1 00:00:00,053 --> 00:00:01,479 माझ्या बालपणी, मिझुरी राज्यात 2 00:00:01,503 --> 00:00:04,155 आम्हांला जंगलात घेऊन जात. 3 00:00:04,179 --> 00:00:07,238 एक नकाशा आणि एक होकायंत्र देत, 4 00:00:07,262 --> 00:00:08,887 आणि घरची वाट शोधून काढायला सांगत. 5 00:00:08,911 --> 00:00:10,583 आणि होकायंत्राशिवाय 6 00:00:10,607 --> 00:00:12,089 नकाशा वाचतासुद्धा येत नाही. 7 00:00:12,113 --> 00:00:13,715 आज मी तुम्हांला तेच सांगणार आहे. 8 00:00:13,739 --> 00:00:14,972 होकायंत्र ही गुरुकिल्ली. 9 00:00:14,996 --> 00:00:16,228 [छोटी वस्तू.] 10 00:00:16,252 --> 00:00:18,124 [मोठी कल्पना.] 11 00:00:20,559 --> 00:00:25,256 सोप्या शब्दांत, होकायंत्र म्हणजे चुंबकीकरण केलेला धातूचा एक तुकडा, 12 00:00:25,280 --> 00:00:28,729 जो पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवाकडे वळतो. 13 00:00:28,753 --> 00:00:31,655 आपल्याला लगेच आठवते ते खिशात मावणारे छोटे होकायंत्र. 14 00:00:31,679 --> 00:00:33,200 ते घड्याळासारखे दिसते, हो ना? 15 00:00:33,224 --> 00:00:34,639 ते हातात धरता येते, 16 00:00:34,663 --> 00:00:37,045 आणि ती हेलकावणारी सुई स्थिर होताना पाहून 17 00:00:37,069 --> 00:00:38,596 उत्तर दिशा समजते. 18 00:00:38,620 --> 00:00:42,618 शास्त्रज्ञांसाठी अजूनही चुंबकत्व ही एक गूढ शक्ती आहे. 19 00:00:42,642 --> 00:00:45,825 पण होकायंत्र कार्य का करते, हे निश्चितपणे समजले आहे. 20 00:00:45,849 --> 00:00:48,071 कारण, पृथ्वी हे एक प्रचंड लोहचुंबक आहे. 21 00:00:48,095 --> 00:00:49,757 आपण जेव्हा होकायंत्र वापरतो, 22 00:00:49,781 --> 00:00:53,435 तेव्हा पृथ्वीच्या केंद्रबिंदूशी आपला थेट संबंध जोडला जातो. 23 00:00:53,459 --> 00:00:57,245 तिथे खदखदणारे द्रवरूप लोह एका गोलकाच्या स्वरूपात फिरत असते. 24 00:00:57,269 --> 00:01:00,235 ते चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. 25 00:01:00,259 --> 00:01:03,035 आपण टेबलावर खेळण्यासाठी वापरतो, त्या चुंबकाप्रमाणेच 26 00:01:03,059 --> 00:01:04,931 यालाही उत्तर व दक्षिण ध्रुव असतात. 27 00:01:04,955 --> 00:01:08,165 यामुळे आपण लोहचुंबक वापरून उत्तर दिशा शोधू शकतो. 28 00:01:08,743 --> 00:01:13,798 सर्वात जुने होकायंत्र ख्रिस्तपूर्व २०० वर्षांपूर्वी चीनमध्ये निर्माण झाले. 29 00:01:13,822 --> 00:01:17,047 त्यांना शोध लागला, की पृथ्वीतून मिळणारा हा धातू 30 00:01:17,071 --> 00:01:18,334 निसर्गतःच चुंबकीय आहे. 31 00:01:18,358 --> 00:01:21,106 त्यांनी या चुंबकीय धातूला 32 00:01:21,130 --> 00:01:22,959 डावासारखा आकार देऊन 33 00:01:22,983 --> 00:01:24,466 तो पितळेच्या ताटलीवर ठेवला, 34 00:01:24,490 --> 00:01:25,926 आणि तो उत्तर दिशा दाखवू लागला. 35 00:01:25,950 --> 00:01:28,730 याचा वापर मुख्यत्वे फेंगशुई सुधारण्यासाठी केला गेला असावा. 36 00:01:28,754 --> 00:01:32,281 त्यामुळे राहत्या जागेतली ऊर्जा उत्तम रीतीने कशी वाहती राहील 37 00:01:32,305 --> 00:01:34,044 हे त्यांना समजत असावे. 