WEBVTT 00:00:01.357 --> 00:00:02.928 बराच काळ 00:00:02.952 --> 00:00:06.086 मला दोन रहस्यं सतावत होती. 00:00:06.689 --> 00:00:08.950 त्यांचा उलगडा होत नव्हता. 00:00:08.974 --> 00:00:11.877 खरं तर, मला खोलात जाऊन ती सोडवायची फार भीती वाटत होती. 00:00:12.349 --> 00:00:15.896 पहिलं रहस्य सांगतो. आजवरच्या माझ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात 00:00:15.920 --> 00:00:18.991 मी पाहतो आहे, की इंग्लंड, अमेरिका 00:00:19.015 --> 00:00:22.371 आणि इतर पाश्चात्य देशांमध्ये 00:00:22.395 --> 00:00:25.085 गंभीर स्वरूपाचे नैराश्य आणि चिंताविकार 00:00:25.109 --> 00:00:26.863 दरवर्षी वाढत चालले आहेत. 00:00:27.173 --> 00:00:30.101 यामागचं कारण मला जाणून घ्यायचं होतं. 00:00:31.108 --> 00:00:32.975 हे विकार आपल्याला का जडताहेत? 00:00:33.394 --> 00:00:36.036 रोजचा दिनक्रम पार पाडणं अशक्य वाटणाऱ्यांची 00:00:36.060 --> 00:00:39.314 संख्या दरवर्षी वाढत का जाते आहे? 00:00:39.743 --> 00:00:43.300 हे समजून घेण्याची इच्छा मला वाटली, यामागे एक खाजगी रहस्य आहे. NOTE Paragraph 00:00:43.324 --> 00:00:44.713 मला आठवतं, तरुणपणी मी 00:00:44.737 --> 00:00:46.158 डॉक्टरांना म्हणालो होतो, 00:00:46.182 --> 00:00:50.667 "मला वाटतं, की माझ्या अंगातून जणु वेदना वाहते आहे. 00:00:51.237 --> 00:00:52.633 तिच्यावर माझं नियंत्रण नाही. 00:00:52.657 --> 00:00:54.942 तिच्यामागचं कारण मला ठाऊक नाही. 00:00:54.966 --> 00:00:57.021 मला या वेदनेची खूप शरम वाटते आहे." 00:00:57.045 --> 00:00:58.641 डॉक्टरांनी मला एक गोष्ट सांगितली. 00:00:58.665 --> 00:01:00.678 त्यांचा हेतू चांगलाच होता. 00:01:00.702 --> 00:01:02.394 त्यांनी सगळं फार सोपं करून टाकलं. 00:01:02.418 --> 00:01:03.586 ते पूर्ण चुकीचं नव्हतं. 00:01:03.610 --> 00:01:06.402 ते म्हणाले, "यामागची कारणं वैद्यकशास्त्राला ठाऊक आहेत. 00:01:06.426 --> 00:01:10.658 काही लोकांच्या डोक्यात निसर्गतःच रासायनिक असंतुलन असतं. 00:01:10.682 --> 00:01:12.103 तू त्यापैकीच एक. 00:01:12.127 --> 00:01:14.111 आता इतकंच करायचं, काही औषधं घ्यायची. 00:01:14.135 --> 00:01:16.499 त्यामुळे तुझं रासायनिक संतुलन ठीक होईल." NOTE Paragraph 00:01:16.523 --> 00:01:18.933 मग मी पॅक्सील किंवा सेरोक्साट घेऊ लागलो. 00:01:18.957 --> 00:01:21.983 ही एकाच औषधाची निरनिराळ्या देशातली नावं. 00:01:22.007 --> 00:01:24.490 मला बरं वाटू लागलं. मोठा आधार मिळाला. 00:01:24.514 --> 00:01:25.925 पण थोड्याच दिवसांत 00:01:25.949 --> 00:01:27.950 वेदना परत जाणवू लागली. 00:01:27.974 --> 00:01:29.802 म्हणून औषधाची मात्रा वाढवण्यात आली. 00:01:29.826 --> 00:01:33.037 तेरा वर्षं, मी जितकी मोठ्यात मोठी मात्रा घेणं शक्य आहे, 00:01:33.061 --> 00:01:35.077 तितकी घेत होतो. 00:01:35.402 --> 00:01:38.871 यापैकी बराचसा काळ, आणि नंतरही 00:01:38.895 --> 00:01:40.395 वेदना होतच होत्या. 00:01:40.419 --> 00:01:43.395 मग मी स्वतःला विचारू लागलो, "हे असं का? 00:01:43.419 --> 00:01:44.961 आजच्या संस्कृतीच्या समजानुसार 00:01:44.985 --> 00:01:48.125 मला जे सांगण्यात आलं, ते सर्व मी केलं आहे. 00:01:48.149 --> 00:01:50.268 तरीही हा त्रास का?" NOTE Paragraph 00:01:50.292 --> 00:01:53.164 या दोन रहस्यांचा शोध घेण्यासाठी आणि पुस्तकलेखनासाठी 00:01:53.188 --> 00:01:54.596 माहिती मिळवण्यासाठी 00:01:54.620 --> 00:01:57.125 मी जगभर फिरलो. 00:01:57.149 --> 00:01:58.568 चाळीस हजार मैल प्रवास केला. 00:01:58.592 --> 00:02:01.085 मला जगातल्या मोठमोठ्या तज्ज्ञांना विचारायचं होतं, 00:02:01.109 --> 00:02:03.276 नैराश्य आणि चिंताविकार कशामुळे होतात? 00:02:03.300 --> 00:02:05.172 या विकारांवर मात कशी करायची? 00:02:05.196 --> 00:02:07.820 या विकारांचा सामना करून त्यातून मुक्त झालेल्या 00:02:07.844 --> 00:02:09.956 लोकांनाही भेटायचं होतं. 00:02:09.980 --> 00:02:11.466 या प्रवासात भेटलेल्या 00:02:11.490 --> 00:02:14.045 विलक्षण लोकांकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. NOTE Paragraph 00:02:14.069 --> 00:02:17.045 मला सर्वात महत्त्वाचं समजलं ते असं: 00:02:17.069 --> 00:02:20.104 नैराश्य आणि चिंताविकार यांची नऊ वेगवेगळी कारणं आहेत. 00:02:20.128 --> 00:02:23.835 त्यांचे शास्त्रीय पुरावे आहेत. 00:02:23.859 --> 00:02:26.668 त्यापैकी दोन जीवशास्त्रीय आहेत. 00:02:26.692 --> 00:02:29.375 या विकारांना बळी पडण्याचं प्रमाण जनुकांवर अवलंबून असतं. 