Return to Video

उत्तम संभाषणाचे दहा मार्ग

  • 0:01 - 0:03
    चला, आता पटापट हात वर करा पाहू..
  • 0:03 - 0:05
    तुमच्यापैकी किती लोकांनी फेसबुकवर
  • 0:05 - 0:09
    राजकारण, धर्म, शिशुसंगोपन, अन्न याबद्दल
    आक्षेपार्ह मत व्यक्त करणाऱ्या
  • 0:09 - 0:11
    व्यक्तीशी मैत्री तोडली आहे?
  • 0:11 - 0:13
    (हशा)
  • 0:13 - 0:16
    आणि किती जण, एखाद्या व्यक्तीशी
  • 0:16 - 0:18
    अजिबात बोलावं लागू नये,
    म्हणून तिला टाळतात?
  • 0:19 - 0:21
    (हशा)
  • 0:21 - 0:24
    पूर्वी, चांगलं संभाषण करायचं असेल, तर
    'माय फेअर लेडी' मधल्या
  • 0:24 - 0:27
    हेन्री हिगिन्सचा सल्ला पुरत असे.
    दोनच गोष्टींविषयी बोलणे.
  • 0:27 - 0:29
    हवापाणी आणि आपली तब्येत.
  • 0:29 - 0:33
    पण आजकाल हवामान बदल,
    लशीकरण विरोध यामुळे हे विषयही
  • 0:33 - 0:34
    (हशा)
  • 0:34 - 0:35
    सुरक्षित राहिलेले नाहीत.
  • 0:35 - 0:38
    आजच्या आपल्या जगात
  • 0:39 - 0:41
    कोणतंही संभाषण
  • 0:41 - 0:43
    वादाचं कारण ठरू शकतं.
  • 0:43 - 0:46
    आपले राजकारणी
    एकमेकांशी संवाद साधू शकत नाहीत.
  • 0:46 - 0:48
    अत्यंत बिनमहत्त्वाच्या मुद्द्यांवरून
  • 0:48 - 0:53
    दोन विरुद्ध बाजू हिरीरीने झगडत असतात,
    आणि ते योग्य मानलं जातं.
  • 0:53 - 0:56
    प्यू संशोधन संस्थेच्या,
    १०००० अमेरिकन प्रौढांवरच्या संशोधनानुसार
  • 0:56 - 0:59
    या क्षणी आपल्यामध्ये
  • 0:59 - 1:00
    इतिहासातल्या
  • 1:00 - 1:03
    कोणत्याही काळातल्यापेक्षा
    जास्त फूट पडलेली आहे.
  • 1:03 - 1:05
    आपण समझोता करत नाही.
  • 1:05 - 1:07
    याचा अर्थ, आपण एकमेकांचं ऐकून घेत नाही.
  • 1:07 - 1:09
    कुठे राहावं, कोणाशी लग्न करावं,
  • 1:09 - 1:12
    कोणाशी मैत्री करावी अशासारखे निर्णय
  • 1:12 - 1:14
    आपण आपल्या पूर्वसमजुतींनुसार घेतो.
  • 1:14 - 1:17
    म्हणजेच, आपण एकमेकांचं म्हणणं
    ऐकून घेत नाही.
  • 1:17 - 1:20
    संभाषणासाठी, बोलणं आणि ऐकणं
    यातला तोल सांभाळावा लागतो.
  • 1:20 - 1:23
    हा तोल आपण हरवून बसलो आहोत.
  • 1:23 - 1:25
    तंत्रज्ञान हे त्यामागचं एक कारण आहे.
  • 1:25 - 1:28
    स्मार्टफोन्स. ते आपल्या सर्वांच्या
    हातात तरी असतात,
  • 1:28 - 1:30
    किंवा पट्कन उचलता येतील इतके जवळ असतात.
  • 1:30 - 1:32
    प्यू संशोधन संस्थेनुसार,
  • 1:32 - 1:37
    अमेरिकन तरुणाईतली १/३ मुलं
    दरदिवशी शंभरावर एसेमेस पाठवतात.
