1 00:00:02,220 --> 00:00:06,660 इंटरनेट: सायबरसुरक्षा आणि गुन्हे 2 00:00:06,660 --> 00:00:11,080 हाय, माझं नाव आहे जेनी मार्टीन आणि मी सिमँटेकमध्ये सायबर सुरक्षा तपास विभागाची 3 00:00:11,080 --> 00:00:16,299 संचालक आहे. आज सायबर गुन्ह्यांमुळे समाजात वैयक्तिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या 4 00:00:16,299 --> 00:00:22,550 आणि अगदी राष्ट्रीय सुरक्षेच्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झालेल्या आहेत. गेल्या 5 00:00:22,550 --> 00:00:26,660 काही वर्षातच कोट्यावधी क्रेडीट कार्ड नंबर्स चोरीला गेले आहेत, 6 00:00:26,660 --> 00:00:30,539 कोट्यावधी सोशल सिक्युरीटी क्रमांक आणि आरोग्यसेवा नोंदी 7 00:00:30,539 --> 00:00:35,360 उघड झाल्या. अगदी आण्विक सेन्ट्रीफ्युजेससुद्धा हॅक झाले आणि मानवरहित 8 00:00:35,360 --> 00:00:40,090 हवाई ड्रोन्स हायजॅक करण्यात आले. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधील कमकुवत दुवे ओळखून किंवा 9 00:00:40,090 --> 00:00:45,059 बऱ्याचदा सॉफ्टवेअर वापरणाऱ्या लोकांनी नकळत घेतलेल्या निर्णयांचा फायदा घेऊन 10 00:00:45,059 --> 00:00:53,300 या सर्व गोष्टी केल्या जातात. सायबर गुन्हे 11 00:00:53,300 --> 00:00:57,600 करणारे लोक एकाच प्रकारचे किंवा एक हेतू असलेलेच नसतात. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यापासून ते 12 00:00:57,600 --> 00:01:03,329 अधिकार मिळवण्यासाठी झगडणाऱ्या किशोरवयीन मुलांपर्यंत कोणीही त्यात असू शकतो. आज सर्वांत 13 00:01:03,329 --> 00:01:08,960 मोठ्या देशांमध्ये केवळ नेहमीचे सैन्यच नसते तर सज्ज असलेले सायबर सैन्यसुद्धा असते. 14 00:01:08,960 --> 00:01:12,500 खरं तर, पुढचं जागतिक युद्ध पारंपारिक शस्त्रांनी लढलं जाणार नाही तर देशातील पाणी पुरवठा, 15 00:01:12,500 --> 00:01:17,210 वीजेची ग्रीड्स आणि वाहतूक व्यवस्था बंद करणाऱ्या कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून लढलं जाईल. 16 00:01:17,210 --> 00:01:25,330 हाय, माझं नाव परिसा आणि मी गुगल सुरक्षा राजकन्या आहे. मी खूप वेगवेगळ्या 17 00:01:25,330 --> 00:01:29,540 उत्पादनांवर काम केलं आहे आणि आमचं सॉफ्टवेअर शक्य तितकं सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळया 18 00:01:29,540 --> 00:01:33,600 पद्धतींवर काम केलं आहे. 19 00:01:33,600 --> 00:01:36,690 आता आपण सायबर गुन्हे कसं काम करतात, ते पाहू. 20 00:01:36,690 --> 00:01:41,320 आपण सॉफ्टवेअर व्हायरसेस, सेवा नाकारण्यासाठी हल्ले, आणि फिशिंग स्कॅम्स याबद्दल शिकू. 