1 00:00:00,800 --> 00:00:03,816 आम्हां भारतीयांची कुटुंबे मोठी असतात. 2 00:00:03,840 --> 00:00:06,416 मी पैजेवर सांगते, आपल्यापैकी अनेकांनी हे ऐकलं असेल. 3 00:00:06,440 --> 00:00:09,280 कौटुंबिक समारंभ अनेक असतात. 4 00:00:09,840 --> 00:00:13,720 लहानपणी, माझे पालक मला अशा कौटुंबिक कार्यक्रमास नेत. 5 00:00:14,360 --> 00:00:17,376 पण मी नेहमीच वाट बघत असे, ती 6 00:00:17,400 --> 00:00:19,440 माझ्या चुलत भावंडांबरोबर खेळण्याची. 7 00:00:20,160 --> 00:00:22,456 आणि हे एक काका 8 00:00:22,480 --> 00:00:23,736 नेहमी तिथे असत. 9 00:00:23,760 --> 00:00:25,616 आमच्याबरोबर उडया मारायला नेहमी तयार. 10 00:00:25,640 --> 00:00:27,136 आमच्यासाठी खेळ आणत. 11 00:00:27,160 --> 00:00:29,960 आम्हा मुलांना बालपणाचा आनंद लुटू देत. 12 00:00:30,920 --> 00:00:33,256 ते अतिशय यशस्वी होते. 13 00:00:33,280 --> 00:00:35,280 त्यांच्यापाशी बळ आणि आत्मविश्वास होता. 14 00:00:35,920 --> 00:00:40,320 पण नंतर मी या तंदुरुस्त माणसाची तब्येत ढासळताना पाहिली. 15 00:00:41,240 --> 00:00:43,520 त्यांना पार्किन्सन्सचं निदान झालं होतं. 16 00:00:44,760 --> 00:00:48,816 पार्किन्सन्स हा आजार चेतासंस्थेमध्ये बिघाड करतो. 17 00:00:48,840 --> 00:00:51,816 म्हणजे आतापर्यंत स्वावलंबी असणाऱ्या माणसाला अचानक 18 00:00:51,840 --> 00:00:57,080 कापऱ्यामुळे, कॉफी पिण्यासारखं काम फार कठीण वाटू लागतं. 19 00:00:57,800 --> 00:01:00,456 काकांनी चालण्यासाठी वॉकर वापरायला सुरुवात केली. 20 00:01:00,480 --> 00:01:01,696 आणि वळण्यासाठी, 21 00:01:01,720 --> 00:01:05,776 त्यांना अक्षरशः एका वेळी एक पाऊल टाकावं लागे. असं. 22 00:01:05,800 --> 00:01:07,040 खूप वेळ लागायचा. 23 00:01:08,240 --> 00:01:11,416 तर हे काका, जे प्रत्येक समारंभाचे 24 00:01:11,440 --> 00:01:13,496 उत्सवमूर्ती असत, 25 00:01:13,520 --> 00:01:15,600 ते अचानक लोकांच्या पाठी दडू लागले. 26 00:01:16,400 --> 00:01:19,760 लोकांच्या कीव करणाऱ्या नजरांपासून ते लपत होते. 27 00:01:20,440 --> 00:01:22,520 आणि असे जगात ते काही एकटेच नाहीत. 28 00:01:23,280 --> 00:01:28,776 दरवर्षी ६०,००० लोकांना पार्किन्सन्सचं निदान केलं जातं. 29 00:01:28,800 --> 00:01:30,840 आणि ही संख्या वाढतच आहे. 30 00:01:32,360 --> 00:01:37,776 आपल्या रचनांनी बहुआयामी समस्या सोडवाव्यात हे आम्हा रचनाकारांचं स्वप्न असतं. 31 00:01:37,800 --> 00:01:40,616 सर्व समस्या सोडवणारं एक उत्तर. 32 00:01:40,640 --> 00:01:42,920 पण नेहमी हे असंच असायला हवं, असं काही नाही. 33 00:01:43,680 --> 00:01:46,496 छोट्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून, 34 00:01:46,520 --> 00:01:50,440 त्यांच्यावर छोटी उत्तरं शोधून, अखेरीस मोठा परिणाम साधता येतो. 35 00:01:51,120 --> 00:01:54,496 तर इथे, पार्किन्सन्स बरा करणे हा माझा हेतू नव्हता. 36 00:01:54,520 --> 00:01:57,696 तर, त्यांची रोजची कामं जास्त सोपी करणं 37 00:01:57,720 --> 00:01:59,120 आणि त्यातून मोठा परिणाम साधणं. 38 00:02:00,040 --> 00:02:03,600 प्रथम मी कंपावर लक्ष केंद्रित केलं. बरोबर? 39 00:02:04,440 --> 00:02:08,976 काकांनी मला सांगितलं होतं, की त्यांनी लोकांसमोर चहा वा कॉफी पिणं बंद केलं आहे. 40 00:02:09,000 --> 00:02:10,479 केवळ लज्जेमुळे. 41 00:02:11,000 --> 00:02:14,480 म्हणून मी न सांडणाऱ्या कपाची रचना केली. 42 00:02:15,080 --> 00:02:17,936 केवळ त्याच्या आकारामुळेच तो कार्य करतो. 