  • 1:37 - 1:41
    त्यापैकी बहुतेक सर्वचजण कधीच
    मित्रमैत्रिणींशी प्रत्यक्षात बोलत नाहीत,
  • 1:41 - 1:43
    फक्त एसेमेस पाठवतात.
  • 1:44 - 1:46
    'द अटलांटिक' मासिकात
    पॉल बार्नवेल नावाच्या
  • 1:46 - 1:49
    माध्यमिक शिक्षकांनी
    एक सुरेख लेख लिहिला आहे.
  • 1:49 - 1:51
    त्यांनी प्रकल्पासाठी
    'संभाषण' हा विषय दिला.
  • 1:51 - 1:55
    एखाद्या विषयावर टिपणं न वापरता
    कसं बोलावं, हे शिकवावं, म्हणून.
  • 1:55 - 1:57
    आणि ते म्हणाले, "माझ्या लक्षात आलं, की
  • 1:57 - 2:00
    (हशा)
  • 2:00 - 2:03
    संभाषण या एका कौशल्याकडे
    आपलं दुर्लक्ष झालं आहे.
  • 2:03 - 2:07
    आपण ते शाळेत शिकवतच नाही.
  • 2:08 - 2:12
    मुलं दिवसभर तंत्रज्ञान साधनांवरून कल्पना
    जाणून घेतात, एकमेकांशी संपर्क साधतात.
  • 2:12 - 2:14
    पण एकमेकांशी संवाद साधून
  • 2:14 - 2:16
    त्यातलं कौशल्य वाढवण्याची संधी
    त्यांना क्वचितच मिळते.
  • 2:16 - 2:19
    हा प्रश्न कदाचित विनोदी वाटेल, पण
    आपण तो स्वतःला विचारायला हवा.
  • 2:20 - 2:21
    आज २१व्या शतकात,
  • 2:21 - 2:27
    सुसंगत संभाषण करणे यापेक्षा
    जास्त महत्त्वाचं कौशल्य आहेच कुठे?"
  • 2:27 - 2:29
    माझ्या व्यवसायासाठी मी सतत
    लोकांशी बोलत असते.
  • 2:29 - 2:32
    नोबेल पारितोषिक विजेते, ट्र्क चालक,
  • 2:32 - 2:34
    कोट्यधीश, बालवाडी शिक्षिका,
  • 2:34 - 2:37
    राष्ट्रप्रमुख, नळ दुरुस्ती करणारे.
  • 2:37 - 2:40
    मी मला आवडणाऱ्या लोकांशी बोलते,
    आणि न आवडणाऱ्या लोकांशीही बोलते.
  • 2:40 - 2:44
    ज्यांची मतं मला अजिबातच पटत नाहीत,
    अशा लोकांशीही मी बोलते.
  • 2:44 - 2:46
    आणि तरीही मी त्यांच्याशी
    उत्तम संभाषण करते.
  • 2:46 - 2:50
    म्हणून, आता पुढच्या १० मिनिटांत
    मी तुम्हांला कसं बोलावं आणि कसं ऐकावं,
  • 2:50 - 2:52
    ते शिकवणार आहे.
  • 2:53 - 2:55
    तुमच्यापैकी अनेकांनी याविषयी
    पुष्कळ सल्ले ऐकले असतील.
  • 2:55 - 2:57
    उदाहरणार्थ, समोरच्या व्यक्तीकडे पहा.
  • 2:57 - 3:01
    कोणत्या रंजक विषयांवर बोलायचं
    ते आधीच ठरवा.
  • 3:01 - 3:06
    आपलं लक्ष आहे हे दाखवण्यासाठी
    मान डोलवा, स्मितहास्य करा.
  • 3:06 - 3:09
    नुकतंच ऐकलेलं वाक्य पुन्हा म्हणा,
    किंवा त्याचा सारांश सांगा.
  • 3:09 - 3:11
    मी म्हणेन, हे सगळं विसरून जा.
  • 3:11 - 3:12
    हे साफ चुकीचं आहे.
  • 3:12 - 3:15
    (हशा)
  • 3:15 - 3:19
    आपण खरोखरच लक्ष देत असू, तर
  • 3:19 - 3:23
    तसं दाखवायला शिकण्याची गरजच नाही.
