Return to Video

टेड भाषांतरकार- एक सार्थ अभिमान | महमूद अगिओर्ली

  • 0:03 - 0:05
    मी, महमूद अगिओर्ली
  • 0:05 - 0:08
    आणि TEDसाठी
    स्वयंसेवी भाषांतरकार म्हणून काम करतो.
  • 0:08 - 0:09
    मूळचा सीरियाचा रहिवासी आहे.
  • 0:09 - 0:13
    आणि मी उत्तरेत वसलेल्या
    अलेप्पो या शहरातला आहे.
  • 0:13 - 0:16
    हे प्राचीन शहर आहे, तसं पाहिलं तर --
  • 0:16 - 0:19
    तिथे ३००० वर्षांपासून आहे.
  • 0:20 - 0:22
    परंतु अलीकडे, फक्त ४ वर्षांत,
    सर्वकाही नष्ट झालं.
  • 0:22 - 0:28
    माझी ठिकाणं, आठवणी आणि इमारती ज्यांची मला आस्था आहे
  • 0:28 - 0:29
    सर्व बेचिराख झालं.
  • 0:29 - 0:34
    ते आगीत खाक झाले किंवा
    बॉम्बहल्ल्याला बळी पडले, नामशेष झाले.
  • 0:34 - 0:37
    आजघडीला ती ठिकाणं तिथे नाहीत.
  • 0:38 - 0:41
    आम्ही एडमला खूप काही गोष्टी सांगू,
  • 0:41 - 0:45
    पण खरंतर, आम्हाला याचं खूप दुःख होतंय
    की तो त्या अनुभवू शकत नाही.
  • 0:45 - 0:52
    आणि ही गोष्ट माझ्या मनाला टोचून गेली,
    प्रत्यक्षात, एक स्त्री आणि एक आई म्हणून..
  • 0:53 - 0:57
    की माझं बाळ भेट देऊ शकणार नाही...
  • 0:59 - 1:02
    त्याच्या बाबांच्या गावाला
    किंवा आईच्या गावाला.
  • 1:03 - 1:04
    तर असं आहे हे.
  • 1:06 - 1:08
    मी आणि भाऊ आम्ही दोघं
    स्थापत्य अभियंते आहोत.
  • 1:08 - 1:13
    आणि आम्ही तिथे अभियांत्रिकी सल्लागार
    कार्यालय उघडायचं स्वप्न पाहत होतो.
  • 1:13 - 1:18
    पण त्या प्रस्तावित अभियांत्रिकी कार्यालयाची जागा
  • 1:18 - 1:21
    एका संवेदनशील भागात होती.
  • 1:21 - 1:23
    म्हणून तेसुद्धा जवळपास नष्ट झालेलंच होतं.
  • 1:24 - 1:27
    म्हणून मला वाटतं,
    तुम्ही कल्पना केलेलं भविष्यसुद्धा
  • 1:27 - 1:29
    असंच नष्ट झालंय किंवा जाळून टाकलंय.
  • 1:29 - 1:32
    मी कुवैतमध्ये बहुतेक ५ वर्षे व्यतीत केली,
  • 1:32 - 1:36
    त्यानंतर २०१५ मध्ये मी देशांतर करून
    इथं ऑस्ट्रेलियात आलो.
  • 1:37 - 1:41
    गेल्यावर्षी, आम्ही २ नोव्हेंबरला इथं आलो.
  • 1:41 - 1:42
    सर्व अंधकारमय होतं,
  • 1:42 - 1:45
    आणि सूर्योदय झाला तेव्हा नवजीवन लाभलं.
  • 1:45 - 1:47
    सर्व काही सुंदर आहे,
  • 1:47 - 1:49
    सर्व काही टवटवीत, फुलांनी बहरलेलं आहे.
  • 1:49 - 1:52
    नूर अलहज येहिआ:
    एडमने चांगल्या वातावरणात जगावं असं वाटतं.
  • 1:52 - 1:55
    त्याने उत्तम आयुष्य जगावं
    असं आम्हाला वाटतं.
  • 1:56 - 2:00
    आणि मला वाटतं तोच मुख्य कारण होता
  • 2:00 - 2:05
    ज्यासाठी आम्ही देशांतराचा निर्णय घेतला.
  • 2:05 - 2:07
    हा काही सहज, सोपा निर्णय नव्हता.
  • 2:08 - 2:10
    दुसऱ्या देशात स्थायिक होणं
  • 2:10 - 2:14
    हे आपल्याला ज्याची सवय झालेली असते
    त्यापेक्षा पूर्णपणे वेगळं असतं
  • 2:14 - 2:15
    तितकंसं सोपं नसतं.
  • 2:15 - 2:17
    आम्ही आता खूपच आनंदी आहोत,