21 00:01:41,320 --> 00:01:46,170 जीवशास्त्रात आणि जीवनात, व्हायरस म्हणजे खोकणे, शिंकणे किंवा 22 00:01:46,170 --> 00:01:49,130 शारीरिक संपर्कातून पसरणारा जीव. 23 00:01:49,130 --> 00:01:53,370 पेशींना संसर्ग करून, आपले जेनेटिक मटेरियल त्यात घालून आणि पुनरुत्पादनासाठी या 24 00:01:53,370 --> 00:01:59,140 पेशी वापरून विषाणू काम करतात. ते लोकांना आजारी पाडतात आणि नंतर इतर लोकांकडे प्रसारित करतात. 25 00:01:59,140 --> 00:02:04,290 कॉम्प्युटरमधील व्हायरस थोडासा अशाचप्रकारे काम करतो. व्हायरस एक्झिक्युट करण्यासारखा प्रोग्रॅम 26 00:02:04,290 --> 00:02:10,090 असतो, जो सामान्यपणे, नकळत इन्स्टॉल होणारा असतो आणि तो युजर आणि त्यांचा कॉम्प्युटर यांचे 27 00:02:10,090 --> 00:02:16,210 नुकसान करतो. व्हायरस आपणहून इतर कॉम्प्युटर्सपर्यंत प्रसारित होणंसुद्धा शक्य असतं. आता 28 00:02:16,210 --> 00:02:19,880 तुमच्या कॉम्प्युटरपर्यंत व्हायरस येतो कसा? हल्लेखोर एक-दोन मार्गांनी एखाद्याच्या कॉम्प्युटरला 29 00:02:19,880 --> 00:02:24,730 संसर्ग करू शकतो. ते बळी पडणाऱ्या माणसाला प्रोग्रॅम इन्स्टॉल करायला भाग पाडतात, तेव्हा त्या प्रोग्रॅमचा हेतू 30 00:02:24,730 --> 00:02:29,200 वेगळाच सांगून दिशाभूल करतात, उदा. खूप व्हायरस एखाद्या सिक्युरीटी अपडेटचे सोंग घेऊन येतात. 31 00:02:29,200 --> 00:02:35,920 तुमच्या कॉम्प्युटरवरील सॉफ्टवेअरमध्ये काही कच्चे दुवे असू शकतात, त्यामुळे हल्लेखोर 32 00:02:35,920 --> 00:02:39,330 स्पष्ट परवानगी न मागतासुद्धा स्वत: इन्स्टॉल करू शकतो. 33 00:02:39,330 --> 00:02:43,590 एकदा व्हायरस तुमच्या कॉम्प्युटरवर आला की तो तुमच्या कोणत्याही फाईल्स चोरू शकतो, हटवू शकतो 34 00:02:43,590 --> 00:02:47,959 इतर प्रोग्रॅम्स नियंत्रित करू शकतो, किंवा अगदी एखाद्याला लांबून तुमच्या कॉम्प्युटरचं नियंत्रण 35 00:02:47,959 --> 00:02:50,340 करण्याची परवानगीसुद्धा देऊ शकतो. 36 00:02:50,340 --> 00:02:55,830 कॉम्प्युटर व्हायरस वापरून, हॅकर्स जगभरातील लक्षावधी कॉम्प्युटर्सवर नियंत्रण मिळवू शकतात 37 00:02:55,830 --> 00:03:01,280 आणि त्यांचा उपयोग डिजिटल सैन्य म्हणून करू शकतात, ज्याला बॉटनेट असं म्हणतात, आणि हल्ले 38 00:03:01,280 --> 00:03:07,269 करून वेबसाईट्स बंद पाडू शकतात. अशा हल्ल्याला सेवेला वितरीत नकार, असे म्हणतात. 39 00:03:07,269 --> 00:03:10,470 सेवेला नकार म्हणजे हॅकर्स वेबसाईटला खूपच 40 00:03:10,470 --> 00:03:14,840 जास्त विनंत्या पाठवून ती बंद पाडतात. जेव्हा असा हल्ला अनेक कॉम्प्युटर्सकडून एकाच वेळी केला जातो 41 00:03:14,840 --> 00:03:16,540 तेव्हा त्याला सेवेला वितरीत नकार असे