00:02:29.399 --> 00:02:31.333 पण जनुकं आपलं भविष्य ठरवत नाहीत. 00:02:31.357 --> 00:02:34.968 तसंच, नैराश्यामुळे मेंदूत घडून येणाऱ्या जीवशास्त्रीय बदलांमुळे 00:02:34.992 --> 00:02:36.690 त्यातून बाहेर पडणं कठीण होतं. 00:02:36.714 --> 00:02:38.896 पण या विकारांची कारणं 00:02:38.920 --> 00:02:40.761 म्हणून सिद्ध झालेल्या बऱ्याचशा घटकांचा 00:02:40.785 --> 00:02:42.550 आपल्या जैविकतेशी संबंध नसतो. 00:02:43.520 --> 00:02:45.734 त्यांचा संबंध असतो, आपल्या जीवनशैलीशी. 00:02:46.116 --> 00:02:47.607 हे घटक समजून घेतल्यावर 00:02:47.631 --> 00:02:50.727 सापडणारे निराळे उपाय, 00:02:50.751 --> 00:02:52.299 रासायनिक नैराश्यरोधकांसमवेत 00:02:52.323 --> 00:02:55.260 सुचवले गेले पाहिजेत. NOTE Paragraph 00:02:55.284 --> 00:02:57.077 उदाहरणार्थ, 00:02:57.101 --> 00:03:00.549 तुम्हांला एकटेपणा वाटत असेल, तर पुढे नैराश्य येण्याची शक्यता वाढते. 00:03:00.573 --> 00:03:03.684 व्यवसायाच्या ठिकाणी कामावर तुमचं नियंत्रण नसेल, 00:03:03.708 --> 00:03:05.604 सांगितलेलं काम निमूट करावं लागत असेल, 00:03:05.628 --> 00:03:07.517 तर नैराश्याची शक्यता वाढते. 00:03:07.541 --> 00:03:10.025 तुम्ही बाहेर खुल्या निसर्गात फारसे जात नसाल, 00:03:10.049 --> 00:03:11.918 तर नैराश्याची शक्यता वाढते. NOTE Paragraph 00:03:11.942 --> 00:03:15.053 आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. या विकारांमागच्या 00:03:15.077 --> 00:03:16.252 अनेक कारणांचा मिलाफ 00:03:16.276 --> 00:03:18.339 त्या गोष्टीत दिसून येतो. 00:03:18.363 --> 00:03:20.029 आपण सर्व जाणताच, की 00:03:20.053 --> 00:03:22.712 प्रत्येकाला नैसर्गिक गरजा असतात. बरोबर? 00:03:22.736 --> 00:03:23.910 हो, अगदी खरं. 00:03:23.934 --> 00:03:26.513 अन्न, पाणी. 00:03:26.537 --> 00:03:28.767 निवारा, स्वच्छ हवा. 00:03:28.791 --> 00:03:30.585 या गोष्टी काढून घेतल्या, 00:03:30.609 --> 00:03:32.902 तर आपले हाल होतील. 00:03:32.926 --> 00:03:34.728 त्याचबरोबर 00:03:34.752 --> 00:03:38.123 प्रत्येक माणसाला नैसर्गिकपणे मानसिक गरजा असतात. 00:03:38.147 --> 00:03:40.186 समाजाशी जोडलेलं असणं, ही गरज असते. 00:03:40.210 --> 00:03:43.274 आयुष्याला अर्थ आणि हेतू असणं, ही गरज असते. 00:03:43.298 --> 00:03:45.829 लोक आपल्याला ओळखतात, मानतात ही भावना गरजेची असते. 00:03:45.853 --> 00:03:48.410 आपलं भविष्य उज्वल आहे असं वाटणं, ही गरज असते. 00:03:48.434 --> 00:03:51.482 आजच्या आपल्या संस्कृतीत अनेक चांगल्या गोष्टी आहेत. 00:03:51.506 --> 00:03:53.666 अनेक गोष्टी भूतकाळापेक्षा चांगल्या आहेत. 00:03:53.690 --> 00:03:55.011 या काळात जन्म होणं सुखाचं. 00:03:55.035 --> 00:03:56.999 पण मूलभूत गंभीर मानसिक गरजा भागवण्याची 00:03:57.023 --> 00:04:01.124 आपली क्षमता मात्र कमी कमी होत चालली आहे. 00:04:01.895 --> 00:04:03.998 मानसिक विकारांचं प्रमाण वाढण्यामागचं 00:04:04.022 --> 00:04:08.069 हे एकमेव नसलं, तरी सर्वात महत्त्वाचं कारण आहे. 00:04:08.919 --> 00:04:12.149 हे समजून घेणं मला फार कठीण गेलं. 00:04:12.173 --> 00:04:14.879 मला माझ्या विचारांशी द्वंद्व करावं लागलं, 00:04:14.903 --> 00:04:19.309 नैराश्य मेंदूत असतं हा विचार बदलून, 00:04:19.333 --> 00:04:20.500 आपल्या जीवनशैलीसारखी 00:04:20.524 --> 00:04:22.585 अनेक कारणं त्यामागे असतात हे समजण्यासाठी. NOTE Paragraph 00:04:22.609 --> 00:04:24.974 हे मला नीटपणे कधी समजलं? 00:04:24.998 --> 00:04:28.141 दक्षिण आफ्रिकेतल्या डॉ. डेरेक समरफील्ड नावाच्या मनोविकारतज्ज्ञांची 00:04:28.165 --> 00:04:29.966 मुलाखत घ्यायला गेलो, त्यावेळी. 00:04:29.990 --> 00:04:31.141 ही एक थोर व्यक्ती आहे. 00:04:31.165 --> 00:04:34.879 २००१ साली डॉ. समरफील्ड कंबोडियात होते. 00:04:34.903 --> 00:04:38.196 त्या वर्षी कंबोडियात प्रथमच रासायनिक नैराश्यरोधक औषधं 00:04:38.220 --> 00:04:39.952 उपलब्ध झाली होती. 00:04:39.976 --> 00:04:43.273 तिथल्या डॉक्टरांना ती ठाऊक नव्हती. त्यांनी विचारलं, 00:04:43.297 --> 00:04:44.888 "ही कसली औषधं?" मग डॉ. समरफील्डनी 00:04:44.912 --> 00:04:46.126 त्याविषयी माहिती दिली. 00:04:46.150 --> 00:04:47.682 यावर ते डॉक्टर्स म्हणाले, 00:04:47.706 --> 00:04:50.403 "यांची आम्हांला गरज नाही. आमच्याकडे नैराश्यरोधक आहेत." 00:04:50.427 --> 00:04:52.164 डॉ. समरफील्डनी विचारलं, "म्हणजे?" 00:04:52.188 --> 00:04:55.427 त्यांना वाटलं, आता हे निसर्गोपचाराविषयी सांगतील. 00:04:55.451 --> 00:04:59.223 सेंट जॉन्स वॉर्ट, जिंगको बिलोबा वगैरे. 