43 00:02:17,960 --> 00:02:23,216 प्रत्येक कंपनावेळी, वरच्या वक्राकारामुळे कपातला द्रवपदार्थ आतच वळवला जातो. 44 00:02:23,240 --> 00:02:26,080 आणि नेहमीच्या कपाच्या तुलनेत, या कपातलं पेय कपातच राहतं. 45 00:02:26,800 --> 00:02:31,720 महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या कपाला पार्किन्सन्स कप असं नाव दिलेलं नाही. 46 00:02:32,040 --> 00:02:36,456 तुम्ही, मी किंवा कोणीही वेंधळा माणूस वापरू शकेल असा हा कप दिसतो. 47 00:02:36,480 --> 00:02:40,480 त्यामुळे तो वापरणं आणि इतर लोकांत मिसळून जाणं हे सोपं होतं. 48 00:02:41,920 --> 00:02:44,576 तर, एक समस्या सुटली. 49 00:02:44,600 --> 00:02:45,840 आणखी बऱ्याच आहेत. 50 00:02:46,640 --> 00:02:49,056 हा सगळा वेळ, मी त्यांची मुलाखत घेत होते. 51 00:02:49,080 --> 00:02:50,616 त्यांना प्रश्न विचारत होते. 52 00:02:50,640 --> 00:02:54,336 तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला फक्त वरवरची माहिती मिळत होती. 53 00:02:54,360 --> 00:02:57,176 फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं. 54 00:02:57,200 --> 00:03:00,360 एक नवा दृष्टीकोन मिळण्यासाठी मला जास्त खोलवर खोदावं लागणार होतं. 55 00:03:01,000 --> 00:03:04,736 म्हणून मी ठरवलं, आपण त्यांच्या रोजच्या कामांचं निरीक्षण करू 56 00:03:04,760 --> 00:03:07,120 ते खात असताना, टी. व्ही. पाहत असताना. 57 00:03:07,800 --> 00:03:11,856 आणि जेव्हा मी त्यांना चालत जेवणाच्या टेबलाजवळ जाताना पाहिलं, 58 00:03:11,880 --> 00:03:17,056 तेव्हा माझ्या मनात आलं, सपाट जमिनीवर चालणं कठीण वाटणारा हा माणूस 59 00:03:17,080 --> 00:03:18,800 जिने कसे चढत असेल? 60 00:03:19,320 --> 00:03:23,016 कारण भारतात आमच्याजवळ जिन्यावरून वर चढवणारा शानदार रूळ नाही. 61 00:03:23,040 --> 00:03:25,056 विकसित देशांसारखा. 62 00:03:25,080 --> 00:03:27,200 जिने स्वतःलाच चढावे लागतात. 63 00:03:27,920 --> 00:03:29,176 तर ते मला म्हणाले, 64 00:03:29,200 --> 00:03:31,200 " चल, मी जिने कसे चढतो ते तुला दाखवतो." 65 00:03:31,880 --> 00:03:33,920 मी जे पाहिलं ते आता आपण पाहू. 66 00:03:36,960 --> 00:03:39,616 इथपर्यंत पोहोचायला त्यांना बराच वेळ लागला. 67 00:03:39,640 --> 00:03:41,496 आणि हा सगळा वेळ मी विचार करत होते, 68 00:03:41,520 --> 00:03:43,456 अरे देवा! ते खरंच हे करणार आहेत का? 69 00:03:43,480 --> 00:03:46,376 खरंच, ते वॉकरशिवाय हे करू शकतील का? 70 00:03:46,400 --> 00:03:47,600 आणि मग.. 71 00:03:50,280 --> 00:03:52,600 (हशा) 72 00:03:56,680 --> 00:03:58,840 आणि वळणं.. ती त्यांनी किती सहज घेतली. 73 00:04:01,240 --> 00:04:02,480 धक्का बसला ना? 74 00:04:02,920 --> 00:04:04,400 मलाही बसला होता. 75 00:04:07,320 --> 00:04:10,296 सपाट जमिनीवर चालू न शकणारा हा माणूस, 76 00:04:10,320 --> 00:04:12,400 जिने चढण्यामध्ये एकदम सराईत होता. 77 00:04:13,720 --> 00:04:18,375 संशोधन केल्यावर याचं कारण समजलं, की ही एक सलग हालचाल होती. 78 00:04:18,399 --> 00:04:21,536 आणखी एक माणूस आहे, त्यालाही हीच लक्षणं सतावतात. 79 00:04:21,560 --> 00:04:22,976 तो देखील वॉकर वापरतो. 80 00:04:23,000 --> 00:04:25,096 पण सायकलवर बसवताक्षणीच 81 00:04:25,120 --> 00:04:26,816 त्याची सगळी लक्षणं नाहीशी होतात. 82 00:04:26,840 --> 00:04:28,920 कारण ती एक सलग हालचाल आहे. 