1 00:00:01,417 --> 00:00:03,893 शाह रुख खान: मुलींनी छान दिसावं. बोलू नये. 2 00:00:03,917 --> 00:00:05,643 गप्प बसा. चूप. 3 00:00:05,667 --> 00:00:09,351 हे शब्द वापरून मुलींना गप्प केलं जातं. अगदी बालपणापासून, 4 00:00:09,375 --> 00:00:10,684 प्रौढपणी, आणि 5 00:00:10,708 --> 00:00:12,434 थेट म्हातारपणापर्यंत. 6 00:00:12,458 --> 00:00:16,101 यापुढील वक्त्यांची ओळख: स्त्रीशक्तीच्या खऱ्याखुऱ्या पुरस्कर्त्या. 7 00:00:16,125 --> 00:00:17,768 जागतिक बँक, युनो आणि देशविदेशांतील 8 00:00:17,792 --> 00:00:19,934 अनेक एनजीओ संस्थांच्या 9 00:00:19,958 --> 00:00:24,268 गरिबी, लैंगिकता आणि विकास या विषयांबद्दलच्या सल्लागार. 10 00:00:24,292 --> 00:00:27,809 त्या स्वतःला सांस्कृतिक गुप्तहेर म्हणवतात. 11 00:00:27,833 --> 00:00:32,476 या सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आणि लेखिकेचं जोरदार स्वागत करू. 12 00:00:32,500 --> 00:00:34,101 दीपा नारायण. 13 00:00:34,125 --> 00:00:36,351 (संगीत) 14 00:00:36,375 --> 00:00:40,292 (टाळ्या) 15 00:00:44,708 --> 00:00:46,893 सर्व प्रेमळ पालकांना वाटतं, की 16 00:00:46,917 --> 00:00:48,768 मुलींचं चांगल्या रीतीने संगोपन करावं. 17 00:00:48,792 --> 00:00:50,601 पण प्रत्यक्षात मात्र ते 18 00:00:50,625 --> 00:00:55,143 मुलींवर बंधनं घालून त्यांना चिरडून टाकतात. 19 00:00:55,167 --> 00:00:57,018 त्यांची मनं चिरडून टाकून 20 00:00:57,042 --> 00:00:58,958 त्यांना छळ सोसायला तयार करतात. 21 00:00:59,875 --> 00:01:02,059 खरं तर हे इतकं भयानक आहे, की 22 00:01:02,083 --> 00:01:04,643 पालकांना ते सहन होत नाही. म्हणून, 23 00:01:04,667 --> 00:01:05,934 त्याचं रूप बदललं जातं. 24 00:01:05,958 --> 00:01:09,226 भारतात आम्ही त्याला "तडजोड" असं म्हणतो. 25 00:01:09,250 --> 00:01:10,792 हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल. 26 00:01:11,625 --> 00:01:13,684 "डार्लिंग, जरा जुळवून घे ना थोडंसं. 27 00:01:13,708 --> 00:01:14,976 फक्त थोडंसं जुळवून घे. 28 00:01:15,000 --> 00:01:17,976 काहीही घडलं, तरी जरा तडजोड कर. " 29 00:01:18,000 --> 00:01:21,809 "तडजोड" मुलींना शिकवते, शक्तिहीन बना. 30 00:01:21,833 --> 00:01:24,393 जगू नका. अदृश्य रहा. 31 00:01:24,417 --> 00:01:26,101 स्वत्व विसरा. 32 00:01:26,125 --> 00:01:32,518 आणि ती मुलांना शिकवते, जगावर सत्ता गाजवा. ताकद दाखवा. 33 00:01:32,542 --> 00:01:38,018 हे सगळं घडत असतानाच आपण लिंगसमभाव आणि महिलांचं सक्षमीकरण याबद्दल बोलत असतो. 