0:00:00.800,0:00:03.816 आम्हां भारतीयांची कुटुंबे मोठी असतात. 0:00:03.840,0:00:06.416 मी पैजेवर सांगते, [br]आपल्यापैकी अनेकांनी हे ऐकलं असेल. 0:00:06.440,0:00:09.280 कौटुंबिक समारंभ अनेक असतात. 0:00:09.840,0:00:13.720 लहानपणी, माझे पालक मला [br]अशा कौटुंबिक कार्यक्रमास नेत. 0:00:14.360,0:00:17.376 पण मी नेहमीच वाट बघत असे, ती 0:00:17.400,0:00:19.440 माझ्या चुलत भावंडांबरोबर खेळण्याची. 0:00:20.160,0:00:22.456 आणि हे एक काका 0:00:22.480,0:00:23.736 नेहमी तिथे असत. 0:00:23.760,0:00:25.616 आमच्याबरोबर उडया मारायला नेहमी तयार. 0:00:25.640,0:00:27.136 आमच्यासाठी खेळ आणत. 0:00:27.160,0:00:29.960 आम्हा मुलांना बालपणाचा आनंद लुटू देत. 0:00:30.920,0:00:33.256 ते अतिशय यशस्वी होते. 0:00:33.280,0:00:35.280 त्यांच्यापाशी बळ आणि आत्मविश्वास होता. 0:00:35.920,0:00:40.320 पण नंतर मी या तंदुरुस्त माणसाची [br]तब्येत ढासळताना पाहिली. 0:00:41.240,0:00:43.520 त्यांना पार्किन्सन्सचं निदान झालं होतं. 0:00:44.760,0:00:48.816 पार्किन्सन्स हा आजार चेतासंस्थेमध्ये [br]बिघाड करतो. 0:00:48.840,0:00:51.816 म्हणजे आतापर्यंत स्वावलंबी असणाऱ्या [br]माणसाला अचानक 0:00:51.840,0:00:57.080 कापऱ्यामुळे, कॉफी पिण्यासारखं काम [br]फार कठीण वाटू लागतं. 0:00:57.800,0:01:00.456 काकांनी चालण्यासाठी वॉकर वापरायला [br]सुरुवात केली. 0:01:00.480,0:01:01.696 आणि वळण्यासाठी, 0:01:01.720,0:01:05.776 त्यांना अक्षरशः एका वेळी [br]एक पाऊल टाकावं लागे. असं. 0:01:05.800,0:01:07.040 खूप वेळ लागायचा. 0:01:08.240,0:01:11.416 तर हे काका, जे प्रत्येक समारंभाचे 0:01:11.440,0:01:13.496 उत्सवमूर्ती असत, 0:01:13.520,0:01:15.600 ते अचानक लोकांच्या पाठी दडू लागले. 0:01:16.400,0:01:19.760 लोकांच्या कीव करणाऱ्या नजरांपासून [br]ते लपत होते. 0:01:20.440,0:01:22.520 आणि असे जगात ते काही एकटेच नाहीत. 0:01:23.280,0:01:28.776 दरवर्षी ६०,००० लोकांना [br]पार्किन्सन्सचं निदान केलं जातं. 0:01:28.800,0:01:30.840 आणि ही संख्या वाढतच आहे. 0:01:32.360,0:01:37.776 आपल्या रचनांनी बहुआयामी समस्या सोडवाव्यात [br]हे आम्हा रचनाकारांचं स्वप्न असतं. 0:01:37.800,0:01:40.616 सर्व समस्या सोडवणारं एक उत्तर. 0:01:40.640,0:01:42.920 पण नेहमी हे असंच असायला हवं, [br]असं काही नाही. 0:01:43.680,0:01:46.496 छोट्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून, 0:01:46.520,0:01:50.440 त्यांच्यावर छोटी उत्तरं शोधून, [br]अखेरीस मोठा परिणाम साधता येतो. 0:01:51.120,0:01:54.496 तर इथे, पार्किन्सन्स बरा करणे [br]हा माझा हेतू नव्हता. 0:01:54.520,0:01:57.696 तर, त्यांची रोजची कामं जास्त सोपी करणं 0:01:57.720,0:01:59.120 आणि त्यातून मोठा परिणाम साधणं. 0:02:00.040,0:02:03.600 प्रथम मी कंपावर लक्ष केंद्रित केलं. [br]बरोबर? 0:02:04.440,0:02:08.976 काकांनी मला सांगितलं होतं, की त्यांनी [br]लोकांसमोर चहा वा कॉफी पिणं बंद केलं आहे. 0:02:09.000,0:02:10.479 केवळ लज्जेमुळे. 0:02:11.000,0:02:14.480 म्हणून मी न सांडणाऱ्या कपाची रचना केली. 0:02:15.080,0:02:17.936 केवळ त्याच्या आकारामुळेच तो कार्य करतो. 