WEBVTT 00:00:00.760 --> 00:00:02.376 जेव्हा मी सहा वर्षांचा झालो, 00:00:02.400 --> 00:00:03.890 मला माझ्या भेटवस्तू मिळाल्या. 00:00:04.320 --> 00:00:07.776 माझ्या पहिलीच्या बाईंची हि एक सुंदर कल्पना होती. 00:00:07.800 --> 00:00:11.136 त्यांना आम्हांला भेटवस्तू स्वीकारणं अनुभवू द्यायचं होतं 00:00:11.160 --> 00:00:15.160 पण त्याचवेळी एकमेकांची प्रशंसा करण्याचा गुणही शिकवायचा होता. 00:00:15.640 --> 00:00:18.536 म्हणून त्या आम्हां सर्वांना वर्गात पुढे बोलवायच्या, 00:00:18.560 --> 00:00:21.536 आणि आमच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू कोपऱ्यात रचून ठेवायच्या. 00:00:21.560 --> 00:00:22.776 आणि त्या म्हणायच्या, 00:00:22.800 --> 00:00:25.456 "आपण इथे उभं राहून एकमेकांची प्रशंसा का करू नये? 00:00:25.480 --> 00:00:27.056 जर तुमचं नाव पुकारलं गेलं, 00:00:27.080 --> 00:00:29.280 तर तिथे जाऊन तुमची भेटवस्तू उचला आणि जागेवर बसा 00:00:30.520 --> 00:00:32.000 किती सुंदर कल्पना, बरोबर? 00:00:32.880 --> 00:00:34.096 काय चूक घडू शकतं? NOTE Paragraph 00:00:34.120 --> 00:00:35.640 (हशा) NOTE Paragraph 00:00:36.400 --> 00:00:38.456 सुरुवातीला आम्ही ४० जण होतो, 00:00:38.480 --> 00:00:40.936 आणि दरवेळी कुणाचं तरी नाव पुकारल्याचं ऐकल्यावर, 00:00:40.960 --> 00:00:42.760 मी अगदी मनापासून आनंद व्यक्त करायचो. 00:00:43.280 --> 00:00:45.776 आणि मग २० जण उरले, 00:00:45.800 --> 00:00:47.576 आणि १० उरले, 00:00:47.600 --> 00:00:48.960 आणि पाच उरले... 00:00:49.560 --> 00:00:50.936 आणि तीन उरले. 00:00:50.960 --> 00:00:52.160 आणि मी त्यांपैकी एक होतो. 00:00:52.720 --> 00:00:54.320 आणि प्रशंसोद्गार थांबले. 00:00:55.560 --> 00:00:57.600 त्याक्षणी, मी रडत होतो. 00:00:58.600 --> 00:01:00.616 आणि बाईंची अवस्था विचित्र झाली होती. 00:01:00.640 --> 00:01:04.296 त्या म्हणत होत्या, "अरे, या लोकांबद्दल कोणी काही चांगलं बोलेल का?" NOTE Paragraph 00:01:04.319 --> 00:01:05.350 (हशा) NOTE Paragraph 00:01:05.350 --> 00:01:08.846 "कुणीच नाही? ठीक आहे, तुम्ही तुमच्या भेटवस्तू घेऊन जागेवर का बसत नाही. 00:01:08.846 --> 00:01:10.046 पुढच्या वर्षी नीट वागा -- 00:01:10.046 --> 00:01:12.146 कुणीतरी तुमच्याबद्दल काहीतरी चांगलं बोलेल." NOTE Paragraph 00:01:12.146 --> 00:01:13.720 (हशा) NOTE Paragraph 00:01:14.520 --> 00:01:16.136 हे सगळं वर्णन मी आपल्याला सांगत 00:01:16.160 --> 00:01:18.966 असताना कदाचित तुम्हांला कळलं असेल कि हे माझ्या लक्षात आहे. NOTE Paragraph 00:01:18.966 --> 00:01:20.160 (हशा) NOTE Paragraph 00:01:20.800 --> 00:01:22.896 पण त्यादिवशी नक्की कुणाला वाईट वाटलं हे ठाऊक 00:01:22.920 --> 00:01:25.096 नाही. मला का बाईंना? 00:01:25.120 --> 00:01:28.256 त्यांना कळून चुकलं असणार कि एका संघ उभारणीच्या घटनेचं रूपांतर 00:01:28.280 --> 00:01:31.080 त्यांनी तीन षड्वर्षीय बालकांसाठी एका जाहीर फजितीत केलं होतं 00:01:31.800 --> 00:01:33.056 आणि विनोदाशिवाय. असं बघा, 00:01:33.080 --> 00:01:35.416 जेव्हा आपण टीव्हीवर लोकांचा पाणउतारा झालेला पाहतो, 00:01:35.440 --> 00:01:36.656 ते मजेशीर असतं. 00:01:36.680 --> 00:01:38.538 त्या दिवसाबद्दल काहीच मजेशीर नव्हतं. NOTE Paragraph 00:01:39.320 --> 00:01:42.336 ते माझं एक रूप होतं, 00:01:42.360 --> 00:01:45.856 आणि तशी परिस्थिती पुन्हा ओढवण्याऐवजी मी मरण पत्करेन -- 00:01:45.880 --> 00:01:47.760 जाहीररीत्या नाकारलं जाण्याची परिस्थिती. 00:01:48.440 --> 00:01:49.896 ते एक रूप आहे. 00:01:49.920 --> 00:01:52.376 नंतर आठ वर्षांनी पुढे येऊ. 00:01:52.400 --> 00:01:54.376 बिल गेट्स माझ्या गावी आले होते -- 00:01:54.400 --> 00:01:55.616 बीजींग, चीन -- 00:01:55.640 --> 00:01:56.856 भाषण देण्यासाठी, 00:01:56.880 --> 00:01:58.616 आणि मी त्यांचा संदेश पाहिला. 