34 00:01:38,042 --> 00:01:43,643 २०१२ मध्ये दिल्लीत चालत्या बसमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्कारानंतर 35 00:01:43,667 --> 00:01:48,684 मला छळामागची कारणं जाणून घेण्याची गरज वाटू लागली. 36 00:01:48,708 --> 00:01:52,143 म्हणून मी एक साधा प्रश्न विचारू लागले. 37 00:01:52,167 --> 00:01:57,458 आजच्या युगात, एक चांगली स्त्री किंवा चांगला पुरुष असणं, म्हणजे काय? 38 00:01:58,333 --> 00:02:01,226 यावर आलेल्या उत्तरांचं, खास करून तरुण पिढीच्या उत्तरांचं, 39 00:02:01,250 --> 00:02:04,601 मला इतकं आश्चर्य वाटलं, की 40 00:02:04,625 --> 00:02:10,184 हा माझ्या संशोधनाचा प्रकल्प बनला आणि त्याने माझं आयुष्य व्यापून टाकलं. 41 00:02:10,208 --> 00:02:15,643 तीन वर्षांत मी ६०० स्त्रिया, पुरुष आणि मुलांशी बोलले. 42 00:02:15,667 --> 00:02:17,476 हे सर्व सुशिक्षित, मध्यमवर्गीय होते. 43 00:02:17,500 --> 00:02:21,559 मी एकूण १८०० तास त्यांचं बोलणं ऐकलं, 44 00:02:21,583 --> 00:02:23,893 आणि त्याबद्दल ८००० पानं भरून टिपणं लिहिली. 45 00:02:23,917 --> 00:02:26,351 त्यांचा अर्थ लावायला मला आणखी एक वर्ष लागलं. 46 00:02:26,375 --> 00:02:32,434 आजकाल सर्वत्र आपण सुशिक्षित, सुरेख पोषाखातल्या स्त्रिया पाहतो. 47 00:02:32,458 --> 00:02:35,268 आज इथे जमलेल्या स्त्रिया किंवा मीही दिसते, तशाच. 48 00:02:35,292 --> 00:02:37,851 त्यामुळे आपल्याला वाटतं, की जग बदललं आहे. 49 00:02:37,875 --> 00:02:41,684 पण हे बाह्य बदल पूर्णपणे दिशाभूल करणारे आहेत. 50 00:02:41,708 --> 00:02:44,667 कारण आपल्यामध्ये अंतर्गत बदल झालेलेच नाहीत. 51 00:02:46,375 --> 00:02:48,809 म्हणून, आज इथे मी गरिबांविषयी बोलणार नाही. 52 00:02:48,833 --> 00:02:51,768 आज मी मध्यमवर्ग आणि उच्चवर्गाविषयी बोलणार आहे. 53 00:02:51,792 --> 00:02:54,893 कारण हाच वर्ग या सत्याकडे सर्वात जास्त डोळेझाक करतो. 54 00:02:54,917 --> 00:02:59,018 आपण फक्त पुन्हा पुन्हा म्हणत राहतो, की 55 00:02:59,042 --> 00:03:01,184 स्त्रियांना शिक्षण मिळालं, 56 00:03:01,208 --> 00:03:02,559 नोकऱ्या मिळाल्या, 57 00:03:02,583 --> 00:03:04,893 त्या कमावत्या झाल्या, की 58 00:03:04,917 --> 00:03:07,625 त्यांना समान हक्क मिळतील, त्या सक्षम होतील, मुक्त होतील. 59 00:03:08,667 --> 00:03:10,059 तसं झालेलं नाही. 60 00:03:10,083 --> 00:03:11,351 का? 61 00:03:11,375 --> 00:03:15,018 माझ्या संशोधनातून मला सात सवयी सापडल्या आहेत. 62 00:03:15,042 --> 00:03:16,601 त्या स्त्रियांना मिटवून टाकतात. 63 00:03:16,625 --> 00:03:18,809 त्यांना पार अदृश्य करून टाकतात. 64 00:03:18,833 --> 00:03:21,434 पण या सवयी समाजात टिकून राहिल्या आहेत, 65 00:03:21,458 --> 00:03:23,851 कारण त्या आपल्या ओळखीच्या आहेत. 66 00:03:23,875 --> 00:03:25,958 त्यांना आपण चांगल्या, सोज्वळ सवयी मानतो. 