0:02:17.960,0:02:23.216 प्रत्येक कंपनावेळी, वरच्या वक्राकारामुळे[br]कपातला द्रवपदार्थ आतच वळवला जातो. 0:02:23.240,0:02:26.080 आणि नेहमीच्या कपाच्या तुलनेत, [br]या कपातलं पेय कपातच राहतं. 0:02:26.800,0:02:31.720 महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या कपाला [br]पार्किन्सन्स कप असं नाव दिलेलं नाही. 0:02:32.040,0:02:36.456 तुम्ही, मी किंवा कोणीही वेंधळा माणूस [br]वापरू शकेल असा हा कप दिसतो. 0:02:36.480,0:02:40.480 त्यामुळे तो वापरणं आणि इतर लोकांत [br]मिसळून जाणं हे सोपं होतं. 0:02:41.920,0:02:44.576 तर, एक समस्या सुटली. 0:02:44.600,0:02:45.840 आणखी बऱ्याच आहेत. 0:02:46.640,0:02:49.056 हा सगळा वेळ, मी त्यांची मुलाखत घेत होते. 0:02:49.080,0:02:50.616 त्यांना प्रश्न विचारत होते. 0:02:50.640,0:02:54.336 तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला फक्त [br]वरवरची माहिती मिळत होती. 0:02:54.360,0:02:57.176 फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं. 0:02:57.200,0:03:00.360 एक नवा दृष्टीकोन मिळण्यासाठी [br]मला जास्त खोलवर खोदावं लागणार होतं. 0:03:01.000,0:03:04.736 म्हणून मी ठरवलं, आपण त्यांच्या [br]रोजच्या कामांचं निरीक्षण करू 0:03:04.760,0:03:07.120 ते खात असताना, टी. व्ही. पाहत असताना. 0:03:07.800,0:03:11.856 आणि जेव्हा मी त्यांना चालत [br]जेवणाच्या टेबलाजवळ जाताना पाहिलं, 0:03:11.880,0:03:17.056 तेव्हा माझ्या मनात आलं, सपाट जमिनीवर [br]चालणं कठीण वाटणारा हा माणूस 0:03:17.080,0:03:18.800 जिने कसे चढत असेल? 0:03:19.320,0:03:23.016 कारण भारतात आमच्याजवळ [br]जिन्यावरून वर चढवणारा शानदार रूळ नाही. 0:03:23.040,0:03:25.056 विकसित देशांसारखा. 0:03:25.080,0:03:27.200 जिने स्वतःलाच चढावे लागतात. 0:03:27.920,0:03:29.176 तर ते मला म्हणाले, 0:03:29.200,0:03:31.200 " चल, मी जिने कसे चढतो ते तुला दाखवतो." 0:03:31.880,0:03:33.920 मी जे पाहिलं ते आता आपण पाहू. 0:03:36.960,0:03:39.616 इथपर्यंत पोहोचायला [br]त्यांना बराच वेळ लागला. 0:03:39.640,0:03:41.496 आणि हा सगळा वेळ मी विचार करत होते, 0:03:41.520,0:03:43.456 अरे देवा! ते खरंच हे करणार आहेत का? 0:03:43.480,0:03:46.376 खरंच, ते वॉकरशिवाय हे करू शकतील का? 0:03:46.400,0:03:47.600 आणि मग.. 0:03:50.280,0:03:52.600 (हशा) 0:03:56.680,0:03:58.840 आणि वळणं.. ती त्यांनी किती सहज घेतली. 0:04:01.240,0:04:02.480 धक्का बसला ना? 0:04:02.920,0:04:04.400 मलाही बसला होता. 0:04:07.320,0:04:10.296 सपाट जमिनीवर चालू न शकणारा हा माणूस, 0:04:10.320,0:04:12.400 जिने चढण्यामध्ये एकदम सराईत होता. 0:04:13.720,0:04:18.375 संशोधन केल्यावर याचं कारण समजलं, [br]की ही एक सलग हालचाल होती. 0:04:18.399,0:04:21.536 आणखी एक माणूस आहे, [br]त्यालाही हीच लक्षणं सतावतात. 0:04:21.560,0:04:22.976 तो देखील वॉकर वापरतो. 0:04:23.000,0:04:25.096 पण सायकलवर बसवताक्षणीच 0:04:25.120,0:04:26.816 त्याची सगळी लक्षणं नाहीशी होतात. 0:04:26.840,0:04:28.920 कारण ती एक सलग हालचाल आहे. 