0:00:02.420,0:00:08.580 इंटरनेट: आयपी अॅड्रेसेस आणि डीएनएस 0:00:10.190,0:00:13.940 हाय! माझं नाव पाओला. मी मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. 0:00:13.940,0:00:20.130 चला, इंटरनेट कसं चालतं त्याबद्दल बोलूया. [br]माझं काम नेटवर्क्स एकमेकांशी बोलू शकण्यावर 0:00:20.130,0:00:26.489 अवलंबून असतं, पण 1970च्या दशकात, यासाठी कोणतीही स्टँडर्ड पद्धत नव्हती. 0:00:26.489,0:00:32.668 विंट सर्फ आणि बॉब कान यांनी इंटरनेटवर्किंग[br]प्रोटोकॉल तयार केल्यानंतरच 0:00:32.668,0:00:38.559 हा संवाद शक्य झाला. या शोधामुळं आपण सध्या ज्याला इंटरनेट म्हणतो त्याची 0:00:38.559,0:00:44.469 पायाभरणी झाली. इंटरनेट म्हणजे नेटवर्क्सचं[br]नेटवर्क. यामध्ये सर्व जगातली कोट्यावधी 0:00:44.469,0:00:51.230 डिव्हायसेस जोडलेली आहेत. त्यामुळे तुम्ही वायफायद्वारे लॅपटॉप किंवा फोनने जोडलेले असता, 0:00:51.230,0:00:56.999 तेव्हा ते वायफाय कनेक्शन इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर (किंवा आयएसपीला जोडलेले असते), आणि तो 0:00:56.999,0:01:01.600 आयएसपी एकमेकांना जोडलेल्या लक्षावधी नेटवर्क्सद्वारे तुम्हाला जगातील 0:01:01.600,0:01:09.270 कोट्यावधी डिव्हायसेसना जोडतो. खूप लोकांच्या लक्षात एक गोष्ट येत नाही ती म्हणजे, 0:01:09.270,0:01:15.640 इंटरनेट हे एक डिझाईन तत्त्वज्ञान आणि आर्कीटेक्चर आहे आणि ते प्रोटोकॉल्सच्या संचाद्वारे 0:01:15.640,0:01:20.300 व्यक्त केलेलं आहे. प्रोटोकॉल म्हणजे नियम आणि स्टँडर्ड्सचा एक ठरलेला संच, जर सगळे पक्ष तो 0:01:20.300,0:01:26.300 वापरण्यास तयार झाले तर तो त्यांना कोणत्याही त्रासाविना संवाद साधण्याची परवानगी देतो. इंटरनेट 0:01:26.300,0:01:31.910 प्रत्यक्षात कसं काम करतं ते यापेक्षा कमी महत्त्वाचं आहे की या डिझाईन तत्त्वज्ञानामुळं 0:01:31.910,0:01:37.710 इंटरनेट नवीन संवादाशी जुळवून घेऊ शकलेलं आहे आणि स्वीकारू शकलं आहे. कारण नवीन तंत्रज्ञानानं 0:01:37.710,0:01:42.610 कोणत्यातरी प्रकारे इंटरनेट वापरण्यासाठी, कोणते प्रोटोकॉल्स वापरायचे एवढंच त्याला माहिती असावं 0:01:42.610,0:01:49.140 लागतं. इंटरनेटवर सगळया वेगवेगळया [br]डिव्हायसेसचे वेगवेगळे अॅड्रेसेस असतात. 0:01:49.140,0:01:54.350 इंटरनेटवरचा अॅड्रेस म्हणजे फक्त एक नंबर असतो, फोन नंबर किंवा रस्त्याच्या पत्त्यासारखा, 0:01:54.350,0:02:00.170 तो नेटवर्कला जोडलेल्या प्रत्येक कॉम्प्युटर किंवा डिव्हाईससाठी वेगळा असतो. बहुतेक सर्व घरे आणि 0:02:00.170,0:02:04.690 व्यवसाय यांचा पत्ता असतो, तसंच हे आहे. एखाद्या व्यक्तीला पोस्टाने पत्र पाठवण्यासाठी तुम्हाला ती 0:02:04.690,0:02:09.110 व्यक्ती