Return to Video

गोंदण तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकते का?

  • 0:01 - 0:06
    मी ओट्झी नावाच्या एका मनोरंजक व्यक्तिची
    ओळख करून देऊ इच्छितो
  • 0:06 - 0:08
    तो इटली मध्ये राहतो
  • 0:08 - 0:10
    दक्षिण टिरोल पुरातत्व संग्रहालयात त्याचे
  • 0:10 - 0:12
    मृत शरीर स्मारक ममी आहे.
  • 0:13 - 0:15
    हे एका कलाकाराचे सादरीकरण आहे की
  • 0:16 - 0:17
    ५३००वर्षांपूर्वी तो कसा दिसत असेल
  • 0:18 - 0:20
    तुम्हाला बघायचंय आज तो कसा दिसतो?
  • 0:20 - 0:22
    (हास्य)
  • 0:22 - 0:25
    ठीक आहे, श्वास रोखून धरा.
    ममीचे ठळक चित्र येत आहे
  • 0:26 - 0:30
    तर तो आता पूर्वीप्रमाणे सुंदर दिसत नाही
  • 0:30 - 0:33
    पण ममी म्हणून तो उत्कृष्ट स्वरूपात आहे
  • 0:33 - 0:35
    कारण तो बर्फात गोठलेला सापडला.
  • 0:36 - 0:41
    ओट्झी त्वचा असलेला सर्वात प्राचीन ममी आहे
  • 0:41 - 0:43
    ५३०० वर्षे प्राचीन
  • 0:43 - 0:45
    इजिप्त मधील पिरामिड पेक्षाही प्राचीन
  • 0:45 - 0:51
    ओट्झी ची त्वचा
    ६१ काळ्या गोंदणांनी झाकलेली आहे.
  • 0:51 - 0:54
    शरीराच्या अवयवांवर रेषा आणि फुल्या आहेत
  • 0:54 - 0:56
    जिथे त्याला अत्यंत वेदना झाल्या असतील
  • 0:56 - 0:59
    वैज्ञानिकांना वाटते
    या जागांचा उपयोग त्यांनी
  • 0:59 - 1:01
    काही उपचारासाठी केला असावा
  • 1:01 - 1:02
    जसं अँक्युपंक्चर
  • 1:03 - 1:07
    तर स्पष्टपणे, आपण पाहिलेली प्राचीन त्वचा
  • 1:07 - 1:09
    जर संपूर्ण गोंदलेली असेल
  • 1:09 - 1:11
    तर गोंदण ही खूप प्राचीन प्रथा आहे
  • 1:11 - 1:15
    आजकाल तर ती सर्वदूर पसरली आहे.
  • 1:15 - 1:18
    जवळपास चारपैकी एका
    अमेरिकन व्यक्तिने गोंदले आहे
  • 1:18 - 1:21
    हा लाखो डॉलर्सचा उद्योग आहे
  • 1:21 - 1:23
    तुम्हाला गोंदण आवडो की न आवडो
  • 1:23 - 1:26
    ही चर्चा त्याबाबतचे तुमचे मत बदलेल
  • 1:27 - 1:29
    तर, गोंदण इतके लोकप्रिय का आहे?
  • 1:31 - 1:35
    ओट्झी वगळता अनेकजण,
    गोंदणाचा उपयोग स्वअभिव्यक्ति साठी करतात
  • 1:36 - 1:39
    व्यक्तीश: मलागोंदण आवडते.
    मी कलेचा चाहता आहे.
  • 1:39 - 1:42
    माझ्यासाठी ती अद्भुत गोष्ट आहे
  • 1:42 - 1:45
    जवळ जवळ अद्भुत रम्य कलाकृती
  • 1:45 - 1:48
    जिची खरेदी- विक्री होऊ शकत नाही
  • 1:48 - 1:50
    बरोबर? तुमचं गोंदण तुमच्यासोबत राहतं,
    अन नष्ट होतं.
