या धड्याला लूपची गंमत असे म्हणतात. या धड्यात आपण फाशांचा खेळ खेळण्यासाठी संख्या रेखा वापरू. प्रत्येक खेळाडू सुरुवातीचे मूल्य, अंतिम मूल्य आणि आपला कालावधी निश्चित करायला तीन वेळा फासा फेकेल. प्रत्येक पाळीच्या वेळी, आपण आपल्या सुरुवातीच्या मूल्याला गोल करू आणि आपल्या कालावधीच्या मूल्याइतक्या पायऱ्या पुढे असलेल्या प्रत्येक मूल्याला आपण गोल करू. जेव्हा आपण आपल्या अंतिम मूल्यापर्यंत पोचू तेव्हा आपण गोळा करणे थांबवू. सर्वांत जास्त गुण असलेली व्यक्ती जिंकेल! अनेक ठिकाणी लूप्स उपयुक्त ठरतात. जर तुम्ही हवामानशास्त्रज्ञ असाल तर तुम्ही नेहमी लूप्स वापरता. हाय, मी बेकी आहे. मी एबल ड्रिलर रिन्यूएबल्समध्ये वाऱ्याची हवामानशास्त्रज्ञ म्हणून काम करते. मी कंपनीच्या मालकीची विंड फार्म्स असलेल्या कोलंबिया नदीच्या घळईच्या भागासाठी वाऱ्याच्या वेगाचा अंदाज व्यक्त करते. आम्ही किती वारा येणार आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आम्हाला किती ऊर्जा तयार होणार आहे, हे समजेल. आम्ही ती माहिती प्रत्यक्ष वेळी ऊर्जेचा व्यापार करणाऱ्यांना देतो. आम्ही किती वीज निर्माण होणार आहे, हे त्यांना सांगतो त्यानुसार ते विजेची खरेदी-विक्री करतात. म्हणजे पॉवर ग्रीड संतुलित करता येते, तुमचे दिवे सुरू राहतात, आणि आम्हाला आमच्या विंड फार्म्समधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आम्ही पोर्टलँडमध्ये एबर ट्रोलर रीन्यूएबल्सच्या राष्ट्रीय नियंत्रण केंद्रात आहोत. आणि इथे आमच्याकडे आमच्या देशभरातील सगळ्या फार्म्समधून माहिती येते. आजचे जगातील सर्वांत ताकदवान कॉम्प्युटर्ससुद्धा सगळीकडे वातावरणाचे सिम्युलेशन करू शकत नाहीत. कॉम्प्युटर वापरून हवामानाचा अंदाज करणाऱ्या मॉडेल्समध्ये ग्रीड असते. प्रत्येक ग्रीड पॉईंट म्हणजे एक अक्षांश आणि रेखांश असतो. आम्हाला भौतिकशास्त्राचा अभ्यास करावा लागतो, आणि वाऱ्याच्या वेगाचा, तापमानाचा, दाबाचा आणि अशा गोष्टींचा अंदाज वर्तवावा लागतो. आमची ग्रीड्स खूप मोठी असल्यामुळे आणि आम्ही हे अनेक ठिकाणी करत आहोत. आम्ही या गोष्टी लाखो वेळा पुन्हा पुन्हा लूप करत आहोत. मी जे काही करतो, त्यात मी फॉर लूप्स वापरतो. फॉर लूपचे उदाहरण इथं आहे. जेव्हा तुम्ही वाऱ्याचा अंदाज वर्तवत असता तेव्हा त्यात अनेक घटक असतात, त्यामुळे मानवाने बसून हे सगळे गणित करणे अशक्य आहे. वाऱ्यावर ज्यांचा परिणाम होणार आहे, असे अनेक वेगवेगळे घटक आहेत. अंदाज वर्तवण्यासाठी आम्हाला ते कॉम्प्युटर मॉडेलमध्ये घालावे लागते.