1 00:00:00,320 --> 00:00:03,740 कॉम्प्युटर्सना एक गोष्ट खूप चांगली जमते, कमांड्स रिपीट करणं. 2 00:00:03,740 --> 00:00:08,170 आपल्याला एकच गोष्ट सलग पुन्हा पुन्हा करावी लागली तर खूप कंटाळा येतो. 3 00:00:08,809 --> 00:00:12,849 पण कॉम्प्युटर एकच गोष्ट लक्षावधी किंवा अगदी कोट्यावधी वेळा करू शकतो, 4 00:00:12,849 --> 00:00:15,000 तेसुद्धा न कंटाळता आणि अगदी चांगल्या पद्धतीनं. 5 00:00:15,500 --> 00:00:17,430 उदाहरणार्थ, मला जर फेसबुकवरच्या प्रत्येकाला 6 00:00:17,430 --> 00:00:20,960 ईमेल पाठवून happy birthday म्हणायचं असेल तर 7 00:00:20,960 --> 00:00:24,850 मला प्रत्येकाला असं ईमेल लिहायला शंभर वर्षं लागतील. 8 00:00:25,269 --> 00:00:28,760 पण कोडच्या फक्त काही ओळी लिहून, मी एका सिस्टीमद्वारे फेसबुकवरच्या 9 00:00:28,760 --> 00:00:32,229 सगळ्यांना ईमेल पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतो. 10 00:00:32,229 --> 00:00:34,000 हेच काम लूप्स करतात आणि म्हणूनच ते उपयोगी पडतात. 11 00:00:34,500 --> 00:00:37,180 आणि कॉम्प्युटर्सना ही गोष्ट चांगली जमते. 12 00:00:37,180 --> 00:00:40,550 या उदाहरणात तुमचं ध्येय असणार आहे, बर्डला 13 00:00:40,550 --> 00:00:44,940 हलवून डुकरापर्यंत पोचवणं. आता आपण "repeat" ब्लॉक वापरू शकतो. 14 00:00:44,940 --> 00:00:49,210 म्हणजे हे काम अगदी सोपं होईल. तुम्ही एकतर 15 00:00:49,210 --> 00:00:52,219 कॉम्प्युटरला "move forward" कमांड पाचवेळा देऊन बर्डला डुकराच्या दिशेत 16 00:00:52,219 --> 00:00:57,079 प्रत्येक वेळी एक पाऊल पुढे सरकवू शकता. 17 00:00:57,079 --> 00:01:00,590 किंवा तुम्ही कॉम्प्युटरला "move forward" एकदाच सांगून 18 00:01:00,590 --> 00:01:04,150 ते 5 वेळा "repeat" करायला सांगू शकता, म्हणजे तीच गोष्ट घडेल. 19 00:01:04,150 --> 00:01:08,280 त्यामुळं हे करण्यासाठी "move forward" कमांड ओढा 20 00:01:08,280 --> 00:01:11,729 आणि ती "repeat" ब्लॉकमध्ये ठेवा. 21 00:01:11,729 --> 00:01:16,200 मग त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला किती पावलं पुढे जायचंय त्याप्रमाणे हा ब्लॉक कितीवेळा 22 00:01:16,200 --> 00:01:19,970 पुन्हा पुन्हा व्हायला हवाय, ते लिहा. आता अजून एक गोष्ट म्हणजे 23 00:01:19,970 --> 00:01:23,540 तुम्ही हव्या तेवढ्या कमांड्स "repeat" ब्लॉकमध्ये लिहू शकता. 24 00:01:23,540 --> 00:01:26,909 या उदाहरणात तुम्ही त्याला पुढे जायला आणि डावीकडे वळायला सांगत आहात, 25 00:01:26,909 --> 00:01:30,970 आणि ही गोष्ट तो पाचवेळा करेल. ठीक आहे. मस्त कामगिरी करा आणि मजा करा :-)