1 00:00:00,016 --> 00:00:03,190 शहारुख खान : सर्वात मोठी ध्येये गाठणाऱ्यामधे दिसते - 2 00:00:03,190 --> 00:00:05,871 धैर्य, निग्रह आणि एकाग्र, केलेली दृष्टी । 3 00:00:05,871 --> 00:00:10,633 त्यांच्यात इतकी हिंमत असते की त्यांना अपयश हा पर्यायच नसतो। 4 00:00:10,786 --> 00:00:13,491 विशाल सागर आपल्याला अजिंक्य दिसतो पण, 5 00:00:13,491 --> 00:00:16,183 आपल्या आजच्या वक्त्यासाठी ते आकर्षक व्यासपीठ आहे 6 00:00:16,183 --> 00:00:17,696 ज्याच्यासाठीच ती जन्मली. 7 00:00:17,696 --> 00:00:20,855 तर आजची आपली निर्भय व्यक्ती भक्ती शर्मा हिच्या गोष्टीत 8 00:00:20,855 --> 00:00:22,283 उडी घेऊ या. 9 00:00:22,283 --> 00:00:25,750 ही लांब अंतर पोहोण्याच्या क्षेत्रात लाटा निर्माण करत आहे. 10 00:00:25,750 --> 00:00:29,017 भक्ती शर्मा. 11 00:00:30,337 --> 00:00:32,502 (टाळ्या) 12 00:00:39,382 --> 00:00:43,190 भक्ती शर्मा : कल्पना करा, राजस्थानच्या कडक उन्हात 13 00:00:43,190 --> 00:00:44,841 एखाद्या रणरणत्या दुपारी, 14 00:00:44,841 --> 00:00:47,132 एक दोन वर्षाची मुलगी आईच्या मोपेडवर बसते, 15 00:00:47,132 --> 00:00:50,213 तिला माहित नाही, आपण कुठे जातोय 16 00:00:50,213 --> 00:00:53,043 आणि २० मिनिटांनंतर 17 00:00:53,043 --> 00:00:55,348 ह्या अडीच वर्षांच्या मुलीला दिसतं 18 00:00:55,348 --> 00:00:57,572 की ती पाण्यात पडली आहे. 19 00:00:57,572 --> 00:00:59,653 मला काही समजण्याच्या आत, 20 00:00:59,653 --> 00:01:02,101 मी लाथा मारत होते, पाणी उडवत, ओरडत होते 21 00:01:02,101 --> 00:01:03,847 माझ्या पोटातही पाणी जात होतं, 22 00:01:03,847 --> 00:01:06,440 माझ्या प्रिय आयुष्यासाठी मी आईला धरत होते. 23 00:01:06,440 --> 00:01:08,069 मी अशी पोहायला शिकले। 24 00:01:08,069 --> 00:01:10,610 मी अडीच वर्षांची असताना तलावात पोहायला लागले. 25 00:01:10,610 --> 00:01:13,144 आणि १४ वर्षांची असताना सागराच्या खुल्या पाण्यात. 26 00:01:13,881 --> 00:01:18,349 मी या खेळाला माझ्या आयुष्याची २५ पेक्षा जास्त वर्षे दिली आहेत. 27 00:01:18,349 --> 00:01:22,478 या काळात मी जगातले सगळे म्हणजे पाचही सागर पोहले आहे. 28 00:01:23,800 --> 00:01:25,320 इंग्लिश खाडी पार केली आहे -- 29 00:01:25,320 --> 00:01:28,696 जिला पोहण्याच्या क्षेत्रात माउंट एव्हरेस्ट समजतात -- 30 00:01:28,696 --> 00:01:32,636 आणि गोठवणाऱ्या अंटर्क्टिक सागरात जागतिक विक्रम नोंदला आहे. 31 00:01:32,636 --> 00:01:35,719 (टाळ्या) 32 00:01:35,719 --> 00:01:38,342 जेव्हा तुम्ही एखाद्या खेळात इतका काळ असता, 33 00:01:38,342 --> 00:01:39,973 तो फक्त खेळ रहात नाही, 34 00:01:39,973 --> 00:01:41,705 तर एक आरसा बनतो, 35 00:01:41,705 --> 00:01:44,237 तो तुम्ही खरंच कोण आहात हे दाखवतो. 