67 00:03:26,792 --> 00:03:30,375 अर्थात, चांगल्या, सोज्वळ गोष्टी कोणी कशाला बदलेल, किंवा सोडून देईल? 68 00:03:31,500 --> 00:03:33,559 एकीकडे आपण आपल्या अपत्यांवर प्रेम करतो. 69 00:03:33,583 --> 00:03:34,893 मुलींवर प्रेम करतो. 70 00:03:34,917 --> 00:03:37,292 आणि दुसरीकडे त्यांना चिरडून टाकतो. 71 00:03:38,875 --> 00:03:41,625 पहिली सवय: मुलींना शरीर नसतं. 72 00:03:43,250 --> 00:03:48,518 मुलीला नाहीसं करण्याची पहिली पायरी म्हणजे तिचं शरीर नाहीसं करणं. 73 00:03:48,542 --> 00:03:50,768 तिला शरीर नाही अशी बतावणी करणं. 74 00:03:50,792 --> 00:03:53,643 २३ वर्षे वयाची आकांक्षा म्हणते, 75 00:03:53,667 --> 00:03:58,018 "आमच्या घरी आम्ही कधीच शरीराबद्दल बोलत नाही. कधीच नाही." 76 00:03:58,042 --> 00:03:59,643 आणि याच अबोल शांततेमुळे 77 00:03:59,667 --> 00:04:03,559 करोडो मुलींवर लैंगिक अत्याचार होतात, 78 00:04:03,583 --> 00:04:06,750 पण त्या आपल्या आईलासुद्धा त्याबद्दल सांगत नाहीत. 79 00:04:07,625 --> 00:04:10,101 इतरांच्या नकारात्मक टिपण्या ऐकून 80 00:04:10,125 --> 00:04:14,833 ९० टक्के मुलींना स्वतःचंच शरीर आवडेनासं होतं. 81 00:04:15,458 --> 00:04:17,726 एखाद्या मुलीने स्वतःचं शरीर नाकारणं म्हणजे 82 00:04:17,750 --> 00:04:19,809 स्वतःचं हक्काचं एकमेव घर नाकारणं. 83 00:04:19,833 --> 00:04:22,726 मग अदृष्यपणा आणि असुरक्षित भावना 84 00:04:22,750 --> 00:04:25,393 हा तिच्या आयुष्याचा डळमळीत पाया ठरतो. 85 00:04:25,417 --> 00:04:29,000 दुसरी सवय: गप्प राहा. चूप. 86 00:04:29,583 --> 00:04:31,559 तुला अस्तित्वच नाही, 87 00:04:31,583 --> 00:04:33,184 शरीरही नाही. 88 00:04:33,208 --> 00:04:35,351 मग तुला आवाज तरी कसा असेल? 89 00:04:35,375 --> 00:04:37,268 अगदी सर्वच स्त्रियांनी मला सांगितलं, 90 00:04:37,292 --> 00:04:41,434 "लहानपणी आई ओरडायची. 91 00:04:41,458 --> 00:04:44,434 म्हणायची, बोलू नकोस. गप्प बस. चूप. 92 00:04:44,458 --> 00:04:47,976 हळू बोल. वाद घालू नकोस. उलट उत्तरं देऊ नकोस. 93 00:04:48,000 --> 00:04:49,309 उलटून बोलू नकोस." 94 00:04:49,333 --> 00:04:50,875 तुम्ही सर्वांनीही हे ऐकलं असेल. 95 00:04:51,750 --> 00:04:54,226 यामुळे मुली घाबरतात, आणि मिटून जातात. 96 00:04:54,250 --> 00:04:57,643 त्या गप्प होतात, आणि म्हणतात, 97 00:04:57,667 --> 00:04:59,476 "सोडून देऊ. जाऊ दे. 