:47 - 8:50या सर्व सवयी स्त्रीला चिरडून टाकतात.
-
8:50 - 8:52तिचं मन भीतीने भरून टाकतात.
-
8:52 - 8:55आणि आपल्या चरितार्थासाठी पूर्णपणे
पुरुषांवर अवलंबून राहायला भाग पाडतात. -
8:56 - 8:59यामुळे पुरुषी वर्चस्व कायम राहतं.
-
9:00 - 9:05म्हणजे, चांगल्या आणि नैतिक
समजल्या गेलेल्या या सात सवयी -
9:05 - 9:08मुलींचं आयुष्य ओरबाडून घेतात,
-
9:08 - 9:10आणि पुरुषांना छळ करू देतात.
-
9:11 - 9:13आपण बदललं पाहिजे.
-
9:13 - 9:14बदलायचं कसं?
-
9:15 - 9:17एक सवय म्हणजे फक्त एक सवय, इतकंच.
-
9:18 - 9:20प्रत्येक सवय आपण लावून घेतलेली असते.
-
9:20 - 9:22तशीच ती आपण मोडूही शकतो.
-
9:22 - 9:24स्वतःमधला हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे.
-
9:24 - 9:27मला सुद्धा बदलावं लागलं होतं.
-
9:27 - 9:29पण यामुळे करोडो स्त्रियांना
-
9:29 - 9:31चिरडून टाकणारा समाज बदलणार नाही.
-
9:32 - 9:34म्हणून आपल्याला पार मुळापर्यंत जायला हवं.
-
9:34 - 9:39चांगली स्त्री किंवा चांगला पुरुष असणं
या शब्दांचे अर्थ बदलायला हवेत. -
9:39 - 9:42कारण प्रत्येक समाजाचा हा पाया आहे.
-
9:42 - 9:47आपल्याला लवचिक स्त्रिया नकोत,
लवचिक व्याख्या हव्यात. -
9:47 - 9:48पुरुषांसाठी सुद्धा.
-
9:48 - 9:54हा मोठा सामाजिक बदल पुरुषांच्या
सहभागाशिवाय घडून येणार नाही. -
9:54 - 9:55आम्हांला तुमची गरज आहे.
-
9:55 - 9:58बदलाला पाठिंबा देणाऱ्या पुरुषांची गरज आहे,
-
9:58 - 10:01जोरदार बदल घडवून आणण्यासाठी.
-
10:01 - 10:04नाहीतर आपल्या मुलींचं आणि मुलांचं
-
10:04 - 10:06आयुष्य सुरक्षित आणि मुक्त व्हायला
-
10:06 - 10:07दोन शतकं लागतील.
-
10:08 - 10:15कल्पना करा, अर्धा अब्ज स्त्रिया
एकत्र येऊन, पुरुषांच्या पाठिंब्यासहित -
10:15 - 10:18एकमेकांशी वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर
-
10:18 - 10:20बदल घडवण्यासंबंधी संवाद साधताहेत.
-
10:20 - 10:22पुरुष आपल्या वर्तुळांत हाच संवाद करताहेत.
-
10:22 - 10:26स्त्रिया आणि पुरुष एकत्र येऊन
एकमेकांचं बोलणं ऐकून घेताहेत. -
10:26 - 10:29कोणाला दोषी न ठरवता.
-
10:29 - 10:32आरोप न ठेवता, शरम न बाळगता,
-
10:32 - 10:34कल्पना करा, आपण किती बदलून जाऊ.
-
10:34 - 10:36आपण सगळे मिळून हे करू शकतो.
-
10:36 - 10:38स्त्रियांनो, जुळवून घेऊ नका.
-
10:39 - 10:41पुरुषांनो, तडजोड करा.
-
10:42 - 10:44ती वेळ आता आली आहे.
-
10:44 - 10:45धन्यवाद.
-
10:45 - 10:49(टाळ्या)
-
10:50 - 10:51फार चांगलं व्याख्यान. सुरेख.
-
10:51 - 10:53सर्वांतर्फे अभिवादन, दीपा.
-
10:53 - 10:55त्यांचं व्याख्यान ऐकताना
मला जाणवलं, की -
10:55 - 10:58स्त्रियांसोबतचं आपलं साधं बोलणंसुद्धा
-
10:58 - 11:00किती आक्रमक असतं.
-
11:00 - 11:03उदाहरणार्थ, माझ्या मुलीला
मी कधीकधी म्हणतो, -
11:03 - 11:06"तू हसलीस की मला बरं वाटतं,
नाहीतर वाईट वाटतं." -
11:06 - 11:08मी पुन्हा असं कधीच म्हणणार नाही.
-
11:08 - 11:10आजपासून मी माझ्या मुलीला सांगेन,
-
11:10 - 11:11तू जे करशील ते मला आवडेल.
