Marathi subtitles

← तुरुंगामध्ये गरीबांचा कसा होतोय छळ?

Get Embed Code
24 Languages

Showing Revision 60 created 02/24/2017 by Abhinav Garule.

 1. २०१३ उन्हाळातल्या एका दुपारी,
  वॉशिंगटन डीसीमध्ये
 2. पोलिसांनी एका मनुष्याला पकडले
  त्याची कसून चौकशी केली
 3. त्यांना त्याच्यावर संशय आला
  व त्यापासून धोका आहे असे वाटले.
 4. खरे तर त्या दिवशी मला
  असे अडकणे अपेक्षित नव्हते
 5. पण मला ते चित्र स्पष्ट दिसते
 6. हे सर्व भीतीदायक आहे.
  शांत राहण्याचा प्रयत्न कर
 7. (हशा)

 8. ह्या वेळी मी पदवीपूर्व नोकरी करत होतो

 9. वॉशिंगटन डीसीमध्ये
  सार्वजनिक सुरक्षा विभागात
 10. कामासाठी मी पोलीस चौकीला भेट देत असे
 11. मी माझ्या मार्गावर होतो
 12. आणि कारपर्यंत पोहोचेपूर्वीच
 13. दोन पोलीस गाडयांनी माझा रस्ता अडवला
 14. आणि एका अधिकाऱ्याने मला मागून घेरले
 15. त्याने मला थांबवले, बॅग काढायला सांगितली
 16. माझे हात पुढे असलेल्या पोलीस कारवर दाबले
 17. साधारण डझनभर पोलिसांनी मला गराडा घातला
 18. सगळ्यांजवळ बंदुका होत्या
 19. तर काहींजवळ घातक रायफली
 20. त्यांनी बॅगेवर बंदूक रोखली
 21. आणि मला पाडलं
 22. माझी छायाचित्रे काढली
 23. आणि ते हसले
 24. आणि हे सगळे घडत असताना

 25. शरीर पोलिसी गाडीवर रेललेले असताना
  मी पायाच्या थरथरीकडे कानाडोळा करत होतो
 26. काय करावे असा विचार करत होतो
 27. तेव्हा अचानक जाणवले
 28. जेव्हा मी फोटोतल्या मला बघितले
 29. तेव्हा स्वतःबद्दल सांगायचे तर
 30. मी असे काही सांगितले असते
 31. "उठावदार टी-शर्ट व चष्मा घातलेला
  १९ वर्षीय भारतीय पुरुष"
 32. पण त्यांनी ह्यातलं काहीच लिहिले नव्हतं
 33. पोलीस रेडीओवर ते वर्णन सांगत
 34. "पाठीवर बॅग घेतलेला मध्य आशियाई मनुष्य"
 35. "पाठीवर बॅग घेतलेला मध्य आशियाई मनुष्य"
 36. आणि हेच वर्णन
  पोलीस रिपोर्टमध्ये घातले गेले
 37. माझ्या स्वतःच्या सरकारकडून
  माझे असे वर्णन अपेक्षित नव्हते
 38. "भ्याड"
 39. "नीच"
 40. "दहशतवादी"
 41. अशी गरळ ओकणे त्यांनी चालूच ठेवले
 42. माझ्या रहिवासाच्या सर्व जागी
  त्यांनी श्वानपथके पाठवली

 43. माझे नाव कुठल्या वॉचलिस्ट मध्ये आहे का
  ह्याचीही सरकारी चौकशी केली.
 44. माझी उलट तपासणी करण्यासाठी
  त्यानी गुप्तहेरही धाडले कारण
 45. माझ्यापाशी लपवायला
  काही नाही हे सांगूनही
 46. मी माझ्या कारची तपासणी का करू देत नाही
  असे त्यांना वाटले
 47. आणि मला दिसत होते कि
  ते समाधानी नाहीत
 48. पण त्यांची पुढची चाल मला उमगत नव्हती
 49. एका क्षणी तर ,
  ज्या अधिकाऱ्याने मला पाडले होते
 50. त्याने पोलीस सुरक्षा कॅमेरा कोठे आहे
  हे बघितले
 51. जेणेकरून काय रेकोर्ड होते आहे हे कळेल.
 52. आणि जेव्हा त्याने असे केले
 53. तेव्हा मला जाणवले की
  आपण त्यांच्या ताब्यात आहोत
 54. मला वाटते लहानपणापासून
  आपली धारणा असते आणि