98 00:04:59,500 --> 00:05:01,333 काय उपयोग? कोणी ऐकणार नाही." 99 00:05:02,375 --> 00:05:04,184 सुशिक्षित स्त्रिया म्हणाल्या, 100 00:05:04,208 --> 00:05:05,768 आमची सर्वात मोठी समस्या म्हणजे 101 00:05:05,792 --> 00:05:09,059 धीटपणे बोलता न येणं. 102 00:05:09,083 --> 00:05:11,976 जणु आम्ही बोललो तर कोणी गळ्यावर टाच लावून 103 00:05:12,000 --> 00:05:13,250 गळाच दाबणार आहे. 104 00:05:14,250 --> 00:05:17,208 बोलता न आल्यामुळे स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाचे तुकडे पडतात. 105 00:05:19,375 --> 00:05:22,268 तिसरी सवय: लोकांना खूष करा. 106 00:05:22,292 --> 00:05:23,559 इतरांना खूष करा. 107 00:05:23,583 --> 00:05:26,726 सतत हसणारी, कशालाच नकार न देणारी, 108 00:05:26,750 --> 00:05:29,184 कोणी शोषण केलं तरीही न रागावणारी 109 00:05:29,208 --> 00:05:31,268 अशी छानशी स्त्री सर्वांनाच आवडते. 110 00:05:31,292 --> 00:05:34,018 १८ वर्षे वयाची अमिषा म्हणाली, 111 00:05:34,042 --> 00:05:36,309 "माझे वडील म्हणत, 112 00:05:36,333 --> 00:05:39,333 तू हसताना दिसली नाहीस तर मला काही बरं वाटत नाही." 113 00:05:40,167 --> 00:05:41,476 म्हणून ती हसते. 114 00:05:41,500 --> 00:05:44,059 म्हणजे तिच्या वडिलांनी तिला शिकवलं, की 115 00:05:44,083 --> 00:05:48,018 तुझ्या आनंदापेक्षा माझा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. 116 00:05:48,042 --> 00:05:52,268 सतत सर्वांना खूष ठेवण्याचा प्रयत्न करत राहिल्यामुळे 117 00:05:52,292 --> 00:05:55,167 मुली निर्णय घ्यायला घाबरतात. 118 00:05:56,042 --> 00:05:58,643 त्यांना काही विचारलं, की म्हणतात, 119 00:05:58,667 --> 00:06:01,042 "काही चालेल. कुछ भी. 120 00:06:01,917 --> 00:06:03,708 मला सगळं चालतं. चलता है." 121 00:06:05,083 --> 00:06:07,101 २५ वर्षे वयाची दर्शा 122 00:06:07,125 --> 00:06:09,018 मोठ्या अभिमानाने सांगते, 123 00:06:09,042 --> 00:06:11,518 "मी अगदी लवचिक आहे. 124 00:06:11,542 --> 00:06:14,792 इतरांना जशी हवी तशी मी होऊ शकते." 125 00:06:15,500 --> 00:06:18,226 अशा मुली आपली स्वप्नं विसरून जातात. 126 00:06:18,250 --> 00:06:19,559 इच्छा विसरून जातात. 127 00:06:19,583 --> 00:06:21,518 आणि कोणाला त्याची दखल नसते. 128 00:06:21,542 --> 00:06:23,476 एक नैराश्य सोडून. 129 00:06:23,500 --> 00:06:24,750 ते त्यांना ग्रासतं. 130 00:06:25,583 --> 00:06:29,000 त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक तुकडा निखळून पडतो. 