1 00:00:02,420 --> 00:00:08,580 इंटरनेट: आयपी अॅड्रेसेस आणि डीएनएस 2 00:00:10,190 --> 00:00:13,940 हाय! माझं नाव पाओला. मी मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. 3 00:00:13,940 --> 00:00:20,130 चला, इंटरनेट कसं चालतं त्याबद्दल बोलूया. माझं काम नेटवर्क्स एकमेकांशी बोलू शकण्यावर 4 00:00:20,130 --> 00:00:26,489 अवलंबून असतं, पण 1970च्या दशकात, यासाठी कोणतीही स्टँडर्ड पद्धत नव्हती. 5 00:00:26,489 --> 00:00:32,668 विंट सर्फ आणि बॉब कान यांनी इंटरनेटवर्किंग प्रोटोकॉल तयार केल्यानंतरच 6 00:00:32,668 --> 00:00:38,559 हा संवाद शक्य झाला. या शोधामुळं आपण सध्या ज्याला इंटरनेट म्हणतो त्याची 7 00:00:38,559 --> 00:00:44,469 पायाभरणी झाली. इंटरनेट म्हणजे नेटवर्क्सचं नेटवर्क. यामध्ये सर्व जगातली कोट्यावधी 8 00:00:44,469 --> 00:00:51,230 डिव्हायसेस जोडलेली आहेत. त्यामुळे तुम्ही वायफायद्वारे लॅपटॉप किंवा फोनने जोडलेले असता, 9 00:00:51,230 --> 00:00:56,999 तेव्हा ते वायफाय कनेक्शन इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर (किंवा आयएसपीला जोडलेले असते), आणि तो 10 00:00:56,999 --> 00:01:01,600 आयएसपी एकमेकांना जोडलेल्या लक्षावधी नेटवर्क्सद्वारे तुम्हाला जगातील 11 00:01:01,600 --> 00:01:09,270 कोट्यावधी डिव्हायसेसना जोडतो. खूप लोकांच्या लक्षात एक गोष्ट येत नाही ती म्हणजे, 12 00:01:09,270 --> 00:01:15,640 इंटरनेट हे एक डिझाईन तत्त्वज्ञान आणि आर्कीटेक्चर आहे आणि ते प्रोटोकॉल्सच्या संचाद्वारे 13 00:01:15,640 --> 00:01:20,300 व्यक्त केलेलं आहे. प्रोटोकॉल म्हणजे नियम आणि स्टँडर्ड्सचा एक ठरलेला संच, जर सगळे पक्ष तो 14 00:01:20,300 --> 00:01:26,300 वापरण्यास तयार झाले तर तो त्यांना कोणत्याही त्रासाविना संवाद साधण्याची परवानगी देतो. इंटरनेट 15 00:01:26,300 --> 00:01:31,910 प्रत्यक्षात कसं काम करतं ते यापेक्षा कमी महत्त्वाचं आहे की या डिझाईन तत्त्वज्ञानामुळं 16 00:01:31,910 --> 00:01:37,710 इंटरनेट नवीन संवादाशी जुळवून घेऊ शकलेलं आहे आणि स्वीकारू शकलं आहे. कारण नवीन तंत्रज्ञानानं 17 00:01:37,710 --> 00:01:42,610 कोणत्यातरी प्रकारे इंटरनेट वापरण्यासाठी, कोणते प्रोटोकॉल्स वापरायचे एवढंच त्याला माहिती असावं 18 00:01:42,610 --> 00:01:49,140 लागतं. इंटरनेटवर सगळया वेगवेगळया डिव्हायसेसचे वेगवेगळे अॅड्रेसेस असतात. 19 00:01:49,140 --> 00:01:54,350 इंटरनेटवरचा अॅड्रेस म्हणजे फक्त एक नंबर असतो, फोन नंबर किंवा रस्त्याच्या पत्त्यासारखा, 20 00:01:54,350 --> 00:02:00,170 तो नेटवर्कला जोडलेल्या प्रत्येक कॉम्प्युटर किंवा डिव्हाईससाठी वेगळा असतो. बहुतेक सर्व घरे आणि 21 00:02:00,170 --> 00:02:04,690 व्यवसाय यांचा पत्ता असतो, तसंच हे आहे. एखाद्या व्यक्तीला पोस्टाने पत्र पाठवण्यासाठी तुम्हाला ती 22 00:02:04,690 --> 00:02:09,110 व्यक्ती