WEBVTT 00:00:01.417 --> 00:00:03.893 शाह रुख खान: मुलींनी छान दिसावं. बोलू नये. 00:00:03.917 --> 00:00:05.643 गप्प बसा. चूप. 00:00:05.667 --> 00:00:09.351 हे शब्द वापरून मुलींना गप्प केलं जातं. अगदी बालपणापासून, 00:00:09.375 --> 00:00:10.684 प्रौढपणी, आणि 00:00:10.708 --> 00:00:12.434 थेट म्हातारपणापर्यंत. NOTE Paragraph 00:00:12.458 --> 00:00:16.101 यापुढील वक्त्यांची ओळख: स्त्रीशक्तीच्या खऱ्याखुऱ्या पुरस्कर्त्या. 00:00:16.125 --> 00:00:17.768 जागतिक बँक, युनो आणि देशविदेशांतील 00:00:17.792 --> 00:00:19.934 अनेक एनजीओ संस्थांच्या 00:00:19.958 --> 00:00:24.268 गरिबी, लैंगिकता आणि विकास या विषयांबद्दलच्या सल्लागार. 00:00:24.292 --> 00:00:27.809 त्या स्वतःला सांस्कृतिक गुप्तहेर म्हणवतात. 00:00:27.833 --> 00:00:32.476 या सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आणि लेखिकेचं जोरदार स्वागत करू. 00:00:32.500 --> 00:00:34.101 दीपा नारायण. NOTE Paragraph 00:00:34.125 --> 00:00:36.351 (संगीत) NOTE Paragraph 00:00:36.375 --> 00:00:40.292 (टाळ्या) NOTE Paragraph 00:00:44.708 --> 00:00:46.893 सर्व प्रेमळ पालकांना वाटतं, की 00:00:46.917 --> 00:00:48.768 मुलींचं चांगल्या रीतीने संगोपन करावं. 00:00:48.792 --> 00:00:50.601 पण प्रत्यक्षात मात्र ते 00:00:50.625 --> 00:00:55.143 मुलींवर बंधनं घालून त्यांना चिरडून टाकतात. 00:00:55.167 --> 00:00:57.018 त्यांची मनं चिरडून टाकून 00:00:57.042 --> 00:00:58.958 त्यांना छळ सोसायला तयार करतात. 00:00:59.875 --> 00:01:02.059 खरं तर हे इतकं भयानक आहे, की 00:01:02.083 --> 00:01:04.643 पालकांना ते सहन होत नाही. म्हणून, 00:01:04.667 --> 00:01:05.934 त्याचं रूप बदललं जातं. NOTE Paragraph 00:01:05.958 --> 00:01:09.226 भारतात आम्ही त्याला "तडजोड" असं म्हणतो. 00:01:09.250 --> 00:01:10.792 हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल. 00:01:11.625 --> 00:01:13.684 "डार्लिंग, जरा जुळवून घे ना थोडंसं. 00:01:13.708 --> 00:01:14.976 फक्त थोडंसं जुळवून घे. 00:01:15.000 --> 00:01:17.976 काहीही घडलं, तरी जरा तडजोड कर. " 00:01:18.000 --> 00:01:21.809 "तडजोड" मुलींना शिकवते, शक्तिहीन बना. 00:01:21.833 --> 00:01:24.393 जगू नका. अदृश्य रहा. 00:01:24.417 --> 00:01:26.101 स्वत्व विसरा. 00:01:26.125 --> 00:01:32.518 आणि ती मुलांना शिकवते, जगावर सत्ता गाजवा. ताकद दाखवा. 00:01:32.542 --> 00:01:38.018 हे सगळं घडत असतानाच आपण लिंगसमभाव आणि महिलांचं सक्षमीकरण याबद्दल बोलत असतो. NOTE Paragraph 00:01:38.042 --> 00:01:43.643 २०१२ मध्ये दिल्लीत चालत्या बसमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्कारानंतर 00:01:43.667 --> 00:01:48.684 मला छळामागची कारणं जाणून घेण्याची गरज वाटू लागली. 00:01:48.708 --> 00:01:52.143 म्हणून मी एक साधा प्रश्न विचारू लागले. 