131 00:06:31,042 --> 00:06:33,750 चौथी सवय: तुम्हांला लैंगिकता नाही. 132 00:06:35,000 --> 00:06:39,101 १.३ अब्ज लोकसंख्येच्या आपल्या देशात 133 00:06:39,125 --> 00:06:41,000 लैंगिकता ही काही नवी गोष्ट नव्हे. 134 00:06:42,208 --> 00:06:46,934 नवी गोष्ट ही, की स्त्रीला लैंगिक इच्छा असण्याचा हक्क आहे, 135 00:06:46,958 --> 00:06:50,000 हे आता मान्य होऊ लागलं आहे. 136 00:06:51,042 --> 00:06:54,518 पण ज्या स्त्रीला स्वतःचं शरीर स्वतःच्या मालकीचं असण्याची मुभा नाही, 137 00:06:54,542 --> 00:06:56,976 जिला स्वतःच्या शरीराबद्दल शिक्षण दिलं जात नाही, 138 00:06:57,000 --> 00:06:59,476 जिच्यावर कदाचित लैंगिक अत्याचार झाले असतील, 139 00:06:59,500 --> 00:07:00,976 जिला नाही म्हणता येत नाही, 140 00:07:01,000 --> 00:07:03,184 आणि जिला स्वतःची शरम वाटत असेल, 141 00:07:03,208 --> 00:07:05,583 ती स्वतःची लैंगिक इच्छापूर्ती कशी करणार? 142 00:07:06,417 --> 00:07:09,042 स्त्रीची लैंगिकता दडपली गेली आहे. 143 00:07:10,625 --> 00:07:13,917 पाचवी सवय: स्त्रियांवर विश्वास ठेवू नका. 144 00:07:15,083 --> 00:07:17,434 कल्पना करा, सर्व स्त्रियांची एकजूट झाली, 145 00:07:17,458 --> 00:07:19,934 तर जग किती बदलेल. 146 00:07:19,958 --> 00:07:22,768 आणि नेमकं हेच होऊ नये, म्हणून 147 00:07:22,792 --> 00:07:26,268 आमची संस्कृती पुरुषांशी इमान राखणे, कुटुंबातल्या गोष्टी गुप्त ठेवणे 148 00:07:26,292 --> 00:07:29,583 अशा गोष्टींना मोठं नैतिक महत्त्व देते. 149 00:07:30,125 --> 00:07:31,768 एकामागून एक स्त्रियांनी सांगितलं, 150 00:07:31,792 --> 00:07:34,393 "माझा फक्त एकाच स्त्रीवर विश्वास आहे. 151 00:07:34,417 --> 00:07:36,018 आणि ती स्त्री म्हणजे मी स्वतः." 152 00:07:36,042 --> 00:07:37,559 ३० वर्षे वयाची रुचि 153 00:07:37,583 --> 00:07:41,476 दिल्ली विद्यापीठात स्त्रियांच्या सबलीकरणावर काम करते. तीदेखील म्हणाली, 154 00:07:41,500 --> 00:07:45,393 "माझा स्त्रियांवर विश्वास नाही. त्या मत्सरी असतात, पाठीत खंजीर खुपसतात." 155 00:07:45,417 --> 00:07:47,184 साहजिकच, शहरांमधून 156 00:07:47,208 --> 00:07:49,059 स्त्रिया महिला गटांत सामील होत नाहीत. 157 00:07:49,083 --> 00:07:52,333 यामागचं कारण विचारल्यावर सांगतात, "मला कुचाळक्या करायला वेळ नाही." 158 00:07:53,208 --> 00:07:57,125 एकट्या स्त्रीला नेस्तनाबूत करणं जास्त सोपं असतं. 159 00:07:58,375 --> 00:08:01,917 सहावी सवय: आपल्या इच्छेपेक्षा कर्तव्य महान. 160 00:08:02,833 --> 00:08:07,143 चांगल्या मुलीची ही लांबलचक व्याख्या सांगणारी मुस्कान फक्त १५ वर्षांची आहे. 