  • 2:17 - 2:19
    आणि आम्हाला माहितीय
    आम्ही जे केलं ते बरोबर केलं
  • 2:19 - 2:21
    आमच्यासाठी, आणि एडमसाठी सुद्धा.
  • 2:21 - 2:24
    महमूद अगिओर्ली:
    फेब्रुवारीपासून, ऑगस्टपर्यंत
  • 2:24 - 2:28
    मी दररोज शोध घ्यायचो आणि
    जवळपास १०-१२ ठिकाणी बायोडेटा पाठवायचो.
  • 2:28 - 2:31
    खरंतर, माझं नाव बदलण्याचाच
    मुख्य उपदेश मिळायचा,
  • 2:31 - 2:34
    कारण "महमूद" हे फारच पारंपरिक वाटतं.
  • 2:34 - 2:35
    दुसरा उपदेश
  • 2:36 - 2:40
    हा होता की ते मला माझ्या प्रमाणपत्रावरचं
  • 2:40 - 2:42
    माझं जन्म ठिकाण व कुळ-मूळ
    लपवायला सांगायचे.
  • 2:42 - 2:45
    त्यांनी मला सांगितलं
    "सीरियाचा कोणताही उल्लेख करू नका."
  • 2:45 - 2:47
    मी ज्याठिकाणी जन्मलो तो देश
    काही मी निवडलेला नव्हता.
  • 2:47 - 2:49
    माझं नावही मी ठरवलं नव्हतं.
  • 2:49 - 2:51
    तर मी निवड न केलेल्या गोष्टींनी
    लोक मला पारखत होते.
  • 2:52 - 2:54
    मात्र ठरवलं की
    मी या समस्यांना कसा सामोरा जाईन ते.
  • 2:54 - 2:58
    आणि नवीन कल्पना चा योग्य अंगिकार असणं
  • 2:58 - 3:02
    हे त्या लोकांसाठी अत्यावश्यक असतं
    जे युद्ध क्षेत्रात राहणारे असतात
  • 3:02 - 3:05
    व त्या लोकांसाठी,
    ज्यांनी भूतकाळ गमावलेला असतो.
  • 3:05 - 3:09
    TED तुम्हाला खूप साऱ्या संकल्पनांची
    योग्य प्रणाली प्रदान करेल
  • 3:09 - 3:11
    जगभरातील असंख्य लोकांमार्फत.
  • 3:11 - 3:15
    तुम्ही त्यांना अगदी थेटपणे सांगू शकता
    ज्यांनी याच समस्येचा सामना केला,
  • 3:15 - 3:18
    त्यांना अगदी थेटपणे सांगू शकता
    जे नुकतेच परदेशात स्थायिक झाले,
  • 3:18 - 3:21
    त्यांना प्रत्यक्ष कथन करू शकता
    जे नवीन कुटुंबात सहभागी होताहेत,
  • 3:21 - 3:22
    कोणीतरी अडचणींचा सामना करणारे.
  • 3:22 - 3:26
    महमूदच्या ठायी प्रेम करण्याचं
    आणि देण्याचं महान सामर्थ्य आहे.
  • 3:26 - 3:29
    आणि मला वाटतं स्वयंसेवी कार्य --
  • 3:29 - 3:30
    (बाळ रडतंय)
  • 3:31 - 3:33
    हा प्रेम करण्याचा आणि देण्याचा मार्ग आहे.
  • 3:33 - 3:35
    एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करणे
  • 3:35 - 3:37
    ही प्रचंड शक्ती आहे.
  • 3:39 - 3:43
    महमूद अगिओर्ली
    अरबी TED भाषांतरकार
  • 3:43 - 3:46
    २००९ पासून ४७४ भाषांतरे
Title:
टेड भाषांतरकार- एक सार्थ अभिमान | महमूद अगिओर्ली
Description:

महमूद अगिओर्ली हे TED भाषांतरकार असून मूळचे अलेप्पो, सीरिया येथील रहिवासी आहेत. या लघुपटात, केवळ महमूदची TEDमधील स्वयंसेवी भाषांतरकाराच्या कार्याचीच नव्हे तर त्याच्या कुटुंबाने ऑस्ट्रेलियाला स्थलांतर केल्याच्या कथेचीही जवळून झलक बघा -- जी उमेद आणि मुक्ती त्यांनी तिथं अनुभवली.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED Translator Resources
Duration:
03:47

Marathi subtitles

Revisions