Marathi subtitles

← मनुष्य ताऱ्यांवर कसा पोहोचू शकतो

Get Embed Code
38 Languages

Showing Revision 40 created 10/31/2020 by Vijay Nandurdikar.

 1. आपण सर्व जमले आहोत
  युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियात,
 2. मानवजातीला पडलेल्या एका स्वप्नावर
  चर्चा करण्यासाठी:
 3. आपली सूर्यमाला मागे सारून
 4. एका नवीन सूर्यमालेत प्रवेश करण्यासाठी.
 5. आणि याचे उत्तर हे अगदी
  आपल्या डोळ्यासमोर आहे.
 6. तर माझ्याजवळ आता दोन गोष्टी आहेत
  - एक म्हणजे घड्याळ,

 7. आणि एक आहे फ्लॅशलाईट,
 8. जे तुमच्याजवळ नसलं तरी
  तुमच्या मोबाइलवर आहेच.
 9. तर, घड्याळ हे वेळ दर्शवते,
 10. आणि फ्लॅशलाईट माझ्या
  सभोवतालाला प्रकाशित करते.
 11. तेंव्हा माझ्यासाठी, एखादया कलेप्रमाणे
  विज्ञान हे प्रकाशित होतं असत.
 12. मला सत्य दुसऱ्या बाजूने पहायचंय.
 13. जेंव्हा मी फ्लॅशलाईट चालू करतो,
 14. अचानक अंधार नाहीस होऊन उजेड पडतो
  आणि मी अचानक पाहू शकतो.
 15. फ्लॅशलाईट आणि त्याचा प्रकाश,

 16. जो बाहेर पडताना तुम्ही पाहता..
 17. माझ्या हातावरील प्रकाश
  हातच प्रकाशीत करत नाही तर,
 18. खरंतर माझा हात ढकलतो देखील.
 19. प्रकाश ऊर्जा आणि मोमेंटम (गती)
  सोबत घेत असतो.
 20. तर उत्तर हे अवकाशयानाला
  फ्लॅशलाईट सारखे बनवण्यात नसून,
 21. कि ज्यात ज्वलन एका बाजूला होऊन
 22. यान दुसऱ्या बाजूला झेपावते...
 23. जे कि आपण आजच्या रसायन विज्ञानात करतो .
 24. तर उत्तर आहे कि :
 25. एक फ्लॅशलाईट घ्या आणि
  पृथ्वीच्या पटलावर,
 26. चंद्राच्या कक्षेवर सोडा,
 27. आणि एका रिफ्लेक्टरवर
  परावर्तित करा
 28. ज्याने रिफ्लेक्टरला गती मिळेल
  जी प्रकाशाच्या गतीला प्राप्त होऊ शकेल,
 29. आता, फ्लॅशलाईटला एवढा
  मोठा कसा करणार?

 30. हे तर काही जमणार नाही.
 31. माझा हात कुठेही जाताना दिसत नाहीये.
 32. आणि ह्याच कारण कि फोर्स
  खूपच कमी आहे.
 33. तर, ह्या समस्येचे समाधान असे असेल
 34. कि खूप सारे फ्लॅशलाईट घ्या,
  जे खरेतर लेसर असतील,
 35. आणि त्यांना वेळशी समक्रमित करा,
 36. आणि जेंव्हा तुम्ही त्यांना एका
  मोठ्या रचनेत एकत्र कराल,
 37. ज्याला आपण फेसड अरे म्हणू,
 38. आता तुमच्याजवळ एक शक्तीशाली प्रणाली असेल,
 39. कि, जी साधारण एक शहराच्या आकाराएवढी असेल,
 40. ते तुमचा अवकाशयान ढकलेल,
  जे तुमच्या हाताच्या आकाराएवढा असेल
 41. जे प्रकाशाच्या साधारण २५%
  एवढ्या गतीला प्राप्त होईल.
 42. ह्या मुळे आपल्याला आपल्या सर्वात
  जवळच्या ताऱ्यापाशी प्रोक्सिमा सेनताउरीपाशी
 43. जो ४ प्रकाशवर्षं इतका दूर आहे,
 44. २० वर्षांच्या पेक्षा कमी अवधीत पोहोचू.
 45. प्रारंभिक प्रोब हे साधारण
  हाताच्या आकारा एवढे असतील,

 46. आणि तुम्ही जे रिफ्लेक्टर वापरणार आहात
 47. साधारण एका माणसाच्या आकाराएव्हढे असेल,
 48. म्हणजे सर्व अगदी माझ्यापेक्षा मोठं नाही,
 49. पण काही मीटर आकाराएव्हढं असेल.
 50. हे फक्त प्रचंड लेसर अरे मधून येणाऱ्या
  प्रकाशाच्या परिवर्तनाचा उपयोग करेल
 51. जे अवकाश यानाला गती देईल.
 52. आता आपण ह्याबद्दल बोलूया.