161 00:08:07,167 --> 00:08:09,768 "दयाळू, मृदु स्वभावाची, नम्र, प्रेमळ, काळजी घेणारी, 162 00:08:09,792 --> 00:08:12,226 सत्यवचनी, आज्ञाधारक, मोठ्यांचा आदर करणारी, 163 00:08:12,250 --> 00:08:15,917 विनाअट मदत करणारी, चांगुलपणाने वागणारी, आणि आपली कर्तव्ये पार पाडणारी." 164 00:08:17,667 --> 00:08:19,559 बाप रे! 165 00:08:19,583 --> 00:08:22,518 कर्तव्य पार पाडून होईपर्यंत 166 00:08:22,542 --> 00:08:25,976 उरलीसुरली इच्छा नाहीशी होणारच. 167 00:08:26,000 --> 00:08:29,518 मग जेव्हा त्यागमूर्ती आईजवळ 168 00:08:29,542 --> 00:08:31,226 जेवणाखेरीज दुसरा विषय उरत नाही, 169 00:08:31,250 --> 00:08:35,184 फक्त "जेवलास का? जेवायला काय करू?" 170 00:08:35,208 --> 00:08:39,292 तेव्हा २४ वर्षीय सौरभ सारखे पुरुष त्यांना "कंटाळवाणी आई" म्हणतात. 171 00:08:40,417 --> 00:08:42,976 स्त्री केवळ अवशेषमात्र उरते. 172 00:08:43,000 --> 00:08:47,184 सातवी सवय: पूर्णपणे परावलंबी व्हा. 173 00:08:47,208 --> 00:08:50,309 या सर्व सवयी स्त्रीला चिरडून टाकतात. 174 00:08:50,333 --> 00:08:51,851 तिचं मन भीतीने भरून टाकतात. 175 00:08:51,875 --> 00:08:55,476 आणि आपल्या चरितार्थासाठी पूर्णपणे पुरुषांवर अवलंबून राहायला भाग पाडतात. 176 00:08:55,500 --> 00:08:59,167 यामुळे पुरुषी वर्चस्व कायम राहतं. 177 00:09:00,083 --> 00:09:04,601 म्हणजे, चांगल्या आणि नैतिक समजल्या गेलेल्या या सात सवयी 178 00:09:04,625 --> 00:09:07,518 मुलींचं आयुष्य ओरबाडून घेतात, 179 00:09:07,542 --> 00:09:09,958 आणि पुरुषांना छळ करू देतात. 180 00:09:11,125 --> 00:09:12,976 आपण बदललं पाहिजे. 181 00:09:13,000 --> 00:09:14,250 बदलायचं कसं? 182 00:09:15,083 --> 00:09:16,917 एक सवय म्हणजे फक्त एक सवय, इतकंच. 183 00:09:17,708 --> 00:09:20,101 प्रत्येक सवय आपण लावून घेतलेली असते. 184 00:09:20,125 --> 00:09:21,684 तशीच ती आपण मोडूही शकतो. 185 00:09:21,708 --> 00:09:24,393 स्वतःमधला हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. 186 00:09:24,417 --> 00:09:26,518 मला सुद्धा बदलावं लागलं होतं. 187 00:09:26,542 --> 00:09:29,101 पण यामुळे करोडो स्त्रियांना 188 00:09:29,125 --> 00:09:31,417 चिरडून टाकणारा समाज बदलणार नाही. 189 00:09:32,292 --> 00:09:34,393 म्हणून आपल्याला पार मुळापर्यंत जायला हवं. 190 00:09:34,417 --> 00:09:38,809 चांगली स्त्री किंवा चांगला पुरुष असणं या शब्दांचे अर्थ बदलायला हवेत. 191 00:09:38,833 --> 00:09:41,583 कारण प्रत्येक समाजाचा हा पाया आहे. 