-
11:11 - 11:14आणि मला नाही आवडलं,
तर माझ्याकडे दुर्लक्ष कर. -
11:14 - 11:17तुला जे आवडेल, तेच तू कर. बरोबर?
-
11:17 - 11:20हो. (टाळ्या)
-
11:20 - 11:21अपुऱ्या कहाण्या, इच्छा,
-
11:21 - 11:27न मिळालेलं स्वातंत्र्य
याबद्दल प्रथम ऐकताना -
11:27 - 11:28तुम्हांला काय वाटलं?
-
11:28 - 11:33तेही सुस्थितीत असाव्यात,
असं वाटणाऱ्या मुलींकडून. -
11:33 - 11:34फार निराश वाटलं.
-
11:34 - 11:37मला धक्का बसला.
म्हणूनच मी तिथे थांबू शकले नाही. -
11:37 - 11:41त्याआधी असं काही संशोधन करून
पुस्तक लिहिण्याचा माझा बेत नव्हता. -
11:41 - 11:45यापूर्वी मी १७ पुस्तकं लिहिली आहेत.
आणि मला वाटलं होतं, की माझं कार्य संपलं. -
11:45 - 11:47मी दिल्लीमधल्या सेंट स्टीफन्स कॉलेजसारख्या
-
11:47 - 11:52अनेक उच्चभ्रू कॉलेजांत गेले.
-
11:52 - 11:54एक स्त्री किंवा एक पुरुष असणं म्हणजे काय
-
11:54 - 11:58याविषयीची तिथल्या तरुण मुलामुलींची
मतं ऐकली. -
11:58 - 12:02ती मतं मला माझ्या नव्हे, तर
माझ्या आईच्या पिढीतली वाटली. -
12:02 - 12:05मग मी आणखी निरनिराळ्या कॉलेजांमध्ये गेले.
-
12:05 - 12:06मला सर्वात प्रकर्षाने जाणवलं, की
-
12:06 - 12:10प्रत्येक स्त्रीला एकटेपणा वाटतो,
-
12:10 - 12:13ती आपली भीती आणि आपली वागणूक दडवते,
-
12:13 - 12:15कारण तिला तो आपला स्वतःचा दोष वाटतो.
-
12:16 - 12:19हा आपला दोष नव्हे, तर
आपल्याला मिळालेली शिकवणूक. -
12:19 - 12:21याबद्दल लक्षात आलेली
सर्वात मोठी गोष्ट अशी, -
12:21 - 12:25की आपण हे ढोंग बंद केलं,
-
12:25 - 12:27की जग बदलतं.
-
12:27 - 12:29मुलींनो, दीपा यांचं म्हणणं
पटतं आहे का तुम्हांला? -
12:29 - 12:32(टाळ्या)
-
12:32 - 12:34ती पहा, ती मुलगी म्हणते आहे,
-
12:34 - 12:37"त्या काय म्हणाल्या ते ऐकलंस?
तू मला हेच सांगतोस." -
12:37 - 12:38हो. असंच असायला हवं.
-
12:38 - 12:41तू, मुला, तू तडजोड कर.
यापुढे आम्ही तडजोड करणार नाही. -
12:41 - 12:43(टाळ्या)
-
12:43 - 12:45आभारी आहे.
-
12:45 - 12:46(टाळ्या)
- Title:
- मुलींचा आवाज दाबणाऱ्या सात सवयी नष्ट कशा कराव्यात.
- Speaker:
- दीपा नारायण
- Description:
-
समाजशास्त्रज्ञ दीपा नारायण म्हणतात, भारतात आणि इतर अनेक देशांत आजही नम्रतेच्या आणि मर्यादांच्या पारंपरिक नियमांखाली मुली आणि स्त्रियांचा आवाज दाबून टाकला जातो. या सडेतोड व्याख्यानात त्यांनी समाजात खोलवर रुजलेल्या, असमानता वाढवणाऱ्या सात सवयी सांगितल्या आहेत, आणि बदल घडवून आणण्यात पुरुषांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं आहे.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 12:59
Abhinav Garule approved Marathi subtitles for 7 beliefs that can silence women -- and how to unlearn them | ||
Arvind Patil accepted Marathi subtitles for 7 beliefs that can silence women -- and how to unlearn them | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for 7 beliefs that can silence women -- and how to unlearn them | ||
Smita Kantak edited Marathi subtitles for 7 beliefs that can silence women -- and how to unlearn them | ||
Smita Kantak edited Marathi subtitles for 7 beliefs that can silence women -- and how to unlearn them | ||
Smita Kantak edited Marathi subtitles for 7 beliefs that can silence women -- and how to unlearn them | ||
Smita Kantak edited Marathi subtitles for 7 beliefs that can silence women -- and how to unlearn them | ||
Smita Kantak edited Marathi subtitles for 7 beliefs that can silence women -- and how to unlearn them |