 55. पोलीस, अटका, बेड्या ह्याबद्दलच्या
  आपल्या कल्पना इतक्या सरळ असतात
 56. म्हणून हे लक्षात येत नाही की
 57. एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा
  ताबा घेणं किती क्लेशदायक आहे!
 58. असे वाटतेय ना तुम्हाला
  कि मला म्हणायचंय
 59. जातीमुळे मला घृणास्पद वागणूक दिली गेली
 60. आणि हो, जर मी गोरा असतो
  तर मला ताब्यात घेतले नसते.
 61. पण खरे तर माझ्या मनात वेगळेच काही आहे
 62. मला वाटते कि परिस्थिती आणखी वाईट असती
 63. जर मी श्रीमंत नसतो तर
 64. मला म्हणायचंय,
  कि मी स्फोटके पेरली असावीत
 65. असे वाटून त्यांनी
  माझी जरी दीड तास चौकशी केली,
 66. तरीही ना तर मला बेड्या घातल्या,
 67. नाही मला तुरुंगात नेले
 68. मला वाटते जर मी वॉशिंगटन डीसीच्या
  खालच्या वर्णाच्या जमातीतील असतो
 69. आणि त्यांना वाटले असते कि माझ्यामुळे
  अधिकाऱ्यांच्या आयुष्याला धोका आहे
 70. तर गोष्टी वेगळ्या प्रकारे घडल्या असत्या
 71. प्रत्यक्षात आपल्या समाजव्यवस्थेत
  असे दृढ धरले जाते कि
 72. पोलीस स्टेशन उडवण्याचा
  प्रयत्न करणारा श्रीमंत
 73. हा त्या गरीबापेक्षा बरा
 74. जो अगदी किरकोळ संशयाने पकडला जातो
 75. माझ्या सध्याच्या कामातले एक उदाहरण देतो

 76. सध्या मी “समान हक्क कायदा” ह्या विभागात
 77. “नागरी अधिकार व्यवस्थेत”
  वाशिंगटन डीसी मध्ये कार्यरत आहे.
 78. मला तुम्हा सर्वाना एक प्रश्न विचारायचा आहे
 79. तुमच्यापैकी कितींनी पार्किंग तिकीट फाडलंय?
 80. हात वर करा
 81. हं. मीही फाडलंय!
 82. आणि जेव्हा मला दंड भरावा लागला
 83. तेव्हा वाईट वाटले
 84. पण मी भरले
 85. मला वाटतं तुमच्यापैकी बहुतेकांनी
  असाच केले असावे
 86. पण काय झाले असते जर
  तुमच्याजवळ तिकिटासाठी पैसे नसते?
 87. आणि तुमच्या कुटुंबाकडेही पैसे नसते !
  तर काय झाले असते ?
 88. बरं, कायद्यांतर्गत
  एक गोष्ट घडू शकत नाही

 89. आणि ती म्हणजे,
  तुम्ही अटक व कारावासाला पात्र नसता
 90. जेव्हा तुमच्याकडे पैसे देण्याची ऐपत नसते
 91. हे बेकायदेशीर आहे.
 92. पण देशांतर्गत असलेले स्थानिक सरकार
 93. गरीबांप्रती हेच करत आहेत
 94. आणि समान न्याय कायद्यांतर्गत
  असे कित्येक खटले
 95. ह्या आधुनिक काळातील तुरुंगाना
  लक्ष्य करत आहेत.
 96. आमचा एक खटला मिसुरी राज्यातील
  फर्ग्युसन शहराच्या विरोधात आहे