192 00:09:42,292 --> 00:09:46,684 आपल्याला लवचिक स्त्रिया नकोत, लवचिक व्याख्या हव्यात. 193 00:09:46,708 --> 00:09:48,268 पुरुषांसाठी सुद्धा. 194 00:09:48,292 --> 00:09:53,518 हा मोठा सामाजिक बदल पुरुषांच्या सहभागाशिवाय घडून येणार नाही. 195 00:09:53,542 --> 00:09:54,809 आम्हांला तुमची गरज आहे. 196 00:09:54,833 --> 00:09:57,851 बदलाला पाठिंबा देणाऱ्या पुरुषांची गरज आहे, 197 00:09:57,875 --> 00:10:01,059 जोरदार बदल घडवून आणण्यासाठी. 198 00:10:01,083 --> 00:10:03,601 नाहीतर आपल्या मुलींचं आणि मुलांचं 199 00:10:03,625 --> 00:10:05,976 आयुष्य सुरक्षित आणि मुक्त व्हायला 200 00:10:06,000 --> 00:10:07,250 दोन शतकं लागतील. 201 00:10:08,292 --> 00:10:14,559 कल्पना करा, अर्धा अब्ज स्त्रिया एकत्र येऊन, पुरुषांच्या पाठिंब्यासहित 202 00:10:14,583 --> 00:10:17,684 एकमेकांशी वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर 203 00:10:17,708 --> 00:10:19,601 बदल घडवण्यासंबंधी संवाद साधताहेत. 204 00:10:19,625 --> 00:10:21,976 पुरुष आपल्या वर्तुळांत हाच संवाद करताहेत. 205 00:10:22,000 --> 00:10:26,268 स्त्रिया आणि पुरुष एकत्र येऊन एकमेकांचं बोलणं ऐकून घेताहेत. 206 00:10:26,292 --> 00:10:28,684 कोणाला दोषी न ठरवता. 207 00:10:28,708 --> 00:10:31,518 आरोप न ठेवता, शरम न बाळगता, 208 00:10:31,542 --> 00:10:33,601 कल्पना करा, आपण किती बदलून जाऊ. 209 00:10:33,625 --> 00:10:35,518 आपण सगळे मिळून हे करू शकतो. 210 00:10:35,542 --> 00:10:37,958 स्त्रियांनो, जुळवून घेऊ नका. 211 00:10:39,167 --> 00:10:41,083 पुरुषांनो, तडजोड करा. 212 00:10:41,958 --> 00:10:43,726 ती वेळ आता आली आहे. 213 00:10:43,750 --> 00:10:45,101 धन्यवाद. 214 00:10:45,125 --> 00:10:48,958 (टाळ्या) 215 00:10:49,542 --> 00:10:51,175 फार चांगलं व्याख्यान. सुरेख. 216 00:10:51,175 --> 00:10:52,937 सर्वांतर्फे अभिवादन, दीपा. 217 00:10:53,000 --> 00:10:54,809 त्यांचं व्याख्यान ऐकताना मला जाणवलं, की 218 00:10:54,833 --> 00:10:58,393 स्त्रियांसोबतचं आपलं साधं बोलणंसुद्धा 219 00:10:58,417 --> 00:10:59,976 किती आक्रमक असतं. 220 00:11:00,000 --> 00:11:02,893 उदाहरणार्थ, माझ्या मुलीला मी कधीकधी म्हणतो, 221 00:11:02,917 --> 00:11:06,059 "तू हसलीस की मला बरं वाटतं, नाहीतर वाईट वाटतं." 222 00:11:06,083 --> 00:11:07,684 मी पुन्हा असं कधीच म्हणणार नाही. 