  • 1:50 - 1:53
    त्याची खरेदी- विक्री किंवा
    व्यवहार होत नाही.
  • 1:53 - 1:55
    म्हणून त्याचे केवळ व्यक्तिगत मूल्य आहे
  • 1:55 - 1:57
    आणि मला ते आवडते
  • 1:57 - 2:00
    आता मी रंगीत गोंदणाकडे आकर्षित होतो
  • 2:00 - 2:02
    कारण मी रंगांनी पछाडलेला आहे
  • 2:02 - 2:04
    माझ्या विद्यापिठात मी
    त्यावर पूर्ण अभ्यासक्रम शिकवतो.
  • 2:04 - 2:07
    पण माझं पहिलं गोंदण पूर्ण काळं होतं
  • 2:07 - 2:09
    ओट्झीप्रमाणे
  • 2:09 - 2:13
    हो,मी अशी अतिपरिचित गोष्ट केली
    जी तरूण कधीतरी करतात
  • 2:13 - 2:16
    मी गोंदवून घेतलं अशा भाषेत
    जी मला वाचता ही येत नाही
  • 2:16 - 2:18
    (हास्य)
  • 2:18 - 2:20
    ठीक आहे,पण मी १९ वर्षांचा होतो
  • 2:20 - 2:24
    मी माझ्या पहिल्या
    परदेशवारीहून परतलो होतो,
  • 2:24 - 2:26
    मी जपानमध्ये पर्वतात होतो
  • 2:26 - 2:28
    बौद्ध मठात ध्यान करत होतो
  • 2:28 - 2:31
    खूप अर्थपूर्ण अनुभव होता तो
  • 2:31 - 2:34
    मला तो चीनी व जपानी भाषेद्वारे
    संस्मरणीय करायचा होता
  • 2:34 - 2:35
    पर्वत शब्द वापरुन
  • 2:37 - 2:40
    हे मला प्रभावित करते
  • 2:40 - 2:42
    माझे १४ वर्षे जुने गोंदण
  • 2:42 - 2:46
    आणि ओट्झीचे ५,३०० वर्षे जुने गोंदण
  • 2:46 - 2:49
    एकाच घटकाने बनले आहेत
  • 2:49 - 2:51
    काजळी
  • 2:51 - 2:53
    काळी कार्बन ची भुकटी
  • 2:53 - 2:56
    जी फायरप्लेसमध्ये
    काही जाळल्यावर मागे उरते.
  • 2:56 - 3:01
    तुम्ही माझे किंवा ओट्झीचे गोंदण
    बारकाईने पाहिले तर
  • 3:01 - 3:03
    ते काहीसे असे दिसेल
  • 3:04 - 3:08
    गोंदण म्हणजे सूक्ष्म रंगकणांचा गुच्छ
  • 3:08 - 3:09
    याठिकाणी काजळी
  • 3:10 - 3:11
    अंतस्त्वचेमध्ये अडकते
  • 3:11 - 3:15
    जो त्वचेच्या पृष्ठभागाखालचा थर आहे
  • 3:15 - 3:18
    तर मागील पाच हजार वर्षांमध्ये आपण
  • 3:18 - 3:21
    गोंदणाचे तंत्रज्ञान अद्ययावत करण्याचे
    नगण्य प्रयत्न केले
  • 3:21 - 3:24
    फक्त अधिकाधिक रंगात आणि
  • 3:24 - 3:26
    अधिक कार्यक्षम पद्धतीने गोंदण्याशिवाय
  • 3:28 - 3:31
    मी एक कलाकार आहे आणि वैज्ञानिक सुद्धा
  • 3:31 - 3:35
    मी सूक्ष्म तंत्रज्ञानात संशोधन करणाऱ्या
    प्रयोगशाळेत मार्गदर्शन करतो
  • 3:35 - 3:39
    हे अतिसूक्ष्म ठोकळ्यांपासून
    वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान आहे
  • 3:39 - 3:43
    मानवी केसाच्या जाडीच्या हजारो पट सूक्ष्म
  • 3:43 - 3:45
    मी स्वत:ला प्रश्न विचारायला लागलो
  • 3:45 - 3:47
    सूक्ष्म तंत्रज्ञान गोंदण कलेला
    कसे मदत करू शकते?