00:01:52.167 --> 00:01:57.458 आजच्या युगात, एक चांगली स्त्री किंवा चांगला पुरुष असणं, म्हणजे काय? 00:01:58.333 --> 00:02:01.226 यावर आलेल्या उत्तरांचं, खास करून तरुण पिढीच्या उत्तरांचं, 00:02:01.250 --> 00:02:04.601 मला इतकं आश्चर्य वाटलं, की 00:02:04.625 --> 00:02:10.184 हा माझ्या संशोधनाचा प्रकल्प बनला आणि त्याने माझं आयुष्य व्यापून टाकलं. NOTE Paragraph 00:02:10.208 --> 00:02:15.643 तीन वर्षांत मी ६०० स्त्रिया, पुरुष आणि मुलांशी बोलले. 00:02:15.667 --> 00:02:17.476 हे सर्व सुशिक्षित, मध्यमवर्गीय होते. 00:02:17.500 --> 00:02:21.559 मी एकूण १८०० तास त्यांचं बोलणं ऐकलं, 00:02:21.583 --> 00:02:23.893 आणि त्याबद्दल ८००० पानं भरून टिपणं लिहिली. 00:02:23.917 --> 00:02:26.351 त्यांचा अर्थ लावायला मला आणखी एक वर्ष लागलं. NOTE Paragraph 00:02:26.375 --> 00:02:32.434 आजकाल सर्वत्र आपण सुशिक्षित, सुरेख पोषाखातल्या स्त्रिया पाहतो. 00:02:32.458 --> 00:02:35.268 आज इथे जमलेल्या स्त्रिया किंवा मीही दिसते, तशाच. 00:02:35.292 --> 00:02:37.851 त्यामुळे आपल्याला वाटतं, की जग बदललं आहे. 00:02:37.875 --> 00:02:41.684 पण हे बाह्य बदल पूर्णपणे दिशाभूल करणारे आहेत. 00:02:41.708 --> 00:02:44.667 कारण आपल्यामध्ये अंतर्गत बदल झालेलेच नाहीत. NOTE Paragraph 00:02:46.375 --> 00:02:48.809 म्हणून, आज इथे मी गरिबांविषयी बोलणार नाही. 00:02:48.833 --> 00:02:51.768 आज मी मध्यमवर्ग आणि उच्चवर्गाविषयी बोलणार आहे. 00:02:51.792 --> 00:02:54.893 कारण हाच वर्ग या सत्याकडे सर्वात जास्त डोळेझाक करतो. 00:02:54.917 --> 00:02:59.018 आपण फक्त पुन्हा पुन्हा म्हणत राहतो, की 00:02:59.042 --> 00:03:01.184 स्त्रियांना शिक्षण मिळालं, 00:03:01.208 --> 00:03:02.559 नोकऱ्या मिळाल्या, 00:03:02.583 --> 00:03:04.893 त्या कमावत्या झाल्या, की 00:03:04.917 --> 00:03:07.625 त्यांना समान हक्क मिळतील, त्या सक्षम होतील, मुक्त होतील. 00:03:08.667 --> 00:03:10.059 तसं झालेलं नाही. 00:03:10.083 --> 00:03:11.351 का? NOTE Paragraph 00:03:11.375 --> 00:03:15.018 माझ्या संशोधनातून मला सात सवयी सापडल्या आहेत. 00:03:15.042 --> 00:03:16.601 त्या स्त्रियांना मिटवून टाकतात. 00:03:16.625 --> 00:03:18.809 त्यांना पार अदृश्य करून टाकतात. 00:03:18.833 --> 00:03:21.434 पण या सवयी समाजात टिकून राहिल्या आहेत, 00:03:21.458 --> 00:03:23.851 कारण त्या आपल्या ओळखीच्या आहेत. 00:03:23.875 --> 00:03:25.958 त्यांना आपण चांगल्या, सोज्वळ सवयी मानतो. 00:03:26.792 --> 00:03:30.375 अर्थात, चांगल्या, सोज्वळ गोष्टी कोणी कशाला बदलेल, किंवा सोडून देईल? 00:03:31.500 --> 00:03:33.559 एकीकडे आपण आपल्या अपत्यांवर प्रेम करतो. 00:03:33.583 --> 00:03:34.893 मुलींवर प्रेम करतो. 00:03:34.917 --> 00:03:37.292 आणि दुसरीकडे त्यांना चिरडून टाकतो. NOTE Paragraph 00:03:38.875 --> 00:03:41.625 पहिली सवय: मुलींना शरीर नसतं. 