83 00:04:29,560 --> 00:04:33,856 तर माझ्यासाठी महत्त्वाचं होतं ते, जिन्यावर चढण्याची ती भावना, 84 00:04:33,880 --> 00:04:35,280 जमिनीवर चालताना जाणवून देणं. 85 00:04:35,880 --> 00:04:38,816 त्यांच्यावर अनेक कल्पनांची चाचणी घेतली गेली. 86 00:04:38,840 --> 00:04:42,360 पण अखेरीस या एका कल्पनेला यश आलं. 87 00:04:45,440 --> 00:04:48,496 (हशा) 88 00:04:48,520 --> 00:04:52,976 (टाळ्या) 89 00:04:53,000 --> 00:04:54,456 ते जलद चालताहेत, हो ना ? 90 00:04:54,480 --> 00:04:57,680 (टाळ्या) 91 00:04:59,240 --> 00:05:02,016 मी याला जिन्याचा आभास म्हणते. 92 00:05:02,040 --> 00:05:06,616 आणि जेव्हा हा आभास संपला, तेव्हा ते एकदम जागीच गोठले. 93 00:05:06,640 --> 00:05:08,656 आणि याला म्हणतात, गतीचे गोठणे. 94 00:05:08,680 --> 00:05:09,896 आणि हे बरेचदा होतं. 95 00:05:09,920 --> 00:05:13,856 तर मग, असा जिन्याचा आभास त्यांच्या सगळ्या खोल्यांतून वाहता का असू नये? 96 00:05:13,880 --> 00:05:16,240 त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूपच वाढेल. 97 00:05:17,440 --> 00:05:20,096 तंत्रज्ञान हेच काही सर्व प्रश्नांचं उत्तर नव्हे. 98 00:05:20,120 --> 00:05:22,896 आपल्याला हवीत माणसाला केंद्रस्थानी ठेवून शोधलेली उत्तरं. 99 00:05:22,920 --> 00:05:25,136 मी नक्कीच याचं प्रक्षेपण करू शकले असते. 100 00:05:25,160 --> 00:05:27,496 किंवा गूगल चष्मा, किंवा तसंच काहीतरी. 101 00:05:27,520 --> 00:05:29,840 पण मी जमिनीवर साधी छपाई करण्याचाच आग्रह धरला. 102 00:05:30,360 --> 00:05:33,296 ही छपाई इस्पितळांत नेता येईल. 103 00:05:33,320 --> 00:05:35,720 त्यामुळे त्यांना तिथे आपलं स्वागत झाल्यासारखं वाटेल 104 00:05:36,600 --> 00:05:39,696 माझी इच्छा आहे, की पार्किन्सन्सच्या प्रत्येक रुग्णाला तसंच वाटावं, 105 00:05:39,720 --> 00:05:42,176 जसं माझ्या काकांना त्या दिवशी वाटलं होतं. 106 00:05:42,200 --> 00:05:45,880 ते मला म्हणाले, की त्यांना पुन्हा आपल्या भूतकाळात गेल्यासारखं वाटलं. 107 00:05:47,120 --> 00:05:51,120 आजच्या युगात "स्मार्ट" चा अर्थ "उच्च तंत्रज्ञान" असा झाला आहे. 108 00:05:51,960 --> 00:05:55,120 आणि जग दिवसेंदिवस जास्त "स्मार्ट" होत चाललं आहे. 109 00:05:55,800 --> 00:05:59,480 पण "स्मार्ट" म्हणजे सोपं असूनही परिणामकारक असं काही का असू नये? 110 00:06:00,320 --> 00:06:04,296 यासाठी हवी केवळ थोडी सहसंवेदना आणि थोडं कुतूहल, 111 00:06:04,320 --> 00:06:06,576 प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण करण्यासाठी. 112 00:06:06,600 --> 00:06:08,496 पण आपण इथेच थांबूया नको. 113 00:06:08,520 --> 00:06:12,176 आपण जास्त गुंतागुंतीच्या समस्या शोधू. त्यांची भीती न बाळगता. 114 00:06:12,200 --> 00:06:15,776 त्यांची तोडफोड करून, त्यांच्यामधून छोट्या छोट्या समस्या वेगळ्या करू. 115 00:06:15,800 --> 00:06:18,296 आणि मग त्यांच्यासाठी सोपी उत्तरं शोधू. 116 00:06:18,320 --> 00:06:21,336 उत्तरं तपासून पाहू. अपयश आलं तर तेही स्वीकारू. 117 00:06:21,360 --> 00:06:23,520 पण ते सुधारण्याचा नवा बोध घेऊन. 118 00:06:24,240 --> 00:06:28,496 आपण सगळ्यांनी सोपी उत्तरं शोधली, तर आपण काय काय करू शकू, कल्पना करा. 119 00:06:28,520 --> 00:06:32,000 आपल्या सगळ्यांची सोपी उत्तरं एकत्र करून होणारं जग कसं असेल? 120 00:06:32,880 --> 00:06:35,896 एक जास्त "स्मार्ट" जग निर्माण करू या. पण साधं सोपं. 121 00:06:35,920 --> 00:06:37,136 धन्यवाद. 122 00:06:37,160 --> 00:06:40,200 (टाळ्या)