  • 3:23 - 3:25
    (हशा)
  • 3:25 - 3:28
    (टाळ्या)
  • 3:28 - 3:31
    एक व्यावसायिक मुलाखतकार म्हणून
    काम करताना मी जी कौशल्यं वापरते,
  • 3:31 - 3:34
    तीच माझ्या वैयक्तिक आयुष्यातही वापरते.
  • 3:34 - 3:38
    आज मी तुम्हांला मुलाखत कशी घ्यावी,
    हे शिकवणार आहे.
  • 3:38 - 3:42
    आणि त्यातूनच, उत्तम संभाषण कसं करावं
    हे तुम्हांला शिकायला मिळेल.
  • 3:42 - 3:43
    उत्तम संभाषण कसं असावं?
  • 3:43 - 3:45
    वेळेचा अपव्यय न करणारं, कंटाळा न आणणारं,
  • 3:46 - 3:49
    आणि कोणालाही न दुखावणारं.
  • 3:49 - 3:51
    आपण कधी ना कधी उत्तम संभाषण केलं असेल.
  • 3:51 - 3:53
    ते कसं असावं, हे आपल्याला ठाऊक असेल.
  • 3:53 - 3:57
    संभाषण उत्तम झाल्यास,
    सूर जुळल्याचा अनुभव येतो.
  • 3:57 - 3:59
    उत्साह वाटतो.
    संवाद साधल्याचं समाधान मिळतं.
  • 3:59 - 4:02
    आपलं म्हणणं समोरच्याला समजलं, असं वाटतं.
  • 4:02 - 4:03
    आपली सर्व संभाषणं
  • 4:03 - 4:06
    अशी उत्तम का असू नयेत?
  • 4:06 - 4:09
    आता मी दहा सोपे नियम सांगणार आहे.
  • 4:09 - 4:13
    पण खरं तर त्यापैकी एखादा निवडून
    तुम्ही त्यात निपुण झालात,
  • 4:13 - 4:16
    तरी तुम्हांला चांगल्या संभाषणाचा
    आनंद मिळू शकेल.
  • 4:16 - 4:18
    १. एका वेळी एकच काम करा.
  • 4:18 - 4:20
    म्हणजे, नुसतंच मोबाईल, टॅबलेट, चाव्या
  • 4:20 - 4:23
    वगैरे वस्तू बाजूला ठेवा असं नव्हे,
  • 4:23 - 4:25
    तर पूर्ण लक्ष द्या.
  • 4:25 - 4:27
    त्या क्षणी जे घडत असेल
    त्याकडे पूर्ण लक्ष द्या.
  • 4:27 - 4:30
    कामावर वरिष्ठांशी झालेले मतभेद आठवू नका.
  • 4:30 - 4:33
    आज रात्री काय जेवणार, याचा विचार करू नका.
  • 4:33 - 4:35
    संभाषण करावंसं वाटत नसेल,
  • 4:35 - 4:36
    तर ते बंद करा.
  • 4:36 - 4:38
    पण अर्धवट लक्ष देऊन ते करू नका.
  • 4:38 - 4:41
    २. छाप टाकण्यासाठी काहीतरी गहन बोलू नका.
  • 4:41 - 4:43
    जर तुम्हांला तुमची मतं मांडायची असतील,
  • 4:43 - 4:49
    पण त्यावर प्रतिसाद, चर्चा, विरोध,
    किंवा भर घातलेली नको असेल,
  • 4:49 - 4:51
    तर ब्लॉग लिहा.
  • 4:51 - 4:54
    (हशा)
  • 4:54 - 4:57
    माझ्या कार्यक्रमात मी विद्वानांना प्रवेश
    देत नाही, यामागे एक कारण आहे.
  • 4:57 - 4:59
    कारण ते फार कंटाळा आणतात.
  • 4:59 - 5:03
    ते सनातनी असले, तर
    काही विशिष्ट गोष्टींना विरोध करतात,
  • 5:03 - 5:05
    आणि उदारमतवादी असले,
  • 5:05 - 5:07
    तर निराळ्या गोष्टींना विरोध करतात.