00:03:43.250 --> 00:03:48.518 मुलीला नाहीसं करण्याची पहिली पायरी म्हणजे तिचं शरीर नाहीसं करणं. 00:03:48.542 --> 00:03:50.768 तिला शरीर नाही अशी बतावणी करणं. 00:03:50.792 --> 00:03:53.643 २३ वर्षे वयाची आकांक्षा म्हणते, 00:03:53.667 --> 00:03:58.018 "आमच्या घरी आम्ही कधीच शरीराबद्दल बोलत नाही. कधीच नाही." 00:03:58.042 --> 00:03:59.643 आणि याच अबोल शांततेमुळे 00:03:59.667 --> 00:04:03.559 करोडो मुलींवर लैंगिक अत्याचार होतात, 00:04:03.583 --> 00:04:06.750 पण त्या आपल्या आईलासुद्धा त्याबद्दल सांगत नाहीत. 00:04:07.625 --> 00:04:10.101 इतरांच्या नकारात्मक टिपण्या ऐकून 00:04:10.125 --> 00:04:14.833 ९० टक्के मुलींना स्वतःचंच शरीर आवडेनासं होतं. 00:04:15.458 --> 00:04:17.726 एखाद्या मुलीने स्वतःचं शरीर नाकारणं म्हणजे 00:04:17.750 --> 00:04:19.809 स्वतःचं हक्काचं एकमेव घर नाकारणं. 00:04:19.833 --> 00:04:22.726 मग अदृष्यपणा आणि असुरक्षित भावना 00:04:22.750 --> 00:04:25.393 हा तिच्या आयुष्याचा डळमळीत पाया ठरतो. NOTE Paragraph 00:04:25.417 --> 00:04:29.000 दुसरी सवय: गप्प राहा. चूप. 00:04:29.583 --> 00:04:31.559 तुला अस्तित्वच नाही, 00:04:31.583 --> 00:04:33.184 शरीरही नाही. 00:04:33.208 --> 00:04:35.351 मग तुला आवाज तरी कसा असेल? 00:04:35.375 --> 00:04:37.268 अगदी सर्वच स्त्रियांनी मला सांगितलं, 00:04:37.292 --> 00:04:41.434 "लहानपणी आई ओरडायची. 00:04:41.458 --> 00:04:44.434 म्हणायची, बोलू नकोस. गप्प बस. चूप. 00:04:44.458 --> 00:04:47.976 हळू बोल. वाद घालू नकोस. उलट उत्तरं देऊ नकोस. 00:04:48.000 --> 00:04:49.309 उलटून बोलू नकोस." 00:04:49.333 --> 00:04:50.875 तुम्ही सर्वांनीही हे ऐकलं असेल. 00:04:51.750 --> 00:04:54.226 यामुळे मुली घाबरतात, आणि मिटून जातात. 00:04:54.250 --> 00:04:57.643 त्या गप्प होतात, आणि म्हणतात, 00:04:57.667 --> 00:04:59.476 "सोडून देऊ. जाऊ दे. 00:04:59.500 --> 00:05:01.333 काय उपयोग? कोणी ऐकणार नाही." 00:05:02.375 --> 00:05:04.184 सुशिक्षित स्त्रिया म्हणाल्या, 00:05:04.208 --> 00:05:05.768 आमची सर्वात मोठी समस्या म्हणजे 00:05:05.792 --> 00:05:09.059 धीटपणे बोलता न येणं. 00:05:09.083 --> 00:05:11.976 जणु आम्ही बोललो तर कोणी गळ्यावर टाच लावून 00:05:12.000 --> 00:05:13.250 गळाच दाबणार आहे. 00:05:14.250 --> 00:05:17.208 बोलता न आल्यामुळे स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाचे तुकडे पडतात. NOTE Paragraph 00:05:19.375 --> 00:05:22.268 तिसरी सवय: लोकांना खूष करा. 00:05:22.292 --> 00:05:23.559 इतरांना खूष करा. 00:05:23.583 --> 00:05:26.726 सतत हसणारी, कशालाच नकार न देणारी, 00:05:26.750 --> 00:05:29.184 कोणी शोषण केलं तरीही न रागावणारी 00:05:29.208 --> 00:05:31.268 अशी छानशी स्त्री सर्वांनाच आवडते. 