वा!
अजून तीन कोडी सुटली!
आणि आपल्याला मिळालाय...सामन.
अगदी सोन्याच्या ढीगाइतका मौल्यवान नाही,
पण जे काही मिळेल ते आपण घेऊ.
आणि मला वाटतेय शिंपल्याचं कवच
नंतर उपयोगी पडेल.
या उध्वस्त जागेत काय लपलं असेल
याची उत्सुकता वाटतेय.
बहुतेक अजून एखादी हिंट!
आत काय आहे बघूया.
माझं नाव नेटी आहे आणि माझ्या या
पडक्या जागेत स्वागत.
आपण नेहमी परिस्थितीनुसार निर्णय घेतो.
जर पाऊस पडेल असे वाटत असेल तर,
आपण छत्री घेतो.
जर आपल्याला भूक लागली तर,
आपण काहीतरी खातो.
जर आपल्याला वेल दिसली तर,
आपण उलट्या दिशेला पळून जातो.
कॉम्प्युटरसुद्धा अशा प्रकारचे
निर्णय घेतात.
कोड वापरून ते परिस्थितीला प्रतिसाद देतात.
कोड कमांड्स वापरून या सारखा प्रतिसाद
प्रोग्रॅम करण्यासाठी, if path ब्लॉक निवडा.
कमांड तयार करण्यासाठी ड्रॉप डाऊन निवडा.
उदा. जर तुम्ही "if path to the right" अशी कमांड लिहीलीत आणि कंडीशनलमध्ये turn right ठेवलेत
तर स्टीव्ह उजवीकडे रस्ता असेल तेव्हा
नेहमी उजवीकडे वळेल.
उजवीकडे रस्ता नसेल तर तो उजवीकडे
वळणार नाही.
जेव्हा तुम्ही अंदाज न करता येणाऱ्या परिस्थितीत असता, तेव्हा या कंडीशनल if कमांड्स उपयुक्त असतात
उदा. पाण्याखालच्या गुहातील गूढ पडक्या जागा.
if ब्लॉक्स वापरून पहा आणि तुमचा कोड वेगळा बनवा.
मस्त!
नेटीची पडकी जागा मस्त होती.
मी पण माझ्या आईवडीलांच्या
घरातून बाहेर पडायला पाहिजे.
मग, तुम्हाला काय वाटतंय?
शेवटची कोडी पूर्ण करण्यासाठी आपण
योग्य स्थितीत आहोत?
चला, जाऊया!