WEBVTT 00:00:00.000 --> 00:00:02.000 आपले जीन्स (अनुवांशिक घटक) बदलण्याचा एक मार्ग म्हणजे नवीन जीन्स बनवणे 00:00:02.000 --> 00:00:04.000 जसे क्रेग वेंटरने इतक्या सुरेखरीत्या दाखवले आहे. 00:00:04.000 --> 00:00:07.000 दुसरा मार्ग म्हणजे आपली जीवनशैली बदलणे. 00:00:07.000 --> 00:00:11.000 आणि आपल्याला आता समजते आहे की हे बदल इतके शक्तिशाली (परिणामकारक) आणि गतिमान असू शकतात 00:00:11.000 --> 00:00:14.000 की त्यांचे फायदे दिसून येण्यास फार काळ थांबावे लागत नाही. 00:00:14.000 --> 00:00:19.000 तुम्ही पोषक आहार घ्याल, तणावावर नियंत्रण ठेवाल, जास्त व्यायाम आणि प्रेम कराल, 00:00:19.000 --> 00:00:21.000 तर तुमच्या मेंदूला जास्त रक्त आणि प्राणवायू पुरवठा मिळेल. 00:00:21.000 --> 00:00:24.000 पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मेंदूचा आकार वाढेल 00:00:24.000 --> 00:00:26.000 काही वर्षांपूर्वी ज्या गोष्टी अशक्यप्राय वाटायच्या 00:00:26.000 --> 00:00:28.000 त्या गोष्टींची मोजमाप देखील आपण आता करू शकतो. 00:00:28.000 --> 00:00:31.000 रॉबिन विल्यम्सला हे कळले होते 00:00:31.000 --> 00:00:33.000 आपल्यासर्वांच्या काही वर्षे अगोदरच. NOTE Paragraph 00:00:33.000 --> 00:00:35.000 आता, तुम्ही अशा काही गोष्टी करू शकता 00:00:35.000 --> 00:00:38.000 ज्याने तुमचा मेंदू नवीन (मेंदू ) पेशी बनवेल. 00:00:38.000 --> 00:00:40.000 माझ्या काही आवडत्या वस्तू, जसे चॉकलेट आणि चहा, ब्लुबेरीज 00:00:40.000 --> 00:00:44.000 अगदी बेताचे मद्यपान, तणावाचे नियंत्रण 00:00:44.000 --> 00:00:46.000 आणि गांज्यात आढळणारे कॅनाबॅनॉइड्स. 00:00:46.000 --> 00:00:48.000 मी फक्त माहिती पोचवणारा आहे. 00:00:49.000 --> 00:00:52.000 (हशा) 00:00:52.000 --> 00:00:55.000 आपण आत्ता कशाबद्दल बोलत होतो? 00:00:55.000 --> 00:00:57.000 (हशा) 00:00:57.000 --> 00:00:59.000 आणि इतर काही गोष्टी ज्या त्याला नुकसानकारक असतात 00:00:59.000 --> 00:01:01.000 ज्यामुळे मेंदूच्या पेशी नष्ट होऊ शकतात. 00:01:01.000 --> 00:01:04.000 आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी, जसे (सॅच्युरेटेड) मेद आणि साखर, 00:01:04.000 --> 00:01:08.000 निकोटीन, अफूयुक्त पदार्थ, कोकेन, प्रमाणाबाहेर दारू आणि सततचा तणाव. NOTE Paragraph 00:01:08.000 --> 00:01:11.000 तुम्ही तुमची जीवनशैली बदलली की तुमच्या त्वचेला रक्तपुरवठा वाढतो 00:01:11.000 --> 00:01:14.000 त्यामुळे वाढत्या वयाचे परिणाम कमी दिसून येतात, त्वचेला सुरकुत्या कमी पडतात. 00:01:14.000 --> 00:01:16.000 तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा वाढतो. 00:01:16.000 --> 00:01:18.000 आम्ही दाखवले आहे की हृदयरोगाचे परिणाम उलटवले जाऊ शकतात. 00:01:18.000 --> 00:01:21.000 येथे वरती डावीकडे तुम्ही पाहत असलेल्या तुंबलेल्या रक्तवाहिन्या, 00:01:21.000 --> 00:01:23.000 फक्त एका वर्षात पुष्कळ प्रमाणात मोकळ्या झाल्या. 00:01:23.000 --> 00:01:25.000 आणि खाली डावीकडे दिसणारे हृदयाचे PET (पेट) स्कॅन, 00:01:25.000 --> 00:01:27.000 निळा रंग म्हणजे तिथे रक्त पुरवठा होत नाहीये. 