38 00:01:34,068 --> 00:01:36,769 बहुधा खलाशांनी सर्वप्रथम 39 00:01:36,793 --> 00:01:39,184 सोबत नेण्याजोगे होकायंत्र विकसित केले असावे. 40 00:01:39,208 --> 00:01:40,932 कारण सूर्य कोणत्याही स्थानावर असला, 41 00:01:40,956 --> 00:01:43,152 ताऱ्यांची स्थाने कोणतीही असली, 42 00:01:43,176 --> 00:01:45,042 तरी त्यांना कायम उत्तर दिशा समजावी. 43 00:01:45,066 --> 00:01:48,568 त्यानंतर बऱ्याच काळाने युरोपियन लोकांनी शोध लावला, 44 00:01:48,592 --> 00:01:50,418 तो नकाशावरच्या होकायंत्र-चिन्हाचा. 45 00:01:50,442 --> 00:01:51,765 त्यावर नेमक्या स्वरूपात 46 00:01:51,789 --> 00:01:54,335 पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशा दाखवल्या होत्या. 47 00:01:54,359 --> 00:01:57,795 त्याबरोबर आणखी दिशाही होत्या. 48 00:01:57,819 --> 00:02:00,916 वायव्य, आग्नेय वगैरे. 49 00:02:00,940 --> 00:02:03,648 त्यामुळे प्रथमच त्यांना आपल्या प्रवासाची दिशा कळू लागली. 50 00:02:03,672 --> 00:02:05,239 हे फार महत्त्वाचे होते. 51 00:02:05,263 --> 00:02:09,146 मला वाटते की हा युरोपियन विज्ञानाला नवी झळाळी मिळण्याच्या प्रक्रियेतला 52 00:02:09,170 --> 00:02:10,565 एक भाग होता. 53 00:02:10,589 --> 00:02:12,385 नवयुग हा शब्द आपल्या परिचयाचा असेल. 54 00:02:12,409 --> 00:02:14,685 अनेक नवीन उपकरणांचा या काळात शोध लागला. 55 00:02:14,709 --> 00:02:16,635 दुर्बिणीपासून सूक्ष्मदर्शक यंत्रापर्यंत. 56 00:02:16,659 --> 00:02:19,176 होकायंत्रामुळे नकाशांमध्ये सुधारणा झाली. हो ना? 57 00:02:19,200 --> 00:02:22,450 कारण त्यामुळे कोणती दिशा कुठे आहे ते समजते. 58 00:02:22,474 --> 00:02:23,784 जास्त सविस्तर माहिती मिळते. 59 00:02:23,808 --> 00:02:25,497 यामुळे जगाशी असलेल्या 60 00:02:25,521 --> 00:02:27,855 आपल्या संबंधात बदल घडून येतो. 61 00:02:27,879 --> 00:02:30,555 नकाशा आणि होकायंत्राची जोडी ही एक अद्भुत शक्ती असते. 62 00:02:30,579 --> 00:02:33,305 जगाचा जो इतिहास आपण जाणतो, 63 00:02:33,329 --> 00:02:35,909 तो होकायंत्राखेरीज घडला नसता: 64 00:02:35,933 --> 00:02:39,812 नव्या जगाचा शोध, मॅगेलनची पृथ्वीप्रदक्षिणा, 65 00:02:39,836 --> 00:02:41,945 पृथ्वी गोल आहे हा शोधदेखील. 66 00:02:41,969 --> 00:02:45,400 होकायंत्र हे इतर उपकरणांमध्ये समाविष्ट असते, 67 00:02:45,424 --> 00:02:47,767 कारण ते अत्यंत उपयोगी आहे. 68 00:02:47,791 --> 00:02:50,455 बहुउपयोगी उपकरणांमध्ये होकायंत्राचा समावेश असतो. 69 00:02:50,479 --> 00:02:52,412 ते मोबाईलमध्ये असते. 70 00:02:52,436 --> 00:02:53,692 होकायंत्र सगळीकडे असते. 71 00:02:53,716 --> 00:02:57,555 कारण अक्षरशः त्यामुळेच आपण जगात मार्ग शोधू शकतो. 72 00:02:57,579 --> 00:02:59,275 त्यामुळे तुम्ही जगाचा शोध घेऊ शकता. 73 00:02:59,299 --> 00:03:03,673 एखाद्या डोंगरापलीकडे किंवा क्षितिजापार काय आहे ते शोधू शकता. 74 00:03:03,697 --> 00:03:06,681 तसेच, होकायंत्राच्या भरवशावर घरची वाट शोधू शकता.