1 00:00:00,120 --> 00:00:07,950 [गाण्यातून काऊंट डाऊन: 7, 6, 5, 4, 3, 2, 1] इंटरनेट: पॅकेट्स, राऊटिंग, आणि विश्वसनीयता 2 00:00:07,950 --> 00:00:13,650 हाय, माझं नाव आहे लिन. मी स्पॉटीफायमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि मी हे मान्य करणारी 3 00:00:13,650 --> 00:00:18,970 पहिली व्यक्ती असेन की मी बऱ्याचवेळा इंटरनेटची विश्वसनीयता गृहीत धरते. इंटरनेटवरून प्रसारित 4 00:00:18,970 --> 00:00:23,170 होणाऱ्या माहितीचं प्रमाण प्रचंड आहे. पण डेटाचा प्रत्येक भाग आपल्यापर्यंत विश्वासनीयरित्या पोचवणं 5 00:00:23,170 --> 00:00:29,080 कसं शक्य होतं? समजा तुम्हाला स्पॉटीफायवरून एक गाणं लावायचं आहे. असं वाटतं की 6 00:00:29,080 --> 00:00:33,989 तुमचा कॉम्प्युटर थेट स्पॉटीफायशी जोडला जातो आणि स्पॉटीफाय तुम्हाला थेट, समर्पित लाईनवरून 7 00:00:33,989 --> 00:00:39,410 गाणं पाठवतं. पण वास्तविक, इंटरनेट अशाप्रकारे काम करत नाही. जर इंटरनेट थेट, 8 00:00:39,410 --> 00:00:43,640 समर्पित कनेक्शन्सचं बनलेलं असेल तर ते सुरू ठेवणं अवघड आहे कारण लक्षावधी युजर्स जोडलेले असतात. 9 00:00:43,640 --> 00:00:48,050 आणि, विशेषत: प्रत्येक वायर आणि कॉम्प्युटर सगळा वेळ काम करत असतीलच, 10 00:00:48,050 --> 00:00:53,350 याची खात्री नाही. त्याऐवजी डेटा इंटरनेटवरून बऱ्याच कमी थेट पद्धतीनं प्रवास करतो. 11 00:00:53,350 --> 00:01:01,210 खूप खूप वर्षांपूर्वी, 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला माझा पार्टनर बॉब कान आणि मी एका डिझाईनवर 12 00:01:01,210 --> 00:01:06,870 काम करायला सुरुवात केली, ज्याला आपण आज इंटरनेट म्हणतो. बॉब आणि मला इंटरनेटचे 13 00:01:06,870 --> 00:01:14,790 प्रोटोकॉल्स आणि आर्किटेक्चर डिझाईन करण्याची जबाबदारी आणि संधी मिळाली. तर आम्ही इंटरनेटच्या 14 00:01:14,790 --> 00:01:20,000 वाढीमध्ये आणि उत्क्रांतीमध्ये या सगळ्या काळापासून ते थेट आत्तापर्यंत सहभागी होणे सुरू ठेवले. 15 00:01:20,000 --> 00:01:25,500 माहिती एका कॉम्प्युटरपासून दुसऱ्या कॉम्प्युटरपर्यंत कशाप्रकारे प्रवास करते, हे फार रंजक आहे. 16 00:01:25,500 --> 00:01:30,900 ती नेहमी एका ठराविक मार्गाने जात नाही, प्रत्यक्षात, एका कॉम्प्युटरचा दुसऱ्या कॉम्प्युटरशी संवाद सुरू 17 00:01:30,900 --> 00:01:36,100 असताना तुमचा मार्ग बदलू शकतो. इंटरनेटवरची माहिती एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्या कॉम्प्युटरवर 18 00:01:36,100 --> 00:01:42,050 माहितीच्या पॅकेटच्या स्वरूपात जाते. आणि आपण गाडीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जसे जातो, 19 00:01:42,050 --> 00:01:46,360 बऱ्याचशा तशाच पद्धतीने पॅकेट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. 