  • 3:48 - 3:51
    जर गोंदण फक्त त्वचेतील
    सूक्ष्म कणांचा गुच्छ असेल
  • 3:51 - 3:56
    तर एखाद्या जास्त रंजक गोष्टीशी
    त्याची अदलाबदल करता येईल का?
  • 3:57 - 3:58
    माझी मोठी कल्पना अशी आहे
  • 3:58 - 4:01
    मला वाटतं गोंदण तुम्हाला महाशक्ति देऊ शकते
  • 4:01 - 4:03
    (हास्य)
  • 4:03 - 4:05
    म्हणजे ते आपल्याला उडायला मदत नाही करणार
  • 4:05 - 4:07
    पण मला वाटते की
    आपल्याला महाशक्ति मिळू शकते
  • 4:07 - 4:11
    गोंदण एकप्रकारे
    आपल्याला नवीन क्षमता देऊ शकते
  • 4:11 - 4:13
    ज्या आत्ता आपल्याजवळ नाहीत
  • 4:14 - 4:18
    सूक्ष्मकण सुधारून आपण
    गोंदण तंत्रज्ञान विकसित करू शकतो.
  • 4:18 - 4:21
    त्यामुळे फक्त त्वचेचं दिसणं नव्हे
  • 4:21 - 4:23
    तर कार्यही बदलेल
  • 4:24 - 4:26
    मी तुम्हांला दाखवतो
  • 4:26 - 4:28
    ही सूक्ष्मकुपीची आकृती आहे
  • 4:29 - 4:32
    हा संरक्षक बाह्यकवच असलेला
    पोकळ सूक्ष्मकण आहे
  • 4:32 - 4:34
    गोंदणाच्या रंगकणाच्या आकाराचा
  • 4:34 - 4:37
    आत तुम्ही व्यावहारिकदृष्ट्या
    हवे ते भरू शकता
  • 4:38 - 4:43
    जर एखादा मनोरंजक घटक या सूक्ष्मकुपीत भरला
  • 4:43 - 4:44
    व त्याने गोंदणाची शाई केली तर
  • 4:45 - 4:48
    आपण गोंदणाला काय कार्य करायला लावू शकतो?
  • 4:48 - 4:51
    कोणत्या समस्या आपण सोडवू शकतो?
  • 4:51 - 4:53
    कोणत्या मानवी मर्यादा ओलांडू शकतो?
  • 4:54 - 4:56
    एक कल्पना आहे
  • 4:57 - 4:58
    मानव म्हणून आपली कमजोरी म्हणजे
  • 4:58 - 5:02
    आपण अल्ट्रा व्हायोलेट किंवा
    अतिनीलकिरण पाहू शकत नाही
  • 5:02 - 5:04
    तो उच्च ऊर्जायुक्त भाग आहे
  • 5:04 - 5:08
    त्यामुळे सनबर्न होते आणि
    त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो
  • 5:09 - 5:12
    बरेच प्राणी व किटक अतिनील किरण पाहू शकतात
    पण आपण नाही
  • 5:13 - 5:17
    तसं असतं तर आपण त्वचेवर लावलेले
    सनस्क्रीन पाहू शकलो असतो
  • 5:18 - 5:21
    दुर्दैवाने आपल्यापैकी बरेचजण
    सनस्क्रीन लावत नाहीत
  • 5:21 - 5:23
    आणि जे लावतात
  • 5:23 - 5:26
    ते सांगू शकत नाहीत की
    ते कधी निघून गेले कारण ते अदृश्य असते
  • 5:26 - 5:29
    याच प्रमुख कारणामुळे
    आपण दरवर्षी एकट्या यू.एस्.मध्ये
  • 5:29 - 5:33
    टाळता येण्याजोग्या त्वचेच्या कर्करोगाच्या
    ५ दशलक्ष रुग्णांवर उपचार करतो
  • 5:33 - 5:36
    यासाठी आपली अर्थव्यवस्था
    दरवर्षी ५ अब्ज डॉलर खर्च करते
  • 5:37 - 5:40
    या मानवी कमजोरीवर आपण
    गोंदणाच्या मदतीने कशी मात करू शकतो?