00:05:31.292 --> 00:05:34.018 १८ वर्षे वयाची अमिषा म्हणाली, 00:05:34.042 --> 00:05:36.309 "माझे वडील म्हणत, 00:05:36.333 --> 00:05:39.333 तू हसताना दिसली नाहीस तर मला काही बरं वाटत नाही." 00:05:40.167 --> 00:05:41.476 म्हणून ती हसते. 00:05:41.500 --> 00:05:44.059 म्हणजे तिच्या वडिलांनी तिला शिकवलं, की 00:05:44.083 --> 00:05:48.018 तुझ्या आनंदापेक्षा माझा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. 00:05:48.042 --> 00:05:52.268 सतत सर्वांना खूष ठेवण्याचा प्रयत्न करत राहिल्यामुळे 00:05:52.292 --> 00:05:55.167 मुली निर्णय घ्यायला घाबरतात. 00:05:56.042 --> 00:05:58.643 त्यांना काही विचारलं, की म्हणतात, 00:05:58.667 --> 00:06:01.042 "काही चालेल. कुछ भी. 00:06:01.917 --> 00:06:03.708 मला सगळं चालतं. चलता है." 00:06:05.083 --> 00:06:07.101 २५ वर्षे वयाची दर्शा 00:06:07.125 --> 00:06:09.018 मोठ्या अभिमानाने सांगते, 00:06:09.042 --> 00:06:11.518 "मी अगदी लवचिक आहे. 00:06:11.542 --> 00:06:14.792 इतरांना जशी हवी तशी मी होऊ शकते." 00:06:15.500 --> 00:06:18.226 अशा मुली आपली स्वप्नं विसरून जातात. 00:06:18.250 --> 00:06:19.559 इच्छा विसरून जातात. 00:06:19.583 --> 00:06:21.518 आणि कोणाला त्याची दखल नसते. 00:06:21.542 --> 00:06:23.476 एक नैराश्य सोडून. 00:06:23.500 --> 00:06:24.750 ते त्यांना ग्रासतं. 00:06:25.583 --> 00:06:29.000 त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक तुकडा निखळून पडतो. NOTE Paragraph 00:06:31.042 --> 00:06:33.750 चौथी सवय: तुम्हांला लैंगिकता नाही. 00:06:35.000 --> 00:06:39.101 १.३ अब्ज लोकसंख्येच्या आपल्या देशात 00:06:39.125 --> 00:06:41.000 लैंगिकता ही काही नवी गोष्ट नव्हे. 00:06:42.208 --> 00:06:46.934 नवी गोष्ट ही, की स्त्रीला लैंगिक इच्छा असण्याचा हक्क आहे, 00:06:46.958 --> 00:06:50.000 हे आता मान्य होऊ लागलं आहे. 00:06:51.042 --> 00:06:54.518 पण ज्या स्त्रीला स्वतःचं शरीर स्वतःच्या मालकीचं असण्याची मुभा नाही, 00:06:54.542 --> 00:06:56.976 जिला स्वतःच्या शरीराबद्दल शिक्षण दिलं जात नाही, 00:06:57.000 --> 00:06:59.476 जिच्यावर कदाचित लैंगिक अत्याचार झाले असतील, 00:06:59.500 --> 00:07:00.976 जिला नाही म्हणता येत नाही, 00:07:01.000 --> 00:07:03.184 आणि जिला स्वतःची शरम वाटत असेल, 00:07:03.208 --> 00:07:05.583 ती स्वतःची लैंगिक इच्छापूर्ती कशी करणार? 00:07:06.417 --> 00:07:09.042 स्त्रीची लैंगिकता दडपली गेली आहे. NOTE Paragraph 00:07:10.625 --> 00:07:13.917 पाचवी सवय: स्त्रियांवर विश्वास ठेवू नका. 00:07:15.083 --> 00:07:17.434 कल्पना करा, सर्व स्त्रियांची एकजूट झाली, 00:07:17.458 --> 00:07:19.934 तर जग किती बदलेल. 00:07:19.958 --> 00:07:22.768 आणि नेमकं हेच होऊ नये, म्हणून 00:07:22.792 --> 00:07:26.268 आमची संस्कृती पुरुषांशी इमान राखणे, कुटुंबातल्या गोष्टी गुप्त ठेवणे 00:07:26.292 --> 00:07:29.583 अशा गोष्टींना मोठं नैतिक महत्त्व देते. 