00:04:59.910 --> 00:05:02.299 पण त्याऐवजी त्यांनी एक गोष्ट सांगितली. NOTE Paragraph 00:05:02.800 --> 00:05:06.379 त्यांच्या गावात एक शेतकरी होता. तो भातशेती करत असे. 00:05:06.403 --> 00:05:08.173 एके दिवशी त्याचा पाय पडला, तो नेमका 00:05:08.197 --> 00:05:10.387 युद्धकाळात मातीत पेरलेल्या स्फोटकावर. 00:05:10.411 --> 00:05:11.823 स्फोटामुळे त्याने पाय गमावला. 00:05:11.847 --> 00:05:13.283 कृत्रिम पाय बसवल्यानंतर 00:05:13.307 --> 00:05:16.078 काही काळाने तो पुन्हा भाताच्या शेतात काम करू लागला. 00:05:16.102 --> 00:05:18.634 पण कृत्रिम पाय सतत पाण्याखाली ठेवून काम करणं 00:05:18.658 --> 00:05:20.332 फार वेदनादायक असतं. 00:05:20.356 --> 00:05:22.276 मला वाटतं, जिथे स्फोट झाला, 00:05:22.300 --> 00:05:24.879 तिथेच पुन्हा जाऊन काम करणंही त्याला कठीण गेलं असावं. 00:05:24.903 --> 00:05:27.306 त्याला दिवसभर रडणं अनावर होऊ लागलं. 00:05:27.330 --> 00:05:28.759 बिछान्यातून उठावंसं वाटेना. 00:05:28.783 --> 00:05:31.666 नैराश्याची सर्व लक्षणं दिसू लागली. 00:05:32.013 --> 00:05:33.378 कंबोडियन डॉक्टर म्हणाले, 00:05:33.402 --> 00:05:35.688 "मग आम्ही त्याला नैराश्यरोधक दिलं." 00:05:35.712 --> 00:05:38.347 डॉ. समरफील्डनी विचारलं, "कोणतं?" 00:05:38.371 --> 00:05:41.180 ते डॉक्टर्स त्याला भेटायला गेले होते. त्याच्याजवळ बसून 00:05:41.982 --> 00:05:43.382 त्यांनी त्याचं म्हणणं ऐकलं. 00:05:44.464 --> 00:05:47.011 त्यांना त्याच्या वेदनेमागचा अर्थ समजला. 00:05:47.035 --> 00:05:49.956 नैराश्याच्या गर्तेत त्याला स्वतःला ते समजणं कठीण होतं, 00:05:49.980 --> 00:05:53.640 पण त्यामागची कारणं त्याच्या आयुष्यात फार महत्त्वाची होती. 00:05:53.966 --> 00:05:57.164 गावातल्या इतर लोकांशी बोलताना त्यापैकी एका डॉक्टरांना सुचलं, 00:05:57.188 --> 00:05:59.125 "आपण याला एक गाय दिली, 00:05:59.149 --> 00:06:01.149 तर तो दुधाचा व्यवसाय करू शकेल. 00:06:01.173 --> 00:06:04.268 मग त्याला भाताच्या शेतात जाऊन 00:06:04.292 --> 00:06:06.799 ते त्रासदायक काम करावं लागणार नाही." 00:06:06.823 --> 00:06:08.022 त्याला गाय देण्यात आली. 00:06:08.046 --> 00:06:10.226 दोन आठवड्यांत त्याचं रडणं थांबलं. 00:06:10.250 --> 00:06:12.162 महिन्याभरात तो नैराश्यातून बाहेर आला. 00:06:12.186 --> 00:06:13.765 डॉ. समरफील्ड, 00:06:13.789 --> 00:06:16.559 ही गाय म्हणजे नैराश्यरोधक, 00:06:16.583 --> 00:06:18.050 हो ना? NOTE Paragraph 00:06:18.074 --> 00:06:19.225 (हशा) NOTE Paragraph 00:06:19.249 --> 00:06:22.302 (टाळ्या) NOTE Paragraph 00:06:22.326 --> 00:06:25.199 लहानपणापासून नैराश्याबद्दल माझी जी समजूत आहे, 00:06:25.223 --> 00:06:26.835 तीच तुमचीही असेल, तर 00:06:26.859 --> 00:06:28.533 तुम्हांला हा एक बाष्कळ विनोद वाटेल. 00:06:28.557 --> 00:06:30.581 "नैराश्यरोधक घ्यावं म्हणून गेलो, आणि 00:06:30.605 --> 00:06:31.771 डॉक्टरांनी गाय दिली." 00:06:31.795 --> 00:06:34.822 विज्ञानाशी संबंध नसलेल्या या प्रसंगावरून 00:06:34.846 --> 00:06:37.823 कंबोडियन डॉक्टरांनी ही अटकळ बांधली. 00:06:37.847 --> 00:06:41.132 गेली कित्येक वर्षं 00:06:41.156 --> 00:06:43.243 जागतिक आरोग्य संस्था (WHO) 00:06:43.267 --> 00:06:45.457 नेमकं हेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे. 00:06:45.481 --> 00:06:47.973 तेही उत्कृष्ठ शास्त्रीय पुरावे देऊन. NOTE Paragraph 00:06:48.576 --> 00:06:50.505 नैराश्य येणं, 00:06:50.529 --> 00:06:51.906 किंवा अति चिंता वाटणं 00:06:53.008 --> 00:06:56.268 म्हणजे दुबळेपणा किंवा वेड लागणं नव्हे. 00:06:56.292 --> 00:06:59.877 किंवा यंत्रासारखे तुमचे काही भाग बिघडलेत, असंही नव्हे. 00:07:00.950 --> 00:07:03.484 एक माणूस म्हणून तुमच्या काही गरजा अपूर्ण आहेत, इतकंच. 00:07:03.919 --> 00:07:07.459 कंबोडियन डॉक्टर आणि जागतिक आरोग्य संस्था 00:07:07.483 --> 00:07:09.800 काय सांगत नाहीत, तेही पाहणं इथे महत्त्वाचं आहे. 00:07:09.824 --> 00:07:11.356 ते असं नाही म्हणाले, 00:07:11.380 --> 00:07:14.181 "मित्रा, अरे जरा भानावर ये. 00:07:14.205 --> 00:07:17.472 तुझा प्रश्न तूच समजून घे, आणि तूच सोडव." 00:07:17.851 --> 00:07:19.843 उलट ते असं म्हणाले, की 00:07:19.867 --> 00:07:23.391 "आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. आपण सर्वजण मिळून 00:07:23.415 --> 00:07:27.827 हा प्रश्न समजून घेऊ आणि सोडवू." 