Return to Video

भयच्छेदाने असाध्य ते साध्य करणे । डॅन मेयर । TEDx मास्ट्रीट

  • 0:08 - 0:10
    धन्यवाद.
  • 0:16 - 0:21
    भारतात एक राजा होता, महाराजा, आणि
    त्याच्या वाढदिवसानिमीत्त एक फर्मान निघालं
  • 0:21 - 0:24
    कि सर्व मुख्याधिशांनी राजाला
    साजेशी अशी भेटवस्तू आणावी.
  • 0:24 - 0:28
    काहींनी उंची तलम वस्र आणली,
    काहींनी आकर्षक तलवारी आणल्या,
  • 0:28 - 0:29
    काहींनी सोनं आणलं.
  • 0:29 - 0:33
    रांगेत सर्वांत शेवटी एक अतिवृद्ध
    माणूस चालत आला
  • 0:33 - 0:37
    जो त्याच्या खेड्यापासून समुद्रमार्गे अनेक
    दिवसांचा प्रवास करून आला होता.
  • 0:37 - 0:41
    आणि तो पुढे येताच राजपुत्राने विचारले,
    "तुम्ही महाराजांसाठी काय आणलं आहे?"
  • 0:41 - 0:45
    आणि त्या वृद्ध माणसाने हळूच
    त्याची मूठ उघडून दाखवली त्यात एक
  • 0:45 - 0:50
    अतिसुंदर शिंपला होता ज्यावर जांभळ्या
    पिवळ्या लाल आणि निळ्या रंगांची नक्षी होती
  • 0:50 - 0:51
    आणि राजपुत्र म्हणाला,
  • 0:51 - 0:54
    "महाराजांसाठीची हि भेटवस्तू नव्हे!
    हि अशी काय भेटवस्तू आणलीत?"
  • 0:55 - 0:57
    वृद्ध माणसाने हळुवारपणे त्याच्याकडे
    वर पाहिलं आणि म्हणाला,
  • 0:58 - 1:01
    "दूरचा प्रवास...भेटवस्तूचाच एक भाग."
  • 1:01 - 1:03
    (हशा)
  • 1:03 - 1:06
    काही क्षणांत मी आपल्याला एक भेट देणार आहे,
  • 1:06 - 1:08
    अशी भेट कि जी मला वाटतं
    सर्वदूर पसरण्यायोग्य आहे.
  • 1:08 - 1:10
    पण तत्पूर्वी, मला आपल्याला माझ्या
    लांब
  • 1:10 - 1:12
    प्रवासाची सफर घडवायची आहे.
  • 1:12 - 1:14
    आपल्यापैकी बऱ्याच जणांसारखंच,
    मी
  • 1:14 - 1:15
    आयुष्य लहान मूल म्हणून सुरु केलं.
  • 1:15 - 1:17
    आपल्यापैकी किती जणांनी
    आयुष्य लहान मूल म्हणून
  • 1:17 - 1:19
    सुरु केलंय? तरुणच
  • 1:19 - 1:20
    जन्मलात? साधारण निम्मे जण...ठीक आहे..
  • 1:21 - 1:22
    (हशा)
  • 1:22 - 1:25
    आणि आपल्यातील उर्वरित, काय?
    आपण प्रौढ म्हणूनच जन्मलात?
  • 1:25 - 1:28
    बाप रे, मला तुमच्या आईला भेटायचंय!
  • 1:28 - 1:29
    अशक्य गोष्टींबद्दल बोलू या!
  • 1:31 - 1:35
    एक लहान मूल म्हणून मला अशक्य
    गोष्टी करण्याचे नेहमी कुतूहल होते.
  • 1:36 - 1:39
    आजच्या दिवसाची मी गेली
    अनेक वर्षं वाट पाहत होतो,
  • 1:39 - 1:41
    कारण आजच्या दिवशी मी प्रयत्न करणार आहे
  • 1:41 - 1:44
    अशक्य गोष्ट करण्याचा अगदी
    आपल्या डोळ्यांदेखत,
  • 1:44 - 1:45
    इथे TEDx मास्ट्रीटमधे.
  • 1:46 - 1:48
    मी सुरुवात करणार आहे
  • 1:49 - 1:51
    शेवटचा खुलासा करून:
    आणि मी
  • 1:51 - 1:53
    आपल्याला सिद्ध करून दाखवणार
  • 1:53 - 1:55
    आहे कि अशक्य हे अशक्य नसतं.
  • 1:55 - 1:58
    आणि मी सर्वदूर पसरवण्यायोग्य अशी
    भेट आपल्याला देऊन थांबणार आहे
  • 1:58 - 2:01
    मी आपल्याला दाखवणार कि आपण आपल्या
    आयुष्यात असाध्य गोष्टी करू शकता
  • 2:03 - 2:05
    अशक्य गोष्टी करण्याच्या माझ्या शोधकार्यात
    मला असं आढळलं कि
  • 2:05 - 2:08
    जगातील सगळ्याच लोकांमध्ये दोन
    गोष्टी सामान्यतः असतात.
  • 2:08 - 2:10
    प्रत्येकाला भीती असते,
  • 2:10 - 2:12
    आणि प्रत्येकाची स्वप्नं असतात.
  • 2:13 - 2:18
    असाध्याचा शोध घेताना मला
    तीन गोष्टी आढळल्या
  • 2:18 - 2:20
    ज्या मी माझ्या आयुष्यात केल्या ज्यांनी मला
  • 2:20 - 2:23
    एक प्रकारे असाध्य करायला भाग पाडलं:
  • 2:24 - 2:27
    डॉजबॉल, किंवा ज्याला आपण "ट्रेफबॉल" म्हणता
  • 2:27 - 2:28
    सुपरमॅन,
  • 2:28 - 2:29
    आणि डास. ते
  • 2:29 - 2:31
    माझे तीन महत्वाचे शब्द आहेत.
  • 2:31 - 2:34
    आता आपल्याला कळलं असेल मी
    आयुष्यात असाध्य ते का करतो.
  • 2:34 - 2:36
    मी आपल्याला माझ्या दूरच्या
    यात्रेचं दर्शन घडवणार आहे
  • 2:36 - 2:39
    भयाकडून स्वप्नांकडे,
  • 2:39 - 2:41
    शब्दांकडून तलवारींकडे,
  • 2:41 - 2:43
    डॉजबॉलकडून
  • 2:43 - 2:44
    सुपरमॅनकडे
  • 2:44 - 2:45
    ते डासाकडे.
  • 2:46 - 2:47
    आणि मी आपल्याला दाखवून देऊ
  • 2:47 - 2:50
    इच्छितो कि आपण आपल्या आयुष्यात
    असाध्य ते साध्य कसं करू
  • 2:52 - 2:55
    शकता. ४ ऑक्टोबर, २००७.