म्हणतात. 42 00:03:16,540 --> 00:03:21,950 बहुतेक सर्व वेबसाईट्स एका दिवशी लक्षावधी विनंत्यांना प्रतिसाद देण्यासाठी तयार असतात, पण जर आपण 43 00:03:21,950 --> 00:03:25,430 त्यांना कोट्यावधी किंवा अब्जावधी विनंत्या, वेगवेगळ्या ठिकाणांहून पाठवल्या, 44 00:03:25,430 --> 00:03:31,500 तर कॉम्प्युटर्स ओव्हरलोड होतात आणि प्रतिसाद देणे थांबवतात. सायबर गुन्हेगार करत असलेला दुसरा 45 00:03:31,500 --> 00:03:35,970 प्रकार म्हणजे लोकांना संवेदनशील वैयक्तिक माहिती शेअर करायला भाग पाडण्यासाठी खूप मोठ्या 46 00:03:35,970 --> 00:03:39,110 प्रमाणावर स्पॅम ईमेल पाठवणे. 47 00:03:39,110 --> 00:03:44,920 याला फिशिंग स्कॅम असे म्हणतात. यामध्ये तुम्हाला एखादे विश्वासार्ह ईमेलसारखे दिसणारे ईमेल येते आणि 48 00:03:44,920 --> 00:03:49,590 ते तुम्हाला तुमच्या खात्यात लॉग इन करायला सांगते, पण त्या ईमेलवर क्लिक केल्यास तुम्हाला एका 49 00:03:49,590 --> 00:03:51,560 बनावट वेबसाईटवर नेण्यात येते. 50 00:03:51,560 --> 00:03:55,599 जर तुम्ही लॉग इन केलेच तर तुम्हाला फसवून तुमचा पासवर्ड चोरला जातो. 51 00:03:55,599 --> 00:04:00,390 मग हॅकर्स तुमची लॉग इन क्रेडेन्शियल्स वापरून तुमच्या खऱ्या खात्यांमध्ये प्रवेश करून 52 00:04:00,390 --> 00:04:05,520 माहिती चोरतात किंवा अगदी तुमचे पैसेसुद्धा चोरतात. सुदैवाने अनेक कंपन्या, 53 00:04:05,520 --> 00:04:09,920 कायदे आणि सरकारी संस्था इंटरनेट सुरक्षित करण्यासाठी काम करत आहेत, 54 00:04:09,920 --> 00:04:14,750 पण हे प्रयत्न पुरेसे नाहीत. 55 00:04:14,750 --> 00:04:18,450 तुम्हाला असं वाटेल की जेव्हा कॉम्प्युटर सिस्टीम हॅक होते, तेव्हा ही सुरक्षेच्या डिझाईनची 56 00:04:18,450 --> 00:04:22,860 किंवा सॉफ्टवेअरची समस्या असेल. नव्वद टक्के वेळा जेव्हा सिस्टीम हॅक होते, तेव्हा ती सुरक्षेतील 57 00:04:22,860 --> 00:04:26,980 बगमुळं नाही तर माणसांनी केलेल्या साध्या चुकांमुळं होते. 58 00:04:26,980 --> 00:04:35,070 स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काही पावलं उचलू शकतो. बऱ्याचदा 59 00:04:35,070 --> 00:04:39,040 तुमच्या कृतींचा परिणाम केवळ तुमच्या स्वत:चा डेटा आणि कॉम्प्युटर याच्याच सुरक्षिततेवरच नव्हे, 60 00:04:39,040 --> 00:04:41,550 तर तुमची शाळा, कामाची जागा आणि घरातील सगळ्याच्यांच सुरक्षिततेवर होतो. 61 00:04:41,550 --> 00:04:46,510 कोट्यावधी किंवा अब्जावधी डॉलर्स पणाला लागलेले असल्यामुळं 62 00:04:46,510 --> 00:04:51,590 सायबर गुन्हेगार दरवर्षी अधिकाधिक स्मार्ट होतात आणि आपण सर्वांनी त्यांचा वेग गाठणं आवश्यक आहे.