 97. मला माहित आहे फर्ग्युसन म्हंटले कि
 98. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या डोक्यात येईल
  "पोलिसी हिंसा व अत्याचार!"
 99. पण आज मला आगळा वेगळा पैलू सांगायचाय
 100. पोलीस आणि नागरिक ह्यांच्यातल्या
  एका वेगळ्या नात्याबद्दल बोलायचे आहे.
 101. फर्ग्युसनमध्ये सरासरी
  २ अटकेची फर्माने निघत.
 102. प्रत्येक माणसाविरोधात ,
  प्रत्येक वर्षी
 103. जास्त करून कर्ज फेडू न शकल्यामुळे !
 104. मी विचार करतो कि दररोज
  घरातून बाहेर पडल्यापडल्या
 105. कोणीतरी आपल्याला पकडेल,
  आपली कर्जे पडताळेल
 106. किंवा ऋण न फेडल्यामुळे
  अटकेचा वाॅरंट जारी करेल
 107. जसे मला डीसीत पकडले ,
  तसं पकडतील
 108. आणि तुरुंगात नेतील
 109. जरा वाईट वाटतं
 110. हा अनुभव घेतलेल्या अनेकांना
  मी फर्ग्युसनमध्ये भेटलो

 111. आणि त्यांच्या कथाही ऐकल्या

 112. फर्ग्युसन जेलमध्ये
 113. प्रत्येक छोट्या कोठडीत
  बंकबेड आणि शौचालय आहे
 114. तरीही प्रत्येक कोठडीत ४ जणांना कोंबतात
 115. ज्यामुळे बेडवर २ व जमिनीवर २ जण
 116. ज्यापैकी एकाला बळेच
  अस्वच्छ शौचालयालगत झोपावे लागते
 117. जे कधीही स्वच्छ केले नसावे
 118. खरे तर आख्खा तुरुंग
  कधीही स्वच्छ केला नसावा
 119. त्यामुळे सर्व जमिनी व भिंती
  रक्त अन शेंबडाने माखलेल्या आहेत
 120. पिण्यास पाणी नाही
 121. शौचालयालगताच्या एका नळाला तेवढे येते
 122. पाणी अस्वच्छ तर दिसतेच पण मचूळ लागते
 123. तिथे पुरेसे अन्न कधीच नव्हते
 124. कधी अंघोळीला पाणी नव्हते
 125. रजस्वला स्त्रियांच्या अनारोग्याची सीमा नसे
 126. व काळजी तर दूरच
 127. जेव्हा मी एका स्त्रीला
  आरोग्यदक्षतेबद्दल विचारले
 128. तेव्हा हसून ती म्हणाली “ओह नो नो ..
 129. इथे गार्डस लक्ष देतात
  केवळ लैंगिक भुकेसाठी"
 130. कर्ज चुकव्याना ते इथे आणत व म्हणत

 131. “जोवर तुम्ही कर्जाची फेड करणार नाही तोवर
  तुमची सुटका नाही"
 132. "आणि जर तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या
  कोणाला बोलवू शकला असता"
 133. "जो तुमच्यासाठी पैसे आणू शकेल"
 134. "तर कदाचित तुम्ही सुटू शकला असता!"
 135. "तेही जर पुरेसे पैसे आणले असते तर"
 136. "पण जर तसे नसते तर इथे राहावे लागेल
  कैक दिवस अथवा आठवडे"
 137. दर दिवशी सुरक्षारक्षक
  कोठडीच्या दारापाशी येत
 138. कर्ज चुकवणाऱ्यांना वेठीशी धरत.
 139. जेव्हा तुरुंग पूर्ण भरे,
  व तुम्ही अजूनही आत आहात
 140. आणि नवा कैदी हजर होई
 141. त्याला घेताना
  ते असा विचार करत
 142. “ओके .. हा मनुष्य कर्ज देऊच शकणार नाही "
 143. शक्यता आहे नवा माणूस देईल”
 144. मग तुम्ही बाहेर आणि तो आत आणि
  आणि हे चक्र असेच चालू राही.
 145. मी एका माणसाला भेटलो,