  • 2:56 - 2:58
    माझं हृदय धडधडत होतं,
    पाय लटपटत होते
  • 2:58 - 2:59
    जसा मी मंचावर गेलो
  • 2:59 - 3:01
    सँडर्स थिएटरच्या
  • 3:01 - 3:03
    हार्वर्ड विद्यापीठातील २००७ वर्षीचं
  • 3:03 - 3:06
    वैद्यकशास्त्रातील इग नोबेल पारितोषिक
    स्वीकारण्यासाठी
  • 3:06 - 3:09
    मी सहलेखन केलेल्या एका
    वैद्यकीय शोधनिबंधाबद्दल
  • 3:09 - 3:10
    ज्याचं शीर्षक होतं "तलवार गिळंकृत
  • 3:10 - 3:12
    करणे...आणि त्याचे परिणाम".
  • 3:12 - 3:13
    (हशा)
  • 3:14 - 3:18
    तो एका छोट्या नियतकालिकात प्रकाशित करण्यात
    आला होता जे मी पूर्वी कधी वाचलंही नव्हतं,
  • 3:18 - 3:20
    ब्रिटिश मेडिकल जर्नल.
  • 3:21 - 3:25
    आणि माझ्यासाठी ती असाध्य
    स्वप्नपूर्ती होती,
  • 3:25 - 3:28
    माझ्यासारख्यासाठी ते एक
    अनपेक्षित आश्चर्य होतं,
  • 3:28 - 3:31
    तो सन्मान मी कधीच विसरू शकणार नाही.
  • 3:31 - 3:35
    पण माझ्या आयुष्यातील सर्वांत
    अविस्मरणीय क्षण तो नव्हता.
  • 3:36 - 3:38
    ४ ऑक्टोबर, १९६७ रोजी
  • 3:38 - 3:40
    हा घाबरलेला, लाजाळू, बारीक, दुबळा मुलगा
  • 3:41 - 3:43
    प्रचंड भयाने ग्रासला होता.
  • 3:43 - 3:46
    जसा तो मंचावर जाण्यासाठी तयार झाला,
  • 3:46 - 3:47
    त्याचं हृदय धडधडत होतं,
  • 3:48 - 3:49
    त्याचे पाय लटपटत होते.
  • 3:50 - 3:52
    बोलण्यासाठी त्याने त्याचे तोंड उघडले,
  • 3:56 - 3:58
    शब्द फुटतच नव्हते.
  • 3:58 - 4:00
    तो थरथरत अश्रू ढाळत उभा राहिला.
  • 4:01 - 4:02
    तो तीव्र भीतीने दुबळा पडला होता,
  • 4:02 - 4:04
    भयाने गोठला होता.
  • 4:04 - 4:06
    या घाबरलेल्या, लाजाळू, बारीक,
    दुबळ्या मुलाला
  • 4:06 - 4:08
    अतिभयाने ग्रासलं होतं.
  • 4:09 - 4:10
    त्याला अंधाराची भीती होती,
  • 4:11 - 4:12
    उंचीची भीती होती,
  • 4:12 - 4:13
    कोळ्यांची व सापांची भीती होती
  • 4:13 - 4:15
    आपल्यापैकी कोणी कोळ्यांना
    व सापांना भीतं का?
  • 4:15 - 4:17
    आहेत, काही जण आहेत...
  • 4:17 - 4:19
    त्याला पाण्याची आणि शार्क
    माशांची भीती होती...
  • 4:19 - 4:22
    डॉक्टर्स, परिचारिका आणि दंतवैद्यकांची
    भीती होती,
  • 4:22 - 4:25
    आणि सुया आणि अणकुचीदार वस्तूंची भीती होती.
  • 4:25 - 4:27
    पण सर्वांत जास्त भीती होती ती
  • 4:27 - 4:28
    लोकांची.
  • 4:29 - 4:32
    तो घाबरलेला, लाजाळू, बारीक, दुबळा मुलगा
  • 4:32 - 4:33
    मी होतो.
  • 4:33 - 4:36
    मला अपयशाची आणि नकाराची भीती होती,
  • 4:37 - 4:40
    कमी स्वाभिमान आणि न्यूनगंड होता,
  • 4:40 - 4:43
    आणि असं काहीतरी जे आपल्याला
    तेव्हा ठाऊकही नव्हतं:
  • 4:43 - 4:45
    समाजात वावरण्याची विवंचना.
  • 4:45 - 4:49
    मला भीती असल्या कारणाने गुंड
    मला छेडायचे आणि मारायचे.
  • 4:49 - 4:52
    ते मला हसायचे आणि चिडवायचे, ते मला
    कधीच त्यांच्या रेनडियर खेळांमध्ये
  • 4:52 - 4:54
    खेळू देत नसत.
  • 4:55 - 4:58
    हा, एक खेळ होता ज्यात
    ते मला खेळू द्यायचे...
  • 4:58 - 4:59
    डॉजबॉल -
  • 5:00 - 5:01
    आणि मी चांगला डॉजर नव्हतो.
  • 5:02 - 5:04
    गुंड मुलं मला हाक मारायची,
  • 5:04 - 5:06
    आणि मी वर मान करायचो आणि
    हे लाल डॉजबॉल्स बघायचो
  • 5:06 - 5:08
    माझ्या चेहऱ्याकडे अतिवेगाने फेकलेले
  • 5:08 - 5:10
    बॅम, बॅम, बॅम!
  • 5:11 - 5:13
    आणि मला शाळेतून घरी परतत
    असतानाचे दिवस आठवतात,
  • 5:13 - 5:18
    माझा चेहरा लाल व्हायचा आणि दुखायचा,
    माझे कान लाल व्हायचे आणि वाजायचे.
  • 5:18 - 5:21
    माझ्या डोळ्यांतून गरम अश्रु वाहायचे,
  • 5:21 - 5:24
    आणि त्यांचे शब्द माझे कान जाळायचे.
  • 5:24 - 5:25
    आणि ज्यांनी कोणी म्हणलंय,
  • 5:25 - 5:29
    "लाठ्या आणि दगड माझी हाडं मोडू शकतात,
    पण शब्द मला कधीच इजा पोहोचवू शकत नाहीत"
  • 5:29 - 5:30
    ते मिथ्या आहे.
  • 5:30 - 5:32
    शब्द सुरीसारखे कापू शकतात.
  • 5:32 - 5:34
    शब्द तलवारीसारखे भोसकू शकतात.
  • 5:34 - 5:36
    शब्द इतक्या खोलवर जखमा करू शकतात कि
  • 5:36 - 5:38
    त्या दिसू शकत नाहीत.
  • 5:38 - 5:41
    तर मला भीती होती.
    आणि शब्द माझे कट्टर शत्रू होते.
  • 5:41 - 5:42
    अजूनही आहेत.
  • 5:43 - 5:45
    पण माझी स्वप्नंही होती.
  • 5:45 - 5:48
    मी घरी जायचो
    आणि सुपरमॅनच्या पुस्तकांत रमायचो
  • 5:48 - 5:50
    आणि मी सुपरमॅनची पुस्तकं वाचायचो
  • 5:50 - 5:53
    आणि मी सुपरमॅनसारखा महानायक
    होण्याचं स्वप्न बघितलं.