  • 5:41 - 5:46
    आपण अतिनील किरण
    पाहू शकत नाही ही समस्या असेल
  • 5:46 - 5:49
    तर आपण गोंदणाला ते शोधायला लावू शकतो
  • 5:49 - 5:52
    मला वाटलं, आपण काही सूक्ष्मकुपी घेऊन
  • 5:52 - 5:56
    अतिनील किरणांना संवेदनशील
    व छटा बदलणारा रंग भरून
  • 5:56 - 5:58
    त्यापासून गोंदणाची शाई बनवली तर?
  • 5:59 - 6:04
    आता गोंदण तंत्रज्ञ असण्याचा तोटा म्हणजे
  • 6:04 - 6:06
    चाचणीसाठी इच्छुक उमेदवार शोधणे
  • 6:06 - 6:07
    (हास्य)
  • 6:07 - 6:11
    जेव्हा या शाईची चाचणी घेण्याची वेळ आली
  • 6:11 - 6:14
    तेव्हा मी विचार केला, माझ्या बिचारा
    पदवीधर विद्यार्थ्यांना न छळणेच उत्तम
  • 6:14 - 6:19
    त्याऐवजी मी स्वतःच्या हातावर
    काही ठिपके गोंदायचे ठरवले
  • 6:20 - 6:23
    आणि खरोखर ते साध्य झाले. हे पहा!
  • 6:23 - 6:25
    मी त्यांना सौर ठिपके म्हणतो
  • 6:25 - 6:28
    कारण त्यांना सूर्यकिरणांपासून उर्जा मिळते
  • 6:28 - 6:30
    आणि या क्षणी ते अदृश्य आहेत
  • 6:30 - 6:33
    ज्या क्षणी मी त्यांना अतिनील किरणांच्या
    सान्निध्यात नेईन, सूर्याप्रमाणे
  • 6:33 - 6:35
    हे असे निळे ठिपके
  • 6:36 - 6:39
    या ध्वनीचित्रफीतीमध्ये
    मी सनस्क्रीन लावलेले नाही
  • 6:39 - 6:42
    लावले असते तर हे निळे ठिपके दिसले नसते
  • 6:42 - 6:44
    नंतर जेव्हा माझे सनस्क्रीन निघून गेले
  • 6:44 - 6:47
    अतिनील किरणांमध्ये सौर ठिपके
    पुन्हा दिसू लागले
  • 6:47 - 6:50
    मला कळाले की आता
    सनस्क्रीन लावायची वेळ झाली आहे
  • 6:50 - 6:54
    तर ही गोंदणे काम करतात
    डोळ्याला दिसतील अश्या निदर्शकांचे
  • 6:54 - 6:56
    त्वचेवरील अतिनील किरणांच्या
  • 6:57 - 6:58
    आणि अर्थातच
  • 6:58 - 7:03
    तुम्ही कलाकुसरही करू शकताच
  • 7:03 - 7:05
    या रंग बदलणार्या गोंदणा सोबत
  • 7:06 - 7:10
    आशा आहे की एक मोठी समस्या
    सोडविण्यासाठी हा आपल्याला मदत करेल
  • 7:10 - 7:12
    त्वचेच्या रक्षणासंदर्भात
  • 7:12 - 7:18
    (टाळ्या)
  • 7:21 - 7:23
    तुम्हाला अजून एक उदाहरण देतो
  • 7:23 - 7:28
    मानवी शरीराचे सामान्य तापमान
    ९७ ते ९९ अंश फॅरनहाइट असते
  • 7:28 - 7:30
    ते कमी जास्त झाले तर
  • 7:30 - 7:33
    लगेच तुम्हाला वैद्यकीय सेवा घ्यावी लागते.