00:07:30.125 --> 00:07:31.768 एकामागून एक स्त्रियांनी सांगितलं, 00:07:31.792 --> 00:07:34.393 "माझा फक्त एकाच स्त्रीवर विश्वास आहे. 00:07:34.417 --> 00:07:36.018 आणि ती स्त्री म्हणजे मी स्वतः." 00:07:36.042 --> 00:07:37.559 ३० वर्षे वयाची रुचि 00:07:37.583 --> 00:07:41.476 दिल्ली विद्यापीठात स्त्रियांच्या सबलीकरणावर काम करते. तीदेखील म्हणाली, 00:07:41.500 --> 00:07:45.393 "माझा स्त्रियांवर विश्वास नाही. त्या मत्सरी असतात, पाठीत खंजीर खुपसतात." 00:07:45.417 --> 00:07:47.184 साहजिकच, शहरांमधून 00:07:47.208 --> 00:07:49.059 स्त्रिया महिला गटांत सामील होत नाहीत. 00:07:49.083 --> 00:07:52.333 यामागचं कारण विचारल्यावर सांगतात, "मला कुचाळक्या करायला वेळ नाही." 00:07:53.208 --> 00:07:57.125 एकट्या स्त्रीला नेस्तनाबूत करणं जास्त सोपं असतं. NOTE Paragraph 00:07:58.375 --> 00:08:01.917 सहावी सवय: आपल्या इच्छेपेक्षा कर्तव्य महान. 00:08:02.833 --> 00:08:07.143 चांगल्या मुलीची ही लांबलचक व्याख्या सांगणारी मुस्कान फक्त १५ वर्षांची आहे. 00:08:07.167 --> 00:08:09.768 "दयाळू, मृदु स्वभावाची, नम्र, प्रेमळ, काळजी घेणारी, 00:08:09.792 --> 00:08:12.226 सत्यवचनी, आज्ञाधारक, मोठ्यांचा आदर करणारी, 00:08:12.250 --> 00:08:15.917 विनाअट मदत करणारी, चांगुलपणाने वागणारी, आणि आपली कर्तव्ये पार पाडणारी." 00:08:17.667 --> 00:08:19.559 बाप रे! 00:08:19.583 --> 00:08:22.518 कर्तव्य पार पाडून होईपर्यंत 00:08:22.542 --> 00:08:25.976 उरलीसुरली इच्छा नाहीशी होणारच. 00:08:26.000 --> 00:08:29.518 मग जेव्हा त्यागमूर्ती आईजवळ 00:08:29.542 --> 00:08:31.226 जेवणाखेरीज दुसरा विषय उरत नाही, 00:08:31.250 --> 00:08:35.184 फक्त "जेवलास का? जेवायला काय करू?" 00:08:35.208 --> 00:08:39.292 तेव्हा २४ वर्षीय सौरभ सारखे पुरुष त्यांना "कंटाळवाणी आई" म्हणतात. 00:08:40.417 --> 00:08:42.976 स्त्री केवळ अवशेषमात्र उरते. NOTE Paragraph 00:08:43.000 --> 00:08:47.184 सातवी सवय: पूर्णपणे परावलंबी व्हा. 00:08:47.208 --> 00:08:50.309 या सर्व सवयी स्त्रीला चिरडून टाकतात. 00:08:50.333 --> 00:08:51.851 तिचं मन भीतीने भरून टाकतात. 00:08:51.875 --> 00:08:55.476 आणि आपल्या चरितार्थासाठी पूर्णपणे पुरुषांवर अवलंबून राहायला भाग पाडतात. 00:08:55.500 --> 00:08:59.167 यामुळे पुरुषी वर्चस्व कायम राहतं. NOTE Paragraph 00:09:00.083 --> 00:09:04.601 म्हणजे, चांगल्या आणि नैतिक समजल्या गेलेल्या या सात सवयी 00:09:04.625 --> 00:09:07.518 मुलींचं आयुष्य ओरबाडून घेतात, 00:09:07.542 --> 00:09:09.958 आणि पुरुषांना छळ करू देतात. NOTE Paragraph 00:09:11.125 --> 00:09:12.976 आपण बदललं पाहिजे. 00:09:13.000 --> 00:09:14.250 बदलायचं कसं? 00:09:15.083 --> 00:09:16.917 एक सवय म्हणजे फक्त एक सवय, इतकंच. 00:09:17.708 --> 00:09:20.101 प्रत्येक सवय आपण लावून घेतलेली असते. 