  • 5:53 - 5:56
    मला सत्य आणि न्यायासाठी लढायचं होतं,
  • 5:56 - 5:59
    मला खलनायकांविरुद्ध लढायचं होतं,
  • 5:59 - 6:03
    मला जगभर उडत उडत अचाट कामगिरी करायची
    होती आणि आयुष्यं वाचवायची होती.
  • 6:03 - 6:06
    मला खऱ्याखुऱ्या गोष्टींचंही
    प्रचंड कुतुहल होतं. मी
  • 6:06 - 6:09
    गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् व रिप्लिज
    बिलिव्ह इट वर नॉट हि पुस्तकं वाचायचो
  • 6:09 - 6:13
    आपल्यापैकी कोणी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड
    रेकॉर्डस् किंवा रिप्लिज वाचलं आहे का?
  • 6:13 - 6:14
    मला ती पुस्तकं आवडतात!
    मी
  • 6:14 - 6:16
    खऱ्या माणसांना अचाट
    गोष्टी करताना पाहिलं
  • 6:16 - 6:18
    आणि मी म्हणलं, मला ते करायचंय.
  • 6:18 - 6:19
    जर गुंड मुलं मला खेळू देत नसतील
  • 6:19 - 6:21
    त्यांच्या कुठल्याच खेळांमध्ये
    तर मग,
  • 6:21 - 6:23
    मला खरी जादू करायची आहे,
    खऱ्या अचाट गोष्टी.
  • 6:23 - 6:27
    मला खरंच काहीतरी उल्लेखनीय करायचं
    आहे जे ते गुंड करू शकत नाहीत. मला
  • 6:27 - 6:29
    माझा हेतु आणि तीव्र इच्छा शोधायच्या आहेत.
  • 6:29 - 6:31
    माझ्या आयुष्याला अर्थ आहे
    हे जाणून घ्यायचंय.
  • 6:31 - 6:33
    जगपरिवर्तनासाठी मला काहीतरी
    अविश्वसनीय करायचं आहे;
  • 6:33 - 6:37
    मला सिद्ध करायचं आहे कि
    असाध्य हे असाध्य नसतं.
  • 6:38 - 6:40
    १० वर्षांनंतर -
  • 6:40 - 6:43
    माझ्या २१ व्या वाढदिवसाआधीचा
    तो आठवडा होता.
  • 6:43 - 6:47
    एकाच दिवशी दोन गोष्टी घटना घडल्या ज्यांनी
    माझं आयुष्य कायमचं बदलवून टाकलं.
  • 6:47 - 6:49
    मी दक्षिण भारतातल्या तामिळनाडूमध्ये
    राहात होतो
  • 6:50 - 6:51
    मी तिथे एक धर्मप्रसारक होतो,
  • 6:51 - 6:53
    आणि माझ्या मार्गदर्शक मित्राने
    मला विचारलं,
  • 6:53 - 6:55
    "डॅनियल, तुला स्वच्छंदी ध्येयं
  • 6:55 - 6:57
    आहेत?" आणि मी म्हणलं," स्वच्छंदी ध्येयं?
    ती काय असतात?
  • 6:57 - 7:00
    ते म्हणाले, "स्वच्छंदी ध्येयं आयुष्यातील महत्वाची ध्येयं असतात.
  • 7:00 - 7:05
    ते म्हणजे स्वप्नं आणि ध्येयांचं एकत्रीकरण
    होय, जसं तू तुला हवं ते करू शकलास,
  • 7:05 - 7:07
    जिथे जावंसं वाटतं तिथे जाऊ शकलास
    जे व्हावंसं वाटतं
  • 7:07 - 7:08
    ते होऊ शकलास,
  • 7:08 - 7:10
    तर कुठे जाशील?
    काय करशील?
  • 7:10 - 7:11
    काय होशील? मी
  • 7:11 - 7:14
    म्हणलं "मला ते शक्य नाही!
    मी खूप भित्रा आहे! मला खूप गोष्टींची भीती
  • 7:14 - 7:18
    आहे!" त्या रात्री मी माझी चटई
    बंगल्याच्या गच्चीवर नेली,
  • 7:18 - 7:19
    चांदण्यांत पसरली,
  • 7:19 - 7:22
    आणि वटवाघळांना डासांकडे
    झेपावताना पाहात राहिलो.
  • 7:22 - 7:26
    आणि मी विचार करत राहिलो तो केवळ स्वच्छंदी
    ध्येयांचा, स्वप्नांचा आणि ध्येयांचा,
  • 7:26 - 7:28
    आणि डॉजबॉल घेतलेल्या त्या गुंड मुलांचा.
  • 7:29 - 7:31
    काही तासांनी मला जाग आली.
  • 7:31 - 7:34
    माझं हृदय धडधडत होतं,
    माझे पाय लटपटत होते.
  • 7:34 - 7:36
    यावेळी भयाने नव्हे.
  • 7:36 - 7:38
    माझं पूर्ण शरीर थरथरत होतं.
  • 7:38 - 7:40
    आणि पुढचे पाच दिवस
  • 7:40 - 7:44
    माझी शुद्ध सारखी हरपत होती आणि मी
    मृत्युशय्येवर जगण्यासाठी धडपडत होतो.
  • 7:44 - 7:48
    १०५ डिग्रीच्या मलेरियाच्या तापाने
    माझा मेंदू फणफणत होता. आणि
  • 7:48 - 7:52
    मी शुद्धीवर असताना फक्त
    स्वच्छंदी ध्येयांचाच विचार करत होतो.
  • 7:52 - 7:54
    मी विचार केला,
    "मला माझ्या आयुष्याचं काय
  • 7:54 - 7:56
    करायचंय?"
    शेवटी माझ्या २१ व्या वाढदिवसाच्या आदल्या
  • 7:56 - 7:58
    रात्री सुस्पष्टतेच्या क्षणात,
  • 7:58 - 8:00
    मला जाणीव झाली:
  • 8:00 - 8:02
    मला जाणवलं कि छोटा डास,
  • 8:03 - 8:05
    अनोफिलीस स्टिफेन्सी,
  • 8:05 - 8:07
    तो छोटा डास
  • 8:07 - 8:08
    ज्याचं वजन ५ मायक्रोग्राम पेक्षाही
  • 8:08 - 8:10
    कमी होतं मीठाच्या कणाहूनही
  • 8:10 - 8:13
    कमी, जर तो डास एका १७० पौंडाच्या, ८०
    किलो वजनाच्या माणसाला बाद
  • 8:13 - 8:15
    करू शकतो, तर तो माझा खलनायक होय.
  • 8:15 - 8:17
    मग मला उमगलं, तो डास नव्हे,
    तर त्या डासातील
  • 8:17 - 8:19
    सूक्ष्म परजीवी,
  • 8:19 - 8:23
    प्लाजमोडियम फॅल्सीपॅरम, तो दरवर्षी
    दहा लाखांच्यावर लोकांचे प्राण घेतो.
  • 8:24 - 8:26
    मग मला कळलं, ते त्याहूनही लहान आहे,
  • 8:26 - 8:29
    पण मला ते खूप मोठं वाटतंय.