  • 5:07 - 5:08
    हे अंदाज बांधणं सोपं आहे.
  • 5:08 - 5:10
    पण असं संभाषण करू नका.
  • 5:10 - 5:15
    प्रत्येक संभाषणातून काहीतरी शिकायला
    मिळणार आहे, अशा अपेक्षेने संभाषण करा.
  • 5:16 - 5:18
    एम. स्कॉट पेक हे मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात,
  • 5:18 - 5:22
    खरोखरीच ऐकायचं असेल,
    तर स्वतःला बाजूला ठेवावं लागतं.
  • 5:22 - 5:25
    म्हणजे, काही वेळा आपली मतं
    बाजूला ठेवावी लागतात.
  • 5:26 - 5:29
    समोरच्या व्यक्तीला हा स्वीकार जाणवला,
  • 5:30 - 5:32
    की तिची भीड हळूहळू चेपते
  • 5:32 - 5:35
    आणि ती मोकळेपणाने
  • 5:35 - 5:37
    आपल्या मनाचे आतले कप्पे उघडते.
    पुन्हा सांगते,
  • 5:37 - 5:40
    प्रत्येक संभाषणातून काही शिकायला मिळेल
    हे गृहित धरा.
  • 5:41 - 5:45
    प्रत्येक व्यक्तीला असं काहीतरी ठाऊक असेल,
    जे तुम्ही जाणत नसाल.
  • 5:45 - 5:47
    मी म्हणेन,
  • 5:47 - 5:50
    प्रत्येक व्यक्ती कोणत्यातरी
    एखाद्या विषयात तज्ज्ञ असते.
  • 5:51 - 5:54
    ३. माहितीपूर्ण उत्तरे येतील
    असे प्रश्न विचारा.
  • 5:54 - 5:56
    या बाबतीत पत्रकारांकडून धडे घ्या.
  • 5:56 - 5:59
    कोण, काय, कधी, कुठे, का, कसे,
    या शब्दांनी प्रश्नांची सुरुवात करा.
  • 5:59 - 6:03
    प्रश्न गुंतागुंतीचा असेल, तर
    उत्तर अगदी सोपं मिळेल.
  • 6:03 - 6:05
    मी जर विचारलं,
    "तुम्ही भीतीने हादरला होतात का?"
  • 6:05 - 6:08
    तर या प्रश्नातल्या सर्वात प्रभावी शब्दाला
    उत्तर मिळेल.
  • 6:08 - 6:12
    "हादरला" हा तो शब्द.
    उत्तर येईल, "हो. होतो." किंवा "नव्हतो."
  • 6:12 - 6:14
    "तुम्ही रागावला होतात का?" - "हो. होतो."
  • 6:14 - 6:17
    त्यांना वर्णन करू द्या.
    कारण जे सांगायचं ते त्यांनाच ठाऊक आहे.
  • 6:17 - 6:20
    असं विचारा,
    "त्यावेळी तुम्हांला कसं वाटलं?"
  • 6:20 - 6:21
    "त्यावेळी कोणती भावना जाणवली?"
  • 6:21 - 6:26
    कारण यामुळे त्यांना जरा थांबून
    विचार करावा लागेल.
  • 6:26 - 6:29
    मग जास्त माहितीपूर्ण उत्तर मिळेल.
  • 6:29 - 6:31
    ४. विचारांचा प्रवाह वाहू द्या.
  • 6:32 - 6:34
    याचा अर्थ, मनात विचार येत राहतील.
  • 6:35 - 6:38
    ते वाहून जाऊ द्या.
  • 6:38 - 6:40
    आपण कित्येक मुलाखतींमध्ये ऐकलं आहे,
  • 6:40 - 6:42
    की त्यात पाहुणा बरीच मिनिटं बोलतो,
  • 6:42 - 6:45
    आणि मग मुलाखतकार भानावर येऊन
    पुढचा प्रश्न विचारतो.
  • 6:45 - 6:48
    हा प्रश्न पूर्णपणे गैरलागू असतो,
    किंवा त्याचं उत्तर आधीच मिळालेलं असतं.