माहीत असणं आवश्यक नाही, पण तुम्हाला त्यांचा पत्ता माहिती असणं आवश्यक आहे आणि 0:02:09.110,0:02:14.190 पत्ता व्यवस्थित कसा लिहायचा ते माहिती पाहिजे म्हणजे ते पत्र पोस्टाद्वारे योग्य ठिकाणी पोचेल. 0:02:14.190,0:02:19.870 कॉम्प्युटर्सवरची अॅड्रेसिंग सिस्टीम याच प्रकारची असते आणि ती इंटरनेट संप्रेषणासाठी वापरल्या 0:02:19.870,0:02:25.340 जाणाऱ्या इंटरनेट प्रोटोकॉल किंव आयपी नावाच्या महत्त्वाच्या प्रोटोकॉलपैकी एक आहे. 0:02:25.340,0:02:31.890 कॉम्प्युटरच्या अॅड्रेसला त्याचा आयपी अॅड्रेस म्हणतात. एखाद्या वेबसाईटला भेट देणे 0:02:31.900,0:02:36.620 म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरनं दुसऱ्या कॉम्प्युटरला माहिती मागणं. तुमचा कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरच्या 0:02:36.620,0:02:41.280 आयपी अॅड्रेसवर मेसेज पाठवतो आणि त्याचा मूळ पत्तासुद्धा पाठवतो. 0:02:41.280,0:02:48.450 म्हणजे दुसऱ्या कॉम्प्युटरला प्रतिसाद कुठं पाठवायचा ते कळतं. तुम्ही आयपी अॅड्रेस पाहिलेला असेल. त्यात 0:02:48.450,0:02:54.910 नुसत्या संख्या असतात. या संख्या एका श्रेणीमध्ये तयार केलेल्या असतात. घराच्या पत्त्यामध्ये देश, शहर, रस्ता 0:02:54.910,0:03:02.270 आणि घर क्रमांक असतो, तसंच, आयपी अॅड्रेसमध्ये अनेक भाग असतात. सगळ्या डिजिटल डेटाप्रमाणे 0:03:02.270,0:03:09.520 यातील प्रत्येक संख्या बीट्सने दर्शवली जाते. पारंपरिक आयपी अॅड्रेसमध्ये 32 बीट्स असतात, अॅड्रेसच्या 0:03:09.520,0:03:16.470 प्रत्येक भागासाठी 8 बीट्स. सुरुवातीच्या संख्या[br]सामान्यपणे देश आणि डिव्हाईसचं 0:03:16.470,0:03:22.470 प्रादेशिक नेटवर्क दर्शवतात. नंतर येतं सबनेटवर्क,[br]आणि शेवटी त्या विशिष्ट 0:03:22.470,0:03:30.470 डिव्हाईसचा अॅड्रेस. आयपी अॅड्रेसिंगच्या[br]या व्हर्जनला IPv4 म्हणतात. ते 1973 मध्ये 0:03:30.470,0:03:36.050 डिझाईन केलं गेलं आणि 80 च्या दशकाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर वापरात आलं आणि इंटरनेटला 0:03:36.050,0:03:41.420 जोडल्या जाणाऱ्या डिव्हायसेसना 400 कोटीपेक्षा जास्त वेगवेगळे अॅड्रेस देण्यात आले. पण इंटरनेट अगदी 0:03:41.420,0:03:47.340 विंट सर्फ यांनी कल्पना केली होती त्यापेक्षासुद्धा खूप जास्त लोकप्रिय झालं आहे आणि 400 कोटी वेगवेगळे अॅड्रेस 0:03:47.340,0:03:53.260 पुरेसे होणार नाहीत. आता आपण अधिक मोठे आयपी अॅड्रेस फॉरमॅट IPv6 साठी अनेक-वर्षे कराव्या 0:03:53.260,0:04:03.660 लागणाऱ्या बदलाच्या स्थितीत आहोत. यामध्ये प्रत्येक अॅड्रेससाठी 128 बीट्स लागतात आणि ते 340 0:04:03.660,0:04:08.780 अनडीझिलीअन वेगवेगळे अॅड्रेस पुरवते. जे पृथ्वीवरील वाळूच्या प्रत्येक कणाला आयपी अॅड्रेस द्यायचा असेल 0:04:08.780,0:04:15.739 तरीसुद्धा पुरतील. बऱ्याचशा वापरकर्त्यांना इंटरनेट अॅड्रेस दिसत नाही किंवा ते त्याची फिकीर करत नाहीत. 0:04:15.739,0:04:23.410 डोमेन नेम सिस्टीम किंवा डीएनएस [br]www.example.com सारखी नावे अॅड्रेसशी जोडते. 