00:07:28.543 --> 00:07:32.559 प्रत्येक नैराश्यग्रस्त व्यक्तीची ही गरज असते, 00:07:32.583 --> 00:07:35.828 ती पूर्ण व्हायला हवी. NOTE Paragraph 00:07:35.852 --> 00:07:38.839 म्हणूनच, २०१७ साली जागतिक आरोग्य दिनाच्या निवेदनात 00:07:38.863 --> 00:07:41.181 संयुक्त राष्ट्रसंघाचे 00:07:41.205 --> 00:07:42.696 एक प्रमुख डॉक्टर म्हणाले, 00:07:42.720 --> 00:07:45.537 "आपण रासायनिक असंतुलनाविषयी बोलणं कमी करून, 00:07:45.561 --> 00:07:48.618 त्याऐवजी जीवनशैलीतल्या असंतुलनाविषयी बोलायला हवं." 00:07:48.920 --> 00:07:50.893 औषधांमुळे काही लोकांना खरोखरच बरं वाटतं. 00:07:50.917 --> 00:07:53.047 मलाही काही काळ बरं वाटलं होतं. 00:07:53.071 --> 00:07:57.498 पण जीवशास्त्रापेक्षा खोल जाणाऱ्या 00:07:57.522 --> 00:08:00.577 या समस्येवरचा उपायही तितकाच खोलवर जाणारा हवा. NOTE Paragraph 00:08:00.601 --> 00:08:03.188 हे जेव्हा मी प्रथम ऐकलं, 00:08:03.212 --> 00:08:04.895 त्यावेळी मला वाटलं होतं, 00:08:04.919 --> 00:08:07.045 "मी शास्त्रीय पुरावे पाहिले आहेत. 00:08:07.069 --> 00:08:08.641 पुष्कळ संशोधनं वाचली आहेत. 00:08:08.665 --> 00:08:11.971 या विषयातल्या तज्ज्ञांशी बोललो आहे." 00:08:11.995 --> 00:08:14.381 आणि तरीही मला समजत नव्हतं, "हे करायचं कसं?" 00:08:14.405 --> 00:08:16.318 आपल्या नैराश्याची कारणं बरेचदा 00:08:16.342 --> 00:08:18.833 त्या कंबोडियन शेतकऱ्याच्या गोष्टीपेक्षा 00:08:18.857 --> 00:08:20.154 जास्त गुंतागुंतीची असतात. 00:08:20.178 --> 00:08:22.812 ती समजून घेण्याची सुरुवात तरी कुठून करावी? NOTE Paragraph 00:08:22.836 --> 00:08:26.085 पुस्तक लिहिण्यासाठी म्हणून 00:08:26.109 --> 00:08:27.680 मी जगभर फिरलो, 00:08:27.704 --> 00:08:30.299 तेव्हा हे समजून घेणारे लोक मला भेटत गेले. 00:08:30.323 --> 00:08:32.775 सिडनी पासून सॅन फ्रान्सिस्को 00:08:32.799 --> 00:08:33.971 आणि साओ पावलो पर्यंत. 00:08:33.995 --> 00:08:36.061 हे लोक नैराश्य आणि चिंताविकाराची 00:08:36.085 --> 00:08:38.432 सखोल कारणं समजून घेत होते 00:08:38.456 --> 00:08:40.871 आणि आपल्या समूहाद्वारे त्यावर उपाय करत होते. 00:08:40.895 --> 00:08:43.576 मला भेटलेल्या सर्वच लोकांबद्दल 00:08:43.600 --> 00:08:45.076 मी इथे सांगू शकत नाही. 00:08:45.100 --> 00:08:48.553 किंवा त्या नऊ कारणांबद्दलही इथे बोलू शकत नाही. 00:08:48.577 --> 00:08:51.059 कारण १० तासांचं TED व्याख्यान द्यायची परवानगी नाही. 00:08:51.083 --> 00:08:52.835 वाटल्यास आयोजकांजवळ तक्रार करा! NOTE Paragraph 00:08:52.859 --> 00:08:54.789 म्हणून मी त्यापैकी दोन कारणं 00:08:54.813 --> 00:08:58.226 आणि दोन उपाय सांगणार आहे. 00:08:58.578 --> 00:08:59.728 पहिलं: 00:09:00.285 --> 00:09:03.293 मानवी इतिहासात जास्त एकटेपणा आपल्याच पिढीला जाणवला आहे. 00:09:03.317 --> 00:09:06.150 नुकतंच एका पाहणीत अमेरिकन लोकांना विचारलं गेलं, 00:09:06.174 --> 00:09:09.324 "आपली कोणाशीच जवळीक उरलेली नाही, असं तुम्हांला वाटतं का?" 00:09:09.348 --> 00:09:12.999 यावर ३९ टक्के लोकांनी हे वर्णन आपल्याला लागू पडतं असं सांगितलं. 00:09:13.023 --> 00:09:14.387 "कोणाशीच जवळीक नाही." 00:09:14.411 --> 00:09:16.908 आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटेपणा मोजला असता, 00:09:16.932 --> 00:09:19.490 ब्रिटन आणि युरोप अमेरिकेच्या खालोखाल आहेत. 00:09:19.514 --> 00:09:21.299 इथे कोणाला उगाच अभिमान वाटायला नको! NOTE Paragraph 00:09:21.323 --> 00:09:22.331 (हशा) NOTE Paragraph 00:09:22.355 --> 00:09:24.244 या विषयातल्या एका तज्ज्ञांशी 00:09:24.268 --> 00:09:26.664 मी बराच काळ चर्चा केली. 00:09:26.688 --> 00:09:28.942 त्या थोर माणसाचं नाव, प्राध्यापक जॉन कासिओपो. 00:09:28.966 --> 00:09:30.117 ते शिकागोत राहत असत. 00:09:30.141 --> 00:09:32.964 त्यांच्या संशोधनाबद्दल मी पुष्कळ चिंतन केलं. 00:09:32.988 --> 00:09:35.293 प्राध्यापक कासिओपो विचारतात, 00:09:35.317 --> 00:09:36.967 "आपण अस्तित्वात आहोत, ते कशामुळे? 00:09:36.991 --> 00:09:38.944 आपण जिवंत का राहिलो आहोत?" 00:09:38.968 --> 00:09:41.174 यामागचं मुख्य कारण असं, की 00:09:41.198 --> 00:09:44.015 आफ्रिकेच्या सव्हाना प्रदेशातले आपले पूर्वज 00:09:44.039 --> 00:09:45.759 एका गोष्टीत खूप हुशार होते. 00:09:46.287 --> 00:09:49.577 भोवतालच्या वन्य श्वापदांपेक्षा ते आकाराने मोठे नव्हते, 00:09:49.601 --> 00:09:52.914 किंवा त्यांच्यापेक्षा जलद धावूही शकत नव्हते. 