00:01:58.640 --> 00:02:00.936 मी त्या माणसाच्या प्रेमात पडलो. 00:02:00.960 --> 00:02:03.856 मी विचार केला, वा, आता मला काय करायचं आहे हे मला कळलंय. 00:02:03.880 --> 00:02:06.016 त्या रात्री मी माझ्या कुटुंबीयांना एक पत्र 00:02:06.040 --> 00:02:08.336 लिहीलं आणि कळवलं: "२५ वर्षांचा होईस्तोवर, 00:02:08.360 --> 00:02:10.976 मी जगातील सर्वांत मोठी कंपनी उभारेन, 00:02:11.000 --> 00:02:12.936 आणि ती कंपनी मायक्रोसॉफ्टला खरेदी करेल." NOTE Paragraph 00:02:12.960 --> 00:02:14.856 (हशा) NOTE Paragraph 00:02:14.880 --> 00:02:17.496 जग जिंकण्याच्या या कल्पनेला मी पूर्णतः अंगीकारलं -- 00:02:17.520 --> 00:02:18.720 वर्चस्व, बरोबर? 00:02:19.160 --> 00:02:21.976 आणि हि बनवाबनवी नाही, मी खरंच ते पत्र लिहीलं. 00:02:22.000 --> 00:02:23.336 आणि हे बघा ते -- NOTE Paragraph 00:02:23.360 --> 00:02:25.336 (हशा) NOTE Paragraph 00:02:25.360 --> 00:02:27.176 तुम्ही ते खरंतर वाचण्याची गरज नाही -- NOTE Paragraph 00:02:27.200 --> 00:02:28.976 (हशा) NOTE Paragraph 00:02:29.000 --> 00:02:32.240 हे एक खराब हस्ताक्षरदेखील आहे, पण काही महत्वाचे शब्द मी ठळक केले आहेत 00:02:33.600 --> 00:02:34.816 तुम्हाला कल्पना आलीच असेल NOTE Paragraph 00:02:34.840 --> 00:02:36.616 (हशा) NOTE Paragraph 00:02:36.640 --> 00:02:37.840 तर... 00:02:39.280 --> 00:02:41.296 ते माझं दुसरं रूप होतं: 00:02:41.320 --> 00:02:43.000 एक जो जगाला जिंकेल. NOTE Paragraph 00:02:43.880 --> 00:02:45.336 मग दोन वर्षांनंतर, 00:02:45.360 --> 00:02:49.296 अमेरिकेला येण्याची एक संधी माझ्यासमोर आली. 00:02:49.320 --> 00:02:50.896 मी त्यावर तुटून पडलो, 00:02:50.920 --> 00:02:53.136 कारण तिथे बिल गेट्स राहत होते, बरोबर? NOTE Paragraph 00:02:53.160 --> 00:02:54.376 (हशा) NOTE Paragraph 00:02:54.400 --> 00:02:57.040 मला वाटलं उद्योजक बनण्याच्या प्रवासाची ती सुरुवात होती. 00:02:57.680 --> 00:02:59.856 मग, अजून १४ वर्षं पुढे येऊ. 00:02:59.880 --> 00:03:01.296 मी ३० वर्षांचा होतो. 00:03:01.320 --> 00:03:03.696 नाही, मी ती कंपनी उभारली नाही. 00:03:03.720 --> 00:03:05.256 मी सुरुवातदेखील केली नाही. 00:03:05.280 --> 00:03:09.256 एका फॉर्च्युन ५०० कंपनीत मी विपणन व्यवस्थापक होतो. 00:03:09.280 --> 00:03:10.896 आणि मला वाटत होतं मी स्थानबद्ध 00:03:10.920 --> 00:03:12.120 झालो आहे; मी अचल होतो. 00:03:13.080 --> 00:03:14.296 ते का आहे? 00:03:14.320 --> 00:03:16.560 ते पत्र लिहिणारा तो १४ वर्षीय कुठे आहे? त्याने 00:03:17.480 --> 00:03:18.957 प्रयत्न केले नाहीत म्हणून नाही. 00:03:19.480 --> 00:03:22.536 त्याचं कारण म्हणजे दरवेळी जेव्हा मला नवीन कल्पना सुचायची तेव्हा, 00:03:22.560 --> 00:03:24.536 दरवेळी जेव्हा मला काहीतरी नवीन आजमावायचं 00:03:24.560 --> 00:03:25.776 असायचं तेव्हा, कामातही -- 00:03:25.800 --> 00:03:27.536 मला प्रस्ताव मांडायचा असायचा, 00:03:27.560 --> 00:03:31.096 समूहातील लोकांसमोर मला बोलायचे असायचे -- 00:03:31.120 --> 00:03:32.936 मला वाटतं सतत एक द्वंद्व असायचं 00:03:32.960 --> 00:03:35.736 १४ वर्षीय आणि सहा वर्षीय मुलामध्ये. 00:03:35.760 --> 00:03:37.896 एकाला जग जिंकायचं असायचं -- 00:03:37.920 --> 00:03:39.136 बदल घडवायचा असायचा -- 00:03:39.160 --> 00:03:41.280 दुसरा नकारला घाबरायचा. 00:03:41.960 --> 00:03:44.480 आणि दरवेळी तो सहा वर्षांचा मुलगाच जिंकायचा NOTE Paragraph 00:03:45.760 --> 00:03:49.736 मी माझी स्वतःची कंपनी सुरु केल्यानंतरही हि भीती कायम होती. 00:03:49.760 --> 00:03:52.896 म्हणजे, मी ३० वर्षांचा असताना माझी स्वतःची कंपनी सुरु केली -- जर 00:03:52.920 --> 00:03:54.336 बिल गेट्स व्हायचं असेल 00:03:54.360 --> 00:03:56.400 तर लवकरात लवकर सुरुवात करायला हवी, बरोबर? 00:03:57.080 --> 00:03:59.616 मी जेव्हा उद्योजक होतो, 00:03:59.640 --> 00:04:02.536 तेव्हा मला एक गुंतवणुकीची संधी पेश झाली, 00:04:02.560 --> 00:04:04.360 आणि नंतर ती नाकारण्यात आली. 