0:04:23.410,0:04:29.160 तुमचा कॉम्प्युटर डोमेन नेम्स शोधण्यासाठी डीएनएस वापरतो आणि संबंधित आयपी अॅड्रेस मिळवतो 0:04:29.160,0:04:33.290 जो तुमच्या कॉम्प्युटरला इंटरनेटवरच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी वापरला जातो. आणि ते काहीसं 0:04:33.290,0:04:38.050 अशाप्रकारे होतं: (आवाज 1) "ए हाय, मला www.code.org वर जायचंय." 0:04:38.050,0:04:49.900 (आवाज 2) "अं..मला त्या डोमेनचा आयपी अॅड्रेस माहिती नाही. मला कोणालातरी विचारू दे. ए, 0:04:49.900,0:04:59.100 तुला माहिती आहे का code.org ला कसं जायचं?" (आवाज 3) " हो, इथं आहे. 174.129.14.120 वर." 0:04:59.100,0:05:04.500 (आवाज 2) "ठीक आहे, धन्यवाद, मी तो लिहून पुन्हा मला लागेल म्हणून सेव्ह करून ठेवणार आहे. 0:05:04.500,0:05:14.040 हाच अॅड्रेस तुला हवा होता." (आवाज 1) "मस्त! धन्यवाद." 0:05:14.040,0:05:20.120 कोट्यावधी डिव्हायसेसची प्रणाली ज्यातली एक वेबसाईट शोधायची आहे, ती आपण कशी डिझाईन 0:05:20.120,0:05:27.889 करतो? एकच डीएनएस सर्व्हर सगळ्या डिव्हायसेसकडून येणाऱ्या विनंत्या हाताळू शकत नाही. 0:05:27.889,0:05:33.000 याच उत्तर आहे डीएनएस सर्व्हर्स वितरीत श्रेणीमध्ये जोडलेले असतात, आणि त्यांचे विभाजन 0:05:33.000,0:05:40.699 वेगवेगळ्या विभागात केलेले असते, त्यात .org, .com, .net अशा प्रमुख डोमेन्सची जबाबदारी विभागलेली 0:05:40.699,0:05:48.030 असते. डीएनएस सुरुवातीला सरकार आणि शैक्षणिक संस्थांसाठी खुला आणि सार्वजनिक प्रोटोकॉल होता. 0:05:48.030,0:05:55.370 खुलेपणामुळे डीएनएस सायबर हल्ल्यांना बळी पडू शकते. 0:05:55.370,0:06:02.540 डीएनएसवरचा एक उदाहरणादाखलचा हल्ला म्हणजे डीएनएस स्पूफिंग. जेव्हा हॅकर डीएनएस सर्व्हरला प्रवेश 0:06:02.540,0:06:09.479 करतो आणि ते बदलून त्याच डोमेन नावाला चुकीचा आयपी अॅड्रेस देतो. त्यामुळे हल्लेखोर लोकांना 0:06:09.479,0:06:15.740 बनावट वेबसाईटवर पाठवतो. जर हे तुमच्याबाबतीत झाले तर तुम्ही अधिक समस्यांना बळी पडता. 0:06:15.740,0:06:23.870 कारण तुम्ही एक बनावट वेबसाईट खरी असल्याप्रमाणे वापरत असता. इंटरनेट भव्य आहे आणि रोज 0:06:23.870,0:06:30.790 अधिकाधिक वाढते आहे. पण डोमेन नेम प्रणाली आणि इंटरनेट प्रोटोकॉल अशा पद्धतीने डिझाईन करण्यात 0:06:30.790,0:06:35.210 आलेले आहेत की इंटरनेट कितीही वाढलं तरी ते वाढवता येतात.