 146. जो ९ वर्षांपूर्वी पकडला गेला
 147. वॉलग्रीनमध्ये ,
  आक्रमकरित्या भीक मागताना
 148. दंड व कोर्टाची फी त्याला परवडत नव्हती
 149. तरुणपणी तो आगीच्या फुफाट्यातून वाचला होता
 150. केवळ तिसऱ्या मजल्यावरच्या
  खिडकीतून उडी मारल्यामुळे
 151. पण त्या घटनेत
  त्याच्या मेंदूला जबर जखम झाली
 152. आणि पायासकट शरीराचे अनेक भाग निकामी झाले
 153. त्यामुळे तो बेकार झाला
 154. आणि आता तो सामाजिक सुरक्षा निधीवर जगतो
 155. जेव्हा मी त्याला
  त्याच्या राहत्या घरी भेटलो
 156. तेव्हा त्याच्याकडे मौल्यवान काही नव्हते
  अगदी फ्रीजमध्ये अन्नही नव्हते
 157. भुकेने तो ग्रस्त होता
 158. एका छोट्या पुठ्याच्या तुकडयाखेरीज
  किमती असे त्याच्याकडे काही नव्हते
 159. ज्यावर त्याने
  त्याच्या मुलांची नावे लिहिली होती
 160. तो त्याने खूप जपला होता
  आनंदाने त्याने तो मला दाखवला
 161. पण त्याच्याकडे देण्यासारखे काही नव्हते
  त्यामुळे तो दंड वं फी भरू शकत नव्हता
 162. ह्या नऊ वर्षात
  त्याला १३ वेळा अटक झाली होती
 163. आणि तब्बल १३० दिवसांची कोठडी झाली
  भीकेच्या त्या केसमध्ये
 164. त्यापैकी एका वेळेस तर
  जोडून ४५ दिवस...
 165. केवळ कल्पना करा आजपासून
  तुम्हाला जून पर्यंत रहावे लागले तर
 166. ह्या अशा मी काही वेळापूर्वी
  वर्णन केलेल्या ठिकाणी !
 167. फर्ग्युसन जेलमधे बघितलेल्या आत्महत्येच्या
  सर्व घटना त्याने मला कथन केल्या

 168. एका व्यक्तीने स्वतःला गळफास लावला
 169. इतरांच्या हातात न येईल अशा ठिकाणी
 170. केवळ ओरडण्यापलीकडे
  ती काही करू शकली नाहीत
 171. जेणेकरून सुरक्षा कर्मचारी बघतील
 172. आणि येतील आणि
  त्याला सोडवतील
 173. पण तो म्हणाला की
  गार्डसने ५ मिनिटे वेळकाढूपणा केला
 174. व जेव्हा ते आले
  तेव्हा तो मनुष्य मूर्च्छित होता
 175. तेव्हा त्यांनी डॉक्टराना बोलावले
  डॉक्टर तुरुंगात पोचले
 176. ते म्हणाले "तो ठीक होईल"
  असे म्हणून त्याला जमिनीवर सोडून ते गेले
 177. अशा अनेक कथा ऐकल्या
  तरीही मला मुळीच आश्चर्य वाटले नाही,
 178. कारण आत्महत्या हे स्थानिक
  तुरुंगातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे
 179. आणि ते केवळ तुरुंगातल्या
  मानसिक स्वास्थ्याच्या अभावामुळे
 180. तीन मुलांच्या एकट्या आईला मी भेटलो
  जी तासाला ७ डाॅलर मिळवीत असे

 181. फूड स्टॅपवर आपला व मुलांचा
  उदरनिर्वाह ती करीत असे
 182. एका दशकापूर्वी
 183. तिच्यावर
  वाहतूक उल्लंघन व भुरट्या चोरीचे
 184. काही गुन्हे दाखल झाले
  आणि दंड भरणे तिला परवडत नसे
 185. तेव्हापासून तिला जवळजवळ
  १० वेळा त्या गुन्ह्यांमुळे अटक झाली
 186. स्किझोफ्रेनिया व बायपोलर डीसऑर्डरने
  ती ग्रस्त होती
 187. तिला रोजच्या रोज औषधोपचाराची गरज भासे
 188. फर्ग्युसन जेलमध्ये तिला औषधे मिळेनात
  कारण
 189. कोणालाही तिच्यावर
  औषधोपचार करायची परवानगी नव्हती
 190. ती सांगे
  "दोन आठवडे तुरुंगात डांबले जाणे"
 191. "तेही चित्रविचित्र आभास वं आवाज ऐकत "
 192. "औषधासाठी केलेली आर्जवे"
 193. व त्याबदल्यात मिळालेले दुर्लक्ष"
  किती भीषण असते
 194. आणि हे असंबद्ध नाहीये
 195. एकंदर आपल्याकडे
  कारावासातील ३०% स्त्रियांना
 196. तीव्र मानसोपचाराची गरज भासते तिच्यासारखीच,
 197. पण फक्त सहा जणींमध्ये एकीला
  तुरुंगात मानसोपचार मिळतात
 198. मी ह्या सगळ्या विलक्षण गोष्टी ऐकल्या