00:04:05.040 --> 00:04:06.776 आणि तो नकार मला खुपला. 00:04:06.800 --> 00:04:10.400 तो इतका खुपला कि मला त्याक्षणी त्यातून बाहेर पडावंसं वाटत होतं. 00:04:11.280 --> 00:04:12.496 पण मग मी विचार केला, 00:04:12.520 --> 00:04:16.360 अरे, एका सध्या गुंतवणुकीच्या नकाराने बिल गेट्सने हार पत्करली असती का? 00:04:16.920 --> 00:04:19.776 कुठलाही यशस्वी उद्योजक अशी माघार घेईल का? 00:04:19.800 --> 00:04:21.176 कदापि नाही. 00:04:21.200 --> 00:04:23.176 आणि तिथेच मला कळून चुकलं. 00:04:23.200 --> 00:04:25.016 हो, मी एक चांगली कंपनी उभारू शकतो. 00:04:25.040 --> 00:04:27.256 मी एक चांगला संघ किंवा उत्पादन तयार करू शकतो, 00:04:27.280 --> 00:04:28.816 पण एक गोष्ट नक्की: 00:04:28.840 --> 00:04:30.696 मला एक चांगला नेता व्हायला हवं. 00:04:30.720 --> 00:04:32.240 मला एक चांगला माणूस व्हायला हवं 00:04:32.720 --> 00:04:36.096 त्या सहा वर्षीय मुलाला मी माझं आयुष्य यापुढे नाही लिहू देऊ शकत. 00:04:36.120 --> 00:04:38.200 मला त्याला त्याच्या जागी परत पाठवायला हवं. NOTE Paragraph 00:04:39.000 --> 00:04:41.416 मग या ठिकाणी मी इंटरनेटवर मदतीचा शोध घेतला 00:04:41.440 --> 00:04:42.696 गुगल माझा मित्र होता. NOTE Paragraph 00:04:42.720 --> 00:04:43.856 (हशा) NOTE Paragraph 00:04:43.880 --> 00:04:46.440 मी शोधलं, "मी नकाराच्या भीतीवर कशी मात करू?" 00:04:46.960 --> 00:04:49.816 मानसशास्त्रीय लेखांचा एक समूह उत्तरादाखलआला 00:04:49.840 --> 00:04:52.696 भीती आणि वेदनांचे उगमस्थान कोणते हे सांगणारा. 00:04:52.720 --> 00:04:56.016 मग एक उत्साहवर्धक प्रेरणादायी लेखांचा समूह उत्तरादाखल आला 00:04:56.040 --> 00:04:58.421 हे सांगणारा "व्यक्तिशः घेऊ नका, त्यावर मात करा." 00:04:59.200 --> 00:05:00.856 हे कुणाला ठाऊक नाही? NOTE Paragraph 00:05:00.880 --> 00:05:02.456 (हशा) NOTE Paragraph 00:05:02.480 --> 00:05:04.616 पण मी अजूनही इतका घाबरलेला का होतो? 00:05:04.640 --> 00:05:06.656 मग नशिबानेच मला हे संकेतस्थळ सापडलं. 00:05:06.680 --> 00:05:09.056 त्याचं नाव रिजेक्शनथेरपी डॉट कॉम. NOTE Paragraph 00:05:09.080 --> 00:05:11.616 (हशा) NOTE Paragraph 00:05:11.640 --> 00:05:15.576 या कॅनेडियन उद्योजकाने हा "रिजेक्शन थेरपी" नावाचा खेळ शोधला. 00:05:15.600 --> 00:05:17.296 त्याचे नाव जेसन कोमली. 00:05:17.320 --> 00:05:22.416 आणि मूलतः कल्पना अशी आहे कि ३० दिवस तुम्ही बाहेर जाऊन नकार शोधायचा, 00:05:22.440 --> 00:05:24.696 आणि रोज कशात तरी नाकारून घ्यायचे, 00:05:24.720 --> 00:05:28.240 आणि मग अखेरीस तुम्ही स्वतःला, दुःखाबाबत असंवेदनशील बनवायचे. 00:05:29.200 --> 00:05:30.896 आणि मला ती कल्पना आवडली. NOTE Paragraph 00:05:30.920 --> 00:05:32.456 (हशा) NOTE Paragraph 00:05:32.480 --> 00:05:34.616 मी म्हणालो, "तुम्हाला ठाऊक आहे? मी हे करणार. 00:05:34.640 --> 00:05:37.656 आणि १०० दिवस मी स्वतःला नाकारून घेणार." 00:05:37.680 --> 00:05:40.096 आणि नाकारून घेण्याच्या मी स्वतः काही कल्पना लढवल्या 00:05:40.120 --> 00:05:42.600 आणि मी त्याचा एक व्हिडीओ ब्लॉग तयार केला. NOTE Paragraph 00:05:43.600 --> 00:05:45.536 आणि मी हे केले. 00:05:45.560 --> 00:05:48.176 ब्लॉग हा साधारण असा होता. 00:05:48.200 --> 00:05:49.400 पहिला दिवस... NOTE Paragraph 00:05:50.000 --> 00:05:51.296 (हशा) NOTE Paragraph 00:05:51.320 --> 00:05:54.560 अनोळखी व्यक्तीकडून १०० डॉलर्स उधार घेणे. 00:05:55.720 --> 00:05:58.456 जिथे मी काम करत होतो तिथे या ठिकाणी मी गेलो. 00:05:58.480 --> 00:06:00.216 मी खाली आलो 00:06:00.240 --> 00:06:02.456 आणि मला हा धिप्पाड माणूस डेस्कमागे बसलेला दिसला 00:06:02.480 --> 00:06:04.216 तो सुरक्षा रक्षकासारखा दिसत होता. 