  • 7:33 - 7:37
    समस्या ही आहे की माणूस
    स्वतःच्या शरीराचे तापमान तापमापकाशिवाय
  • 7:37 - 7:39
    ओळखू शकत नाही
  • 7:39 - 7:42
    नक्कीच, तुम्ही जुन्या पद्धतीने
    कपाळावर हात ठेवून पाहू शकता
  • 7:42 - 7:44
    पण तिला काहीच वैज्ञानिक आधार नाही
  • 7:44 - 7:46
    (हास्य)
  • 7:46 - 7:49
    मग जर आपण गोंदलेला तापमापक बनवला तर
  • 7:49 - 7:50
    जो तुम्ही कधीही उपयोगात आणू शकता?
  • 7:51 - 7:56
    आठवतंय? सौर टिपक्यांनी अतिनील किरणांना
    संवेदनशील रंग कसा वापरला
  • 7:56 - 7:59
    गोंदणाच्या शाईच्या सूक्ष्म कुपीमध्ये?
  • 7:59 - 8:01
    तुम्ही उष्मा संवेदनशील
    रंगही वापरू शकता
  • 8:01 - 8:03
    सूक्ष्म कुपीमध्ये
  • 8:03 - 8:05
    आणि तुम्ही अनेक प्रकारची शाई बनवू शकता
  • 8:05 - 8:08
    जी वेगवेगळ्या तापमानाला रंग बदलते.
  • 8:08 - 8:13
    समजा, ते ९६,९८ व १०० अंश फॅरनहाइट होते
  • 8:13 - 8:16
    तुम्ही त्या शाई शेजारी शेजारी ठेवल्या
  • 8:16 - 8:18
    आता तुमच्याकडे शरीराशी संलग्न
  • 8:18 - 8:20
    तापमापक पट्टी आहे.
  • 8:20 - 8:25
    या ध्वनिचित्रफितीमध्ये
    तुम्हाला गोंदणाचे विविध तुकडे
  • 8:25 - 8:27
    क्रमाने अदृश्य होताना दिसतील
  • 8:27 - 8:29
    जसजशी आम्ही चाचणी घेतलेली डुकराची त्वचा
  • 8:29 - 8:30
    गरम होत जाईल.
  • 8:30 - 8:33
    म्हणून तुम्हाला असे गोंदून घ्यायचे असेल
  • 8:33 - 8:37
    जिथे बाह्य तापमानातील चढउताराचा
    काहीही परिणाम होत नाही
  • 8:37 - 8:40
    तोंडामध्ये किंवा कदाचित
    ओठांच्या मागच्या बाजूला?
  • 8:42 - 8:44
    तर तुम्हाला फक्त आरशात
    तुमच्या गोंदणाकडे पाहून
  • 8:44 - 8:46
    तुमच्या शरीराचे तापमान कधीही मोजता येईल
  • 8:47 - 8:48
    आश्चर्यकारक, बरोबर?
  • 8:50 - 8:51
    (टाळ्या)
  • 8:51 - 8:52
    धन्यवाद
  • 8:52 - 8:56
    (टाळ्या)
  • 8:56 - 8:58
    माणूस म्हणून आपली दुसरी कमजोरी म्हणजे
  • 8:58 - 9:01
    आपली त्वचा विजेची संवाहक नाही.
  • 9:02 - 9:05
    ही चांगली गोष्ट आहे पण आवश्यक नाही.