0:04:29.560,0:04:33.856 तर माझ्यासाठी महत्त्वाचं होतं ते, [br]जिन्यावर चढण्याची ती भावना, 0:04:33.880,0:04:35.280 जमिनीवर चालताना जाणवून देणं. 0:04:35.880,0:04:38.816 त्यांच्यावर अनेक कल्पनांची [br]चाचणी घेतली गेली. 0:04:38.840,0:04:42.360 पण अखेरीस या एका कल्पनेला यश आलं. 0:04:45.440,0:04:48.496 (हशा) 0:04:48.520,0:04:52.976 (टाळ्या) 0:04:53.000,0:04:54.456 ते जलद चालताहेत, हो ना ? 0:04:54.480,0:04:57.680 (टाळ्या) 0:04:59.240,0:05:02.016 मी याला जिन्याचा आभास म्हणते. 0:05:02.040,0:05:06.616 आणि जेव्हा हा आभास संपला, [br]तेव्हा ते एकदम जागीच गोठले. 0:05:06.640,0:05:08.656 आणि याला म्हणतात, गतीचे गोठणे. 0:05:08.680,0:05:09.896 आणि हे बरेचदा होतं. 0:05:09.920,0:05:13.856 तर मग, असा जिन्याचा आभास त्यांच्या [br]सगळ्या खोल्यांतून वाहता का असू नये? [br] 0:05:13.880,0:05:16.240 त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूपच वाढेल. 0:05:17.440,0:05:20.096 तंत्रज्ञान हेच काही [br]सर्व प्रश्नांचं उत्तर नव्हे. 0:05:20.120,0:05:22.896 आपल्याला हवीत माणसाला केंद्रस्थानी ठेवून [br]शोधलेली उत्तरं. 0:05:22.920,0:05:25.136 मी नक्कीच याचं प्रक्षेपण करू शकले असते. 0:05:25.160,0:05:27.496 किंवा गूगल चष्मा, किंवा तसंच काहीतरी. 0:05:27.520,0:05:29.840 पण मी जमिनीवर साधी छपाई करण्याचाच [br]आग्रह धरला. 0:05:30.360,0:05:33.296 ही छपाई इस्पितळांत नेता येईल. 0:05:33.320,0:05:35.720 त्यामुळे त्यांना तिथे आपलं[br]स्वागत झाल्यासारखं वाटेल 0:05:36.600,0:05:39.696 माझी इच्छा आहे, की पार्किन्सन्सच्या[br]प्रत्येक रुग्णाला तसंच वाटावं, 0:05:39.720,0:05:42.176 जसं माझ्या काकांना त्या दिवशी वाटलं होतं. 0:05:42.200,0:05:45.880 ते मला म्हणाले, की त्यांना पुन्हा [br]आपल्या भूतकाळात गेल्यासारखं वाटलं. 0:05:47.120,0:05:51.120 आजच्या युगात "स्मार्ट" चा अर्थ [br]"उच्च तंत्रज्ञान" असा झाला आहे. 0:05:51.960,0:05:55.120 आणि जग दिवसेंदिवस जास्त [br]"स्मार्ट" होत चाललं आहे. 0:05:55.800,0:05:59.480 पण "स्मार्ट" म्हणजे सोपं असूनही परिणामकारक[br]असं काही का असू नये? 0:06:00.320,0:06:04.296 यासाठी हवी केवळ थोडी सहसंवेदना [br]आणि थोडं कुतूहल, 0:06:04.320,0:06:06.576 प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण करण्यासाठी. 0:06:06.600,0:06:08.496 पण आपण इथेच थांबूया नको. 0:06:08.520,0:06:12.176 आपण जास्त गुंतागुंतीच्या समस्या शोधू. [br]त्यांची भीती न बाळगता. 0:06:12.200,0:06:15.776 त्यांची तोडफोड करून, त्यांच्यामधून [br]छोट्या छोट्या समस्या वेगळ्या करू. 0:06:15.800,0:06:18.296 आणि मग त्यांच्यासाठी सोपी उत्तरं शोधू. 0:06:18.320,0:06:21.336 उत्तरं तपासून पाहू. [br]अपयश आलं तर तेही स्वीकारू. 0:06:21.360,0:06:23.520 पण ते सुधारण्याचा नवा बोध घेऊन. 0:06:24.240,0:06:28.496 आपण सगळ्यांनी सोपी उत्तरं शोधली, [br]तर आपण काय काय करू शकू, कल्पना करा. 0:06:28.520,0:06:32.000 आपल्या सगळ्यांची सोपी उत्तरं एकत्र करून[br]होणारं जग कसं असेल? 0:06:32.880,0:06:35.896 एक जास्त "स्मार्ट" जग निर्माण करू या. [br]पण साधं सोपं. 0:06:35.920,0:06:37.136 धन्यवाद. 0:06:37.160,0:06:40.200 (टाळ्या)