Marathi subtitles

← होकायंत्राने जग खुले कसे केले

जगाचा जो इतिहास आपण जाणतो, तो होकायंत्राखेरीज घडला नसता. या उपकरणाने आपला जगाशी असलेला संबंध कसा बदलला, हे सांगताहेत टेड विज्ञान प्रमुख डेव्हिड बिएलो.

Get Embed Code
23 Languages

Showing Revision 10 created 08/01/2020 by Smita Kantak.

 1. माझ्या बालपणी, मिझुरी राज्यात
 2. आम्हांला जंगलात घेऊन जात.
 3. एक नकाशा आणि एक होकायंत्र देत,
 4. आणि घरची वाट शोधून काढायला सांगत.

 5. आणि होकायंत्राशिवाय
 6. नकाशा वाचतासुद्धा येत नाही.
 7. आज मी तुम्हांला तेच सांगणार आहे.
 8. होकायंत्र ही गुरुकिल्ली.
 9. [छोटी वस्तू.]

 10. [मोठी कल्पना.]

 11. सोप्या शब्दांत, होकायंत्र म्हणजे
  चुंबकीकरण केलेला धातूचा एक तुकडा,

 12. जो पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवाकडे वळतो.
 13. आपल्याला लगेच आठवते ते
  खिशात मावणारे छोटे होकायंत्र.
 14. ते घड्याळासारखे दिसते, हो ना?
 15. ते हातात धरता येते,
 16. आणि ती हेलकावणारी सुई स्थिर होताना पाहून
 17. उत्तर दिशा समजते.
 18. शास्त्रज्ञांसाठी अजूनही
  चुंबकत्व ही एक गूढ शक्ती आहे.

 19. पण होकायंत्र कार्य का करते,
  हे निश्चितपणे समजले आहे.
 20. कारण, पृथ्वी हे एक प्रचंड लोहचुंबक आहे.
 21. आपण जेव्हा होकायंत्र वापरतो,
 22. तेव्हा पृथ्वीच्या केंद्रबिंदूशी
  आपला थेट संबंध जोडला जातो.
 23. तिथे खदखदणारे द्रवरूप लोह
  एका गोलकाच्या स्वरूपात फिरत असते.
 24. ते चुंबकीय क्षेत्र निर्माण करते.
 25. आपण टेबलावर खेळण्यासाठी वापरतो,
  त्या चुंबकाप्रमाणेच
 26. यालाही उत्तर व दक्षिण ध्रुव असतात.
 27. यामुळे आपण लोहचुंबक वापरून
  उत्तर दिशा शोधू शकतो.
 28. सर्वात जुने होकायंत्र ख्रिस्तपूर्व २००
  वर्षांपूर्वी चीनमध्ये निर्माण झाले.

 29. त्यांना शोध लागला, की
  पृथ्वीतून मिळणारा हा धातू
 30. निसर्गतःच चुंबकीय आहे.
 31. त्यांनी या चुंबकीय धातूला
 32. डावासारखा आकार देऊन
 33. तो पितळेच्या ताटलीवर ठेवला,
 34. आणि तो उत्तर दिशा दाखवू लागला.
 35. याचा वापर मुख्यत्वे फेंगशुई
  सुधारण्यासाठी केला गेला असावा.
 36. त्यामुळे राहत्या जागेतली ऊर्जा
  उत्तम रीतीने कशी वाहती राहील
 37. हे त्यांना समजत असावे.
 38. बहुधा खलाशांनी सर्वप्रथम

 39. सोबत नेण्याजोगे होकायंत्र
  विकसित केले असावे.
 40. कारण सूर्य कोणत्याही स्थानावर असला,
 41. ताऱ्यांची स्थाने कोणतीही असली,
 42. तरी त्यांना कायम उत्तर दिशा समजावी.
 43. त्यानंतर बऱ्याच काळाने
  युरोपियन लोकांनी शोध लावला,

 44. तो नकाशावरच्या होकायंत्र-चिन्हाचा.
 45. त्यावर नेमक्या स्वरूपात
 46. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण
  दिशा दाखवल्या होत्या.
 47. त्याबरोबर आणखी दिशाही होत्या.
 48. वायव्य, आग्नेय वगैरे.
 49. त्यामुळे प्रथमच त्यांना
  आपल्या प्रवासाची दिशा कळू लागली.
 50. हे फार महत्त्वाचे होते.
 51. मला वाटते की हा युरोपियन विज्ञानाला
  नवी झळाळी मिळण्याच्या प्रक्रियेतला

 52. एक भाग होता.
 53. नवयुग हा शब्द आपल्या परिचयाचा असेल.
 54. अनेक नवीन उपकरणांचा या काळात शोध लागला.
 55. दुर्बिणीपासून सूक्ष्मदर्शक यंत्रापर्यंत.
 56. होकायंत्रामुळे नकाशांमध्ये
  सुधारणा झाली. हो ना?

 57. कारण त्यामुळे कोणती दिशा
  कुठे आहे ते समजते.
 58. जास्त सविस्तर माहिती मिळते.
 59. यामुळे जगाशी असलेल्या
 60. आपल्या संबंधात बदल घडून येतो.
 61. नकाशा आणि होकायंत्राची जोडी ही
  एक अद्भुत शक्ती असते.
 62. जगाचा जो इतिहास आपण जाणतो,
 63. तो होकायंत्राखेरीज घडला नसता:
 64. नव्या जगाचा शोध,
  मॅगेलनची पृथ्वीप्रदक्षिणा,
 65. पृथ्वी गोल आहे हा शोधदेखील.
 66. होकायंत्र हे इतर उपकरणांमध्ये
  समाविष्ट असते,

 67. कारण ते अत्यंत उपयोगी आहे.
 68. बहुउपयोगी उपकरणांमध्ये
  होकायंत्राचा समावेश असतो.
 69. ते मोबाईलमध्ये असते.
 70. होकायंत्र सगळीकडे असते.
 71. कारण अक्षरशः त्यामुळेच
  आपण जगात मार्ग शोधू शकतो.
 72. त्यामुळे तुम्ही जगाचा शोध घेऊ शकता.
 73. एखाद्या डोंगरापलीकडे किंवा क्षितिजापार
  काय आहे ते शोधू शकता.
 74. तसेच, होकायंत्राच्या भरवशावर
  घरची वाट शोधू शकता.