00:06:04.240 --> 00:06:05.776 म्हणून मी त्याच्या सहज जवळ गेलो. 00:06:05.800 --> 00:06:07.536 आणि मी असच चालत राहिलो 00:06:07.560 --> 00:06:09.896 आणि माझ्या आयुष्यातील ते सर्वात लांबचं चालणं होतं 00:06:09.920 --> 00:06:12.056 माझ्या मानेवरील केस उभे राहात होते, 00:06:12.080 --> 00:06:14.536 मी घामाने निथळलो होतो आणि माझं हृदय धडधडत होतं. 00:06:14.560 --> 00:06:15.776 आणि मी तिथे पोचून म्हणालो 00:06:15.800 --> 00:06:18.456 "श्रीमान, मला आपल्याकडून १०० डॉलर्स उधार मिळतील काय?" NOTE Paragraph 00:06:18.480 --> 00:06:19.816 (हशा) NOTE Paragraph 00:06:19.840 --> 00:06:21.940 त्यांनी वर पाहिल्यावर "नाही" असा भाव होता. 00:06:22.640 --> 00:06:23.840 "का?" NOTE Paragraph 00:06:24.200 --> 00:06:26.496 आणि मी म्हणालो, "नाही? मला माफ करा." 00:06:26.520 --> 00:06:28.235 मग मी वळलो आणि पळत सुटलो. NOTE Paragraph 00:06:28.259 --> 00:06:29.619 (हशा) NOTE Paragraph 00:06:30.960 --> 00:06:32.696 मी एकदम गोरामोरा झालो होतो. 00:06:32.720 --> 00:06:34.176 पण मी स्वतःचे चित्रीकरण केलेले 00:06:34.200 --> 00:06:37.336 असल्याने - त्या रात्री मग मी स्वतःला नाकारला जात असताना पाहात होतो, 00:06:37.360 --> 00:06:39.456 मी पाहिलं कि मी किती घाबरलो होतो. 00:06:39.480 --> 00:06:41.936 मी या "छठ्या अर्थात" असलेल्या मुलासारखा दिसलो. 00:06:41.960 --> 00:06:43.376 मला मृत लोक दिसले. NOTE Paragraph 00:06:43.400 --> 00:06:45.016 (हशा) NOTE Paragraph 00:06:45.040 --> 00:06:46.576 पण मग मला हा माणूस दिसला. 00:06:46.600 --> 00:06:48.496 असं बघा कि, तो तेवढा धोकादायक नव्हता. 00:06:48.520 --> 00:06:50.896 तो एक गुबगुबीत, प्रेमळ माणूस होता, 00:06:50.920 --> 00:06:54.376 आणि त्याने मला "का?" म्हणून विचारलं देखील 00:06:54.400 --> 00:06:56.816 खरंतर, त्याने मला विनम्र स्पष्टीकरण मागितले होते. 00:06:56.840 --> 00:06:58.416 आणि मी बरंच काही सांगू शकलो असतो. 00:06:58.440 --> 00:07:00.736 मी स्पष्टीकरण देऊ शकलो असतो. मी तडजोड केली असती. 00:07:00.760 --> 00:07:02.200 पण मी त्यापैकी काहीच केले नाही 00:07:02.680 --> 00:07:04.200 मी फक्त पळ काढला. 00:07:05.160 --> 00:07:08.320 मला वाटलं, अरे, हि तर माझ्या आयुष्याची छोटी प्रतिकृतीच आहे. 00:07:08.920 --> 00:07:11.456 दरवेळी जेव्हा मला हलकासा नकार जाणवत असे, 00:07:11.480 --> 00:07:13.616 मी शक्य तितक्या जोरात पळ काढत असे. 00:07:13.640 --> 00:07:14.896 तुम्हाला माहिती आहे का? 00:07:14.920 --> 00:07:16.736 पुढच्या दिवशी, काहीही झाले तरी, 00:07:16.760 --> 00:07:18.256 मी पळ काढणार नाही. 00:07:18.280 --> 00:07:19.480 मी तिथेच थांबेन. NOTE Paragraph 00:07:20.080 --> 00:07:22.136 दुसरा दिवस: "बर्गर पुनर्भरणाची" विनंती. NOTE Paragraph 00:07:22.160 --> 00:07:24.136 (हशा) NOTE Paragraph 00:07:24.160 --> 00:07:26.456 ते जेव्हा मी बर्गरच्या हॉटेलात गेलो, 00:07:26.480 --> 00:07:28.976 मी जेवण संपवलं, मी कॅशियरपाशी गेलो आणि विचारलं, 00:07:29.000 --> 00:07:30.576 मला बर्गर पुनर्भरण करून मिळेल का? NOTE Paragraph 00:07:30.600 --> 00:07:32.776 (हशा) NOTE Paragraph 00:07:32.800 --> 00:07:35.256 तो पूर्णतः गोंधळला होता, "बर्गरचे पुनर्भरण म्हणजे?" NOTE Paragraph 00:07:35.280 --> 00:07:36.536 (हशा) NOTE Paragraph 00:07:36.560 --> 00:07:40.216 मी म्हणालो, "म्हणजे ते पेयाच्या पुनर्भरणासारखेच आहे फक्त बर्गरने करायचे." 00:07:40.240 --> 00:07:42.736 आणि तो म्हणाला, "माफ कर, मित्रा, आम्ही बर्गरचे NOTE Paragraph 00:07:42.760 --> 00:07:44.096 पुनर्भरण करत नाही." (हशा) NOTE Paragraph 00:07:44.120 --> 00:07:48.176 म्हणजे इथे नकार मिळाला आणि मी पळू शकलो असतो, पण मी थांबलो. 