20 00:01:46,360 --> 00:01:51,420 प्रत्येक वेळी प्रवास करून त्याच ठिकाणी जाताना वाहतुकीची कोंडी किंवा रस्त्यांच्या स्थितीनुसार, 21 00:01:51,420 --> 00:01:59,000 तुम्ही दुसरा रस्ता निवडता किंवा तसं करणं तुम्हाला भाग पडतं. आणि 22 00:01:59,000 --> 00:02:03,980 तुम्ही गाडीतून सगळ्या प्रकारचं सामान नेऊ शकता त्याचप्रमाणे, विविध प्रकारची डिजिटल माहिती 23 00:02:03,980 --> 00:02:10,359 आयपी पॅकेट्सबरोबर पाठवली जाऊ शकते, पण याला काही मर्यादा आहेत. उदा. जर तुम्हाला एखादं 24 00:02:10,359 --> 00:02:14,200 अवकाशयान जिथं तयार झालं आहे तिथून प्रक्षेपणाच्या ठिकाणी न्यायचं असलं तर? अवकाशयान 25 00:02:14,200 --> 00:02:18,780 एका ट्रकमध्ये मावणार नाही, त्यामुळे त्याचे तुकडे करावे लागतील, आणि ट्रकच्या काफिल्यामधून त्यांची 26 00:02:18,780 --> 00:02:23,099 वाहतूक करावी लागेल. ते वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकतात आणि इच्छित ठिकाणी वेगवेगळ्या वेळी 27 00:02:23,099 --> 00:02:28,109 पोचू शकतात. पण एकदा सगळे भाग पोचले की ते जोडून तुम्हाला अवकाशयान पुन्हा जोडता येतं आणि 28 00:02:28,109 --> 00:02:34,329 ते उड्डाणासाठी सज्ज होतं. इंटरनेटवरसुद्धा अशाचप्रकारे काम होतं, जर 29 00:02:34,329 --> 00:02:40,090 तुमची इमेज फार मोठी असेल आणि तुम्हाला ती मित्राला पाठवायची असेल किंवा वेबसाईटवर अपलोड 30 00:02:40,090 --> 00:02:44,819 करायची असेल, तर ती इमेज कोट्यावधी अशा 1 आणि 0 च्या बीट्सपासून बनलेली असेल, एका पॅकेटमध्ये 31 00:02:44,819 --> 00:02:49,810 पाठवण्यासाठी खूप जास्त. हा कॉम्प्युटरवरचा डेटा असल्यानं , पाठवणारा कॉम्प्युटर याचं लगेचच शेकडो 32 00:02:49,810 --> 00:02:55,719 किंवा अगदी हजारो छोट्या भागात, पॅकेट्समध्ये विभाजन करू शकतो. कार्स किंवा ट्रकप्रमाणं 33 00:02:55,719 --> 00:03:00,230 या पॅकेट्सना ड्रायव्हर्स नसतात आणि ती आपला मार्ग निवडत नाहीत. प्रत्येक 34 00:03:00,230 --> 00:03:04,650 पॅकेटला इंटरनेट अॅड्रेस असतो, तो जिथून आला आहे आणि जिथे जाणार आहे त्याचा. इंटरनेटवरील खास 35 00:03:04,650 --> 00:03:09,430 कॉम्प्युटर्स म्हणजे राऊटर्स वाहतूक नियंत्रकांप्रमाणं काम करतात आणि या पॅकेट्सची वाहतूक नेटवर्कमधून 36 00:03:09,430 --> 00:03:15,239 सुरळीत चालू ठेवतात. जर एका मार्गावर गर्दी असेल तर, प्रत्येक पॅकेट इंटरनेटवर वेगवेगळ्या मार्गानं प्रवास 37 00:03:15,239 --> 00:03:20,370 करू शकतं आणि ती पुन्हा इच्छित ठिकाणी थोड्याशा वेगवेगळ्या वेळी पोचू शकतात किंवा अगदी बिघडूसुद्धा 38 00:03:20,370 --> 00:03:26,569 शकतात. हे कसं काम करतं ते बघूया. इंटरनेट प्रोटोकॉलचा भाग म्हणून, 39 00:03:26,569 --> 00:03:31,169 प्रत्येक राऊटर पॅकेट्स पाठवायच्या विविध मार्गांवर लक्ष ठेवतं, आणि डेटाच्या प्रत्येक भागासाठी पॅकेट 40 00:03:31,169 --> 00:03:37,079 पाठवायच्या आयपी अॅड्रेसनुसार त्यातील सर्वांत स्वस्त उपलब्ध मार्ग निवडतं. 41 00:03:37,079 --> 00:03:42,120 या संदर्भात सर्वांत स्वस्त म्हणजे किमतीच्या दृष्टीनं नाही तर वेळ आणि इतर अ-तांत्रिक घटक म्हणजे 42 00:03:42,120 --> 00:03:47,499 राजकारण आणि कंपन्यांमधील नातं वगैरेच्या दृष्टीनं. बऱ्याचदा डेटाच्या प्रवासाचा सर्वोत्तम मार्ग सर्वांत थेट 43 00:03:47,499 --> 00:03:53,150 असेलच असं नाही. मार्गांसाठी पर्याय असणं हे नेटवर्कला दोषांसाठी सहनशील बनवतं. म्हणजेच जरी काही मोठी 44 00:03:53,150 --> 00:03:57,700 समस्या आली तरीही नेटवर्क पॅकेटस पाठवणं चालूच ठेवू शकतं. 45 00:03:57,700 --> 00:04:04,849 हा इंटरनेटच्या महत्त्वाच्या तत्त्वाचा पाया आहे: विश्वसनीयता. आता, जर तुम्हाला 46 00:04:04,849 --> 00:04:09,349 काही डेटा हवा असेल आणि सगळं पाठवलं गेलं नसेल तर काय? समजा, तुम्हाला एखादं गाणं ऐकायचं आहे. 