Return to Video

Unplugged - Variables in Envelopes

  • 0:23 - 0:26
    या धड्याचं नाव आहे पाकीटातली व्हेरीएबल्स.
  • 0:26 - 0:30
    आपल्याकडं काही माहिती उपलब्ध नसतानासुद्धा आपण वाक्यं कशी तयार करू शकतो, हे आपण शिकणार आहोत.
  • 0:30 - 0:34
    आपल्यापैकी बऱ्याच लोकांना गाळलेल्या जागा
    भरा ही संकल्पना माहिती आहे.
  • 0:34 - 0:37
    आपण आपलं नाव गृहपाठात लिहितानासुद्धा
    हे करतो.
  • 0:37 - 0:41
    कधीकधी, एकापेक्षा जास्त गाळलेल्या जागा
    भरायच्या असतात आणि अशावेळी
  • 0:42 - 0:46
    आपण त्या रिकाम्या जागेला एक नाव देतो
    म्हणजे आपल्याला कुठली माहिती कुठं भरायची ते कळेल.
  • 0:47 - 0:51
    आपण जी माहिती बदलू शकतो त्या जागी प्लेसहोल्डर्स
    म्हणून व्हेरीएबल्स वापरले जातात.
  • 0:51 - 0:56
    नसलेल्या माहितीसाठी व्हेरीएबल वापरून, आपण
    जे काही करत होतो त्यावर काम करण्याकडे परत जाऊ शकतो
  • 0:56 - 1:00
    आणि कोणालातरी ती माहिती नंतर भरायला
    सांगू शकतो.
  • 1:00 - 1:02
    सॉफ्टवेअरमध्ये, आपण खूप वेळा
    व्हेरीएबल्स वापरतो.
  • 1:03 - 1:07
    आपण नाव, इमेल पत्ता आणि अगदी युजरच्या नावासाठीसुद्धा प्लेसहोल्डर्स म्हणून व्हेरीएबल्स वापरतो.
  • 1:07 - 1:10
    अशाप्रकारे, आपण हा तपशील युजरने
    भरल्यावर कुठे दिसेल,
  • 1:10 - 1:12
    ते प्रोग्रॅमला सांगतो.
  • 1:13 - 1:15
    आम्ही आमच्या कामात नेहमी
    व्हेरीएबल्स वापरतो.
  • 1:15 - 1:20
    तुम्हाला कोणत्याही वेळी नंतर वापरण्यासाठी माहिती साठवायची असेल तर आपण व्हेरीएबल वापरतो.
  • 1:21 - 1:24
    समजा आपल्याला युजरनं कितीवेळा
    ट्विट केलं आहे हे मोजायचं आहे.
  • 1:26 - 1:29
    युजरनं प्रत्येकवेळा ट्विट केलं की
    आपण त्या संख्येत एक मिळवू.
  • 1:29 - 1:32
    आणि प्रत्येकवेळी युजरनं ट्विट डीलीट केलं की
    आपण त्या संख्येतून एक वजा करू.
  • 1:33 - 1:36
    आपल्याला कोणात्याही वेळी युजरनं कितीवेळा ट्विट केलं ती संख्या हवी असेल तेव्हा
  • 1:36 - 1:38
    आपण फक्त तो व्हेरीएबल बघू.
Title:
Unplugged - Variables in Envelopes
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
01:43

Marathi subtitles

Revisions