00:07:48.200 --> 00:07:50.336 मी म्हणालो, "अहो, मला तुमचे बर्गर्स आवडतात, 00:07:50.360 --> 00:07:51.776 मला तुमचे हॉटेल आवडते, 00:07:51.800 --> 00:07:53.896 आणि तुम्ही जर बर्गरचे पुनर्भरण केले तर, 00:07:53.920 --> 00:07:55.256 मला तुम्ही अधिक आवडू लागाल." NOTE Paragraph 00:07:55.280 --> 00:07:56.536 (हशा) NOTE Paragraph 00:07:56.560 --> 00:07:59.176 आणि तो म्हणाला, "ठीक आहे, मी माझ्या व्यवस्थापकाला सांगतो 00:07:59.200 --> 00:08:02.176 आणि कदाचित आम्ही ते करू,पण माफ करा, हे आम्ही आज नाही करू शकणार. 00:08:02.200 --> 00:08:03.616 मग मी निघालो. 00:08:03.640 --> 00:08:05.496 आणि हो, 00:08:05.520 --> 00:08:07.776 मला नाही वाटत त्यांनी बर्गरचे पुनर्भरण कधी केले NOTE Paragraph 00:08:07.800 --> 00:08:09.016 असेल. (हशा) NOTE Paragraph 00:08:09.040 --> 00:08:10.600 मला वाटतं ते अजूनही तिथे आहेत. 00:08:11.160 --> 00:08:14.456 पण मला पहिल्यांदा वाटत असलेली जीवन मृत्युची भावना 00:08:14.480 --> 00:08:15.816 आता अजिबात नव्हती, 00:08:15.840 --> 00:08:17.576 केवळ मी तिथे गुंतून राहिलो म्हणून -- 00:08:17.600 --> 00:08:19.216 केवळ मी पळ काढला नाही म्हणून. 00:08:19.240 --> 00:08:21.600 मी म्हणालो, "अरे वा, छान, मी गोष्टी शिकायलासुद्धा 00:08:22.520 --> 00:08:23.736 लागलो. मस्त." NOTE Paragraph 00:08:23.760 --> 00:08:25.960 आणि मग तिसरा दिवस: ऑलिम्पिकचे डोनट्स मिळवणे. 00:08:26.760 --> 00:08:29.280 इथे माझे आयुष्य पूर्णतः बदलून गेले. 00:08:30.120 --> 00:08:31.736 मी क्रिस्पी क्रीममधे गेलो होतो. 00:08:31.760 --> 00:08:32.976 ते डोनटचे दुकान आहे 00:08:33.000 --> 00:08:35.616 मुख्यतः अमेरिकेच्या दक्षिणपूर्व भागात आहे. 00:08:35.640 --> 00:08:37.496 माझी खात्री आहे ते इथेही असतील. 00:08:37.520 --> 00:08:38.775 आणि मी आत गेलो, 00:08:38.799 --> 00:08:41.936 मी विचारलं, "ऑलिम्पिकच्या चिन्हासारखे दिसणारे डोनट्स तुम्ही बनवू 00:08:41.960 --> 00:08:44.856 शकता का? म्हणजे पाच डोनट्स एकमेकाला जोडायचे..." 00:08:44.880 --> 00:08:47.120 म्हणजे ते हो म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, बरोबर? 00:08:47.640 --> 00:08:50.016 डोनट बनवणाऱ्याने माझे म्हणणे खूप गांभीर्याने घेतले. NOTE Paragraph 00:08:50.040 --> 00:08:51.256 (हशा) NOTE Paragraph 00:08:51.280 --> 00:08:52.496 मग तिने एक कागद घेतला, 00:08:52.520 --> 00:08:54.696 आणि रंग आणि वर्तुळं काढायला सुरुवात केली, 00:08:54.720 --> 00:08:56.736 आणि म्हणाली, "हे मी कसं बनवू शकते?" 00:08:56.760 --> 00:08:58.656 आणि १५ मिनिटांनंतर, 00:08:58.680 --> 00:09:02.096 ती एक खोकं घेऊन आली जे ऑलिम्पिकच्या वर्तुळांसारखं दिसत होतं. 00:09:02.120 --> 00:09:03.776 आणि मला खूप भरून आलं. 00:09:03.800 --> 00:09:05.936 माझा त्यावर विश्वासच बसला नाही. 00:09:05.960 --> 00:09:09.720 आणि त्या व्हिडीओला युट्युबवर आतापर्यंत पन्नास लाखवेळा पाहिलं गेलं आहे. 00:09:10.440 --> 00:09:12.536 जगाचाही त्यावर विश्वास बसला नाही. NOTE Paragraph 00:09:12.560 --> 00:09:14.080 (हशा) NOTE Paragraph 00:09:15.440 --> 00:09:18.656 तुम्हाला माहित आहे, त्यामुळे मी वर्तमानपत्रात, चर्चांमध्ये, 00:09:18.680 --> 00:09:20.096 सगळ्यांत झळकलो. 00:09:20.120 --> 00:09:21.616 आणि मी प्रसिद्ध झालो. 00:09:21.640 --> 00:09:23.776 बऱ्याच लोकांनी मला ईमेल पाठवायला सुरुवात केली 00:09:23.800 --> 00:09:26.336 आणि म्हणू लागले, "तुम्ही जे करत आहात ते जबरदस्त आहे." 00:09:26.360 --> 00:09:29.896 पण प्रसिद्धी आणि कुप्रसिद्धीने माझे काही झाले नाही. 00:09:29.920 --> 00:09:31.736 मला खरंतर शिकायचे होते, 00:09:31.760 --> 00:09:32.976 आणि स्वतःला बदलायचे होते. 00:09:33.000 --> 00:09:35.616 म्हणून मग मी माझे नकाराचे उर्वरित १०० दिवस 00:09:35.640 --> 00:09:37.536 या मैदानात रूपांतरित केले -- 00:09:37.560 --> 00:09:39.696 या शोध प्रकल्पात रूपांतरित केले. 