होकायंत्राने जग खुले कसे केले
-
0:00 - 0:01माझ्या बालपणी, मिझुरी राज्यात
-
0:02 - 0:04आम्हांला जंगलात घेऊन जात.
-
0:04 - 0:07एक नकाशा आणि एक होकायंत्र देत,
-
0:07 - 0:09आणि घरची वाट शोधून काढायला सांगत.
-
0:09 - 0:11आणि होकायंत्राशिवाय
-
0:11 - 0:12नकाशा वाचतासुद्धा येत नाही.
-
0:12 - 0:14आज मी तुम्हांला तेच सांगणार आहे.
-
0:14 - 0:15होकायंत्र ही गुरुकिल्ली.
-
0:15 - 0:16[छोटी वस्तू.]
-
0:16 - 0:18[मोठी कल्पना.]
-
0:21 - 0:25सोप्या शब्दांत, होकायंत्र म्हणजे
चुंबकीकरण केलेला धातूचा एक तुकडा, -
0:25 - 0:29जो पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवाकडे वळतो.
-
0:29 - 0:32आपल्याला लगेच आठवते ते
खिशात मावणारे छोटे होकायंत्र. -
0:32 - 0:33ते घड्याळासारखे दिसते, हो ना?
-
0:33 - 0:35ते हातात धरता येते,
-
0:35 - 0:37आणि ती हेलकावणारी सुई स्थिर होताना पाहून
-
0:37 - 0:39उत्तर दिशा समजते.
-
0:39 - 0:43शास्त्रज्ञांसाठी अजूनही
चुंबकत्व ही एक गूढ शक्ती आहे. -
0:43 - 0:46पण होकायंत्र कार्य का करते,
हे निश्चितपणे समजले आहे. -
0:46 - 0:48कारण, पृथ्वी हे एक प्रचंड लोहचुंबक आहे.
-
0:48 - 0:50आपण जेव्हा होकायंत्र वापरतो,
-
0:50 - 0:53तेव्हा पृथ्वीच्या केंद्रबिंदूशी
आपला थेट संबंध जोडला जातो. -
0:53 - 0:57तिथे खदखदणारे द्रवरूप लोह
एका गोलकाच्या स्वरूपात फिरत असते. -
0:57 - 1:00ते चुंबकीय क्षेत्र निर्माण करते.
-
1:00 - 1:03आपण टेबलावर खेळण्यासाठी वापरतो,
त्या चुंबकाप्रमाणेच -
1:03 - 1:05यालाही उत्तर व दक्षिण ध्रुव असतात.
-
1:05 - 1:08यामुळे आपण लोहचुंबक वापरून
उत्तर दिशा शोधू शकतो. -
1:09 - 1:14सर्वात जुने होकायंत्र ख्रिस्तपूर्व २००
वर्षांपूर्वी चीनमध्ये निर्माण झाले. -
1:14 - 1:17त्यांना शोध लागला, की
पृथ्वीतून मिळणारा हा धातू -
1:17 - 1:18निसर्गतःच चुंबकीय आहे.
-
1:18 - 1:21त्यांनी या चुंबकीय धातूला
-
1:21 - 1:23डावासारखा आकार देऊन
-
1:23 - 1:24तो पितळेच्या ताटलीवर ठेवला,
-
1:24 - 1:26आणि तो उत्तर दिशा दाखवू लागला.
-
1:26 - 1:29याचा वापर मुख्यत्वे फेंगशुई
सुधारण्यासाठी केला गेला असावा. -
1:29 - 1:32त्यामुळे राहत्या जागेतली ऊर्जा
उत्तम रीतीने कशी वाहती राहील -
1:32 - 1:34हे त्यांना समजत असावे.
-
1:34 - 1:37बहुधा खलाशांनी सर्वप्रथम
-
1:37 - 1:39सोबत नेण्याजोगे होकायंत्र
विकसित केले असावे. -
1:39 - 1:41कारण सूर्य कोणत्याही स्थानावर असला,
-
1:41 - 1:43ताऱ्यांची स्थाने कोणतीही असली,
-
1:43 - 1:45तरी त्यांना कायम उत्तर दिशा समजावी.