  • 9:05 - 9:06
    (हास्य)
  • 9:06 - 9:10
    जर तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक
    बायोमेडिकल इम्प्लांट असेल
  • 9:10 - 9:12
    उदाहरणार्थ पेसमेकर
  • 9:12 - 9:15
    आता तुम्हाला पेसमेकर असेल तर
  • 9:15 - 9:19
    त्याची बॅटरी संपल्यावर बदलण्यासाठी दर
    ५ते १० वर्षांनी शस्त्रक्रिया करावी लागते
  • 9:19 - 9:22
    किती चांगले होईल जर त्याऐवजी
  • 9:22 - 9:25
    संवाहक त्वचेच्या माध्यमातून
    बॅटरी पुन्हा चार्ज करता आली तर?
  • 9:27 - 9:30
    गोंदणाच्या माध्यमातून
    ही समस्या हाताळायची असेल तर
  • 9:30 - 9:34
    विद्युत संवाहक गोंदण बनवणे
    ही पहिली पायरी आहे.
  • 9:34 - 9:37
    माझ्या प्रयोगशाळेत आम्ही
    संवाहक शाई बनवण्यासाठी काम करत आहोत
  • 9:37 - 9:43
    आता आम्ही त्वचेची संवाहकता
    ३०० पटींनी वाढवण्यात यशस्वी झालो आहोत
  • 9:43 - 9:45
    आमच्या गोंदणाच्या संवाहक शाईमुळे
  • 9:46 - 9:49
    लांबचा पल्ला गाठल्यावर
    मिळेल संवाहकता
  • 9:49 - 9:52
    तांब्याच्या तारेसारखी
  • 9:52 - 9:53
    मी खूप उत्सुक आहे
  • 9:54 - 9:56
    यामुळे शक्यतांचे
    विश्व खुले होईल
  • 9:56 - 9:58
    गोंदणासाठी.
  • 9:58 - 10:02
    मला असे भविष्य दिसते जिथे
    गोंदण आपल्याला सक्षम बनवते
  • 10:02 - 10:06
    गोंदण्यायोग्य तारा सक्षम बनवतील
  • 10:06 - 10:12
    तंत्रज्ञान आपल्या शरीरात
    सामावून घेण्यासाठी
  • 10:12 - 10:13
    जणूकाही ते आपला विस्तारच आहेत
  • 10:14 - 10:15
    बाह्य उपकरण नव्हे
  • 10:17 - 10:22
    ही प्रगत उदाहरणे पहा
    सूक्ष्मतंत्रज्ञानाच्या वापराची .
  • 10:22 - 10:26
    गोंदणासाठी
  • 10:27 - 10:28
    ही सुरूवात आहे
  • 10:28 - 10:34
    हाय टेक गोंदणाच्या मदतीने
    खूप काही साध्य करता येईल.
  • 10:34 - 10:37
    भविष्यात गोंदण फक्त सुंदर असणार नाही,
  • 10:37 - 10:39
    तर ते कार्यक्षम सुद्धा असेल,
  • 10:39 - 10:41
    धन्यवाद
  • 10:41 - 10:43
    (टाळ्या)
Title:
गोंदण तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकते का?
Speaker:
कार्सन ब्रून्स
Description:

आपण गोंदणाला सुंदर तसेच कार्यक्षम बनवू शकतो का? सूक्ष्मतंत्रज्ञ कार्सन ब्रून्स सांगत आहेत त्यांच्या उच्च तंत्रज्ञान युक्त गोंदणाच्या निर्मितीबद्दल जे त्याच्या पर्यावरणाला प्रतिक्रिया देते. जसे रंग बदलणारी शाई सांगते तुम्हाला कधी सनबर्न होत आहे. शिवाय रोमांचक रीतीने ते तुमच्या वर्तमान आरोग्याविषयी माहिती देते

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
10:58

Marathi subtitles

Revisions