00:09:20.125 --> 00:09:21.684 तशीच ती आपण मोडूही शकतो. 00:09:21.708 --> 00:09:24.393 स्वतःमधला हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. 00:09:24.417 --> 00:09:26.518 मला सुद्धा बदलावं लागलं होतं. 00:09:26.542 --> 00:09:29.101 पण यामुळे करोडो स्त्रियांना 00:09:29.125 --> 00:09:31.417 चिरडून टाकणारा समाज बदलणार नाही. 00:09:32.292 --> 00:09:34.393 म्हणून आपल्याला पार मुळापर्यंत जायला हवं. 00:09:34.417 --> 00:09:38.809 चांगली स्त्री किंवा चांगला पुरुष असणं या शब्दांचे अर्थ बदलायला हवेत. 00:09:38.833 --> 00:09:41.583 कारण प्रत्येक समाजाचा हा पाया आहे. 00:09:42.292 --> 00:09:46.684 आपल्याला लवचिक स्त्रिया नकोत, लवचिक व्याख्या हव्यात. 00:09:46.708 --> 00:09:48.268 पुरुषांसाठी सुद्धा. 00:09:48.292 --> 00:09:53.518 हा मोठा सामाजिक बदल पुरुषांच्या सहभागाशिवाय घडून येणार नाही. 00:09:53.542 --> 00:09:54.809 आम्हांला तुमची गरज आहे. 00:09:54.833 --> 00:09:57.851 बदलाला पाठिंबा देणाऱ्या पुरुषांची गरज आहे, 00:09:57.875 --> 00:10:01.059 जोरदार बदल घडवून आणण्यासाठी. 00:10:01.083 --> 00:10:03.601 नाहीतर आपल्या मुलींचं आणि मुलांचं 00:10:03.625 --> 00:10:05.976 आयुष्य सुरक्षित आणि मुक्त व्हायला 00:10:06.000 --> 00:10:07.250 दोन शतकं लागतील. NOTE Paragraph 00:10:08.292 --> 00:10:14.559 कल्पना करा, अर्धा अब्ज स्त्रिया एकत्र येऊन, पुरुषांच्या पाठिंब्यासहित 00:10:14.583 --> 00:10:17.684 एकमेकांशी वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर 00:10:17.708 --> 00:10:19.601 बदल घडवण्यासंबंधी संवाद साधताहेत. 00:10:19.625 --> 00:10:21.976 पुरुष आपल्या वर्तुळांत हाच संवाद करताहेत. 00:10:22.000 --> 00:10:26.268 स्त्रिया आणि पुरुष एकत्र येऊन एकमेकांचं बोलणं ऐकून घेताहेत. 00:10:26.292 --> 00:10:28.684 कोणाला दोषी न ठरवता. 00:10:28.708 --> 00:10:31.518 आरोप न ठेवता, शरम न बाळगता, 00:10:31.542 --> 00:10:33.601 कल्पना करा, आपण किती बदलून जाऊ. 00:10:33.625 --> 00:10:35.518 आपण सगळे मिळून हे करू शकतो. 00:10:35.542 --> 00:10:37.958 स्त्रियांनो, जुळवून घेऊ नका. 00:10:39.167 --> 00:10:41.083 पुरुषांनो, तडजोड करा. 00:10:41.958 --> 00:10:43.726 ती वेळ आता आली आहे. NOTE Paragraph 00:10:43.750 --> 00:10:45.101 धन्यवाद. NOTE Paragraph 00:10:45.125 --> 00:10:48.958 (टाळ्या) NOTE Paragraph 00:10:49.542 --> 00:10:51.175 फार चांगलं व्याख्यान. सुरेख. 00:10:51.175 --> 00:10:52.937 सर्वांतर्फे अभिवादन, दीपा. 00:10:53.000 --> 00:10:54.809 त्यांचं व्याख्यान ऐकताना मला जाणवलं, की 00:10:54.833 --> 00:10:58.393 स्त्रियांसोबतचं आपलं साधं बोलणंसुद्धा 00:10:58.417 --> 00:10:59.976 किती आक्रमक असतं. 00:11:00.000 --> 00:11:02.893 उदाहरणार्थ, माझ्या मुलीला मी कधीकधी म्हणतो, 00:11:02.917 --> 00:11:06.059 "तू हसलीस की मला बरं वाटतं, नाहीतर वाईट वाटतं." 