  • 6:48 - 6:51
    म्हणजे, मुलाखतकाराचं लक्ष
    दोन मिनिटांपूर्वीच भरकटलं होतं.
  • 6:51 - 6:54
    पण हा चतुर प्रश्न पूर्वीच
    ठरवून ठेवलेला असल्याने
  • 6:54 - 6:57
    त्याने तो विचारून टाकला.
  • 6:57 - 6:59
    आपण अगदी हेच करतो.
  • 6:59 - 7:02
    कोणाशीतरी संभाषण करत बसलो असताना
    आपल्याला,
  • 7:02 - 7:06
    पूर्वी कधीतरी कॉफी शॉप मध्ये
    कोणी सिनेनट दिसल्याचं आठवतं.
  • 7:06 - 7:07
    (हशा)
  • 7:07 - 7:09
    मग आपण पुढचं संभाषण ऐकतच नाही.
  • 7:09 - 7:11
    अशा गोष्टी, कल्पना मनात येणारच आहेत.
  • 7:11 - 7:14
    त्या बाजूला सारायला हव्यात.
  • 7:14 - 7:18
    ५. एखादी गोष्ट ठाऊक नसेल, तर तसं सांगा.
  • 7:19 - 7:21
    राष्ट्रीय रेडिओवरच्या लोकांना
  • 7:21 - 7:24
    आपल्या बोलण्याची नोंद होते आहे
    याची जाणीव असते.
  • 7:24 - 7:28
    त्यामुळे आपण एखाद्या विषयातले तज्ज्ञ आहो,
  • 7:28 - 7:30
    असं सांगताना ते खबरदारी बाळगतात.
  • 7:30 - 7:32
    तसंच करा.
    चुकून जास्त खबरदारी घेतली, तरी चालेल.
  • 7:32 - 7:34
    तुमचं बोलणं सवंग व्हायला नको.
  • 7:35 - 7:38
    ६. आपले दोघांचे अनुभव एकसारखे आहेत,
    असं सिद्ध करायला जाऊ नका.
  • 7:39 - 7:42
    त्यांच्या कुटुंबात झालेल्या निधनाविषयी
    ते बोलत असतील,
  • 7:42 - 7:45
    तर लगेच आपल्या कुटुंबात झालेल्या
    निधनाविषयी बोलू नका.
  • 7:45 - 7:48
    ते आपल्या व्यवसायात होणाऱ्या
    त्रासाबद्दल बोलत असतील, तर
  • 7:48 - 7:50
    तुम्हांलाही व्यवसाय आवडत नसल्याचं
    सांगू नका.
  • 7:50 - 7:52
    दोन व्यक्तींचे अनुभव कधीच एकसारखे नसतात.
  • 7:52 - 7:54
    ते व्यक्तिगणिक निराळे असतात.
  • 7:54 - 7:57
    त्याहून महत्त्वाचं,
    संभाषण तुमच्याभोवती चाललेलं नाही.
  • 7:57 - 8:01
    त्या क्षणी त्यात घुसून, आपण किती
    महान आहोत, किंवा किती त्रास सोसले आहेत,
  • 8:01 - 8:02
    हे दाखवण्याची गरज नाही.
  • 8:03 - 8:06
    स्टीफन हॉकिंग यांचा बुद्धयांक विचारला असता
    ते म्हणाले,
  • 8:06 - 8:09
    "मला कल्पना नाही.
    अपयशी लोकच बुद्ध्यांकाची बढाई मारतात."
  • 8:09 - 8:11
    (हशा)
  • 8:11 - 8:14
    संभाषण म्हणजे
    आपली जाहिरात करण्याची संधी नव्हे.
  • 8:17 - 8:18
    ७. स्वतःच्या बोलण्याची
  • 8:19 - 8:21
    पुनरावृत्ती करू नका.
  • 8:21 - 8:23
    त्यात शिष्टपणा दिसतो,
    आणि ते कंटाळवाणंही होतं.
  • 8:23 - 8:25
    पण आपण बरेचदा
    पुनरावृत्ती करत असतो.