-
1:45 - 1:49त्यानंतर बऱ्याच काळाने
युरोपियन लोकांनी शोध लावला, -
1:49 - 1:50तो नकाशावरच्या होकायंत्र-चिन्हाचा.
-
1:50 - 1:52त्यावर नेमक्या स्वरूपात
-
1:52 - 1:54पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण
दिशा दाखवल्या होत्या. -
1:54 - 1:58त्याबरोबर आणखी दिशाही होत्या.
-
1:58 - 2:01वायव्य, आग्नेय वगैरे.
-
2:01 - 2:04त्यामुळे प्रथमच त्यांना
आपल्या प्रवासाची दिशा कळू लागली. -
2:04 - 2:05हे फार महत्त्वाचे होते.
-
2:05 - 2:09मला वाटते की हा युरोपियन विज्ञानाला
नवी झळाळी मिळण्याच्या प्रक्रियेतला -
2:09 - 2:11एक भाग होता.
-
2:11 - 2:12नवयुग हा शब्द आपल्या परिचयाचा असेल.
-
2:12 - 2:15अनेक नवीन उपकरणांचा या काळात शोध लागला.
-
2:15 - 2:17दुर्बिणीपासून सूक्ष्मदर्शक यंत्रापर्यंत.
-
2:17 - 2:19होकायंत्रामुळे नकाशांमध्ये
सुधारणा झाली. हो ना? -
2:19 - 2:22कारण त्यामुळे कोणती दिशा
कुठे आहे ते समजते. -
2:22 - 2:24जास्त सविस्तर माहिती मिळते.
-
2:24 - 2:25यामुळे जगाशी असलेल्या
-
2:26 - 2:28आपल्या संबंधात बदल घडून येतो.
-
2:28 - 2:31नकाशा आणि होकायंत्राची जोडी ही
एक अद्भुत शक्ती असते. -
2:31 - 2:33जगाचा जो इतिहास आपण जाणतो,
-
2:33 - 2:36तो होकायंत्राखेरीज घडला नसता:
-
2:36 - 2:40नव्या जगाचा शोध,
मॅगेलनची पृथ्वीप्रदक्षिणा, -
2:40 - 2:42पृथ्वी गोल आहे हा शोधदेखील.
-
2:42 - 2:45होकायंत्र हे इतर उपकरणांमध्ये
समाविष्ट असते, -
2:45 - 2:48कारण ते अत्यंत उपयोगी आहे.
-
2:48 - 2:50बहुउपयोगी उपकरणांमध्ये
होकायंत्राचा समावेश असतो. -
2:50 - 2:52ते मोबाईलमध्ये असते.
-
2:52 - 2:54होकायंत्र सगळीकडे असते.
-
2:54 - 2:58कारण अक्षरशः त्यामुळेच
आपण जगात मार्ग शोधू शकतो. -
2:58 - 2:59त्यामुळे तुम्ही जगाचा शोध घेऊ शकता.
-
2:59 - 3:04एखाद्या डोंगरापलीकडे किंवा क्षितिजापार
काय आहे ते शोधू शकता. -
3:04 - 3:07तसेच, होकायंत्राच्या भरवशावर
घरची वाट शोधू शकता.
- Title:
- होकायंत्राने जग खुले कसे केले
- Speaker:
- डेव्हिड बिएलो
- Description:
-
जगाचा जो इतिहास आपण जाणतो, तो होकायंत्राखेरीज घडला नसता. या उपकरणाने आपला जगाशी असलेला संबंध कसा बदलला, हे सांगताहेत टेड विज्ञान प्रमुख डेव्हिड बिएलो.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TED Series
- Duration:
- 03:21
Arvind Patil approved Marathi subtitles for How the compass unlocked the world | ||
Arvind Patil accepted Marathi subtitles for How the compass unlocked the world | ||
Smita Kantak edited Marathi subtitles for How the compass unlocked the world | ||
Smita Kantak edited Marathi subtitles for How the compass unlocked the world | ||
Smita Kantak edited Marathi subtitles for How the compass unlocked the world | ||
Smita Kantak edited Marathi subtitles for How the compass unlocked the world | ||
Smita Kantak edited Marathi subtitles for How the compass unlocked the world | ||
Smita Kantak edited Marathi subtitles for How the compass unlocked the world |