WEBVTT 00:00:00.320 --> 00:00:03.740 कॉम्प्युटर्सना एक गोष्ट खूप चांगली जमते, कमांड्स रिपीट करणं. 00:00:03.740 --> 00:00:08.170 आपल्याला एकच गोष्ट सलग पुन्हा पुन्हा करावी लागली तर खूप कंटाळा येतो. 00:00:08.809 --> 00:00:12.849 पण कॉम्प्युटर एकच गोष्ट लक्षावधी किंवा अगदी कोट्यावधी वेळा करू शकतो, 00:00:12.849 --> 00:00:15.000 तेसुद्धा न कंटाळता आणि अगदी चांगल्या पद्धतीनं. 00:00:15.500 --> 00:00:17.430 उदाहरणार्थ, मला जर फेसबुकवरच्या प्रत्येकाला 00:00:17.430 --> 00:00:20.960 ईमेल पाठवून happy birthday म्हणायचं असेल तर 00:00:20.960 --> 00:00:24.850 मला प्रत्येकाला असं ईमेल लिहायला शंभर वर्षं लागतील. 00:00:25.269 --> 00:00:28.760 पण कोडच्या फक्त काही ओळी लिहून, मी एका सिस्टीमद्वारे फेसबुकवरच्या 00:00:28.760 --> 00:00:32.229 सगळ्यांना ईमेल पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतो. 00:00:32.229 --> 00:00:34.000 हेच काम लूप्स करतात आणि म्हणूनच ते उपयोगी पडतात. 00:00:34.500 --> 00:00:37.180 आणि कॉम्प्युटर्सना ही गोष्ट चांगली जमते. 00:00:37.180 --> 00:00:40.550 या उदाहरणात तुमचं ध्येय असणार आहे, बर्डला 00:00:40.550 --> 00:00:44.940 हलवून डुकरापर्यंत पोचवणं. आता आपण "repeat" ब्लॉक वापरू शकतो. 00:00:44.940 --> 00:00:49.210 म्हणजे हे काम अगदी सोपं होईल. तुम्ही एकतर 00:00:49.210 --> 00:00:52.219 कॉम्प्युटरला "move forward" कमांड पाचवेळा देऊन बर्डला डुकराच्या दिशेत 00:00:52.219 --> 00:00:57.079 प्रत्येक वेळी एक पाऊल पुढे सरकवू शकता. 00:00:57.079 --> 00:01:00.590 किंवा तुम्ही कॉम्प्युटरला "move forward" एकदाच सांगून 00:01:00.590 --> 00:01:04.150 ते 5 वेळा "repeat" करायला सांगू शकता, म्हणजे तीच गोष्ट घडेल. 00:01:04.150 --> 00:01:08.280 त्यामुळं हे करण्यासाठी "move forward" कमांड ओढा 00:01:08.280 --> 00:01:11.729 आणि ती "repeat" ब्लॉकमध्ये ठेवा. 00:01:11.729 --> 00:01:16.200 मग त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला किती पावलं पुढे जायचंय त्याप्रमाणे हा ब्लॉक कितीवेळा 00:01:16.200 --> 00:01:19.970 पुन्हा पुन्हा व्हायला हवाय, ते लिहा. आता अजून एक गोष्ट म्हणजे 00:01:19.970 --> 00:01:23.540 तुम्ही हव्या तेवढ्या कमांड्स "repeat" ब्लॉकमध्ये लिहू शकता. 00:01:23.540 --> 00:01:26.909 या उदाहरणात तुम्ही त्याला पुढे जायला आणि डावीकडे वळायला सांगत आहात, 00:01:26.909 --> 00:01:30.970 आणि ही गोष्ट तो पाचवेळा करेल. ठीक आहे. मस्त कामगिरी करा आणि मजा करा :-)