36 00:01:44,237 --> 00:01:47,807 खेळाडू म्हणून तुमची परीक्षा फक्त शर्यतीच्या दिवशीच नाही, 37 00:01:47,807 --> 00:01:51,991 तर प्रत्येक दिवशी होत असते, 38 00:01:51,991 --> 00:01:56,094 जेव्हा ह्या खेळाची मागणी असते की तुम्ही पहाटे ४:३० ला उठायचे, 39 00:01:56,094 --> 00:01:57,531 दोन तास पोहायचे, 40 00:01:57,531 --> 00:02:00,174 शाळेत जायचे, परत यायचे, परत ३ तास पोहायचे, 41 00:02:00,174 --> 00:02:02,863 घरी जायचे, जेवायचे आणि झोपायचे. 42 00:02:02,863 --> 00:02:05,657 जेव्हा तुम्ही एक मेडल जिंकता किंवा जागतिक विक्रम करता, 43 00:02:05,657 --> 00:02:09,981 तेव्हा हा आरसा तुम्हाला तुमचा आणि तुमच्या जवळच्यांचा आनंद दाखवतो, 44 00:02:09,981 --> 00:02:13,217 तसेच तुम्ही ढाळलेले अश्रुही दाखवतो 45 00:02:13,217 --> 00:02:16,043 जे तुम्ही पाण्यात अगदी एकटे असताना येतात. 46 00:02:16,043 --> 00:02:19,425 खुल्या सागरात पोहणे हा खूप एकाकी खेळ आहे. 47 00:02:19,425 --> 00:02:21,660 मी असे अनेक तास घालवले आहेत, 48 00:02:21,660 --> 00:02:25,840 माझ्याखालच्या अनंत आणि अथांग वाटणाऱ्या सागरात बघत, 49 00:02:25,840 --> 00:02:29,235 जिथे माझ्या सोबतीला माझे विचार सोडून कोणीही नसते. 50 00:02:29,235 --> 00:02:32,613 त्यामुळे माझी परीक्षा एक जलतरणपटू म्हणूनच होत नाही तर 51 00:02:32,613 --> 00:02:36,755 एक विचारी, भावना असलेली, कल्पना करणारी माणूस म्हणूनही होते. 52 00:02:36,755 --> 00:02:40,293 ही परीक्षा माझ्या पहिल्या मेरेथोन टेस्टमधे होते, 53 00:02:40,293 --> 00:02:44,974 किंवा न थांबता १२ तास तलावात पोहायचे ठरवताना होते, 54 00:02:44,974 --> 00:02:48,651 तसंच १३ तास ५५ मिनिटांमधे इंग्लिश खाडी ओलांडताना होते. 55 00:02:48,651 --> 00:02:51,748 पोहत असताना तुम्ही बोलत नाही, 56 00:02:51,748 --> 00:02:53,958 तुम्हाला नीट ऐकू येत नाही, 57 00:02:53,958 --> 00:02:57,228 आणि तुमची नजर फक्त अगदी समोर असलेल्या किंवा 58 00:02:57,228 --> 00:02:58,776 तुमच्या खालच्या गोष्टींपर्यतच जाते. 59 00:02:58,776 --> 00:03:02,982 माझ्या खेळातले हे एकाकीपण माझ्यासाठी सर्वात मोठे बक्षिस आहे. 60 00:03:02,982 --> 00:03:04,792 अथांग सागरात पोहोण्यामुळे, 61 00:03:04,792 --> 00:03:09,540 मी कधी अपेक्षा केली नसेल अशा प्रकारे मला स्वत:ची ओळख झाली. 62 00:03:09,540 --> 00:03:11,532 मला आठवतंय, १४ वर्षांची असताना, 63 00:03:11,532 --> 00:03:14,711 मी जेव्हा सागरात पोहोण्यासाठी पहिल्यांदा उडी मारली, 64 00:03:14,711 --> 00:03:16,649 आणि ह्या पूर्ण पोहोण्यामधे, 65 00:03:16,649 --> 00:03:19,680 लाटा मला उंच उचलत होत्या आणि खाली फेकत होत्या, 66 00:03:19,680 --> 00:03:23,877 मला माझ्यातलं मूल दिसलं, ज्याला असं धाडस आवडतं. 