  • 8:25 - 8:29
    व्यवसायविषयक बोलण्यात किंवा
    आपल्या मुलांशी बोलताना, एखादा मुद्दा
  • 8:29 - 8:30
    आपण पुन्हा पुन्हा
  • 8:30 - 8:33
    निरनिराळ्या तऱ्हेने सांगत राहतो.
  • 8:34 - 8:35
    तसं करू नका.
  • 8:35 - 8:37
    ८. फार खोलात शिरू नका.
  • 8:37 - 8:40
    खरं म्हणजे तारखा, वर्षं, नावं
  • 8:40 - 8:43
    असली माहिती
  • 8:43 - 8:45
    तुम्ही कितीही कष्टाने आठवलीत,
  • 8:45 - 8:47
    तरी लोकांना त्यात रस नसतो.
  • 8:47 - 8:49
    त्यांना रस असतो तो तुमच्यात.
  • 8:50 - 8:51
    तुम्ही कसे आहात,
  • 8:52 - 8:54
    तुमच्यामधला समान दुवा कोणता, त्यात.
  • 8:54 - 8:56
    म्हणून, तपशील वगळा.
  • 8:57 - 8:58
    ९. हा मुद्दा शेवटचा नाही
  • 8:58 - 9:01
    तर सर्वात जास्त महत्त्वाचा आहे.
  • 9:01 - 9:03
    ऐका.
  • 9:03 - 9:06
    कितीतरी महान व्यक्तींनी म्हटलं आहे,
  • 9:06 - 9:10
    की ऐकणं हे बहुधा सर्वात महत्त्वाचं
  • 9:10 - 9:12
    कौशल्य आहे.
  • 9:12 - 9:13
    गौतम बुद्धांचं वचन
    माझ्या शब्दात सांगते,
  • 9:13 - 9:16
    "तुमचं तोंड उघडं असेल,
    तेव्हा तुम्ही शिकत नसता."
  • 9:16 - 9:20
    कॅल्विन कूलीज म्हणतात, "आजपर्यंत कोणीही
    फार ऐकण्यामुळे नोकरी गमावलेली नाही."
  • 9:21 - 9:22
    (हशा)
  • 9:22 - 9:24
    आपण एकमेकांचं का ऐकत नाही?
    पहिलं कारण,
  • 9:25 - 9:27
    त्याऐवजी आपल्याला बोलायचं असतं.
  • 9:27 - 9:29
    त्यामुळे नियंत्रण आपल्या हातात येतं.
  • 9:29 - 9:32
    ज्यात रस नसेल, ते ऐकावं लागत नाही.
  • 9:32 - 9:33
    सर्वांचं लक्ष वेधलं जातं.
  • 9:33 - 9:35
    आपली ओळख ठसवली जाते.
  • 9:35 - 9:36
    दुसरं कारण,
  • 9:37 - 9:38
    बोलल्यामुळे लक्ष विचलित होतं.
  • 9:38 - 9:42
    सामान्य माणूस एका मिनिटात २२५ शब्द बोलतो.
  • 9:42 - 9:46
    पण आपण दर मिनिटाला ५०० शब्द ऐकू शकतो.
  • 9:46 - 9:50
    या उरलेल्या २७५ शब्दांची भर
    आपलं मन त्यात घालत असतं.
  • 9:50 - 9:53
    एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याकडे
    खरोखर लक्ष द्यायला
  • 9:53 - 9:55
    ऊर्जा आणि प्रयत्न लागतात.
  • 9:55 - 9:58
    आणि ते करू शकत नसाल, तर ते संभाषण नव्हे.
  • 9:58 - 10:01
    ते ठरेल फक्त दोन माणसांनी एका जागी येऊन
    साधारण एकाच विषयावरची
  • 10:01 - 10:03
    वाक्यं ओरडणं.
  • 10:03 - 10:04
    (हशा)
  • 10:04 - 10:07
    एकमेकांचं ऐकून घ्यायला हवं.
  • 10:07 - 10:09
    स्टीफन कोव्ही यांनी छान सांगितलं आहे.