 53. हे काही समुद्रावर नौकाविहार
  करण्यासारखा नाहीये.
 54. तुम्ही जेंव्हा समुद्रावर विहार करता,
  तेंव्हा वाऱ्याने ढकलला जाता.
 55. आणि तो वारा तुम्हाला
  पाण्यामध्ये पुढे नेतो.
 56. आपल्या बाबतीत मात्र आपण अवकाशात
  एक कृत्रिम वारा तयार करत आहोत
 57. ह्या लेसरच्या सहाय्याने.
 58. मात्र लेसरमधील फोटोंस
  खरंतर तेंव्हा वारा असेल,
 59. लेसर मधील प्रकाश हाच वारा बनेल
 60. ज्यावर आपण विहार करू शकू.
 61. हा प्रकाश खूप दिशादर्शक असेल -
 62. ह्याला ढोबळमानाने दिशादर्शक शक्ती म्हणूया.
 63. तर हे आज एक शक्य आहे,

 64. आपण आज ताऱ्यांवर पोहोचण्याची
  भाषा का करत आहोत,
 65. ६० वर्षांपूर्वी,
 66. जेंव्हा अंतराळ कार्यक्रम सुरू झाला,
 67. लोकांनी तेंव्हा म्हंटलं असतं
  हे काही शक्य नाही
 68. ह्याच कारण बर्याच अंशी आजच्या
  उपभोक्त्याशी निगडित आहे
 69. आणि प्रत्यय म्हणजे तुम्ही मला बघू शकता
 70. तुम्ही मला एका जलद इंटरनेट द्वारे पाहत आहत
 71. ज्यावर फायबर ऑप्टिक्सद्वारे
  माहिती देणाऱ्या फोटोनिक्सचे वर्चस्व आहे
 72. इंटरनेट खरंतर फोटोनिक्समुळे अस्तित्वात आहे
 73. आणि ते आजतागायत आहे.
 74. प्रचंड माहिती क्षणार्धात पाठवण्याच्या
 75. ह्याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपण
 76. अवकाशयान ताऱ्यांपर्यंत
  अगदी जलद पोहोचवू शकू
 77. तुमच्याजवळ इंधनाचा अनंत साठा आहे

 78. तुम्ही हवं तेंव्हा चालू -बंद करू शकता.
 79. तुम्हाला लेसर अरे सोडायची गरज नाही
  जो प्रकाश तयार करतो
 80. संपूर्ण प्रवासासाठी.
 81. एक लहान अवकाश्यनासाठी अगदी मिनिटभर
 82. आणि नंतर एका बंदुकीच्या गोळीप्रमाणे
 83. तुमचा मार्ग एखाद्या क्षेपणासरासारखा असणार
 84. आपण मनुष्य म्हणून त्या अवकाशयानावर
  बसलो जरी नसू
 85. पण कमीत कमी आपल्याकडे क्षमता आहे
  की आपण अशी याने पाठवू शकू
 86. तुम्हाला लांबून बघावं लागणार

 87. किंवा रेमोट इमेजिंगआणि सेनसिंगचा वापर करून
 88. गोष्टी बघाव्या लागणार
 89. उदाहरणार्थ, जर आपण गुरू ग्रहावर गेलो
 90. ह्या फ्लाय बाय मिशन ने
 91. आपण गुरुचे छायाचित्र काढू
 92. त्याची चुंबकीय शक्ती मोजू शकू
 93. अणूंची घनता,
 94. आणि हे सगळं आपण दुरून करत असू
 95. अगदी जसं तुम्ही आता
  मला पाहू शकत आहात
 96. आणि सध्याचे अनेक प्रकल्प
  जे की चंद्राहून दूरचे आहेत
 97. ते रिमोट सेनसिंग प्रकल्प आहेत
 98. जर आपण ग्रहाला भेट दिली तर
  तेथे आपण काय सापडण्याची आशा करू?

 99. कदाचित त्या ग्रहावर जीवन असेल
 100. आणि जेंव्हा आपण जीवनाचा पुरावा पाहू
 101. वातावरणाच्या अस्तित्वाने
 102. अथवा एखादया अकल्पित दृष्याने
 103. आपण तेंव्हा खरंतर काही
  जमेची बाजू बघू
 104. आपल्याला माहिती नाहीये की
  अंतराळात जीवन आहे का ते
 105. कदाचित आपल्या असल्या प्रकल्पांद्वारे
  आपण जीवाचा शोध करू देखील
 106. कदाचित नाही
 107. आणि ह्या सर्वात अर्थशास्त्र जर कमकुवत दिसत

 108. जेंव्हा आपण अवकाश प्रवासातील
  गोष्टींबाबत चर्चा करतो,
 109. अंतरतारकीय क्षमतेमध्ये खरंतर
  हाच मोठा अडथळा आहे
 110. आपल्याला गोष्टी इथपर्यंत आणाव्या लागणार
  जिथे त्या आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या असतील
 111. ज्याने गोष्टी साध्य होतील.
 112. तर सध्या,