माहीत असणं आवश्यक नाही, पण तुम्हाला त्यांचा पत्ता माहिती असणं आवश्यक आहे आणि 23 00:02:09,110 --> 00:02:14,190 पत्ता व्यवस्थित कसा लिहायचा ते माहिती पाहिजे म्हणजे ते पत्र पोस्टाद्वारे योग्य ठिकाणी पोचेल. 24 00:02:14,190 --> 00:02:19,870 कॉम्प्युटर्सवरची अॅड्रेसिंग सिस्टीम याच प्रकारची असते आणि ती इंटरनेट संप्रेषणासाठी वापरल्या 25 00:02:19,870 --> 00:02:25,340 जाणाऱ्या इंटरनेट प्रोटोकॉल किंव आयपी नावाच्या महत्त्वाच्या प्रोटोकॉलपैकी एक आहे. 26 00:02:25,340 --> 00:02:31,890 कॉम्प्युटरच्या अॅड्रेसला त्याचा आयपी अॅड्रेस म्हणतात. एखाद्या वेबसाईटला भेट देणे 27 00:02:31,900 --> 00:02:36,620 म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरनं दुसऱ्या कॉम्प्युटरला माहिती मागणं. तुमचा कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरच्या 28 00:02:36,620 --> 00:02:41,280 आयपी अॅड्रेसवर मेसेज पाठवतो आणि त्याचा मूळ पत्तासुद्धा पाठवतो. 29 00:02:41,280 --> 00:02:48,450 म्हणजे दुसऱ्या कॉम्प्युटरला प्रतिसाद कुठं पाठवायचा ते कळतं. तुम्ही आयपी अॅड्रेस पाहिलेला असेल. त्यात 30 00:02:48,450 --> 00:02:54,910 नुसत्या संख्या असतात. या संख्या एका श्रेणीमध्ये तयार केलेल्या असतात. घराच्या पत्त्यामध्ये देश, शहर, रस्ता 31 00:02:54,910 --> 00:03:02,270 आणि घर क्रमांक असतो, तसंच, आयपी अॅड्रेसमध्ये अनेक भाग असतात. सगळ्या डिजिटल डेटाप्रमाणे 32 00:03:02,270 --> 00:03:09,520 यातील प्रत्येक संख्या बीट्सने दर्शवली जाते. पारंपरिक आयपी अॅड्रेसमध्ये 32 बीट्स असतात, अॅड्रेसच्या 33 00:03:09,520 --> 00:03:16,470 प्रत्येक भागासाठी 8 बीट्स. सुरुवातीच्या संख्या सामान्यपणे देश आणि डिव्हाईसचं 34 00:03:16,470 --> 00:03:22,470 प्रादेशिक नेटवर्क दर्शवतात. नंतर येतं सबनेटवर्क, आणि शेवटी त्या विशिष्ट 35 00:03:22,470 --> 00:03:30,470 डिव्हाईसचा अॅड्रेस. आयपी अॅड्रेसिंगच्या या व्हर्जनला IPv4 म्हणतात. ते 1973 मध्ये 36 00:03:30,470 --> 00:03:36,050 डिझाईन केलं गेलं आणि 80 च्या दशकाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर वापरात आलं आणि इंटरनेटला 37 00:03:36,050 --> 00:03:41,420 जोडल्या जाणाऱ्या डिव्हायसेसना 400 कोटीपेक्षा जास्त वेगवेगळे अॅड्रेस देण्यात आले. पण इंटरनेट अगदी 38 00:03:41,420 --> 00:03:47,340 विंट सर्फ यांनी कल्पना केली होती त्यापेक्षासुद्धा खूप जास्त लोकप्रिय झालं आहे आणि 400 कोटी वेगवेगळे अॅड्रेस 39 00:03:47,340 --> 00:03:53,260 पुरेसे होणार नाहीत. आता आपण अधिक मोठे आयपी अॅड्रेस फॉरमॅट IPv6 साठी अनेक-वर्षे कराव्या 40 00:03:53,260 --> 00:04:03,660 लागणाऱ्या बदलाच्या स्थितीत आहोत. यामध्ये प्रत्येक अॅड्रेससाठी 128 बीट्स लागतात आणि ते 340 41 00:04:03,660 --> 00:04:08,780 अनडीझिलीअन वेगवेगळे अॅड्रेस पुरवते. जे पृथ्वीवरील वाळूच्या प्रत्येक कणाला आयपी अॅड्रेस द्यायचा असेल 42 00:04:08,780 --> 00:04:15,739 तरीसुद्धा पुरतील. बऱ्याचशा वापरकर्त्यांना इंटरनेट अॅड्रेस दिसत नाही किंवा ते त्याची फिकीर करत नाहीत. 43 00:04:15,739 --> 00:04:23,410 डोमेन नेम सिस्टीम किंवा डीएनएस www.example.com सारखी नावे अॅड्रेसशी जोडते. 