00:09:52.938 --> 00:09:55.652 पण ते जमाव करून एकत्र राहत होते, 00:09:55.676 --> 00:09:57.276 एकमेकांना साह्य करत होते. 00:09:57.300 --> 00:09:59.561 ही आपल्या मानवजातीची दैवी शक्ती आहे. 00:09:59.585 --> 00:10:00.990 आपण समूहात राहतो. 00:10:01.014 --> 00:10:03.490 मधमाशांची उत्क्रांती होऊन त्या पोळ्यात राहू लागल्या, 00:10:03.514 --> 00:10:05.746 तसा मनुष्यप्राणी जमातीत राहू लागला. 00:10:05.770 --> 00:10:09.580 या जमातींची मोडतोड करणारी 00:10:10.492 --> 00:10:11.959 आपलीच पहिली पिढी आहे. 00:10:12.484 --> 00:10:14.551 यामुळे आपलं जीवन उध्वस्त होत आहे. 00:10:15.048 --> 00:10:17.192 वास्तविक हे असं व्हायला नको. NOTE Paragraph 00:10:17.216 --> 00:10:19.850 माझ्या पुस्तकातली आणि माझ्या आयुष्यातलीही 00:10:19.874 --> 00:10:21.969 एक मोठी व्यक्ती आहे, सॅम एव्हरिंग्टन. 00:10:21.993 --> 00:10:24.731 लंडनच्या पूर्वेच्या एका गरीब वस्तीतले हे डॉक्टर. 00:10:24.755 --> 00:10:26.334 तिथे मी बराच काळ राहत होतो. 00:10:26.358 --> 00:10:28.045 सॅम फार अस्वस्थ होते. 00:10:28.069 --> 00:10:29.625 कारण त्यांचे अनेक रुग्ण 00:10:29.649 --> 00:10:32.093 भयंकर नैराश्य आणि चिंताविकाराने ग्रस्त होते. 00:10:32.117 --> 00:10:34.839 माझ्यासारखंच डॉ. सॅमना देखील वाटतं, की नैराश्यरोधकांमुळे 00:10:34.863 --> 00:10:37.085 काही लोकांना थोडं बरं वाटू शकतं. 00:10:37.109 --> 00:10:38.482 त्यांनी दोन गोष्टी पाहिल्या. 00:10:38.506 --> 00:10:42.061 एक, त्यांचे रुग्ण बराच काळ त्रस्त होते. 00:10:42.085 --> 00:10:45.823 यामागची कारणं स्पष्ट होती. उदाहरणार्थ, एकटेपणा. 00:10:45.847 --> 00:10:49.291 दोन, औषधांनी काही लोकांना थोड्या प्रमाणात बरं वाटत असलं, 00:10:49.315 --> 00:10:51.583 तरी अनेक वेळा औषधामुळे 00:10:51.607 --> 00:10:53.140 मूळ प्रश्न सुटत नव्हता. 00:10:53.871 --> 00:10:56.522 एके दिवशी, डॉ. सॅमनी एक नवीन उपाय वापरायचं ठरवलं. 00:10:56.546 --> 00:10:58.998 त्यांच्या दवाखान्यात एक महिला आली. 00:10:59.022 --> 00:11:00.489 तिचं नाव लिसा कनिंगहॅम. 00:11:00.513 --> 00:11:02.387 माझी तिच्याशी नंतर ओळख झाली. 00:11:02.411 --> 00:11:06.495 भयानक नैराश्य आणि चिंताविकारामुळे लिसा घरातून बाहेरच पडत नव्हती. 00:11:06.519 --> 00:11:07.669 तब्बल सात वर्षं. 00:11:08.898 --> 00:11:11.823 डॉ. सॅमनी तिला सांगितलं, "आम्ही तुला औषधं तर देऊच, 00:11:11.847 --> 00:11:13.677 पण त्याबरोबर 00:11:13.701 --> 00:11:16.498 तू आणखी काहीतरी करायचं आहेस. 00:11:16.522 --> 00:11:19.965 आठवड्यातून दोनदा इथे यायचं, 00:11:19.989 --> 00:11:22.767 आणि इतर रुग्णांशी बोलायचं. 00:11:22.791 --> 00:11:25.601 पण आपण किती दुर्दैवी, अशा प्रकारचं काही बोलायचं नाही. 00:11:25.625 --> 00:11:29.172 तर सगळ्यांनी मिळून काहीतरी अर्थपूर्ण काम शोधून ते करायचं. 00:11:29.196 --> 00:11:32.299 मग एकटेपणा वाटणार नाही, आयुष्याला अर्थ नाही असं वाटणार नाही." NOTE Paragraph 00:11:32.323 --> 00:11:35.098 त्या रुग्णांना लिसा जेव्हा प्रथम भेटली, 00:11:35.122 --> 00:11:37.378 तेव्हा तो ताण असह्य होऊन 00:11:37.402 --> 00:11:39.323 तिला वांत्या होऊ लागल्या. 00:11:39.347 --> 00:11:41.981 तेव्हा इतरांनी तिला सावरलं. चर्चा सुरु झाली. 00:11:42.005 --> 00:11:43.680 "आपण एकत्र येऊन काय करू शकतो?" 00:11:43.704 --> 00:11:45.998 हे रुग्ण माझ्यासारखे, लंडनच्या आतल्या भागातले. 00:11:46.022 --> 00:11:48.070 त्यांना बागकामाची काहीच माहिती नव्हती. 00:11:48.094 --> 00:11:50.339 "आपण बागकाम शिकूया का?" 00:11:50.363 --> 00:11:52.529 दवाखान्याच्या मागेच 00:11:52.553 --> 00:11:53.704 पडीक जागा होती. 00:11:53.728 --> 00:11:55.610 "इथे बाग करूया का?" 00:11:55.634 --> 00:11:57.809 त्यांनी लायब्ररीतून पुस्तकं आणली. 00:11:57.833 --> 00:11:59.318 You Tube वर धडे घेतले. 00:11:59.342 --> 00:12:01.501 मातीत हात मळवून घेतले. 00:12:01.844 --> 00:12:04.887 ऋतुचक्र समजून घ्यायला सुरुवात केली. 00:12:04.911 --> 00:12:06.241 अनेक पुराव्यांनुसार, 00:12:06.265 --> 00:12:07.894 निसर्गाशी जवळीक करणं 00:12:07.918 --> 00:12:09.894 हा नैराश्यावर एक चांगला उपाय आहे. 00:12:09.918 --> 00:12:12.927 पण हा गट त्याहीपेक्षा जास्त काही करत होता. 00:12:13.347 --> 00:12:15.377 त्यांनी एक जमात तयार केली. 00:12:15.401 --> 00:12:17.212 एक समूह तयार केला. 00:12:17.236 --> 00:12:19.260 त्यांना एकमेकांविषयी आपुलकी वाटू लागली. 