 199. ज्या फर्ग्युसनमध्ये
  कर्ज बुडव्यांबरोबर घडल्या
 200. आणि हे बघण्याची जेव्हा स्वतःवर वेळ आली
 201. व तुरुंगात जावे लागले
 202. तेव्हा मला खात्री नव्हती काय बघेन
 203. पण हे अपेक्षित नव्हते
 204. ती एक साधारण सरकारी इमारत होती,
 205. पोस्ट ऑफिस सारखी
 206. अथवा शाळेची असावी तशी
 207. त्या घटनेने मला जाणवून दिले की
 208. ह्या बेकायदेशीर खंडणी योजना
 209. लपून छपून
  चालवल्या जात नाहीयेत तर
 210. खुलेआम चालवल्या जात आहेत
 211. आपल्या सार्वजनिक अधिकाऱ्यांकडून
 212. सार्वजनिक योजनेच्या भाग आहेत
 213. ह्या घटनेने मला जाणवून दिले की
  एकंदर गरिबीचा तुरुंगवासाला ,
 214. कर्जबुडव्यांच्या तुरुंगवासाच्या कक्षेबाहेरही
 215. जास्त महत्वाचे
  आणि मध्यवर्ती स्थान आहे
 216. आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये!
 217. माझ्या मनात येते
 218. आपली जमीन पद्धत

 219. आपल्या संस्थेमध्ये तुम्ही मुक्त असा
  अथवा बंदी तुम्ही किती धोकादायक आहात
 220. हे महत्वाचे ठरत नाही
 221. किंवा तुम्ही पळून जाण्याची
  किती भीती आहे
 222. ह्याचा संबंध नसतो
 223. तुम्ही जामीन भरू शकता की नाही
  हे मायने ठेवते
 224. बिल कोस्बी
 225. ज्याचा जमीन
 226. एक लाख रुपये होता
 227. व ज्याने त्वरित चेक फाडला
 228. त्याला एकही सेकंद तुरुंगवास झाला नाही
 229. पण सॅन्द्रा ब्लांड,
 230. तुरुंगात मेली
 231. कारण तिचे कुटुंब ५०० डॉलर
  आणू शकले नाही
 232. प्रत्यक्षात , आज जगात अर्धा लाख
  सॅन्द्रा ब्लांड आहेत

 233. ५००००० लोक आज तुरुंगवासात आहेत
 234. फक्त एका कारणाने - ते जामीन देऊ शकत नाहीत
 235. आपल्याला सांगितले जाते की
  जेल म्हणजे गुन्हेगारांसाठी असतात
 236. पण आकडेवारीप्रमाणे तसे नाहीये

 237. प्रत्येक ५ पैकी ३ जण केवळ चाचपणीसाठी
  जेलमध्ये टाकले गेले आहेत
 238. त्यांनी प्रत्यक्षात
  काहीच गुन्हा केलेला नाही
 239. किंवा त्यांनी कुठल्याही गुन्ह्याची
  कबुली दिलेली नाही
 240. खुद्द सान्स फ्रान्सिस्को मध्ये
 241. जेलमधील ८५% कैदी
 242. हे केवळ अटकपूर्व कैदी असावेत
 243. ह्याचा अर्थ सान्स फ्रान्सिस्को जवळजवळ
  ८० लक्ष डॉलर खर्च करते
 244. दरवर्षी केवळ अटकपूर्व कैदेसाठी
 245. ह्यापैकी बरेच लोक जेलमध्ये आहेत
  जामीन देऊ शकत नाहीत म्हणून
 246. आणि तेही अगदी किरकोळ गुन्ह्यांसाठी

