या धड्याचं नाव आहे पाकीटातली व्हेरीएबल्स. आपल्याकडं काही माहिती उपलब्ध नसतानासुद्धा आपण वाक्यं कशी तयार करू शकतो, हे आपण शिकणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना गाळलेल्या जागा भरा ही संकल्पना माहिती आहे. आपण आपलं नाव गृहपाठात लिहितानासुद्धा हे करतो. कधीकधी, एकापेक्षा जास्त गाळलेल्या जागा भरायच्या असतात आणि अशावेळी आपण त्या रिकाम्या जागेला एक नाव देतो म्हणजे आपल्याला कुठली माहिती कुठं भरायची ते कळेल. आपण जी माहिती बदलू शकतो त्या जागी प्लेसहोल्डर्स म्हणून व्हेरीएबल्स वापरले जातात. नसलेल्या माहितीसाठी व्हेरीएबल वापरून, आपण जे काही करत होतो त्यावर काम करण्याकडे परत जाऊ शकतो आणि कोणालातरी ती माहिती नंतर भरायला सांगू शकतो. सॉफ्टवेअरमध्ये, आपण खूप वेळा व्हेरीएबल्स वापरतो. आपण नाव, इमेल पत्ता आणि अगदी युजरच्या नावासाठीसुद्धा प्लेसहोल्डर्स म्हणून व्हेरीएबल्स वापरतो. अशाप्रकारे, आपण हा तपशील युजरने भरल्यावर कुठे दिसेल, ते प्रोग्रॅमला सांगतो. आम्ही आमच्या कामात नेहमी व्हेरीएबल्स वापरतो. तुम्हाला कोणत्याही वेळी नंतर वापरण्यासाठी माहिती साठवायची असेल तर आपण व्हेरीएबल वापरतो. समजा आपल्याला युजरनं कितीवेळा ट्विट केलं आहे हे मोजायचं आहे. युजरनं प्रत्येकवेळा ट्विट केलं की आपण त्या संख्येत एक मिळवू. आणि प्रत्येकवेळी युजरनं ट्विट डीलीट केलं की आपण त्या संख्येतून एक वजा करू. आपल्याला कोणात्याही वेळी युजरनं कितीवेळा ट्विट केलं ती संख्या हवी असेल तेव्हा आपण फक्त तो व्हेरीएबल बघू.