00:09:39.720 --> 00:09:41.800 मला बघायचं होत मी काय शिकू शकतो ते. NOTE Paragraph 00:09:42.240 --> 00:09:44.016 आणि मग मी बऱ्याच गोष्टी शिकलो. 00:09:44.040 --> 00:09:45.616 मला कित्येक गुपितं कळली. 00:09:45.640 --> 00:09:48.536 उदाहरणार्थ, मला कळलं कि मी जर पळालो नाही, 00:09:48.560 --> 00:09:49.816 मला नकार मिळालेला असताना, 00:09:49.840 --> 00:09:51.896 मी नकारला होकारात बदलवू शकतो 00:09:51.920 --> 00:09:53.536 आणि जादुई शब्द आहे, "का". NOTE Paragraph 00:09:53.560 --> 00:09:57.656 मग एका दिवशी मी एका अनोळखी व्यक्तीच्या घरी गेलो, माझ्या हातात हे फुल होतं, 00:09:57.680 --> 00:09:59.096 दार ठोठावलं आणि विचारलं, 00:09:59.120 --> 00:10:01.376 "काय हो, हे फुल मी तुमच्या परसात लावू शकतो का?" NOTE Paragraph 00:10:01.400 --> 00:10:02.936 (हशा) NOTE Paragraph 00:10:02.960 --> 00:10:04.680 आणि तो म्हणाला, "नाही". 00:10:05.640 --> 00:10:07.376 पण तो जायच्या आत मी विचारलं, 00:10:07.400 --> 00:10:09.336 "अरे, मला कारण कळू शकेल का?" 00:10:09.360 --> 00:10:12.416 आणि तो म्हणाला, "माझ्याकडे कुत्रा आहे जो मी परसात 00:10:12.440 --> 00:10:14.520 ठेवलेली कुठलीही गोष्ट उकरून काढतो." 00:10:14.520 --> 00:10:16.340 मला तुमचे फुल वाया जाऊ द्यायचे नाही. 00:10:16.340 --> 00:10:19.656 जर तुम्हाला हे करायचेच असेल तर रस्त्याच्या पलीकडे जा आणि कॉनीशी बोला. 00:10:19.680 --> 00:10:20.896 तिला फुलं आवडतात." 00:10:20.920 --> 00:10:22.136 मग मी तेच केले. 00:10:22.160 --> 00:10:24.216 मी पलीकडे गेलो आणि कॉनीचे दार ठोठावले. 00:10:24.240 --> 00:10:26.096 आणि मला भेटून तिला खूप आनंद झाला. NOTE Paragraph 00:10:26.120 --> 00:10:27.816 (हशा) NOTE Paragraph 00:10:27.840 --> 00:10:29.216 आणि अर्ध्या तासानंतर, 00:10:29.240 --> 00:10:31.296 हे फुल कॉनीच्या परसात होतं. माझी खात्री आहे 00:10:31.320 --> 00:10:32.736 ते आता अधिक चांगलं दिसत असेल. NOTE Paragraph 00:10:32.760 --> 00:10:34.056 (हशा) NOTE Paragraph 00:10:34.080 --> 00:10:37.016 पण सुरुवातीच्या नकारानंतर जर मी निघून गेलो असतो तर, 00:10:37.040 --> 00:10:38.256 मी विचार केला असता, 00:10:38.280 --> 00:10:40.466 त्या माणसाचा माझ्यावर विश्वास नसल्याने ते झालं, 00:10:40.466 --> 00:10:41.676 मी वेडा झालो होतो 00:10:41.676 --> 00:10:44.276 माझा पोषाख चांगला नव्हता, मी चांगला दिसत नव्हतो म्हणून. 00:10:44.276 --> 00:10:45.386 त्यापैकी काहीच नव्हते. 00:10:45.386 --> 00:10:47.976 त्याचं कारण हे होतं कि मी जे दिलं होतं ते त्याला पाहिजे 00:10:48.000 --> 00:10:50.256 तसं नव्हतं. आणि त्याने दुसरा संदर्भ देण्याइतका 00:10:50.280 --> 00:10:51.936 विश्वास ठेवला, विक्रीची संज्ञा. 00:10:51.960 --> 00:10:53.480 मी त्या संदर्भाचे रूपांतरण केले NOTE Paragraph 00:10:54.560 --> 00:10:55.776 मग एका दिवशी - 00:10:55.800 --> 00:10:58.696 आणि मला हेही कळलं कि मी काही गोष्टी खरंच म्हणू शकतो 00:10:58.720 --> 00:11:00.656 आणि होकार मिळवण्याची शक्यता वाढवू शकतो. 00:11:00.680 --> 00:11:02.896 म्हणजे उदाहरणार्थ, एका दिवशी मी स्टारबक्स मधे 00:11:02.920 --> 00:11:06.496 गेलो आणि व्यवस्थापकाला विचारले, "काय हो, मी स्टारबक्स ग्रीटर होवू शकतो का? 00:11:06.520 --> 00:11:08.896 तो म्हणाला, "स्टारबक्स ग्रीटर म्हणजे?" 00:11:08.920 --> 00:11:11.016 मी म्हणालो, "तुम्हाला ते वॉलमार्टचे ग्रीटर्स 00:11:11.040 --> 00:11:14.456 ठाऊक आहेत? ते लोक जे तुम्ही स्टोअरमधे जात असताना तुम्हाला 'हाय' म्हणतात, 00:11:14.480 --> 00:11:17.136 आणि खरंतर तुम्ही काही चोरणार नाही याची खात्री करत असतात? 00:11:17.136 --> 00:11:19.856 मला स्टारबक्सच्या ग्राहकांना वॉलमार्टचा अनुभव द्यायचाय." NOTE Paragraph 00:11:19.880 --> 00:11:21.336 (हशा) NOTE Paragraph 00:11:21.360 --> 00:11:24.360 खरंतर ती चांगली गोष्ट आहे का नाही याची खात्री नाही -- 00:11:25.600 --> 00:11:28.096 खरंतर मला हे पक्कं माहिती आहे कि ती वाईट गोष्ट आहे. 