  • 8:29 - 8:30
    मला जाणवलं,
  • 8:30 - 8:31
    भय हा माझा खलनायक होता,
  • 8:31 - 8:32
    माझा परजीवी,
  • 8:32 - 8:35
    ज्याने मला आयुष्यभर पंगू
    आणि ठप्प केलं होतं.
  • 8:35 - 8:38
    असं बघा, धोका आणि भय यांमध्ये फरक आहे.
  • 8:38 - 8:40
    धोका हा खरा असतो.
  • 8:40 - 8:42
    भय हा विकल्प आहे.
  • 8:42 - 8:44
    आणि मला समजलं कि माझ्याकडे विकल्प होता:
  • 8:44 - 8:48
    एकतर मी भीतीने जगेन आणि
    अपयशात त्या रात्री मरून जाईन,
  • 8:49 - 8:52
    किंवा मी माझ्या भीतीचा शेवट कारेन आणि मी
  • 8:52 - 8:56
    स्वप्नांच्या दिशेने झेपावेन,
    मी आयुष्य जगण्याचे धाडस करेन.
  • 8:57 - 9:00
    आणि असं बघा, मृत्युशय्येवर असणं
    आणि मृत्यूला सामोरं जाणं
  • 9:00 - 9:04
    म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं असतं जे
    तुम्हाला जगण्यास अधिक प्रवृत्त करतं.
  • 9:04 - 9:07
    मला कळलं कि प्रत्येकजण मृत्यु पावतो
    पण प्रत्येकजण जगत नाही.
  • 9:08 - 9:10
    आपण मृत्युतच जगत असतो.
  • 9:10 - 9:12
    हे बघा, जेव्हा तुम्ही मृत्युला
  • 9:12 - 9:13
    स्वीकारता तेव्हाच तुम्ही खरोखर
  • 9:13 - 9:15
    जगायला शिकता. मग त्या रात्री मी बदलायची
  • 9:15 - 9:16
    ठरवली माझी आयुष्यागाथा.
  • 9:17 - 9:18
    मला मरायचं नव्हतं.
  • 9:18 - 9:20
    मग मी एक छोटीशी प्रार्थना केली, मी
  • 9:20 - 9:22
    म्हणलं, "देवा, जर तू मला माझ्या २१ व्या
  • 9:22 - 9:25
    वाढदिवसापर्यंत जगवलंस तर मी भयाला
    माझ्या आयुष्यात
  • 9:25 - 9:27
    थारा देणार नाही. मी माझ्या भयाचा अंत
  • 9:27 - 9:30
    करेन, माझ्या स्वप्नांकडे मी झेपावेन,
  • 9:30 - 9:31
    मला माझी वृत्ती बदलायची आहे,
  • 9:31 - 9:34
    मला आयुष्यात काहीतरी अलौकिक करायचं आहे,
  • 9:34 - 9:36
    मला आयुष्याचं ध्येय शोधायचं आहे,
  • 9:36 - 9:39
    मला जाणून घ्यायचं आहे कि
    असाध्य हे असाध्य नसतं."
  • 9:39 - 9:43
    मी त्या रात्री जगलो कि नाही हे मी आपल्याला
    सांगणार नाही; ते आपणच ठरवावं.
  • 9:43 - 9:44
    (हशा)
  • 9:44 - 9:47
    पण त्या रात्री मी माझ्या पहिल्या १०
    स्वच्छंदी ध्येयांची यादी बनवली
  • 9:47 - 9:50
    मी ठरवलं मला जगातील महत्वाच्या
    खंडांना भेट द्यायची आहे
  • 9:50 - 9:52
    जगातील ७ आश्चर्ये पाहायची आहेत
  • 9:52 - 9:53
    काही भाषा शिकायच्या आहेत,
  • 9:53 - 9:55
    निर्मनुष्य बेटावर राहायचं आहे,
  • 9:55 - 9:56
    महासागरातील बोटीवर राहायचं आहे,
  • 9:56 - 9:59
    अमॅझॉनमधील आदिवासींबरोबर राहायचं आहे,
  • 9:59 - 10:01
    स्वीडनमधील सर्वांत उंच
    पर्वतशिखरावर चढायचं आहे, मला
  • 10:01 - 10:03
    सूर्योदयाच्या वेळी माउंट
    एव्हरेस्ट बघायचाय
  • 10:03 - 10:05
    नॅशव्हिलमधे मला संगीतक्षेत्रात
    काम करायचं आहे,
  • 10:05 - 10:07
    मला सर्कसमधे काम करायचं आहे,
  • 10:07 - 10:09
    आणि मला उडत्या विमानातून उडी मारायची आहे.
  • 10:09 - 10:12
    पुढच्या वीस वर्षांत, मी त्यांपैकी
    बरीचशी ध्येयं पूर्ण केली.
  • 10:12 - 10:15
    दरवेळी एक ध्येय पूर्ण केल्यावर मी ५ किंवा
  • 10:15 - 10:18
    १० ध्येयांची भर माझ्या यादीत घालत असे
    आणि माझी यादी वाढतच राहिली.
  • 10:19 - 10:23
    पुढची सात वर्षं, मी बहामाजमधील एका
    छोट्या बेटावर राहिलो
  • 10:23 - 10:25
    जवळजवळ सात वर्षं
  • 10:25 - 10:27
    एका छोट्या झोपडीत,
  • 10:29 - 10:34
    अन्नासाठी शार्कसारख्या माशांची शिकार करत,
    बेटावर एकाकी,
  • 10:34 - 10:36
    लंगोट घातलेला,
  • 10:37 - 10:39
    आणि संकटांशी सामना करायला शिकलो.
  • 10:39 - 10:41
    आणि तिथून मी मेक्सिकोला गेलो,
  • 10:41 - 10:45
    आणि नंतर इक्वाडोरमधील अमॅझॉन
    नदीच्या पात्राजवळ गेलो,
  • 10:45 - 10:48
    प्युजो पोंगो इक्वाडोर, तिथल्या
    स्थानिकांसोबत राहिलो,
  • 10:48 - 10:52
    आणि थोडं थोडं करत माझ्या ध्येयांमुळेच
    माझा आत्मविश्वास वाढत गेला.
  • 10:52 - 10:55
    मी नॅशव्हिलमधे संगीतक्षेत्रातील व्यवसाय
    केला, आणि मग स्वीडनला
  • 10:55 - 10:58
    गेलो, स्टॉकहोममधे संगीताचा व्यवसाय केला,
  • 10:58 - 11:02
    जिथे मी माउंट केबनेकेजच्या शिखरावर
    चढलो आर्क्टिक वर्तुळाच्यावर
  • 11:03 - 11:05
    मी विदूषक झालो,
  • 11:05 - 11:06
    करामती केल्या,
  • 11:06 - 11:07
    काठीवर चालायला शिकलो,
  • 11:07 - 11:10
    एकचाकी सायकल शिकलो, विस्तव
    गिळायला, काच खायला शिकलो.
  • 11:10 - 11:14
    १९९७ मधे माझ्या ऐकिवात आलं तलवार
    गिळणारे एक डझनाहूनही कमी लोक उरलेत
  • 11:14 - 11:15
    आणि मी म्हणालो, "मला ते केलंच पाहिजे!
