Return to Video

माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड- रिपीट लूप्स

  • 0:00 - 0:07
    मी लिडीया विंटर्स, मोयांगची ब्रँड डीरेक्टर. आम्ही एक छोटा गेम बनवला आहे, माईनक्राफ्ट.
  • 0:07 - 0:12
    माईनक्राफ्टमधली माझी सर्वांत आवडती गोष्ट म्हणजे एक्स्प्लोर करणे.
    मला गुहांमध्ये शोध घ्यायला आणि काय
  • 0:12 - 0:18
    सापडतेय ते पाहायला आवडते. मी प्रोग्रॅमर नसल्यामुळे,
    मला माईनक्राफ्टचे
  • 0:18 - 0:25
    धडे पाहायला आणि स्वत:च कोडींग शिकायला खूप मजा येते.
  • 0:25 - 0:30
    शेवटच्या पातळीमध्ये खूप moveForward(); ब्लॉक्स लागतात. जर आपण कॉम्प्युटरला मूव्ह फॉरवर्ड कमांड
  • 0:30 - 0:36
    चार ते पाचवेळा करायला सांगू शकलो तर सोपे पडेल. सुदैवाने, रिपीट लूप वापरून कमांड्स पुन्हापुन्हा करण्यात
  • 0:36 - 0:43
    कॉम्प्युटर पारंगत आहेत. माईनक्राफ्ट तयार करताना आपण नवीन जग तयार करण्यासाठी सर्व सुरुवातीचे
  • 0:43 - 0:49
    मटेरियल ठेवण्यासाठी रिपीट लूप्स वापरतो. अगदी हजारो ब्लॉक्स. आपण
  • 0:49 - 0:55
    छोट्या प्रमाणातसुद्धा लूप्स वापरतो, उदा. अलेक्स चालते तेव्हा तिचे पाय मागे पुढे करायला.
  • 0:55 - 1:01
    रिपीट लूप्स हा प्रोग्रॅमिंगचा ताकदवान भाग आहे.
  • 1:01 - 1:06
    रात्र होते आहे त्यामुळे पुढच्या दोन पातळ्यांमध्ये आपण सुरक्षित राहण्यासाठी घर बांधणार आहोत.
  • 1:06 - 1:13
    हे फार सोपे आहे. आपल्या घराची भिंत बांधण्यासाठी, आपण अलेक्सला पुढे यायला
  • 1:13 - 1:18
    आणि फळ्या चारवेळा लावायला सांगू शकतो किंवा आपण तिला पुढे जाऊन एक फळी ठेवायला सांगू शकतो, नंतर
  • 1:18 - 1:24
    ही कमांड घ्या आणि तिला हीच कृती पुन्हापुन्हा करायला लावण्यासाठी रिपीट ब्लॉक वापरा.
  • 1:24 - 1:28
    आता आपण रिपीट ब्लॉकवर क्लिक करू आणि तिनं कितीवेळा ही कृती
  • 1:28 - 1:32
    करायची आहे, ते सांगू. चला, रात्र होण्यापूर्वी आपलं घर बांधूया! मजा करा!
Title:
माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड- रिपीट लूप्स
Description:

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
01:35

Marathi subtitles

Revisions Compare revisions