00:11:28.120 --> 00:11:30.176 आणि त्याने "ओह" असे केले -- 00:11:30.200 --> 00:11:32.456 हो, तो असा दिसला, त्याचे नाव एरिक आहे -- 00:11:32.480 --> 00:11:34.056 आणि तो म्हणाला, "मला माहिती नाही. 00:11:34.080 --> 00:11:36.136 तो माझं म्हणणं असं ऐकत होता. "नक्की नाही." 00:11:36.160 --> 00:11:37.816 मी त्याला विचारलं "ते विचित्र आहे 00:11:37.840 --> 00:11:39.880 का?" तो म्हणाला, "हो ते खरंच विचित्र आहे." 00:11:40.800 --> 00:11:43.656 पण तो तसं म्हणताच त्याचे पूर्ण हावभावच बदलले. 00:11:43.680 --> 00:11:46.616 ते जणू काही त्याचा पूर्ण संभ्रम बाजूला ठेवण्यासारखे होते. 00:11:46.640 --> 00:11:48.376 आणि तो म्हणाला, "हो तू हे करू शकतोस, 00:11:48.400 --> 00:11:50.056 फक्त खूप काही विचित्र करू नकोस." NOTE Paragraph 00:11:50.056 --> 00:11:51.096 (हशा) NOTE Paragraph 00:11:51.120 --> 00:11:53.496 मग पुढचा तासभर मी स्टारबक्स ग्रीटर होतो. 00:11:53.520 --> 00:11:55.656 येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मी 'हाय' करायचो, 00:11:55.680 --> 00:11:58.056 आणि सुट्टीच्या शुभेच्छा द्यायचो. 00:11:58.080 --> 00:12:00.736 मला ठाऊक नाही तुमच्या कारकिर्दीची कमान कशी आहे ते, 00:12:00.760 --> 00:12:01.976 ग्रीटर होऊ नका. NOTE Paragraph 00:12:02.000 --> 00:12:03.216 (हशा) NOTE Paragraph 00:12:03.240 --> 00:12:04.440 ते खरंच कंटाळवाणं होतं. 00:12:05.200 --> 00:12:10.136 पण मग मला कळलं कि मी ते करू शकलो कारण मी म्हणालो, "ते विचित्र आहे का?" 00:12:10.160 --> 00:12:12.296 त्याला असलेली शंका मी नमूद केली होती. 00:12:12.320 --> 00:12:15.856 आणि "ते विचित्र आहे का?" असं मी म्हणल्यानेच त्यातून मी विचित्र नाही 00:12:15.880 --> 00:12:18.416 असा अर्थ निघतो, त्याचा अर्थ मी खरंतर त्याच्यासारखा 00:12:18.440 --> 00:12:20.816 विचार करत होतो या गोष्टीकडे विचित्र म्हणून बघून. 00:12:20.840 --> 00:12:22.096 आणि पुन्हा, आणि मग, 00:12:22.120 --> 00:12:25.256 मला हे कळलं कि जर लोकांच्या मनात असलेली शंका मी बोलून दाखवली, 00:12:25.280 --> 00:12:27.096 मी प्रश्न विचारायच्या आधी, 00:12:27.120 --> 00:12:28.666 तर मी त्यांचा विश्वास जिंकत असे. 00:12:28.666 --> 00:12:30.680 लोकांची हो म्हणण्याची जास्त शक्यता होती. NOTE Paragraph 00:12:30.800 --> 00:12:34.136 आणि मग मला उमजलं कि माझे स्वप्न पूर्ण करू शकतो... 00:12:34.160 --> 00:12:35.576 प्रश्न विचारून. 00:12:35.600 --> 00:12:38.696 असं बघा, माझ्या आधीच्या चार पिढ्या शिक्षकांच्या होत्या, 00:12:38.720 --> 00:12:41.536 आणि माझी आजी मला नेहमी सांगत असे, 00:12:41.560 --> 00:12:43.856 "जिया, तुला हवं असेल ते काहीही तू करू शकतोस, 00:12:43.880 --> 00:12:45.936 पण तू शिक्षक झालास तर उत्तम होईल." NOTE Paragraph 00:12:45.960 --> 00:12:47.376 (हशा) NOTE Paragraph 00:12:47.400 --> 00:12:49.656 पण मला उद्योजक व्हायचे होते म्हणून मी झालो नाही. 00:12:49.680 --> 00:12:53.056 पण खरंच काहीतरी शिकवावे हे माझे नेहमी स्वप्न होते. 00:12:53.080 --> 00:12:54.896 म्हणून मी म्हणालो, "मी विचारलं 00:12:54.920 --> 00:12:57.536 आणि कॉलेजच्या वर्गाला शिकवले तर काय होईल?" 00:12:57.560 --> 00:12:58.980 त्यावेळेस मी ऑस्टीनमधे राहायचो 00:12:58.980 --> 00:13:01.096 म्हणून मी ऑस्टीनच्या टेक्सास विद्यापीठात गेलो 00:13:01.120 --> 00:13:04.336 आणि प्राध्यापकांची दारं ठोठावून विचारलं, "मी तुमच्या वर्गाला शिकवू?" 00:13:04.360 --> 00:13:06.856 पहिल्या दोन वेळेस मला काहीच हाती लागलं नाही. 00:13:06.880 --> 00:13:09.376 पण मी पळालो नाही म्हणून मी ते करत राहिलो -- 00:13:09.400 --> 00:13:12.736 आणि तिसऱ्या प्रयत्नाच्या वेळी प्राध्यापक खूप प्रभावित झाले. 00:13:12.760 --> 00:13:14.816 ते म्हणाले, "याआधी असे कोणीच केलेले नाही." 