  • 11:15 - 11:18
    मी तलवार गिळणाऱ्या एकाला भेटलो
    आणि काही क्लुप्त्या विचारल्या.
  • 11:18 - 11:20
    तो म्हणाला, "हो, मी तुला २ गोष्टी
    सांगतो
  • 11:20 - 11:22
    क्रमांक १: ते खूप धोकादायक आहे,
  • 11:22 - 11:24
    हे करताना लोकांचा जीव गेला आहे.
  • 11:24 - 11:25
    क्रमांक २:
  • 11:25 - 11:26
    त्याचा प्रयत्न करू नकोस!"
  • 11:26 - 11:28
    (हशा)
  • 11:28 - 11:30
    मग मी त्याचा समावेश माझ्या ध्येयांच्या
  • 11:30 - 11:33
    यादीत केला. आणि मी दररोज
    १० ते १२ वेळा सराव केला
  • 11:34 - 11:35
    चार वर्षं.
  • 11:35 - 11:37
    आता मी ते मोजलं...
  • 11:37 - 11:40
    ४ x ३६५ [x १२]
  • 11:40 - 11:43
    जवळजवळ १३,००० अयशस्वी प्रयत्नांनंतर मी
  • 11:43 - 11:45
    २००१ मधे पहिल्यांदा तलवार
    घशाखाली उतरवू शकलो.
  • 11:46 - 11:48
    त्यादरम्यान मी ध्येय ठरवलं
  • 11:48 - 11:51
    तलवार गिळण्याची क्षेत्रातील
    जगातील अग्रणी तज्ज्ञ होण्याचं.
  • 11:51 - 11:54
    मी प्रत्येक पुस्तक, नियतकालिक,
    वर्तमानपत्रातील लेख शोधला,
  • 11:54 - 11:58
    प्रत्येक वैद्यकीय अहवाल, मी
    शरीरशास्त्राच्या अभ्यास केला
  • 11:58 - 12:00
    मी डॉक्टरांशी आणि परिचारिकांशी बोललो,
  • 12:00 - 12:02
    सगळ्या तलवार गिळणाऱ्या लोकांना एकत्र करून
  • 12:02 - 12:04
    स्वोर्ड स्वॅलोवर्स असोसिएशन
    इंटरनॅशनलची स्थापना केली,
  • 12:04 - 12:06
    आणि २ वर्षं एका वैद्यकीय
    शोधनिबंधावर काम केलं
  • 12:06 - 12:09
    तलवार गिळणे आणि त्याचे परिणाम या नावाने
  • 12:09 - 12:11
    जो ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये
    प्रकाशित झाला.
  • 12:11 - 12:12
    (हशा)
  • 12:12 - 12:13
    धन्यवाद.
  • 12:13 - 12:18
    (टाळ्या)
  • 12:18 - 12:22
    आणि तलवार गिळण्याबाबतच्या
    काही अदभूत गोष्टी मी शिकलो.
  • 12:22 - 12:25
    मी शर्त लावतो काही गोष्टींचा आपण यापूर्वी
    विचार केला नसेल पण आजनंतर कराल.
  • 12:25 - 12:29
    पुढच्या वेळी जेव्हा आपण घरी
    जाल आणि मांस सुऱ्याने,
  • 12:29 - 12:32
    तलवारीने किंवा तुमच्या "बेस्टेकने"
    कापाल तुम्ही याचा विचार कराल...
  • 12:34 - 12:37
    मला कळलं कि तलवार गिळण्याची
    सुरुवात भारतात झाली -
  • 12:37 - 12:40
    अगदी तिथेच जिथे मी ते प्रथम पाहिलं
    २० वर्षांचा असताना -
  • 12:40 - 12:42
    जवळजवळ ४००० वर्षांपूर्वी, इ.स. २००० मधे.
  • 12:42 - 12:46
    गेल्या १५० वर्षांत, तलवारी
    गिळणाऱ्यांचा उपयोग,
  • 12:46 - 12:47
    शास्त्र आणि वैद्यकशास्त्रात
    केला गेला
  • 12:47 - 12:51
    आहे १८६८ मधे शरीरातील अवयव पाहण्याचे
    कणखर उपकरण तयार करण्यासाठी
  • 12:51 - 12:54
    फ्रायबर्ग जर्मनीस्थित डॉ. एडॉल्फ
    कुसमौल यांकडून.
  • 12:54 - 12:57
    १९०६ साली, वेल्समध्ये ECG द्वारे,
  • 12:57 - 13:00
    गिळण्याच्या आणि पचनाच्या विकारांचा
    अभ्यास करण्यासाठी, श्वासनलिका
  • 13:00 - 13:02
    तपासण्याच्या
    उपकरणांसाठी वगैरे.
  • 13:02 - 13:04
    पण गेल्या १५० वर्षांत झालेल्या,
  • 13:04 - 13:08
    शेकडो दुखापती आणि डझनावारी मृत्यु
    आपल्याला माहिती आहेत...
  • 13:08 - 13:15
    हे बघा डॉ. एडॉल्फ कुसमौलनी बनवलेलं
    शरीरातील अवयव पाहण्याचं कणखर उपकरण.
  • 13:15 - 13:19
    पण आम्हांला कळलं कि गेल्या १५०
    वर्षांत २९ मृत्यु झाले आहेत
  • 13:19 - 13:22
    ज्यात लंडनमधील एकाचा समावेश आहे
    ज्याने त्याच्या हृदयात तलवार खुपसली.
  • 13:23 - 13:25
    आम्हांला हेही कळलं कि ३ ते ८ भीषण
  • 13:25 - 13:28
    दुखापती तलवार गिळताना दरवर्षी होतात.
  • 13:28 - 13:30
    मला माहिती आहे कारण मला फोन येतात.
  • 13:30 - 13:31
    नुकतेच मला दोन फोन आले
    होते
  • 13:31 - 13:34
    एक स्वीडनहून आणि एक ऑरलँडोहून
    नुकतेच गेल्या काही आठवड्यांपूर्वी
  • 13:34 - 13:37
    दुखापतींमुळे तलवार गिळणारे
    हॉस्पिटलमधे असल्याचे
  • 13:37 - 13:39
    तर ते अत्यंत धोकादायक आहे.
  • 13:39 - 13:42
    दुसरी गोष्टी जी मी शिकलो ती
    म्हणजे तलवार गिळायला
  • 13:42 - 13:44
    २ ते १० वर्षं लागतात
  • 13:44 - 13:46
    बऱ्याच लोकांना.
  • 13:46 - 13:48
    पण सर्वांत चित्तवेधक शोध मला लागला तो याचा
  • 13:48 - 13:51
    कि तलवार गिळणारे ती असाध्य
    गोष्ट कशी शिकतात.
  • 13:51 - 13:53
    आणि मी आपल्याला एक गुपित सांगणार आहे:
  • 13:54 - 13:58
    ९९.९% जे अशक्य आहे त्यावर
    लक्ष केंद्रित करू नका.