 113. लॅब्समध्ये काही प्रणाली आहेत
 114. ज्यांनी समक्रमित करण्याची क्षमता
  मोठ्या प्रमाणात प्राप्त केली आहे
 115. १० किमी किंवा साधारण ६ मैलांपर्यंत
 116. आपण लेसर समक्रमित करू शकू
 117. आणि हेअतिशय सुंदरपणे काम करतंय.
 118. अनेक दशकांपासून आपल्याला
  लेसर कसे बनवायचयं याचं ज्ञान आहे,
 119. फक्त आता ते तंत्रज्ञान स्वस्त झालंय,
 120. आणि एवढा परिपक्व झालय की
 121. आपण अक्षरशः एका मोठ्या प्रणालीचा
  विचार करू शकतो,
 122. की ती काही किमी क्षेत्रात पसरेल
  अगदी सौर ऊर्जा प्रकल्पासारखा,
 123. पण प्रकाश घेण्याऐवजी ते प्रकाश सोडतील.
 124. असल्या तंत्रज्ञानाची सुंदरता अशी कि
  ते अनेक कामात उपयोगात आणू शकू,

 125. फक्त छोट्या अवकाशयानाची
  सापेक्षतावादी उडाण नव्हे,
 126. तर अति जलद अवकाशयाने असो,
 127. आपल्या सूर्यमालेतील जलद प्रवास असो,
 128. ग्रह संरक्षण असो,
 129. अंतराळ कचरा काढणं असो,
 130. दूरवर ऊर्जा प्रसारण करणं असो,
 131. जसे कि चंद्रावर अवकाशयान पाठवणे
  अथवा तळ तयार करणे.
 132. हे अत्यंत वैविध्यपूर्ण तंत्रज्ञान आहे,
 133. हे असा काही आहे की ते
  मानवाला तयार बनवायला आवडेल
 134. जरी अवकाशयान ताऱ्यांकडे झेपवायचा नसलं तरी,
 135. कारण हे तंत्रज्ञान अनेक संधी उपलब्ध करेल
 136. कि ज्या सध्या सोयीस्कर नाहीये.
 137. आणि म्हणून मला असा वाटत की
  हे अपरिहार्य तंत्रज्ञान आहे
 138. कारण आपल्याकडे क्षमता आहे
 139. आपल्याला तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हायचंय
 140. आणि अर्थशास्रसोबत येईपर्यंत वाट पाहायची
 141. जेणे करून मोठ्या प्रणाली
  स्वस्त दरात बनवू शकू
 142. छोट्या प्रणाली स्वस्त आहेत
 143. आणि आम्ही प्रयोगशाळेत त्या प्रणालींचे
  नमुनेदेखील बनवणं चालू आहे
 144. तर हे अगदी उद्या जरी होत नसेल,

 145. तरी आपण प्रक्रिया चालू केली आहे.
 146. आणि आतापर्यंत ते उत्तम काम करतंय .
 147. हे दोन्ही क्रांतिकारी प्रकल्प आहेत,
 148. फक्त तंत्रज्ञानातील प्रगतीतच नव्हे,
 149. तर एकूणच विकसनशील प्रकल्प आहे.
 150. तर व्यक्तीशः ,
  मला असं वाटत नाही कि
 151. जेंव्हा पहिलं
  अपेक्षित उडाण होईल.
 152. मला वाटत कि साधारण आणखी ३० वर्ष लागतील
  त्या गोष्टीपर्यंत पोहोचायला,
 153. आणि किंवा जास्त.
 154. पण माझी प्रेरणा अशी
 155. कि हि क्षमता
  अंतिम ध्येय गाठू शकते.
 156. जरी हे माझ्या जीवनकाळात जरी शक्य नसलं,
 157. हे पूढच्या पिढीच्या जीवनकाळात शक्य आहे
 158. किंवा त्याही पुढच्या पिढीत.
 159. याचा परिणाम बदलकारक होतील कि
 160. माझ्यामते आपण ह्या मार्गावर चालून,
 161. आणि मर्यादांवर मंथन करून,
 162. आणि त्यावर उपाय योजले पाहिजे.
 163. परग्रहांवरील जीवनाचा शोध

 164. हे मानावाजातीतल्या महत्वाच्या
  शोधांपैकी एक आहे
 165. आणि जर हे आपण करू शकलो
 166. आणि परग्रहावर जीवन शोधू शकलो
 167. तर हे मानवजातीला कायमचा बदलून टाकेल.
 168. आयुष्यात गोष्टी सखोलअसतात .

 169. जर तुम्ही खोल पाहिलत
 170. तर आयुष्यात आश्चर्यकारकरित्या काही
  क्लिष्ट,चित्तवेधक आणि सुंदर गोष्टी सापडतील
 171. आणि हे सत्य अगदी
  छोट्या फोटॉन्ससाठीही लागू होत
 172. जो आपण आपल्या आयुष्यात दररोज पाहतो.
 173. पण जेव्हा तुम्ही चौकटीबाहेर बघता
  आणि महान गोष्टींबाबत कल्पना करता,
 174. तेंव्हा लेसरचे किरणे समक्रमित झालेले असता,
 175. आपण अश्या कल्पना करू शकतो
  की त्या अगदी असामान्य आहे.
 176. आणि दुसऱ्या ताऱ्यावर पोहोचण्याची क्षमता
 177. ही देखील त्याच
  असामान्य क्षमतेतील एक आहे.
 178. (पक्ष्यांची चिवचिवाट)