00:01:27.000 --> 00:01:30.000 एका वर्षानंतर - नारिंगी आणि पांढरा म्हणजे तिथे सर्वाधिक रक्तपुरवठा होतोय. 00:01:30.000 --> 00:01:33.000 आम्ही दाखवले आहे की (कर्करोगाची) प्रगती थांबवू शकली जाऊ शकते आणि उलटवू देखील जाऊ शकते 00:01:33.000 --> 00:01:35.000 प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग आणि ओघाने स्तनाच्या कर्करोगाचीही 00:01:35.000 --> 00:01:37.000 फक्त हे बदल केल्यावर. 00:01:37.000 --> 00:01:40.000 आम्हाला प्रयोगशाळेत आढळून आले की हे बदल करणाऱ्या गटात ट्युमर पेशींची वाढ 00:01:40.000 --> 00:01:42.000 सत्तर (७०) टक्क्यांनी कमी झाली , 00:01:42.000 --> 00:01:45.000 पण तुलनेत दुसऱ्या गटात फक्त नऊ (९) टक्क्यांनी वाढ कमी झाली. NOTE Paragraph 00:01:45.000 --> 00:01:47.000 हा फरक खरोखर खूप मोठा आहे. 00:01:47.000 --> 00:01:49.000 लैंगिक अवयवांना देखील रक्तपुरवठा वाढतो, 00:01:49.000 --> 00:01:51.000 त्यामुळे लैंगिक सामर्थ्य वाढते. 00:01:51.000 --> 00:01:53.000 धूम्रपानाच्या विरोधात काढण्यात आलेल्या जाहिरातींपैकी एक सर्वात परिणामकारक 00:01:53.000 --> 00:01:55.000 जाहिरात डिपार्टमेंट ऑफ़ हेल्थ सर्विसेस यांनी काढली होती, 00:01:55.000 --> 00:01:57.000 (त्यात) दाखवण्यात आले होते की निकोटीन, जे रक्तवाहिन्यांना संकुचित करते, 00:01:57.000 --> 00:01:59.000 (निकोटीनमुळे) हृदयाचा झटका आणि (मेंदू) संपात होऊ शकतो 00:01:59.000 --> 00:02:01.000 पण त्याने नपुंसकतेचा धोकासुद्धा उद्भवतो. 00:02:01.000 --> 00:02:03.000 धूम्रपान करणाऱ्यांपैकी अर्धे पुरुष लैंगिकरित्या दुर्बल असतात. 00:02:03.000 --> 00:02:04.000 हे किती उत्तेजक वाटते? NOTE Paragraph 00:02:04.000 --> 00:02:06.000 लवकरच आम्ही एका संशोधनाचे परिणाम प्रस्तुत करणार आहोत -- 00:02:06.000 --> 00:02:09.000 त्या संशोधनात दिसून आले आहे की प्रोस्टेटचा कर्करोग असणाऱ्या पुरुषांमध्ये अनुवांशिक घटकांचे परिणाम बदलता येतात. 00:02:09.000 --> 00:02:11.000 ह्याला हीट मॅप म्हणतात 00:02:11.000 --> 00:02:14.000 हे वेगवेगळे रंग आणि बाजूला उजवीकडे असलेले विविध जीन्स आहेत 00:02:14.000 --> 00:02:17.000 आणि आम्हाला दिसून आले की पाचशेहून (५००) अधिक जीन्स (अनुवांशिक घटक) मध्ये फायदेशीर बदल झाला होता 00:02:17.000 --> 00:02:20.000 म्हणजेच चांगले जीन्स, ज्यामुळे रोगांपासून बचाव होतो, ते कार्यान्वित झाले होते 00:02:20.000 --> 00:02:24.000 आणि रोगांसाठी कारणीभूत असणारे जीन्स बंद पडले होते. NOTE Paragraph 00:02:24.000 --> 00:02:27.000 आणि म्हणून मला वाटते की हा शोध फार शक्तिशाली आहे 00:02:27.000 --> 00:02:29.000 अनेक लोकांना यामुळे नवीन आशा आणि नवीन पर्याय मिळतील. 00:02:29.000 --> 00:02:34.000 आणि Navigenix , DNA Direct आणि 23andMe सारख्या कंपन्या , 00:02:34.000 --> 00:02:37.000 ज्या तुम्हाला तुमची अनुवांशिक माहिती पुरवतात , 00:02:37.000 --> 00:02:40.000 ते बघून लोकांमध्ये अशी भावना निर्माण होते , "अरे! याबद्दल मी काय करू शकतो ?" 00:02:40.000 --> 00:02:43.000 आपले अनुवांशिक घटक आपले भाग्य नाही ठरवत, आणि जर का आपण हे बदल केले -- 00:02:43.000 --> 00:02:45.000 ते रोगाला प्रवण असण्याची स्थिती निर्माण करतात, पण आपण जर मोठे बदल घडवून आणले 00:02:45.000 --> 00:02:47.000 आपण यापूर्वी विचार केला आहे त्याहूनही मोठे 00:02:47.000 --> 00:02:50.000 तर आपण आपल्या जीन्सद्वारे घडणारे परिणाम बदलू शकतो 00:02:50.000 --> 00:02:51.000 धन्यवाद 00:02:51.000 --> 00:02:53.000 (टाळ्या)