00:12:19.284 --> 00:12:20.958 एखादा गैरहजर असला, 00:12:20.982 --> 00:12:23.502 "काय झालं? ठीक आहेस ना?" अशी चौकशी करू लागले. 00:12:23.526 --> 00:12:26.137 त्याला कसला त्रास होत असेल ते जाणून घेऊ लागले. 00:12:26.161 --> 00:12:27.964 लिसा म्हणाली, 00:12:27.988 --> 00:12:30.585 "जसजशी बाग बहरू लागली, 00:12:30.609 --> 00:12:31.876 तसतसे आम्हीही बहरू लागलो!" NOTE Paragraph 00:12:32.474 --> 00:12:34.506 याला म्हणतात समाजोपचार. 00:12:34.530 --> 00:12:36.045 हे युरोपमध्ये वाढत आहे. 00:12:36.069 --> 00:12:38.370 हळूहळू गोळा होणाऱ्या पुराव्यांनुसार 00:12:38.394 --> 00:12:41.274 नैराश्य आणि चिंताविकारात 00:12:41.298 --> 00:12:43.276 खरोखरीच घट होत असल्याचं दिसून येत आहे. NOTE Paragraph 00:12:43.300 --> 00:12:47.021 एके दिवशी या बागेत असताना 00:12:47.045 --> 00:12:49.526 माझ्या मनात एक विचार आला. 00:12:49.550 --> 00:12:51.134 त्या सुंदर बागेत गेलो असताना 00:12:51.158 --> 00:12:52.349 मला जे वाटलं, 00:12:52.373 --> 00:12:56.244 त्यामागे ऑस्ट्रेलियन प्राध्यापक ह्यू मके यांच्या विचारांची प्रेरणा आहे. 00:12:56.268 --> 00:13:00.649 मला वाटलं, की आजच्या आपल्या संस्कृतीत एखाद्याला उदास वाटत असेल, 00:13:00.673 --> 00:13:03.737 तर आपण त्याला काय सांगतो? तुम्ही सांगत असाल, मीही सांगितलं आहे.. 00:13:03.761 --> 00:13:06.985 "तू स्वतः कोण आहेस ते जाणून घे. स्वतःला पटेल तेच कर." 00:13:07.742 --> 00:13:10.692 आणि माझ्या लक्षात आलं, की त्याऐवजी आपण सांगायला हवं, 00:13:10.716 --> 00:13:11.866 "स्वतःपुरतं पाहू नकोस. 00:13:12.306 --> 00:13:13.639 तुझा एकट्याचा नव्हे, 00:13:14.218 --> 00:13:16.427 समूहाचा विचार कर. 00:13:16.765 --> 00:13:18.090 समूहाचा भाग हो." NOTE Paragraph 00:13:18.114 --> 00:13:21.820 (टाळ्या) NOTE Paragraph 00:13:21.844 --> 00:13:24.423 या विकारांवर उपाय म्हणून आपण एकांडेपणाने राहून 00:13:24.447 --> 00:13:27.598 आपल्या एकट्याच्या हातात असलेली साधनं जास्तीत जास्त वापरत गेलो. 00:13:27.622 --> 00:13:29.061 हे विकार बळावण्यात 00:13:29.085 --> 00:13:31.125 हा समज थोडा कारणीभूत ठरला असावा. 00:13:31.149 --> 00:13:33.902 स्वतःला महत्त्व देण्यापेक्षा एखादा मोठा उद्देश हवा. NOTE Paragraph 00:13:33.926 --> 00:13:36.347 इथे नैराश्य आणि चिंताविकाराचं आणखी एक कारण सापडतं, 00:13:36.371 --> 00:13:39.268 ज्याविषयी मला आज बोलायचं होतं. 00:13:39.292 --> 00:13:40.982 आपण सर्वजण जाणतो, की 00:13:41.006 --> 00:13:44.752 आहारात चटपटीत पदार्थ वाढल्यामुळे आपलं आरोग्य बिघडत चाललं आहे. 00:13:44.776 --> 00:13:46.982 मी पौष्टिक आहार घेतो, असं नव्हे. 00:13:47.006 --> 00:13:49.405 व्याख्यानापूर्वी मी मॅकडोनाल्ड मध्ये खाऊन आलो. 00:13:49.429 --> 00:13:52.942 तुम्हां सर्वांना TED ची पौष्टिक न्याहारी खाताना पाहून मला लाज वाटली. 00:13:52.966 --> 00:13:58.109 पोषणरहित अन्नामुळे जसं आपलं आरोग्य बिघडतं, 00:13:58.133 --> 00:14:02.243 तसाच, काही निकृष्ट मूल्यांनी मनाचा ताबा घेतल्यामुळे 00:14:02.267 --> 00:14:03.745 आपलं मानसिक आरोग्य बिघडतं. 00:14:04.157 --> 00:14:07.261 हजारो वर्षांपासून तत्त्ववेत्ते सांगताहेत, की 00:14:07.285 --> 00:14:11.873 पैसा, समाजातलं स्थान, दिखाऊपणा यांना महत्त्व दिलं, 00:14:11.897 --> 00:14:13.420 तर मानसिक आरोग्य ढासळेल. 00:14:13.444 --> 00:14:15.511 असं शोपेनहावर म्हणाले होते. 00:14:15.535 --> 00:14:17.307 नेमकं हेच नव्हे,पण अशाच अर्थाचं. NOTE Paragraph 00:14:17.331 --> 00:14:20.357 आश्चर्य म्हणजे, यावर फारसं शास्त्रीय संशोधन झालं नव्हतं. 00:14:20.381 --> 00:14:24.030 पण मला भेटलेली एक असामान्य व्यक्ती, प्राध्यापक टिम कासर 00:14:24.054 --> 00:14:26.347 हे इलिनॉयच्या नॉक्स कॉलेजमध्ये 00:14:26.371 --> 00:14:28.934 गेली तीस वर्षं या विषयावर संशोधन करताहेत. 00:14:28.958 --> 00:14:31.974 त्यांच्या संशोधनाने काही महत्त्वाच्या गोष्टी सुचवल्या आहेत. 00:14:31.998 --> 00:14:35.189 पहिली गोष्ट. 00:14:35.213 --> 00:14:39.578 उत्तमोत्तम वस्तू विकत घेऊन त्यांचं प्रदर्शन केल्याने 00:14:39.602 --> 00:14:41.793 दुःखावर मात होऊन आनंद मिळेल असं जितकं समजाल, 00:14:41.817 --> 00:14:44.729 तितकं नैराश्य आणि चिंता पदरी पडतील. 00:14:44.753 --> 00:14:46.046 दुसरी गोष्ट. 00:14:46.070 --> 00:14:50.658 अशा समजांनी आपल्या संपूर्ण समाजाचाच ताबा घेतला आहे. 