Return to Video

होकायंत्राने जग खुले कसे केले

  • 0:00 - 0:01
    माझ्या बालपणी, मिझुरी राज्यात
  • 0:02 - 0:04
    आम्हांला जंगलात घेऊन जात.
  • 0:04 - 0:07
    एक नकाशा आणि एक होकायंत्र देत,
  • 0:07 - 0:09
    आणि घरची वाट शोधून काढायला सांगत.
  • 0:09 - 0:11
    आणि होकायंत्राशिवाय
  • 0:11 - 0:12
    नकाशा वाचतासुद्धा येत नाही.
  • 0:12 - 0:14
    आज मी तुम्हांला तेच सांगणार आहे.
  • 0:14 - 0:15
    होकायंत्र ही गुरुकिल्ली.
  • 0:15 - 0:16
    [छोटी वस्तू.]
  • 0:16 - 0:18
    [मोठी कल्पना.]
  • 0:21 - 0:25
    सोप्या शब्दांत, होकायंत्र म्हणजे
    चुंबकीकरण केलेला धातूचा एक तुकडा,
  • 0:25 - 0:29
    जो पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवाकडे वळतो.
  • 0:29 - 0:32
    आपल्याला लगेच आठवते ते
    खिशात मावणारे छोटे होकायंत्र.
  • 0:32 - 0:33
    ते घड्याळासारखे दिसते, हो ना?
  • 0:33 - 0:35
    ते हातात धरता येते,
  • 0:35 - 0:37
    आणि ती हेलकावणारी सुई स्थिर होताना पाहून
  • 0:37 - 0:39
    उत्तर दिशा समजते.
  • 0:39 - 0:43
    शास्त्रज्ञांसाठी अजूनही
    चुंबकत्व ही एक गूढ शक्ती आहे.
  • 0:43 - 0:46
    पण होकायंत्र कार्य का करते,
    हे निश्चितपणे समजले आहे.
  • 0:46 - 0:48
    कारण, पृथ्वी हे एक प्रचंड लोहचुंबक आहे.
  • 0:48 - 0:50
    आपण जेव्हा होकायंत्र वापरतो,
  • 0:50 - 0:53
    तेव्हा पृथ्वीच्या केंद्रबिंदूशी
    आपला थेट संबंध जोडला जातो.
  • 0:53 - 0:57
    तिथे खदखदणारे द्रवरूप लोह
    एका गोलकाच्या स्वरूपात फिरत असते.
  • 0:57 - 1:00
    ते चुंबकीय क्षेत्र निर्माण करते.
  • 1:00 - 1:03
    आपण टेबलावर खेळण्यासाठी वापरतो,
    त्या चुंबकाप्रमाणेच
  • 1:03 - 1:05
    यालाही उत्तर व दक्षिण ध्रुव असतात.
  • 1:05 - 1:08
    यामुळे आपण लोहचुंबक वापरून
    उत्तर दिशा शोधू शकतो.
  • 1:09 - 1:14
    सर्वात जुने होकायंत्र ख्रिस्तपूर्व २००
    वर्षांपूर्वी चीनमध्ये निर्माण झाले.
  • 1:14 - 1:17
    त्यांना शोध लागला, की
    पृथ्वीतून मिळणारा हा धातू
  • 1:17 - 1:18
    निसर्गतःच चुंबकीय आहे.
  • 1:18 - 1:21
    त्यांनी या चुंबकीय धातूला
  • 1:21 - 1:23
    डावासारखा आकार देऊन
  • 1:23 - 1:24
    तो पितळेच्या ताटलीवर ठेवला,
  • 1:24 - 1:26
    आणि तो उत्तर दिशा दाखवू लागला.
  • 1:26 - 1:29
    याचा वापर मुख्यत्वे फेंगशुई
    सुधारण्यासाठी केला गेला असावा.
  • 1:29 - 1:32
    त्यामुळे राहत्या जागेतली ऊर्जा
    उत्तम रीतीने कशी वाहती राहील
  • 1:32 - 1:34
    हे त्यांना समजत असावे.
  • 1:34 - 1:37
    बहुधा खलाशांनी सर्वप्रथम
  • 1:37 - 1:39
    सोबत नेण्याजोगे होकायंत्र
    विकसित केले असावे.
  • 1:39 - 1:41