67 00:03:23,877 --> 00:03:25,823 इंग्लिश खाडी पार करताना, 68 00:03:25,823 --> 00:03:28,531 आधीचे १० तास पोहोल्यानंतर, 69 00:03:28,531 --> 00:03:31,330 मी जेव्हा एकाच जागी दीड तास अडकून पडले, 70 00:03:31,330 --> 00:03:33,019 जे प्रवाहांमुळे होतं, 71 00:03:33,019 --> 00:03:36,363 मला माझ्यातला समर्पित आणि खंबीर खेळाडू दिसला, 72 00:03:36,363 --> 00:03:39,491 ज्याला त्याच्या देशाचा आणि पालकांचा अपेक्षाभंग करायचा नव्हता. 73 00:03:39,491 --> 00:03:42,933 स्वित्झर्लंडमधे झालेल्या खुल्या पाण्यातल्या मेरेथोन मधे 74 00:03:42,933 --> 00:03:47,005 मी जेव्हा माझं पहिलं सुवर्णपदक भारतासाठी मिळवलं- - 75 00:03:47,005 --> 00:03:50,493 (टाळ्या) 76 00:03:50,493 --> 00:03:52,771 मी माझ्यातला अभिमानी भारतीय पाहिला. 77 00:03:52,771 --> 00:03:55,616 पुन्हा एकदा इंग्लिश खाडी पार करताना, 78 00:03:55,616 --> 00:03:57,981 ह्यावेळी माझ्या आईबरोबर रिले करत, 79 00:03:57,981 --> 00:04:00,823 आम्ही इतिहास घडवतो आहे हे माहित नसताना, 80 00:04:00,823 --> 00:04:03,245 मी माझ्यातली काळजी घेणारी मुलगी पाहिली, 81 00:04:03,245 --> 00:04:06,958 जिला फक्त तिच्या आईचं स्वप्न साकार होताना पहायचं होतं. 82 00:04:06,958 --> 00:04:08,363 आणि चार वर्षांपूर्वी, 83 00:04:08,363 --> 00:04:10,601 मी जेव्हा अंटार्क्टिक समुद्रात उडी घेतली, 84 00:04:10,601 --> 00:04:14,133 अंगावर स्वीमिंग सूट्, टोपी व गोगल सोडून काही नसताना, 85 00:04:14,133 --> 00:04:16,984 फक्त काही करण्याच्या अथक जिद्दीने, 86 00:04:16,984 --> 00:04:19,121 माझ्यातला योध्दा मी पाहिला. 87 00:04:19,121 --> 00:04:22,582 मी जेव्हा शून्य ते एक अंश तापमानाच्या पाण्यात उडी मारली, 88 00:04:22,606 --> 00:04:26,887 मला जाणीव झाली की मी स्वत:च्या शरीर व मनाला थंडीसाठी तयार केलं होतं, 89 00:04:26,887 --> 00:04:30,752 पण पाण्याच्या दाटपणासाठी माझी तयारी नव्हती. 90 00:04:30,752 --> 00:04:34,659 मारलेला प्रत्येक हात तेलात मारल्यासारखा वाटत होता. 91 00:04:34,659 --> 00:04:36,290 आणि पहिल्या पाच मिनिटांमधे, 92 00:04:36,290 --> 00:04:39,486 मला हे सगळं सोडून देण्याचा पंगू करणारा विचार आला. 93 00:04:39,486 --> 00:04:42,667 हे सगळं सोडलं तर किती बरं होईल, 94 00:04:42,667 --> 00:04:43,842 बोटीवर जावं, 95 00:04:43,842 --> 00:04:45,577 गरम पाण्याच्या शोवरखाली उभं रहावं, 96 00:04:45,577 --> 00:04:48,529 की उबदार पांघरुणात गुंडाळून घ्यावं 97 00:04:48,529 --> 00:04:50,298 पण ह्याच विचाराबरोबर, 98 00:04:50,298 --> 00:04:54,649 अगदी आतून एक हट्टी सबळ विचार आला. 