00:14:50.682 --> 00:14:52.095 मी आयुष्यभर पाहतो आहे, 00:14:52.119 --> 00:14:56.312 जाहिरातबाजी, इंस्टाग्राम इत्यादि गोष्टी कशा प्रभाव पाडतात. NOTE Paragraph 00:14:56.871 --> 00:14:58.244 मला वाटतं 00:14:58.268 --> 00:15:04.029 आपण जन्मापासून मानसिक KFC खातो आहोत. 00:15:04.053 --> 00:15:07.926 चुकीच्या ठिकाणी आनंद शोधतो आहोत. 00:15:07.950 --> 00:15:10.720 आणि जसं चटपटीत अन्न पोषणाची गरज भागवण्याऐवजी 00:15:10.744 --> 00:15:13.042 उलट आपल्याला आजारी पाडतं, 00:15:13.066 --> 00:15:16.208 तसंच निकृष्ट मूल्यं आपल्या मानसिक गरजा न भागवता 00:15:16.232 --> 00:15:18.874 आपल्याला निरोगी आयुष्यापासून दूर नेतात. 00:15:18.898 --> 00:15:21.521 मी जेव्हा प्रथम प्रा. कासर यांना भेटून 00:15:21.545 --> 00:15:23.022 हे जाणून घेत होतो, 00:15:23.046 --> 00:15:25.633 तेव्हा माझ्या मनात संमिश्र भावना उभ्या राहिल्या. 00:15:25.657 --> 00:15:28.347 माझ्यासाठी हे एक आव्हान होतं. 00:15:28.371 --> 00:15:31.633 कारण माझ्या स्वतःच्याच आयुष्यात मी बरेचदा उदासीनतेचा सामना करण्यासाठी 00:15:31.657 --> 00:15:36.922 एखादी बाह्य परिणाम करणारी भपकेबाज गोष्ट करत आलो होतो. 00:15:37.441 --> 00:15:40.131 आणि त्याचा काही उपयोग होत नव्हता, हेही पाहत आलो होतो. 00:15:40.930 --> 00:15:43.812 मला वाटलं, हे तर साहजिकच आहे. 00:15:43.836 --> 00:15:45.581 अगदी रटाळ मुद्दा, हो ना? 00:15:45.605 --> 00:15:46.930 आता मी तुम्हांला सांगतो, 00:15:46.954 --> 00:15:49.097 मरणशय्येवर असताना, आपल्याजवळ किती बूट आहेत, 00:15:49.121 --> 00:15:52.437 किंवा किती री-ट्विट मिळाले होते या गोष्टी तुम्हांला आठवणार नाहीत. 00:15:52.461 --> 00:15:54.144 त्यावेळी आठवतील ते प्रेमाचे, 00:15:54.168 --> 00:15:56.279 अर्थपूर्ण जगण्याचे आणि सुसंवादाचे क्षण. 00:15:56.303 --> 00:15:58.248 हे वाक्य वापरून गुळगुळीत झालेलं आहे खरं. 00:15:58.272 --> 00:16:00.621 मी प्रा. कासरना विचारलं, 00:16:00.645 --> 00:16:02.998 "मला यात एक विचित्र दुटप्पीपणा दिसतो. का बरं?" 00:16:03.022 --> 00:16:06.829 ते म्हणाले, "कारण आपल्याला मनात कुठेतरी या गोष्टी ठाऊक असतात. 00:16:06.853 --> 00:16:09.228 पण या संस्कृतीत आपण त्या पाळत नाही." 00:16:09.252 --> 00:16:11.331 या गोष्टी रटाळ वाटण्याइतपत ठाऊक आहेत. 00:16:11.355 --> 00:16:12.633 पण आपण त्या पाळत नाही. 00:16:12.657 --> 00:16:15.866 मी विचारलं, "का? इतक्या महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक असून 00:16:15.890 --> 00:16:17.176 आपण त्या पाळत का नाही?" 00:16:17.200 --> 00:16:20.604 थोड्या वेळाने प्रा. कासर म्हणाले, 00:16:20.628 --> 00:16:23.049 "कारण आपण एका यंत्रात राहतो. 00:16:23.073 --> 00:16:26.806 आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींचा आपल्याला विसर पाडणं हे त्याचं कार्य." 00:16:27.260 --> 00:16:28.847 यावर मला खूप विचार करावा लागला. 00:16:28.871 --> 00:16:30.276 "कारण आपण ज्या यंत्रात राहतो, 00:16:30.300 --> 00:16:33.978 ते आपल्याला महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लावतं." NOTE Paragraph 00:16:34.299 --> 00:16:38.077 हे यंत्र मोडून टाकता येईल का, हे प्रा. कासरना शोधून काढायचं होतं. 00:16:38.101 --> 00:16:39.974 यावर त्यांनी पुष्कळ संशोधन केलं आहे. 00:16:39.998 --> 00:16:41.553 इथे मी एक उदाहरण सांगतो. 00:16:41.577 --> 00:16:45.077 तुम्हां सर्वांना विनंती: आपल्या कुटुंब आणि मित्रांबरोबर करून पहा. 00:16:45.101 --> 00:16:48.443 नेथन डंगन याने तरुण आणि प्रौढांचा एक गट बोलावला. 00:16:48.467 --> 00:16:52.680 काही दिवस त्यांच्या सभा घेतल्या. 00:16:52.704 --> 00:16:54.467 यातला एक भाग असा होता: 00:16:54.491 --> 00:16:57.791 आपल्या आयुष्यातला असा एखादा क्षण आठवा, ज्यावेळी तुम्हांला खरोखर 00:16:57.815 --> 00:17:00.561 आयुष्याचा अर्थ आणि हेतु गवसला असेल. 00:17:00.585 --> 00:17:02.728 प्रत्येकाला हे निरनिराळं जाणवलं. 00:17:02.752 --> 00:17:06.369 कोणाला आठवलं संगीत, कोणाला लेखन, मदतकार्य. 00:17:06.393 --> 00:17:09.196 तुम्हां सर्वांनाही नक्कीच काहीतरी जाणवलं असेल. 00:17:09.220 --> 00:17:12.101 यातला दुसरा भाग असा होता: प्रश्न विचारायला प्रवृत्त करणे. 00:17:12.125 --> 00:17:14.887 "या महत्त्वाच्या गोष्टींना जास्त वेळ कसा द्यावा? 00:17:14.911 --> 00:17:17.595 आणि निरुपयोगी कचरा विकत घेऊन 00:17:17.619 --> 00:17:20.569 त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून 00:17:20.593 --> 00:17:23.315 लोकांना OMG म्हणायला लावणं 00:17:23.339 --> 00:17:24.606 कसं टाळावं?" NOTE Paragraph 00:17:24.958 --> 00:17:26.601 नुसता या सभांना येण्याचादेखील 00:17:26.625 --> 00:17:27.959 चांगला परिणाम दिसून आला. 