Return to Video

Unspotted Bugs

 • 0:00 - 0:02
  न दिसलेले बग्ज.
 • 0:02 - 0:03
  किकी प्रॉट्समनद्वारा लिखित.
 • 0:03 - 0:08
  रेखाटने - माईक मेझर आणि किकी प्रॉट्समन
 • 0:08 - 0:09
  ही जास्मिन आहे.
 • 0:09 - 0:13
  ती कोडव्हीलमध्ये किडे पकडणारी कंपनी
  चालवते.
 • 0:13 - 0:17
  समाजाला त्रासापासून सुरक्षित ठेवण्यासाठी
  ती प्रसिद्ध आहे.
 • 0:17 - 0:20
  आज पहाटे, काहीतरी अनपेक्षित घडलं!
 • 0:20 - 0:25
  कोणीतरी किड्यांच्या खोलीचं दार उघडं ठेवलं
  आणि त्रासदायक किड्यांची झुंड
 • 0:25 - 0:28
  शहरात घुसली, एका मोठ्या टॅलेंट
  प्रोग्रॅमच्या थोडाच वेळ आधी.
 • 0:28 - 0:30
  "म्हणूनच मी तुला कामावर ठेवलं आहे!"
 • 0:30 - 0:32
  जास्मिन JD ला म्हणाली.
 • 0:32 - 0:37
  "आपण तीन वाजेपर्यंत सगळे किडे गोळा केले
  नाहीत तर सगळ्या कार्यक्रमाची वाट लागेल!"
 • 0:37 - 0:41
  "हे सोपं आहे," आजूबाजूला पाहत JD म्हणाला.
 • 0:41 - 0:44
  "मला काही इथं दिसत आहेत आणि काही तिथं
  दिसत आहेत."
 • 0:44 - 0:49
  "अरे, ते फक्त दिसणारे बग्ज आहेत,"
  जास्मिन म्हणाली.
 • 0:49 - 0:52
  "त्या किड्यांवर नियंत्रण मिळवणं सोपं आहे.
 • 0:52 - 0:56
  न दिसणारे बग्ज सगळ्यात जास्त त्रास देतात."
 • 0:56 - 1:00
  "न दिसणारे किडे शोधायला त्रास होतो.
 • 1:00 - 1:05
  तुम्हाला अपेक्षित नसतं अशा ठिकाणी ते लपतात
  आणि त्यामुळं सगळं अवघड होतं आणि शेवटी
 • 1:05 - 1:07
  काहीच उपाय नाही, असं वाटायला लागतं."
 • 1:07 - 1:10
  "नाही!" JD ओरडला.
 • 1:10 - 1:13
  "प्रोग्रॅम सुरळीत पार पडण्यासाठी आपण ते
  सगळे वेळेत कसे पकडू शकणार?"
 • 1:13 - 1:20
  "काळजी करू नकोस, न दिसणारे किडे शोधायची एक युक्ती मी तुला शिकवते."
 • 1:20 - 1:23
  "आधी, आपल्याला माहिती पाहिजे
  की ते कुठं नाहीत."
 • 1:23 - 1:26
  "रस्त्यावर चक्कर मार.
 • 1:26 - 1:28
  पहिल्या पावलाला सगळं व्यवस्थित
  सुरू आहे का?"
 • 1:28 - 1:31
  "दुसऱ्या पावलाला सगळं व्यवस्थित
  सुरू आहे का?"
 • 1:31 - 1:33
  "तिसऱ्या पावलाला काय होतंय?"
 • 1:33 - 1:38
  "काहीतरी चुकीचं घडेपर्यंत तुझ्या
  मार्गावरून एक एक पाऊल चालत राहा."
 • 1:38 - 1:40
  "इथंच किडा लपलेला आहे!"
 • 1:40 - 1:44
  "तुला आता तो कुठं आहे माहिती आहे,
  किडा शोध!
 • 1:44 - 1:47
  त्याला एक नाव दे आणि ते मोठ्यानं म्हण.
 • 1:47 - 1:50
  तू ते केल्या केल्या, जादू होईल."
 • 1:50 - 1:56
  "किडा दिसला!
 • 1:56 - 2:00
  आता आपण किड्यानं घातलेला गोंधळ
  दूर करूया."
 • 2:00 - 2:01
  "लवकर, जास्मिन!
 • 2:01 - 2:02
  तीन वाजलेच!"
 • 2:02 - 2:06
  "आपल्याला अजून एक मोठा किडा सापडलेला
  नाहीये," जास्मिन म्हणाली.
 • 2:06 - 2:08
  "पण माझी बरणी भरलीय!
 • 2:08 - 2:10
  तुला तो स्वत:च शोधायला लागेल."
 • 2:10 - 2:14
  "JD चिंताग्रस्त होऊन बाहेर पडला.
 • 2:14 - 2:19
  "आधी, तुला माहिती पाहिजे की तो कुठे
  नाहीये," तो स्वत:शीच कुजबुजला.
 • 2:19 - 2:23
  "पहिल्या पावलाला सगळं व्यवस्थित
  सुरू आहे का?
 • 2:23 - 2:24
  हो."
 • 2:24 - 2:27
  "दुसऱ्या पावलाला सगळं व्यवस्थित
  सुरू आहे का?
 • 2:27 - 2:28
  हो."
 • 2:28 - 2:31
  "तिसऱ्या पावलाला काय होतंय?
 • 2:31 - 2:32
  नाही!"
 • 2:32 - 2:36
  "आता मला माहितीये किडा कुठं आहे,
  मला आता तो शोधायला हवा!"
 • 2:36 - 2:37
  "त्याला एक नाव दे.
 • 2:37 - 2:39
  ते मोठ्याने म्हण."
 • 2:39 - 2:43
  "या किड्यामुळं दिवा चालत नाहीये, त्यामुळं
  मी त्याला स्पार्की म्हणेन."
 • 2:43 - 2:45
  "झालं काम!
 • 2:45 - 2:47
  मला किडा दिसला!
 • 2:47 - 2:51
  आता मी किडा काढून टाकू शकतो आणि
  त्यानं घातलेला गोंधळ दूर करू शकतो.
 • 2:51 - 2:53
  टॅलेंट प्रोग्रॅम सुरू व्हायच्या आत!"
 • 2:53 - 2:57
  JD चा जास्मिनला खूप अभिमान वाटला.
 • 2:57 - 3:00
  आता सगळ्या शहराला माहिती आहे,
  एखादी गोष्ट नीट होत नसेल तर,
 • 3:00 - 3:03
  डीबगर्सना कामाला लावायची वेळ आली आहे!
 • 3:03 - 3:05
  समाप्त!
Title:
Unspotted Bugs
Description:

more » « less
Video Language:
English
Duration:
03:06

Marathi subtitles

Revisions