99 00:04:54,649 --> 00:04:58,141 "तुला माहितीये की अजून एक स्ट्रोक मारण्याची क्षमता तुझ्यात आहे." 100 00:04:58,165 --> 00:05:00,514 आणि मी हात उचलून एक स्ट्रोक मारला. 101 00:05:00,514 --> 00:05:01,792 " आता अजून एक." 102 00:05:01,792 --> 00:05:04,714 मग मी दुसरा आणि तिसराही स्ट्रोक मारला. 103 00:05:04,714 --> 00:05:06,681 चौथ्या स्ट्रोक पर्यंत, 104 00:05:06,681 --> 00:05:09,945 मला माझ्या पोटाखालून एक पेंग्विन पोहोताना दिसला. 105 00:05:09,945 --> 00:05:13,839 तो माझ्या डावीकडे आला व माझ्याबरोबर पोहू लागला. 106 00:05:13,839 --> 00:05:15,967 " पहा, पेंग्विन तुला प्रोत्साहन देत आहे," 107 00:05:15,967 --> 00:05:17,614 त्या आवाजाने मला सांगितलं. 108 00:05:17,614 --> 00:05:20,495 ( टाळ्या व प्रोत्साहन ) 109 00:05:20,495 --> 00:05:23,095 मी बोटीतल्या माझ्या लोकांकडे पाहिलं. 110 00:05:23,095 --> 00:05:26,930 माझ्या चेहऱ्यावर होतं तसंच हसू त्यांच्यापण होतं. 111 00:05:26,930 --> 00:05:29,292 आम्हा सगळ्यांकडे तेच हसू होतं 112 00:05:29,292 --> 00:05:31,681 जे आपण अवघड परिस्थितीत अडकलेले असताना 113 00:05:31,681 --> 00:05:33,622 आशेचा एक किरण दिसल्यावर येतं. 114 00:05:33,622 --> 00:05:35,760 आपण ते नशिबाचे चिन्ह म्हणून घेतो, 115 00:05:35,760 --> 00:05:38,109 आणि आपण फक्त पुढे जात रहातो. 116 00:05:38,109 --> 00:05:39,498 अगदी मी केलं त्याप्रमाणे 117 00:05:39,498 --> 00:05:41,212 आणि ४० मिनिटांनंतर, 118 00:05:41,212 --> 00:05:44,216 मी अटलांटिक सागरात सर्वात जास्त अंतर पोहोण्याचा 119 00:05:44,216 --> 00:05:45,821 जागतिक विक्रम केला. 120 00:05:45,821 --> 00:05:49,235 ( टाळ्या) 121 00:05:49,235 --> 00:05:52,187 कल्पना करा,राजस्थानमधे बर्फसुद्धा पडत नाही. 122 00:05:52,187 --> 00:05:53,560 ( हशा ) 123 00:05:53,560 --> 00:05:57,243 हा आवाज, जो माझ्या सर्व कठीण प्रसंगात माझ्या सोबतीला होता 124 00:05:57,243 --> 00:05:58,633 माझ्या सगळ्या पोहोण्यामधे, 125 00:05:58,633 --> 00:06:00,347 मला कधीच दिसला नसता, 126 00:06:00,347 --> 00:06:03,331 जर मी इतका वेळ एकटीने घालवला नसता, 127 00:06:03,355 --> 00:06:06,251 जर माझ्या मनात डोकावणाऱ्या 128 00:06:06,251 --> 00:06:07,921 प्रत्येक विचाराकडे लक्ष दिलं नसतं. 