223 00:11:07,708 --> 00:11:09,768 आजपासून मी माझ्या मुलीला सांगेन, 224 00:11:09,792 --> 00:11:11,101 तू जे करशील ते मला आवडेल. 225 00:11:11,125 --> 00:11:13,726 आणि मला नाही आवडलं, तर माझ्याकडे दुर्लक्ष कर. 226 00:11:13,750 --> 00:11:16,601 तुला जे आवडेल, तेच तू कर. बरोबर? 227 00:11:16,625 --> 00:11:19,518 हो. (टाळ्या) 228 00:11:19,542 --> 00:11:21,018 अपुऱ्या कहाण्या, इच्छा, 229 00:11:21,042 --> 00:11:26,976 न मिळालेलं स्वातंत्र्य याबद्दल प्रथम ऐकताना 230 00:11:27,000 --> 00:11:28,309 तुम्हांला काय वाटलं? 231 00:11:28,333 --> 00:11:32,851 तेही सुस्थितीत असाव्यात, असं वाटणाऱ्या मुलींकडून. 232 00:11:32,875 --> 00:11:34,381 फार निराश वाटलं. 233 00:11:34,381 --> 00:11:37,268 मला धक्का बसला. म्हणूनच मी तिथे थांबू शकले नाही. 234 00:11:37,292 --> 00:11:41,268 त्याआधी असं काही संशोधन करून पुस्तक लिहिण्याचा माझा बेत नव्हता. 235 00:11:41,292 --> 00:11:45,101 यापूर्वी मी १७ पुस्तकं लिहिली आहेत. आणि मला वाटलं होतं, की माझं कार्य संपलं. 236 00:11:45,125 --> 00:11:47,268 मी दिल्लीमधल्या सेंट स्टीफन्स कॉलेजसारख्या 237 00:11:47,292 --> 00:11:52,393 अनेक उच्चभ्रू कॉलेजांत गेले. 238 00:11:52,417 --> 00:11:54,476 एक स्त्री किंवा एक पुरुष असणं म्हणजे काय 239 00:11:54,500 --> 00:11:58,351 याविषयीची तिथल्या तरुण मुलामुलींची मतं ऐकली. 240 00:11:58,375 --> 00:12:01,643 ती मतं मला माझ्या नव्हे, तर माझ्या आईच्या पिढीतली वाटली. 241 00:12:01,667 --> 00:12:04,768 मग मी आणखी निरनिराळ्या कॉलेजांमध्ये गेले. 242 00:12:04,792 --> 00:12:06,476 मला सर्वात प्रकर्षाने जाणवलं, की 243 00:12:06,500 --> 00:12:09,934 प्रत्येक स्त्रीला एकटेपणा वाटतो, 244 00:12:09,958 --> 00:12:13,351 ती आपली भीती आणि आपली वागणूक दडवते, 245 00:12:13,375 --> 00:12:15,375 कारण तिला तो आपला स्वतःचा दोष वाटतो. 246 00:12:16,125 --> 00:12:19,059 हा आपला दोष नव्हे, तर आपल्याला मिळालेली शिकवणूक. 247 00:12:19,083 --> 00:12:21,393 याबद्दल लक्षात आलेली सर्वात मोठी गोष्ट अशी, 248 00:12:21,417 --> 00:12:24,851 की आपण हे ढोंग बंद केलं, 249 00:12:24,875 --> 00:12:26,601 की जग बदलतं. 250 00:12:26,625 --> 00:12:29,309 मुलींनो, दीपा यांचं म्हणणं पटतं आहे का तुम्हांला? 251 00:12:29,333 --> 00:12:32,184 (टाळ्या) 252 00:12:32,208 --> 00:12:33,934 ती पहा, ती मुलगी म्हणते आहे, 253 00:12:33,958 --> 00:12:36,559 "त्या काय म्हणाल्या ते ऐकलंस? तू मला हेच सांगतोस." 254 00:12:36,583 --> 00:12:38,268 हो. असंच असायला हवं. 255 00:12:38,292 --> 00:12:41,018 तू, मुला, तू तडजोड कर. यापुढे आम्ही तडजोड करणार नाही. 256 00:12:41,042 --> 00:12:42,601 (टाळ्या) 257 00:12:42,625 --> 00:12:44,976 आभारी आहे. 258 00:12:45,000 --> 00:12:46,150 (टाळ्या)