  • 13:58 - 14:02
    शक्य असलेल्या .१% वर लक्ष केंद्रित करा आणि
    ते साध्य कसं करता येईल ते पाहा.
  • 14:03 - 14:06
    आता मी आपल्याला तलवार गिळणाऱ्या
    व्यक्तीच्या मनाची सफर घडवतो.
  • 14:06 - 14:09
    तलवार गिळण्यासाठी, मनाचं चिंतन लागतं,
  • 14:09 - 14:12
    प्रचंड एकाग्रता, कमालीची अचूकता लागते
    शरीराच्या आतले अवयव
  • 14:12 - 14:16
    बाजूला सारण्यासाठी व स्वयंचलित शारीरिक
    प्रतिक्षेपांवर विजय मिळवण्यासाठी
  • 14:16 - 14:20
    मेंदूच्या प्रबलित रुपरेषेद्वारे,
    स्नायूंच्या पुनरावृत्त स्मृतीद्वारे
  • 14:20 - 14:24
    १०,००० हूनही अधिक वेळा केलेल्या
    जाणीवपूर्वक सरावाने.
  • 14:24 - 14:28
    आता मी आपल्याला तलवार गिळणाऱ्याच्या
    शरीराची एक छोटी सफर घडवतो.
  • 14:28 - 14:30
    तलवार गिळण्यासाठी,
  • 14:30 - 14:32
    मला पातं जिभेवरून ढकलावं लागतं,
  • 14:32 - 14:35
    घशाचा प्रतिक्षेप दाबून अन्ननलिकेद्वारे,
  • 14:35 - 14:38
    ९० अंशाचे वळण घेऊन अधिस्वर द्वारात खाली,
  • 14:38 - 14:41
    UES झडपेतून,
  • 14:41 - 14:43
    आंत्रपुरस्सरण प्रतिक्षेपाला
    दाबून
  • 14:43 - 14:44
    छातीच्या पोकळीत पातं सरकवावं लागतं
  • 14:44 - 14:46
    फुफ्फुसांच्यामध्ये.
  • 14:46 - 14:48
    इथे मला
  • 14:48 - 14:50
    खरंतर माझं हृदय सरकावावं लागतं.
  • 14:50 - 14:52
    जर आपण नीट पाहिलंत,
  • 14:52 - 14:54
    माझं हृदय तालवारीसोबत धडधडताना दिसेल
  • 14:54 - 14:56
    कारण ती हृदयाला टेकून आहे
  • 14:56 - 14:59
    अन्ननलिकेपासून जवळजवळ इंचाच्या
    एक अष्टमांश इतक्या अंतरावर आहे.
  • 14:59 - 15:01
    हे असं आहे ज्यात खोटेपणाला
    वाव नाही.
  • 15:01 - 15:03
    मग मला ते छातीच्या हाडापुढे ढकलावं लागतं,
  • 15:03 - 15:06
    अन्ननलिकेच्या संकोचातून खाली पोटात,
  • 15:06 - 15:09
    पोटातील ताणाचा प्रतीक्षेत दाबून
    खाली आद्यांत्रापर्यंत.
  • 15:09 - 15:10
    अगदी सोपं आहे.
  • 15:10 - 15:11
    (हशा)
  • 15:11 - 15:13
    जर मला त्याहून पुढे जायचं झालं,
  • 15:13 - 15:18
    मी माझ्या अंडवाहिन्यांपर्यंत जाईन.
  • 15:18 - 15:21
    मित्रांनो आपल्या पत्नींना
    त्याबाबत नंतर विचारा ...
  • 15:22 - 15:24
    लोक मला विचारतात, म्हणतात,
  • 15:24 - 15:27
    "आयुष्य धोक्यात घालायला,
    हृदय हलवायला
  • 15:27 - 15:29
    आणि तलवार गिळायला
    खूप धैर्य लागत असेल..."
  • 15:29 - 15:30
    नाही. खरं धैर्य आहे ते
  • 15:30 - 15:33
    त्या भित्र्या, लाजाळू, बारीक,
    दुबळ्या मुलाने
  • 15:33 - 15:36
    अपयश आणि नकाराच्या विरुद्ध जाण्याचं,
  • 15:36 - 15:37
    त्याच्या मनाची कवाडं
    उघडण्याचं
  • 15:37 - 15:38
    व त्याचा अभिमान
    गिळण्याचं
  • 15:38 - 15:41
    आणि इथे अनोळखी व्यक्तींसमोर उभं राहण्याचं
  • 15:41 - 15:44
    आणि त्याच्या भयाची आणि स्वप्नांची
    कथा ऐकवण्याचं
  • 15:44 - 15:48
    मुक्तपणे, बिनधास्तपणे संवाद साधण्याचं.
  • 15:48 - 15:49
    असं बघा - धन्यवाद.
  • 15:49 - 15:54
    (टाळ्या)
  • 15:54 - 15:56
    असं बघा, खरी अदभूत गोष्ट अशी आहे कि
    मला माझ्या
  • 15:56 - 15:59
    आयुष्यात नेहमीच काहीतरी
    उल्लेखनीय करायचं होतं
  • 15:59 - 16:00
    आणि आता मी आहे.
  • 16:00 - 16:03
    पण खरी उल्लेखनीय गोष्ट
    हि नाही कि मी २१ तलवारी
  • 16:03 - 16:05
    एकावेळेस गिळू शकतो, किंवा
  • 16:08 - 16:10
    २० फुट पाण्याखाली एका टाकीत
    ८८ शार्क माशांसोबत गिळू शकतो
  • 16:10 - 16:12
    रिप्लिजच्या बिलिव्ह इट ऑर नॉट साठी,
  • 16:14 - 16:18
    किंवा स्टॅन लीज सुपरह्युमन्ससाठी १५००
    डिग्री लाल तळपती गिळू शकतो
  • 16:18 - 16:19
    "पोलादी पुरुष" म्हणून
  • 16:20 - 16:22
    आणि ती गरम होती!
  • 16:22 - 16:25
    किंवा रिप्लिजसाठी किंवा गिनेजसाठी
    तलवारीने
  • 16:25 - 16:26
    गाडी ओढणे
  • 16:26 - 16:29
    किंवा अमेरिका हॅज गॉट टॅलेंटच्या
    अंतिम फेरीत जाणे
  • 16:29 - 16:32
    किंवा २००७ चं वैद्यकशास्त्राच इग
    नोबेल पारितोषिक जिंकणं.
  • 16:32 - 16:34
    नाही, ती खरी उल्लेखनीय गोष्ट नाही.
  • 16:34 - 16:36
    तसं लोकांना वाटतं. नाही नाही. ते खरं नाही.