    कारण सूर्य कोणत्याही स्थानावर असला,
  • 1:41 - 1:43
    ताऱ्यांची स्थाने कोणतीही असली,
  • 1:43 - 1:45
    तरी त्यांना कायम उत्तर दिशा समजावी.
  • 1:45 - 1:49
    त्यानंतर बऱ्याच काळाने
    युरोपियन लोकांनी शोध लावला,
  • 1:49 - 1:50
    तो नकाशावरच्या होकायंत्र-चिन्हाचा.
  • 1:50 - 1:52
    त्यावर नेमक्या स्वरूपात
  • 1:52 - 1:54
    पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण
    दिशा दाखवल्या होत्या.
  • 1:54 - 1:58
    त्याबरोबर आणखी दिशाही होत्या.
  • 1:58 - 2:01
    वायव्य, आग्नेय वगैरे.
  • 2:01 - 2:04
    त्यामुळे प्रथमच त्यांना
    आपल्या प्रवासाची दिशा कळू लागली.
  • 2:04 - 2:05
    हे फार महत्त्वाचे होते.
  • 2:05 - 2:09
    मला वाटते की हा युरोपियन विज्ञानाला
    नवी झळाळी मिळण्याच्या प्रक्रियेतला
  • 2:09 - 2:11
    एक भाग होता.
  • 2:11 - 2:12
    नवयुग हा शब्द आपल्या परिचयाचा असेल.
  • 2:12 - 2:15
    अनेक नवीन उपकरणांचा या काळात शोध लागला.
  • 2:15 - 2:17
    दुर्बिणीपासून सूक्ष्मदर्शक यंत्रापर्यंत.
  • 2:17 - 2:19
    होकायंत्रामुळे नकाशांमध्ये
    सुधारणा झाली. हो ना?
  • 2:19 - 2:22
    कारण त्यामुळे कोणती दिशा
    कुठे आहे ते समजते.
  • 2:22 - 2:24
    जास्त सविस्तर माहिती मिळते.
  • 2:24 - 2:25
    यामुळे जगाशी असलेल्या
  • 2:26 - 2:28
    आपल्या संबंधात बदल घडून येतो.
  • 2:28 - 2:31
    नकाशा आणि होकायंत्राची जोडी ही
    एक अद्भुत शक्ती असते.
  • 2:31 - 2:33
    जगाचा जो इतिहास आपण जाणतो,
  • 2:33 - 2:36
    तो होकायंत्राखेरीज घडला नसता:
  • 2:36 - 2:40
    नव्या जगाचा शोध,
    मॅगेलनची पृथ्वीप्रदक्षिणा,
  • 2:40 - 2:42
    पृथ्वी गोल आहे हा शोधदेखील.
  • 2:42 - 2:45
    होकायंत्र हे इतर उपकरणांमध्ये
    समाविष्ट असते,
  • 2:45 - 2:48
    कारण ते अत्यंत उपयोगी आहे.
  • 2:48 - 2:50
    बहुउपयोगी उपकरणांमध्ये
    होकायंत्राचा समावेश असतो.
  • 2:50 - 2:52
    ते मोबाईलमध्ये असते.
  • 2:52 - 2:54
    होकायंत्र सगळीकडे असते.
  • 2:54 - 2:58
    कारण अक्षरशः त्यामुळेच
    आपण जगात मार्ग शोधू शकतो.
  • 2:58 - 2:59
    त्यामुळे तुम्ही जगाचा शोध घेऊ शकता.
  • 2:59 - 3:04
    एखाद्या डोंगरापलीकडे किंवा क्षितिजापार
    काय आहे ते शोधू शकता.
  • 3:04 - 3:07
    तसेच, होकायंत्राच्या भरवशावर
    घरची वाट शोधू शकता.
Title:
होकायंत्राने जग खुले कसे केले
Speaker:
डेव्हिड बिएलो
Description:

जगाचा जो इतिहास आपण जाणतो, तो होकायंत्राखेरीज घडला नसता. या उपकरणाने आपला जगाशी असलेला संबंध कसा बदलला, हे सांगताहेत टेड विज्ञान प्रमुख डेव्हिड बिएलो.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED Series
Duration:
03:21

Marathi subtitles

Revisions