44 00:04:23,410 --> 00:04:29,160 तुमचा कॉम्प्युटर डोमेन नेम्स शोधण्यासाठी डीएनएस वापरतो आणि संबंधित आयपी अॅड्रेस मिळवतो 45 00:04:29,160 --> 00:04:33,290 जो तुमच्या कॉम्प्युटरला इंटरनेटवरच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी वापरला जातो. आणि ते काहीसं 46 00:04:33,290 --> 00:04:38,050 अशाप्रकारे होतं: (आवाज 1) "ए हाय, मला www.code.org वर जायचंय." 47 00:04:38,050 --> 00:04:49,900 (आवाज 2) "अं..मला त्या डोमेनचा आयपी अॅड्रेस माहिती नाही. मला कोणालातरी विचारू दे. ए, 48 00:04:49,900 --> 00:04:59,100 तुला माहिती आहे का code.org ला कसं जायचं?" (आवाज 3) " हो, इथं आहे. 174.129.14.120 वर." 49 00:04:59,100 --> 00:05:04,500 (आवाज 2) "ठीक आहे, धन्यवाद, मी तो लिहून पुन्हा मला लागेल म्हणून सेव्ह करून ठेवणार आहे. 50 00:05:04,500 --> 00:05:14,040 हाच अॅड्रेस तुला हवा होता." (आवाज 1) "मस्त! धन्यवाद." 51 00:05:14,040 --> 00:05:20,120 कोट्यावधी डिव्हायसेसची प्रणाली ज्यातली एक वेबसाईट शोधायची आहे, ती आपण कशी डिझाईन 52 00:05:20,120 --> 00:05:27,889 करतो? एकच डीएनएस सर्व्हर सगळ्या डिव्हायसेसकडून येणाऱ्या विनंत्या हाताळू शकत नाही. 53 00:05:27,889 --> 00:05:33,000 याच उत्तर आहे डीएनएस सर्व्हर्स वितरीत श्रेणीमध्ये जोडलेले असतात, आणि त्यांचे विभाजन 54 00:05:33,000 --> 00:05:40,699 वेगवेगळ्या विभागात केलेले असते, त्यात .org, .com, .net अशा प्रमुख डोमेन्सची जबाबदारी विभागलेली 55 00:05:40,699 --> 00:05:48,030 असते. डीएनएस सुरुवातीला सरकार आणि शैक्षणिक संस्थांसाठी खुला आणि सार्वजनिक प्रोटोकॉल होता. 56 00:05:48,030 --> 00:05:55,370 खुलेपणामुळे डीएनएस सायबर हल्ल्यांना बळी पडू शकते. 57 00:05:55,370 --> 00:06:02,540 डीएनएसवरचा एक उदाहरणादाखलचा हल्ला म्हणजे डीएनएस स्पूफिंग. जेव्हा हॅकर डीएनएस सर्व्हरला प्रवेश 58 00:06:02,540 --> 00:06:09,479 करतो आणि ते बदलून त्याच डोमेन नावाला चुकीचा आयपी अॅड्रेस देतो. त्यामुळे हल्लेखोर लोकांना 59 00:06:09,479 --> 00:06:15,740 बनावट वेबसाईटवर पाठवतो. जर हे तुमच्याबाबतीत झाले तर तुम्ही अधिक समस्यांना बळी पडता. 60 00:06:15,740 --> 00:06:23,870 कारण तुम्ही एक बनावट वेबसाईट खरी असल्याप्रमाणे वापरत असता. इंटरनेट भव्य आहे आणि रोज 61 00:06:23,870 --> 00:06:30,790 अधिकाधिक वाढते आहे. पण डोमेन नेम प्रणाली आणि इंटरनेट प्रोटोकॉल अशा पद्धतीने डिझाईन करण्यात 62 00:06:30,790 --> 00:06:35,210 आलेले आहेत की इंटरनेट कितीही वाढलं तरी ते वाढवता येतात.