  • 16:36 - 16:38
    खरी उल्लेखनीय गोष्ट हि आहे
  • 16:38 - 16:41
    कि देव त्या भित्र्या, लाजाळू, बारीक,
    दुबळ्या मुलाला घेऊ शकला
  • 16:41 - 16:42
    जो घाबरायचा उंचीला,
  • 16:42 - 16:44
    पाण्याला व शार्क
    माशांना
  • 16:44 - 16:46
    व डॉक्टर्सना, परिचारिकांना
    सुयांना व तीक्ष्ण वस्तूंना
  • 16:46 - 16:48
    आणि लोकांशी बोलायला
  • 16:48 - 16:50
    आणि आता त्यानेच मला जगभर फिरवलं
  • 16:50 - 16:51
    ३०,००० फूट उंचीवरती
  • 16:51 - 16:54
    शार्क माशांच्या तलावात तीक्ष्ण वस्तू
    गिळायची ताकद दिली,
  • 16:54 - 16:57
    डॉक्टर्स, नर्सेस आणि आपल्यासारख्या
    जगभरातील श्रोत्यांसमोर बोलायचं बाळ दिलं.
  • 16:57 - 17:00
    ती माझ्यासाठी खरी उल्लेखनीय गोष्ट आहे.
  • 17:00 - 17:01
    मला नेहमी असाध्य काहीतरी करायचं होतं -
  • 17:01 - 17:02
    धन्यवाद.
  • 17:02 - 17:04
    (टाळ्या)
  • 17:04 - 17:05
    धन्यवाद.
  • 17:06 - 17:09
    (टाळ्या)
  • 17:10 - 17:13
    मला नेहमी काहीतरी असाध्य करायचं
    होतं आणि आता मी आहे.
  • 17:13 - 17:16
    मला जगपरिवर्तनासाठी माझ्या आयुष्यात
    काहीतरी उल्लेखनीय करायचं होतं
  • 17:16 - 17:17
    आणि आता मी आहे.
  • 17:17 - 17:20
    मला नेहमी जगभर फिरायचं होतं
    महानायकी कृत्य करत
  • 17:20 - 17:21
    आणि आयुष्य वाचवत, आणि आता मी आहे
  • 17:21 - 17:23
    आणि आपल्याला ठाऊक आहे का?
  • 17:23 - 17:26
    त्या लहान मुलाच्या मोठ्या स्वप्नातील
    एक छोटा भाग अजूनही आहे
  • 17:26 - 17:27
    खोल हृदयात.
  • 17:30 - 17:36
    (हशा) (टाळ्या)
  • 17:37 - 17:40
    आणि हे बघा, मला नेहमी
    माझं ध्येय शोधायचं होतं
  • 17:40 - 17:42
    आणि आता मला ते सापडलं आहे.
  • 17:42 - 17:43
    पण माहिती आहे का?
    तुम्ही
  • 17:43 - 17:46
    विचार करत असल्याप्रमाणे ते तालवारींत
    नाही, माझ्या बलस्थानांत नाही
  • 17:46 - 17:49
    ते खरंतर माझ्यातील उणीवेत
    आहे, माझ्या शब्दांत.
  • 17:49 - 17:51
    माझं ध्येय हे जगपरिवर्तनाचं आहे
  • 17:51 - 17:52
    भयच्छेद करून
  • 17:52 - 17:55
    एकवेळी एक तलवार, एकावेळी एक शब्द,
  • 17:55 - 17:57
    एकावेळी एक सुरी, एकावेळी एक आयुष्य,
  • 17:58 - 18:00
    लोकांना महानायक होण्यास आणि त्यांच्या
  • 18:00 - 18:02
    आयुष्यात असाध्य ते साध्य
    करण्यास प्रेरित करणे.
  • 18:02 - 18:05
    माझं ध्येय इतरांना त्यांचं शोधण्यासाठी
    मदत करणे हे आहे
  • 18:05 - 18:06
    तुमचं काय आहे?
  • 18:06 - 18:07
    तुमचं उद्दिष्ट काय आहे?
  • 18:07 - 18:09
    तुम्ही इथे काय करण्यासाठी आला आहात?
  • 18:09 - 18:12
    मला वाटतं आपण सर्वजण महानायक
    होण्यासाठी आलो आहोत.
  • 18:12 - 18:14
    तुमची अदभुत शक्ती कोणती?
  • 18:15 - 18:18
    जगाच्या ७ अब्ज लोकसंख्येपैकी,
  • 18:18 - 18:20
    काही थोडकेच तलवार गिळणारे
  • 18:20 - 18:22
    आज जिवंत आहेत,
  • 18:22 - 18:23
    पण तुम्ही एकमेव आहात.
  • 18:23 - 18:24
    तुम्ही अद्वितीय आहात.
  • 18:24 - 18:26
    तुमची गाथा काय?
  • 18:26 - 18:28
    तुमचं वेगळेपण काय?
  • 18:28 - 18:29
    तुमची कथा सांगा,
  • 18:29 - 18:32
    जरी तुमचा आवाज बारीक आणि थरथरता असला तरी.
  • 18:32 - 18:33
    तुमची स्वच्छंदी ध्येयं कोणती?
  • 18:33 - 18:36
    जर तुम्ही काहीही करू शकलात,
    कोणीही बनू शकलात, कुठेही
  • 18:36 - 18:37
    जाऊ शकलात - तुम्ही काय कराल?
  • 18:37 - 18:38
    तुम्ही कोठे जाल? काय
  • 18:38 - 18:40
    कराल? आयुष्यात तुम्हाला काय करायचंय?
  • 18:40 - 18:42
    तुमची मोठी स्वप्नं कोणती?
  • 18:42 - 18:44
    लहानपणी तुमची मोठी स्वप्नं काय होती?
    विचार करा.
  • 18:44 - 18:46
    मी शर्त लावतो, हे ते नव्हतं, होतं का?
  • 18:46 - 18:48
    तुमची सर्वांत विचित्र स्वप्नं
  • 18:48 - 18:50
    कोणती होती जी तुम्हाला वेगळी
    आणि अस्पष्ट वाटली?
  • 18:50 - 18:54
    मी शर्त लावतो हे पाहिल्यावर तुमची स्वप्नं
    तुम्हाला विचित्र वाटणार नाहीत,
  • 18:55 - 18:57
    नाही का? तुमची तलवार कोणती?
  • 18:57 - 18:59
    आपल्यापैकी प्रत्येकाकडे एक तलवार
  • 18:59 - 19:01
    आहे, एक दुधारी तलवार भयाची आणि स्वप्नांची
  • 19:01 - 19:04
    तुमची तलवार गिळा, कशीही असली तरी.
  • 19:04 - 19:06
    श्रोतेहो, तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.
  • 19:06 - 19:09
    तुम्हाला जे व्हायचं होतं ते होण्यासाठी
    कधीही उशीर झालेला नसतो.
  • 19:10 - 19:13
    डॉजबॉल खेळणाऱ्या त्या
    गुंड मुलांना ज्यांना वाटलं
  • 19:13 - 19:15
    कि मी असाध्य कधीही करू शकणार नाही,
  • 19:15 - 19:18
    मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे:
  • 19:18 - 19:19
    धन्यवाद.
  • 19:19 - 19:22
    कारण जर खलनायक नसते तर
    आपण महानायक झालो नसतो.
  • 19:23 - 19:27
    असाध्य ते असाध्य नाही हे सिद्ध
    करण्यासाठी मी इथे आलो आहे.
