Return to Video

सलोनी शिकवत आहे if-Else स्टेटमेंट्स आईस एजमधल्या स्क्रॅट खारीबरोबर

  • 0:00 - 0:06
    if-else स्टेटमेंट म्हणजे दोन गोष्टींमधली निवड
    असते, उदा. जर स्क्रॅट खारीला ओकचे फळ मिळाले
  • 0:06 - 0:12
    तर ती खुश होईल. नाहीतर ती दु:खी होईल
    आणि शोधत राहील. आता आपण
  • 0:12 - 0:17
    आपल्या स्क्रॅट या मैत्रिणीबरोबर if-else स्टेटमेंट
    कसं वापरायचं ते बघूया. हा ब्लॉक "if" ब्लॉकसारखाच
  • 0:17 - 0:22
    दिसतो पण शेवटी एक जास्त भाग आहे, "else". जर मी "do" मध्ये "move forward" ब्लॉक टाकला
  • 0:22 - 0:27
    आणि "else" मध्ये "turn left" ब्लॉक टाकला,
    तर रस्ता असेल तर स्क्रॅट खार
  • 0:27 - 0:32
    पुढे जाईल. आणि जर पुढे रस्ता नसेल तर,
  • 0:32 - 0:37
    स्क्रॅट डावीकडे वळेल. ती निर्णय घेत आहे
    आणि त्यानुसार दोनपैकी एक कृती करेल.
  • 0:37 - 0:42
    आणि "if" ब्लॉक्सप्रमाणेच तुम्ही "repeat"
    मध्ये "if-else" ब्लॉक्स घालू शकता.
  • 0:42 - 0:46
    आता, स्क्रॅट खारीला ओकचे फळ
    मिळवायला मदत करूया.
Title:
सलोनी शिकवत आहे if-Else स्टेटमेंट्स आईस एजमधल्या स्क्रॅट खारीबरोबर
Description:

तुमचा अवर ऑफ कोड करून आईस एजमधल्या स्क्रॅट खारीला भेटा! code.org/learn ला भेट द्या.

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
Hour of Code
Duration:
0:50

Marathi subtitles

Revisions