  • 10:09 - 10:13
    "आपण समजून घेण्याच्या उद्देशाने ऐकत नाही.
  • 10:13 - 10:16
    आपण ऐकतो, ते उत्तर देण्याच्या उद्देशाने."
  • 10:17 - 10:21
    आणखी एक नियम. दहावा नियम. थोडक्यात बोला.
  • 10:21 - 10:24
    "चांगलं संभाषण तोकड्या स्कर्टसारखं असावं.
    उत्सुकता वाढवणारं,
  • 10:24 - 10:27
    पण विषयाला पूर्ण वेढणारं."
    - इति माझी बहीण.
  • 10:27 - 10:28
    (हशा)
  • 10:28 - 10:30
    (टाळ्या)
  • 10:30 - 10:35
    या सर्वांचा अर्थ एकच निघतो.
  • 10:35 - 10:38
    इतरांबद्दल स्वारस्य वाटू द्या.
  • 10:38 - 10:41
    माझ्या सुप्रसिद्ध आजोबांच्या घरी
    माझं बालपण गेलं.
  • 10:41 - 10:43
    आमच्या घरी एक प्रघात होता.
  • 10:43 - 10:45
    माझ्या आजोबांना भेटायला लोक येत,
  • 10:45 - 10:48
    आणि ते परत गेल्यानंतर
    आई आम्हांला विचारायची,
  • 10:48 - 10:50
    "हे कोण होतं, ठाऊक आहे का?"
  • 10:50 - 10:52
    "ही मिस अमेरिका स्पर्धेची उपविजेती.
  • 10:52 - 10:54
    हे सॅक्रामेंटो शहराचे माजी महापौर.
  • 10:54 - 10:57
    ही पुलित्झर पारितोषिक विजेती.
    हा रशियन बॅले नर्तक."
  • 10:57 - 11:00
    त्यामुळे प्रत्येकाजवळ एखादी
    अद्भुत गोष्ट दडलेली असते,
  • 11:00 - 11:03
    अशा समजुतीत मी वाढले.
  • 11:04 - 11:07
    मला वाटतं, यामुळे मला
    चांगली मुलाखत घेता येते.
  • 11:07 - 11:10
    मी शक्य तितकं माझं तोंड बंद ठेवते,
  • 11:10 - 11:12
    आणि मन खुलं ठेवते.
  • 11:12 - 11:14
    मी नेहमी आश्चर्यचकित होण्याची तयारी ठेवते,
  • 11:14 - 11:16
    आणि अजूनपर्यंत माझी निराशा झालेली नाही.
  • 11:17 - 11:19
    तुम्हीही असंच करा.
  • 11:19 - 11:21
    जा, लोकांशी बोला,
  • 11:21 - 11:22
    त्यांचं बोलणं ऐका.
  • 11:22 - 11:26
    आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे,
    आश्चर्यचकित होण्याची तयारी ठेवा."
  • 11:26 - 11:28
    धन्यवाद.
  • 11:28 - 11:31
    (टाळ्या)
Title:
उत्तम संभाषणाचे दहा मार्ग
Speaker:
सेलेस्ट हेडली
Description:

'लोकांशी उत्तम संभाषण करता येणं' या कौशल्यावर अवलंबून असणारा व्यवसाय करता करता त्यात प्राविण्य वाढत जातं. त्याबरोबरच हेही समजतं, की आपल्यापैकी अनेकांना चांगलं संभाषण करता येत नाही. सेलेस्ट हेडली या गेली काही दशके एक रेडिओ मुलाखतकार म्हणून कार्यरत आहेत. उत्तम संभाषणाचे घटक त्या जाणतात: प्रामाणिकपणा, नेमकेपणा, स्पष्टपणा, आणि लक्षपूर्वक ऐकणे. या बोधप्रद व्याख्यानात त्या सांगताहेत उत्तम संभाषणाचे दहा मार्ग. त्या म्हणतात, "जा, लोकांशी बोला, त्यांचं बोलणं ऐका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आश्चर्यचकित होण्याची तयारी ठेवा."

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
11:44

Marathi subtitles

Revisions