00:11:06.083 --> 00:11:07.684 मी पुन्हा असं कधीच म्हणणार नाही. 00:11:07.708 --> 00:11:09.768 आजपासून मी माझ्या मुलीला सांगेन, 00:11:09.792 --> 00:11:11.101 तू जे करशील ते मला आवडेल. 00:11:11.125 --> 00:11:13.726 आणि मला नाही आवडलं, तर माझ्याकडे दुर्लक्ष कर. 00:11:13.750 --> 00:11:16.601 तुला जे आवडेल, तेच तू कर. बरोबर? NOTE Paragraph 00:11:16.625 --> 00:11:19.518 हो. (टाळ्या) NOTE Paragraph 00:11:19.542 --> 00:11:21.018 अपुऱ्या कहाण्या, इच्छा, 00:11:21.042 --> 00:11:26.976 न मिळालेलं स्वातंत्र्य याबद्दल प्रथम ऐकताना 00:11:27.000 --> 00:11:28.309 तुम्हांला काय वाटलं? 00:11:28.333 --> 00:11:32.851 तेही सुस्थितीत असाव्यात, असं वाटणाऱ्या मुलींकडून. NOTE Paragraph 00:11:32.875 --> 00:11:34.381 फार निराश वाटलं. 00:11:34.381 --> 00:11:37.268 मला धक्का बसला. म्हणूनच मी तिथे थांबू शकले नाही. 00:11:37.292 --> 00:11:41.268 त्याआधी असं काही संशोधन करून पुस्तक लिहिण्याचा माझा बेत नव्हता. 00:11:41.292 --> 00:11:45.101 यापूर्वी मी १७ पुस्तकं लिहिली आहेत. आणि मला वाटलं होतं, की माझं कार्य संपलं. 00:11:45.125 --> 00:11:47.268 मी दिल्लीमधल्या सेंट स्टीफन्स कॉलेजसारख्या 00:11:47.292 --> 00:11:52.393 अनेक उच्चभ्रू कॉलेजांत गेले. 00:11:52.417 --> 00:11:54.476 एक स्त्री किंवा एक पुरुष असणं म्हणजे काय 00:11:54.500 --> 00:11:58.351 याविषयीची तिथल्या तरुण मुलामुलींची मतं ऐकली. 00:11:58.375 --> 00:12:01.643 ती मतं मला माझ्या नव्हे, तर माझ्या आईच्या पिढीतली वाटली. 00:12:01.667 --> 00:12:04.768 मग मी आणखी निरनिराळ्या कॉलेजांमध्ये गेले. 00:12:04.792 --> 00:12:06.476 मला सर्वात प्रकर्षाने जाणवलं, की 00:12:06.500 --> 00:12:09.934 प्रत्येक स्त्रीला एकटेपणा वाटतो, 00:12:09.958 --> 00:12:13.351 ती आपली भीती आणि आपली वागणूक दडवते, 00:12:13.375 --> 00:12:15.375 कारण तिला तो आपला स्वतःचा दोष वाटतो. 00:12:16.125 --> 00:12:19.059 हा आपला दोष नव्हे, तर आपल्याला मिळालेली शिकवणूक. 00:12:19.083 --> 00:12:21.393 याबद्दल लक्षात आलेली सर्वात मोठी गोष्ट अशी, 00:12:21.417 --> 00:12:24.851 की आपण हे ढोंग बंद केलं, 00:12:24.875 --> 00:12:26.601 की जग बदलतं. NOTE Paragraph 00:12:26.625 --> 00:12:29.309 मुलींनो, दीपा यांचं म्हणणं पटतं आहे का तुम्हांला? NOTE Paragraph 00:12:29.333 --> 00:12:32.184 (टाळ्या) NOTE Paragraph 00:12:32.208 --> 00:12:33.934 ती पहा, ती मुलगी म्हणते आहे, 00:12:33.958 --> 00:12:36.559 "त्या काय म्हणाल्या ते ऐकलंस? तू मला हेच सांगतोस." 00:12:36.583 --> 00:12:38.268 हो. असंच असायला हवं. 00:12:38.292 --> 00:12:41.018 तू, मुला, तू तडजोड कर. यापुढे आम्ही तडजोड करणार नाही. NOTE Paragraph 00:12:41.042 --> 00:12:42.601 (टाळ्या) NOTE Paragraph 00:12:42.625 --> 00:12:44.976 आभारी आहे. NOTE Paragraph 00:12:45.000 --> 00:12:46.150 (टाळ्या)