 247. आणि तपासणी होईपर्यंतचा वेळ
 248. हा त्यांना गुन्हेगार ठरवल्यावर होणाऱ्या
  शिक्षेपेक्षाही जास्त असेल
 249. ह्याचा अर्थ त्यांना पक्की सुटका मिळेल
 250. जर त्यांनी क्षमायाचना केली तर
 251. आता निवडीचे पर्याय असे:
 252. ह्या भयानक जागेवर राहावे?
 253. माझ्या कुटुंब आणि
  माझ्यावर अवलंबित लोकांपासून दूर
 254. नोकरीपासून वंचित
 255. आणि मग आरोपांविरुद्ध लढावे?
 256. का वकिलाच्या इच्छेनुसार क्षमायाचना
  करून बाहेर पडावे?
 257. आणि ह्याक्षणी ते केवळ अटकपूर्व कैदी आहेत,
  गुन्हेगार नव्हेत
 258. पण एकदा त्यांनी क्षमायाचना केली,
  कि आम्ही त्यांना गुन्हेह्गार म्हणतो
 259. आणि जरी श्रीमंत मनुष्य
  ह्या परिस्थितीमध्ये कधी अडकला नसेल
 260. तरीही श्रीमंत माणसाला
  सरळ जामीन मिळाला असता
 261. ह्या वेळी तुम्हाला आश्चर्य वाटत असेल कि
 262. "हा मुलगा प्रभाव पाडण्यासाठी उभा आहे.
  आणि काय करतोय?"

 263. (हशा)
 264. "हे अतिशय निराशाजनक आहे.
  मला माझे पैसे हवेत "

 265. (हशा)

 266. पण खरे तर

 267. जेलबद्दल बोलणे हे इतर पर्यायांपेक्षा
  कमी निराशाजनक वाटते

 268. कारण मला असे वाटते की
  आपण जर ह्याविषयी मौन बाळगले
 269. आणि जेलबद्दलचा विचार
  सामूहिकरीत्या बदलला तर
 270. आपल्या आयुष्याच्या सरतेशेवटी
 271. आपल्याकडे तरी तुरुंग भरलेले असतील
  अशा कैद्यांनी जे तिथले नसतील
 272. हे मला अतिशय खेदजनक वाटते
 273. पण मला ज्याचे अप्रूप वाटते
  ते म्हणजे ह्या साऱ्या गोष्टी
 274. जेलबद्दलची आपली विचारसरणी
  बदलू शकतात
 275. शास्त्रशुद्ध रित्या "" नव्हे
 276. किंवा "गुन्हेगारीची शिक्षा"
 277. पण माणुसकीच्या शब्दात
 278. जेव्हा आपण एखाद्या माणसाला
  काही दिवस वा आठवडे किंवा महिन्यांसाठी
 279. किंवा काही वर्षांसाठी सुद्धा
  तुरुंगात धाडतो तेव्हा

 280. आपण त्याच्या शरीरावर किंवा मनावर
  काय परिणाम घडवत आहोत का?
 281. कुठल्या परिस्थितीत आपण हे करू इच्छितो?
 282. आणि कर इथे असलेल्या
  आपण १०० जणांनी सुरुवात केली तर
 283. आपण जेलप्रती वेगळ्या पद्धतीने
  विचार करण्यासाठी वचनबद्ध होऊ शकतो
 284. मग आपण पूर्वीची जुनी विचारधारा बदलू शकतो
 285. आज जर मी तुमच्याजवळ काही सोडून जात असेन
  तर तो आशादायी विचार असेल
 286. की जर मुळापासून बदल घडवायचा असेल तर

 287. केवळ दंड आणि जामिनाविषयी
  नियम बदलून होणार नाही
 288. तर जे नवे नियम जुन्यांना
  बदलून निर्माण होतील
 289. त्यांच्यामुळे गोरगरीबांना
  व अल्पसंख्यांकांना शिक्षा होणार नाही
 290. जर असा बदल हवा असेल.
 291. तर प्रत्येकाने दृष्टीकोन बदलायला हवा
 292. धन्यवाद
 293. (टाळ्या)