00:17:27.983 --> 00:17:31.093 हे चंगळवादाच्या व्यसनमुक्तीचे वर्ग, बरोबर? 00:17:31.807 --> 00:17:34.760 अशा सभांना हजर राहून एकमेकांचे विचार ऐकणं, 00:17:34.784 --> 00:17:37.315 ते पाळण्याचा निश्चय करणं, एकमेकांची चौकशी करणं 00:17:37.339 --> 00:17:40.196 यामुळे या लोकांच्या विचारसरणीत मोठा बदल घडून आला. 00:17:40.220 --> 00:17:44.633 चुकीच्या गोष्टींत आनंद शोधायला लावून 00:17:44.657 --> 00:17:47.291 नैराश्यात ढकलणाऱ्या संदेशांची वावटळ टाळून 00:17:47.315 --> 00:17:50.656 ते नैराश्यातून बाहेर काढणाऱ्या 00:17:50.680 --> 00:17:52.680 अर्थपूर्ण आणि पोषक विचारांकडे वळू लागले. NOTE Paragraph 00:17:53.347 --> 00:17:56.649 पण मी असे काही उपाय शोधले, त्याबद्दल लिहिलं, 00:17:56.673 --> 00:17:59.412 यात आज न सांगितलेलेही काही आहेत, 00:17:59.436 --> 00:18:00.807 तरीसुद्धा माझ्या मनात येतं, 00:18:00.831 --> 00:18:04.530 हे विचार सुचायला मला इतका वेळ का लागला? 00:18:04.554 --> 00:18:06.570 कारण इतरांना समजावून सांगताना-- 00:18:06.594 --> 00:18:09.038 त्यापैकी काही कठीण आहेत, सर्व नव्हेत. 00:18:09.062 --> 00:18:12.306 ते सोपे वाटतात. ते काही अवकाश विज्ञान नव्हे. 00:18:12.330 --> 00:18:14.425 या गोष्टी आपल्याला मनात कुठेतरी ठाऊक असतात. 00:18:14.449 --> 00:18:17.086 मग त्या समजायला इतक्या कठीण का? 00:18:17.110 --> 00:18:19.044 मला वाटतं, यामागे पुष्कळ कारणं आहेत. 00:18:19.475 --> 00:18:23.744 यापैकी एक कारण असं, की नैराश्य किंवा चिंताविकार म्हणजे नक्की काय, 00:18:23.768 --> 00:18:27.188 याविषयीच्या आपल्या कल्पना बदलायला हव्यात. 00:18:27.776 --> 00:18:29.958 काही खरीखुरी जैविक कारणंसुद्धा 00:18:29.982 --> 00:18:31.715 या विकारांमागे असू शकतात. 00:18:32.117 --> 00:18:35.871 आपण सगळं ठपका जैविक कारणांवरच ठेवतो. 00:18:35.895 --> 00:18:37.141 असं मी बराच काळ करत होतो. 00:18:37.165 --> 00:18:41.230 आपल्या संस्कृतीचा प्रभाव 00:18:41.254 --> 00:18:45.111 मी आयुष्यभर पाहत आलो आहे. 00:18:45.135 --> 00:18:48.172 या प्रभावामुळे आपण निराश किंवा चिंताग्रस्त व्यक्तीला सांगतो, 00:18:48.196 --> 00:18:50.498 "तुला होणाऱ्या वेदनांना काही अर्थ नाही. 00:18:50.522 --> 00:18:51.958 फक्त थोडासा बिघाड झाला आहे. 00:18:51.982 --> 00:18:54.451 संगणक प्रणालीत येतो तसा काही व्यत्यय आला आहे. 00:18:54.475 --> 00:18:57.142 तुझ्या डोक्यातली जुळणी थोडी बिघडली आहे." 00:18:58.061 --> 00:19:01.168 पण नैराश्य म्हणजे बिघाड नव्हे हे समजलं, 00:19:01.192 --> 00:19:05.257 तेव्हा माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. 00:19:06.620 --> 00:19:07.770 तुमचं नैराश्य म्हणजे 00:19:08.684 --> 00:19:10.691 तुम्हांला मिळालेला एक इशारा. 00:19:11.077 --> 00:19:12.918 तो तुम्हांला काहीतरी सांगत असतो. NOTE Paragraph 00:19:12.942 --> 00:19:17.553 (टाळ्या) NOTE Paragraph 00:19:17.577 --> 00:19:19.966 निराश वाटण्यामागे काही कारणं असतात. 00:19:19.990 --> 00:19:22.705 नैराश्याच्या गर्तेत ती समजणं कठीण असतं. 00:19:22.729 --> 00:19:25.339 हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून जाणतो. 00:19:25.363 --> 00:19:28.846 पण योग्य मदत मिळाली, तर समस्या समजून घेऊन, 00:19:28.870 --> 00:19:31.344 सर्वांनी मिळून त्या सोडवता येतात. 00:19:31.368 --> 00:19:32.560 पण हे करण्याअगोदरची 00:19:32.584 --> 00:19:34.322 पहिली पायरी म्हणजे 00:19:34.346 --> 00:19:36.964 हे इशारे धुडकावून न लावणं. 00:19:36.988 --> 00:19:41.180 त्यांना दुबळेपणा, वेड किंवा जैविक कारण न समजणं. 00:19:41.204 --> 00:19:43.139 काही थोड्या अपवादांमध्ये तसं असू शकतं. 00:19:43.163 --> 00:19:46.789 हे इशारे आपण ऐकायला हवेत. 00:19:46.813 --> 00:19:50.085 कारण आपण ऐकायलाच हवं असं काहीतरी ते सांगत असतात. 00:19:50.514 --> 00:19:55.537 आपण जेव्हा खरोखरीच हे इशारे ऐकून 00:19:55.561 --> 00:19:59.576 त्यांचा योग्य तो मान राखायला लागू, 00:19:59.600 --> 00:20:01.847 तेव्हाच आपल्याला दिसू लागतील 00:20:01.871 --> 00:20:06.029 मुक्तता देणारे, सक्षम करणारे सखोल उपाय. 00:20:07.133 --> 00:20:11.206 भोवताली सर्वत्र गायी थबकल्या आहेत! NOTE Paragraph 00:20:11.585 --> 00:20:12.766 धन्यवाद. NOTE Paragraph 00:20:12.790 --> 00:20:16.478 (टाळ्या)