129 00:06:07,921 --> 00:06:12,649 जेव्हा तुम्ही सागरात फक्त तुमच्या विचारांच्या साथीने एकटे असता, 130 00:06:12,649 --> 00:06:15,530 तुम्हाला येऊन भिडणारी संकटं व्हेल, शार्क, जेलीफिश अशी 131 00:06:15,530 --> 00:06:18,748 किंवा नाउमेद करणारी माणसे 132 00:06:18,748 --> 00:06:20,825 अशी फक्त बाहेरची नसतात, 133 00:06:20,825 --> 00:06:23,696 पण जास्त भितीदायक राक्षसी शत्रू म्हणजे 134 00:06:23,696 --> 00:06:25,998 तुमच्या मनातली भीती आणि नकारात्मक विचार. 135 00:06:25,998 --> 00:06:29,268 जे सांगतात, तू पुरेशी चांगली नाहीस, 136 00:06:29,268 --> 00:06:31,252 तू कधीच त्या किनाऱ्याला लागणार नाहीस. 137 00:06:31,276 --> 00:06:32,839 तुझं पुरेसं प्रशिक्षण झालं नाही 138 00:06:32,863 --> 00:06:35,649 तुला अपयश आलं तर? लोक काय म्हणतील? 139 00:06:35,673 --> 00:06:38,936 मला खात्री आहे की आत्ता सगळे म्हणताहेत 'तू किती हळू पोहोतेस.' 140 00:06:38,936 --> 00:06:42,161 सगळ्यांनाच स्वत:चे आतले राक्षस असतात, नाही का? 141 00:06:42,161 --> 00:06:45,244 रोजच्या जीवनात आपण त्यांच्यापासून लपू शकतो, 142 00:06:45,244 --> 00:06:48,339 तुमचे काम किंवा लक्ष देण्याच्या इतर अनेक गोष्टींच्या मागे. 143 00:06:48,339 --> 00:06:50,553 पण मी म्हटले त्याप्रमाणे 144 00:06:50,553 --> 00:06:54,244 अथांग सागरात तुम्हाला लपायला कुठेच जागा नसते. 145 00:06:54,244 --> 00:06:56,786 मलाही माझ्या आतल्या राक्षसांना तोंड द्यावं लागलं, 146 00:06:56,786 --> 00:06:59,784 जशी मला सागराच्या खारट पाण्याची चव बघावी लागते, 147 00:06:59,784 --> 00:07:01,517 अंगावर दमटपणा जाणवतो, 148 00:07:01,517 --> 00:07:05,191 किंवा माझ्या बाजूने पोहोणाऱ्या व्हेल माशांची दखल घ्यावी लागते, 149 00:07:05,191 --> 00:07:08,301 मला ह्याचा राग येतो, आणि प्रेमही वाटतं. 150 00:07:08,301 --> 00:07:13,291 मला राग येतो कारण हा खेळ मला माझी ती बाजू दाखवतो 151 00:07:13,291 --> 00:07:15,894 जिच्या अस्तित्वावर मला विश्वास ठेवायचा नाही. 152 00:07:15,894 --> 00:07:19,156 माझी मानवी आणि आदर्श नसलेली बाजू. 153 00:07:19,156 --> 00:07:20,561 माझा तो भाग 154 00:07:20,561 --> 00:07:23,936 जो सकाळी अंथरुणाबाहेर पडून सराव करु शकत नाही 155 00:07:23,936 --> 00:07:27,785 तो भाग जो इतका दमतो, त्याचा इतका शक्तीपात होतो, 156 00:07:27,785 --> 00:07:29,722 की त्याला पोहोणंच सोडून द्यायचं असतं. 157 00:07:29,722 --> 00:07:31,547 पण या खेळाबद्दल प्रेमही वाटतं, 158 00:07:31,571 --> 00:07:35,768 कारण ह्याने मला दिलेल्या काही क्षणांची मी तेव्हा आठवण काढते, 159 00:07:35,768 --> 00:07:37,689 जेव्हा मला प्रेरणा मिळत नाही. 160 00:07:37,689 --> 00:07:40,228 आणि मला फार क्रुतद्न्य वाटून 161 00:07:40,228 --> 00:07:43,868 मी त्याच्यापुढे अगदी गुढगे टेकते. 162 00:07:43,868 --> 00:07:48,027 तुमच्यापैकी बरेच जण न थांबता तासनतास पोहले नसतील. 163 00:07:48,027 --> 00:07:52,177 पण तुम्ही तुमचा बराच वेळ कोणाबरोबर घालवता? 