  • 19:28 - 19:32
    हे खूप धोकादायक आहे.
    ते माझा जीव घेऊ शकतं.
  • 19:32 - 19:34
    मी आशा करतो तुम्हाला ते आवडेल
  • 19:34 - 19:35
    (हशा)
  • 19:36 - 19:39
    हे करण्यासाठी मला आपली मदत लागेल.
  • 19:47 - 19:48
    श्रोते: दोन, तीन.
  • 19:48 - 19:52
    डॅन मेयर: नाही नाही. मला मोजण्यासाठी
    तुम्हां सगळ्यांची मदत हवी आहे, ठीक आहे?
  • 19:52 - 19:53
    (हशा)
  • 19:53 - 19:56
    जर तुम्हांला शब्द माहीत असतील तर? ठीक?
    माझ्यासोबत मोजा.
  • 19:56 - 19:57
    तयार? एक.
  • 19:57 - 19:58
    दोन.
  • 19:58 - 19:59
    तीन.
  • 19:59 - 20:01
    नाही ते २ आहे, पण तुम्हांला समजलंय आता.
  • 20:07 - 20:08
    श्रोते: एक.
  • 20:08 - 20:09
    दोन.
  • 20:09 - 20:10
    तीन.
  • 20:11 - 20:13
    (धापा टाकत)
  • 20:14 - 20:16
    (टाळ्या)
  • 20:16 - 20:17
    डॅमे: हा!
  • 20:17 - 20:23
    (टाळ्या) (कडकडाट)
  • 20:23 - 20:25
    आपला खूप आभारी आहे.
  • 20:25 - 20:29
    धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
    अगदी मनापासून धन्यवाद.
  • 20:29 - 20:31
    खरंतर अगदी पोटापासून धन्यवाद.
    मी आपल्याला सांगितलं
  • 20:32 - 20:35
    होतं मी इथे असाध्य ते करण्यासाठी आलो
    आहे आणि आता मी ते केलं आहे.
  • 20:35 - 20:38
    पण हे अशक्य नव्हतं.
    हे मी रोज करतो.
  • 20:38 - 20:43
    असाध्य गोष्ट त्या भित्र्या, लाजाळू, बारीक
    दुबळ्या मुलासाठी होती भयाला सामोरं
  • 20:43 - 20:45
    जाण्याची, इथे [TEDx ] मंचावर उभं
  • 20:45 - 20:47
    राहण्याची आणि जग बदलण्याची,
    एकावेळी एक शब्द,
  • 20:47 - 20:49
    एकावेळी एक तलवार, एकावेळी एक आयुष्य.
  • 20:49 - 20:52
    जर मी आपल्याला नवीन मार्गांनी विचार
    करायला भाग पाडलंय, जर मी
  • 20:52 - 20:54
    आपल्याला असाध्य ते असाध्य नसतं
    हे मानायला लावलंय
  • 20:54 - 20:58
    जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्टी
    करू शकता याची जाणीव मी करून देऊ
  • 20:58 - 21:01
    शकलो आहे तर माझं काम झालंय
    आणि तुमचं नुकतंच सुरु झालंय.
  • 21:01 - 21:04
    स्वप्नं बघणं कधी थांबवू नका.
    विश्वास ठेवणं कधी थांबवू नका.
  • 21:05 - 21:06
    माझ्यावरील विश्वासाबद्दल आभारी
  • 21:06 - 21:08
    आहे आणि माझ्या स्वप्नातील सहभागाबद्दल
  • 21:08 - 21:10
    धन्यवाद. आणि हि माझी भेट:
  • 21:10 - 21:11
    असाध्य ते असाध्य...
  • 21:11 - 21:13
    श्रोते: नसतं .
  • 21:13 - 21:15
    माझा प्रवास हा भेटीचाच भाग.
  • 21:15 - 21:20
    (टाळ्या)
  • 21:20 - 21:21
    धन्यवाद.
  • 21:21 - 21:25
    (टाळ्या)
  • 21:26 - 21:28
    (कडकडाट)
  • 21:28 - 21:30
    यजमान: वा, डॅन मेयर, धन्यवाद!
Title:
भयच्छेदाने असाध्य ते साध्य करणे । डॅन मेयर । TEDx मास्ट्रीट
Description:

महानायक होऊन अशक्य गोष्टी कधी कराव्याश्या वाटतात का? कितीही पराकोटीचं आपलं भय असलं किंवा कितीही विचित्र आपली स्वप्नं असली तरी आपल्या प्रत्येकात महानायक होण्याची क्षमता असते, अशक्य गोष्टी आपण करू शकतो आणि जगात परिवर्तन घडवून आणू शकतो असा डॅन मेयर यांचा विश्वास आहे. कझाकस्तानातील अनाथांना मदत करणाऱ्या एका मानवतावादी संघटनेचे संचालक असलेले डॅन आपल्याला सांगतात त्यांच्या लहानपणीच्या भयावर, सामाजिक विवंचनेवर आणि होणाऱ्या छळावर महानायकी कृत्य करण्यासाठी कशी मात केली, अमेरिका हॅज गॉट टॅलेंटमध्ये अंतिम स्पर्धक कसे झाले, हार्वर्ड विद्यापीठात २००७ सालचं इग नोबेल पारितोषिक कसे जिंकले, आणि तलवार गिळंकृत करणे या जगातील एका अतिप्राचीन आणि अतिधोकादायक कलेत ३९ वेळा विश्वविक्रम प्रस्थापित करून त्यातील आघाडीचे तज्ज्ञ कसे झाले आणि लोकांना त्यांच्या आयुष्यात अशक्य गोष्टी करण्यासाठी प्रेरणा देण्याच्या ध्येयाने वेडे कसे झाले.

त्यांच्या पहिल्या TED व्याख्यानात, डॅन श्रोत्यांना त्यांच्या अतिभयाकडून अतुलनीय कामगिरीकडे, दुबळेपणाकडून विश्वविक्रमादित्य होण्याकडे, हरलेल्या अवस्थेतून इग नोबेल पारितोषिक मिळवण्याकडे आणि पळपुटेपणाकडून अमेरिका हॅज गॉट टॅलेंटचा अंतिम स्पर्धक होण्यापर्यंतचा लांब प्रवास घडवून आणतात. तलवार गिळंकृत करण्याच्या प्राचीन कलेमागचं शास्त्र डाँ समजावून सांगतात, आणि महानायकी कृत्यं करण्यामागची त्यांच्या प्रबळ इच्छेचं, भयावर मात करण्याचं आणि अशक्य गोष्टी करण्यासाठी आणि जगपरिवर्तनासाठी मानवी शरीराच्या असलेल्या मर्यादांचं वर्णन करतात. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्टी करण्यासाठी भयच्छेद कसा करू शकता याबाबत क्लुप्त्या सांगतात!

हे व्याख्यान एका स्थानिक TEDx कार्यक्रमात दिलं होतं, TED परिषदांमधून स्वतंत्र निर्मिती केली होती.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDxTalks
Duration:
21:38

Marathi subtitles

Revisions