00:13:14.840 --> 00:13:18.856 आणि मी पॉवरपॉईंट्स आणि शिकवायचा धडा याची तयारी करून आलो. 00:13:18.880 --> 00:13:20.936 ते म्हणाले. "छान, मी हे वापरू शकतो. 00:13:20.960 --> 00:13:24.296 तू दोन महिन्यांनंतर का येत नाहीस? मी तुला माझ्या अभ्यासक्रमात जागा देईन 00:13:24.320 --> 00:13:26.416 आणि दोन महिन्यांनंतर मी वर्गाला शिकवत होतो. NOTE Paragraph 00:13:26.440 --> 00:13:29.696 हा मी आहे -- कदाचित तुम्हाला दिसत नसेन, हा खराब फोटो आहे. 00:13:29.720 --> 00:13:32.496 असं बघा, कधी कधी प्रकाशाने तुम्ही नाकारले जाता. NOTE Paragraph 00:13:32.520 --> 00:13:33.720 (हशा) NOTE Paragraph 00:13:34.680 --> 00:13:35.896 पण वा -- 00:13:35.920 --> 00:13:38.656 जेव्हा मी तो क्लास संपवला, मी रडत बाहेर आलो, 00:13:38.680 --> 00:13:40.456 कारण मला वाटलं 00:13:40.480 --> 00:13:43.776 मी माझे आयुष्याचे स्वप्न पूर्ण करू शकलो केवळ विचारल्याने. 00:13:43.800 --> 00:13:46.456 मी विचार करायचो मला या सगळ्या गोष्टी मिळवाव्या लागतील -- 00:13:46.480 --> 00:13:50.096 शिकवण्यासाठी एक महान उद्योजक बनावं लागेल, किंवा पीएचडी मिळवावी लागेल -- 00:13:50.120 --> 00:13:51.656 पण नाही, मी फक्त विचारलं, 00:13:51.680 --> 00:13:52.880 आणि मी शिकवू शकलो. NOTE Paragraph 00:13:53.400 --> 00:13:55.776 आणि त्या फोटोत जो तुम्ही पाहू शकत नाहीयेत, 00:13:55.800 --> 00:13:59.096 मी मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांचे शब्द वापरले होते 00:13:59.120 --> 00:14:03.656 का? कारण माझ्या संशोधनात मला आढळलं कि जे लोक खरंच जगात परिवर्तन घडवतात, 00:14:03.680 --> 00:14:06.616 जे आपल्या जगण्याचा आणि विचार करण्याचा मार्ग बदलतात, 00:14:06.640 --> 00:14:10.736 ते असे लोक असतात ज्यांना प्रारंभी आणि नेहमी तीव्र नकार मिळालेला असतो. 00:14:10.760 --> 00:14:12.816 मार्टिन ल्युथर किंग ज्यु., महात्मा गांधी, 00:14:12.840 --> 00:14:14.896 नेल्सन मंडेला किंवा जिझस क्राईस्टसुद्धा 00:14:14.920 --> 00:14:16.456 यांसारखे लोक. 00:14:16.480 --> 00:14:19.856 त्यांना मिळालेल्या नकाराने ते ओळखले जात नाहीत. 00:14:19.880 --> 00:14:24.040 नकारानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रियेमुळे ते ओळखले जातात. 00:14:24.920 --> 00:14:26.480 आणि त्यांनी नकाराला कवेत घेतले. NOTE Paragraph 00:14:27.360 --> 00:14:30.576 आणि नकाराबाबत शिकण्यासाठी आपल्याला ते लोक व्हायची गरज नाही, 00:14:30.600 --> 00:14:31.856 आणि माझ्या बाबतीत, 00:14:31.880 --> 00:14:33.896 नकार माझा शाप होता, 00:14:33.920 --> 00:14:35.176 माझा बागुलबुवा होता. 00:14:35.200 --> 00:14:39.376 माझ्या संपूर्ण आयुष्यभर त्याने मला छळलं कारण मी त्यापासून दूर पळत होतो. 00:14:39.400 --> 00:14:41.120 मग मी त्याला कवेत घ्यायला लागलो. 00:14:41.800 --> 00:14:44.520 मी त्याचे रूपांतर आयुष्याच्या सर्वात मोठ्या भेटीत केले. 00:14:45.320 --> 00:14:49.776 नकारांचे रूपांतर संधींत कसे करावे हे मी लोकांना शिकवायला सुरुवात केली. 00:14:49.800 --> 00:14:51.816 मी माझा ब्लॉग, माझे व्याख्यान, 00:14:51.840 --> 00:14:53.986 माझे नुकतेच प्रकाशित केलेले पुस्तक वापरतो, 00:14:53.986 --> 00:14:58.320 आणि लोकांना नकाराच्या भयावर मात करता यावी याकरता तंत्रज्ञानसुद्धा विकसित करतोय. NOTE Paragraph 00:15:00.200 --> 00:15:01.936 जेव्हा आयुष्यात तुम्हाला नकार मिळतो, 00:15:01.960 --> 00:15:04.176 जेव्हा तुम्ही पुढच्या अडथळ्याचा सामना करत असाल 00:15:04.200 --> 00:15:06.216 किंवा पुढच्या अपयशाचा, 00:15:06.240 --> 00:15:08.056 शक्यतांचा विचार करा. 00:15:08.080 --> 00:15:09.296 पळू नका. 00:15:09.320 --> 00:15:10.536 जर तुम्ही त्यांना कवेत 00:15:10.560 --> 00:15:12.640 घेतले तर ते तुमचे वरदानही ठरू शकतील. NOTE Paragraph 00:15:13.160 --> 00:15:14.376 धन्यवाद. NOTE Paragraph 00:15:14.400 --> 00:15:18.744 (टाळ्या)