164 00:07:52,177 --> 00:07:56,022 तुमचं स्वत:बाहेरचं लक्ष अनेक लोकांशी वाटून घेतलेलं असतं, 165 00:07:56,046 --> 00:07:59,565 पण तुमचा एक सोबती सतत तुमच्याजवळ असतो, 166 00:08:00,204 --> 00:08:01,654 तुम्ही स्वत: 167 00:08:01,654 --> 00:08:06,500 तरीही, बहुतेकांना आपण खरंच कोण आहोत याची ओळख नसते. 168 00:08:06,500 --> 00:08:10,624 मी एक मुलगी आहे, एक भारतीय, एक जलतरणपटू, एक विद्यार्थी आहे. 169 00:08:10,624 --> 00:08:12,816 पण यापलीकडेही मी कितीतरी आहे. 170 00:08:12,816 --> 00:08:15,823 तुम्ही स्वत:मधे गुंतवणुक करत नसाल, 171 00:08:15,823 --> 00:08:19,855 तुम्हाला 'त्या' स्वत:जवळ नेणारा मार्ग तयार करत नसाल तर 172 00:08:19,855 --> 00:08:25,091 कितीही "यश" मिळाल्याने तुम्हाला शाश्वत आनंद व समाधान मिळणार नाही. 173 00:08:25,091 --> 00:08:26,570 आजही, 174 00:08:26,570 --> 00:08:30,260 जेव्हा मला, मी करतेय त्यातून प्रेरणा किंवा आनंद मिळत नाही, 175 00:08:30,260 --> 00:08:32,054 मी स्वत:ला फक्त विचारते, 176 00:08:32,054 --> 00:08:34,734 या क्षणी मी जे सर्वोत्तम करु शकेन, ते हेच आहे का? 177 00:08:34,734 --> 00:08:37,168 आणि "माझे सर्वोत्तम" ह्याचा अर्थ बदलत रहातो. 178 00:08:37,168 --> 00:08:40,120 कधी तो, प्रयत्न सोडू नये असा असतो, 179 00:08:40,120 --> 00:08:43,433 कधी, गोठलेल्या पाण्यात पोहत राहून जागतिक विक्रम करणे असतो. 180 00:08:43,433 --> 00:08:45,252 पण इतर अनेक दिवशी, 181 00:08:45,252 --> 00:08:47,825 माझ्या निराश विचारांवर मात करणे असतो, 182 00:08:47,825 --> 00:08:49,268 घराच्या बाहेर पाऊल टाकून, 183 00:08:49,268 --> 00:08:52,066 रोजची साधी कामे करु शकणे असतो. 184 00:08:52,066 --> 00:08:54,990 बदलत नाही तो आतला आवाज. 185 00:08:54,990 --> 00:08:56,569 ते आतलं होकयंत्र, जे मला 186 00:08:56,569 --> 00:08:59,739 दररोज जास्त चांगली व्यक्ती होण्याची दिशा दाखवतं. 187 00:08:59,739 --> 00:09:02,031 आणि माझा विश्वास आहे की 188 00:09:02,031 --> 00:09:07,553 खरोखरचे यशस्वी आयुष्य म्हणजे याचा शोध घेत रहाणे 189 00:09:07,553 --> 00:09:11,117 की तुम्ही 'सर्वात चांगले तुम्ही' कसे असाल 190 00:09:11,117 --> 00:09:13,243 जेव्हा तुम्ही शेवटचा श्वास घ्याल. 191 00:09:13,243 --> 00:09:14,417 धन्यवाद. 192 00:09:14,417 --> 00:09:18,702 ( टाळ्या ) 193 00:09:22,083 --> 00:09:24,719 शहारुख खान: मला वाटतं पोहणे हा एकच खेळ मला जमणार नाही- 194 00:09:24,719 --> 00:09:26,161 मी दगडासारखा खाली बुडतो. 195 00:09:26,161 --> 00:09:28,978 त्यामुळे जगातल्या सर्वोत्तम जलतरणपटूच्या शेजारी उभं रहायला 196 00:09:28,978 --> 00:09:30,424 मला जरा कसं वाटतंय, म्हणजे - - 197 00:09:30,424 --> 00:09:31,897 माझ्या शब्द-कोटीला माफ करा - - 198 00:09:31,897 --> 00:09:33,478 जणू काही सागरात असल्यासारखं. 