47 00:04:09,349 --> 00:04:14,829 तुम्हाला 100% खात्री कशी होईल की सगळा डेटा आला आहे, आणि गाणं व्यवस्थित लागणार आहे? 48 00:04:14,829 --> 00:04:21,440 ओळख करून देत आहे, तुमच्या नव्या सगळ्यात चांगल्या मित्राची, टीसीपी (ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल). टीसीपी तुमचा सर्व डेटा पॅकेट्स 49 00:04:21,440 --> 00:04:26,530 म्हणून पाठवण्याच्या आणि स्वीकारण्याच्या कामाचं नियंत्रण करतो. एखादी विश्वासार्ह पोस्टाची सेवा 50 00:04:26,530 --> 00:04:31,669 असल्याप्रमाणं आहे तो. जेव्हा तुम्ही तुमच्या डिव्हाईसवर गाणं पाठवण्याची विनंती करता, तेव्हा 51 00:04:31,669 --> 00:04:37,210 स्पॉटीफाय गाण्याचं अनेक पॅकेट्समध्ये विभाजन करतं. पॅकेट्स आली की टीसीपी ती तपासून आलेल्या 52 00:04:37,210 --> 00:04:42,840 प्रत्येक पॅकेटसाठी पोचपावती पाठवतो. सगळी पॅकेट्स आली तर टीसीपी तुमच्या डीलीव्हरीसाठी स्वाक्षरी करतो 53 00:04:42,840 --> 00:04:54,819 आणि तुमचं काम होतं (गाणं ऐकू येतं), जर काही पॅकेट्स गहाळ झाल्याचं टीसीपीला कळलं तर तो 54 00:04:54,819 --> 00:04:59,930 स्वाक्षरी करत नाही, नाहीतर गाणं तितकं चांगलं ऐकू येणार नाही किंवा त्याचा काही भाग गहाळ असेल. 55 00:04:59,930 --> 00:05:05,930 प्रत्येक गहाळ किंवा अपूर्ण पॅकेट स्पॉटीफाय पुन्हा पाठवतं. टीसीपीनं त्या गाण्यासाठीची सगळी 56 00:05:05,930 --> 00:05:13,370 पॅकेट्स आल्याची पुष्टी केल्यावर तुमचं गाणं लागेल. टीसीपी आणि राऊटर सिस्टीमची महत्त्वाची गोष्ट 57 00:05:13,370 --> 00:05:19,220 काय आहे? ते स्केलेबल आहेत. ते 8 किंवा 800 कोटी डिव्हायसेसबरोबर काम करू शकतात. खरंतर, 58 00:05:19,220 --> 00:05:23,449 दोष सहनशीलता आणि अतिरिक्तता, या तत्त्वांमुळं, आपण जितके जास्त राऊटर्स जोडतो, तितकं इंटरनेट 59 00:05:23,449 --> 00:05:28,069 जास्त विश्वसनीय होतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इंटरनेट आणि त्याचं प्रमाण वाढवू 60 00:05:28,069 --> 00:05:34,379 शकतो, कोणीही वापरत असलेल्या सेवांमध्ये व्यत्यय न आणता. इंटरनेट प्रत्यक्ष जोडलेली शेकडो नेटवर्क्स आणि 61 00:05:34,379 --> 00:05:39,280 कोट्यावधी कॉम्प्युटर्स आणि डिव्हायसेस यापासून बनलेलं आहे, इंटरनेट बनवणाऱ्या या वेगवेगळया 62 00:05:39,280 --> 00:05:44,360 प्रणाली एकमेकांशी जोडल्या जातात, संवाद साधतात, आणि एकत्र काम करतात ते 63 00:05:44,360 --> 00:05:51,289 डेटा इंटरनेटवर कसा पाठवला जाईल याबद्दलच्या मान्य केलेल्या स्टँडर्ड्समुळं. 64 00:05:51,289 --> 00:05:56,000 इंटरनेटवरची कॉम्प्युटिंग डिव्हायसेस, किंवा राऊटर्स सर्व पॅकेटना त्यांच्या इच्छित स्थळी पोचण्यासाठी 65 00:05:56,000 --> 00:06:02,789 मदत करतात, जिथं ती पुन्हा एकत्र केली जातात, आवश्यक असेल तर क्रमाने लावली जातात. हे 66 00:06:02,789 --> 00:06:08,889 एका दिवसात कोट्यावधीवेळा होतं, तुम्ही आणि इतर लोक मेल पाठवत असतील, वेब पेज पहात असतील, 67 00:06:08,889 --> 00:06:13,870 किंवा व्हिडीओ चॅट करत असतील, मोबाईल अॅप वापरत असतील किंवा जर इंटरनेटवरची सेन्सर्स किंवा 68 00:06:13,870 --> 00:06:20,931 डीव्हायसेस एकमेकांशी बोलत असतील तेव्हा.