199 00:09:33,478 --> 00:09:34,273 पण - - 200 00:09:34,273 --> 00:09:36,296 भक्ती शर्मा : (हसते) खरंच कोटी नाही. 201 00:09:36,296 --> 00:09:38,958 खान : पण तुमचं जलतरणातलं पुढचं ध्येय काय आहे? 202 00:09:38,958 --> 00:09:40,966 शर्मा : मला स्पर्धेची बरीच भिती आहे, 203 00:09:40,966 --> 00:09:44,089 तेव्हा ओलिंपिकपेक्षा जास्त चांगलं ध्येय काय असेल? 204 00:09:44,089 --> 00:09:47,121 कारण खुल्या सागरात पोहोणे हा आता ओलिंपिकमधला खेळ आहे. 205 00:09:47,121 --> 00:09:48,883 ( टाळ्या ) 206 00:09:48,883 --> 00:09:51,580 हे मोठ्याने बोलतानासुद्धा माझ्या अंगावर शहारे येतायत, 207 00:09:51,580 --> 00:09:53,085 कारण ते इतकं मोठं ध्येय आहे 208 00:09:53,085 --> 00:09:55,654 की ते ध्येय माझं आहे यावर मला विश्वास ठेवायचा नाही 209 00:09:55,654 --> 00:09:58,188 पण तोच त्यातला थरार आहे, तोच त्याचा भाग आहे. 210 00:09:58,188 --> 00:10:02,601 आणि माझा असा विचार आहे की मी ओलिंपिकमधे गेले, किंवा नाही गेले, 211 00:10:02,601 --> 00:10:03,776 त्याने मला फरक पडत नाही, 212 00:10:03,776 --> 00:10:05,665 पण त्याच्या प्रशिक्षणाच्या प्रक्रीयेमधे 213 00:10:05,665 --> 00:10:08,323 मी एक जास्त चांगली जलतरणपटू आणि एक चांगली माणूस बनेन. 214 00:10:08,323 --> 00:10:10,664 खान : इन्शा अल्ला, तू जरुर ओलिंपिकला जाशील. 215 00:10:10,664 --> 00:10:12,252 आणि मला तुला सांगायचंय की 216 00:10:12,252 --> 00:10:14,688 बरेच लोक जे हा कार्यक्रम घरुन पहात आहेत 217 00:10:14,688 --> 00:10:18,231 असंख्य माणसे, जी सगळी तुझ्याबद्दल फक्त सकारात्मक विचार करत आहेत, 218 00:10:18,231 --> 00:10:19,828 तर तू जेव्हा ओलिंपिकला जाशील, 219 00:10:19,828 --> 00:10:23,405 आम्ही सगळे पेंग्विनचा सूट घालून तुझ्याबरोबर पोहत असू, 220 00:10:23,405 --> 00:10:25,709 आणि म्हणू, "पुढे जा, भक्ती, पुढे जा, पुढे जा." 221 00:10:25,733 --> 00:10:27,431 भक्ती : माझा खास पेंग्विन व्हाल? 222 00:10:27,455 --> 00:10:29,161 खान : मी आताच तुझा पेंग्विन आहे. 223 00:10:29,776 --> 00:10:32,645 तू जर शार्क वगैरे म्हणाली असतीस तर बरं झालं असतं, 224 00:10:32,669 --> 00:10:33,820 पण पेंग्विन - - 225 00:10:33,844 --> 00:10:36,452 भक्ती : माझा आवडता प्राणी ओर्का आहे, माझे ओर्का व्हा. 226 00:10:36,476 --> 00:10:37,698 ( टाळ्या ) 227 00:10:37,722 --> 00:10:39,366 खान : लेडीज अड जंटलमन, भक्ती. 228 00:10:39,390 --> 00:10:40,579 भक्ती : धन्यवाद. 229 00:10:40,603 --> 00:10:42,743 (टाळ्या)